Saturday, November 22, 2014

संस्कृत नव्हे......!

भाषा हे वर्चस्ववादाचे नेहमीच जगभरचे एक साधन राहिलेले आहे. संस्कृत ही भाषा अर्वाचीन असून ती ग्रांथिक कारणांसाठी कृत्रीम रित्या बनवली गेली असुनही तिला साक्षात "देववाणी" चा अनादि दर्जा दिला गेला. वेद तर ईश्वराचे नि:श्वास बनले. खरे तर वेदांची भाषा आणि संस्कृत ही एकच भाषा नव्हे. वैदिक भाषेत पाचशेच्या वर द्राविडी, मुंडा व आस्ट्रिक शब्द व काही व्याकरणाची रुपे आलेली आहेत. विट्झेलने वेदांची भाषा प्राकृताचीच एक शाखा असल्याचे मत हिरीरीने मांडले आहे. वैदिक भाषा जुन्या काळातच संस्कत येणा-यांनाच अनाकलनीय झाल्याने ती समजावून सांगण्यासाठी निरुक्त-निघंटुची निर्मिती झाली. दोन्ही भाषांत प्रचंड फरक आहे. अगदी वेदांतील काही वर्णही संस्कृतात नाहीत. संस्कृतचा पुरावा इस. १५० पेक्षा मागे जात नाही. ही भाषा पुरातन नव्हे. तरीही हिरीरीने याबाबत प्रचार प्रसार करत संस्कृतला "भारतीय संस्कृतीचा चेहरा" म्हणण्याच्या थापा चालु झाल्या...त्या आजतागायत चालु आहेत व त्याही सरकारच्या पाठिंब्याने हाच खरा भारतीय संस्कृतीचा खून आहे.

वर्चस्वतावादासाठी जे जे संस्कृतात पारंगत तेच काय ते विद्वान व प्राकृतात पुरातन काळापासून जनव्यवहार व साहित्यव्यवहार करणारे ते हलके, दुय्यम अशी विभागणी केली गेली. स्त्री-पुरुष भेदाचाही जन्म संस्कृत साहित्याने घातला. उदा. सर्व संस्कृत म्हणवणा-या नाटकांतील स्त्रीपात्रे प्राकृतातुनच बोलतात...मग ती स्वर्गीची उर्वशी असो कि एखादी महाराणी का असेना! संस्कृत संवाद फक्त कथित उच्चभ्रु पुरुषांना! (विक्रमोर्वशीय) म्हणजे संस्कृत भाषेचा वापर समाज विभागण्यासाठी निरलसपणे केला गेला. स्त्री-पुरुष भेदभावासाठीही तिचा वापर केला गेला. वैदिक धर्मियांना त्यांच्याच धर्माच्या स्त्रीयांबद्दलचा इतका आकस पुर्वी का होता हे कळत नाही.

संस्कृत भाषेने प्राकृत भाषकांच्या मनात अखंडित न्युनगंड निर्माण करायचे अखंड कार्य केले. "संस्कृत देवांनी केली मग प्राकृत काय चोरांपासून झाली?" असे (बहुदा) एकनाथांनी दरडावून विचारले असले तरी त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. वैदिक धर्मियांनी संस्कृतचाही उपयोग एका हत्याराप्रमाणे केला. प्राकृत भाषा संस्कृतोद्भवच आहेत असे एवढे बिंबवले गेले आहे कि त्या भ्रमातून बाहेर निघणे आजही अनेकांना अवघड जाते. वास्तव हे आहे कि संस्कृत ही प्राकृतोद्भव भाषा असून सनपुर्व ३०० ते सन १५० या काळातील तिच्या प्राकृताची एक शाखा म्हणून विकसन झाल्याचे असंख्य शिलालेखीय व नाणकीय पुरावे उपलब्ध आहेत. तिचा विकास अनेक स्थळी झाला व शेवटी पाणिनीने सन २५० मद्ध्ये तिला व्याकरणात बांधले. अशी ही अर्वाचीन भाषा ग्रांथिक कारणासाठी निर्माण झाल्याने ती जनभाषा कधीच नव्हती. संस्कृत मद्ध्ये साहित्य निर्मिती होत असतांना त्यावेळचे पुरातन प्रेमी प्राकृतात साहित्यनिर्मिती करतच होते...महाकाव्ये लिहितच होते...इतकी कि प्राकृत साहित्यसंपदा हजारोंच्या घरात भरते. ही परंपरा नवनवे बदल स्विकारत अव्याहतपणे चालू राहिली आहे ती प्राकृत प्रवाही राहिल्याने व कालसुसंगत बदल स्विकारत गेल्याने.

पण कालौघात शिस्तबद्ध प्रचार करत संस्कृतला देववाणी म्हणवत-बिंबवत तिचे माहात्म्य वाढवले...भाषिक वर्चस्वतावादासाठी (ती इतरांना शिकू न देता) तिचा निरलस वापर केला. प्राकृतवाद्यांच्या मनात शिस्तबद्ध न्यूनगंड निर्माण केला गेला. जी भाषा प्राकृताचीच शाखा आहे हे सांगणारे व प्राकृताभिमानी लोक कालौघात नाहीसे झाले. तशी संस्कृतही नाहीशी झाली. आज तसा तिचा उपयोग फक्त भाषिक/ सांस्कृतिक संशोधकांपुरताच उरलेला आहे. लोक जेवढा ल्यटीन, सुमेरियन, ग्रीक, इजिप्शियन, पाली या म्रूत भाषांचा अभ्यास याच कारणांसाठी करतात तेवढाच संस्कृतचाही करतात. त्यापलीकडॆ संस्कृतचे स्थान नाही.
आपणच संस्कृतीचे निर्माते आहोत या गंडातील लोकांना निक्षून सांगायला हवे कि भारताची संस्कृती आद्य काळापासून प्राकृत भाषांत होती व आहे....

संस्कृत नव्हे!

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Now-saffron-outfit-wants-CBSE-schools-to-drop-foreign-languages/articleshow/45227407.cms 

33 comments:

  1. अतिशय सुंदर विचार !

    ReplyDelete
  2. भोंदू 'भगवान', भोळे भक्त!

    दिनेश गुणे

    तथाकथित तांत्रिक गुरू चंद्रास्वामी ते आताचे आसाराम बापू अन् रामपालबाबा.. जनतेच्या धार्मिक भावनांचे
    आणि अंधश्रद्धांचे भांडवल करून अनेक बाबा-बुवांनी आपापली दुकाने थाटली आणि गोळा केलेल्या मायेच्या जोरावर राजकारणापासून अन्य अनेक क्षेत्रांवर आपली हुकमतही गाजवली. या बाबा-बुवांच्या व्यवस्थेने जनजीवनात अनावश्यक आणि अनधिकृत लुडबुड सुरू केली आहे.
    ..'त्यांच्या' चेहऱ्यावर एक निरागस बाल्य विलसत असते.. डोळ्यांत मायेचा अपार सागर दडलेला दिसतो.. त्यांनी हात उचलताच तेजस्वी प्रकाशकिरणांनी आसमंत उजळून निघाल्याचा भास होतो आणि त्यांच्या हास्यातून प्रेमाचे झरे ओसंडू लागतात.. तोच विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारक आहे असे भासू लागते. त्याच्या चमत्कारांनी असंख्य आजार बरे होतात, त्याच्या कृपाप्रसादाने निपुत्रिकांना संतानप्राप्ती होते, निर्धनांना धनलाभ होतो.. भौतिक समस्यांचे सारे डोंगर भुईसपाट होतात.. त्याच्या दैवी शक्तीचा सर्वत्र बोलबाला सुरू होतो आणि संसारतापाने पोळलेल्यांची त्यांच्या दारी मुक्तीसाठी रीघ लागते. त्यांचा एक कृपाकटाक्ष व्हावा, यासाठी ताटकळण्याचीही त्यांची तयारी असते. त्यांचा सहवास लाभला, मस्तकावर त्यांचा हस्तस्पर्श फिरला, प्रसादाचा लाभ झाला, की भौतिक जगातील सारी दु:खे जणू झटक्यात दूर होऊन जातात आणि स्वर्गीय सुखाच्या अनुभूतीने मन आत्मानंदी रंगू लागते.. या अनुभूतीचे दाखले इतरांनाही दिले जातात आणि समस्यामुक्तीच्या शोधात भरकटणारे हजारो आत्मे बाबांच्या चरणी लीन होतात. आपल्याजवळ असलेले सारे काही बाबांच्या पायाशी ओतण्याची त्यांची तयारी असते. एकदा अशा समर्पणभावाने भारलेल्या भक्तांची फौज तयार झाली, की बाबांच्या आश्रमाभोवती नवनवे उपक्रमही सुरू होतात. एखादा बाबा रुग्णालय सुरू करतो, कुणी योगशिक्षणाचे वर्ग सुरू करतो. कुणी आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करतो आणि बाबांच्या समाजोपयोगी कामाने भक्तगण आणखीनच भारावून जातात..

    ReplyDelete
  3. अशा रीतीने, आधुनिक युगातील एक एक स्वयंप्रकाशी महापुरुषाचा उदय होऊ लागतो आणि भक्तसमुदायाच्या पाठिंब्यावर हा आधुनिक देव महान होऊ लागतो.. त्याचा जन्म, जगणे हा जणू चमत्कार होऊन जातो. बाबाच्या आयुष्याला चमत्काराच्या कहाण्या चिकटू लागतात..
    ..अशा बाबांचा आता सुळसुळाट झाला आहे. भक्तांच्या तिजोरीच्या चाव्या पायाशी खेळविणाऱ्या अनेक बाबांचे पितळ उघडे पडू लागले तरीही भक्तपरिवाराची त्यांच्यावरील श्रद्धा अभंगच आहे. 'भगवंतालाही आत्मक्लेश सहन करावे लागतात', असा भोंदू संदेश देत हे भुक्कड भगवंत आपल्या साम्राज्याचे दगड मजबूत ठेवण्यासाठी गजाआडूनही धडपडताना दिसताहेत. देवत्वाचा शिक्का कपाळावर मिरवत पशूलाही लाजविणारी कृत्ये करणारे हे बाबा असतात तरी कोण?.. महापुरुष, माफिया, लिंगपिसाट, देव, की देवदूत?.. ही सारी रूपे बेमालूमपणे वठवत, 'आपण केवळ निमित्तमात्र' असल्याचा आव आणणाऱ्या या भोंदूबाबांची साम्राज्ये उघडउघड उभी राहात असताना, त्यांच्या कारनाम्यांचा साधा सुगावादेखील सरकारी यंत्रणांना का लागत नाही?. किंबहुना, सरकारी यंत्रणांमधील उच्चपदस्थांची मांदियाळीच अशा बाबांच्या चरणाशी लीन होऊन कृपायाचना करताना का दिसू लागते?.. अशी कोणती शक्ती या बाबा-बुवांच्या अंगी असते, जिच्यापुढे साऱ्या यंत्रणा ढिल्या पडू लागतात?..
    ..याचे सरळ उत्तर एकच आहे. ते म्हणजे, ज्या बाबा-बुवाच्या मठ-आश्रमांच्या दारी भाविकांची अखंड वारी, तो बाबा महान.. त्याची कीर्ती पसरू लागते आणि त्याच्या चरणाशी साऱ्या यंत्रणाही लोळण घेऊ लागतात, कारण त्याला दुखावणे म्हणजे त्याच्या असंख्य अनुयायांच्या भावनांना थेट हात घालणे, त्यांची नाराजी ओढवून घेणे.. असे केले, तर बाबा-बुवांचा रोष ओढवणार आणि त्यांची अवकृपा झाली, तर त्यांचे असंख्य भक्तदेखील दूर होणार. त्याचा थेट परिणाम मतपेटीवरच होणार, या साध्या गणितापायी बाबा-बुवांची साम्राज्ये सुखाने फोफावत चालली आहेत.

    ReplyDelete
  4. हरियाणातील हिसार जिल्हय़ातील बाबा रामपाल नावाच्या स्वयंघोषित भोंदूला अटक झाली आणि अशा कथित महापुरुषांनी व्यवस्थेला केवढा जबरदस्त विळखा घातला आहे, त्याचे वास्तव पुन्हा उजेडात आले. सरकारी नोकरीत कनिष्ठ अभियंता असलेल्या या रामपालबाबाला आपण कबीराचा अवतार असल्याचा साक्षात्कार झाला आणि नोकरी सोडून १९९९ मध्ये त्याने सतलोक आश्रमाची स्थापना केली. तेव्हापासून त्याच्याभोवती गूढ वलय दाटत गेले. आज १२ एकरांवरील त्याच्या पंचतारांकित आश्रमात एक लाख लोक महिनाभर जेवण करू शकतील एवढा धान्यसाठा सापडला आहे. त्याच्या आलिशान आश्रमात सापडलेल्या गर्भनिरोधकांचे गूढ उकलण्यात आता तपास यंत्रणा कामाला लागली आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि दिल्लीत सुमारे २५ लाख लोक त्याच्या भजनी लागले असावेत, असा अंदाज आहे. भजनी लागलेल्या भाविकांच्या भाबडेपणाचा फायदा उठवत स्वत:च्या लैंगिक विकृतीचे उदात्तीकरण हा अनेक बाबांच्या धंद्याचा मूलमंत्र असल्याचे काही प्रकरणांत दिसून आले आहे. तरीही रामपालबाबावरील कारवाईच्या वेळी हजारो लोकांनी त्याच्याभोवती संरक्षक कवच उभे करून प्रतिकार केला. हे त्याचे भक्त होते, की बंदिवान होते, याची चर्चा आता नव्याने सुरू झाली आहे.
    पुण्यसंचयासाठी ज्याच्या दारी हजारोंची रीघ लागते, तो बलात्कारी असतो, बालकांवरील लैंगिक अत्याचाराचा डाग त्याच्या कपाळावर दडलेला असतो, महिलांच्या लैंगिक शोषणाचे आणि हत्या, अपहरणासारख्या गुन्हय़ांचा ठपकाही त्याच्या स्वयंघोषित दैवी आयुष्याला लगडलेला असतो. रामपालला अटक झाली, त्याच्या काही महिने अगोदर, आसाराम बापू नावाच्या एका स्वयंघोषित आध्यात्मिक बाबाला गजाआड जावे लागले. त्याच्या 'कृष्ण'लीला उजेडात येऊनही, त्याच्या भजनी लागलेल्या भक्तांसाठी आसाराम हा कृष्णावतारच आहे. लैंगिकतेचा खुला पुरस्कार हेच जणू त्याचे अवतारकार्य होते. एका १५ वर्षांच्या बालिकेवरील बलात्कार प्रकरणातून आसारामाच्या लीला उजेडात आल्या आणि तो गजाआड गेला. त्याआधी त्याच्या गुजरातमधील आश्रमातील दोन मुलांचे कुजलेले मृतदेह साबरमतीच्या तीरावर आढळले होते. या गूढ मृत्यूमुळे आसारामभोवतीचे संशयाचे ढग गडद झालेच होते. तरीही, आसाराम हा असामान्य संत असल्याचा डांगोरा त्याचे भक्तगण पिटतच आहेत. देशभरात जवळपास सव्वाचारशे आश्रम आणि ५०हून अधिक गुरुकुल शाळांचा पसारा असलेल्या आसारामबापूवर आणि त्याच्या मुलावर संपत्ती आणि मालमत्ता हडप केल्याचाही आरोप आहे.

    ReplyDelete
  5. आसारामसारखाच एक स्वयंघोषित अवतार कर्नाटकातील बंगलोरजवळील बिदादी येथे उदयाला आला होता. स्वत:ला स्वामी नित्यानंद म्हणविणारा हा भोंदू २०१० मध्ये एका स्थानिक टीव्ही वाहिनीवर एका तमीळ अभिनेत्रीसोबत नको त्या स्थितीत लोकांना दिसला आणि त्याचे कारनामे उजेडात येऊ लागले. आरती राव नावाची एक भारतीय वंशाची अमेरिकन महिला त्याच्या जाळ्यात फसली होती. तिने त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचे जाहीर आरोपही केले होते. मात्र नित्यानंदने हे आरोपही फेटाळून लावले. तिच्या तक्रारीवरून नित्यानंदला अटक झाली; पण ५३ दिवसांनंतर तो बाहेरही आला. आपल्या 'भगवंतमुखा'तून निघणाऱ्या प्रवचनवाणीने भक्तांवर मोहिनी घालणाऱ्या या स्वामीला, 'माइंड बॉडी स्पिरिट' नावाच्या नियतकालिकाने 'जगातील सर्वात प्रभावशाली १०० आध्यात्मिक गुरूं'च्या मालिकेत बसवून गौरविले होते. २७ भाषांमध्ये ३०० पुस्तके लिहिणारा हा 'स्वामी' वास्तव जीवनात मात्र 'भिकार चाळे' करणाराच निघाला.
    'आध्यात्मिक गुरू' म्हणवून घेणाऱ्यांच्या पंथातील ज्या काही बाबांनी राजकारणावरही आपल्या प्रभावाची मोहिनी घातली होती, त्यामध्ये बाबा रामदेव या योगगुरूचेही नाव घेतले जाते. योग प्रसारकार्य करणारा हा गुरू, राजकीय भाष्य करण्यातही नेहमी आघाडीवर असतो. देशविदेशात पसरलेल्या 'हाय प्रोफाइल' भक्तगणांचा मोठा परिवार पाठीशी असल्याने रामदेव बाबा हे राजकारणातील 'बडे प्रस्थ' ठरले असून अलीकडेच या संन्याशाला सरकारी 'झेड प्लस' सुरक्षा पुरविण्यात आली आहे. जून २०११ मध्ये दिल्लीतील रामलीला मैदानावरील त्यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसी फौजा दाखल होताच साडी नेसून बाबांनी पळ काढला होता, याची आठवण अजूनही अनेकांच्या मनात ताजी आहे. काळ्या पैशाच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या रामदेव बाबांनी करचुकवेगिरी केल्याचा, शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आणि वीजचोरी केल्याचा आरोप 'तहलका' या नियतकालिकाने केल्यानंतर रामदेव बाबांच्या व्यवहारांभोवती गूढ वलय निर्माण झाले. रामदेव बाबांच्या ट्रस्टमार्फत चालविल्या जाणाऱ्या 'दिव्य फार्मसी' या औषध कंपनीतील उत्पादनांमध्ये मानवी आणि प्राण्यांच्या हाडांचा वापर केला जात असल्याचा आरोप करून माकपच्या वृंदा करात यांनी खळबळ माजविली होती.
    बाबा रामपालचे अनुयायी आणि आर्य समाजचे कार्यकर्ते यांच्यातील संघर्षांतूनच रामपालचे कारनामे उघड होत गेले. याच आर्य समाजचे एक विचारवंत नेते म्हणून स्वामी अग्निवेश यांचा राजकारणातही प्रभावी उदय झाला. हरियाणातील आमदारकीपासून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या या स्वामींनी चित्रवाणीवर गाजलेल्या 'बिग बॉस'च्या घरातही काही दिवस घालविले होते. समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात अण्णांच्या खांद्याला खांदा लावून उतरलेल्या या स्वामींचे पुढे काही बिनसले आणि त्यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासूनच फारकत घेतली. हजारे यांच्यावर कारवाई करावी असे सरकारमधील एका वरिष्ठ व्यक्तीस सुचवितानाच्या त्यांच्या व्हिडीओमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. हा व्हिडीओ बनावट असल्याचा बचाव अग्निवेश यांनी केला; पण त्यांना चौफेर टीका झेलावी लागली.

    ReplyDelete
  6. राजकारण्यांचे 'तांत्रिक गुरू' म्हणून ख्याती मिळविलेले चंद्रास्वामी हे एक गूढ व्यक्तिमत्त्व होते. आर्थिक गैरव्यवहारांचा शिक्का कपाळावर बसलेल्या चंद्रास्वामी यांचे अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध होते. परकी चलन कायद्याच्या भंगप्रकरणी त्यांना सुमारे नऊ कोटींचा दंड भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. लंडनमधील एका व्यावसायिकाच्या फसवणूकप्रकरणी त्यांना १९९६ मध्ये अटक झाली होती. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात चंद्रास्वामी यांच्याभोवती संशयाचे वलय निर्माण झाले होते. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या जैन आयोगाने आपल्या अहवालात चंद्रास्वामींवर काही पाने खर्ची घातली; पण अद्यापही त्यांच्या सहभागाबाबतचा कोणताच निश्चित निष्कर्ष निघू शकलेला नाही. या कटाच्या आर्थिक बाजूमध्ये त्यांचा सहभाग असल्याच्या संशयावरून तपास सुरूच आहे. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्यापासून कुख्यात शस्त्रास्त्र तस्कर अदनान खशोगीपर्यंत अनेकांचे तांत्रिक गुरू म्हणून त्यांची ख्याती आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या पंतप्रधानपदाचे भाकीतही त्यांनी अगोदरच वर्तविले होते, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते नटवर सिंह यांनी केला आहे. मध्यंतरी काही काळ काहीसे मागे पडलेल्या चंद्रास्वामींचा दरबार आता पुन्हा सजू लागला असून अनेक पक्षांचे नेते आपली कुंडली घेऊन चंद्रास्वामींच्या दरबारात हजेरी लावत असल्याचे बोलले जाते.
    पंजाबमध्ये १९४९ साली 'डेरा सच्चा सौदा' नावाच्या एका आध्यात्मिक संघटनेची स्थापना झाली. समाजसेवा आणि धर्मप्रसार या उद्दिष्टाने ही संघटना काम करते, असे सांगितले जाते. संघटनेचे सध्याचे प्रमुख गुरमीत राम रहिम सिंह यांना या पंथाचे अनुयायी ईश्वराचा अवतार मानतात. डोळे दिपविणारी सांपत्तिक स्थिती असलेल्या या धर्मगुरूने अवैध मार्गाने ३०० कोटींहून अधिक मालमत्ता जमविल्याचाही आरोप आहे. आसाराम बापूंवर बलात्काराचा आरोप झाल्यावर त्यांच्या बचावाकरिता धाव घेणाऱ्या या संतावरही महिला अनुयायांच्या लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. मुंबईतील मुलुंड उपनगरातील गोळीबार प्रकरणानंतर डेरा सच्चा सौदा हे नाव मुंबईतही चर्चेत आले. राम रहिम सिंह यांच्या अनुयायांनी हा गोळीबार केल्याचा आरोप केला जातो. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता.
    देशात बहुचर्चित असलेल्या आधुनिक संतांच्या मांदियाळीत श्री श्री रविशंकर यांचे नाव अग्रक्रमावर आहे. 'आर्ट ऑफ लिव्हिंग'- म्हणजे जगण्याची नवी शैली शिकविणारे श्री श्री रविशंकर 'योगी' म्हणविले जात असले तरी प्रत्यक्षात त्यांचा उल्लेख 'श्रीमान योगी' असाच करावा लागेल. ५०० कोटींहून अधिक संपत्तीचा मालक असलेला हा गुरू, जनतेला जगण्याची कला शिकवितो. पौराणिक कथाकथन करून धर्मभावाचा प्रसार करणारे मोरारी बापू यांच्याकडेही ३०० कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे बोलले जाते. ही सारी संपत्ती दानाच्या स्वरूपात प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते.

    ReplyDelete
  7. माणसाच्या अंगी दैवी शक्ती कुठून येते?.. आपल्या भक्तांची मती हा मानवी भगवान चमत्काराने कशी गुंग करून टाकतो? असे चमत्कार खरेच शक्य असतात का?. अशा प्रश्नांवर वादविवाद होत असले, तरी पुट्टापर्थीचे सत्य साईबाबा हे साक्षात साई अवतार आहेत आणि त्यांना कोणतीही गोष्ट अशक्य नाही, अशी त्यांच्या भक्तांची श्रद्धा आहे. सत्य साईबाबा यांच्या आश्रमावरही अशीच श्रीमंतीची झळाळी दाटलेली दिसते. ते हयात असतानाच्या त्यांच्या चमत्कारांच्या अनेक कथा अजूनही रंगवून वर्णन केल्या जातात. राजकीय वर्तुळातील अनेक बडय़ा नेत्यांचे गुरू असलेले सत्य साईबाबा यांच्या राजकीय गुरूचे रूप माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांनी केलेल्या पाद्यपूजा सोहळ्यामुळे महाराष्ट्राला अनुभवता आले. सत्य साईबाबांच्या निधनानंतर त्यांच्या आश्रमातील संपत्तीची मोजदाद करताना अनुयायी थकून गेले होते, असे सांगतात. सत्य साई ट्रस्टची मालमत्ता ४० हजार कोटींच्या घरात असावी, असा अंदाज वर्तविला जातो.
    धर्म हा भारतीय जनजीवनाचा अविभाज्य हिस्सा आहे. जनतेच्या धार्मिक भावनांचे आणि अंधश्रद्धांचे भांडवल करून अनेक बाबा-बुवांनी आपापली दुकाने थाटली आणि गोळा केलेल्या मायेच्या जोरावर राजकारणापासून अन्य अनेक क्षेत्रांवर आपली हुकमतही गाजवली. धर्म आणि अध्यात्माच्या नावावर, ईश्वराचे नाव घेत जनतेची फसवणूक करणाऱ्या बाबा-बुवांनी आध्यात्मिक क्षेत्र आणि श्रद्धाळू जनतेचे जगणेही गढूळ करून टाकले. केवळ संपत्तीच्या जोरावर बसविलेले बस्तान आणि जनतेच्या श्रद्धांचे भांडवल करून थाटलेल्या साम्राज्याच्या तेजाने राजकारणही दिपून गेले आहे. जनजीवन सुरळीत चालण्यासाठी अनेक बाबी आवश्यक असतात. या बाबींची घडी बसावी आणि दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी काम करणाऱ्या व्यवस्थांना अधिकृतपणा असतो. आजकालच्या बाबा-बुवांच्या व्यवस्थेने मात्र जनजीवनात अनावश्यक आणि अनधिकृत लुडबुड सुरू केली असूनही, या व्यवस्थेला वेसण का घातली जात नाही, हा प्रश्नच आहे. उलट, वादाची वलये स्वत:भोवती मिरविणारे तथाकथित साधुसंत आणि बुवा-बाबा राजकारण्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात आणि राजकारणी नेते त्यांच्यासमोर विनम्रतेने नतमस्तक होतात, तेव्हा खरे काय, याचा संभ्रम समाजात बळावतो. अनधिकृतपणे समाजव्यवस्थेत वावरणाऱ्या या शक्तीची योग्य ती घडी बसविण्याची वेळ आता आली आहे. रामपालबाबा प्रकरणानंतर हे स्पष्ट झाले आहे.
    समाप्त.

    ReplyDelete
  8. संजय सर , आपल्या अनमोल लेखाबद्दल आनंद वाटत आहे !पण काही शंका निर्माण होतात आणि त्याचे निरसन आपणच कराल असे वाटते
    काही शंकांचे आपण खुलासे केले तर आम्हास विषय समजण्यास सुलभ जाईल म्हणून ही विनंती ,
    १) महाभारत आणि रामायण हे मूलतः प्राकृतात लिहिले गेले का ?कारण आपल्यामते संस्कृत फारफार तर इसपू ३०० वर्षे जुनी आहे असे आपण म्हणता !आणि पाणिनीने इस २५० ला तिला व्याकरणात बांधले - म्हणजेच आजचे महाभारत हे व्याकरणदृष्ट्या सदोष नसल्यास त्याचे इस२५० मध्ये पुनर्लेखन झाले असेच म्हणायला पाहिजे
    २) आपण मागे एकदा सांगितले आहे की रामायण हे महाभारता नंतर घडले असावे त्याबाबत
    साधारण वर्षांच्या हिशोबात काही सांगता येईल का ?आम्हास फार उत्सुकता आहे
    ३) त्या काळच्या प्राकृत लिखाणाची - म्हणजे संस्कृतपूर्व प्राकृताची काही झलक , वैशिष्ठ्ये सांगता आली आणि समजली तर आनंद होईल
    ४) कोणत्याही माणसाला अगदी पं नेहरुनाहि - आपल्या संस्कृतभाषा आणि महाकाव्यांबद्दल नितांत आदर होता - आज पर्यंत कुणा भारतीय इतिहासकाराने याबाबतआपणासदृश सिद्धांत मांडला आहे का ?- त्यांच्या संशोधनाचे पुस्तक रुपात - थेसिस स्वरूपात लेखन उपलब्ध आहे का ?
    ५) आपली मानली जाणारी भारतीय संस्कृती साधारणपणे कधी सुरु झाली असे आपण मानता ?इंद्रादी देवता मानणाऱ्या वैदिकांपासून का त्याही आधीच्या शैव पंथापासून ?
    ६) वैदिक इथलेच , या मातीतालेच का बाहेरून घुसलेले घुसखोर ?त्यांचे वर्चस्व पुढे निर्माण झाले असेल तर त्यांनी शैवांचा भौतिक आणि सामाजिक पराभव कधी केला का ?त्याचा काल कोणता ?
    ते वाग्युद्ध प्राकृतात झाले का संस्कृतात ?कारण बौद्ध आणि इतर दर्शने या बाबत जो वाद
    आद्य शंकराचार्यांनी घातला तो संस्कृतात घातला असे मानले जाते - त्यावेळेस जैन बौद्ध दर्शने होती आणि त्यांचा पराभव त्यांनी केला असे मानले जाते - त्यावेळेस सर्वच लोक संस्कृत वापरत होते असे दिसते - म्हणजेच पाणिनीने पक्की केलेली संस्कृत भाषा इ स १००० काळात पक्की रुजली होती असे दिसते परंतु असे मानण्यास वाव आहे की ई स १००० साली एकाच वेळी ब्राह्मण वर्ग संस्कृत आणि बहुजन प्राकृत भाषा वापरत होते -
    ७) प्राकृताच्या स्थानिक वापरातून , लकबीतून , प्रांतिक भाषांना प्रोत्साहन मिळाले आणि बंगाली , कानडी , मलयालम , पंजाबी इत्यादी भाषा निर्माण झाल्या
    आपले याबाबतचे विवेचन समजून घेण्यास आम्ही उत्सुख आहोत !
    या सर्व घादामोदिमध्ये वैदिकनचा शिरकाव बाहेरून झाला का ते या मातीतालेच आहेत हे समजणे आम्हास फार महत्वाचे वाटते
    ८) मुसलमान हे इथले नाहीत आणि त्यांच्या श्रद्धा इथल्या नाहीत - त्यांची तोंडे मक्केकडे - , पण मग वैदिक हे मूळचे इथलेच का ?
    धन्यवाद

    ReplyDelete
  9. @pratibha pratima

    तुम्ही स्वतः च्या profile सोबत कुत्र्याचा फोटो लावला आहे, या मागचे रहस्य काय? अन भाषा सुद्धा तशीच आहे, कुत्र्या सारखी?

    फोटो बदला, भाषा बदला!

    ReplyDelete
  10. , नितांत सुंदर लेखाखाली लिहा वाचा या नावाने इतके भरमसाट कुणी लिहिले आहे त्याचा आणि आपल्या लेखाचा सुतराम संबंध नाही - मग आपण हे असे विरस करणारे
    लिखाण का प्रसिद्ध करता? -

    तसे पाहिले तर अक्कलकोट स्वामी महाराज , गजानन महाराज , साईबाबा पुण्याचे शंकर महाराज आणि अनेक पूर्वीचे तथाकथित महाराज ह्यांच्या बाबतीत तरी आपण छातीठोकपणे कुठे सांगू शकतो - ? कोणतीही वस्तू कधीही इकडची तिकडे करता येत नाही आणि पूर्वीचे हे महाराज
    खटा खट आपली योगशक्ती (?) वापरून चमत्कार करत - आजचे महाराज चोर आणि चक्क गुन्हेगार आहेतच - पण पूर्वीचे हे महाराज तरी संत होते का ? त्यावरही लिहा वाचाने मोकळेपणे भाष्य करावे - कारण त्या मठांची संपत्ती सुद्धा अगणित होत आहे -
    आजकाल धार्मिक टुरिझम अफाट वाढत आहे - हे अभ्यास करण्यासारखे आहे -
    माझ्या लहानपणी मांढर देवीचा मागमूस नव्हता - आता ते प्रचंड प्रस्थ बनले आहे -
    आणि आतातर परत पशुबळी देणे आणि हिंसा याचा उद्रेक होऊ पहात आहे - याचापण विचार करा

    ReplyDelete
  11. लिहा वाचा याना -,
    मीतरी काहीच गैर या लेखाबद्दल लिहिलेले नाही , मग त्यांनी मला असे कुत्र्याच्या चित्राबद्दल आणि भाषेबद्दल का लिहावे ? फार वाईट वाटले !
    लिहा वाचा सर ,
    आपणास माझ्याकडून या लेखाच्या प्रतिक्रियेत काही गैर शिवीगाळ लिहिली गेली आहे का ? मी तर सभ्य लिहिले आहे , ती कुत्री आमच्या आईची अत्यंत प्रिय होती आणि आईच्या दुःखद निधना नंतर मूकपणे तिने प्राण सोडला - शब्दात न मावणाऱ्या भावना व्यक्त करत ती आम्हास सोडून गेली - असो -
    पण हे मी लिहिलेही नसते - आपण विनाकारण विषय वाढवलात आणि दोष दिला याचे दुःख होते आहे कारण संजय सरांनी एक अप्रतिम लेख लिहिला आहे आणि त्याबाबत फक्त काही शंका विद्यार्थी या नात्याने मी विचारल्या इतकेच !

    ReplyDelete
    Replies
    1. @pratibha pratima November 23, 2014 at 2:18 AM

      खोटारडी, क्षमा करा, खोटारडा कुठला (कुत्रा)?

      Delete
  12. लिहा वाचा ,
    आज देवदिवाळी,
    आपण असे का लिहावे - एखाद्याने कोणाचा फोटो वापरावा हे त्याच्यावर सोडावे आपण त्यात पडू नये असे वाटते ,प्रत्येकाने आमच्या सारखा देवाचा फोटो वापरावा असा अट्टाहास आम्ही करावा का ? तेही गैरच ठरेल तसेच तुमचे लिहिणेही गैर आहे - खरेतर संजय सरांनी अशा वर्तनाची लगेच दाखल घ्यावी असे आम्हाला वाटते
    आणि त्यांनी अर्वाच्य भाषा वापरली असे का वाटावे हे मात्र विचारावेसे वाटते
    त्याना - प्रतिभा आणि प्रतिमा यांना सरांचा हा लेख आवडला आणि त्यांनी काही त्यांच्या बुद्धीप्रमाणे काही शंका विचारल्या आहेत - त्यात भाषा बदला सांगण्यासारखे काय आहे ?आम्हालापण समजून घेण्यास आवडेल !
    सर्वाना देवदिवाळीच्या शुभेच्छा !

    ReplyDelete
  13. लिहा वाचा यांनी एक पुस्ती म्हणून चागला माहितीपर लेख जोडला आहे , आणि मुळचा
    संजय सरांचा लेखही अत्यंत सुंदर झाला आहे - त्यावर प्रतिक्रिया म्हणून प्रतिमा प्रतिभा ताईने आणि इतरांनी चांगले प्रश्न विचारले आहेत
    मी हा ब्लोग नियमित वाचतो आणि त्याचे नेहमीच कौतुक केले जाते कारण यामध्ये वैदिक शैव यांच्या बाबत नेहमीच उद्बोधक माहिती असते ,
    आम्हासही अनेक प्रश्न पडले आहेत -
    वैदिक काळ हा महाभारता पूर्वीचा आहे का ? आजच्या भाषेत पांडव हे कोण मानायचे -
    वैदिक क्षत्रिय ? तेन्वांचे गुरु कृप , द्रोण वगैरे ब्राह्मण होते का ? त्यांना इंद्रादी देवता मान्य होत्या म्हणजे हे सर्व वैदिक धर्म मानणारे होते का ?
    त्यांना शिकवणारे सर्व गुरु ब्राह्मण ? ते आपापसात कोणती भाषा बोलत असतील ?संस्कृत का प्राकृत ? आजही सर्वमान्य असे मिक्श्चर हे इंग्रजी आणि हिंदी असे आहे - तसेच काही तेंव्हा होते का ?आणि प्रकृताचे व्याकरण कोणी , कधी निर्माण केले - ती भाषा मराठी कोकणी असे जे आहे तसेच काहीतरी होते का ?
    काही लोक आजही कोकणीला मराठीपेक्षा जास्त प्युअर मानतात - आणि मराठीला हिंदी इंग्रजीमुळे बिघडलेली मानतात -
    महाभारतातील अनेक अर्जुन भीम अशी नावे आजही प्रचलित असली तरी द्रौपदी कुंती युधिष्ठीर दृष्टद्युम्न शिशुपाल द्रोण कर्ण अशी नावे आज वापरात नाहीत असे का व्हावे ?
    वैदिक धर्माचा परिणाम आपल्यावर कोणत्या प्रकारे शिल्लक आहे आणि तो घालवण्यास काय करावे ?

    ReplyDelete
  14. चांगले प्रश्न आहेत. काहींबाबत मी "भाषेचा उदय" या लेबलांतर्गत याच ब्लोगवर लिहिलेले आहे. उरलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे उद्या देतो. धन्यवाद. (आपसात वाद घालु नये ही विनंती.)

    ReplyDelete
    Replies
    1. Mr. Sanjay, no answer? You said that you will answer tomorrow, i.e. 24 November. I am waiting for your answers.

      Delete
    2. आप्पा - वा वा - फारच डोंगरा इतकी माहिती मिळाली -
      बाप्पा - खरेच संजयने अनेक प्रकारचे परिपक्व लिखाण दिले आहे - - आपले काही प्रश्न आपण विचारून आपलेच हसे करून घ्यायचे कारे आप्पा - ? नाही म्हटले तरी थोडी लाज वाटते नाही का ?
      आप्पा - का नाही विचारायचे ? हा ब्लोग त्यासाठीतर आहे !असे संजयच सांगत असतो !आणि एक पाहिलेस का , आता संजयने अनोनिमास लोकाना या ब्लोग वरून कायमचा डच्चू दिलाय - त्यामुळे फालतूगिरी एकदम बंद !फार उत्तम झाले -एक दिलासा मिळाला !
      बाप्पा - संजयचे "भाषेचा उदय "हे प्रकरण अगदी सलग वाचले आपण ! खूप मन रमले त्यात - कितीतरी शिकायला मिळाले ! मनात अनेक प्रश्न - उप प्रश्न हिंदोळायला लागले - अजूनच हुरूप आला आहे !खरेतर दिव्यदृष्टी मिळाली असे म्हण जगाकडे बघायची -
      आप्पा - दृष्टीचे काही बोलू नकोस - आजच नवा चष्मा करून आणलाय !
      मला प्रश्न पडलाय की मग महाभारत आणि रामायण या कथापण कदाचित कनिष्क आणि तत्सम राजसत्ते बरोबर इकडे आल्या असतील का ?आणि संस्कृत भाषा इतकी तरुण असेल तर मारून मुटकून तिला म्हातारे कशासाठी केले जात आहे ? हा हव्यास कशासाठी ? केवळ तिला देवभाषा ठरवले आहे म्हणून ?हा इतका खटाटोप कोणी आणि कधी केला असेल - त्याचे काहीतरी गणित असणारच -त्याचे पुरावे सापडतात का तेपण पाहिले पाहिजे !
      बाप्पा - असेच जर भाषे सारखे देव या कल्पनेचे पण संशोधन केले तर ?

      Delete
    3. आप्पा - देव ही गरज आहे हे कसे विकसित झाले असेल ?एकाने दुसऱ्याला - तोंडातोंडी ? स्वानुभव हा भाव कधी रुजला असेल ?अनेक प्रकारे विचार करावासा - मांडावासा वाटतो रे बाप्पा - हे इतके प्रचंड संस्कृत लिखाण आणि वाग्मय कसे निर्माण झाले ?का ती देवांची भाषा - धर्माची भाषा - किंवा आज जसे हिंदी-इंग्रजी एकत्र वापर होतो - म्हणजे इलाईट क्लास फ़्लुएंट इंग्रजी आणि समाजासाठी हिंदी असा तर प्रपंच होत नसेल ना ?

      बाप्पा - अजून एक दुसरा विचार सुचतो - तो म्हणजे त्याकाळातले ब्राह्मण सुद्धा प्राकृत बोलत असणार ?त्याकाळीही आमची जात उच्च असे प्राकृतात मिरवत असणार ?शौच अशौच , विटाळ या कल्पना कधीच्या ? कारण आपल्या संस्कृतीत हे एक लोढणे कितीतरी वर्षे आपण वहात आहोत - अशा छोट्याछोट्या गोष्टींची दखलही जर घेतली तर विषय हलका आणि समजायला सोपा होत जाईल - नाही का ?
      आप्पा - पण काहीही म्हण बाप्पा - हे एक आक्रीतच आहे म्हणायचे !इतके चपखलपणे आपले घोडे कुणी दामटले असेल ?कोणाचा स्वार्थ असणार त्यात तेच कळत नाही - कारण सर्वांचीच भाषा प्राकृत मग कोणी इतका जीवघेणा उद्योग आरंभला असेल - आटापिटा केला असेल की इतिहासच फिरवून टाकायचा ?केव्हढे हे कारस्थान !
      बाप्पा - म्हणूनच तर एक मन म्हणते काहीतरी चुकते आहे !
      आप्पा - मग असेच विचार करत गेले तर ही एक थरार कथाच बनत जाते - प्रत्येक कथेत एक प्लॉट असतो तसा यात कोणाचा स्वार्थ धरायचा ?मुळात त्याकाळात ब्राह्मण वर्गही प्राकृतातूनच सत्ता भोगत असेल का ?असणारच ! ते तेंव्हा होतेच - असणारच - हो ना संजय ? एकदम नवीन भाषा आवश्यक का वाटू लागली असावी हेच कोडे उलगडत नाही - आणि त्यावर आपला पगडा असावा असे ब्राह्मण वर्गाला का वाटले असावे ? इतका आडनिडा द्राविडी प्राणायाम ब्राह्मणवर्ग करेल का कारण अगदी सोप्या भाषेत पाहिले - सिंहावलोकन केले तर - सत्तेची पकड घट्ट करण्यासाठी धडपड - हा मनुष्यस्वभाव आहे - तसे नसते तर फक्त पाणपोयाच बांधल्या असत्या राजेलोकांनी किंवा व्यापारी वर्गानी !पण आर्थिक सत्तेचे प्रकटीकरण करण्याचा एक मार्ग म्हणून सत्ताधीश अशी कामे करत असत - आजही करतात !
      आप्पा - ज्या वेळेस ग्रामराज्ये होती त्यावेळेस काय असेल आणि मगधा सारख्या महासत्ता निर्माण झाल्या त्यावेळची निकड वेगळी असेल का ? हाही एक विचार मनात येउन जातो !

      बाप्पा - थोडेसे गमतीने सांगायचे तर प्रभातचे साधे सरळ पण सकस चित्रपट आणि एकदम न झेपणाऱ्या नजरबंदी होणाऱ्या निर्मितीतून आलेला शोले सारखे प्रचंड आवाक्याचे आणि ताकतीचे चित्रपट -याचा एकत्र अभ्यास करताना आपले काय होते ?तसेच काहीतरी या संस्कृत आणि प्राकृत प्रकरणात होते !
      आप्पा - प्राकृत कडून संस्कृत किंवा संस्कृत कडून प्राकृत अशी वाढ ही काहीकेल्या नैसर्गिक का वाटत नाही ?
      बाप्पा - भारतीय उपखंडात एक सर्व समावेशक मापदंड म्हणून संस्कृतची निर्मिती - एका भाषेची मानावी का ? तर तसेही नाही ! ही काही सामाजिक किंवा धार्मिक गरज होत नाही ,सत्तेची गरजही असेल असे वाटत नाही ! का तसे असेल ?

      आप्पा - तुकाराम रामदास उत्तम लेखन मराठीतून करत होते आणि छत्रपति शिवाजी महाराजांनी मात्र आपला राज्यकोष संस्कृत मधून का लिहावा ? फारसी नको हे ठीक , पण मराठी का नको ? ते मात्र समजत नाही ! का काव्याइतकि गद्य मराठी सशक्त झाली नव्हती असे समजायचे ?

      बाप्पा - स्थानिक प्राकृत असा एक शब्दप्रयोग संजयने केला आहे तो पण समजत नाही - असे करत गेले तर मूळ प्राकृत कोणती धरायची ?गंगाकाठची का कृष्णाकाठची ?
      आप्पा - आणि या सर्व उद्योगात दक्षिण भारताचे काय ?कनिश्क आले,शक आले - त्यांच्या कडून अनेक सामाजिक बदलांची सुरवात झाली - पण त्यापूर्वी दक्षिणेत काय चालले होते - तिथपर्यंत वरून येणाऱ्या लाटांचा परिणाम झालाच नसेल तर - तेथील प्राकृत कशी होती ?देशभरातील प्राकृताचे व्याकरण एकच एक असेल असे पटत नाही त्याची संगती लागत नाही !
      बाप्पा - बापरे - चार वाजले - चहाची वेळ झाली - घरी ओरडा सुरु असेल - आता मोबाइल घेतला पाहिजेल !
      आप्पा - आमच्या घरी चल , चहानंतर फोन करू आणि मग निवांत गप्पा चालू ठेऊ !
      संजयला विचारू येणार का ते ! काय संजय ?

      Delete
  15. संस्कृत सगळ्याच भाषांची जननी नव्हे !

    अतुल पांडे

    ' संस्कृत ही सगळ्या भाषांची जननी आहे , असा एकांतिक आग्रह कुणीच धरू नये . ती सर्वच भाषांची जननी नव्हे , ती बहुसंख्य अधुनिक भारतीय भाषांची जननी आहे , असे म्हणता येईल . ती ज्ञान भाषा मात्र जरूर आहे . ज्ञान जेवढे शाश्वत आहे , तेवढीच संस्कृत भाषा शाश्वत आहे . ऋषिमुनींची शास्त्रे , संशोधन यांच्या संहिता संस्कृतमध्येच आहेत . त्या उलगडण्यासाठी संस्कृतचा मार्ग अवलंबवावा लागेल . मेडिकल , इंजिनीअरिंगकडे जाऊ पहाणाऱ्या तरुणाईला जेव्हा ते कळेल तेव्हा संस्कृत पुन्हा झेप घेईल . केवळ देशीच नव्हे तर विदेशी मंडळी सुध्दा त्याकडे आकर्षित होतील . कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाची पुढची वाटचाल त्याच दिशेने असेल .' असे मत कुलगुरू डॉ . उमा वैद्य यांनी व्यक्त केले .

    संस्कृत सारखा पारंपरिक विषय शिकविणाऱ्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदी एका महिलेने आरुढ होणे हाच एक इतिहास ठरावा . तो मान उमा वैद्य यांना मिळाला . त्यांचा जन्म नागपूरचाच . त्यांचं बालपण महाजन चाळीतील विंझेच्या वाड्यात गेलं . त्यामुळे विदर्भ त्यांच्यासाठी अनोळखी नाही . संस्कृत सोबतच पाली आणि तत्त्वज्ञानाशी गाढ मैत्री असलेल्या वैद्य यांनी राज्यातील विद्यापीठांच्या ३८ समित्यांवर काम केलंय . त्यामुळे प्रशासनावरील त्यांची पकड घट्ट आहे . तुम्ही त्यांच्या कार्यालयात गेलात तर संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू ' लॅपटॉप ' ला नेटकार्ड कनेक्ट करून काही ' सर्च ' करताना दिसतात . अधुनिकतेशी कनेक्शन ठेवताना डोक्यात मात्र सातत्याने संस्कृतच आहे . संस्कृत आज कुठे आहे ? तिला कुठे न्यायचं आहे ? याचे सगळे प्लान त्यांच्या डोक्यात पक्के आहेत . त्यांच्याशी साधलेला हा संवाद

    प्रश्न - संस्कृत भाषेचे महत्त्व , उपयोगिता यापेक्षा ती सगळ्या भाषांची जननी आहे की नाही ? यावरूनच अधिक चर्चा होते . काही जण ठामपणे ही भूमिका मांडतात , काही तेवढ्याच टोकाचा विरोध करतात ? तुम्हाला काय वाटते ?

    उत्तर - संस्कृत सगळ्याच भाषांची जननी आहे असा एकांतिक आग्रह कुणीच धरू नये . ती बहुसंख्य अधुनिक भारतीय भाषांची जननी असू शकेल . तिच्याकडे बोली किंवा व्यवहार भाषा म्हणून न बघता , ज्ञानभाषा म्हणून बघितलं जावं . ज्ञान जेवढं शाश्वत , तेवढीच संस्कृत शाश्वत आहे . बोली ही मुखसौकर्यातून येते , संस्कृत बोली नसल्याने तिची शुध्दता अधिक आहे . आपल्या पूर्वजांनी लावलेल्या विविध शोधांच्या संहिता संस्कृतमध्ये आहेत . त्याचा अभ्यास करून विदेशी मंडळी नवनवे शोध लावत आहेत . आपण मागे का राहतो ? आपण आपल्या चर्चेचा दृष्टिकोन अशा दिशेने वळविला पाहिजे .

    प्रश्न - संस्कृत अधुनिक भारतीय भाषांची जननी आहे तर भाषेची जननी कोणती भाषा आहे ? संस्कृतच्या जन्माची बिजे कुठल्या भाषेत आढळतात ?

    उत्तर - याची वेगवेगळी उत्तरे दिली जातील तुम्हाला . तुम्ही नेमकी कोणती थिअरी मान्य करता , त्यावर ते अवलंबून आहे . आर्य उत्तर धृवावरून आले ही थिअरी मान्य करणार असाल तर तेथे ज्या टोळ्या राहत होत्या , ते युरो भारतीय भाषा बोलत . तेथून विविध समूह , विविध दिशेने आणि विविध देशात , प्रांतात गेले . त्यांची भाषा तेथील जनसमूहाची भाषा बनली . तिने जागतिक पातळीवर विविध रुपे घेतली . काही समूह भारतात आले . त्यांच्या संस्कारातून जी भाषा आली ती संस्कृत . अर्थात ही थिअरी सर्वमान्य आहे असे नाही . भाषेच्या संदर्भात ज्या अनेक उपपत्या दिल्या जातात , त्यापैकी ही एक आहे .

    ReplyDelete
  16. अजून एक विचार ......

    पाली हीच भारताची प्राचीन भाषा

    इतिहास संशोधक पु. श्री. सदार

    भारतातील मागधी भाषा ही या देशातील इ. स. पूर्व दुसऱ्या शतकापर्यंत विद्वत भाषा होती. मागधी या लोकभाषेत तथागम गौतम बुद्धांनी धम्माचा उपदेश केला. त्रिपीटक या जगप्रसिद्ध बौद्ध ग्रंथाची भाषा मागधी होती. या भाषेलाच पुढे पाली असे संबोधण्यात आले असून मागधी अर्थात पाली भाषा हीच भारताची प्राचीन भाषा आहे. भगवान महावीर यांचे विचार सुद्धा मागधी भाषेतच सापडतात.

    ReplyDelete
  17. खास लिहा वाचा यांच्यासाठी एक असेही संशोधन ,
    दुसऱ्याचे फोटो आणि भाषा सुधारायला सांगणाऱ्या निर्लज्ज माणसा ,
    अरे तू कसली मागधी आणि पाली अशी भाषा करतो?
    मगध मधल्या पालीनासुद्धा मागधी भाषा ऐकून ऐकून पाठ झाली आणि त्यापण मागधीतून बोलू लागल्या इतकीही तुला अक्कल नाही ?
    मूर्ख लेकाचा !
    दुसऱ्याला शिकवतोय येडपट - तुझ्या रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी वृत्तीचे आम्ही काय कौतुक करायचे का तुझी आरती करायची ?
    जा दांडेकर पुलापाशी बस , चार पैसेतरी मिळतील !

    ReplyDelete
    Replies
    1. @AMRUTA VISHVARUPNovember 25, 2014 at 6:16 AM

      अमृता नावाने लिहिणाऱ्या बाद माणसा तुला अक्कल कधी येणार? नाहीरे, ते तुझे क्षेत्रच नाही! तू कधीही सुधरणार नाहीस हे मात्र नक्की आहे. लिहिताना काय लिहावे, कसे लिहावे, भाषा कशी असावी याचे याला थोडेही तारतम्य नाही. थु याच्या जिंदगीवर!!!!

      Delete
  18. Amruta, now this is a height of your madness! You actually not read the comment and reply without using your brain. This thought not related to liha vacha but related to Historian Mr. Sadar. Plz concentrate your mind towards the subject before you write, this is a humble request!

    ReplyDelete
  19. अय्या ,
    काहीतरीच काय , हे काय !मी बोलत्ये लिहा वाचा बरोबर आणि हा विकास कुठे आला लुडबुडायला मध्येच !
    लिहा वाचा काय अडकला काय चुंबन जिहादच्या गर्दीत ?
    हि फुकटची हजामत कशाला रे विकास ?
    आणि संजय उत्तर देणार होता लवकरच त्याचे काय झाले ?
    अमित तर म्हणतो आहे संजय संस्कृत मधून उत्तर देणार आहे !- अरे बापरे !
    आधी संजयला आनि पानी सुधारायला सांगा - मग म्हणावे संस्कृतच्या गमजा कर !
    इश्श्य ! -
    हे मात्र फारच शाल हं ! एकाच उत्तर दुसऱ्याने द्यायचं हे !!
    अमित तुला पटतात कारे हे असले उद्योग ?मला घाईची लागली मोरीवर तर माझ्या ऐवजी दुसर्याने जाउन चालेल का ? मलाच गेले पाहिजे नाही का विकास ?
    तेंव्हा तेझे तोंड बंद ठेव आणि मध्ये मध्ये तोंड खुपसू नकोस !

    ReplyDelete
    Replies
    1. अमृता, आगाऊपणा, चावटपणा करीत जाऊ नकोस! वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवायला शिक! ते तुझ्याच फायद्याचे आहे, म्हणून सांगितले. बघ जमले तर?

      Delete
  20. Amruta, mind your language. Otherwise go to hell. Do not show your madness frequently.

    ReplyDelete
  21. विकास याने हा विषय मांडला - अभिनंदन !
    आज संजयचे पुस्तकाचे प्रकाशन आहे त्यावेळेस तो काही बोलतो का ते बघू या !
    नेमाडे हे संधिसाधू आहेत त्यामुळे भडक बोलणे हा त्यांचा धर्मच आहे !
    त्यांचे कर्तृत्व फारच गचाळ आहे - कोसला या एका कादंबरीवर आयुष्य काढायची त्यांना लाज कशी वाटत नाही ?
    हिंदू अत्यंत नीरस आहे दिशाहीन आहे
    बाकीच्या रद्दीच्या दुकानात वजनावर मिळतात - आपल्या संजयची पुस्तकेही तिथेच वजनावर मिळतात - पण आमचा संजय हौशी आहे - लिहित असतो बिचारा - त्याला पाठीवर थाप हवी आहे !
    कोणाला काय भूक असते जगात !

    ReplyDelete
  22. नेमाडे हा गेमाडे आहे
    तो काही लेखक म्हणून प्रसिद्ध नाही !
    खटपट्या लटपट्या आहे - त्याच्या विचारणा कोणीच गंभीरपणे घेत नाही !
    त्याचा लेखनाचा काळ संपला आहे प्रतिभा त्याला सोडून गेली आहे
    त्यामुळे प्रकाशक त्याला टाळतात

    ReplyDelete
  23. अय्या ,विकास झोपला वाटते -कुणाबरोबर ?-लिहा वाचा ?
    तो पण काहीच लिहित नाही - तो पण झोपला वाटते
    इश्श्य तास नाही काही - काहीतरीच काय -
    विकास आणि लिहा वाचा - काहीतरीच हं इश्श्य
    नको बाई ऐकायला
    त्या बिचार्या अमृताला काहीबाही बोलत असतात आणि स्वतः मात्र - अय्या -

    ReplyDelete
    Replies
    1. Mohini, what is this? Your brain is not in proper place! May be available in your knee!

      Delete
  24. मोहिनी परकर नावाने लिहिणाऱ्या नराधमा, पुरे झाला तुझा चावटपणा ! अक्कल गहाण ठेवली आहेस काय?

    ReplyDelete
  25. पाणीनि : (इ. स. पू. सु. पचावे वा चवथे शतक). संस्कृतातील पहिल्या सर्वांगपूर्ण अशा व्याकरणाचा कर्ता. पाणिनीच्या काळासंबंधी विद्वानांत मतभेद आहेत. अष्टाध्यायी, अष्टक किंवा शब्दानुशासन ह्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या, पाणिनीच्या व्याकरणग्रंथातील पुराव्यांवरून; त्याचप्रमाणे अन्य ग्रंथांत आलेले पाणिनीविषयक उल्लेख लक्षात घेऊन पाणिनीचा काळ वर दिल्याप्रमाणे इ. स. पू. पाचवे वा चवथे शतक असा सामान्यतः मानला जात असला, तरी काही संशोधकांनी पाणिनीचा काळ इ. स. पू. आठव्या शतकापर्यंत मागे नेलेला आहे. पाणिनीच्या एका सूत्रात शलातुर देशाचा उल्लेख आहे. ह्याच देशाचा तो रहिवासी असावा, असा विद्वानांचा तर्क आहे. शलातुर ह्या शब्दाचे प्राकृत रूप सलाउर असे होते. अनेक प्रांतांत ‘स’ च्या ऐवजी ‘ह’ उच्चारला जात असल्यामुळे सलाउरचे रूप हलाउर होऊन आणि ‘ह’ व ‘ल’ ह्यांच्यात वर्णव्यत्यत होऊन सलाउरचे ‘लहाउर’ असे रूप होऊ शकते. ह्या ‘लहाउर’ चेच पुढे ‘लहोर’ झाले असावे. असे अनुमान करून शलातुर म्हणजेच आजचे लाहोर असण्याची शक्यता नमूद केली जाते. पाणिनीच्या सूत्रांतून येणारे सिंधु, तक्षशिला, कच्छ इ. उल्लेखही बोलके आहेत. पाणिनीचे शिक्षण तक्षशिलेस झाले असावे, असा तर्क आहे. पाणिनीचा ‘दाक्षीपुत्र’ असाही उल्लेख केला जातो, हे पाहता त्याच्या आईचे नाव ‘दाक्षी’ असावे, असा तर्क केला जातो.

    पाणिनीने वैदिक भाषेबरोबर तत्कालीन बोलीभाषेचा अभ्यास करून दोहोंसाठी वर्णनात्मक व्याकरण लिहिले. सु. ४,००० सूत्रे असलेल्या ह्या व्याकरणग्रंथाचे आठ अध्याय असल्यामुळे त्याला अष्टाध्यायी किंवा अष्टक असे नाव रूढ झाले. अष्टाध्यायीमधील सूत्रे बीजगणितातील सूत्रांप्रमाणेच तांत्रिक परिभाषेत लिहिली गेली असून योजिलेल्या तंत्राचा नीट उलगडा व्हावा, म्हणून त्याने संज्ञासूत्रे आणि परिभाषासूत्रे दिलेली आहेत.

    वाक्यांतील पदांचा परस्परसंबंध, सामासिक पदांचा प्रकृतिप्रत्ययात्मक विभाग, संधी ह्यांचा विचार केला असून त्यासाठी अनुबंध, प्रत्याहार, स्थानिन्, आदेश, आगम इ. तांत्रिक साधनांचा उपयोग केला आहे. ग्रंथातील तपशील व बारकावे ह्यांवरून अष्टाध्यायी हा ग्रंथ म्हणजे शतकानुशतके चालू असलेल्या व्याकरणविषयक विचारांचे (व कदाचित ग्रंथांचेही) शेवटचे संस्करण असावे, असे दिसते. पाणिंनीने आपल्यापूर्वींच्या दहा वैयाकरणांचा उल्लेख केलेला आहे. ‘गणपाठ’ व ‘धातुपाठ’ अशी परिशिष्टे त्याने अष्टाध्यायीला जोडलेली आहेत. गणपाठात शब्दांचे गट केलेले असून त्यासाठी समान प्रत्यय अथवा स्वर इ. कसोट्या लावल्या आहेत. तो तो गट त्या त्या गटातील पहिल्या शब्दापुठे ‘आदी’ हा (किंवा या अर्थाचा) शब्द लावून ओळखला जातो. उदा., ‘स्वरादि’. पाणिनीच्या सुत्रांवर ⇨ कात्यायनाने (इ. स. पू. सु. तिसरे शतक) चिकित्सक दृष्टिकोणातून वार्त्तिके लिहिली आहेत. ह्या वार्त्तिकांवर ⇨ पतंजलीने ⇨ महाभाष्य नावाची प्रसिद्ध टीका लिहिली (इ. स. पू. सु. १५०). सातव्या शतकात जयादित्य आणि वामन ह्यांनी अष्टाध्यायीवर काशिका नावाची टीका लिहिली. इंग्रजी, जर्मन व फ्रेंच भाषांत अष्टाध्यायीचे अनुवाद झालेले आहेत.

    ReplyDelete
  26. प्रिय संजयजी,
    क्या आपने हिंदी के प्रसिद्ध विद्वान वासुदेवशरण अग्रवाल का शोध प्रबंध “पाणिनिकालीन भारतवर्ष” पढ़ा है? वह प्राचीन भारत को भारतीय साहित्य के नजरिये से देखने की एक कोशीश है ना कि आधुनिक भारतवेत्ताओं की नजर से.
    मुझे लगता है कि आपके जैसे इतिहास के जिज्ञासु ने वह जरूर पढ़ना चाहिये. उनके अनुमान से पाणिनि कौटिल्य के समकालीन थे जो कि ईसापूर्व ४०० के करीब था.
    महाभारत युद्ध पर उनकी पुस्तक “भारत सावित्री” मैंने पढ़ी है.. मैं तब से उनका मुरीद हो चुका हूँ.. आपको अपनी खोज जारी रखने का पूरा हक हैं किंतु यदि उनके शोध आपकी और सहायता करते है, तो इससे सभी का लाभ ही होगा.
    दिनेश शर्मा

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...