Friday, September 28, 2012

भाषेचा उदय कसा होतो? (1)




भाषा हा मानवसमाजाच्या अस्तित्वाचा, सांस्क्रुतीक प्रगतीचा प्राण आहे. किंबहुना भाषेच्या अस्तित्वाखेरीज मनुष्य हा पुरा-आदिम अवस्थेतच राहिला असता व कसलीही भौतीक प्रगती त्याला साध्य करता आली नसती. भाषेचा उदय कसा झाला असावा व त्याच्या प्रगतीचे टप्पे काय असावेत याबाबत सतराव्या शतकापासुनच तत्वद्न्य,  ते भाषाविद चर्चा करु लागले होते. त्यांच्यात एकमत न होता विवादच वाढु लागल्यानंतर १८६६ मद्धे लिंग्विस्टिक सोसायटी ओफ प्यरिसने या विवादावरच बंदी घालण्याइतपत मजल गाठली होती. असे असले तरी मानवी जिद्न्यासा अपार असते. जगात आजमितीला अक्षरशा हजारो भाषा आहेत. काही भाषा म्रुत झाल्या असुन काही म्रुत होण्याच्या मार्गावर आहेत. जोवर ती भाषा बोलणारा मानवी समुदाय पुरेपुर नष्ट होत नाही तोवर अन्य भाषांचे कितीही आक्रमण झाले तरी मुळ भाषेचा गाभा त्या-त्या भाषेचे अनुयायी जपुन ठेवतात हेही एक वास्तव आहे. भाषा ही मानवी मनाची मुलभुत (Innate) गरज आहे असे मत मानसशास्त्राचा पितामह सिग्मंड फ्राईड याने स्पष्ट नोंदवुन ठेवले आहे आणि त्यात अमान्य करण्यासारखे काही नाही.

भाषेच्या उद्गमाबाबत जी चर्चा आजवर झालेली आहे त्याबद्दल आपण प्रथम आढावा घेवूयात.
भाषेचा उगम व विकास हा क्रमशा: होत जात असून भाषेचा उदय एकाएकी झाला असे मानता येत नाही असे क्रमविकासवादी (Continuity theories)चे समर्थक मानत होते. भाषा आज आपण जशा पहातो-वापरतो त्या एवढ्या गुंतागुंतीच्या (Complex) व तरीही त्याहीपेक्षा वाढलेल्या नवीन मानसिक गुंतागुंतीच्या अभिव्यक्तीला अनेकदा पुरेसा न्याय न देना-या आहेत कि त्यांचा उगम एकाएकी झालेला असू शकत नाही असे त्यांचे एकुणातील मत आहे.
स्टिव्हन पिंकर हा या मताचा खंदा पुरस्कर्ता होता. त्याच्या मते जसा मानवी प्राण्याचा क्रमविकास झाला तशीच भाषाही क्रमश: विकसीत होत गेली. या सिद्धांताशी सहमत, पण विभिन्न मते असणा-यांपैकी, एका गटाचे मत होते कि भाषेचा उगम हा इतरांशी संवाद साधण्याच्या गरजेतुन निर्माण झाला नसुन आदिम अभिव्यक्तीच्या नैसर्गिक गरजेतुन निर्माण झाला आहे.
अगदी या क्रमविकाससिद्धांतालाही छेद देणारा पुढचा सिद्धात आला तो म्हणजे "क्रमखंडवादी" (Discontinuty Theories) सिद्धांत. या सिद्धांतवाद्यांच्या मते अन्य कोनत्याही प्राण्यात न आढळणा-या एकमेवद्वितीय अशा भाषानिर्मितीचे गुण मानवातच आढळत असल्याने ती बहुदा एकाएकी मानवी उत्क्रांतीच्या क्रमात कोणत्यातरी टप्प्यावर अचानकपणे अवतरली असावी असे या सिद्धांत्याचे मत आहे.
नोआम चोम्स्की हा क्रमखंडवादी सिद्धांताचा प्रमुख प्रसारक होता. परंतु त्याचा सिद्धांताला फारसे समर्थक लाभले नसले तरी एक लक्ष वर्षांच्या मानवी क्रमविकासात अचानक, बहुदा अपघाताने, भाषिक गुणांचा अचानक विस्फोट होत भाषा अवतरली असावी असे त्याचे मुख्य मत होते. या मतामागे प्रामुख्याने मानवी गुणसुत्रांत होणारे काही अचानक बदल त्याने ग्रुहित धरले होते. मानवी शरीरातील, विशेषता: मेंदुतील जैवरसायनी बदलांमुळे भाषेचा उद्गम झाला अशा या सिद्धांताचा एकुणातील अर्थ आहे
अजून एक विचारप्रवाह आहे तो म्हणजे भाषा हा मानवी मनातील (मेंदुतील) मुलभुत गुणधर्म असून गुणसुत्रांनीच त्याची नैसर्गिक बांधनी मानवी मनात केली आहे व त्यामुळेच भाषेंचा जन्म झाला आहे. हे मत फारसे मान्य केले गेले नाही याचे कारण म्हणजे अंतत: वेगळे काही असे या सिद्धांतामुळे सिद्ध होत नाही.

मी भाषेचा क्रमविकास हा कालौघात होत जातो या मताशी सहमत आहे. पण क्रमविकास मान्य केल्याने मुळात भाषाच का निर्माण होते याचे उत्तर मिळत नाही. याच सिद्धांत्यांचे म्हनने आहे कि एकतर संवाद साधण्यासाठी तरी भाषेची निर्मिती होते अथवा अभिव्यक्त होण्यासाठी. या सिद्धांत्यांनी अर्थातच चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवाद मान्य केला आहे हे स्पष्टच आहे. एपपासुन पुरातन होमो, नियेंडरथल आणि मग आताच्या मानवाचे पुर्वज होमोसेपियन्स अशी या क्रमविकासाची रचना आहे.
मी या मताशी सहमत नाही. याचे कारण म्हणजे पुरादिम एपपासुन जर समजा आजचा मानव निर्माण झाला तर तसाच क्रमविकास अन्य प्राण्यांत दिसत नाही. डार्विनने प्रत्यक्ष निरिक्षणांतुन काही नि:श्कर्ष काढले. त्यात पुरातन आदिम अन्य प्राण्याची जीवाष्मे/अवशेष सापडल्याने व त्यांचे आताच्या काही प्राणी-पक्षी-मत्स्य यांच्याशी क्रमविकासामुळे (उत्क्रांतीमुळे) असलेले साधर्म्य दाखवले असले तरी ते वैद्न्यानिक पायावरच अमान्य होण्यासारखे आहे.

ते आधी कसे हे आपण येथे पाहुयात.

१. मानवाची जशी सरासरी २५ लक्ष वर्षांपासुन उत्क्रांती होत आहे हे मान्य केले तर मग याच कालखंडात अन्य प्राण्यांची उत्क्रांती झाल्याचे दिसुन येत नाही. तत्पुर्वीचे असंख्ये जीव नष्ट झाले ते बव्हंशी जल-वायुमान, तापमान, अचानक धुमसणारे ज्वालामुखी, उल्काप्रपात यामुळे. "सर्व्हावयल ओफ फिट्टेस्ट" हे डार्विन यांचे तत्व येथे मान्य होत नाही. ज्या आदिम जैवरासायनिक क्रियेतुन आद्य जीव निर्माण झाले, ते जशा प्रुथ्वीच्या रसायनी वातावरणात बदल होत गेले तसे नष्ट झाले आणि नवीन रसायनांतुन नवजीव निर्माण होत गेले.
२. प्रुथ्वीचा पुराकाळ हा अत्यंत विक्षोभी (Hostile) होता. परंतु ४०-४५ लाख वर्षांपुर्वी तो क्रमशा: स्थिर होत गेला व याच काळात आताचे दिसनारे सर्वच जीव पुन्हा नव्या दमाने, परंतु बदललेल्या पर्यावरणाशी जुळवणारे, अस्तित्वात आले. कोणतही जीव हा कोनत्याही पुरातन जीवघटकाचा उत्क्रंत नमुना आहे असे म्हणण्यासाठी कसलेही पुरावे उपलब्ध नाहीत. प्रथमदर्शीची साम्ये एवढेच सिद्ध करतात कि ज्या रसायनी क्रियेतुन तत्पुर्वीचे जीव भुतलावर जन्माला आले जवळपास तसलेच जीव त्याच परंतु बदललेल्या रसायनी क्रियेतुन जन्माला आले. त्यामुळे आधीच्या जीवांतील कमीअधिक साम्य, परंतु नवीन तत्सम रचना आणि तत्सम नैसर्गिक अभिव्यक्ती निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसुन येते.
३. जगण्याच्या संघर्षातुन नवनवीन नैसर्गिक आयुधे निर्माण होत गेली असाही डर्विन यांचा तर्क आहे. एप मद्धे जी नैसर्गिक आयुधे आहेत त्यापैकी एकही मानवात नहीत. शिवाय एप आजही अस्तित्वात आहेत. त्यांच्यात अर्धमानव-अर्ध एप अशी एकही प्राणि प्रजाती आजही अस्तित्वात नाही. खरे तर एप पासुन क्रमविकास होत आजचा मानव बनला असता तर एकही एप या भुतलावर अस्तित्वात नसता. हाच न्याय अन्य प्राणिसमुहालाही लावता येतो.
याचा अर्थ असा नाही कि मी उत्क्रांतीवाद पुर्णतया फेटाळुन लावत आहे. डार्विन यांचे नि:ष्कर्ष अत्यंत धाडसी व घाईचे होते एवढेच मला येथे नमुद करायचे आहे. क्रमविकास हा फक्त मानवी संदर्भात घेता येतो व तोही मानसिक पातळीवर. भौतिक पातळीवरचे बदल हे पुन्हा वातावरणातील बदलांशी संबंधित आहेत, परंतु त्याचे प्रमाण अल्पांशात आहे. जे पुरामानवाचे अवशेष (विशेशता: आफ्रिकेतील) ग्रुहित धरत मानव प्रथम आफ्रिकेत अवतरला व नंतर जगभर पसरला (निएंडरथन मानव) हे मानववंशशास्त्रद्न्यांचे मतही असेच धाडसी आहे. प्रत्यक्षत जगभरच सर्वत्रच मानव प्राण्यापासुन ते अन्य सर्व प्राणी, जलचर,  जरी एकाच वेळीस नसले तरी काही शतकांच्या (लाखो वर्षांच्या नव्हे) अंतराने निर्माण झाले. रसायनी क्रियेतच जे मुळात, ज्याला आपण अक्षम जीव आपसुक निर्माण झाले त्यांचा आपसुक कालौघात नाश झाला.
पण "सर्वायवल ओप्फ़ द फिट्टेस्ट" हा न्याय लावला तर ज्यांच्यात कसलेही तसे फिट नाहीत अशा असंख्य प्रजात्या, "जीवो जीवस्य जीवनम" हा न्याय लावला तरी अस्तित्वात आहेत. त्यांच्यात कसलेही शारीर-भौतिक (उत्क्रांती) बदल झालेले नाहीत. जर काही प्राणि जमाती (उदा. डॊडॊ) नष्ट झाल्या असतील तर त्या मानवी अक्षम्य चुकांमुळे झाल्या आहेत. निसर्गाचा काही संबंध नाही.
  दुसरे असे कि मानवाला सक्षम तोंड देण्यासाठी मग जो नैसर्गिक क्रमविकास अशा प्राण्यांमद्धे व्हायला हवा होता तसाही तो झालेला नाही.

याचाच अर्थ असा होतो कि डार्विनचा उत्क्रांतीवादी सिद्धांत जसाच्या तसा मान्य करता येत नाही.

उलट क्रमखंडवाद (भाषेच्या विकासाच्या परिप्रेक्षात नव्हे हे क्रुपया ध्यानात घ्यावे.) सहज मान्य होण्यासारखा आहे. प्रुथ्वीचा जन्म सरासरी सहा अब्ज वर्षांपुर्वी झाला याबाबत सर्वच शास्त्रद्न्यांत एकमत आहे. हा कालखंड समजा दोनेक अब्ज वर्ष मागेपुढे होवू शकतो हेही सध्या मान्य करुयात, कारण तसे प्रत्यक्ष पुरावे अद्याप तरी हाती आलेले नाहीत. विश्वनिर्मितीशास्त्र अद्याप गणिती अंदाजांच्या पायावरच रेंगाळत आहे असे समजुन आपण पुढे जावुयात.

(क्रमश:)

Tuesday, September 25, 2012

ऐरणीच्या देवा तुला...


Image result for iron pillar mehrauli history


आपल्या पुरातन पुर्वजांनी इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर जीवनोपयोगी जे शोध लावले ते पाहून आपण अचंबित होतो. लोहाचा शोध हा एक असाच अत्यंत महत्वाचा टप्पा. लोहयुगाचे सुरुवात ही मानवी विकासाच्या टप्प्यातील एक क्रांतीकारी घटना मानली जाते. सनपूर्व तीन हजार वर्षांपुर्वी मानवाला लोहाचा शोध लागला असे पुरातत्वविद मानतात. लोहयुग सुरु होण्याच्याही खूप आधी मध्यपुर्वेत अशनींत मिळणारे शुद्ध लोह-निकेलचे गोळे वापरात आनले जात असत. भूपृष्ठावर मिळणा-या लोह खनिजात अशुद्ध धातू व अधातु जवळपास ३० ते ३५% असतात. शिवाय धातुकाचे ओक्सीडीकरण झालेले असते. लोह वितळवण्यासाठी आवश्यक असलेले उच्च तापमान निर्माण कृत्रीमरित्या निर्माण करणे व शुद्ध लोह वेगळे करणे ही क्रिया सुरुवातीला अशक्य अशीच होती. त्यामुळे लोह वितळवून धातूरस साच्यात घालुन वेगवेगळ्य वस्तु निर्माण करत येत नसत. त्यामुळे सुरुवातीला लोखंडाचे गोळे तापवून, नरम करुन त्याला ठोकून निरनिराळ्या वस्तू बनवल्या जावू लागल्या. कालांतराने मानवाने भट्ट्यांत तांत्रिक सुधारणा केली व लोहाचा रस निर्माण करण्यासाठी आवश्यक तापमान निर्माण व्हायला सुरुवात झाली.


भारतात लोहयुग कधी अवतरले याबाबत विद्वानांत अनेक मतभेद आहेत. ऋग्वेदात लोहाचा उल्लेख येत नाही. वैदिक मंडळीनी लोहशास्त्र आदिवासी मुंड लोकांकडुन घेतले असे मत अ.ज. करंदीकर यांनी व्यक्त केले आहे. संस्कृतात मुंड शब्दाचा अर्थ "लोह" असाच आहे. मुंडायसम, मुंडलोहम अशी नांवे वेदांत वारंवार येतात. त्यामुळे भारतातील लोहाच्या शोधाचे श्रेय मुंड या आदिवासी जमातीला दिले जाते व ते संयुक्तिकही आहे. मुंड आदिवासींच्या वसाहती आजही ज्या भागांत आहेत तेथे लोहखनिजाच्या विपूल खानी आहेत. त्यामुळे लोहाशी त्यांचा प्रथम परिचय झाला असणे स्वाभाविक आहे. सनपूर्व अठराव्या शतकापर्यंत लोह उद्योग भारतभर पसरला होता असे विविध ठिकाणी झालेल्या उत्खननांतुन सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात तीन हजार वर्षांपुर्वीच्या  महापाषाणयुगातील लोखंडाचे घोड्याचे नाल व खिळे तसेच घोड्याच्या मुखावर बसवण्यासाठी बनवलेला तांब्याच्या पत्र्यापासून बनवलेल्या व लोखंडी खिळ्यांनी ठोकलेला अलंकार मिळाला आहे.

पुढे मात्र लोहक्षेत्रात भारतियांनी खुपच मोठी क्रांती घडवली. शुद्ध लोह मऊ असल्याने हत्यारांसाठी त्याचा उपयोग होत नसे. पण धातुरसात कर्ब मिसळला तर कठीण असे पोलाद तयार होते असे लक्षात आले. बैलगाडीच्या चाकांना लोखंडी धाव बनवणे ही फारच मोठी तंत्रकौशल्याची बाब होती. त्यामुळे बैलगाड्यांचे आयुष्य तर वाढलेच मालवाहतुकही सुलभ होत गेली. सिंधु संस्कृतीत लोहाच्या धावा बैलगाड्यांना असत. अशा धावांच्या चाको-याही सापडलेल्या आहेत. पाण्याच्या मोटी, नांदरांचे फाळ, कुदळी, टिकाव, पहारी, खुरपी, घमेली, विळ्या, खिडक्यांचे गज, बांगड्या, प्याले ते थाळ्याही लोहापासून बनू लागल्या.  मानवी जीवनात ही एक मोठी क्रांती होती. मानवी जीवन सुलभ, सुसह्य करण्यात या असंख्य लोहवस्तुंनी हातभार लावला.

युद्धतंत्रातही या शोधाने मोठी क्रांती झाली. सनपुर्व १००० पासून पोलादी तलवारी, बाणांची टोके, चिलखते पोलादापासून बनू लागली. सैन्याची संहार व बचाव क्षमता वाढली. दैनंदिन वापराच्या वस्तूंपासून ते सैन्यासाठी शस्त्रास्त्रे बनवणे हा एक देशव्यापी अवाढव्य उद्योग बनला. लोह वितळवणे ते त्यापासून विविध वस्तु बनवणे हे एक तंत्र कौशल्याचे तसेच कष्टाचे काम. शिवाय धातुज्ञानाची आवश्यकता. सातयाने उष्नतेच्या धगीत रहावे लागण्याची आवश्यकता. यामुळे इसपू १००० पासुनच हा उद्योग परंपरागत बनत गेला. भारतात निर्माण झालेल्या प्राचीन जातींपैकी ही एक जात. अर्थात या जातीत विविध वंशगटांतील लोक आले. व्यवसाय वैविध्यही त्यामुळेच आले.

भारतातील लोहारांनी धातुशास्त्रात जी प्रगती केली तिला तोड नाही. भारताच्त बनणा-या पोलादी तलवारी जगात उच्च दर्जाच्या मानल्या जात. निर्यातही मोठ्या प्रमाणावर होत असे. भारतीय तलवारींत न्यनो तंत्रज्ञान वापरले गेले असल्याचे दावे आता होत आहेत. टिपू सुलतानाची तलवार न्यनो तंत्रज्ञानानेच बनवली गेली होती. या सर्व प्रक्रिया लिखित स्वरुपात लिहिल्या न गेल्याने आधुनिक लोहविज्ञानाची मोठीच हानी झाली आहे असे आपल्याला म्हनता येते. परंतु आपापले शोध, तंत्रे पिढ्यानुपिढ्या आपल्याच वंशात जपण्याची आपली पद्धत. त्यामुळे असे होणेही स्वाभाविक होते.

भारतीयांनी अझुन एक क्रांती केली ती म्हनजे लोहभुकटी विज्ञानात घेतलेली झेप. अठराव्या शतकापर्यंत जे तंत्रज्ञान युरोपातही शोधले गेले नव्हते ते तंत्रज्ञान भारतीय लोहारांना चांगलेच माहित होते. याचा आजेही जिताजागता असलेला पुरावा म्हणजे महरौली येथील २३ फुट उंचीचा व सुमारे सहा टन वजनाचा कधीही न गंजनारा लोहस्तंभ. हा स्तंभ सन चवथ्या शतकात निर्माण केला गेला. हा स्तंभ उघड्यावर असूनही का गंजत नाही ही बाब नेहमीच आश्चर्याची मानली गेली आहे. परंतु आधुनिक पावडर मेटालर्जी तज्ञांनी हा स्तंभ लोहभुकटी विज्ञानाने बनला आहे असे सिद्ध केले आहे.

लोखंडाची अत्यंत बारीक भुकटी करुन, त्यात निकेल, तांबे अशा धातुंची पुड काही प्रमाणात मिसळुन मिश्रधातु बनवणे ही पहिली पायरी. पुढची पायरी म्हनजे हे भुकटी मिश्रण साच्यात दाबुन सरासरी वितळबिंदुच्या खालचे म्हणजे ९०० डिग्री तापमान बाहेरुन देणे. या तापमानाला धातुभुकटीचे कण परस्परसंबब्ध होवून अखंड वस्तू मिळते. या तंत्रज्ञानाला आज सिंटरिंग तंत्रज्ञान म्हनतात. याच पद्धतीने क्रमाक्रमाने हा लोहस्तंभ बनवला गेला आहे. यात असलेल्या अगंज धातुकांच्या भुकटीच्या मिश्रनानेच या स्तंभावर आजतागायत गंज चढलेला नाही. पण हे तंत्रज्ञान पुढे फारसे वापरात आलेले दिसत नाही. अपवाद असतीलही, पण त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे मात्र उपलब्ध नाहीत. परंतु आजही पाश्चात्य जग धातुभुकटी विज्ञानाच्या शोधाचे श्रेय भारताला देते हा आपल्या लोहविद्येचा मोठा सन्मानच होय.

पुर्वीचे लोहार किती मोठे साचे बनवू शकत असतील? याचे एक उदाहरण आजही जीवित आहे.

रांचीच्या पश्चिमेला दोनेकशे किलोमीटर अंतरावर टांगीनाथ नांवाचे एक प्रसिद्ध शिवक्षेत्र आहे. येथे एक प्रचंड त्रिशुळ असून त्याचे मधले टोक तुटुन पदलेले आहे. या तुकड्याचेच वजन तीन टन आहे. संपुर्ण त्रिशुळाचे वजन वीस टन असावे असा तज्ञांचा कयास आहे. हा त्रिशूल अखंड साच्यातुन बनवला गेला आहे. अवघ्या जगात असे लोहकामाचे उदाहरण नाही. हा त्रिशुळ किमान दीड हजार वर्ष एवढा जुना आहे. वीस टनी त्रिशूळ बनवायला केवढा मोठा साचा तयार करावा लागला असेल व त्यासाठी नेमके कसे तंत्रज्ञान विकसीत केले गेले असेल याची आज आपण फक्त कल्पनाच करु शकतो.

थोडक्यात भारतातील लोहारांनी धातु विज्ञानात अद्भुत प्रगती साधली होती. बिल ड्युरांटने "द स्टोरी ओफ सिविलायजेशन" या ग्रंथात भारतीयांनी कास्ट आयर्न बाबत भारतीयांनी केलेल्या प्रगतीचे कौतुक केले असून पाश्चात्य जग भारतीयांपेक्षा किती मागासलेले होते याचे विस्तृत वर्णन करून ठेवले आहे.

 भारतात एखादा व्यवसाय वंशपरंपरागत बनला कि त्याची जात बनते हे एक ऐतिहासिक वास्तव आहे. लोहार हीही एक जात बनणे स्वाभाविकच होते. भारतात सुरुवातीला ज्या अल्पशा जाती बनल्या त्या आद्य जातींपैकी लोहार ही जात होय. प्रदेशनिहाय भाषाभेदांमुळे व व्यवसाय वैशिष्ट्यांमुळे लोहार समाजात विविध पोटभेद पडत गेले. रिश्ले हा मानववंशशास्त्रज्ञ म्हणतो कि भारतातील लोहार हे वेगवेगळ्या वंशगटांतुन आलेले आहेत. त्यामुळेच कि काय देवदेवता, विवाह चालीरिती, धर्मश्रद्धा यांत फरक आढळतो. प्रदेशनिहाय नांवेही वेगळी आहेत. उदा. कन्नड लोहारांना कम्मार म्हणतात, कोकणी लोहारांना धावड तर बिहारमद्धे बढई म्हणतात.

राजस्थानातुन महाराष्ट्रात आलेल्या गाडी लोहारांची कथाही अद्भुत आहे. गाडीलोहार म्हनजे फिरस्ते लोहार. हत्यारे बनवून बैलगाडीतुन हिंडुन ती विकणारे वा स्थानिक गरजांप्रमाने ती बनवून देणारी ही एक पोटजात. हे मुळचे राजस्थानी. सन १५६८ मद्ध्ये अकबराने चितोड काबीज केले. गाडी लोहारांना या घटनेचे प्रचंड दु:ख झाले व त्यांनी राजस्थान सोडुन जायचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी पाच प्रतिज्ञा केल्या त्या अशा...१. कुठेही स्थाईक वस्ती करायची नाही, २) छपराखाली रहायचे नाही, ३) विहिरीतुन दोराने पाणी काढायचे नाही, 4) दिवा लावायचा नाही आणि ५) खाटेवर झोपायचे नाही. नंतर चारशे वर्षांनी स्वातंत्र्यानंतरच या स्वाभिमानी गाडी लोहारांचा राजस्थान प्रवेश समारंभपुर्वक झाला...पंतप्रधान पं नेहरु या समारंभाला आवर्जुन उपस्थित होते.

महाराष्ट्रात आजमितीला जवळपास २० लाख लोहार समाजाचे लोक राहतात. हा समाज खेडोपाडी विखुरलेला असून जवळपास पाच पोटजातींत हा समाज विखुरलेला आहे. या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व शुण्य असून औद्योगिकरणानंतर तर हा व्यवसायही जवळपास संपला आहे. मोठमोठे उद्योग अगदी टिकाव-घमेलीही बनवू लागल्याने यांची गरजच संपवली गेली. खरे तर शासनाने या परंपरागत उद्योगाला संजीवनी देत औद्योगिकिकरणात सामाविष्ट करून घेत त्यांच्या पारंपारिक कौशल्यांचा उपयोग करुन घ्यायला हवा होता. अजुनही वेळ गेलेली नाही असे लोहार समाजाचे नेते श्री दिलीप थोरात मानतात. पोटजातींतील विभेद संपवण्याचे प्रयत्नही मोठ्या प्रमानावर होत आहेत. हे खरे असले तरी शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण व आर्थिक दारिद्र्य हा या समाजासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. पदवीधरांची अजुनही या समाजात मोठ्या प्रमाणावर वानवा आहे. भारतात लोहयुग अवतरवत जनजीवन सक्षम आणि समृद्ध करनारा हा समाज आज अस्तित्वहीण झालेला आहे. या समाजाचे आर्थिक उत्थान करता येणे सरकारला अशक्य नाही. त्यासाठी लोहार समाजाच्या पारंपारिक व्यवसायाला आधुनिक बनवण्यासाठी तांत्रिक व अर्थसहाय्य उपलब्ध करून देत विक्री यंत्रणा निर्माण करुन दिली तर आजही हा उद्योग काही प्रमानात का होईना उभारी धरु शकतो व आजही खेडोपाडी जे लोहारकामावरच कसाबसा तग धरुन आहेत त्यांना उत्पन्नाचे साधन मिळु शकते. अनेक लोहवस्तु आजही कारखान्यांत बनत नाहीत पण त्यांची गरज असते. अशा वस्तु-उत्पादनापुरता तरी या समाजाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होवू शकतो. एके काळी मुंबईतील लोहार चाळ ही दैनंदिन उपयोगाच्या कलात्मक लोहवस्तुंसाठी प्रसिद्ध होती. आता तिचे नांव तेच राहिले पण उत्पादने भलतीच विकली जातात. पण यातुन घेता येईल तो धडा हा कि लोहवस्तुंची अनेक विक्रीकेंद्रे काढता येणे सहज शक्य आहे. हस्तोद्योग, खादी-ग्रामोद्योग केंद्रांप्रमानेच लोहवस्तु केंद्रेही बनवता येणे अशक्य नाही. पण त्यासाठी हवी शासनाची संवेदनशीलता. सर्व समाजघटकांचे खरे कल्याण घडवण्याची तळमळ!

एखादा समाज अत्यल्पसंख्य आहे, राजकीय प्रतिनिधित्व नाही म्हणुन त्या समाजाला पुर्ण दुर्लक्षीत ठेवायचे असले निंद्य कृत्य शासनाकडुन व सर्वच समाजांकडुन होवू नये हीच अपेक्षा.

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

Monday, September 24, 2012

हवेत ते फक्त सहप्रवासी....

आपल्याला विश्व आपल्याशी जोडायचे असेल तर सर्वप्रथम आपण वैश्विकतेचे विनम्र पाईक व्हायला हवे. श्रेष्ठत्ववाद्यांना मिळाले तर मिळतात फक्त गुलाम...विश्ववाद्यांना मिळतात सहप्रवासी. अनुयायी मुळीच नकोत...हवेत ते फक्त सहप्रवासी. एकमेकांना समजावून घेत, हातात हात घेत एकमेकांचे अश्रू पुसत वा एकमेकांपासून अनिवार जिद्द घेत पुढचा काटेरी, तरीही सुखदायक वाटनारा मार्ग तुडवू शकतात तेच जगात खरी क्रांती घडवू शकतात. हा मार्ग भेकडांचा नव्हे तर शूरवीरांचा आहे. गुलाम (मग ते वैचारिक असोत, राजकीय असोत कि आर्थिक) बनवू पाहणारे नेहमीच भेकड असतात कारण त्यांचा मानवी मूल्यांवर कधीही विश्वास नसतो. भेकडांचे महाभेकड गुलाम व्हायचे कि वीरांचे सहप्रवासी हे आपणच ठरवायला हवे...किमान एवढेही स्वातंत्रय आपल्याला वापरता येणार नसेल तर आपण गुलामच व्ह्यायच्या लायकीचे आहोत हे पक्के समजुन चालावे!

Wednesday, September 19, 2012

खरी कृषिक्रांती घडवायची तर.....


किरकोळ मालविक्री क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला मोकळे रान देण्याची केंद्र सरकारची नीति शेतकरी व देशी उत्पादकांना फायद्याची ठरेल कि तोट्याची याबाबत अर्थतज्ञांत अनेक मतभेद आहेत. विरोधासाठी विरोध करना-या राजकीय पक्षांच्या मतांना येथे महत्व देण्याचे कारण नाही. या शासकीय निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेत क्रांतीकारी बदल घडुन शेतकरी व छोट्या उत्पादकांचे आर्थिक हित होईल, रोजगार वाढेल व पायाभुत सुविधा निर्माण होतील असा एक दावा आहे. प्रतिपक्षाचा दावा आहे कि यामुळे उलट शेतक-यांचेच अंतिम शोषण होईल. य सर्व चर्चा होत असतांना अनेक मुलभुत व महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधने आवश्यक आहे. या लेखात शेतकरी हच घटक डोळ्यसमोर ठेवुन विवेचन केले आहे, हेही लक्षात घ्यावे.

१. पहिली गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि विदेशी कंपन्यांचे भारतात (अन्य विकसनशील देशांतही) जबरदस्त लोबिंग आहे. आपल्या हिताचे निर्णय घेण्यासाठी ते मंत्रीमंडळ ते संबंधित प्रशासनावर पैशांच्या जोरावर दबाव आणत अनुकुल निर्णय घ्यायला भाग पाडत असतात. विचारवंत, अर्थतज्ञ, पत्रकारही जनमत अशा अहितकारी बाबींच्या विरोधात न नेता अनुकुल बनवण्याचा प्रयत्न करत असतात.

२. कोणीही विदेशी कंपनी भारतात गुंतवणुक करत असते ती निव्वळ नफ्यासाठी, समाजसेवेसाठी नव्हे याचेही भान ठेवले पाहिजे. नफा कमावणे वावगे नाही. पण त्या बदल्यात आपण काय गमावणार आहोत याचे विश्लेषन झालेले दिसत नाही.

३. एफ़.डी. आय. मुळे पाच लाख खेड्यांतील शेतक-यांना फायदा होईल व कंत्राटी शेतीमुळे एक नवी किंमत-संरचना अस्तित्वात येईल असा एक दावा अर्थतज्ञ करत आहेत. हा दावा पोकळ आहे हे कोणाच्याही लक्षात येईल. आज भारतात कंत्राटी शेती नवी नाही, पण त्याबाबतचा शेतक-यांचा अनुभव निराशाजनक आहे. ग्रेडींग/सोर्टिंग यात खरोखर उचलला जानारा माल व शिलकीतला माल यात तफावत पडते व ती शेवटी शेतक-याच्या आर्थिक हितावर बेतते. रिटेल विक्री यंत्रणा, समज ते शेतक-यांना अन्य सोर्सेसपेक्षा अधिक किंमत देतील हे समजा मान्य केले तरी विक्रीकेंद्रे ती कोणत्या भावात विकतील? यातुन महागाईचा इंडेक्स वाढेल कि कमी होइल? यावरही सखोल चर्चा झालेली दिसत नाही.

४.  आज अमेरिकेत व युरोपात अवाढव्य प्रमानावर माल्स असले तरी तिथे आजही कृषिक्षेत्राला प्रचंड प्रमानावर सबसिद्या द्याव्याच लागतात. उदा अमेरिकेत ३०८ अब्ज डालर एवढी सबसिडी आजही दिली जाते. रिटेल चेन्समुळे शेतक-यांचे आर्थिक हित झाले असते तर या सबसिड्या कमी करता आल्या असत्या हे उघड आहे.

५. अमेरिकेतीलच अभ्यासगटाच्या नि:ष्कर्षानुसार १९५० साली शेतक-याचे उत्पन्न १ डालरच्या विक्रीवर ७० सेंट एवढे असे, तेच आता (२००५ साली) फक्त ४ सेंट एवढे खाली उतरलेले आहे.

सांगायचा मुद्दा असा कि सुरुवातीला अधिक चांगला भाव देत व ग्राहकाला प्रसंगी तोटा सहन करत माल विकणे हे पाश्चात्य अर्थनीतिला सहज शक्य आहे...पण दीर्घकाळाचा विचार केला तर शेतकरी हा न घर का न घाट का या अवस्थेला पोचण्याची शक्यता अधिक आहे.

का हवी आहे ही विदेशी गुंतवणुक? जे उपाय आहे त्या व्यवस्थेत करता येणे शासनाला सहज शक्य होते ते उपाय का केले गेले नाहीत? केवळ काही भांडवलदारांना खुष करण्यासाठी? व्यक्तिगत उत्त्पन्ने वाढवण्यासाठी? कि खरोखर शेतक-यांचा कळवळा आला आहे म्हणुन?

आजही भारतात पुरेशी गोदामे नाहीत. जवळपास दहा लाख टन अन्नधान्य सडुन जाते. भाजीपाल्याची गत तर विचारायलाच नको. पुरेशी शितगृहे नसल्याने जवळपास ४०% भाजीपाला नष्ट होतो. फळ-फळावळांचीही हीच गत. शासनाने आजतागायत काय केले? हे जे नुकसान होते आहे हे विदेशी गुंतवणुकीने थांबेल या भ्रमात सरकार आहे. ज्या पायाभुत सुविधा निर्मण केल्या जाण्यची अपेक्षा आहे त्या स्व-गरजेपुरत्याच या कंपन्या करणार हे उघड आहे. त्या तशा आजही देशी कंपन्या करतच आल्या आहेत. एफ.डी.आय. मधुन फार फार तर ९ ते १०% शेतमाल साठवला जाईल...त्यातुन शेतक-यांची समग्र उन्नती होनार आहे असे चित्र अत्यंत चुकीचे आहे.

खरे तर खालील बाबी शासन सहज करु शकते...

१. तालुकानिहाय गोदामे व शितगृहे.
२. तालुकानिहाय व जिल्हानिहाय विक्रीकेंद्रे व त्यांत प्रत्येक गांवनिहाय एक गाळा.
३. कृषी-उत्पन्न बाजार समित्या सरसकट बंद करुन टाकणे.
४. शेतमालाचा भाव ठरवण्याचे स्वातंत्र्य शेतक-याला देणे.
५. क्रुषीउत्पादनावर प्रक्रिया करना-या उद्योगांना चालना देणे.
६. उत्पादित मालावर On the spot वित्तसहाय्य उपलब्ध करुन देणे.

अशा केंद्रांसाठी जागा उपलब्ध करुन देणे, त्यांचे बांधकाम करणे ही जबाबदारी स्थानिक स्वराज्यसंस्थांवर सोपवली जावु शकते. त्यासाठी केंद्र सरकारवर भार पडनार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था कररुपातुन नागरिकांकडुन दीर्घ मुदतीत हे भांडवल वसुल करु शकतील.

यातुन होणारे फायदे...

१. मूल्यनिर्धारण करणुयाचा हक्क दलालांकडे न जाता शेतक-यांकडे जाईल.
२. ग्राहकाला तुलनेने स्वस्तातच माल मिळेल व शेतक-यालाही अन्यथा मिळत नाही तो चांगला भाव मिळेल.
३. शेतमालाचे प्रदेशनिहाय ब्रंडिंग करता येईल. सांगलीचा माल पुण्यात तर पुण्याचा सांगलीत...वा अन्यत्र,  एक्स्चेंज करता येईल...मध्यस्थाशिवाय...भावांतील फरकाची तुट वा वाढ सप्ताहांती देव-घेव करुन मिटवता येईल. यासाठीही कोणा व्यापा-याची गरज नाही. शेतकरीच हे सौदे करतील. त्यासाठी सुनिश्चित अशी व्यवस्था निर्माण करता येणे सहज शक्य आहे.

थोडक्यात उत्पादक आणि विक्रेता हे शेतकरीच राहतील अशी व्यवस्था निर्माण करणे शक्य आहे. त्यासाठी विदेशी भांडवलाची काही गरज नाही. सध्याच्या किरकोळ विक्रेत्यांनाही काही नुकसान नाही कारण ते याच केंद्रांतुन ठोक माल घेवून परंपरागत पद्धतीने विक्री करु शकतील.

यामुळे देशातील सर्वच खेडी, तालुके व जिल्हे स्व्यंपुर्ण शेती प्रशासनांतर्गत येतील. रोजगार वाढेल. शेतक-यांचे उत्पन्न वाढेल. जो नफा अहे तो येथेच राहील. परावलंबीत्व येणार नाही.

या विचारांवर व्यापक चर्चा व्हावी ही अपेक्षा अर्थातच आहे. खरी कृषिक्रांती घडवायची तर हेच अंतिम उत्तर आहे असे मला वाटते. यात साधक-बाधक चर्चा करुन एक नवे मोडॆल विकसीत करता येईल याचा मला विश्वास आहे.

Monday, September 17, 2012

डा. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र...




प्रा. हरी नरके संपादित "डा. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र" हा ब्रुहत्खंड मुळात शासनाचे प्रकाशन वाटत नाही एवढ्या देखण्या स्वरुपात प्रसिद्ध झाला आहे. अशा अभिजात चित्र-चरित्राच्या संपादनाबद्दल व प्रकाशनाबद्दल शासनाचे आणि संपादक प्रा. हरी नरके व त्यांच्या सहका-यांचे अभिनंदन करणे भाग आहे.  त्याच बरोबर डा. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचीव प्रा. दत्ता भगत आणि तत्कालीन कार्यासन अधिकारी शुद्धोदन आहेर यांच्या योगदानाबदल त्यांचेही अभिनंदन केलेच पाहिजे एवढे उच्च दर्जाचे कार्य य ग्रंथरुपाने झाले आहे  हा ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांना दिलेली एक अभिनव विनम्र मानवंदना आहे. उण्यापु-या अत्यंत दुर्मीळ अशा अडिचशे छायाचित्रांतुन व त्यासोबत दिलेल्या बाबासाहेबांच्या बहुमोल वचनांतुन एक विलक्षण असा जीवनपट उलगडणारा हा ग्रंथ म्हनजे सर्वांसाठी एक पर्वणीच आहे. आणि अवघ्या देशातुन इंग्रजी आवृत्तीला तर महाराष्ट्रातुन मराठी आवृत्तीला एवढा प्रतिसाद लाभला आहे, इतका कि प्रथम प्रकाशनानंतर ( १४ एप्रिल २०१०) या चित्रचरित्राच्या मराठी आवृत्तीच्या तीन हजार प्रती व इंग्रजी आवृत्तीच्या दोन हजार प्रती हातोहात संपल्या आहेत. 

डा. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या शोषितांसाठी अविरत संघर्षरत राहणा-या, कालांधाराला आपल्या प्रज्ञासुर्याने दूर हटवत नवे आत्मभान देणा-या महामानवाचे समग्र साहित्य, त्यांची सर्व भाषणे, पत्रव्यवहार पुढच्या पिढ्यांसाठी एक चिरंतन दीपस्तंभ म्हणुन उपलब्ध करुन देणे हे अत्यंत आवश्यक असेच होते. महाराष्ट्र शासनाने त्यासाठी डा. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीची १५ मार्च १९७६ मद्ध्ये स्थापना केली. "डा. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे" या शिर्षकाखाली क्रमा-क्रमाने अडचणींना तोंड देत अनेक खंड प्रकाशित होत राहिले. हे सर्व होत असतांना बाबासाहेबांचे चित्रमय चरित्रही प्रकाशित झाले पाहिजे या भावनेने शासनाने १९९५ साली त्यासाठी एक उपसमिती निर्माण केली. २००२ साली या समितीची धुरा महाराष्ट्रातील आघाडीचे विचारवंत प्रा, हरी नरकेंकडे आली. तत्पुर्वी बराचसा काळ हा छायाचित्रे मिळवण्यातच व्यतीत झाला होता. 

यातील अनेक छायाचित्रे ही जुनी असल्याने फिक्कट झालेली, सुरकुत्या पडलेली वा पिवळट पडलेली अशी होती. अनेक छायाचित्रे तर प्रिंटवरुन रीप्रिंट मारलेली असल्याने छापण्यास योग्यच नव्हती. अशा स्थितीत हार न मानता चित्रमय चरित्राला अग्रक्रम देण्याचे ठरवत प्रा. नरके यांनी या अंधुक/खराब झालेल्या अथवा आकार वाढवला तर धुरकट होणा-या फोटोंना जणु अलिकडेच काढलेत असे वाटावे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्यायचे ठरवले. 

डा. बाबासाहेब लेखन आणि भाषणे या ग्रंथमालिकेतील बाविसावा खंड म्हनजे हा "डा. बाबासाहेब आंबेडकर: चित्रमय चरित्र". या चित्रमय चरित्रातील प्रक्रिया करुन अत्यंत आधुनिक छपाई तंत्रज्ञानाने छापलेली बाबासाहेबांची छायाचित्रे पाहिली तर लक्षात येते कि बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वातील भव्यता, प्रगल्भता आणि तेजस्वीपणा प्रत्येक छायचित्रातुन ओथंबुन वाहतो आहे. बाबासाहेबांच्या माणुसकीचा, करुणेचा आणि समतेचा हा अक्षय्य झरा पानापानातुन ओसंडुन वाहतांना दिसतो...आणि प्रत्येक छायाचित्रासोबत बाबासाहेबांचे महत्वपुर्ण विचारही दिले असल्याने ग्रंथाची उंचीही वाढतांना दिसते. छायाचित्रांवर तांत्रिक संस्कार करणारे श्री. संजु हिंगे आणि चित्रमय चरित्रासाठीचे लेखन करणा-या संगिता पवार यांच्याही कार्याला या निमित्ताने दाद दिलीच पाहिजे. या सर्वांमुळे व प्रा. नरकेंच्या अहोरात्र कष्ट घेत केलेल्या साक्षेपी संपादनामुळे एक जागतीक दर्जाचा चित्रमय ग्रंथ प्रसिद्ध होवू शकला आहे. 

बाबासाहेबांचे समग्र जीवन हा अथक संघर्षाचा एक प्रवास आहे. हा विलक्षण प्रवास छायाचित्रांच्या मदतीने क्रमा-क्रमाने उलगडला जातो. त्यांच्या जीवनातील विविधांगी प्रसंग छायाचित्रांच्या रुपाने उलगडत जातात. फार क्वचित त्यांना फुरसतीचे, हास्य-विनोदाचे क्षण लाभले आहेत. परंतु या ग्रंथात बाबासाहेबांच्या तब्बल १२ हस-या मुद्रा आहेत.हे या ग्रंथाचे अतुलनीय वैशिष्ट्य आहे. एवढी हास्यमुद्रा असणारी छायाचित्रे आजवर बाबासाहेबांवरील प्रसिद्ध झालेल्या कोनत्यही ग्रंथात नाहीत. प्रसन्नतेचा शिडकावा करणारे बाबासाहेबांचे हास्य पाहिले कि पाहणारा नकळत भावूक होवून जातो आणि त्या महामानवासमोर नतमस्तक होतो. 

बाबासाहेब हे आजच्या-पुढच्या पिढ्यांसाठीचे अक्षय्य उर्जास्त्रोत आहेत. या ग्रंथमालेमुळे एक अनमोल ठेवा एकत्रीत संचित झाला आहे. प्रा. नरके यांनी बाबासाहेबांच्या या मालिकेतील अन्यही ग्रंथांचे संपादन केले असून तब्बल ९ ब्रुहत्खंड त्यांच्या कारकिर्दीत प्रकाशित झाले आहेत. राज्यभरातुन प्रा. नरकेंचे कौतुकच झाले आहे. बाबासाहेबांचे समग्र व्यक्तिमत्व पेलने हेच मुळात एक अशक्यप्राय कार्य. हितसंबंधियांचा अनवरत त्रास. शासकीय अडचणी...जागा-निधी इ. ची चणचण. अशाही स्थितीत मार्ग काढत हे जे एक अतुलनीय चित्रमय चरित्र प्रकाशित झाले आहे त्यासाठी प्रा. नरके अभिनंदनास पात्र आहेत.

प्रत्येक भारतीयाच्या संग्रही असायलाच हवे असे हे चित्रमय चरित्र. एवढेच नव्हे तर जगभरात या चित्रमय चरित्राचा प्रसार व्हायला हवा. या ग्रंथाची पुढील आवृत्ती प्रतीक्षीत आहे ती यासाठीच. 

Saturday, September 15, 2012

वंजारी समाजाचा इतिहास


आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शोध लागण्यापुर्वी पुरातन काळापासुन ही मालवाहतुक/मालपुरवठा करणारा एक मोठा समाज होता ज्याला आपण महाराष्ट्रात वंजारी म्हणतो. फिरता व्यापार करणारे म्हणजे वण-चारी...याचेच रुपांतर "वंजारी" या शब्दात झाले असे इतिहासात डोकावुन पाहता दिसते. या आद्य मालवाहतुकदारांचा...मालपुरवठादारांचा इतिहास पुरातन तर आहेच पण मानवी जीवनाला तेवढाच उपकारक ठरलेला आहे.

पुरातन काळी भारतात अरण्ये खुप होती. बैलगाड्या जावू शकतील असे फार रस्तेही नव्हते. भारत हा एक खंडप्राय देश. भुगोलही विचित्र. प्रचंड पर्वतरांगा. अलंघ्य नद्यांची रेलचेल. क्वचितच रहदारी करता येतील असे नाणेघाटासारखे घाट...पण ते बैलगाड्यांना अनुपयुक्त. बरे एका राज्यातील माल दुस-या राज्यांतील नागरिकांच्या गरजांसाठी/व्यापा-यांसाठी वाहतुक यंत्रणेची गरज तर होतीच. सिंधु संस्क्रुतीच्या कालापासुनच भारतात नैसर्गिक ते कृत्रीम बंदरे बनु लागली होती. या बंदरांतुन विदेशात माल निर्यात केला जायचा तसाच आयातही केला जायचा. हा बंदरांपर्यंत पोहोचवणे ते आयात माल देशात इच्छित स्थळी पोहोचवण्याची सुविधा नसती तर या आयात-निर्यातीचे काम अशक्यप्राय असेच होते.

हे तत्कालीन सुविधांचा पुरेपुर अभाव पाहता विविध समाजघटकांतील ही गरज पुरी करायला पुढे आले. बैलगाड्यांचा उपयोग नसल्याने बैलांचा मोठ्या प्रमाणावर मालवाहतुकीसाठी वापर करायला सुरुवात केली. कापडांचे तागे, धान्य, मीठ, मसाले असे पदार्थ बैलांवर शिस्तशीर लादुन ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवले जावू लागले. तिकडुन तेथील माल लादुन आनला जावू लागला. त्याचबरोबर हे वंजारी स्वत: व्यापारही करत.

मालवाहतुकीसाठी बैलांची गरज असल्याने हा समाज पशुंच्या पैदाशीतही अग्रेसर राहिला.

कोकणातुन व गुजरातेतील क्च्छमधुन मीठ आणत देशभर वितरण करणारा एक स्पेशालिस्ट वर्गही यातुनच निर्माण झाला. मीठाची गरज सर्वत्र. आगरी समाजाकडुन ते उचलायचे आणि देशभर विकायचे. त्या काळात मीठाची किंमत मोठी होती. लवण (मीठ) वाहतुक करणारे ते "लमान" (लभान) हा पोटभेद त्यातुनच निर्माण झाला.

आजचे घाट, रस्ते हे मुळच्या वंजारी मार्गांवरच बनले आहेत. या मार्गांवरुन एकेक वंजारी कुटुंब शेकडो बैलांचे तांडे घेवून देशभर मालवाहतुक करत असत. वाटेत चोर-दरोडेखोरांच्या धाडी पडण्याच्या घटना नित्य असल्याने प्रतिकारासाठी आपसुक वंजारी समाज लढवैय्याही बनलेला होता. मुळ व्यवसायच भटक्या स्वरुपाचा असल्याने आणि विविध जाती-जमातींशी, अगदी परकिय व्यापा-यांशीही नित्य संपर्ज येत असल्याने वंजा-यांची एक स्वतंत्र व वैशिष्ट्यपुर्ण संस्कृतीही बनत गेली. इतर कोणत्याही समाजापासुन वेगळे पडल्याने एक स्वतंत्र मानसिकता...भटकेपणाची नैसर्गिक उर्मी यातुन त्यांचे स्वत:चे संगीत...काव्यही उमलत गेले. भाषाही वेगळी बनत गेली. हे सारे नैसर्गिक व स्वाभाविक असेच होते. वंजारी-लमाणांच्या तांड्यांचे आकर्षण तत्कालीन कवी/नाटककारांमद्धेही होते. दंडीने त्याच्या दशकुमारचरितात तांड्यांच्या एका थांब्याचे व रात्रीच्या त्यांच्या आनंदी गीतांचे/नृत्यांचे अत्यंत सुंदर वर्णन करुन ठेवले आहे.

वंजारी समाजाचे कार्य फक्त नागरी व व्यापा-यांसाठीचा मालपुरवठा करणे येथेच संपत नाही. या समाजाचे राजव्यवस्थांसाठीचे सर्वात मोठे योगदान म्हणजे युद्धकाळात सैन्यासाठी अन्नधान्याचा पुरवठा करणे. हे काम वंजारी समाज पुरातन कालापासुन करत आला असला तरी तत्कालीन युद्धे नजीकच्याच सीमावर्ती राजांशीच शक्यतो होत असल्याने सैन्यासाठीच्या अन्नधान्य वाहतुकीची व्याप्ती कमी होती. पण पुढे युद्धांचा परिसर विस्तारत गेला. मध्ययुगात इस्लामी सत्ता आल्यानंतर सतत युद्धायमान परिस्थित्या जशा बनत गेल्या तसतसे या क्षेत्रातील वंजारी/लमानांचे योगदान वाढत गेले. महिनोनमहिने सैन्याचे तळ एकेका ठिकाणी पडत. सैन्य असो कि बाजारबुणगे, शाश्वत अन्नधान्य पुरवठ्याशिवाय जगणे शक्य नव्हते. सैन्य पोटावर चालते हे म्हणतात ते खोटे नाही. वाटेतला मुक्काम असो कि युद्धभुमीवरील, वंजारी/लमाणांचे तांडे अन्नधान्य पुरवठा अव्याहतपणे करत असत. हा समाज कोणत्या अशा विशिष्ट बाजुसाठीच पुरवठा करत नसल्याने, तटस्थ असल्याने  वंजा-यांवर कोणताही पक्ष बळजबरी करत नसे वा हल्ले करुन त्यांची लुटमारही करत नसे याचे कारंण म्हणजे त्यांच्या अस्तित्वाखेरीज युद्धे लढता येणे अशक्य आहे याची जाणीव सर्वांनाच असे. सैन्याला अन्नधान्य पुरवठा करण्याचे काम अगदी ब्रिटिशकाळापर्यंत चालु होते. चेउल येथील बंदरात हजारो बैलांचे वंजारी तांडे येत असत, याची नोंद कोलाबा ग्यझेटियरने केलेली आहे. अनेक वंजारी/चारण/लमानांना मोगलांनी वतने दिली असल्याच्याही नोंदी मिळतात.

थोडक्यात अठराव्या शतकापर्यंत मालवाहतुक, फिरता व्यापार यात वंजारी समाजाचे प्राबल्य होते. परंतु ब्रिटिशकाळात रस्ते बनु लागले. औद्योगिक क्रांतीमुळे वाहतुकीची आधुनिक साधने आली व वाहतुकीचा वेगही वाढला. रेल्वेने तर पुरती क्रांतीच घडवली. बैलांच्या पाठीवर सामान लादुन भ्रमंती करनारा वंजारी/लमाण समाज दूर फेकला जावू लागला. त्याची गरजच संपुष्टात आली. चार-पाच हजार वर्ष अव्याहतपणे भटकत राहुन व्यवसाय करणा-यांचे पेकाट मोडले नसते तरच नवल! हा सर्वच समाज यामुळे एका विचित्र वळनावर आला. स्थिर होणे भाग पडले. ही सक्तीची स्थिरता होती. काही शेतीकडे वळाले, तर काही मोलमजुरीकडे.


अनेक वंशातुन निर्माण झालेला समाज

संपूर्ण भारतात विखुरलेली, परंतु काही राज्यांत अनुसूचित जमात व काही राज्यांत अनुसूचीबाहेर असलेली ही एके काळची भटकी जमात. यांची वस्ती प्रामुख्याने राजस्थान, आंध्रप्रदेश, ओरिसा, कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब व बिहार , मध्य प्रदेश, महाराष्ट्र व हरयाणा या राज्यांत आढळते. बंजारा जमातीच्या अनेक शाखोपशाखा आहेत. प्रदेशपरत्वे या लोकांना बंजारी, लमाणी, लंबाडी, सुकलीर लमाण, मथुरा लमाण, न्हावी बंजारा, शिंगवाले बंजारा, चारण बंजारा, गोर बंजारा, कचलीवाले बंजारा, यांसारखी विविध नावे आहेत. स्थलपरत्वे त्यांच्या चालीरीती, देवदेवता व अंत्यसंस्कार यांतही काहीसा फरक आढळतो. महाराष्ट्र्रात काही जिल्हयात आढळणारी वणजारी किंवा वंजारी ही जात बंजारा वा बनजारी जमातीहून सांस्कृतिक दृष्टया निराळी आहे. याचे कारण म्हनजे या समाजाचे गेल्या दोनेकशे वर्षांत झालेले महाराष्ट्रीकरण. परंतु सर्वांचा व्यवसाय एकच होता. अर्थात विविध वंशाचे लोक या व्यवसायात सामील झाल्याने त्यांची प्रदेशनिहाय नांवे वेगळी झाली हे वरील यादीवरुन लक्षात येईल. अनेक वंजारी स्वत:ला राजपूत कुळीतील राणाप्रतापाचे वंशज समजतात. राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते मुसलमानांबरोबर दक्षिणेस आले असावेत असेही मानले जाते, पण ते ऐतिहासिक वास्तव नाही. त्यांच्यात अनेक उपजमांतीचे लोक आहेत. बिहार व ओरिसा या राज्यांत त्यांना आदिवासी म्हणून मान्यता मिळाली नाही. इतरत्र त्यांना अनुसूचित जमातींत समाविष्ट केले आहे. तर महाराष्ट्र्र राज्यात त्यांना भटक्या विमुक्त जातीचा दर्जा दिलेला आहे. आंध्र प्रदेशात ते सुगाळी, दिल्लीत शिरकिवन, राजस्थान व केरळात गवरिया व गूजरातमध्ये चारण म्हणून ओळखले जातात. लोदी घराण्यातील सिकंदरशाह याने १५०२ मध्ये धोलपूरवर स्वारी केली, तेव्हा बंजारांचा प्रथम उल्लेख केलेला आढळतो. एन.एफ. कंबलीज याने या जमाती संबंधीचे संशोधन प्रथम प्रसिध्द केले. त्यांच्या मते बंजारांच्या चार प्रमुख पोटजाती आहेत चारण, मथुरिया, लमाण आणि घाडी, यांपैकी चारण हे संख्येने जास्त आहेत. त्यांच्यात पुन्हा राठोड, परमार चाहमान, जाडोत, किंवा मुखिया अशा चार कुळी आहेत.

थोडक्यात विविध वंशीय व प्रांतीय लोक या व्यवसायात आल्याने हे सर्व पोटभेद पडले असले तरी समस्या समान आहेत. व्यवसाय म्हणुन बंजारा-वंजारी-चारण हे सारे एकच हा समाजशास्त्रीय इतिहास आहे.

वंजारी समाजही पुरातन काळी मातृसत्ताक पद्धती पाळनाराच होता. महाराष्ट्रातील वंजा-यांची श्रद्धास्थाने म्हणजे जेजुरीचा खंडोबा आणि तुळजाभवानी. या समाजातुन उदयाला आलेले थोर संत म्हणजे भगवानबाबा महाराज. वंजारी समाजाची भगवानबाबांवर अपार श्रद्धा आहे.

आजचे वास्तव

आज महाराष्ट्रातील वंजारी समाजाची अवस्था अवांच्छित समाजघटक अशी बनली आहे. आज काही प्रमानात शेती तर असम्ख्य वंजारी उसतोदणी कामगार म्हणुन राबत आहेत. आर्थिक स्थिती ही अत्यंत दुर्बळ झालेली आहे. आजही हा समाज स्वत:च्या अस्तित्वाच्या शोधात आहे. आजही शिक्षणाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर आहे. परभणी, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत वंजा-यांची संख्या मोठ्या प्रमानावर आहे. याचे कारण म्हनजे हा भाग सातवाहन ते यादव काळापर्यंत व्यापाराची मध्यवर्ती केंद्रे होती.

महाराष्ट्रात याच समाजातुन उदयाला आलेले महत्वाचे राजकीय नेतृत्व म्हनजे गोपीनाथ मुंडे. वंजारी समाजाचे ते एकमेव आशास्थान असले तरी महाराष्ट्राच्या जातीय राजकारणात त्यांना शह देण्याची अन्य जातींतील नेतृत्वांची प्रवृत्ती एकार्थाने विघातक अशीच आहे. सध्या बहुजन समाजाचे ऐक्य करण्याचे प्रयत्न चालु आहेत त्यात महादेव जानकर, छगन भुजबळ व गोपीनाथ मुंडे हे पुढाकार घेत आहेत. भविष्यात काय होइल हे सांगता येत नसले तरी आज वंजारी समाजाला सापत्नभावाची वागणुक मिळते आहे हेही तेवढेच सत्य आहे. ही स्थिती कशी बदलवायची हे आपल्या सर्वच समाजासमोरील आव्हान आहे.

 नोट- वाचकमित्रांनी माह्या लेखावर विरोध दर्शवण्यापुर्वी खालील मजकुर वाचावा.

-सरकारी कागदोपत्री बंजारा आणि वंजारी समाज एकत्रच मानले जात होते आणि त्यांचा समावेश भटक्या जातसमुहात केला गेला होता. १९३१ च्या जनगणनेनुसारही दोघांना एकाच जातसमुहात घेतले गेले होते. बंजारा नेता वसंतराव नाईक यांनीही आपला मतदारसंघ मजबुत व्हावा यासाठी या जातीसमुहाची एकत्रीतपणेच आयडेंटिटी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. १९८० नंतर मात्र चित्र पालटले. आपली स्वतंत्र राजकीय/आर्थिक/सामाजिक ओळख निर्माण व्हावी यासाठी अनेक जातींत असेच बदल घडू लागले. मंडल आयोगाने बंजारा व वंजारी यांना एकत्र व एकच गृहित धरत त्यांना भटक्या जमातीत घेतले होते. पण याला बंजारा आणि वंजारा या दोघांनी आक्षेप घेतला. हा वाद उच्च व सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही जमाती एकच असल्याचे सांगितले. नव्वदच्या दशकात वंजारी तरुणांनी "माधव" समीकरणात मोठ्या प्रमाणावर भाग घेतला. या समीकरणामुळे मंडलोत्तर काळात स्व. गोपिनाथ मुंडे हे भाजपचे मुख्य नेते म्हणून उदयाला आले. मुंडेंमुळे राज्य सरकारला बंजारा-वंजारी प्रश्न सोडवण्यासाठी एकसदस्सीय  आयोग बसवणे भाग पडले.े आयोगाने दोन जमाती एक नसल्याचा निर्वाळा दिला. यामुळे वंजारी जमातीला आरक्षणाचे अधिक फायदे मिळू लागले. (संदर्भ- Caste Associations in the Post-Mandal Era: Notes from Maharashtra by Rajeshwari Deshpande
Department of Politics & Public Administration, University of Pune )

Friday, September 14, 2012

१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज



इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात. १ फेब्रुवारी १६८९ ते ११ मार्च १६८९ या कालातील छ. संभाजी महाराजांबदल मराठी इतिहास असाच मौन पाळुन बसला आहे. ढोबळ व संक्षिप्त माहिती व्यतिरिक्त हातात काहीच लागत नाही. एका सार्वभौम राजाची अटक ते निघृण हत्या घडल्याची अति-अपवादात्मक घटना घडली असतांनाही असे घडावे याचे आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. असो. तरीही आपल्याला कालक्रमानुसार ही संपुर्ण घटना नजरेखालुन घालायची आहे व उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. या उत्तरांतुन अजुन काही प्रश्न निर्माण होतील याची मला जाणीव आहे...पण उत्तरे शोधण्याचा प्रयत्न एक अभ्यासक म्हणुन निकोपपणे करणे मला आवश्यक वाटते.

मराठी रियासत भाग दोनमद्धे येणारा कालक्रम असा...

१) २१–४-१६८०  रोजी राजारामास गादीवर बसवण्यात आले
(२) ६-५-१६८०   राजारामाचे मंचकारोहण
(३) १८-६-१६८०  संभाजी रायगडावर आला
(४) २०-७-१६८०  संभाजीने मंचकारोहण केले
(५) १६-१-१६८१    संभाजीचा राज्याभिषेक
(६) १-२-१६८९    संगमेश्वर मुक्कामी असताना छत्रपती संभाजी महाराज व कवि कलशास शेख निजाम यांनी ( जवळच्याच खटोले गावी ) पकडले.
(७)९-२-१६८९  राजारामाचे मंचकारोहण रायगडावर
(८) शेख निजाम याने संभाजी महाराज व कलुशास १५ फेब्रुवारी १६८९ रोजी बहादुरगड (पेडगांव, जि. अहमदनगर) येथे औरंगजेबासमोर उपस्थित केले.
(९) ११-३-१६८९  संभाजीचा वध कोरेगावच्या छावणीत
(१०) २५-३-१६८९  झुल्फिकारखानाचा रायगडास वेढा
(११) ५-४-१६८९ रायगड सोडून राजारामाचे प्रतापगडास आगमन
(१२) ऑगस्ट १६८९ राजारामाचे प्रतापगड सोडून पन्हाळ्यास प्रयाण
(१३) ३-११-१६८९  रायगड किल्ला झुल्फिकारखानास हस्तगत  

संभाजीमहाराजांविषयी जेधे शकावली आणि करीनामध्ये आलेली माहिती खालीलप्रमाणे :-

१) जेधे शकावली 

(१) वैशाख शुध ३ त्रितीयेस राजारामास आनाजी पंत सुरणीस यांनी मंचकी बैसवीले
(२) आशाड शुध २ शुक्रवारी संभाजी राजे रायेगडास आले राज्य करू लागले राजाराम कैदेत ठेविले
(३) श्रावण शुध ५ पंचमी संभाजी राजे मंचकाराहोन जाले
(४) माघ सुध ७ रायेगडी संभाजी राजे सिव्हासनी बैसले
(५) माघ वद्य ७ शुक्रवासरी संभाजीराजे व कविकलश रायेगडास जावयास संगमेस्वरास आले असता सेक निजाम दौड करून येऊन उभयेतांस जिवंतच धरून नेले वरकड लोक रायेगडास गेले
(६) फालगुण शुध ३ राजारामास रायेगडचा किल्लेदार चांगोली काटकर व येसाजी कंक याणी माघ वद्य ३० अदबखानाहून काढून बाहेर आणून मंचकी बैसविले मानाजी मोरे व वरकड सरकारकून धरिले होते ते सोडिले ज्याचे कार्य भाग त्यासी देऊन राजाराम राज्य करू लागले येसजी व सिदोजी फर्जद यास कडेलोट केले
(७) फालगुण वद्य ३० अवरंगजेब तुलापुरी संभाजी राजे व कवि कलश यास जिवे मारून सिरच्छेद केले
(८) चैत्र शुध १५ अवरंगजेब जुलपुकारखानास पाठऊन रायगडास वेढा घातला चैत्र वद्य १० शुक्रवारी राजाराम पळोण प्रतापगडास गेले.

२) जेधे करीना 

(१) ..... शेख निजाम यास फौजेनसी राजश्री संभाजी राजे याजवरी रवाना केले त्याणे संगमेश्वरास येऊन राजश्री संभाजी राजे व कविकलश यास माघ वद्य ७ शुक्रवारी सेख निजामाने धरून तुलापुरास नेले तेथे पातशाहानी उभयतांस जिवे मारिले राजश्री राजाराम रायेगडी अटकेत होते ते बाहेर काढून मंचकावारी बैसऊन राज्याभिषेक केला शके १६११ शुक्ल संवछरी जुलपुकारास रवाना केले राजश्री राजाराम निघोन रायेगडीहून प्रतापगडास आले.
शकावली व रियासती तसेच मुस्लिम साधनांतील माहितीनुसार वर येणारा कालक्रम बरोबर आहे असे दिसते.
वरील घटनाक्रमावरुन पहिली ठळक नजरेत भरणारी बाब म्हणजे इकडे संभाजी महाराज अटकेत पडले असतांनाही मंत्री व अन्य सरदारांनी राजाराम महाराजांची तात्काळ सुटका करुन ९ फेब्रुवारी रोजी त्यांचे मंचकारोहन केले. म्हणजे ही सुटका संभाजी महाराजांच्या अटकेनंतर दोनेक दिवसांतच झाली असण्याची शक्यता आहे. मंचकारोहनचा सरळ अर्थ असा कि राजाराम महाराजांना नवा राजा म्हणुन घोषित करण्यात आले. या समारंभास अर्थातच सर्व मंत्री व महत्वाचे सरदार हजर असले पाहिजेत.
याचा अर्थ असा होतो कि संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा राजाराम महाराजांना नवा राजा म्हणुन घोषित करण्यात मंत्रीगण व सरदारांना अधिक रस होता. राजाराम महाराजांनी सिंहासनावर बसताच येसाजी व सिदोजी फर्जंद या संभाजी महाराजांच्या समर्थकांना कडेलोट करण्यात आले. सिदोजी फर्जंद हा संभाजी महाराजांचा विश्वासु अधिकारी होता. त्याने संभाजी महाराजांच्या वतीने पोर्तुगीजांना पाठवलेली दोन पत्रे (२४ डिसेंबर १६८४ व १० मार्च १६८५ )उपलब्ध आहेत. तत्पुर्वी संभाजी महाराजांनी अटकेत टाकलेल्या चांगोली काटकर व येसाजी कंक यांना मुक्त केले.
म्हनजेच राजा म्हणुन राजाराम महाराजांनी कार्यभार तर घेतलाच पण संभाजी महाराजांच्या विश्वासु अधिका-यांना ठार मारले व ज्यांना अटकेत टाकले होते त्यांना मुक्त केले व सवतंत्र कारभार सुरु केला.
बखरकार संभाजी महाराजांवर अन्याय करतात हे खरे मानले तर राजाराम महाराजांचे हे दिलेले दोन हुकुम (बखरकार राजाराम महाराजांचे पक्षपाती असल्याने) तत्कालीन वास्तवाकडे बोट दाखवतात.
हे सगळे संभाजी महाराज अटक झाल्यापासुन अवघ्या नऊ दिवसांत झाले आहे हे विशेष. राजाराम महाराजांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी सरदारांना कसलाही हुकूम दिलेला दिसत नाही.  झुल्फिकारखानाचा रायगडास वेढा २५-३-१६८९ रोजी पडलेला आहे. संभाजी महाराजांची हत्या तत्पुर्वीच झालेली होती. त्यामुळे मोगलांच्या कोकणातील प्राबल्यामुळे मराठ्यांना हालचाल करायला अवधी मिळाला नाही या म्हनण्यात तथ्य नाही.
एवढेच नव्हे तर ९ तारखेला राजाराम महाराज स्वत:च सत्ताधीश बनल्यामुळे औरंगजेबाशी स्वराज्याच्या वतीने संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी तह करण्याचे अधिकार आता सरळ राजाराम महाराजांकडे आले होते. संभाजी महाराजांच्या हाती काही उरलेलेच नव्हते. त्यामुळे धर्मांतर, किल्ल्यांची व खजिन्याची औरंगजेबाची मागणी याबाबत फारसी सधनांनी जे लिहुन ठेवले आहे ते विश्वसनीय मानता येत नाही. औरंगजेबाचे हेरखाते प्रबळ होते. काही मराठा सरदारही त्याचे हेर म्हणुन काम करत होते. असदखानाला औरंगजेब लिहितो कि...."मुकर्रबखानास पन्हाळा घ्यायला पाठवले आहे. त्यास ताबडतोब कळवा कि  त्यांनी ताबडतोब तेथील जहागिरदारावर (संभाजीवर) चालुन जावे. तो जहागिरदार एकटाच रायरीवरुन खेळण्यास गेला आहे. त्याचे कारण म्हणजे शिर्क्याशी भांडण देणे हे आहे....." (रुकायत-ई-आलमगिरी)
म्हणजे औरंगजेब संभाजी महाराजंची प्रत्येक क्ल्हबर ठेवत होता. एवढी संवेदनशील माहिती त्याच्यापर्यंत पोहोचत होती याचाच अर्थ असा कि रायगडावरही घरभेदे होते. जेधे शकावलीनुसार खेम सावंत, शिर्के, नागोजी माने ई. मंडळी औरंगजेबाला सामील झाली होती व तेच संभाजी महाराजांची वित्तंबातमी औरंगजेबाला पुरवत होते.
दुसरी महत्वाची बाब अशी शंभुराजे संगमेश्वराला आले १ फेब्रुवारीला...किंवा तीन दिवस आधी. पण त्यांच्या सोबत फक्त ४०० ते ५०० भालाईत होते. मुकर्रबखान अवघ्या ६०-७० मैलांवर कोल्हापुरी आहे हे संभाजी महाराजांना माहित असावे. तरीही एवढ्या अल्प सैन्यासह ते कसे हा प्रश्न उद्भवतो. मोगल येथेवर येणार नाहीत एवढे गाफिल संभाजी महाराज राहतील असे वाटत नाही कारण शिवाजे महाराजंच्या निधनापासुन अनेक कटकारस्थानांचा त्यांना सामना करावा लागला होता. बरे ही तुकडी होती फक्त भालाइतांची. मोठ्या लढाइला अनुपयुक्त. त्यांच्या सोबत सरसेनापती म्हाळोजी व संताजी घोरपडॆ हे पितापुत्र व खंडोजी बल्लाळही होते. (यात जेधे शकावली फारशी विश्वसनीय धरता येत नसली तरी संताजी राजांसोबत होता हे स्पष्ट दिसते.) असे सेनानी बरोबर असतांना त्यांचे सैन्य मात्र बरोबर नव्हते. मुकर्रबखानाने दोन हजार घोडदळ व हजार पदाती यांच्या बळावर एक फेब्रुवारीला अचानक हल्ला चढवला. या अनपेक्षीत हल्ल्यामुळे राजांचे सैन्य फारसा प्रतिकार करु शकले नाही. ते पळुन गेले. अधिकारीही पळाले. अटक झाले ते संभाजी महाराज आणि कवि कलश व काही वरकड लोक. यात संताजीचे नांव दिसत नाही म्हणजे तेही पळुन जाण्यात यशस्वी झाले असे दिसते. ही पळालेली मंडळी सरळ आसपसच्या किल्ल्यांच्या आश्रयाला निघुन जाण्यात यशस्वी झाली.
आता संभाजी महाराज मद्याच्या वा कवि कलशाच्या अनुष्ठानच्या नादात पकडले गेले हे बखरकारांचे म्हणणे मान्य करताच येत नाही. कसल्याही परिस्थितीत ही अटक अपरिहर्यपणे अटळ बनली होती. संभाजी महाराजांना सापळ्यात तर अडकावले गेले नाही ना हाच प्रश्न उपस्थित होतो. य प्रश्नाकडॆ वरील घटनाक्रम पाहता निकोपपणे पहायला हवे.
खरे तर रायगडावर व सह्यद्रीच्या रांगांतील किल्यांच्या किल्लेदारांपर्यंत ही बातमी अवघ्य दोनेक दिवसात पोहोचली असनार. मुकर्रबखानाचे एकुण सैन्य होते फक्त तीन हजार. बादशहा त्यावेळी होता तीन-चारशे किलोमीटर दुर अकलुजला. संगमेश्वरपासुन  राजांना घेवून मुकर्रबखान बहादुरगड्ला (पेडगांव, जि. अहमदनगर) पोहोचला तो १५ फेब्रुवारीला. हे अंतर काटायला त्याला तब्बल पंधरा दिवस लागले. हा प्रवास त्याने चिपळुन, खेळना, पन्हाळा ते बहादुरगड असा पुर्ण केला. या मार्गावर मराठ्यांच्या ताब्यात अनेक किल्ले होते. सह्याद्री घाटात तर मराठ्यांना मुकर्रबखानावर हल्ला चढवण्याची संधी होतीच. पण असा एकही प्रयत्न झाला नाही. त्यांनी तसा काही प्रयत्न करु नये अशी काही आज्ञा तर नसेल?
आपल्य राजाचे सर्वतोपरी रक्षण करणे व त्याला योग्य ते संरक्षण पुरवणे ही जबादारी प्रधानमंडळाची असते. बखरी विश्वसनीय मानल्या तर सेनापती म्हाळोजी (मालोजीराजे) राजांसोबतच होते...आणि फक्त चार-पाचशे भालाइत? तेही ते शिर्क्यांचा तंटा सोडवायला गेले असतांना? छ. शिवाजी महाराजांचे स्वत:चेच अंगरक्षक दल हे दोन हजार कसलेल्या सैनिकांचे असायचे. यातुन दोनच तर्कनिष्ठ अर्थ निघू शकतात...एक म्हणजे संभाजी महाराजांना मुकर्रबखान चालुन येतो आहे ही बातमीच एरवी चाणाक्ष व तरबेज असलेल्या हेरखात्याने काही कारणास्तव दिली नाही. अरण्यातुन कितीही लपत प्रवास केला तरे हा प्रवास तीन हजार शत्रूसैन्याचा होता...तोही तीन दिवस चाललेला....त्यांचे अस्तित्व हालचाल कोणाच्याही लक्षात येणार नाही हे मला तरी संभवनीय वाटत नाही. दुसरा म्हणजे संभाजी महाराज पकडले जावेत हीच सरदार-मंत्रीगणाची इच्छा होती म्हणुन हा घटनाक्रम घडवण्यात आला असे समजायला बराच वाव आहे. अगदी समजा संभाजी महाराज नशेच्या अंमलामुळे बेसावध राहिले...पण त्यांचे हेरखाते वा सरदार वा अगदी भालाइतही अचानक हल्ला होईपर्यंत बेसावध होते असे मुळीच म्हणता येत नाही. राजाराम महाराजांनी तात्काळ सिंहासनावर बसणे, अधिकार वापरायला सुरुवात करणे पण संभाजी राजांच्या सुटकेसाठी एकही युद्धाची आज्ञा जारी न करणे, औरंगजेबाकडे एकही मुत्सद्दी व वकील तडजोड/तहासाठी न पाठवणे या गोष्टी काय सुचवतात? राजाराम महाराज ५ एप्रिल १६८९ रोजी झुल्हिकारखानच्या वेढ्यातुन निसटतात पण महाराणी येसुबाईं व संभाजीपुत्र बाल शिवाजी (शाहु महाराजांचे मुळ नांव) मात्र झुल्फिकारखानाने रायगड जिंकल्यावर ३ नोव्हेंबर १६८९ पर्यंत रायगडावरच अडकुन पडतात व शेवटी मोगलांचे कैदी होतात....त्यांना मात्र आधीच किल्ल्याबाहेर काढले जात नाही वा तसा एकही प्रयत्न होत नाही याचाही अर्थ कसा लावायचा?
मला असे वाटते संभाजी महाराजांना आपल्याला सर्वांनी त्यागल्याचे अटकेच्या काही दिवसांतच समजुन चुकले असावे म्हणुन ते मृट्युला धीरोदात्तपणे सामोरे जायला सज्ज झाले.
असो...या काही प्रश्नांचे व तर्कांचे अजुनही काही पैलु आहेत...ते पुढील भागात...

Tuesday, September 11, 2012

धनगरांच्या पुनरुत्थानासाठी...



धनगर ही तशी जात नसून जमात आहे हे त्यांच्या पुरातन इतिहासापासुन दिसुन येते. म्हणजे जेंव्हा वर्णव्यवस्था वा जातीसंस्थासुद्धा अस्तित्वात आली नव्हती तेंव्हापासुन धनगर समाजाचे अस्तित्व महाराष्ट्रात राहिले आहे. या समाजाची स्वतंत्र अशी संस्कृती आहे. खंडोबा, बिरोबा या त्यांच्या मुख्य देवता. पानकळा संपला कि मेंढरांचे कळप घेवून बाहेर पडायचे आणि पानकळ्याच्या आरंभी परत यायचे. थोडक्यात हा समाज अजुनही मोठ्या प्रमाणावर निमभटका राहिलेला आहे. यामुळे या समाजात शिक्षणाचे प्रमाण खुपच कमी आहे. अर्थतच त्यामुळे आर्थिक दारिद्र्यही मोठ्या प्रमानावर आहे. एके काळी संपन्न असलेला, "धनाचे आगर" म्हणुन धनगर म्हटला जाणारा हाच तो समाज यावर सहजी विश्वास बसणे अशक्य वाटावे एवढी आर्थिक अवनती या समाजाची आज महाराष्ट्रात झाली आहे.

मेंढपाळी व्यवसायावर कोसळलेली संकटे

मेंढपाळांना हवी असतात चरावू कुरणे. परंतु जसे भारतात औद्योगिकी करण होवू लागले व औद्योगिक वसाहतींसाठी शासनाने ज्या जागा ताब्यात घेतल्या त्या जागा म्हणजे चराऊ कुरणेच होती. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर धरणे बांधली गेली. त्यात जशा शेतजमीनी बुडल्या तशीच हजारो हेक्टर चरावु कुरणेही. सेझमुळे या आपत्तीत भरच पडली. शेतक-यांना वा विस्थापितांना सरकारने उशीरा का होईना भरपाया तरी दिल्या व पर्यायी जागाही दिल्या. पुनर्वसनेही झाली. विस्थापितांच्या प्रश्नांसाठी आंदोलनेही झाली व आजही होतच आहेत. पण मेंढपाळांना सरकारने कसलीही आर्थिक मदत तर केली नाहीच पण पर्यायी व्यवस्थाही केली नाही. ते तर सोडाच, वनखात्याच्या जाचक नियमांनी पुर्वांपार ज्या क्षेत्रांत मेंढरांना चरायची सोय होती तीही आक्रसली. धनगर समाज हा मुळात मूक समाज. त्यांनीही आपल्या प्रश्नांना कधी वाचा फोडली नाही. तो कधी रस्त्यावर आला नाही. कधी आवाज उठवला नाही. त्यांच्या बाजुने कोणी अन्य पक्षनेत्यांनीही विधानसभेत वा संसदेत साधा आवाज उठवला नाही. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण देशातील मेंढपाळी उद्योगाच्या गळ्याला आपण नख लावतो आहेत याचे भान कोणालाही राहिले नाही.

शेतक-यांच्या प्रश्नांवर आजवर असंख्य आंदोलने झालीत. महाराष्ट्रात शरद जोशींची शेतकरी संघटना असो कि उत्तरेतील महेंद्र टिकैतांची...त्यांनी शेतकरी प्रश्नांवर वारंवार रान उठवले आहे. अनेक पुस्तके, अगणित लेख लिहिले गेले आहेत...पण मेंढपाळांच्या एकुण अवस्थेबाबत, त्यांच्या व्यावसायिक समस्यांबाबत अभ्यासक/विचारवंतही कधी अभ्यास करते वा लिहिते झाले नाहीत. एकुणात मेंढपाळांच्या प्रश्नावर कोणीही तोंड उघडलेले दिसत नाही...आंदोलने तर खुप दुरची गोष्ट झाली.

आज महाराष्ट्रात धनगर समाज हा वाड्या-वस्त्यांवर विखरुन राहिला आहे. या समाजाची एकुण लोकसंख्या दीड कोटीच्या घरात आहे. म्हणजे एकुण लोकसंख्येच्या एकुण जवळपास सोळा-सतरा टक्के एवढा हा समाज असुनही एवढा दुर्लक्षित रहावा ही पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने खरे तर लांच्छनास्पद बाब आहे. पण लक्षात कोण घेतो? खुद्ध धनगर समाजाचे सध्या फक्त सहा आमदार आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेपासुन आजतागायत फक्त तीन जणांना मंत्रीपदे मिळाली आहेत. आजतागायत या समाजातुन एकही खासदार झालेला नाही. याचे कारण म्हणजे कोणत्याही पक्षाने उमेदवारी देतांना धनगर समाजाच्या प्रतिनिधित्वाचा विचारच केलेला दिसत नाही.

यामुळेच कि काय श्री. महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना करुन धनगर व बहुजन समाजाला एकत्र करत राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु केले. परंतु अद्याप या पक्षाला खुप मोठी मजल मारायची आहे. तोवर काय होणार हा प्रश्न आहेच. पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व नसल्याने धनगर समाजावरील अन्याय कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही.

मेंढपाळी व्यवसायाचे महत्व

मेंढ्यांपासुन मांस, कातडी, दुध व लोकर मिळते. आज हा जगभर अत्यंत महत्वाचा उद्योग मानला जातो. चीन, आस्ट्रेलिया व अमेरिकेत या उद्योगाला मोठ्या प्रमाणावर अनुदानेही दिली जातात. चरावू कुरणांना पुर्ण संरक्षण आहे. चीन देश या उद्योगात प्रथम क्रमांकावर असुन या देशात चवदा कोटी मेंढ्या आहेत. भारत हा दुस-या क्रमांकावर असून भारतातील मेंढ्यांची संख्या आजमितीला आठ कोटींच्या आसपास आहे. अमेरिका आज आपली बोकड/मेंढी मांसाची ५०% गरज आयातीतुन पुर्ण करतो.

महाराष्ट्रात आजमितीला चाळीस लाखांपेक्षा अधिक मेंढरे आहेत. अत्यल्प अपवाद वगळले तर या मेंढरांचे सर्वस्वी मालक धनगरच आहेत. नाबार्डच्या अहवालानुसार महाराष्ट्रात अजुनही पन्नास लाख मेंढरांची गरज आहे...ती लोकर व मांसाची गरज पुरवण्यासाठी. पण मुळात चरावु रानेच नष्ट होत चालल्याने वाढ तर सोडा यात घटच होत जाणार आहे हे उघड दिसते. यामुळे भारत मांसाचा निर्यातदार नव्हे तर आयातदार होत जाईल हा धोका कोणी लक्षात घेत नाही हे दुर्दैवच आहे.

मेंढपाळांवर कोसळत असनारे दुसरे संकट म्हणजे शेतकरी आणि मेंढपाळामद्धे अकारण उठणारे संघर्ष. एखादे मेंढरु चुकुन शेतात घुसले कि धनगरांना अक्षरशा चोपुन काढले जाते. धनगरांना मिळनारे एक अत्यल्प उत्पन्न साधन म्हणजे रिकाम्या शेतात मेंढरे बसवून सेंद्रिय खत पुरवणे. पण आजकाल रासायनिक कीटनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने, अनेकदा मेंढरांना वीषबाधा होते. अनेक मेंढरे दगावतात. वीमा नसल्याने भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही.  त्यात दुष्टाव्याने वीष घालुन मेंढरे मारली जाण्याच्याही घटना मोठ्या प्रमानावर होवू लागल्या आहेत. नुकतीच बुलढाना जिल्ह्यातील मोताळा तालुका येथील खडकी शिवारात लोणच्यात वीष घालुन शेकडो मेम्ढरांना वीषबाधा करण्यात आली...त्यात छप्पन्न मेंढरांचा जीव गेला. या दुष्टाव्याबाबत आजतागायत कसलाही गुन्हा नोंदवून घेतला गेलेला नाही. कुरणे कमी होत असल्याने व त्यात आता नवीन भुमीग्रहण कायदा केंद्र सरकार आणत असल्यामुळे असे प्रकार वाढत जाणार व अकारण तेढीही. एक नवा सामाजिक संघर्ष उभा राहण्याचा धोका या निमित्ताने होवू शकतो.  त्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलत चरावु कुरणांची पुरेशी उपलब्धता कशी होइल यावर वनखात्याशी चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे.

पण असे करत असतांनाच मेंढपाळ समाजालाही आधुनिकीकरणाची कास धरली पाहिजे. हजारो वर्ष चालत आलेली भटकी मेंढपाळी आधुनिक युगात उपयोगाची नाही. यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणजे बंदिस्त मेंढीपालन.  आंध्र-कर्नाटकात असे अपुरे असले तरी अनेक यशस्वी प्रयोग झाले आहेत. महाराष्ट्रात मात्र धनगर समाज आधुनिकीकरणापासून दुरच राहिला आहे. किंबहुना त्यांचे नीट प्रबोधन झालेलेच नाही.  किंबहुना ते केले पाहिजे याचे भान धनगर समाज नेत्यांना राहिलेले नाही. प्रत्येक मेंढपाळ जर बंदिस्त मेंढीपालन करु लागला तर आज नवी आर्थिक क्रांती घडु शकते. म्हणजे आज जो एक मेंढपाळ दिड-दोनशे मेंढ्यांचे कळप पाळतो तोच पाचशे-हजार मेंढरांचे संवर्धन करु शकतो आणि मनुष्यबळ कमी लागत असल्याने मुलांना शिक्षणाकडे वळता येईल. आज लहान मुला-मुलींनाही पालकांबरोबर मदतीसाठी भटकावे लागते.  त्यामुळे त्यांचे शिक्षण होण्याची शक्यता शुण्य. बंदिस्त मेंढीपालनामुळे ही वेळ येणार नाही व समाजात सुशिक्षितांचे प्रमाण वाढायला मदत होइल. बंदिस्त मेंढीपालन खर्चिक नाही. त्यासाठी नज़बार्डच्या अनेक स्वस्त दरातील कर्जयोजना आहेत. अनुदानेही आहेत. दुर्दैवाने त्यांचा फायदा घेण्यात हा समाज पुर्ण मागे राहिलेला आहे. चारा-पाण्याचा बंदोबस्त गवळी बंधव करतात तसाच करता येवू शकतो हेही लक्षात घ्यायची गरज आहे. यामुळे धनगर समाज स्वत: भांडवलदार तर बनु शकतोच, पण विक्रय व्यवस्थाही दलालांमार्फत न करता स्वतंत्रपणे उभारु शकतो. थोडक्यात त्याचे उत्पन्न मोठ्या प्रमानावर वाढवू शकतो. यासाठी महादेव जानकर, रमेश शेंडगे, प्रकाश शेंडगे, अण्णा डांगेंसारख्या नेत्यांनी पुढाकार घेतला तर या अर्थक्रांतीची सुरुवात तरी होवू शकते. कारण मांस-लोकरीची गरज वाढतच जाणार आहे व जोवर मनुष्यप्राणि भुतलावर आहे तोवर हा उद्योग सुरुच राहनार आहे...पण आज धनगरांनी पुढाकार घेतला नाही तर हा उद्योग अन्य भांडवलदारांच्या हाती जाईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

सामाजिक समस्या

धनगर समाज आज्मितीला बावीस पोटजातींत वाटला गेलेला आहे. या पोटजातींत अजुनही नीट स्मन्वयही नाही. आजची तरुण शिक्षित पिढी "धनगर सारा एक" असा नारा देत असली व त्या दिशेने प्रयत्न होत असले तरी ते पुरेशे नाहीत. प्रत्येक पोटजातीची स्वतंत्र संघटना आहे. वधुवर मेळाव्यांपलिकडे त्यांची मजल जात नाही. इतिहासाचे नीट आकलन नसल्याने कोणी धनगरांचे मुळ राजपुतांत शोधतो तर कोणी क्षत्रियत्वात. या भ्रमांतुन बाहेर येवून आपले पुरातन मुळ पाहण्याची अद्याप सुरुवात नाही. पोटजातींतही कोण उच्च-कोण खालचे असे विवाद आहेतच. ऐतिहासिक दृष्ट्या खरे तर हे उतरंडीचे धोरण अत्यंत आक्षेपार्ह आहे. कदाचित त्यामुळेच हा समाज आपले सामाजिक अस्तित्व हरपत चालला आहे असे दिसते. उदा. धनगर समाज हा निमभटका समाज आहे. धनगर समाजाला प्रदेशनिहाय भाषाभेदामुळे विविध नांवे आहेत. उदा. उत्तरेत धनगर समाज धनगड, पाल, गडरिया आदि नांवांनी ओळखला जातो तर दक्षीणे कुरुब, दनगार, इ. नांवांनी ओळखला जातो. व्यवसाय मात्र एकच. तरीही त्यांना त्या-त्या राज्य सरकारांनी वेगवेगळ्या गटअंत आरक्षण दिले आहे. मानव वंशशास्त्र द्रुष्टीने हा सर्वच समाज अनुसुचित जमातींत येतो हे सर्वमान्य असतांनाही महाराष्ट्र शासनाने धनगरांची भटक्या जमातीत केलेली आहे. हा समाज पुर्णवेळ भटका नाही हे सामाजिक सत्य डावलले आहे. धनगर समाज आपली मागणी मांडत असला तरी त्यासाठी नेमलेला आगरवाल आयोग अद्याप कोणत्याही निष्कर्षाला पोहोचलेला नाही. याबाबत आजतागायत महाराष्ट्र सरकारने धनगरांची घोर फसवणुकच केलेली आहे. पण पुरेसा रेटा नसल्याने काही होईल अशी आशा बाळगता येत नाही. रेनके आयोगाला जे सरकार गुंडाळुन ठेवते ते सरकार समजा अजुन चार-पाच वर्षांनी आगरवाल आयोगचा अहवाल आला तरी काहीएक कार्यवाही करेल या भ्रमात राहने गैर आहे. असो.

एक गौरवशाली इतिहास असलेला, महाराष्ट्राचे आद्य वसाहतकार असलेल्या या समाजाची दैना सर्वच समाजांनी समजावून घ्यावी व या मुक समाजाला बोलते होण्यासाठी प्रेरणा द्यावी ही अपेक्षा.

(समाप्त)

संजय सोनवणी
९८६०९९१२०५

Monday, September 10, 2012

संभाजी महाराजांच्या मुक्ततेसाठी अल्पसाही प्रयत्न ...?


मित्रहो, मला एक प्रश्न पडलाय. कालच मी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज या शालिनी मोहोड लिखित ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात हा प्रश्न उपस्थित केला आणि मला वाटनारे तर्कनिष्ठ विश्लेषनही केले जे श्रोत्यांना स्फोटक वाटले असले तरीही अन्य वक्त्यांनाही पटले. असो. प्रश्न असा आहे कि १ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वर येथे संभाजी महाराजांना पकदण्यात आले व त्यांची हत्या (दुर्दैव म्हणजे या ग्रंथाची लेखिका वारंवार या हत्येला "वध" म्हणत होती. निषेध करावा तेवढा कमीच!) १३ मार्च १६८९ रोजी झाली. या काळात संभाजी महाराजांचा छळ क्रमाने करत शेवटी हत्या कशी केली गेली याची सर्व वर्णणे मिळतात. पण याच काळात एकाही मराठी सरदाराने, वतनदाराने वा शंभुराजांच्या एकाही मंत्र्याने शंभुराजांना सोडवण्याचा एकही प्रयत्न केला नाही अथवा तहाची बोलणी करायला व शंभुराजांना सोडवायला एकही वकील औरंगजेबाच्या दरबारी आला नाही. जनतेनेही कसलाही उठाव केला नाही.

हे विचित्र अशासाठी वाटते कि तदनंतर राजाराम महाराज जिंजीला असुनही मराठ्यांनी याच औरंग्याला सळो कि पळो कसुन सोडले. राजाराम महाराजांच्या अकाली मृत्युनंतराही रणरागिणी ताराराणीने अथक लढा सुरुच ठेवला. औरंग्याला याच भुमीत हताश श्वास घेत मरायला भाग पाडले...

मग असे तेंव्हाच नेमके काय झाले कि एकही सरदार संभाजी महाराजांच्या मुक्ततेसाठी अल्पसाही प्रयत्न करु शकला नाही? मंत्री-मुत्सद्दी यांनी किमान वाटाघाटींचा प्रयत्न का केला नाही?

कि संभाजी महाराज खरेच जनतेला म्हणा वा सरदारांना म्हणा कि मंत्र्यांना म्हणा नकोसे होते? राजाराम महाराज रायगडावरुन वेढ्यातुनही सटकुन जिंजीला जावू शकतात तर महाराणी येसुबाई आणि बाल शिवाजी (शाहुंचे जन्मनाम शिवाजी होते) मात्र औरंगजेबाच्या कैदेत जातात याचा अन्वयार्थ कसा लावायचा?

कृपया इतिहास अभ्यासकांनी या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मदत करावी ही विनंती.
2 ·  ·  · 
    • Amit Namjoshi संजयदा, योग्य शंकेला वाचा फ़ोडलीत. असं जाणवून गेलं की होय अशी शंका आमच्याही मनात होती.
      about an hour ago · Edited ·  · 2
    • Sudhakar Jadhav स्फोटक आणि अडचणीचे प्रश्न ! उत्तरे मुद्द्यात येतात की गुद्द्यात हे लवकरच कळेल.
      about an hour ago ·  · 1
    • Sanjay Sonawani संगमेश्वर ते तुळापुर हे अंतर पाच-सहा हजार सैन्याच्या मदतीने शंभु राजांना घेवून मोगलांनी कापले. या विस्तीर्ण भागात एकही मराठा सरदार नव्हता काय? कि शंभुराजांना कैद केल्याची माहिती मराठ्यांना त्यांची हत्या होईपर्यतही मिळालीच नाही? मला हे अशक्य वातते म्हणुन हे प्रश्न. औरंगजेबाचे सैन्य मोठे होते पण त्याची धास्त मराठ्यांना होती असेही दिसत नाही....त्यामुळेच नेमके काय झाले असावे याबाबत काहे पुरावे मिळतात काय यासाठीच ही पोस्ट आहे.
      55 minutes ago ·  · 2
    • Sanjay Sonawani 
      जाधव सर, प्रश्नच विचारले नाहीत तर आपण उत्तरे कशी शोधणार? ज्यांना इतिहास ही आपलीच जातीय मालमत्ता वाटते ते गुद्द्यांवर येवू शकतात...तसे काही कालही आले होते...पण म्हणुन संशोधने करायचीच नाहीत का? आपल्याला उत्तरे हवी आहेत आणि ती शोधायचा हा प्राम...See More
      50 minutes ago ·  · 5
    • Gitesh Deokar ‎1.महाराजांची हत्या 13 नाही तर 11 मार्चला झाली...
      2.औरंगजेब महाराजांना सोडायला तयार होता मात्र त्याला स्वराज्याचा खजिना हवा होता..आणि त्याच्या दरबारातील कोण कोण महाराजांना सामील होते,याची माहिती हवी होती..(ही खाफीखानाची नोँद आहे.)
      3.औरंगजेब...See More
      41 minutes ago via mobile ·  · 3
    • Sanjay Sonawani 
      गितेशजी, तारखांचा घोळ आपल्या इतिहासात संपत नाही...दुर्दैव. असो. संभाजी राजे ताब्यात असतांना स्वराज्याचा खजीना तेवढ्याच धमकीवर शंभुराजांच्या मंत्र्यांकडुन वा येसुबाईंकडुन मिळवणे सहज शक्य होते. त्यामुळे शंभुराजांनी खजिना दिला नाही म्हणुन त्या...See More
      30 minutes ago ·  · 3
    • Sanjay Sonawani आणि एक अजुन प्रश्न...शंभुराजांना कैद केल्यानंतर शंभुराजांना किमान चर्चेसाठी त्यांच्या एकाही मंत्र्याशी/अधिका-याशी/वकीलाशी बोलायची परवानगी न देता औरंगजेब शंभुराजांकडुनच अनुमत्या मिळवायला छळत राहु शकतो काय? जगाच्या इतिहासात असा प्रसंग घडला आह...See More
      20 minutes ago ·  · 2
    • Gitesh Deokar कदाचित जातिव्यवस्थेला हादरे देणारं कार्यच कारणीभूत असावं...वैदिक धर्म नाकारुन शाक्त धर्माचा प्रसार यामुळे त्यांची बदनामी करण्यात आधीच मंत्री यशस्वी झाले होते..मराठा सरदारांना वतनदारी पद्धती बंद पाडणं रुचलं नसावं कदाचित..कारण यामुळं त्यांचं वर्चस्व धोक्यात आलं होतं...:-)
      18 minutes ago via mobile ·  · 2
    • Sanjay Sonawani And Rajaram Maharaj restarted vatandari,....Gitesh ji...this also can be a reason. Let's probe more. Thanks.
      15 minutes ago ·  · 2
    • Gitesh Deokar याउलट औरंगजेबाने वतनदारांना मोकळं रान सोडण्याची भूमिका घेतली होती...त्यामुळे शंभुराजांपेक्षा तो परवडला अशी मनोमन गणितं जमवुन शंभुराजांना कसलीही मदत न करता मरणाच्या दारात या सरदारांनी सोडुन दिलं असावं..!
      13 minutes ago via mobile ·  · 2
    • Sanjay Sonawani Could be. We need to probe to reach to the conclusion...
      10 minutes ago ·  · 2
    • Gitesh Deokar तुमच्या मागच्या कथेत चितारलेला इतिहासाच्या गोधड्या उसवणारा नायक खरोखरी तुम्हीच आहात....आगे बढो..:-)
      2 minutes ago via mobile ·  · 1
    • Sanjay Sonawani गितेशदा...म्या जीवंत हाय...सावली नाय.
      उद्याचं दादा माह्यत नाय!..

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...