Sunday, October 29, 2017

म्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणूक पर्यायांची विपूलता!

मराठी माणूस म्युच्युअल फंडांपासून जरा दुरच राहिला याचे कारण म्हणजे या व्यापक क्षेत्राची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचायला हवी होती तशी पोहोचली नाही. गुंतवणुकीची क्षेत्रे किती व्यापक झाली आहेत हे आपण मागच्या काही लेखांत म्युच्युअल फंडांच्या विविध प्रकारांतून पाहिले. पारंपारिक गुंतवणुकीच्या पर्यायांना मुळात मर्यादा आहेत. शिवाय त्या आपल्या स्वत:च्या व्यक्तिगत अंदाजांवर अथवा भोवतालच्या प्रभावावर अवलंबून असतात. त्यात जशी पर्यायांत विविधता नसते तसेच तज्ञ व्यवस्थापन कौशल्यही नसते. खरे तर म्युचुअल फंड गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची जेवढी व्यापक क्षेत्रे उपलब्ध करुन देतात तेवढे पारंपारिक गुंतवणुकीचे प्रकार देत नाहीत. ते कसे?

समजा तुम्हाला एखाद्या अविकसनशील देशातील प्रकल्पांत भावी लाभ दिसत असतांनाही व्यक्तिश: गुंतवणूक करता येणे शक्य आहे काय? समजा तुम्हाला फक्त स्थावर मालमत्तेच्या क्षेत्रात (रियल इस्टेट) गुंतवणूक करायची इच्छा आहे पण तेवढे अवाढव्य भांडवल मात्र नाही, मग कशी गुंतवणूक करणार? समजा तुम्हाला वस्तूंच्या (कमोडिटी) खरेदी विक्रीत गुंतवणूक करायची आहे पण त्यासाठी लागणारे कौशल्यच नसेल तर मग कशी गुंतवणूक करणार? इतरही अशा विशिष्ट क्षेत्रातीलच गुंतवणुकीबाबतही हेच लागू आहे. अनेक क्षेत्रे तर आपल्याला माहितही नसतात पण त्यांचा वेगवान विकास होत असतो. त्यांची माहिती सामान्य माणसापर्यंत पोहोचतच नाही. मग त्या विकासाचा फायदा गुंतवणूकदार कसा घेऊ शकणार?

बाजारात अत्यंत नवी तंत्रज्ञाने येवू घातलेली असतात त्या उत्पादनांना भविष्यात मोठी मागणी असू शकते हे समजत असुनही या नव्या तंत्रज्ञानांवर आधारित उद्योगांत कशी गुंतवणूक करणार? त्याची अद्ययावत माहिती कोठून मिळणार?

म्युच्युअल फंडांमध्ये आपल्या गुंतवणुकीसाठी भरपूर पर्याय उपलब्ध असतात. बरे आपल्याकडे या क्षेत्रांत गुंतवणूक करण्यासाठी अल्प रक्कम असली तरी चालते. आपण या गुंतवणुकीतील सामुहिक भागीदार बनू शकता. त्यासाठी स्वत: तज्ञ असण्याची गरज नाही. रोज देखरेख करण्याची आवश्यकता नाही. आधीच्या लेखांत माहिती दिल्याप्रमाणे हे विशिष्ट-क्षेत्र केंद्रित फंड (Funds based on speciality) आपल्याला अजून जास्त पर्याय देत असतात. म्हणजेच म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा अत्यंत व्यापक असा मार्ग ठरतो.

म्युच्युअल फंडांत अधिक जोखिम असलेले, मध्यम जोखिम असलेले कमी जोखिम असलेले  असे प्रकार पडतात हे तुमच्या लक्षात आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून लक्षात आले असेलच. लाभ जोखिम यात निकटचा संबंध असतो. म्हणजे जोखिम अधिक असेल तर लाभही अधिक होणार असतो. प्रत्येक गुंतवणूकदार कोणत्या स्तराची जोखिम घेऊ शकतो हे त्याच्या व्यक्तिगत क्षमतेवर तो गुंतवणुकीचे कोणते माध्यम निवडतो यावर ठरत असते. आजिबात जोखिम नाही अशी गुंतवणूक तर असू शकत नाही. पण ती गुंतवंणुकीसाठी सुयोग्य निवड करुन किमान स्तरापर्यंत आणता येवू शकते आणि म्युच्युअल फंडाच्या अनेकविध प्रकारांत तशीही सोय गुंतवणूकदारांसाठी करुन दिलेली असते.

त्यासाठी गुंतवणूकदारांनी आपली निवड करतांना खालील विचार केले पाहिजेत.

पहिली बाब म्हणजे आपल्या गुंतवणुकीचा हेतू उद्दिष्ट काय आहे, हा प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे. आपल्याकडे एक्स्ट्रा रक्कम आहे म्हणून ती कोठेही गुंतवा असा विचार करता त्यात किती किती काळात वाढ अपेक्षित आहे याचा अंदाज घ्यावा त्यासाठी अनुकूल म्युच्युअल फंडांची माहिती घ्यावी. आपण किती जोखिम स्विकारू शकतो हाही प्रश्न आपण स्वत:ला विचारायला हवा. आपल्याला आपल्या गुंतवणुकीतील वाढ किती वेगाने अपेक्षित आहे हे लक्षात घेऊन अधिक जोखिम ते कमी जोखिमीचे पर्यायही आपण अभ्यासू शकता. आपणास करबचत हे उद्दिष्ट ठेवायचे असेल तर तशा प्रकारचे म्युच्युअल फंडही उपलब्ध असतात. आपल्याला दरवर्षीच लाभांशाच्या रुपाने नफा हवा असेल तर लाभांश देणा-या म्युच्युअल फंड पर्यायांचा विचार करायला हवा. आपण गुंतवणूक टप्प्याटप्प्याने करणार आहोत की एकरकमी हेही ठरवायला हवे. शिवाय आपल्याला कोणतीही गुंतवणूक किती काळासाठी करायची आहे याचाही अंदाज आधीच घेतला पाहिजे.


प्रत्येक म्युच्युअल फंड आपल्या योजनेची माहिती देत असतांना खाली एक वैधानिक सूचना देत असतो. त्यानुसार तुम्ही म्युच्युअल फंड योजनेची संपूर्ण वाचणे, समजाऊन घेणे आवश्यक तर आहेच पण म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीमध्ये असणा-या बाजारातील संभाव्य जोखिमींचा इशाराही विचारात घेतला पाहिजे. म्युच्युअल फंड आपल्या विशिष्ट योजनेत फंडाची रक्कम कोठे गुंतवली जाणार आहे गुंतवणुकदाराला कोणत्या सुविधा देणार याचीही माहिती Offer Document मध्ये देत असतो. ते बारकाईने समजावून घेतले पाहिजे आवश्यकता भासल्यास आपल्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घेतली पाहिजे मगच योग्य वाटणा-या पर्यायाची निवड केली पाहिजे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या
https://www.reliancemutual.com/campaigns/RMFContest/index.html

(वैधानिक सूचना: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करतांना योजनेशी संबंधीत कागदपत्रे काळजीपुर्वक पहावीत व मगच गुंतवणुकीचा स्वजबाबदारीवर निर्णय घ्यावा.)


गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...