Wednesday, January 14, 2015

छावण्यांच्या तुष्टीकरणासाठी इतिहास?

"भारतीय इतिहासकारांची एक मोठी समस्या म्हणजे ते बव्हंशी कोणत्या ना कोणत्या छावणीतील आहेत. म्हणजे मार्क्सवादी, हिंदुत्ववादी, आर्यवादी, मुलनिवासीवादी, बहुजनवादी वगैरे. समस्या अशी आहे कि छावण्यांच्या तुष्टीकरणासाठी व त्या छावण्यांच्या भुमिका लादण्यासाठी इतिहास लिहिला जातो, त्यामुळे ऐतिहासिक घटनांचे उदात्तीकरण, अतिउदात्तीकरण अथवा विकृतीकरण केले जाते अथवा अनेक घटनाच अनुल्लेखाने मारल्या जातात. थोडक्यात यामुळे भारतात "इतिहास" ख-या अर्थाने लिहिलाच गेलेला नाही असे म्हणायला भरपुर वाव आहे. छावण्यांच्या दृष्टीकोणातून इतिहास लिहिणे सोपे असते, आयते समर्थक मिळतात, मानसन्मान मिळतात...पण इतिहासाचा खून पडतो याचे भान असले पाहिजे.

"नवीन इतिहासकारांनी प्रथम या सर्वच छावण्यांचा त्याग केला पाहिजे. जुन्या इतिहासकारांबद्दल आदर ठेवत त्यांचे नि:ष्कर्ष नाकारत, पुर्ण संशयी होत त्यांचे दावे, संदर्भ पुन्हा तपासले पाहिजेत. इतिहास हा स्वत:च्या किंवा कोणाच्या भावना सुखावण्यासाठी अथवा दुखावण्यासाठी नसतो तर तर फक्त उपलब्ध तथ्यांची इमान राखणारा असतो. इतिहास असा लिहिला जाणार असेल तर लिहावा अथवा त्याच्या वाटेला जात एकुणातील समाजांचे नुकसान करु नये.

"युरोपियन इतिहासकार फार सज्जन आहेत असा भ्रमही बाळगायचे कारण नाही. आर्यवाद असो अथवा आताचा इंडो-युरोपियन भाषा सिद्धांत असो, याचा जन्म केवळ सेमेटिक भाषागटाच्या लोकांवर वर्चस्वतावाद निर्माण करण्यासाठी झाला व त्यासाठी पुरातत्वीय पुराव्यांची सोयिस्कर मांडणी केली गेली. आजही केली जात आहे. इतिहास भवितव्यासाठी कि इतिहास भवितव्यात विकृती निर्माण करण्यासाठी याचा निर्णय आपण घ्यायला पाहिजे."

(अलीकडेच अक्षरमानवतर्फे ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी भरवलेल्या इतिहास लेखन कार्यशाळेत बोलतांना मी मांडलेला एक मुद्दा.)

15 comments:

  1. सौदीचे फाहद यांना आणि अमेरिकेलाही योजना पटली, म्हणून त्या वेळी- ३० ते ३५ देशोदेशींच्या तुरुंगांतून अनेक मुस्लीम तरुणांना सोडण्यात येतं..
    आणि अलीकडेच, विश्वचषकाच्या वेळी गडबड नको म्हणून एक देश मुस्लीम तरुणांना उचलून तुरुंगात डांबतो..
    मैदान इकडे-तिकडे.. पण खेळ तोच..
    फुटबॉलप्रेमींना दोन नावं माहीत असतातच असतात. त्यातला एक तर बऱ्याच जणांचा आदर्श वगरे असतो. त्याचं नाव झिनादिन झिदान. आणि दुसरा रिबरी.
    या दोघांत दोन गोष्टी समान आहेत. एक म्हणजे दोघेही फ्रान्सचे. आणि दुसरं म्हणजे दोघेही धर्मानं मुसलमान. आता खेळाडूंचा धर्म पाहू नये वगरे सर्व तत्त्वज्ञान ठीकच. पण काही गोष्टी तशा डोळ्यांवर आल्याशिवाय राहत नाहीत. उदाहरणार्थ पाकिस्तानच्या संघात कुठे लक्षणीय भूमिकेत हिंदू खेळाडू असतात? ते लक्षात येतंच की. झिदान आणि रिबरी यांचादेखील धर्म तसा चर्चेचा मुद्दा झाला नसता. पण पॅरिसमध्ये परवा जे काही घडलं त्यामुळे त्या देशातील मुसलमान हा मुद्दा गंभीरपणे बोलला जाऊ लागलाय. यातला झिदान हा मूळचा अल्जिरियाचा. हा अफ्रिकी देश एके काळी फ्रेंचांची वसाहत होता. त्यामुळे फ्रान्समध्ये आज बरेच अल्जिरियन आढळतात. ते तिथल्या समाजजीवनाचा भागच बनून गेलेत. रिबरी हा धर्मातरित मुसलमान. मूळचा फ्रान्सचा. पण नंतर मुसलमान झाला. आता का, वगरे तपशिलाची चर्चा काही आपल्याला इथे करायची नाही. मुद्दा आहे तो फ्रान्समधल्या मुसलमानांचा.
    अनेकांना कदाचित माहीतही नसेल युरोप खंडात सर्वात जास्त मुसलमान फ्रान्समध्ये आहेत. लोकसंख्येच्या साधारण आठ टक्के इतके. म्हणजे पंचावन्न लाख वगरे मुसलमान आज फ्रान्समध्ये आहेत. त्या खालोखाल जर्मनीत पाच टक्के किंवा चाळीस लाख. आणि मग इंग्लंड. त्या देशातही पाच टक्केच. पण साधारण तीस लाख. यातली गंभीर बाब फ्रान्समधले मुसलमान किती, ही नाही. तर ते कुठे राहतात ही आहे.
    लोकसंख्येच्या आठ टक्के मुसलमान फ्रान्समध्ये आहेत. पण त्यातले निम्म्याहून अधिक म्हणजे तीसेक लाख वगरे चक्कतुरुंगात आहेत. वेगवेगळ्या गुन्हय़ांच्या आरोपांखाली. म्हणजे एखाद्या समुदायाची निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही तुरुंगात असेल तर जरा काळजीचंच कारण मानायला हवं. फ्रान्समध्ये नेमकं हेच झालंय. या इतक्या लोकांमधले तब्बल ११०० जण हे थेट दहशतवादाच्या आरोपांसाठी तुरुंगात आहेत. खटले सुरू आहेत त्यातील काहींवर. याकडेही एकवार दुर्लक्ष करता आलं असतं. पण या गंभीर तपशिलातली अधिक गंभीर बाब ही की फ्रान्समधले तुरुंग हे इस्लामी दहशतवादासाठी भरती केंद्र बनले आहेत. युरोपीय समुदायाच्या पाहणी अहवालात ही माहिती आहे. म्हणजे इतके मुसलमान, तेही गुन्हेगार म्हणून तुरुंगात असल्यामुळे त्यांना गळाला लावणं हे धर्मभडकावू मंडळींना सोपं जातं.
    यातली वेदनादायी बाब ही की ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे.
    या वेळी खंड बदलला इतकंच.

    ReplyDelete
  2. १९८० च्या दशकात जेव्हा सोविएत फौजा अफगाणिस्तानात घुसल्या त्या वेळी त्यांना बेजार करण्याच्या पद्धतींवर अमेरिका आणि तिच्या बगलबच्च्या देशांत व्यापक चर्चा झाली. त्यात आघाडीवर होता सौदी अरेबिया. आता तो देश का? तर मुसलमानांसाठी अत्यंत पवित्र धर्मस्थानं मक्का आणि मदिना ही त्या देशात आहेत. तेव्हा निधर्मी तत्त्वज्ञान सांगणाऱ्या साम्यवादावर त्या देशाचा राग असणं साहजिकच. त्यामुळे सौदीनं या रशियन घुसखोरीविरोधात लढण्यासाठी चांगलीच तयारी दाखवली होती.
    त्या वेळी एक तरुण त्या वेळचे सौदी राजे फाहद यांच्याकडे गेला आणि म्हणाला, मला आवडेल सोविएत युनियनविरोधी लढय़ाचं नेतृत्व करायला.. इस्लामविरोधकांना धडा शिकवायलाच हवा. त्या तरुणाच्या वडिलांचं सौदी राजघराण्याशी चांगलंच सख्य होतं. कारण फाहद यांच्या आधीचे राजे फैझल आíथक संकटात असताना या तरुणाच्या वडिलांनी त्यांना मदत केली होती. मक्का, मदिनेतील धर्मस्थळाच्या उभारणीचं काम या तरुणाच्या वडिलांनी केलं होतं. राजे फैजल यांना कर्ज दिलं होतं. त्यामुळे या कुटुंबाची सौदी राजघराण्याशी चांगलीच घसट होती. त्याचमुळे तर तो थेट राजासमोर जाऊ शकला. तेव्हा राजे फाहद यांना या तरुणाची कल्पना आवडली. आणि दुसरं असं की राजे फाहद हे तसे डोक्याने बेतास बातच होते. राजे फैझल यांच्यासारखं द्रष्टेपण वगरे काही त्यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे ते सहज अमेरिकेच्या तालावर नाचत. त्यामुळे अमेरिकेनंही भरीस घातलं त्यांना या उद्योगासाठी. पण पंचाईत ही होती की अमेरिका त्या तरुणाला थेट मदत करू शकत नव्हती. कारण अमेरिकी कायदा. तेव्हा मार्ग असा निघाला की सौदीनं लागेल ती मदत या तरुणाला द्यायची आणि अमेरिकेनं लागेल ती मदत सौदीला द्यायची.
    या मदतीत दोन गोष्टी गरजेच्या होत्या. एक म्हणजे शस्त्रास्त्रं. ती अमेरिका पुरवणार. आणि दुसरी माणसं. ती पुरवण्यासाठी सौदीनं मदत करायची. हे म्हणायला ठीक. पण ती आणणार कुठनं? तेव्हा कल्पना अशी सुचवली गेली की आशियातल्या ज्या ज्या देशांतल्या तुरुंगात मुसलमान गुन्हेगार कैदी आहेत, त्यांना सोडायचं आणि त्यांच्यावर धर्माचं गारूड करून त्यांना अफगाणिस्तानात मुजाहिदीन म्हणून पाठवायचं. दुर्दैव हे की इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, पाकिस्तान आदी अनेक देशांतल्या तुरुंगांत गंभीर गुन्हय़ांसाठी शिक्षा भोगत असलेल्या शेकडो कैद्यांची त्या त्या सरकारांनी सुटका केली, या तरुणाला मदत करणाऱ्या अमेरिकेनं या मुक्त कैद्यांना किमान शस्त्रास्त्रं चालवण्याचं प्रशिक्षण दिलं आणि एकजात हे सगळेच्या सगळे धर्मसेवक बनून अफगाणिस्तानात दाखल झाले. धर्मविरोधी सोविएत रशियाच्या विरोधात लढण्यासाठी.
    ही सुपीक कल्पना ज्यानं सौदी अरेबिया आणि अमेरिका यांच्या कानात घातली, अमलात आणली त्याचं नाव ओसामा बिन लादेन.

    ReplyDelete
  3. असं म्हणतात की त्या वेळी ओसामाच्या वतीनं भारतातल्या मुसलमान गुन्हेगारांच्या भरतीसाठीदेखील प्रयत्न झाले. पण आपलं सरकार ही अशी कोणतीच माहिती उघड करत नाही. त्यामुळे तो तपशील काही ठामपणे उपलब्ध नाही.
    तर आता तोच खेळ सुरू आहे. फ्रान्समधल्या तुरुंगात मुसलमान कैद्यांच्या धार्मिक भावना भडकवायच्या आणि त्या भडकल्या की स्वर्गप्राप्तीचं आमिष दाखवत त्यांना प्रगत देशांविरोधात वापरायचं. हे कसं होतं ते आता फ्रान्सला कळायला लागलंय. १९९८ साली त्या देशानं फुटबॉलचे विश्वचषक सामने भरवले होते. त्या वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनेक तरुण गुंडपुंडांना फ्रान्स सरकारनं ताब्यात घेतलं होतं. पॅरिसच्या आसपास असे अनेक आहेत. एका अर्थानं पॅरिस.आणि फ्रान्ससुद्धा.आपल्यासारखाच आहे. अजागळ, अस्ताव्यस्त आणि बराचसा बेशिस्त. ते आयफेल टॉवर, शाँझ एलिझे रस्ता, कॅबरे वगरे ठीक आहे. पण खुद्द पॅरिसात चांगल्याच झोपडपट्टय़ाही आहेत आणि लोक दारूबिरू पिऊन पडलेले आढळतात. अशा कंगालतेत गुंडगिरी अर्थातच वाढते. फ्रान्समध्ये ती चिक्कार आहे. त्याचमुळे विश्वचषकाआधी सरकारनं बऱ्याच गुंडांना डांबून ठेवलं. छोटय़ा-मोठय़ा गुन्हय़ांत नाही तरी त्यांचा हात होताच. विश्वचषकानंतर त्यातले बरेचसे सुटलेदेखील.
    फ्रान्स सरकारच्या आता लक्षात येतंय. तुरुंगात जाण्यापूर्वीचे हे तरुण आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतरचे ते यात आमूलाग्र बदल झालाय. यातले बरेच तरुण कर्मठ, कर्कश धर्मवादी झालेत. त्यातले काही तर थेट पश्चिम आशियाच्या वाळवंटात जिहादसाठी दाखल झालेत. अगदी तसेच. तीन-साडेतीन दशकांआधी आशियाई तुरुंगातून अफगाणिस्तानात रशियाविरोधात लढायला दाखल झालेल्या तरुणांसारखे.
    शार्ली एब्दोवर हल्ला करणारे तरुण हे अशांतल्यापकीच. काही वर्षांपूर्वीच तुरुंगवास भोगून आलेले. तुरुंगात जाताना फक्त मुसलमान होते. बाहेर आले ते जिहादी बनून.
    तीन-साडेतीन दशकांपूर्वी हा खेळ खेळला गेला. पहिल्यांदा. आताही तोच खेळला जातोय. त्या वेळी या खेळात एक पिढीच्या पिढी बरबाद झाली. आताही तेच होणार आहे.
    या अशा खेळांचं तेच तर विशेष. खेळतंय कोण? हरतंय कोण? जिंकतंय कोण? आणि त्याहूनही महत्त्वाचं मरतंय कोण? कोणीच काही बघत नाहीये. कोणालाच विचार त्याचा नाहीये. खेळ मात्र अव्याहत सुरू आहे.. तोच खेळ पुन्हा पुन्हा..

    ReplyDelete
  4. ●● इतिहासाचार्य प्रा.मा.म.देशमुख ●●

    "एका बीजा केला नाश
    मग भोगिले कणीस.."

    हजारो दाणे असणारे कणीस मिळवायचे असेल तर आधी एका बीजाला स्वतःचा नाश करुन घ्यावा लागतो.त्या बीजाने स्वतःला जमीनीत गाडुन घेतल्यावरच त्याच्यातुन तयार होणारे कणीस त्या बीजाचा वारसा पुढे चालवत नवनिर्मितीच्या प्रक्रियेत भाग घेतं..

    इतिहासाचार्य प्रा.मा.म.देशमुख ह्यांचे जीवन अगदी बीजासारखंच आहे.
    समाजात परीवर्तन घडवुन आणण्यासाठी चळवळीच्या भूमीत स्वतःचे जीवन गाडुन घेऊन परीवर्तनवादी विचारांचे कार्यकर्ते असणारी कणसं तयार करण्याचे महान कार्य सरांनी केले आहे.

    आपल्या राष्ट्रजागृती लेखमालेतुन मनुवादाची साल काढत नवीन परीवर्तनवादी लेखक,वक्ते यांची फळी उभी करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
    ● रामदास आणि पेशवाई
    ● मराठा-कुणबी समाजाची दशा आणि दिशा
    ● बहुजन समाज आणि परीवर्तन
    ● शिवराज्य
    ● मनुवाद्यांशी लढा
    ● राष्ट्रनिर्माते
    ● शिवशाही
    ● मनुवादी शिवस्मारक होऊ देणार नाही
    ● मध्ययुगीन भारताचा इतिहास
    ● मराठ्यांचे दासीपुत्र: संपादित
    ● भांडारकर तो झाँकी है शनिवारवाडा अभी बाकी है
    ● जिजाऊ
    ● अभ्यास कसा करावा ?
    या व अशा अनेक विचारग्रंथांतुन तसेच आपली व्याख्याने,लेख,चर्चासत्र,प्रशिक्षण शिबीरांमधुन मनुवादी लेखकांनी लिहलेला खोटा इतिहास पुराव्यासहीत खोडुन काढण्याबरोबरच वैचारिक धन वाटण्याचे कार्य त्यांनी केले.

    "रामदास हा आदिलशहाचा हेरच होता" हे त्यांनी आपल्या "रामदास आणि पेशवाई" मध्ये पुराव्यानिशी सिध्द केले.हायकोर्टाने त्यांच्या या पुस्तकावरील बंदी उठवुन या संशोधनावर शिक्कामोर्तब केले.
    "आचार्य अत्रे" पासुन ते अनेक मनुवादी लेखकांची तोंडे कायमची बंद करण्याचा पराक्रम सरांनी केला आहे.

    त्याचबरोबर पुण्यातील शनिवारवाडा हाच जिजाऊंचा खरा लालमहाल आहे असे पुराव्यासहीत संशोधन त्यांनी केले आहे.

    मनुवादी लेखकांनी लपवलेला आणि इतिहासात शिवरायांवर तलवारीने वार करणारा अफजलखानाचा वकील सरांनी सर्वप्रथम आपल्या लेखणीतुन समाजासमोर आणला.

    एके काळी तर मनुवाद्यांनी सरांच्या लेखनाची इतकी धास्ती घेतली होती की सरांचे मुद्दे खोडता येत नाहीत म्हणुन त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्याचाच प्रयत्न त्यांनी केला.पण सरांच्या अंगात सुध्दा मराठ्याचं रक्त आहे ही गोष्ट ते मनुवादी जाणुन असल्यामुळे ते सरांना काहीच करु शकले नाहीत.
    मनुवाद्यांच्या कारस्थानाबाबत सरांच्या विद्यार्थ्यांना समजताच हजारो तरुण सरांच्या मदतीला धावले.हे बघुन त्या मनुवादी मुर्खांनी आपली कातडी वाचवुन बुडाला पाय लावुन पळ काढण्यातच धन्यता मानली.त्याच ठिकाणी या तरुणांनी सरांची "प्रेमयात्रा" काढली.इतकी लोकप्रियता सरांची त्या काळीसुध्दा होती.

    जाहीर व्याख्यान देत असताना अनेक वाक्यांच्या पाठीमागील गुढ अर्थ श्रोत्याने समजुन घ्यावा यासाठी "पाणी तापु द्या.." असे आपल्या खास शैलीत सांगत श्रोत्याची मनं जिंकण्याची किमया सरांना चांगलीच अवगत आहे.

    "भिकाऱ्याला भिक देणे ही सेवा आहे परंतु त्या भिकाऱ्यावर भीक मागायची वेळच येणार नाही अशी स्थिती निर्माण करणे म्हणजे परीवर्तन होय" अशी समाजसेवा आणि समाजपरीवर्तन यातील व्याख्या उलगडुन सांगुन परीवर्तनासाठी आग्रही कार्यकर्ते तयार करण्याचा मान त्यांना जातो.

    आज सरांचे वय झाले असले तरी ते अजुन थकले नाहीत.परीवर्तनासाठीची त्यांची उमेद तरुणांना लाजवेल अशीच आहे.त्यांचा या वयातील हा जोश पाहुन तरुण कार्यकर्त्यांच्या अंगात हुरुप चढतो.

    मात्र मनुवादी लोकांनी सरांचे कार्य,लेखन दडपण्याचा किंवा त्यांचा चुकीचा प्रचार करण्याचेच काम केल्यामुळे आज अनेक तरुण देशमुख सरांविषयी अनभिज्ञ आहेत.त्यांना सरांचे विचार,लेखन माहीतच नाही.
    असे तरुण कोणतीही चिकित्सा न करता मनुवाद्यांच्या प्रभावाखाली येऊन सरांवर वेडेवाकडे शब्द लिहतात.हेच मनुवाद्यांना हवंय.
    म्हणुन अशा तरुणांना विनंती आहे,की मा.म.देशमुखांची पुस्तके वाचा.त्याशिवाय तुम्हाला त्यांचे कार्य समजणार नाही.पाण्याची खोली पाण्यात उतरल्याशिवाय समजत नाही.कुणाच्याही ऐकण्यावरुन मत ठरवण्यापेक्षा एकदा स्वतः वाचुन पहा.विचार करा मग मत बनवा.
    आणि मा.म. सर तर स्वतःच सांगतात की,
    "मी लिहलंय त्यावर तुम्ही विश्वास ठेवा असा माझा आग्रह नाही,मात्र तुम्ही त्यावर विचार करा.."
    बघा विचार करायला काय हरकत आहे ?

    जाता जाता मा.म.देशमुख सरांच्याच काही ओळी लिहुन लेखनाचा शेवट करतो.

    एकमेका संघटीत करु | अवघे बनु कृतीवंत |
    शिव-फुले-शाहू-भीमाचा मार्ग धरू | करु मनुवादाचा अंत ||

    सरांच्या जिद्दीला आणि कार्याला आमच्या तमाम शिवप्रेमी मावळ्यांचा सलाम
    आणि सरांना दीर्घायुष्य लाभुन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांचे मार्गदर्शन मिळत राहो या सदिच्छा..

    ReplyDelete
  5. मामा देशमुख यांचे विचार वाचून मी भारावून गेलो
    शनिवारवाडा हाच लाल महाल हे वाचून अतिशय मोलाची माहिती मिळाली
    आता आपल्याला आंदोलन करून शनिवारवाडा या ठिकाणी लाल महाल बांधायला आर्चीआलॉजी
    विभाग तयार होईल नाहीतर आंदोलन करण्या वाचून गत्यंतर नाही
    मामा देशमुख याना ही योग्य आदरांजली ठरेल
    आपण घरटी १० रुपये जरी गोळा केले तर नवा लाल महाल उभा राहील
    रायगडावरील पवित्र माती शनिवार वाड्यावर पसरून तो पवित्र करावा आणि त्यासाठी प्रत्येकाने मूठ मूठ माती शिवारायासाठी असे आंदोलन करावे , परंतु त्याच वेळी रायगडावर पुरेशी माती राहील याची काळजी घ्यावी

    मुंबईत जसे समुद्रात शिव स्मारक उभे रहात आहे तसेच स्मारक शनिवार वाड्यात उभारता येईल
    आणि कायमचे प्रदर्शन करता येईल
    शनिवार वाड्यावर मामा देशमुखांचे एक भाषण केल्यास लाखो देशमुख प्रेमी त्यास हजेरी लावतील

    आता जुन्या लाल महालात स्त्रियांसाठी वाचनालय सुरु करावे आणि शिव धर्मासाठी तेथे संस्कार वर्ग सुरु करावेत तसेच स्त्रियाना दांड पत्ता आणि इतर आत्म रक्षणाचे शिक्षण मिळावेत
    सध्या पांढरे पोलिस पैसे जमा करण्यासाठी लाल महालाच्या प्रवेश द्वाराचा उपयोग करतात त्याकडे लक्ष द्यावे
    आपण मामा देशमुख यांचा परिचय अतिशय सोप्या शब्दात करून दिला आहे याबद्दल आपले अभिनंदन आपण आता बाजीरावाचा पुतळा आणि मस्तानीची कबर लवकरात लवकर हलवण्याचा निर्णय घ्यावा

    ReplyDelete
  6. आप्पा - मामा देशमुख यांचे विचार अतिशय क्रांतिकारक आहेत आणि समाजाला नवीन दिशा देणारे आहेत याबद्दल अजिबात संशय नाही
    बाप्पा - नवीन पाठ्य पुस्तकात अभ्यासक्रमात हे विचार अत्यंत प्रभावीपणे मांडले जाण्यासाठी त्याचा पाठपुरावा होणे आवश्यक आहे
    आप्पा - आता नवीन लाल महाल शनिवार वाड्यावर होण्यासाठी इमारतीचा आराखडा मंजुरीसाठी सुयोग्य ठिकाणी दाखल करावा
    बाप्पा - पृथ्वीराज घोरपडे यांनी वर्गणी बद्दल लिहिले आहे , पण शिवरायांच्या स्मारकासाठी सरकारनेच "शनिवारवाडा लालमहाल कृती समिती" स्थापन करून एक भूमिका घ्यावी
    आप्पा - प्राचार्य मामा देशमुख यांच्या बद्दल अधिक लिहिले जाणे आवश्यक आहे त्यांचे थोर विचार सर्व वर्गाना मार्गदर्शक ठरून आपला महाराष्ट्र या नवविचारांनी एका नव्या जोमाने वाटचाल करेल आणि शेती शिक्षण आणि समाज प्रबोधन या क्षेत्रामध्ये मध्ये एक प्रगतीचे नवे शिखर गाठेल अशी खात्री आहे
    बाप्पा - २०१५ ला आचार्य मामा देशमुख याना भारतरत्न देऊन त्यांचा यथोचित गौरव करावा , त्यामुळे खरेतर भारतरत्न या पदविचाच गौरव होणार आहे हेपण मोदी सरकार आणि मोहन भागवत यांनी लक्षात घ्यावे
    आप्पा - पुणे हे नव विचारांना आणि उपक्रमाना प्रतिसाद देण्यासाठी प्रसिद्ध आहे , शनिवार वाडा येथे लाल महाल होण्यासाठी दैनिक सकाळ आणि इतर संस्था एक नवा उपक्रम हाती घेऊन करोडो रुपयाचा निधी मिळवून देईल
    बाप्पा - शनिवारवाड्यात शिवाजी महाराज हे निधर्मी कसे होते हे दाखवणारे एक दालन असावे असे सुचवावेसे वाटते
    आप्पा - शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली हा गैरसमज किंवा अफझल काकांची शिवाजी महाराजांनी हत्या केली हा गैरसमज प्राचार्य मामा देशमुख यांच्या ताज्या संशोधनाचा आधार घेत जगासमोर मांडावा

    ReplyDelete
  7. Sanjay you make false statements that is ok? You are a liar and I have proved it multiple times. So stop this hypocratic attitude of preaching others.

    ReplyDelete
  8. राष्ट्र जागृती लेखमाला अंर्तगत प्रा.मा.म.देशमुख यांनी पुढील ग्रंथ लिहिले आहेत.त्यातील मध्ययुगीन भारताचा इतिहास या ग्रंथावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली होती पण अवतरण चिन्हापर्यंत लढून हायकोर्टाने बंदी उठवली.त्याच्या पुस्तकांचे वैशिष्टये म्हणजे ना नफा ना तोटा तत्वावर विक्री व पुस्तकांचा प्रचंड खप.

    1.शिवशाही
    2.सन्मार्ग
    3.राष्ट्रनिर्माते
    4.मनुवाद्याशी लढा(नववी आवृती)
    5.रामदास आणि पेशवाई
    6.मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा
    7बहुजन समाज आणि परिवर्तन
    8.समाज प्रबोधन
    9.शिवराज्य
    10.साहित्यकांची जबाबदारी
    11.भांडारकर झाँकी है शनिवारवाडा बाकी है
    12.बौद्ध धम्म आणि शिवधर्म
    13.वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य
    14.अभिनव अभिरूप लोकसभा
    15.मराठ्यांचे दासीपुत्र(संपादित)
    16.अभ्यास असा करावा
    17.जय जिजाऊ
    18.मनुवादी शिवस्मारक होऊ देणार नाही...
    19.प्राचीन भारताचा इतिहास
    20.मध्ययुगीन भारताचा इतिहास (महाराष्ट्र शासनाने बंदी घातली हायकोर्टाने बंदी उठवली.)
    21.युगप्रवर्तक शिवराज आणि मराठ्याची शौर्यगाथा

    प्रा.मा.म.देशमुख यांच्या भाषणाच्या व्हिडिओ सी.डी.

    1.बौद्ध धम्म आणि शिवधर्म
    2.छत्रपती शिवराय
    3.डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि बहूजन समाज
    4.डॉ.पंजाबराव देशमुख
    5.न्या.सावंत मुलाखत
    6.आरक्षण भाग १
    7.आरक्षण भाग २
    8.ब्राह्मणी थोतांड
    9.कांशीराम
    10.अविद्येपेक्षा कुविद्या भयानक
    11.क्रांतीकारी भाषण
    12.हिंदू राष्ट्रवाद

    पुस्तके आणि व्ही. डी. ओ. सी. डी. मिळण्याचे ठिकाण :

    सौ. मंजुश्री देशमुख
    ६९, ए, कोतवाल नगर (प्रताप नगर), नागपूर - २२
    महाराष्ट्र.

    ReplyDelete
  9. कै .मामाजी देशमुख यांचे विचार वाचून मराठी मनात किती खळबळ चालू आहे त्याची कल्पना आली
    योयायोगाचा भाग असा की या पुस्तकांविषयी आम्ही शेजारच्या हंबीर राव याना सांगितले आणि त्यांनी गालातल्या गालात हसत आपल्या घरातून ती सर्व पुस्तके आणून दिली ते म्हणाले की खुद्द शिवाजी महाराज त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले की ही सर्व पुस्तके ५ रु किलोने नागपुरात
    कोतवाल नगरात उपलब्ध आहेत , अगदी कोरिच्या कोरी , ते असो , आम्ही सर्व पुस्तके घेतली , फारच उच्च विचार आहेत
    या विचारांनी जर सर्व नागपूरकर भारावून गेले तर महाराष्ट्राचे रंगरूप बदलून जाईल
    ह्या प्राचार्याना दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात आणून त्यांची सीडी व्याख्याने विशेषतः पुणे ठाणे नाशकात झाली पाहिजेत
    निदान ही रद्दी त्या भागात वाटली पाहिजे
    किती थोर विचार , अंग मोहरून गेले आज ते आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार आपल्याला प्रत्येक पावलागणिक मार्गदर्शन करतील
    उद्याची आपली पिढी किती महान असेल
    धन्य ते मामा देशमुख . खरेतर त्यांचे स्मारक प्रथम झाले पाहिजे , आणि नंतर शिवाजी राजांचे
    की . मामांचा अश्वारूढ पुतळा सिताबर्डीत करुया
    चला निघूया सरसावोनी देशाच्या उद्धरणी

    ReplyDelete
    Replies
    1. कै. दत्तात्रेय आगाशे या बावळट, खुळचट, हरामखोर माणसाला अगदी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली.

      Delete
  10. Really a great historian M M Deshmukh!

    ReplyDelete
  11. इतिहासाची अधिकात अधिक वस्तुनिष्ठ अशी व्याख्या करायची, तर इतिहास ह्या संस्कृत शब्दाचा व्युत्पत्तिसिद्ध जो अर्थ आहे, तोच स्वयंपूर्ण आणि प्रमाण मानावा लागेल. 'इति + ह् + आस' म्हणजे 'असे झाले', 'याप्रमाणे घडले'. ह्यात सर्व घडलेल्या गोष्टी आल्या आणि अर्थात त्या घडल्या तशाच सांगितल्या गेल्या, हेही इथे अभिप्रेत आहे. जे घडले ते सर्वच्या सर्व इतिहासाच्या कक्षेत न घेतल्यामुळे इतिहास म्हणजे भूतकालीन राजकारण, अशा प्रकारच्या संकुचित व्याख्या निर्माण होतात. एखाद्या कालखंडाचा इतिहास म्हणजे त्या काळातील मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा आढावा, असाच अर्थ झाला पाहिजे. आवश्यकतेप्रमाणे घटनांची निवड करता येते,केलीही जाते; मात्र अशा वेळी आपण ज्याचा आढावा घेत अहोत, तो भूतकालीन जीवनाचा केवळ एक भाग आहे, ह्याची स्पष्ट जाणीव ठेवावी लागते.

    इतिहासाच्या व्याख्येत 'असे असे झाले' असे मोघमपणे म्हटले, तरी काय झाले व कसे झाले हे सांगणारा अभ्यासक इतिहासकथनाच्या क्रियेत त्या घटनांकडे पाहण्याची आपली द्दष्टी थोडीबहुत आणणारच. काही अज्ञान, काही पूर्वग्रह व काही प्रमाणात भूतकालातील विचार व भावना समजण्याची माणसाची असमर्थता यांमुळे इतिहासलेखन हे खरोखरी अगदी जसे घडले तसेच्या तसे सांगितले, अशा स्वरूपाचे होणे शक्य नाही. तथापि आदर्श स्वरूपात इतिहास म्हणजे जे घडले ते जसेच्या तसे सांगणे व जेवढे सर्व सांगणे, असाच अर्थ करावा लागेल.

    माणूस जेव्हा इतिहासाचा विचार करतो, तेव्हा त्याचे लक्ष्य मानव हेच असते. माणसाप्रमाणे एखाद्या हत्तीला, वृक्षाला किंवा दगडालाही भूतकाळ आहेत. प्राणिशास्त्रज्ञाच्या दृष्टीने हत्तीचा इतिहास, वनस्पतीशास्त्रज्ञानाच्या दृष्टीने वृक्षाचा भूतकाळ आणि भूवैज्ञानिकाच्या दृष्टीने दगडाचे जुने स्वरूप ह्याही गोष्टी अर्थपूर्ण आहेत. तथापि जेव्हा इतिहास विषयाचा ती एक ज्ञानशाखा म्हणून विचार होतो, तेव्हा अभ्यासविषय म्हणून मनुष्यप्राणीच अभिप्रेत असतो. जीवनपद्धतीत प्रयत्‍नपूर्वक आणि जाणीवपूर्वक होत जाणारी स्थित्यंतरे ही फक्त मानवाच्या बाबतीत शक्य आहेत. अधिकाधिक सुखसमृद्धीसाठी मानव धडपडत असतो. ह्या उद्योगात जय असतात. पराजयही असतात. ह्या सर्व यशापयशांची कथा आणि चिकित्सा म्हणजे इतिहास.
    इतिहासाच्या संबंधात निर्विवाद असलेली गोष्ट एकच. ती म्हणजे एकामागून एक होणारी स्थित्यंतरे. माणूस कापसाचे, रेशमाचे, लोकरीचे, टेरिलीनचे वस्त्र केव्हातरी वापरीत नव्हता. तो केव्हातरी ते वापरू लागला हे निश्चित. तसेच राजकीय जीवनात पूर्वी जगाच्या बहुतेक भागांत सर्वसत्ताधीश असे राजे राज्य करीत होते, तर आज जगाच्या बहुतेक सर्व भागांत लोकशाही पद्धतीचा राज्यकारभार चालू आहे. सामाजिक व्यवहारात जगातील अनेक समाजात पूर्वी बहुपत्‍नीकत्व होते, ते आता गेले आहे. आता हे स्थित्यंतर फक्त जीवनाच्या बाह्या स्वरूपातीलच आहे. एक सजीव प्राणी म्हणून भूक, तहान, लैंगिक भावना इ. मूलभूत विकार जे आहेत, ते कोणत्याही काळी कोणत्याही समाजात सारखेच असतात, असे म्हणता येईल. हे जरी मान्य केले, तरी आपल्या निरनिराळ्या भुका भागविण्याच्या, निरनिराळ्या इच्छा पुऱ्या करून घेण्याच्या माणसाच्या पद्धती बदलतात. बदल—बाह्य स्वरूपातील बदल म्हणा हवे तर-हे एक उघड दिसणारे आणि वादातीत असे सत्य आहे. काहीतरी असते ते नाहीसे होते किंवा त्याचे रूप तरी पालटते, काही नसलेल्या गोष्टी नव्याने येतात किंवा जुन्याच गोष्टी नव्या स्वरूपात अवतरतात. पण काहीना काही घडामोड ही चालूच अलते. ह्या घडामोडींचे अर्थ कसेही लावले, तरी घडामोड नावाचे सत्य मानायलाच पाहिजे. इतिहासाचा दुसरा कोणताही अर्थ लागो किंवा न लागो, इतिहास म्हणजे बदल, इतिहास म्हणजे स्थित्यंतर, हे मान्य करूनच पुढे त्या विषयासंबंधी अधिक ऊहापोह व्हावा.

    ReplyDelete
  12. डॉ.बालाजी जाधव मुलाखतीत म्हणाले "मी प्रथम कट्टर हिंदुत्ववादी होतो. मी कुणाचेही काही ऐकत नव्हतो.माझ्या भावांनी मला एकदा प्रश्न केला की, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध का झाला ? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते.त्यांनी दुसरा प्रश्न केला की, तुकाराम महाराज वैकुंठी गेले की त्यांच्या खून झाला ? याही प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. मात्र भावाने असे प्रश्न केल्याने मी मात्र भावावर खवळलोच तेंव्हा भावाने मला आ.ह.साळूंके यांचे विद्रोही तुकाराम, मा.म.देशमुख यांचे रामदास पेशवाई आणि गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता? हे पुस्तक वाचण्यास सांगितले.दुसरा प्रसंग असा घडला की,मी लातुरला १२ वी इंटरशीपला असतांना माझा मित्र भोसले मला मा.म.देशमुख यांच्या केडर कॅंपला घेऊन गेला होता.तेंव्हा मला त्यांचे विचार आवडले आणि डोळ्यावरची हिंदुत्ववादाची झाडप गळून पडली. आपणही समाजासाठी काहीतरी करावं असं ठरवलं.त्यावेळेस मा.म.देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी शिक्षण विचारलं, मी १२ वी इंटरशिपला असल्यामुळे त्यांनी नंतर या तुमचं समाजासाठी काम करण्याचं वय नाही असे सांगितले.ही आपलेपणाची भावना मला पटली कारण असे कोणीही सांगत नाही तेंव्हा पासून मी या चळवळीत कार्य करायचं ठरवलं व त्याप्रमाणे मी कार्य करत आहे".

    ReplyDelete
  13. प्रा मामाजी देशमुख यांचे कार्य आज सर्वत्र गौरवले जात आहे , आज समाज जागृत होत आहे
    बहुजन समाज आज पर्यंत झोपलेला होता तोवर सवर्णांची सद्दी होती परंतु आज बहुजनाना अगदी सोप्या शब्दात त्यांच्या हक्कांची आणि अन्यायाची जाणीव प्रा मामाजी देशमुखांनी करून दिली आहे . त्यांचे यौ ट्यूब वरील भाषणाचे चिंतन मनन करावेसे वाटते
    आपण सर्वांनी एकत्र येउन त्यांचा भव्य सत्कार केला पाहिजे
    तसेच आज हा समाज दारू मटका आणि अत्यंत विखारी व्यसनात बुडाला आहे त्यासाठी सर्व श्रीमंत बहुजनांनी या पद दलिताना प्रत्येकी १ लाख वर्गणी काढून मदत करून चांगल्या उपक्रमाची सुरवात करायला पाहिजे तसेच आपली सरकारी नोकरी व्ही आर एस घेऊन या पद दलिताना दिली पाहिजे त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल
    चला तर आपण सर्व आपल्या नोकर्यांचे राजीनामे देऊन त्यांची प्रगतीची वात मोकळी करुया
    त्यांचे " शनिवारवाडा हाच खरा लाल महाल " हे संशोधन फारच अभ्यास करण्या सारखे आहे ,
    याबाबत दुसरे श्रेष्ठ इतिहास तज्ञ प्रा संजय सोनवणी यानिपण काही लिहावे असे विनंतीवजा सांगावे आपण सर्वांनी २०१५ मध्ये शनिवार वाड्यावर आमरण उपोषण करून तो ताब्यात घेतला पाहिजे या आमरण उपोषणाची सुरवात प्रा मामाजी देशमुख स्वतः करतील याबद्दल शंका नाही

    मला खात्री आहे की प्रा मामाजी देशमुख त्याचे नेतृत्व करतील आणि प्रत्येकी १ लाख रुपये
    पद दलिताना वाटतील

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...