Showing posts with label भाषणे. Show all posts
Showing posts with label भाषणे. Show all posts

Tuesday, October 9, 2018

आमचा इतिहास निर्माणकर्त्यांचा!


"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे विचार आहेत त्यांच्यासमोर जाऊन बोला. तुम्ही शहाणे आणि खरे असाल तर समोरच्यांपैकी किमान दोन लोक तरी तुमचे विचार समजावून घेतील. दोनाचे चार आणि चाराचे आठ व्हायची प्रक्रिया त्यातुनच सुरु होईल. समतेचे विचार ख-या समतावादी आचरणातुनच जातात. विचार हे सर्वांसाठीच असतात. तुमचे विचार पक्के असतील तर कोणाहीपुढे कधीही तुमचे विचार मांडता आले पाहिजेत. सत्याचा तोच महिमा आहे. कोणी संस्कृतीचे अपहरण केले असे आपण म्हणतो तेंव्हा फक्त आरोप करुन चालत नाही तर पुराव्यानिशी तसे सिद्ध करावे लागते. आमचा सांस्कृतिक अभ्यासच मुळात नगण्य आहे....मग नुसते आरोप करुन आमची संस्कृती काय होती आणि अशी का झाली हे कसे समजणार? आम्हाला अभ्यास नको आहे. आम्हीच जातीयवादी आहोत, वक्त्यांच्या जाती व माझा प्रवर्ग सांगितला जातो आहे....आणि आम्ही जाती नष्ट करायची स्वप्न पाहतोय. हा विरोधाभास आम्हाला समजावून घ्यावा लागेल. जाती नष्ट करायच्या नसतील तर नका करु...किमान जातींतील समता तरी आधी आणाल? पण आम्हाला तेही करायचे नाही. मग आम्ही समतावादी आहोत हे म्हणायचा आम्हाला काय अधिकार? बुद्ध, बाबासाहेब, फुले, शाहुंना अभिवादन करायचा काय अधिकार? आम्ही गेल्या वर्षी हीच अभिवादने करतांना जिथे होतो तिथेच आजही आहोत आणि पुढच्या वर्षीही तिथेच राहणार असू तर आम्ही पुरोगामी कसे?
"संस्कृतीची अपहरणे झाली आहेत. पुरातन वारसा नाकारायच्या नादात आम्हीच आमचेच व्यास-वाल्मिकी ते कालिदास नाकारत गेलो आहोत. आम्ही सारेच नाकारायच्या नादात आम्हाला संस्कृतीच नव्हती हेच उरबडवेपण करून सांगत आहोत. पण सिंधू संस्कृती आज समजते ती तत्कालीन कुंभारांच्या मृद्भांड्यामुळे, शेतक-यांच्या शेती करण्याच्या पद्धतीमुळे, गवंड्यांच्या शिस्तबद्ध बांधकामांमुळे, मुर्तीकारांच्या रचनांमुळे आणि अलंकार बनवणा-या कारागिरांच्या कुशल कारागिरीमुळे. आम्हाला ही संस्कृती समजते ती देशोदेशी व्यापार करणा-या तत्कालीन साहसी, दर्यावर्दी व्यापा-यांमुळे आणि त्यांना लागणारी शिडाची भव्य जहाजे बनवणा-या सुतारांमुळे. वैदिकांचे साहित्य आम्हाला आमचा इतिहास सांगत नाही. वैदिक साहित्यात आमचा इतिहास शोधणे मुर्खपणाचे आहे. आमचा इतिहास प्रत्यक्ष पुराव्यांनी सामोरा आहे....शाब्दिक नाही...आणि प्रत्यक्ष जे असते तीच संस्कृती असते....लेखनात चो-या, प्रक्षेप होऊ शकतात....प्रत्यक्ष वास्तवदर्शी वस्तुंत नाही. आमचा इतिहास निर्माणकर्त्यांचा आहे...लेखनिकांचा नाही हे आपण समजावून घेतले पाहिजे.
"सांस्कृतिक अपहरण झाले आहे हे खरे मानले तरी आमचे काय होते हे शोधायची आमची तयारी नाही. किंबहुना सारे काही नाकारायचेच ठरवले असेल तर मग आज आम्हाला आमची संस्कृतीच नाही हेही मान्य करावे लागेल. बरे, तेही ठीक आहे असे समजू. पण मग आम्ही नवी संस्कृती घडवायला तरी तयार आहोत काय? नाही. संस्कृती ही अर्थकारण, सत्ताकारण आणि त्याहीपेक्षा मोठे म्हणजे ज्ञानकारण यातून साकार होते. अर्थकारण म्हणावे तर आमचा डोळा गेला बाजार नोक-यांवर. सत्ताकारण म्हणावे तर ते आजही भिकेच्या तुकड्यांवर. आणि ज्ञानकारण....ते तर आम्हाला आजही दुरचे स्वप्न झाले आहे. त्याच्या अभावात संस्कृतीचे पुनर्रचना अशक्य आहे, याचे भान आम्हाला जर येत नसेल तर आमचे कसे होणार यावर आम्हीच नीट विचार केला पाहिजे."

( भारतीय साधनसंपत्ती परिषदेत मुंबई येथे केलेल्या भाषणातील मुद्दे)

Thursday, April 14, 2016

अस्मितांच्या बाजारात.....

भारत आधुनिक तेंव्हाच होईल जेंव्हा आम्ही भारतीय नागरिक आचार-विचार प्रगल्भ, जिज्ञासू आणि भविष्यवेधी होऊ. आम्हाला महापुरुष बोट धरुन चालवतात. पुढची दिशाही दाखवतात. काळाचा घाला कोणाला सोडत नाही. बोट सुटते. आम्ही ज्या दिशेला बोट दाखवले त्या दिशेकडे जायचा मात्र प्रयत्न करत नाही. जेथे साथ सुटली तेथेच रेंगाळत राहतो. स्मारके बनवणे अथवा जयघोषात रममान होणे हाच जणू आमच्या अनुयायी असंण्याचा एकमेव निकष बनतो. आम्ही पुढे जात नाही. आम्ही त्यांचे काम, विचार पुढे नेत नाही. अजुन वरचे मजले बांधायचे बाकी आहेत हे आमच्या गांवीही नसते. 

आम्ही स्मरण करतो म्हणजे नेमके काय करतो? अभिवादन करतो म्हणजे नेमके काय करतो? खरे तर यातुन आम्ही काहीच करू शकत नाही हेच सिद्ध करतो. म्हणून आमच्या समस्या त्याच जुनाट आणि बुरसटलेल्या आहेत. आमच्या जातीअंतांच्या सभा वक्त्यांच्या जातीची नांवे घेतच होतात. आमचा पाण्याचा प्रश्न स्वातंत्र्यपुर्व काळात होता तो आजही तसाच आहे. आमच्या अर्थिक आणि जातीय विषमता यात काही बदल झालेला नाही. वैचारिक प्रगल्भता आली असावी असे वाटावे अशी सामाजिक, शास्त्रीय, आर्थिक संशोधनेही आम्ही केली नाहीत. ज्ञानाची कोठारे एका टिचकीवर आज उपलब्ध झाली पण आम्ही त्या साधनांचा गैरवापरच जास्त केला. आमचेच पंख आम्ही वांझ, खोटारड्या अस्मितांच्या लालसेपायी कापून घेतले. खरे म्हणजे जीवंत बोट जी दिशा दाखवत होते ती दिशा आम्ही सोडली आणि काल्पनिक बोटाच्या छत्रछायेत आमचे गौरव शोधत राहिलो.

गौरवात भर घालु न शकणारे नागरिक ज्या देशात होतात त्या देशाला भविष्य नसते. अभिवादन सार्थ कृतीतून होते. ज्ञान-विचार-समग्र सामाजिकतेत भर घालून होते, पोकळ आठवणी काढत आणि त्यातच रमत होत नसते याचे भान आम्हाला आजही नाही. अस्मितांच्या बाजारात महापुरुष हरवले आहेत. आम्ही दिग्भ्रमित माणसे बनलो आहोत नि त्यामुळेच स्वजातीय महापुरुषांना घट्ट कवटाळुन बसत स्वत: तर प्रतिगामी होतच आहोत, महापुरुषांनाही छोटे बनवत आहोत. त्यांच्यात अस्मिता शोधणे महत्वाचे असले तरी त्यांच्या पेक्षाही किमान दोन पावले पुढे जाण्याचे व खरी आदरांजली वाहण्याचे आपल्याला भान नाही. बाबासाहेबांना दर वर्षी जयंती नि पुण्यतिथीला अभिवादनाचे कार्यक्रम होतात. पण आमच्यात कोणती वैचारिक प्रगल्भता आली याचा आम्ही कधी विचार करणार? त्यांनी ज्या वैचारिक, सामाजिक स्वातंत्र्याकडे बोट दाखवले त्या दिशेने कधी वाटचाल करणार?

( 13.4.2016. सिंहगड टेक्निकल इंस्टिट्यूट, आंबेगांव -पुणे येथे विद्यार्थ्यांसमोर बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त बोलतांना मांडलेले विचार.)

Wednesday, January 6, 2016

शेतीच्या भवितव्यासाठी....

दोन जानेवारी रोजी संध्याकाळी माझे डेक्कन शुगर टेक्नोलोजिस्ट असोशिएशन येथे "शेती आणि आधुनिक तंत्रज्ञाने" या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी उगार साखर कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष श्री. राजाभाऊ शिरगांवकर होते.

मी मांडलेले मुद्दे:

१. शेतीचा शोध हा मानवी संस्कृति-इतिहासातील क्रांतीकारी टप्पा आहे. या टप्प्यानेच गरजेपोटी आद्य तंत्रज्ञाने, नांगरासारखी प्राथमिक यंत्रे जन्माला आली. शेतीसाठी आद्य जैविक तंत्रज्ञानेही वापरत विविध प्रकारची अन्नध्यान्ये व पालेभाज्या-फळभाज्या संकराने निर्माण केल्या. धरणे बांधने, कालवे काढणे याची सुरुवातही सिंधू संस्कृती कालात सुरु झाली. शेती ही नुसते जगण्याची नव्हे तर मानवी शोधबुद्धीला चालणा देणारी, सर्जनाचा पाया असलेले धर्मविचार आणि विवाहसंस्थेचेही मूळ कारण बनली. आपले आजचेही बहुतेक सण हे कृषीसांस्कृतीतून आलेले आहेत. तंत्रज्ञान आणि शेती याचा मुळ संबंध हा असा असला तरी पुढे त्यात नवीन भर पडली नाही. परंपरागत पद्धती हजारो वर्ष सुरु राहिल्या.

२. पर्यावरणाची चक्रे फिरल्याने सिंधू संस्कृती अवनतीला पोहोचली. अलीकडेच पहायचे तर दहाव्या शतकासून पर्यावरण बदलत जात देशावर दुष्काळाच्या रांगा सतराव्या शतकापर्यंत कायम राहिल्या. त्याने शेतीचीच नव्हे तर सामाजिक स्थितीचीही धुळधान केली. आज वर्तमानात पर्यावरण बदलाचे संकेत आपल्याला मिळत आहेत. आज आम्ही आधुनिक तंत्रयुगात राहतो आहोत असा दावाही आम्ही करतो. पण त्यावर उपाय शोधण्यात आम्ही कमी पडतो आहोत. अवकाळी पाऊस, अतिवृष्ट्या ते पावसाचे वाढते लहरीपण हे आमच्या तंत्रज्ञांचे संशोधनाचे विषय बनत नाहीत हे अत्यंत दुर्दैवी आहे.

३. आम्ही शेतीत स्पर्धात्मकताही ठेवलेली नाही. उद्योजकांनी आपली उत्पादने कोनत्या किंमतीला विकावीत हे सरकार ठरवत नाहे तसेच ग्राहकही. ते उत्पादक ठरवतात. त्यांनी आपली उत्पादने निर्यात करून परकीय चलन आणावे यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न होतात. शेतीवर ५५% लोक अवलंबून आहेत. तेही उत्पादक आहेत. मात्र त्यांना त्यांच्या उत्पादनांचा भाव ठरवायचा अधिकार नाही. हवे तेंव्हा निर्यातीचाच काय भारतातील दुस-या राज्यांत थेट पाठवायचा अधिकार नाही. घटनेच्या समतेच्या मुलतत्वाविरुद्ध ही बाब आहे. शेतक-याला गुलाम करणारी, हमी भावांवर अवलंबून ठेवण्याची ही चाल आहे. हमी भावांचा आधार तरी काय आणि किमान तो तरी किती कृषी-उत्पन्न बाजार समित्या देतात हा संशोधनाचा विषय आहे. शेतक-याला प्यकेज अथवा दात्यांच्या भिकेची गरज नाही, आपल्या उत्पादनाचा भाव ठरवायचा अधिकार, हवे तेथे विकण्याचा अधिकार हीच मुलभूत गरज आहे. स्पर्धात्मकतेमुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञाने अधिक डोळसपणे वापरतील. त्याच त्या परंपरागत पीकांच्या मागे लागत स्वत:चे आणि आपल्या जमीनीचे नुकसान करून घेणार नाहीत.

४. आधुनिक तंत्रज्ञानांबरोबरच शेतक-यांना आधुनिक व्यवस्थापन शास्त्रांशी परिचय करून दिला पाहिजे. शेतक-याची स्थिती एकल उद्योजकासारखी झाली आहे. व्यक्तिगत भुक्षेत्र कमी कमी होत चालले आहे. अशा स्थितीत शेतक-यांनाच एकत्र येत कार्पोरेट पद्धतीने शेती केल्याखेरीज भविष्यात गत्यंतर नाही,. याबाबत व्यापक प्रबोधन करावे लागेल. काही शेतकरी गटशेतीच्या पद्धतीने हे प्रयोग यशस्वीपणे राबवत आहेत. तो आदर्श सर्वांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.

५. लोकांना अन्नधान्ये स्वस्त मिळावीत म्हणून शेतक-यांना वेठीला धरले जाते. ५५% लोकसंख्या गळा आवळत नेत ४५% लोकांचाच विचार करायचा हे ठीक असले तरी भले यात टक्काभर लोकांचेच होते. ग्राहकाला ते फायदे मिलत नाहीत आणि शेतकरी तर लुबाडलाच जातो. समाजवादी धोरणे ही अंतत: मुठभर भांडवलदारांच्याच हिताची असतात. गरज सर्व शेतक-यांना भांडवलदार बनवण्याची आहे. समाज व सरकारच्या कृपादृष्टीवर अवलंबुन असलेले याचक नव्हे.

६. भारतात आज फक्त २% शेतमालावर प्रक्रिया केली जाते. जवळपास ३०% फळे व भाजीपाला साठवणूकीच्या अभावात वाया जातो तर बराच माल अनेकदा भावच पडल्यामुळे अक्षरश: रस्त्यांवर फेकला जातो. आम्ही प्रक्रिया उद्योगात मागे असू तर आम्ही कोणत्या तंत्रज्ञानातील यशाच्या गप्पा हाकतो? बरे, ही काही रोकेट टेक्नोलोजी नाही. आम्हाला अशा तंत्रज्ञानांना भारतात पसरवावे लागेल. भारताच्या महासत्ता बनण्याची खरी ताकद आजही शेतीक्षेत्रात आहे. पण ते पोटेंशियल आम्हाला नीटपणे समजावून घ्यावे लागेल.

७. आपण सर्वांना मिळून शेतीसाठी, पशुपालन व मासेमारी उद्योगांसाठी नवे अर्थ-तत्वज्ञान, तंत्रज्ञान व व्यवस्थापन ज्ञान विकसीत करणे हेच खरे आपल्यासमोरील आव्हान आहे.

Sunday, August 2, 2015

आम्ही कृतघ्न आहोत!



काल जेजुरी येथे उमेश कुदळे व त्यांच्या तरुण मित्रांनी सावली प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या जेजुरीतील पहिल्याच व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना मी मांडलेले काही निवडक मुद्दे-
१. आम्ही १९४७ साली स्वतंत्र झालो असे मानत असलो तरी ते खरे नाही. खरे मानवी प्रगल्भ स्वातंत्र्य आमच्यापर्यंत आमच्यामुळेच पोहोचलेले नाही. आम्ही आमच्या जातींच्या, पोटजातींच्या, धर्मांच्या आणि स्वत:च्याच अविकसित मानसिकतेच्य बेड्यांत अडकलेलो आहोत.
२. आम्ही भारतीय कृतघ्न आहोत. ते महानायकांची नांवे घेतात, जयजयकार व्करतात पण त्यामागे प्रेरणा व आचरण हा उद्देश्य नसून केवळ आपल्या खोट्या अस्मितांचा बाजार मांडणे हा त्यांचा प्रमूख हेतू असतो. जयंत्या-पुण्यतिथ्या साज-या करणे हे आम्हीच व्यर्थ बनवून टाकले आहे. अम्ही कधीच पुरोगामी नव्हतो असे वाटावे अशी स्थिती आहे.
३. प्रगल्भ, विचारी, तर्कनिष्ठ नागरिक बनवले हा शिक्षणाचा मूळ हेतू. काय शिकावे हे शिकण्यासाठी शाळा-कोलेजेस. पण आम्ही शिक्षणाचे साध्य दूर ठेवले आणि आवड असो को नसो...त्या सर्व विषयांत उत्तमोत्तम मार्क पाडून घेण्याच्या स्पर्धेत उतरलो. कलामांनी आम्हाला महासत्ता होण्याचे स्वप्न दाखवले. ते साध्य होण्यासाठी ज्ञानसत्ता आधी मिळवावी लागते. त्यासाठी आमच्याकडे योजनाच नसेल तर महासत्तेचे स्वप्न स्वप्नच राहील. आमचे शिक्षण विद्यार्थ्याला ज्ञानार्थी नव्हे तर पोटार्थी बनवते. तेही जेथे स्कोप वाटतो अशाच क्षेत्रात आम्ही झुंडीने घुसतो. खरे तर स्कोप नाही असे एकही क्षेत्र नाही. पण आम्ही आमच्या नैसर्गिक कल असणा-या विषयांकडे न वळता झूडीच्या नियमांनी अनियमित चालु लागतो. सर्वांना यश मिळणे असंभाव्य होऊन जाते.
४. आम्हाला इतिहासाचे प्रेम आहे असे आम्हाला वाटते. पण तेही खोटे आहे. आम्हाला आमचे महापुरुष ख-या-खु-या ऐतिहासिक मानवी स्वरुपात पहायचे नसतात तर आमच्या विचारधारांचे रंग लेपवून पहायचे असतात. विशिष्ट विचारधारांनी प्रेरित असाच इतिहास लिहिला जात असल्याने आम्हाला तटस्थ इतिहासच नाही. इतिहास आम्हाला संघर्षासाठी, जातीय महत्तांसाठी हवा असतो. इतिहास आपल्या गतीत घडून गेलाय...तो तुमच्या सोयीसाठी घडलेला नाही हे लक्षात घ्यायला हवे. सोयीने कोणाचे उदात्तीकरण करायचे नि कोनाला बदनाम करायचे वा दुर्लक्षित ठेवायचे हे धंदे इतिहासात चालत नाही याचे भान आपल्याला नाही.
५. समतेचा, स्वातंत्र्याच्या सिद्धांतापासुनही आम्ही कोसो दूर आहोत. आम्हाला आपल्या जाती सोडा, जातींअंतर्गतच्या पोटजातीतही समत्वाची भावना आजही आणता आलेली नाही. भटक्या-विमुक्तांसारख्या वंचित-शोषित जातींच्या प्रश्नांचा स्पर्षही आमचा तथाकथित संवेदनशिल मनांना होत नाही. आम्ही स्वत:ला धार्मिक समजतो. पण ज्याने यच्चयावत विश्व निर्माण केले त्या देवालाही आम्ही भिकारी बनवून टाकले. हा आमचा उद्दामपणा आहे. यच्चयावत विश्वातील कणाकणात परमेश्वर भरलेला आहे असे आम्ही एकीकडे म्हणतो आणि माणसांबद्दलच एवढे निघृण होतो. आजही अनेक मंदिरांत दलित अथवा स्त्रीयांना प्रवेश नाही. पानवठ्यांचीही हीच कहानी आहे. संताची वचने सोयीनुसार फेकायला आम्हाला लाज वाटत नाही, पण मानवतेबद्दलचा त्यांचा कनवाळुपणा आम्हाला शिकावासा वाटत नाही. देव-धर्म मानावी कि न मानावा, हा व्यक्तिगत प्रश्न असला तरी ही दांभिकता आमच्यात कोणी भरली?
६. आम्हाला जागतिकीकरणाचे आव्हान अजुनही नीटसे उमगले नाही. हे आव्हान नुसते जगण्याचे, पोट भरण्याचे नाही तर बदललेल्या परिस्थितीला समजावून घेत तीवर स्वार होत तिचा लगाम हाती घेण्याचे आहेत. खेड्यांचे खेडेपण शहरांनी आणि शहरांतील काही उपयुक्त मुल्ये खेड्यांनी घ्यायची गरज आहे. हे होत नाही. उलट दोहोंतील दरी वाढत चालली आहे व ते एकमेकांकडे साशंकतेने, असुयेने तर कधी द्वेषाने पहात आहेत. खरे तर निरंतर अभिसरणाची, चुका दूर मरत नवी उदात्त मुल्ये निर्माण करण्याची गरज आहे. ६५% खेड्यांतील जनता जोवर वैचारिक समृद्ध होत नही तोवर महासत्ता बनता येणे शक्य नाही.
७. आधुनिक साधनांनी जग आमच्या हातात, मोबाईलवरील इंटरनेटमुळे, आले आहे. पण आम्ही त्या जगाच्या उघड्या खिडकीकडे पाठ वळवत आमच्या विकृत्यांचा उन्माद-उच्छाद मांडण्यासाठी त्याचा उपयोग करीत आहोत. याला प्रगल्भ भारत म्हणता येत नाही. किमान आम्ही ’विद्यार्थी’ भारत तरी बनु का? प्रश्नच आहे ...उत्तर आपल्यालाच शोधावे लागेल.
(जवळपास दीड तास मी बोललो. अजुनही खूप मुद्दे होते. पण लक्षात राहिलेले हे. सावली प्रतिष्ठानच्या पुढील उपक्रमांना शुभेच्छा!)

Friday, July 3, 2015

"शिक्षणाचे भारतीयीकरण : भ्रम आणि तथ्य"

काल अभाविपने मुंबई विद्यापीठात आयोजित केलेल्या "शिक्षणाचे भारतीयीकरण : भ्रम आणि तथ्य" या परिसंवादात मी मांडलेले ठळक मुद्दे:

१) मला या कार्यक्रमाला वक्त्यांत एक बहुजन असावा म्हणूण बोलावले गेल्याचे दिसते आहे. आपल्याकडची बहुजन-अभिजन ही वाटणी जातीय आहे, वास्तवाधारित नाही. संस्कृत्यांचे निर्माण सातत्याने करणारे लोक अभिजन तर संस्कृतीचे अनुगामी बहुजन असतात. पण येथे मतीमंद, निर्बुद्ध किंवा अतिसामान्य मानसे केवळ जातीमुळे अभिजन म्हणून मिरवतात.

२) संस्कृती निर्माणकर्ते घडवत असतात. संस्कृती त्यांचीच असते. भारताचे पुरातन संस्कृती त्या त्या काळच्या वडार, गवंडी, कुंभार, चर्मकार आदि लोकांनी घडवली आहे. आज आम्हाला आमचा गेल्या ४०-५० हजार वर्षांचा इतिहस समजतो तो त्यांच्याच रचनांतून. आपल्याकडे मात्र वैदिक सम्स्कृतीपासुनच भारताचा इतिहास सुरु होतो असा मानण्याचा प्रघात आहे. वैदिक संस्कृते ही अल्पसंख्यांकांची संस्कृती असून तिला भारतीय संस्कृती चा आरंभ मानता येत नाही. ही आयात झालेली धर्म-संस्कृती आहे, ती मुळचे भारतीय नाही. संस्कृत ही सर्व भषांची जननी हाही एक भ्रम आहे. प्राकृत भाषा संस्कृतची आई आहेत...कन्या नव्हेत.

३) पण स्मृती इराणी यांनी वेद, उपनिषदे व त्यातील गणित-विज्ञान वगैरेंवर भर देत शिक्षण पद्धतीत बदल घडवायचे सुतोवाच केले आहे. हे शिक्षणाचे भारतीयीकरण नव्हे तर वैदिकीकरण आहे आणि त्यामुळेच ते निंदेस व विरोधास पात्र आहे. भारतीयीकरण हा तुमचा भ्रम आहे, तथ्य आम्हाला माहित आहे.

४) भारतीयांचा विज्ञान व तत्वज्ञानात मोठा गोंधळ झाला आहे. तत्वज्ञानातील संकल्पनांबद्दल वैदिक-अवैदिक तत्ववेत्यांच्या प्रतिभेला सलाम जरी केला तरी त्या संकल्पना जोवर गणिताने व प्रयोगाने सिद्ध केल्या जात नाहीत तोवर त्यांना विज्ञान म्हणता येत नाही. वेदांतील विमानांनी अलीकडेच आपले जगभर हसू झाले. बिग ब्यंग थियरी पासून ते अणूबोंबचे शोध आमच्या पुर्वजांनी लावले होते हे दावे छाती फुगवून करणे निरर्थक व मुर्खपणाचे आहे. एक तर तुम्ही वर्तमानात तरी प्रयोग करून ते दावे सत्य आहेत हे सिद्ध करुन दाखवा किंवा त्यांना कविकल्पना म्हणून सोडून द्या. आर्यभटाने पृथ्वी परिवलन सिद्धांत पहिल्यांदा मांडला हे खरे आहे पण त्या सिद्धांताचा उपयोग आदि शंकराचार्य ते ज्ञानेश्वरांनी तत्वज्ञानातील दृष्टांतासाठी वापर केला. विज्ञानासाठी नाही. वैदिक गणित हे यज्ञवेद्या बांधण्यापुरते मर्यादित होते...विशाल वास्तुरचना करण्यासाठी शुल्बसुत्रांचा उपयोग नाही हे गणिती जाणतात. ज्याला आज वैदिक गणित म्हटले जाते ते तर विसाव्या शतकातील आहे.

५) भारत ही पुरातन काळापासून जागतिक संस्कृत्यांमधील एक पुल आहे. पोलिनिशियन, अरब, मध्य आशिया, अफगाणिस्तान, चीन-मंगोलिया इत्यादि संस्कृत्यांचे भारतावर व भारताचे त्यांच्यावर ऋण आहे. सर्वस्वी भारतीय असे शोधत बसणे वेडेपणाचे आहे. भारतातील पहिले चर्च सन ५२ म्धे बनले. ख्रिस्ती धर्मप्रचारक सातवाहनांच्या दरबारी आल्याचे पुरावे आहेत. पहिली मशीद भारतात सन ६२९ मद्ध्ये बनली. असंख्य नीतिकथा, मिथककथा यांचे आदानप्रदानही झाले. आपले शिक्षण विद्यार्थ्याला वैश्विक नागरिक करु इच्छि्त असेल तर या बाबींकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?

६) शिक्षण हे विद्यार्थ्याला विगतातील आभासी, खोट्या वैभवात रमवायचे माध्यम नाही. ते ज्ञानार्थी बनवत अनावर जिज्ञासेने शोध घेत नव्या ज्ञानाची विश्वे खुली करण्यासाठी आहे. आजचे शिक्षण हे विद्यार्थ्याला ज्ञानवंत नव्हे तर पोटवंत बनवते आणि म्हणून सध्याची शिक्षणपद्धती नाकारलीच पाहिजे व ज्ञानाधारित, विद्यार्थ्याचा नैसर्गिक कल, आवड ज्यात आहे त्यातच शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य देणारी शिक्षणव्यवस्था आपल्याला हवी आहे. पण भारतीयीकरण हे विद्यार्थ्याला संकुचित करत नेत विज्ञानातील झेप अधिकच मारत त्याला मध्ययुगात घेऊन जाईल. गतकाळाच्या वैभवाचे गुणगान म्हणजे भारतीयीकरण नव्हे. युरोपियनांनी बायबल फेकले व विज्ञान हाती घेतले म्हणून आज आपण आधुनिक विज्ञानाची फळे चाखत आहोत. वेद मात्र झुगारायची तुमची इच्छा नसेल तर ज्ञानवंतांचा देश या स्तरावर आम्ही जावू शकणार नाही. तसेही जगातील पहिल्या २०० विद्यापीठांत एकही भारतीय विद्यापीठ नाही हे वास्तव आहे.

७) भारतात मुळात शिक्षणव्यवस्थाच नव्हती, जी होती ती एका धर्मसमुहापुरती मर्यादित होती. म्हणजेच भारतीय म्हणावी अशी जर शिक्षणव्यवस्थाच अस्तित्वात नसेल तर आज आम्हाला भारतीयीकरण करणारी शिक्षणव्यवस्था म्हणजे काय हा प्रश्न पडणारच! शिक्षणाचे फक्त वैश्विकीकरण होऊ शकते कारण आज आपण इच्छा असो कि नसो वैश्विक नागरिक बनलो आहोत. तुमच्याशी संवाद साधतांना हा माईक...स्पीकर्स, आकोस्टिक्स...सारे पाश्चात्य आहे. भारतीय म्हणावे असे आधुनिक आमच्याकडे काही नाही. मग पाश्चात्यांनी शोध लावले त्यापेक्षा प्रबळ शोध आम्ही लावण्यासाठी आमची बुद्धीमत्ता का खर्चत नाही? उदा. बिट सिस्टमवर आजही कंप्युटर चालतात. क्वंटम मेक्यनिक्स वापरुन आम्ही नवीच प्रणाली का शोधू नये? माइक-स्पीकरशिवायही आवाज सर्वांपर्यंत पोहोचेल असे अगदी नवे तंत्रज्ञान आम्हाला का शोधता येवू नये? शिवकाळात म्हणे असे तंत्रज्ञान होते. होते कि...असेल....पण आज ते उपयुक्ततावादी पद्धतीने पुन्हा विकसीत करत त्याला जनोपयोगी का बनवता येत नाही? केवळ होते आमच्याकडे असल्या भुलथापा विज्ञानात चालत नाहीत. पुरावे द्यावे लागतात. ज्यांचे पुरावे आजही जितेजागते आहेत त्यांना मात्र समाजव्यवस्थेत तळागाळात दाबले गेले आहे. सन्मान ना भुतकाळात दिला ना आज देत आहेत. वांझ वर्चस्वतावाद हा विघातक आहे....अकारण निर्माण केला गेलेला हीनगंडही तेवढाच विनाशकारी सिद्ध झाला आहे.

८) भारतीयीकरण म्हणजे वैदिकीकरण नाही. तसे करायचा प्रयत्न होतो आणि जोवर होत राहील तोवर मी त्याला खंदा विरोध करणारा एक पाईक असेल. फेकाफेकीतून विकृती निर्माण होते...ज्ञान नव्हे याचे भान असले पाहिजे.

Wednesday, April 29, 2015

सांस्कृतीक वर्चस्वतावाद आणि आपण!



("Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation" या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मी केलेल्या भाषणाचा सारांश.)

प्रबोधनकाळाने जगाला अद्वितीय गोष्टी दिल्या. ज्ञान, विज्ञान व अभिव्यक्तीची क्षितीजे अमर्याद विस्तारली पण याच काळाला एक काळीकुट्त किनार आहे व ती म्हणजे आधेचा आर्य श्रेष्ठत्वता वाद आणि नंतरचा नव्या नांवाने आणला गेलेला पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणा-यंचा गट व त्यांची विस्थापने. युरोपियनांना सेमेटिक संस्कृती मुळे तोडायची होती. जर्मनांना जर्मनांच्य सांस्कृतीक एकीकरणासाठी "जर्मननेस" शोधायची गरज होती. उल्रीच हटनसारख्या विद्वानाने सोळाव्या शतकात रोमन चर्चला नाकारण्यासाठी "जर्मन मर्द तर रोमन बायकी" असे म्हणायला सुरुवात केली. अडाम-इव्हापासुन सारी मानवजात निर्माण झाली हे नाकारत प्रत्यक वंशाची स्वतंत्र उत्पत्ती असुन सेमेटिक व निग्रो हे कमास्सल आहेत हे मांडायला सुरुवात झाली. ज्यु द्वेषाची कारणे सेमिटिक द्वेषात आहेत.

डॆव्हीड ह्युमसारख्या अठराव्या शतकातील श्रेष्ठ तत्वज्ञाने गोरेतर सारेच हीण आहेत असे स्पष्ट प्रतिपादित केले. काहींची मजल तर काळे हे युरोपियन व एप्सच्या मिश्रणातुन निर्मण झालेले निर्बुद्ध आहेत अशी मांडणी करण्यापर्यंत मजल गाठली. यात सेमिटिक नाळ तोडण्याचे प्रयत्न सुरु होतेच. भारत हीच मुळभुमी मानण्याकडे या काळात कल होता. त्यासाठी व्होल्तेयरसारख्या तत्ववेत्त्याने तर भारतीय ब्रह्म आणि अब्राहमात साधर्म्य शोधले तर रेनान या फ्रेंच विद्वानाने येशु ख्रिस्त हा सेमिटिक नव्हे तर "आर्य" होता असे प्रतिपादित केले. थोडक्यात एनकेनप्रकारेन युरोपातील धर्म-संस्कृतीचे मुळ मुळात सेमिटिक नाही हे त्यांना सिद्ध करायचे होते व आर्य सिद्धांत त्यासाठी आणला गेला.

पण पुढे भारत ही मुळभुमी हे अमान्य करण्याची लाट आली. कारण ठरला आर्य संकल्पनेला सिद्धांताची जोड देणा-या म्यक्समुल्लर. त्याने कलकत्त्यातील रिक्षा ओढणरे आणि बंडातील शिपाई हे आर्य असुच शकत नाहीत असे म्हटले. युरोपियन विद्वानांनी लगेच आर्यांचे मुळस्थान युरेशियात शोधायची मोहिम सुरु केली. हिटलरनंतर आर्य हाच शब्द धोकेदायक वाटु लागल्याने आर्यभाषा गट किंवा पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणारे, त्यांचे मुलस्थान आणि त्यांची विस्थापने याकडे मांडणीची दिशा वळाली. भारतात टिळकांसारख्या विद्वानांनीही आर्यांना उत्तर ध्रुवाच्या निकट शोधले. आर्य सिद्धांतामुळे भारतातही मोठी उलथापालथ झाली. उत्तरेतील आर्य व दक्षीणेतील द्रविड अशी सरळ विभागणी होत त्याचे सांस्कृतीक व राजकीय पडसाद उमटले. प्रसंगी हिंसा तर विभाजनवादाचा डोंबही उसळला. आजही त्याचे निराकरण झाले नाही. याच सिद्धांतातुन मुलनिवासीवादही जन्माला आला.

मुळात आर्य नावाचा वंश पृथ्वीवर कधीही अस्तित्वात नव्हता. इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांत हा विसाव्या शतकातील सर्वात मोठा फ़्राड आहे. पण हे लक्षात न घेता भारतीय सांस्कृतीक/सामाजिक/राजकीय इतिहासाची मांडणीही त्याच आधारे झाली. थोडक्यात ती खोटी व दिशाभुल करणारी मांडणी झाली. आधी आक्रमक आर्य म्हणवत गौरवाने स्वत:कडे पाहणारे वैदिक लोक युरोपियनांच्या पुढे पाऊल टाकत वैदिक आर्य भारतातुनच पश्चिमेकडे गेले व जगात संस्कृती पसरवली असे सिद्धांत मांडु लागले. आधीचा धार्मिक श्रेष्ठत्ववाद होताच...त्याला युरोपियन सिद्धांतनाने त्यांना बळ दिले. बहुजनीय अवैदिक समाजघटकांना हीण लेखले जात होते, आता या सिद्धांतामुळे सांस्कृतिक अर्थाने श्रेष्टत्व माजवण्याचा हा प्रयत्न होता. थोडक्यात अन्यांचे काहीही सांस्कृतिक अस्त्तित्व नाही हेच या वैदिक धर्मियांना सांगायचे होते. घग्गर नदीचे सरस्वती नामकरण करत सिंधु-घग्गर संस्कृतीचे निर्माते वैदिकच असेही सांगितले जाऊ लागले. युरोपियनांचा वर्चस्वतावाद वैदिकांनीही त्यांच्याच पद्धतीने खोट्याचा आधार घेत जपला आहे. गेल्या वर्षीपर्यंत घग्गरला घग्गरच म्हणनारे पुरातत्व खाते आता आपल्या डिसेंबर १४ मधील अहवालात घग्गर नांव वगळत सरस्वती हे नांव देवु लागले आहेत. ही सांस्कृतीक अपहरणांची पुनरावृत्ती होते आहे.

मुळात वैदिक धर्म येथला नाही. तो येथे आला धर्मप्रचाराने. मुळ वेद रचनाकारांशी येथील वैदिकांचा कसलाही आनुवांशिकी संबंध नाही. ते धर्मांतरील लोक आहेत. घग्गर नदी ही पुरातत्वीय, भुशास्त्रीय आणि खुद्द ऋग्वेदातील वर्ण्णने व नंतरच्या मिथ्सच्या आधाराने सरस्वती नाही हे सिद्ध होत असले तरी त्यासाठी पुरावे वाकवण्याचे, तुडवण्याचे व खोटे सांगायची स्पर्धा सुरु आहे.

युरोपियनांचा वर्चस्वतावाद आजही संपलेला नाही. आजही आखाती राष्ट्रांत जे चालु आहे त्यामागे सेमिटिकविरोध हे मुळ आहे. भारतातील वैदिक मुस्लिमांचा द्वेष करतात यामागील कारणेही युरोपियनांच्या सेमिटिक द्वेषात शोधावी लागतील. वर्चस्वतावाद हा गैर आहे. कोणतीही संस्कृती व भाषा पृथक व पुर्ण स्वतंत्र नसते. आजच्या सरेव संस्कृत्या या पुरातन मानवी समाजांचे एकत्रीत सुकृत आहे जे प्रदेशनिहाय वैशिष्ट्यंसह अभिव्यक्त झालेले आहे. पाळेमुळे शोधावी वाटणे हा एक मानसिक भाग झाला पण खोट्या गोष्टींत पाळेमुळे सापडणार नाहीत. भारतात आज जेही काही सांस्कृतीक संघर्ष आहेत तिचे मुळे श्रेष्ठतावाद व वर्चस्वतावादात आहेत. एखाद्या समाजघटकात जाणीवपुर्वक   सांस्कृतीक वारसे नाकारत हीणगंड निर्माण करणे यासारखे नैतीक अध:पतन कोणतेही असु शकणार नाही. एकमय समाजाची स्वप्ने पुर्ण होऊ शकणार नाहीत. त्या एकमयतेच्या दिशेने कसे जायचे हे या वर्चस्वतावादी वैदिक भुमिकेच्या सहास्तित्वात अवघड दिसत आहे. तरीही आपण प्रयत्न् केले पाहिजेत!

माझे हे पुस्तक म्हणजे सिंधु-घग्गर संस्कृती, वैरिक व अवेस्तन धर्म, इंडो-युरोपियनंची विस्थापनांचे मिथक आणि एकुणातील जागतीक संस्कृत्यांचे मला सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यांवर आधारीत वास्तव मांडते. हे अंतिम नाही याची मला जाणीव आहे. पण वर्चस्वतावादाविरुद्धचा लढा आजची प्राथमिकता आहे!

Sunday, January 4, 2015

धर्म:तारक कि मारक?


१) धर्माबाबत भारतात गेली सात महिने ज्या पद्धतीने वादळी विधाने केली जात आहेत ती पाहता या देशात धर्माखेरीज अन्य प्रश्न शिल्लक नसावेत असे वाटू लागते. धर्म म्हणजे काय हे माहित नसतांना धर्माची चर्चा व्हावी हे त्याहुनही विशेष.

२) पुरातन काळी माणुस टोळ्यांनी राही. अन्न व शिकारीच्या शोधात तो भटकत असे. निसर्गातील अनाकलनीय घडामोडी, असुरक्षा व भय या जाणीवांतून त्याने सुष्ट आणि दुष्ट शक्तींची आपापल्या कल्पनांप्रमाणे विभागणी केली. काही टोळ्यांसाठी जे दुष्ट होते ते काही टोळ्यांसाठी सृष्ट होते. उदा. झरथुष्ट्राच्या धर्मात असूर पुजनीय तर वैदिकांच्या धर्मात असूर अपुजनीय-दुष्ट. देवतांचा व दानवांचा जन्म त्या कल्पनांतुन झाला. वर्चस्वाचे लढे पुरातन आहेत, त्यातुन देवता व नैतिक संकल्पना पसरवण्याचे/लादण्याचे प्रयत्न झाले आहेत. त्यातुन हिंसाचारही घडला आहे.

३) जगात पुरातन काळी अनेक बलाढ्य संस्कृत्या अस्तित्वात आल्या. अस्सीरियन/इजिप्शियन या महत्वाच्या संस्कृत्या. त्यांचेही देव होते, धर्म होते. पण या संस्कृत्या नष्ट झाल्या. त्यांचे देव त्या संस्कृत्या वाचवु शकल्या नाहीत. ्म्हणजे देव हा सर्वशक्तीमान असतो हे सत्य नाही. ती सदाचरणासाठी एक नैतिक बळ म्हणून चांगली संकल्पना असली तरी तिला प्रत्यक्ष असा कसलाही आधार नाही.

४) धर्मामुळे जगभर जेवढी हिंसा झाली आहे तेवढी राजकीय युद्धांत झालेली नाही. किंबहुना धर्म हा बहुतेक युद्धांत कळीचा मुद्दा होता व आहे. ज्यु विरुद्ध इजिप्शियन, नंतर ज्यु विरुद्ध ख्रिस्ती आणि नंतर इस्लामच्या जन्मानंतर ज्यु-ख्रिस्ती-इस्लाम अशा वर्चस्वाच्या तिरंगी रक्तरंजित सामन्याची सुरुवात झाली. क्रुसेडस्ने त्यात भरच पडली. आता मुस्लिम विरुद्ध मुस्लिम अशीही भर पडली आहे. हे धर्म कृषीसंस्कृतीतुन निर्माण झालेले नाहीत, स्वाभाविकच टोळी (कबिला) जीवनाचे असणारे वेगळेच आक्रमक तत्वज्ञान त्यात आहे. वैदिक धर्मही टोळीजीवनातुन निर्माण झाल्याने त्यातही युद्धखोरपणा, आक्रमकता याचे तत्वज्ञान आहे. पण अहिंसक तत्वज्ञानाचे गायन करणारे धर्मही हिंसक/दहशतवादी बनु शकतात हे म्यानमारमधील घटनांनी सिद्ध केलेले आहे.

५) भारतीय धर्म हे कृषी संस्कृतीचे, स्थिर संस्कृतीचे आहेत. सुफलताविधी, सृजन हा त्यामुळेच येथील धर्माचा भाग आहे. सारे सणही कृषी संस्कृतीशी निगडित आहेत ते यामुळेच. थोडक्यात धर्म म्हणजे त्या त्या समाजाच्या मानसिकतेचे प्रतीक व त्याला बळ देणारे तत्वज्ञान. प्रत्येक धर्म आपला धर्म श्रेष्ठ आणि पुरातन हे सांगतो. या श्रेष्ठतावादाच्या संघर्षात "माणुस" मात्र दुर्लक्षित राहिला आहे. धर्म हेच अधर्म बनत आहेत.

६) माणसाला धर्माने काहीही दिलेले नाही. जे दिले आहे ते विज्ञानाने व विकासवादाने दिले आहे. तेथे मग न्युटन ख्रिस्ती होता, आईन्स्टाईन ज्यु होता, मध्ययुगातील शेकडो ते अलीकडचे फारुक-उल-अबाझ असे अनेक शास्त्रज्ञ मुस्लिम होते. ते विज्ञान धर्मांचे नव्हे तर मानवतेचे होते. मग धर्म राहिले कोठे? धर्मांनी माणसाला जे दिले नाही ते विज्ञानाने दिले व आज त्याचाच उपयोग करत धर्मांध लोक आपली वर्चस्वतावादी तत्वज्ञानांना, मिथ्या-विज्ञानांना पसरवण्यासाठी वापरत आहेत. भारतातील वैदिक धर्मीय हिंदू नांवाखाली हा उद्योग अहर्निशपणे करत आले आहेत. आता तर त्यात दिवसेंदिवस उन्मादी भर पडत आहे. त्यामुळे बहुजनांत न्युनगंड वाढवला जातो. आपल्याच धर्म/देवता याबाबत संभ्रम निर्माण केला जातो आणि धर्माच्या दास्यातच रहावे असाही नकळत संदेश दिला जातो. परमेश्वर नाही पण ती एक संकल्पना आहे. तिच्यावर प्रेम अवश्य करा, पण त्यासाठी हे बुवा-बापू ते मंदिरांची गरज काय याचाही विचार करा.आताच तुम्ही सरस्वतीपुजन केले. मुळात ही तुमची देवता नाही. विद्येचे देवता असलाच तर गणेश आहे. आणि खरे दैवत मानायचे तर बहुजनांसाठी ते सावित्रीमाई आणि म. फुले आहेत. प्रतीके सारीच चांगली असली तरी वर्चस्वतावादासाठी निर्माण केली गेलेली प्रतीके नाकारायला शिकले पाहिजे.

७) धर्म तारक आहे कि मारक? धर्म हा मुळात माणसाने नीतिमान होण्यासाठी निर्माण केला गेलेला एक मार्ग आहे. जोवर माणुसकीचा कळवळा आहे तोवर धर्म आहे, मग त्याला काहीही नांव द्या. तुकोबारायांनी "जे का रंजले-गांजले-त्याशी म्हणे जो आपुले..." म्हणून ठेवलय तेच ख-या धर्मांचे सार आहे. याप्रमाणे जगत राहिलो तर धर्म नक्कीच तारक ठरेल. आणि याविरुद्ध गेलात तर मग मुळात तेथे धर्मच राहत नसल्याने धर्म मारक ठरेल. शेवटी धरमातील लोक कसे वागतात-विचार करतात त्यावर धर्म चांगला कि वाईट हे ठरते. तुम्ही स्वत: कोण आहात हे शोधा...मग धर्म उपयुक्त कि अनुपयुक्त याचे उत्तर तुम्हाला मिळेल.

(काल माळेवाडी, श्रीरामपुर येथे "धर्म:तारक कि मारक" या व्याख्यानातील महत्वाचे मुद्दे.)


Tuesday, September 9, 2014

ओबीसींच्या हितासाठी...






१. इतिहास केवळ सत्ताधारी आणि धर्माधिशांचा होता या भ्रमातून ओबीसींनी बाहेर यायला हवे. ओबीसी म्हनजे "निर्माणकर्ता समाज" पुरातन काळापासून नवनवे जीवनोपयोगी शोध ते त्यांचे व्यवसाय चालवत या निर्माणकर्त्यांनी संस्कृती घडवली व तिला आकारही दिला. जगभर निर्मित वस्तुंचा व्यापार झाल्याने सांस्कृतिक देवाण-घेवाणी होत जेवढे जग जवळ आले तेवढे राजा-महाराजांच्या आक्रमणे व युद्धांमुळे जवळ आलेले नाही. त्यामुळे संस्कृतीत आपण दुय्यम आहोत आणि आपल्याला इतिहास नाही या निर्माण केल्या गेलेल्या भ्रमातून बाहेर पडा. आज जगाचा जोही काही पुरातन इतिहास उत्खननांतून सापडतो तो आम्हाला तेथील घरे, खापरे, अलंकार, जीवनोपयोगी अन्य साधने इ. साधनांवरुन अंदाजिता येतो...आणि त्यांची निर्मिती ही निर्माणकर्त्यांची आहे. निर्माणकर्त्यांनाच खरा वास्तवदर्शी इतिहास आहे, इतरांचा केवळ नांवांवर संपतो हे लक्षात घेतले पाहिजे.

२. ओबीसी हक्क परिषदा भरतात. पण हक्क म्हणजे नेमके काय हे कोणाला माहित नसते. हक्कांची राबवणुक करून घ्यायला नेमके कोणते मार्ग चोखाळावेत याचेही ज्ञान नसते. जातीय नेत्यांची झुडपे तेवढी त्यातून वाढतात...हक्क मिळत नाहीत. हक्क हक्क करून लोकांना हक्कच समजत नाहीत मग जबाबदा-यांचा संबंध तरी कसा येणार?

३. अर्थसत्ता, ज्ञानसत्ता आणि राजसत्ता हा निर्माणकर्त्यांचा मुलमंत्र असला पाहिजे. निर्माणकर्ते नेहमीच अर्थसत्तेचे मुख्य आधारस्तंभ राहिले. ज्ञानाची जोपासना केल्याने उत्पादन पद्धतीत विकास होत राहिला. पण दहाव्या शतकानंतर बदललेल्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीमुळे वातावरण सकारात्मक राहिले नाही. गेल्या दोन-अडिचशे वर्षात हतबलता आणि न्युनगंडाचे प्रमाण वाढत गेले. शिकले पण ज्ञान आले नाही. आधुनिक तंत्रज्ञानांचा आपल्या पारंपारिक व्यवसायांत कसा उपयोग करावा ते नीट समजले नाही.

वाचनाचे प्रमाण याच समाजगटात सर्वाधिक कमी आहे. एखाद्या नोकरीत "चिकटने" आणि त्यातच इतिकर्तव्यता मानत झापडबंद आयुष्य घालवणे यात ओबीसी आत्ममग्न आहे. त्याला समाजाच्या एकुणातील परिस्थितीचे भान नसते. असलेच तर फक्त स्वजातीचे असते. तेही जातीचा नेता म्हणवून मिरवण्याइतपत. त्यामुळे ओबीसी-बजेट सारख्या ख-या मुद्द्याकडे तो ढुंकनही पाहत नाही. पारंपारिक व्यवसाय करणा-यांना विना-तारण कर्ज मिळालेच पाहिजे असे शासकीय धोरण असुनही ते दिले जात नाही. यासाठी ब्यंकांवर कोणाचा मोर्चा निघाल्याचे ऐकीवात नाही. आरक्षण सर्व समाजाचे भले करू शकत नाही. आरक्षणाची तेवढी व्याप्तीही नाही. शासकीय नोक-या घटताहेत याचे भान नाही. स्वबळावर उभे ठाकणे व गरज पडली तर आणि तरच आरक्षण वापरणे यातच ओबीसींचे भले आहे. परंपरागत व्यवसायांबरोबरच कोकणातील निर्मित फळे-मासे यांवर प्रक्रियाउद्योग काढण्यास प्रचंड वाव आहे. पण तिकडे कोणाचे लक्ष नाही.

४. जाती या व्यवसायामुळे पडलेल्या आहेत. त्या कोणी निर्माण केल्या नाहीत. वैदिकांचा त्याशी काडीइतकाही संबंध नाही. जाती बंदिस्त झाल्या त्याची कारणे वेगळी आणि स्वतंत्र आहे. गुरव हे पुरातन काळापासून हिंदुंचे खरे नैसर्गिक पुरोहित आहेत. पण त्यांनीही धर्माभ्यासाची कास सोडल्याने वैधर्मी लोक त्यांनाच खरा-खोटा धर्म सांगत असतील तर गुरवांनीही आता बदलायला पाहिजे. वैदिक जोखडे झिडकारत ख-या समतेचे तत्वज्ञान अंगिकारले पाहिजे. पण ओबीसी नुसत्या आपल्यातीलच जातींना उच्च-नीच मानून थांबत नाहेवे तर आपल्यातीलच पोटजातींत विश्झमता पाळतो. हे वैदिक गुलामीचे लक्षण आहे. ही मानसिक गुलामी सोडण्याची गरज आहे.

५. कोकणचा क्यलिफोर्निया करण्याची स्वप्ने दाखवली जातात. सरकार अपेशी आहे तेवढेच कोकणचे रहिवासीही अपेशी आहेत. घाणेरडे बीच, साध्या कोकनी खाद्य स्पेश्यलिटीजचा  अभाव, रहायच्या आणे पर्यटकसेवांतील गैरसोयी यामुळे जगभरचे पर्यटक कसे इकडे येणार? कोकणचा क्यलिफोर्निया सोडा, केरळही करता आलेला नाही, याला शासनाबरोबरच आम्हीही जबाबदार आहोत.

६. ज्या घटकांना नवे आरक्षण हवे वा प्रवर्गबदल हवेत त्या घटकांनी केवळ आंदोलने करून ते मिळणार नाही. आंदोलने हा आपली मागणी समोर आनण्याचा एक मार्ग आहे. पण जातीय नेत्यांना आरक्षणांत खरा रस नसतो हे त्या त्या जातीयांनाही समजत नाही. त्यामुळे आपली मागणी नेमकी कोणत्या फोरमसमोर आणि कशी गेली पाहिजे या दिशेने नेतेही प्रयत्न करत नाहीत आणि अज्ञानामुळे कार्यकर्तेही नेत्यांना ते विचारत नाहीत. नेते फक्त प्रसिद्धीत खुष असतात. पण नवीन आरक्षणाची प्रक्रिया ही सखोल माहिती, पुरावे आणि युक्तीवादाच्या आधारे होते याचे भान ठेवले गेले पाहिजे तरच मागण्या मान्य होण्याच्या थोड्यातरी शक्यता आहेत.

(काल चिपळून येथील ओबीसी हक्क परिषदेत मी मांडलेले हे काही मुद्दे. या परिषदेचे आयोजन श्री. माधव गवळी व विजय बोडेकर यांनी केले होते.)

Tuesday, August 26, 2014

खरे मराठी साहित्य...




"खरे मराठी साहित्य अजून यायचेच असून आजवरचे मराठी साहित्य म्हणजे "जेमतेम साहित्य" आहे. साहित्य म्हणजे समाजमनाचा, त्याच्या वर्तमानाचा, भुतकालीन सावटाचा आणि त्यातून निर्माण होणा-या आशा-आकांक्षांचा आरसा असेल तर अपवादात्मग भाग सोडला तर मराठीत सार्वकालिक म्हणता येईल असे साहित्य नाही.

"मराठी साहित्यिक हा अनुभवांच्या स्वनिर्मित मर्यादांच्या चौकटीत अडकवून घेत, ना स्वत:साठी ना वाचकांसाठी लिहित जात प्रसिद्धी आणि पारितोषिके याच त्याच्या जर साहित्यप्रेरणा असतील तर मराठीचे साहित्य हे खपत नाही, वाचले जात नाही या तक्रारी निरर्थक होऊन जातात.

"महाराष्ट्र हा प्राचीन काळापासून ते आजतागायत धार्मिक, वैचारिक, सामाजीक चळवळींनी गजबजलेला आहे. त्याचे प्रतिबिंब/विश्लेषन अथवा त्या त्या चळवळी व त्या त्या काळचे सामाजिक मानसशास्त्र कोणत्याही कादंबरीत येत नाही. जे चित्रण आहे ते वरकरणी व वाचकशरण असेच आहे. परंपरावाद्यांनी पुराणकथांतील व इतिहासातील पात्रांचे पुनरुज्जीवनवादी भांडवल केले तर विद्रोहवाद्यांनी त्या पात्रांचे निखळ द्वेषपूर्ण चित्रण केले. यात पात्रे व समाज कोठे होता? अशाने ज्याला आपण "निखळ साहित्य" म्हणू ते कोठे राहते?

"आणि यातून समाजजीवनाला सुदृढ विचारी बनवायची परंपरा निर्माण होते काय? याचे उत्तर आहे आम्ही साहित्यातून भरीव असे काहीही देवू शकलो नाही. त्यामुळे अलीकडच्या सर्वच सामाजिक चळवळीही साहित्यबंधापासून पुरत्या अलिप्त आहेत. त्यांना तत्वज्ञान देतील असे बळ साहित्यिकांत नाही. ते नाही तर नाही, त्यांचे यथास्थित चित्रणही साहित्यात होत नाही.

"जातीअंत हे आदर्श मानले तर चळवळीच जातींत विखुरल्या आहेत. छोटे-मोठे नेते जातींतच आपले अस्तित्व शोधत आहेत. साहित्यिकही त्याला अपवाद नाहीत. आपल्याच जातीच्या चौकडीत साहित्यिक म्हनून मिरवण्यात जर साहित्यिक धन्यता मानत असतील व इतरांकडे उपहासाने पाहत असतील तर साहित्य आणि साहित्यिकाला अर्थ काय राहिला? "दलित" हा शब्द बाबासाहेबांच्या "Broken Man" सिद्धांताशी जवळ जात दलित या संज्ञेत सर्व पुर्वास्पृष्य, आदिवासी, भटके-विमूक्त व श्रमिक-मजूरही आहेत अशी ती व्यापक संज्ञा होती. परंतू ती बरोबर एकाच जातीच्या मर्यादेत साहित्य व तत्वज्ञान म्हणूनही विसावली आहे. त्यामुळे दलित चळवळही भरकटली आहे. नव्या काळाला सुसंगत असे तत्वज्ञान व तसे साहित्य निर्माण करण्यात घोर अपयश आले आहे.



"सध्या दिखावू चळवळ्यांपेक्षा समाजाच्या मनातच जी सूप्त चळवळ सतत चालू असते ती लिहिली जात नाही, रस्त्यावर सहसा येत नाही, पण तीच खरे बदल घडवते. त्या चळवळीला अजून वैचारिक अधिष्ठाण साहित्यिकांना देता येत नाही हे त्यांचे दुर्दैव!"

"जागतिकीकरणामुळे नातेसंबंधांची फेरआखणी होत आहे. नवे तानतणाव निर्माण होत आहेत. निराधार व वृद्धांसाठी आश्रम वाढत आहेत. पती-पत्नी, भाऊ-बहीण, पिता-माता-पूत्र या नात्यांचे संदर्भ बदलत चालले आहेत. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय संदर्भही झपाट्याने बदलत आहेत. पण आमचा लेखक कोठेतरी हरवला आहे. आम्हाला लेखकाचाच शोध आहे."


( भांडुप (पूर्व) येथे (24/8/14) झालेल्या साहित्य संगीतीतील "आजचे समाज वास्तव-साहित्य आणि चळवळ" या परिसंवादात बोलतांना मी. सोबत माझे मित्र, सा. विवेकचे संपादक रवींद्र गोळे..या संगीतीचे आयोजक. नेटके आयोजन, प्रगल्भ श्रोते यामुळे सहभाग घेतल्याचे खरेच समाधान मिळाले.)

Wednesday, March 19, 2014

आदिवासी


Image result for nomadic tribes india dhangar

"आजच्या सर्वांचेच पुर्वज आदिम काळातील 

आदिवासी आहेत. शेतीच्या शोधाने माणूस स्थिर 

झाला आणि नागर संस्कृती आकाराला येवू लागली. 

नागर संस्कृतीत सामील होनारे बव्हंशी लोक हे 
इहवादी, भोगवादी आणि चंगळवादीही होते. परंतु याच समाजातील एक घटक असाही होता जो अरण्याशी, साध्या जगण्याशी असलेली नाळ तोडू इच्छित नव्हता. त्याने गहन अरण्यांतच निसर्गासोबत जगणे-राहणे व तल्लीन होणे पसंत केले. काही  पशुपालनाचे आदिम पेशे सांभाळत रानोमाळ भटकंती करत राहिले. धनगरादि काही पुरादिम जमातींना शासन एकीकडे भटके आदिवासी मानते, पण त्यांना आदिवासींच्या सोयी-सवलतींपासून वंचित ठेवते ही विसंगती आहे. ज्यांना दिल्यात त्याही त्यांच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीत. एकंदरीत अनास्थाच आहे.  

"नागरी संस्कृती ही मुळात कृत्रीमतेच्या पायावर 
उभी आहे. तिचे साहित्य-कलाविश्व हे नजाकतीने भरलेले असेल पण त्यात आदिवासींच्या कलांचा जोम आणि जोश नाही. नागर संस्कृतीचे जीवनविचार आणि आदिवासी संस्कृतीचे जीवनविचार यात फार अंतर राहणे स्वाभाविकच होते. परंतू अलीकडे आदिवासी संस्कृतीचेही नागरीकरण होत आहे. एकीकडे जगभर एक मतप्रवाह आहे कि आदिवासींच्या जीवनपद्धतीत आधुनिक नागरी संस्कृतीने हस्तक्षेप करु नये. आणि दुसरा मतप्रवाह आहे कि आधुनिक ज्ञान-विज्ञान आणि राजव्यवस्था यात त्यांना सहभागी करून घेतलेच पाहिजे. आपल्या देशत यावर फारसा मुलगामी विचार झालेला नाही.

"दुसरे असे कि लोकसंख्या विस्फोटामुळे अरण्ये 
आकुंचित होत गेलेली आहेत. आदिवासींच्या नैसर्गिक अधिवासांना आकुंचित केले गेले आहे. खाणी, धरणे, तदनुषंगिक प्रकल्प यामुळे त्यांच्या जीवनकेंद्रांवरच नागरी संस्कृतीने घाला घातला आहे. आधुनिक वनकायद्यांमुळे अरण्य हेच हजारो वर्ष ज्यांच्या जीवनाचा आधार त्या आदिवासींचे मुलभूत अधिकारच नाकारले गेलेले आहेत. एकीकडे प्रशासन व दुसरीकडे नक्षलवादी या कचाट्यात आदिवासी सापडला आहे.

"आदिवासींबाबतच्या नागर समाजाच्या धारणा 

पोकळ व सिनेमाधारित असल्याने त्या अत्यंत खोट्या आहेत. मधुकर रामटेकेंचे "आम्ही माडिया" हे कथन वाचतांना ते प्रकर्षाने जाणवते. आदिवासी साहित्याचा पहिला उद्गार म्हणून वाल्मिकीकडे पाहिले जाते. आता असंख्य आदिवासी प्रतिभाशाली लोक लिहिताहेत...पण मुख्य प्रवाहात त्याची निरलस दखल घेतली जात नाही. खरे आदिवासी जीवन, त्यांचे जीवनविषयक विचार आम्हा नागरजनांना समजून घ्यावे वाटत नाहीत. डा. तुकाराम रोंगटे यांनी आदिवासी साहित्याचा चिंतनशील अभ्यास करून आम्हा नागरजनांसमोर एक जजळीत वास्तव मांडले आहे. त्याचे आम्ही स्वागत करायला हवे!"

- "आदिवासी साहित्य: चिंतन आणि चिकित्सा" या 


डा. तुकाराम रोंगटे लिखित ग्रंथाच्या प्रकाशन 

समारंभात मी मांडलेले काही मुद्दे. हा कार्यक्रम 

विद्यापीठात, नामदेव सभागृहात झाला. 

अध्यक्षस्थाने डा. नागनाथ कोतापल्ले होते. डा. 

श्रीपाल सबनिस, डा. अविनाश आवलगांवकर, डा. 

संजय लोहकरे यांचीही भाषणे या प्रसंगी झाली. 

Friday, December 27, 2013

हीच आपल्या लेखनाची प्रेरणा आहे काय?

मित्रहो,

संस्कृतीचा आदिम वारसा मिरवणा-या गोमंतभूमीत भरणारे हे शेकोटी साहित्य संमेलन आधुनिक काळातील साहित्य-संस्कृतीच्या प्रकाशाचा, उर्जेचा आणि चेतनेचा उत्सव आहे. शेकोटी या शब्दातच मानवाच्या पुरातन गाथेचा समग्र इतिहास सामावला आहे. अग्नीचा शोध माणसाला लागला ही आदिमानवाच्या जीवनात क्रांती घडवणारी घटना होती. मानवी टोळ्यांनी अग्नी सतत प्रज्वलीत रहावा यातून पहिली शेकोटी पेटवली त्याला आता कदाचित लाखावर वर्ष झाली असतील. मानवी टोळ्यांनी स्थलांतर जरी केले तरी एखादे तरी जळते लाकूड दुस-या स्थानी नेले जायचे. तेथे पुन्हा शेकोटी पेटायची. या शेकोटीचा भवताली बसून टोळीमानव आपल्या आदिम भाषेत गूज करायचा. शेकोटीभोवतीच पुरातन काव्ये स्फुरली. भाषेचा विकास शेकोटीभोवतीच होत गेला. शेकोटीनेच अनेक धर्मांना जन्म घातला. वैदिक धर्मियांचे यज्ञ हे शेकोटीचेच उत्क्रांत रुप. अग्नीत हविद्रव्ये देत ते त्यांच्या अमूर्त देवतांना आवाहने करायचे. पारशी धर्मही पुर्णतया अग्नीभोवतीच फिरणारा. मुर्तीपूजक (पेगन) शैव, ग्रीक, इजिप्शियन धर्मांत मंदिरांत होम पेटायचे. अग्नी सर्वात पवित्र मानला गेला कारण त्याने नुसतीच माणसाची सोय केली नाही तर त्याच्या सांस्कृतीक जीवनात क्रांती घडवून आणली. 

गोमंतभुमीत मानवाच्या संस्कृतीचे किमान चाळीस हजार वर्षांपुर्वीचे पुरावे आहेत. ते पुरावे म्हणजे कुशावती नदीच्या काठी पुरामानवाने खडकांत कोरलेली चित्रे. ही चित्रे जशी त्याच्या कौशल्याची साक्ष आहेत तशीच त्याच्या गूढ धर्मकल्पना आणि जीवनसौंदर्याच्या जाणीवेचे प्रगल्भ दर्शन घडवनारी आहेत. त्यात आदिमातेचे जसे चित्रण आहे तसेच नाचणारी युवती व पशु-पक्षांचेही चित्रण आहे. हे चित्रण करणारा मानव, आपला पुर्वज कोणत्या भाषेत बोलत होता हे आपल्याला माहित नाही...त्या भाषेत त्याने कोणती कवने रचली हे आपल्याला माहित नाही...पण त्या गीत-संगीत तालावर ते नाचत होते...आणि ते नृत्य शिकार करुन आलेल्याला थकव्याला मिटवण्यासाठी, जीवन सौंदर्य खुलवण्यासाठी शेकोटीभोवतीच नाचत होते हे आपण निश्चयाने म्हणु शकतो. आज आपण येथे जी शेकोटी पेटवली आहे आणि त्याभोवती हा साहित्य-संस्कृतीचा जागर सुरू झाला आहे तो मला थेट त्या काळात नेतोय.

संस्कृतीचा प्रवाह अव्याहतपणे जीवंत ठेवण्यासाठीचा हा साहित्य संमेलनाचा उपक्रम मला अभिनंदनीय, अनुकरणीय वाटतो तो त्यासाठीच!

वर्तमानात येतांना मात्र आपल्याला अधिक गंभीर व्हायला लागते. आपण सारे साहित्यिक आणि साहित्यप्रेमी आहात. किंबहुना आपण आहात म्हणून साहित्य संस्कृती जीवंत आहे. पण जीवंत असने म्हणजे नेमके काय? आपण कसे जीवंत आहोत? रसरशितपणे जीवंत आहोत कि गलितगात्र जीवंत आहोत? आपली साहित्य संस्कृती कोणत्या प्रकारे जीवंत आहे याचे नीट अवगाहन केल्याखेरीज आपल्याला योग्य निदान करता येणार नाही. आपण त्यावर जर गंभीरपणे चर्चा केली नाही तर साहित्य संस्कृतीचे भवितव्यही आपल्याना नीट ठरवता येणार नाही. या शेकोटीच्या साक्षीने आपण त्यावर चर्चा करुयात.

मराठी साहित्याला पुरातन इतिहास आहे. हालाची गाथा सप्तशती आज उपलब्ध असलेला सर्वात जुना पण कालजेयी पुरावा आहे. गाथा सप्तशतीत इसवी सनाच्या पहिल्या शतकातील मानवी जीवनाचे जे मनमोकळे आणि मनोरम चित्रण झाले आहे तसे दुर्दैवाने नंतरच्या साहित्यातून गायब झालेले दिसते. गाथा सप्तशतीत आठव्या शतकापर्यंत भर पडत राहिली हे येथे लक्षात घेतले पाहिजे. गाथा सप्तशतीतील एक गाथा येथे सांगण्याचा मोह आवरत नाही कारण आपले संचित काय आहे हे समजायला त्यामुळे उपयोग होईल.

"तुह मुहसारिच्छं ण लहै त्ति संपुण्णमंण्डलो विहिणा
आणामां व्व घडइउं वि खण्डिज्जइ मिअंको..."

अर्थ असा आहे...पौर्णिमेचा पुर्ण चंद्रही तुझ्या रुपाशी स्पर्धा करु शकत नाही म्हणून चिडलेला विधाता नवीन चंद्र घडवावा यासाठी या चंद्राचे कलाकलांनी तुकडे करतो आहे.

गाथा सप्तशतीतील सर्वच गाथा नितांत रमणीय आहेत. आपल्या भाषेचे प्राचीन रुप त्यातून दिसते. ही माहाराष्ट्री प्राकृत चक्रधरांच्या...नंतर ज्ञानदेवांचा मराठीत कशी बदलत गेली यावरून मराठीचा प्रवाहीपणा दिसतो आणि बदलत्या काळाबरोबर बदलणारी भाषा कशी चिरकाळ टिकते हेही यातून स्पष्ट होते. मध्ययुगातील भाषा ते आजची भाषाही परिवर्तन स्वीकारत आली आहे. या भाषेने जसे इतर हजारो शब्द उधार घेतले तसेच हजारो शब्द इतर भाषांना दिलेही. आपली माय मराठी प्रगल्भ झाली ती यामुळेच.

पण भाषा वैभवशाली असली तरी आम्ही आधुनिक काळात तिच्यावर साज चढवण्यात कितपत यशस्वी ठरत आहोत हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मुद्दा आहे. मराठी साहित्यावर परपूष्ट असल्याचा आरोप वारंवार होत असतो. म्हणजे मूळ म्हणता येतील अशा कृती मराठीत अत्यल्प आहेत. र. वा. दिघेंसारखे, उद्धव शेळकेंसारखे काही ओरिजिनल साहित्यिक आपल्याकडे दुर्लक्षीत राहिले तर जे उचलेगिरी करत लिहित राहिले ते मात्र "सारस्वत" म्हणून मिरवत राहिले असे आपल्याला दिसते. आपले साहित्य आपल्या मातीचे हवे, आपल्या शैलीचे हवे, आपल्या आशा-आकांक्षा-जीवनस्वप्ने-जीवनशोध त्यातून प्रखरपणे आणि प्रगल्भपणे व्यक्त करणारे हवे ही अपेक्षा साहित्याकडून असायला हरकत नाही. पण गत शतकाने अपवाद वगळता आपली निराशाच केली आहे हे जर तटस्थपणे पाहिले तर आपल्या लक्षात येईल. 

साहित्य हे मानवी संस्कृतीचा उद्गार असते. समाजाच्या रचनेचा, एकुणातील व्यक्तिगत तसेच समष्टीच्या अंतर्गत कलह-विजय-अपुर्णता-पुर्णत्वाची ओढ इत्यादिंचा एकुणातील जो सारगर्भ याला साहित्यातून जीवंत केले जात असते. त्यासाठी साहित्यिकाला...कवीला प्रत्यक्ष जीवनाशी भिडावे लागते. अनुभवसंपृक्त व्हावे लागते. वैश्विक दृष्टीकोनातून समग्र जीवनाकडे पहावे लागते. मग एका सामान्य शेतक-याची साधी गोष्टही वैश्विक बनू शकते. उध्वस्त वृक्षावरील एखादी दहा ओळींची कविताही महाकाव्याचा अनुभव देवू शकते. मी येथे पाश्चात्य लेखक-कवींची उदाहरणे देत नाही. काही प्रयोजनही नाही. कारण आपल्याला आपल्या स्वप्रतिभेने अजून खूप मजल मारायची आहे. त्यांचे जीवन बेगळे, संस्कृती वेगळी, सामाजिक संदर्भ वेगळे आणि त्यांना उपलब्ध असलेले अवकाशही वेगळे. आपला प्रश्न हा आहे कि आम्ही आमचे अवकाश शोधण्यात कमी तर पडत नाही ना? 

आम्ही आमची संस्कृती नीट शोधण्यात, समजण्यात, सामाजिक अनुबंध जाणन्यात कमी तर पडत नाही ना?

आपण मोठे साहित्यिक असलो तरी हा प्रश्न विचारला पाहिजे, सातत्याने, व प्रश्नांची उत्तरेही शोधली पाहिजेत...सातत्याने, कारण आज आपल्या जगाला कधी नव्हे तेवढा वेग आला आहे. हा वेग भोवळ आणनारा आहे. त्यामुळे साहित्यिकांसमोरील आव्हानेही तेवढीच वाढली आहेत.

गत शतकातील आढावा घेतला तर हजारोंनी लेखक-कवी झाल्याचे आपल्या लक्षात येईल. पण ज्ञानेश्वरांची-नामदेवांची ते तुकोबांची उंची ओलांडुन जाईल...पुढेही टिकेल, कालातीत होईल अशी एकही साहित्यकृती मराठीत निर्माण झालेली आपल्याला दिसून येणार नाही. ज्ञानेश्वर-नामदेव-तुकोबा टिकले ते केवळ त्यांच्या आध्यात्मिक लेखनामुळे असे म्हणता येणार नाही कारण आध्यात्मिक लेखकांची तर फार मोठी मांदियाळी होऊन गेली आहे. जीवनाचे दर्शन हा त्यांच्या लेखनाचा मुलगाभा होता. आमचे साहित्यिक तेथेच कमी पडले हे वास्तव स्वीकारायला हवे. 

मी पारितोषिकांवरून साहित्याची उंची मोजत नाही. मी एखाद्या लेखकाच्या कृतीची समिक्षा किती झाली यावरुनही त्याची उंची मोजत नाही. मी एखादे पुस्तक किती खपले यावरुनही त्या पुस्तकाचा दर्जा ठरवत नाही. साहित्याची उंची आणि खोली मोजायचे एकच साधन असते म्हणजे त्यातील जीवनदर्शन किती प्रत्ययकारी आहे यावरून! तसे असले तर आज वाचक दहा आहेत कि दहा लाख...ते भविष्यात कोट्यावधी होतातच याबद्दल शंका बाळगायचे कारण नाही. अन्यथा पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे साहित्यिकाच्या हातात असतेच. Old Man and the Sea ही अवघ्या शंभरेक पानांची कादंबरी...तिलास नोबेल मिळाले... पण ती हेमिंग्वेने ३२ वेळा पुन्हा पुन्हा लिहून काढली होती हे आम्ही विसरतो. 

साहित्यनिष्ठा हा साहित्यिकाचा प्राण असतो. पण मी आजकालच नव्हे तर प्रकाशक झाल्यापासून बघतो...१९९२ सालापासून कि लेखकाला प्रसिद्ध होण्याची अकारण घाई झालेली असते. संपादकीय संस्कार, पुनर्लेखन हे प्रकार अपवाद वगळता लेखकांना आवडत नाहीत. काही लेखक तर मी असे पाहिलेत कि पुस्तक प्रकाशित होण्याआधीच पुरस्कारांची फिल्डिंग लावून आलेले होते. एका नव-लेखकाच्या शोधलेखनात खरेच दम होता...पण अप्रोच बदलला तर ते लेखन एक माइलस्टोन ठरु शकले असते. पण त्यांना आहे तसेच प्रकाशित करायचे होते. कोणी प्रकाशक भेटला नाही तर ते स्वत: खर्च करून प्रकाशित केले. मला आता त्या लेखकाचेही नांव आठवत नाही...आठवतो फक्त विषय. 

म्हणजे आपणच विस्मृतीत जाण्यासाठीच लेखन करतो काय? केवळ पुस्तक यावे व एखादा पुरस्कार मिळावा हीच आपल्या लेखनाची प्रेरणा आहे काय? मला वाटते आपण हा प्रश्न मनोमन विचारायला हवा. आपापली कृती अधिकाधिक निर्दोष आणि अधिक सखोल जीवनदर्शन घडवणारी होईल याबाबत सजग रहायला हवे. असे म्हणतात लेखनाची एखादी कल्पना स्फुरते तोच प्रतिभेचा क्षण असतो...पुढची कारागिरी असते. पण कारागिरीलाही वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी कल्पना स्फुरण्याचा जो प्रतिभाशाली क्षण होता तेवढीच प्रतिभा पुन्हा पुन्हा पणाला लावावी लागते. 

ज्येष्ठ समिक्षक शंकर सारडा नेहमी म्हणतात कि मराठीत नोबेल पारितोषिक मिळण्याच्या योग्यतेची कविता-कथा-कादंबरी यायला हवी. त्यांचे बरोबर आहे. नोबेल मिळणे हे काही साहित्यकृती श्रेष्ठ असण्याचे लक्षण नाही. गांधीजींना नोबेल मिळाले नाही पण त्यांच्या शिष्याला मिळाले. गांधीजींची योग्यता कधीच कमी झाली नाही. नोबेल समितीला त्याबद्दल खेद व्यक्त करावा लागला. असाच खेद प्रत्येक वाचकाच्या मनात निर्माण होईल अशा कृती निर्माण करायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?  

असो. आपण आज ज्या जगात जगत आहोत ते कसे आहे? 

आज जागतिकीकरणामुळे जीवनाचे संदर्भ झपाट्याने बदलत चालले आहेत. मानवी नातेसंबंधांची मोडतोड होत त्यांची नव्याने फेरबांधणी होत आहे. त्याचा परिणाम आपल्या संस्कृतीवरही होत आहे. किंबहुना एवढ्या वेगाने सांस्कृतिक-सामाजिक अभिसरण होऊ शकते याची कोणी कल्पनाही केली नव्हती. जागतीकीकरण गोयंकरांना तसे नवे नाही. पुरातन कालापासून विविध संस्कृत्यांचे मानवी समूह येथे आले आहेत. सर्वात आधी तीन-चार हजार वर्षांपुर्वी आले ते सुमेरियन. नंतर जसे हबशी आले तसे शिद्दीही. काही टिकले तर काही पुन्हा स्थलांतरीत झाले. पुढचा इतिहास आपल्याला माहितच आहे. किंबहुना गोवा...ही कोकणची अवघी किनारपट्टी जागतीक संस्कृत्यांसाठी एक पुल बनला. पण आताचे जागतिकीकरण वेगळे आहे. ते चांगले कि वाईट हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन असू शकतो. मतमतांतरे असायलाच हवीत. पण हे जे संक्रमण होते आहे त्याचे जीवंत चित्रण करणे हे आपणासमोरचे मोठे आव्हान आहे.  

दुसरे महत्वाचे असे की मराठी साहित्यात एक नवाच चातुर्वर्ण्य निर्माण झालेला आहे. म्हणजे शहरी साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, ओबीसी साहित्य, प्रादेशिक कादंब-या इत्यादी. समिक्षक अशा कोणत्या ना कोणत्या क्यटेगरीत साहित्य ढकलत त्याचे त्या क्यटेगरीप्रमाने समिक्षण करत असल्याने, व त्यालाही पाश्चात्य साहित्यिक मापदंड लावत असल्याने एक विचित्र स्थिती झालेली आहे. ही स्थिती साहित्यिकांसाठीही विघातक आहे. प्रदेशाचे, जातीयतेचे परिमाण लावून त्या साहित्याकडे पाहिले तर साहित्याचा जो मुलगर्भ हेतू...वैश्विकता कसा साध्य होईल? महात्मा फुले सामाजिक संदर्भात म्हनाले होते...एकमय समाज निर्माण झाल्याखेरीज नेशन...म्हणजे राष्ट्र निर्माण होत नसते. यालाच पुढे नेवून म्हणता येईल कि साहित्यातील सर्व प्रवाहांना एकमयतेच्या दृष्टीने जर आपण पाहू शकलो नाही तर ते मराठी साहित्याला विघातक ठरेल...नव्हे ठरतेच आहे. र. वा. दिघेंच्या कादंब-यांना ग्रामीण कादंबरी किंवा प्रादेशिक कादंबरीचे लेबल चिकटवल्यामुळे पानकळासारख्या अभिजात साहित्यकृतीचे नुकसान झाले आहे हे आपण विसरता कामा नये. 

साहित्यकृती एकतर उत्कृष्ठ असते किंवा चांगली किंवा वाईट...साहित्य हे साहित्यच असते याचे भान समिक्षकांनी ठेवले पाहिजे.

आपल्या साहित्य व्यवहाराच्या अन्य अंगांकडे जरा दृष्टी टाकुयात. आज आपला साहित्य संस्कृतीचा व्यवहार अत्यंत विखंडित झाला आहे असे आपल्या लक्षात येईल. तसा तो सुरुवातीपासुनच आहे. विदर्भातला लेखक पश्चिम महाराष्ट्राला माहित होता होता त्याचे उमेदीचे वय निघून जाते. परराज्यांतील लेखकांची अवस्था तर अधिकच बिकट आहे. प्रकाशक मिळणे, त्याची व्यापक समिक्षा होणे हे प्रकार कमीच आहेत. सर्वदूर मराठी भाषकांपर्यंत एखाद्या लेखकाला पोहोचता येईल असे दुर्दैवाने एकही माध्यम नाही. साहित्य विषयाला वाहिलेल्या पुरवण्या आटत चालल्या आहेत. एक-दोन पाने देणारी वृत्तपत्रे आता जाहिरातीच जास्त आणि चतकोर मजकूर अशा अवस्थेला आली आहेत. मग साहित्य प्रचार-प्रसार कसा होणार? नवीन लेखकांना व्यासपीठ कसे मिळणार?

महाराष्ट्रातील साहित्य संस्थाही कृपण बनलेल्या आहेत. परराज्यांतील लेखकांना, समिक्षकांना, विचारवंतांना आपण निमंत्रीत करायला हवे, त्यांची ओळख साहित्य रसिकांना व्हायला हवी यासाठी काही उपक्रम नाहीत. उलट परराज्यातील संस्था मात्र महाराष्ट्रातील लेखक-कवींना आवर्जून बोलवत असतात. त्यांचे मन लावून ऐकत असतात...सन्मान देत असतात. पण आपलेही काही उत्तरदायित्व आहे याचे भान महाराष्ट्रातील संस्थांनी ठेवलेले नाही याबाबत खंत व्यक्त केलीच पाहिजे. 

साहित्य संस्कृतीचे विकसन व्हायला, लेखक-कवींना मोकळे व्ह्यायला, अभिव्यक्त व्हायला साहित्य संमेलनांची, साहित्यिक कार्यक्रमांची, व्याख्यानांची आवश्यकता असते. गोवा हे त्या दृष्टीने श्रीमंत राज्य आहे असे म्हनावे लागेल. मराठी भाषेला अधिष्ठान देण्यात गोव्याने नेहमीच हातभार लावला आहे. किंबहुना गोव्याची संस्कृती घडवण्यात मराठीने मोठा हातभार लावला आहे. बा. भ. बोरकरांसारखे महान कवी याच भुमीने दिले आहेत. असे असतांनाही गोवा शासन मराठीला मात्र प्रशासकीय भाषेचा दर्जा देत नाही ही दुर्दैवी बाब आहे. खरे तर हे घटनाविरोधी आहे. घटनेचे कलम ३०, ३४५, ३४७ आणि ३५० (अ व ब) नुसार एखाद्या राज्यातील किंवा त्या राज्यातील एखाद्या जिल्ह्यात राहणा-या एखाद्या अल्पभाषक गटाने जरी मागणी केली तरी त्यांच्या भाषेला प्रशासकीय भाषेचा दर्जा दिला पाहिजे. खरे तर घटनेत "राजभाषा" हा शब्दच नाही...आहे तो प्रशासकीय भाषा आणि एखाद्या राज्यात अशा अनेक प्रशासकीय भाषा असू शकतात. हे असे असूनहे मराठी भाषेला गोवा शासन प्रशासकीय भाषेचा दर्जा इतकी वर्ष मागणी करुनही देत नसेल तर ही बाब घटनेच्या विरोधात जाते. सर्वांनी घटनेचा सन्मान ठेवायला हवा. गोवा शासनही ठेवेल अशी मला आशा आहे.  

आजवर दिग्गजांनी भुषवलेल्या शेकोटी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी यंदा आपण माझी निवड केली याबाबत मी संयोजकांचा आणि आपणा सर्वांचा कृतज्ञ आहे. ही शेकोटी अशाच धगधगत राहो...आपल्या चिरंतन प्रकाशाने साहित्य संस्कृती तेजालत राहो...सर्वांसाठी एक दीपस्तंभ बनो आणि आपल्या सर्वांचे...मग साहित्यिक असोत कि साहित्य रसिक...जीवन समृद्ध करो ही शुभकामना. 

धन्यवाद.

Tuesday, December 10, 2013

पुरोगामी होणे फार सोपे आहे.....

"देवा-धर्माला, परंपरांना नाकारणे आणि ब्राह्मणांना शिव्या देणे एवढीच आपली पुरोगामीपणाची संकुचित व्याख्या करुन घेतली आहे. ती व्याख्या चुकीची आहे. ब्राह्मनांना शिव्या देणे व त्यांना समाजापेक्षा वेगळे समजणे यामुळे समतेचे तत्वकारण पुढे जात नाही....जावू शकणार नाही. देवाधर्माला नाकारणे ही व्यक्तिगत पातळीवरची बाब झाली. ती सामुदायिक बनू शकत नाही. तसा बनवायचा प्रयत्न समाजाला पुढे नेण्यात यशस्वी ठरत नाही. फार तर व्यवहारातून त्यांचे महत्व कमी करत राहता येवू शकते.

"पुरोगामीपनाची व्याख्या व्यापक आहे. आज आपण आर्थिक/वैचारिक/ज्ञानात्मक दृष्ट्या जिथे आहोत त्यापुढे उद्या असणे हे पुरोगामीपणाचे लक्षण आहे. त्यासाठी सतत चिंतन/मनन करत तसे जीवनाचरण करणेही तेवढेच महत्वाचे आहे.

"पुरोगामीपणा हा राजकारण, अर्थकारण तसेच समाजकारणाशीही निगडित आहे. महाराष्ट्राचा पुरोगामीचा इतिहास उज्वल असला तरी यशवंतराव चव्हाणांनंतरचा काळ पाहिला तर आपण या सर्वच क्षेत्रांत प्रतिगामी झालो आहोत असे दिसून येईल. आपले राजकारण जातींपार जाण्याऐवजी जातीनिष्ठ झाले आहे हे वास्तव असेल तर आपण कसे पुरोगामी? १९९२ नंतर धर्मांनी कधी नव्हे एवढी उचल खात हिंसकतेला बळ दिले हे आपल्या पुरोगामीतेचे लक्षण आहे काय? आजही कोणताही पक्ष जातीय विचार करुनच आपले उमेदवार देतो. यामुळे पुरोगाम्यांचे जातीविरहित समाजाचे स्वप्न साकार होणार नाही. खरे तर आजच्या जातीयतेला आरक्षणापेक्षा राजकारण्यांनाच जबाबदार धरायला हवे...पण पुरोगामी विचारवंतच कोणत्या ना कोणत्या राजकारण्याच्या कंपुत आपापल्या जाती घेऊन असतात...अशा अवस्थेत पुरोगामी म्हनवणे हा निव्वळ दांभिकपणा आहे.

 दुसरे, पुरोगामीता ही अर्थ क्षेत्रातही असते याचे भान आम्ही गमावले आहे. जशी सामाजिक लोकशाही असते तशी प्रादेशिक विकासातही लोकशाही हवी. म्हणजे समान विकासाच्या संध्या आणि त्यानुरुप सुविधा सर्वच प्रदेशांत हव्यात. पण आमचा विकास मुळात असंतुलित आहे. पश्चिम महाराष्ट्राचा नको तेवढा विकास आणि मराठवादा-विदर्भ भकास हे चित्र पुरोगामीतेला साजेशे नाही.  विकेंद्रीकरण करत सर्वच प्रदेशांचे संतुलित विकसन आम्हाला जमले नाही. पाण्यावर प्रत्येकाचा समान हक्क असुनही ७०% पाणी पश्चिम महाराष्ट्रच खातो. पश्चिम महाराष्ट्रात शहरे बेशिस्तीने वाढली कारण उद्योगधंदेही तिकडेच केंद्रीत. यामुळे ज्या सामाजिक/सांस्कृतिक/आर्थिक समस्या वाढल्या त्याचे निराकरण करायला आम्ही कमी पडतो. बकालपणा हीच जर आम्हाला प्रगती वाटत असेल तर आम्ही पुरोगामी कसे?

आम्ही लोक...या देशाचे लोक कोणत्या नैतिकतेला आज मानतो हेही तपासून पहायला पाहिजे. "प्रजेला आपल्या लायकीप्रमानेच शासक मिळतात" या उक्तीप्रमाने राजकीय क्षेत्रातील अध:पतनाला आम्हीच जबाबदार आहोत. पण आम्हाला आमची कोणतीही जबाबदारी नको आहे. आम्हाला आमच्या नेत्यांना शिव्या घालण्याचा काय अधिकार आहे? आम्ही भ्रष्टाचार निर्मुलनासाठी जनलोकपाल मागतो...पण भ्रष्टाचार हा एकतर्फी नसतो, त्याला देणारे म्हणुन आमचाही हातभारच असतो हे मात्र आम्ही विसरतो.

आमच्या पिढ्या अशाच वाया गेल्या. आम्ही नुसते शिकलो...भले डाक्टर-वकील झाले असू...पण आमचे मानसिकता मात्र अशिक्षितासारखीच आहे. आम्हाला आमच्या मुलांना मोकळे आकाश देण्याची भिती वाटते. मुलगा संगीतकार-नाटककार बनावा...चित्रकार बनावा, सारे आयुष्य त्यासाठी द्यावे असे वाटत नाही. आम्ही त्यांचे पंख छाटतो. त्याला कमाईचे मशिन बनवू पहातो. जीवन न समजावुन न घेता जगायला सांगतो. असे आम्ही आई-बाप असू तर मुक्त मनाची सबळ पिढी कशी निर्माण होईल? आम्हाला आमचीही पुढची पिढी नोकरदारच व्हावी वाटत असेल तर आम्ही कधी महासत्ता होणार? मुलांना निकोप वाढीचे स्वातंत्र्य नाकारणारे आम्ही कसले पालक आहोत?

आज आपण जागतिकीकरणाच्या लाटेत आलो आहोत. घरोघर...अगदी झोपड्यांत सुद्धा आधुनिक साधने प्रवेशली आहेत. विज्ञानाची फळे आम्ही सर्वच चाखत आहोत...पण आज बुवा-बापुंचे पेव कधी नव्हे एवढे फुटले आहे. प्रत्येकजण कोणा-ना-कोणाचा भक्त आहे. भक्ती वाईट नाही...पण ती सरळ परमेश्वराची करण्याऐवजी आम्हाला दलाल लागत आहेत. ते बरबटलेले असले...लिंगपिसाट असले तरी आमची त्यांच्यावरची भक्ती कमी होत नसेल तर आम्ही पुरोगामी राज्याचे नागरिक कसे? उलट आम्ही दिवसेंदिवस प्रतिगामी बनत मध्ययुगात जात आहोत. आणि ही बलजबरी कोभ्णी केलेली नाही...ही स्वत:चा अंत घडवणारी स्वेच्छा आहे याचे भान आम्हाला जर नाही तर या आधुनिक जगाचा आम्हाला काय उपयोग आहे?

दाभोळकरांचा खून पुण्यात होतो. ते स्वत:साठी नव्हे... तुमच्या-आमच्या सर्वांसाठी लढत होते...आमच्याच भावी पिढ्या निकोप आणि स्वच्छ मनाच्या बनाव्या यासाठी झगडत होते. त्यांचा खून झाला. पण त्यांच्या खुन्यांना पकडायची मागणी करण्यासाठी फक्त त्यांचेच कार्यकर्ते जमावेत-मोर्चे काढावेत..? जर ते लढत होते ते जर आपल्यासाठी तर आम्ही कितीजण रस्त्यावर आलो? दाभोळकरांची हत्या हा सर्व विचारकांना इशारा होता. विचारकांनी गप्प बसावे नाहीतर "तुमचा दाभोळकर करु" अशा धमक्या सदानंद मोरे-हरी नरके यांना आजही जात असतील आणि आम्ही सारेच डोळ्यावर कातडे पांघरणार असू तर आम्ही पुरोगामी कसे? ते आमच्यासाठी, आमच्या भावी पिढ्यांसाठीच लढत होते आणि आहेत ना? मग आम्ही कसे वागतो यावर कधी विचार करणार?

पुरोगामी होणे फार सोपे आहे. पुढे डोळे उघडे ठेऊन चालत रहा. सर्व काही नीट समजावून घ्या. भावनांच्या लाटांवर वाहत जाऊ नका. ज्ञाननिष्ठ बना. पण आम्हाला बहुदा ज्ञानाची भिती वाटते. म्हणून आम्ही झापडबंद झालो आहोत. सर्वच अनैतिकतेला आम्ही मूक पाठिंबाच देत नाही तर स्वत:ही अनैतिक बनलो आहोत. महाराष्ट्र पुरोगामी नाही. तो पुरोगामी आहे हीच आपली सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. सर्वप्रथम या अंधश्रद्धेला दूर सारुन स्वच्छपणे स्वत:कडे पहायला हवे."

-यशवंतराव चव्हाण यांच्या २९ व्या स्मृती समारोहात उद्घाटनपर भाषण देतांना मी मांडलेले काही मुद्दे. मंचावर श्री. दगडू लोमटे, श्री. बाबा बांड आणि श्री. गिरधारीलाल भराडिया.

Friday, April 12, 2013

विकलांग मानसिकतेचे प्रतीक!




११ एप्रिल ही महात्मा फुले यांची जयंती. येत्या ११ मे रोजी फुलेंना मुंबईतील कोळी समाजाने पुढाकार घेऊन "महात्मा" पदवी दिली होती त्याला १२५ वर्ष पुर्ण होताहेत. काल गुढीपाडवाही होता. त्या निमित्त समस्त मच्छीमार समाज व कोळी महासंघाने माझे व्याख्यान माहिम चौपाटीवर आयोजित केले होते. या प्रसंगी आमदार कपिल पाटील, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील, राजहंस टपके आदी मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.


येथे मी दिलेल्या व्याख्यानातील महत्वाचे मुद्दे:

१. मुंबईच्या आगरी, कोळी आणि अन्य बहुजन कामगार बांधवांनी फुलेंच्या जातिनिरपेक्ष समाजजागृतीच्या कर्याची दखल घेऊन फुलेंना "महात्मा" हा पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार प्रदान झाल्यावर म. फुलेंनी केलेल्या भाषनात ते म्हणाले होते, "शुद्रातिशुद्रांसह भिल्ल -कोळी वगैरे सर्व लोक विद्वान होवून विचार करण्यालायक होईपावेतो ते सर्वसारखे एकमय लोक  निर्माण झाल्याखेरीज "नेशन" निर्माण होणे शक्य नाही." आम्ही गेल्या सव्वाशे वर्षांत शिकलो पण विद्वान झालो नाही. आम्हा भारतीयांनी ज्ञानाची कास सोडुन एक सहस्त्रक उलटले. आज आम्ही जागतिकीकरनाच्या लाटेल आलो तरीही आम्हाला आमचे प्रश्न नीट समजत नाहीत आणि ते सोडवण्यासाठी उत्तरे स्वत:च शोधावी वाटत नाही. आम्हाला आमच्या सर्वच प्रश्नांची सोडवणुक शासनाने करावी अशी आमची अपेक्षा असते. पण जे प्रश्न निर्माण होतात त्यामागे आपला एक नागरिक म्हणुन काहीतरी हात असतो हे आपण कधी लक्षात घेणार?

२. जागतिकीकरणात आपला वाटा काय? हजारो वर्ष कोळी बांधवांनी सागरकिनारे राखले. नौकानयन ते विदेशव्यापाराची दारे खुले करुन दिली. एक वैशिष्ट्यपुर्ण सम्स्कृती व धर्मभावना विकसीत केल्या. व्यास-वाल्मिकी सारखे महाकवि कोळी समाजाने दिले. गौतम बुद्धाची माता कोलीय गणाची होती...झलकारीबाईसारखी लढवैय्या महिला याच समाजाने दिली. कबीर कोळी होते. कोलीय/कोळी नांवाची असंख्य गांवे आजही भारतात सर्वत्र आहेत एवढा हा मानवगण विविध व्यवसाय क्षेत्रांत पसरलेला आहे. परंतू मच्चःईमारी करणारे कोळी बांधव आज निर्वासित होवू लागले आहेत. मुंबई-ठाने ते संपुर्ण पाच जिल्ह्यांची किनारपट्टी कोळ्यांच्या हातून जात भांडवलदारांच्या हाती जात आहेत. कारण शिकले असतील पण ज्ञान आले नाही. आपणही भांडवलदार बनावे अशी आकांक्षा जोपासता आली नाही. जमीनी विकल्या. ट्रालर्सवाल्याशी स्पर्धा करता येत नाही. मासळी अजुनही उन्हात वाळवता. जगभर निर्जलीकरणाची सोपी पण यांत्रिक पद्धत वापरली जात असता संपुर्ण देशात एक अपवाद वगळता कोनी आधुनिकीकरण केले नाही. याही उद्योगात एफ.डी.आय. एक दिवस आनायला लावणार आहात काय? आज्मितीला सुक्या मासळीची जागतीक बाजारपेठ ७० बिलियन डालर्सची आहे. यात आपला वाटा काय? कि हेही काम शासनानेच करावे अशी अपेक्षा आहे?

३. आरक्षण हे दिवसेंदिवस कुचकामी होणार आहे. आरक्षणाची मागणी ही विकलांग मानसिकतेचे प्रतीक आहे. नोक-या मागणा-यांच्या यादीत जावून बसू नका तर नोक-या देनारे बना! आणि ते अशक्य नाही. फक्त व्यवसाय पद्धती आधुनिक बनवणे गरजेचे आहे. अणि यालाच ज्ञान आणि विद्वत्तेचे लक्षण म्हणतात. शंभर पुस्तके वाचुन कोणी विद्वान होत नसते तर विद्वत्ता आचरणातून अभिव्यक्त होत असते. आपण जे समाजकारण आणि अर्थकारण विकसीत करतो त्यातून व्यक्त होत असते. आपण एकोणिसाव्या शतकातही अडाने होतो आणि आजही अडानी आहोत. मग आपण महात्मा फुले जर समजुच शकलो नसू, तसे थोडेबहुतही आचरण करुच शकलो नसू तर या जयंत्या साज-या करण्याचा दळींद्रीपना तरी कशाला करता?

४. आज घरी जाल तेंव्हा आपण आपल्या योग्यतेपेक्षा अधिक उच्च जागी आहोत की खालच्या यावर निरपेक्ष विचार करा. जर तुम्हाला आहे ती स्थिती समाधानकारक वाटत असेल तर तुम्ही गुलाम होण्याच्याच योग्यतेचे आहात असे खुशाल समजून चाला. पण जर एक क्षणही तुम्हाला असे वाटले, कि नाही, मी मागे आहे...तर पेटुन उठा...आणि स्वत:चे स्थान निर्माण करण्याच्या मागे हात धुवून लागा. समुद्रकिनारे आणि खुद्द समुद्र ही तुमची प्राधान्याची संपती आहे. तिच्यावरचा हक्क जपायचा तर सागरी संपत्तीचेही नीट नियोजन करावे लागेल. बेसुमार मासेमारी आणि त्या प्रमानात पुनर्भरणी न केल्याचे दुष्परिणाम आताच दिसू लागले आहेत. शेतक-यांनी जी चूक केली ती तुम्ही तरी करू नका. शासनाने शेतक-यांची मानसिकता मतांच्या लाचारीसाठी एवढी विकलांग केलीय कि चा-यापासून पाण्याचे प्रश्न सरकारनेच सोडवावेत अशी अपेक्षा ठेवून असतात...पण स्वत: कसलेही नियोजन करत नाहीत. चारा आणि मासे मंत्रालयांत उत्पादित होवू शकत नाहीत...ते काम शेवटी गरजवंतांनाच प्रामाणिकपणे करावे लागते. आपण त्यात अपेशी ठरलो आहोत...म्हणुन आपण अज्ञानी आहोत हे समजून चालावे.


५. म. फुलेंने "एकमयता" हा शब्द अत्यंत विचारपुर्वक वापरला आहे. जात-जमात कोनतीही असो, आपण सारेच एका एकजिनसी समाजाचे व्यावसायिक कौशल्यांच्या विभागणीमुळे विभक्त झालो आहोत. एकाच घरातील भावंडे जबाबदा-या वाटुन घेतात तसे. पण आपण कोळ्यांच्या प्रश्नाशी शिंप्यांचे काय घेणे? धनगरांच्या प्रश्नांशी कुणब्यांचे काय घेणे? अशा भयंकर मानसिकतेत आजही आहोत. जाती सोडा...पोटजाती/शाखांतही ऐक्य नाही. मग सर्व-सामाजिक एकमयता कोठुन येणार? महादेव कोळ्यांच्या प्रश्नांसाठी मच्च्छीमार कोळी पाठीशी उभा राहणार नसेल तर मग तुम्हाला व्यास-वाल्मिकीचा वारसा सांगायचा कोणता हक्क पोहोचतो? धनगर आणि कोळ्यांचे समान प्रश्न असतांना त्या प्रश्नांसाठी सर्व अन्य जाती आवाज उठवणार नसतील तर कोणती एकमयता येणार आहे? विखंडीत समाज, विचार न करणारा समाज हा नेहमीच राजसत्तेला प्रिय असतो. ती मग कोणत्याही जातीची असो. राज्यकर्ते आणि धर्मलंड नेहमीच विचारांना घाबरतात. म्हणुन कोणीतरी काल्पनिक शत्रु द्यायचा आणि समाजाला त्यापाठी लावून द्यायचे हे उद्योग होत असतात. आता तरी सावध व्हा. एकमयतेचा रस्ता सहृदयता आणि इतिहासाची वास्तव जाण यातून जातो. स्वत:चे हक्क हवे असतात तर जबाबदा-यांचे पालनही करावे लागते.

६. म. फुले म्हनतात...या वरील अटी पुर्ण झाल्या नाहीत तर आपण "नेशन" होणार नाही. आज आपण जरी भारतीय संघराज्य म्हणत असलो तरी आपल्या देशाला "नेशन" म्हणता येणे अशक्यप्राय आहे...कारण एकमयताच नाही. डा. आंबेडकर जसे म्हनतात कि सामाजिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही व्यर्थ आहे...त्याचा अन्वयार्थ हाच आहे. आम्ही राजकीय लोकशाहीत आहोत म्हणुनच आम्ही सरंजामदारशाहीत आहोत...खरी लोकशाही आम्ही कधी पाहिलेलीच नाही. आणि आम्ही एकमय झालो नाही तर ती कधी आम्हाला पहायला मिळनारही नाही.
आम्ही शासनासाठी नव्हे तर शासन आमच्यासाठी तेंव्हाच होवू शकेल जेंव्हा आम्ही एकमयता आणत सामाजिक लोकशाही प्रस्थापित करू. आम्ही महामानवांच्या मुलभूत तत्वज्ञानांवर स्वत:च काळीमा फासला आहे. चरित्रांची पारायणे करून काही साध्य होनार नाही तर त्यांचे तत्वज्ञान कृतीत आनायला हवे. महात्मा फुलेंनी एकोणिसाव्या शतकात जो द्रष्टेपणा दाखवला त्याचा आम्ही अंगिकार केलाच नाही. अजुनही वेळ गेलेली नाही. आपल्याला ख-या लोकशाहीचा लढा लढायचा आहे...आमच्याच गुलाम मानसिकतेतून बाहेर यायचे आहे!

Friday, January 25, 2013

पाकिस्तान व धर्मांध ओवेसीच्या विरोधात धि:कार सभा संपन्न!



 पाकिस्तानी सैनिकांनी दोन भारतीय जवानांची निघृण हत्या करुन त्यांचा शिरच्छेद करण्याचे अमानुष, रानटी कृत्य केले, त्याबद्दल आज करिष्मा चौक, कर्वे रस्ता येथे आज सकाळी दहा वाजता महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठान आणि वसुंधरा मित्र परिवाराच्या वतीने धि:कार सभा आयोजित केली गेली होती. महात्मा गांधी, डा. बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून लान्स नाईक हेमराज सिंग आणि लान्सनाईक सुधाकर सिंग यांना विनम्र श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली व पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.


मी म्हणालो: पाकिस्तानचे अस्तित्व हे भारतालाच नव्हे तर जगाला घातक आहे. मध्ययुगीन रानटी कृती करणा-या देशाला कसलीही संस्कृती असू शकत नाही. पाकिस्तानचा निषेध जागतिक पातळीवर व्हायला हवा. या देशाशी युद्ध हे सर्व उपाय थकल्यानंतरचे अंतिम उत्तर असले तरी या देशाचे तीन तुकडे तरी केले गेलेच पाहिजेत तोवर देशात शांतता नांदणे व प्रगती होणे शक्य नाही. त्यासाठी असंतुष्ट पाकी प्रदेशांना योग्य ती रसद सरकारने कुटनीति वापरत पुरवलीच पाहिजे व अपेक्षित परिणाम साधला पाहिजे. एमायएमच्या ओवेसीने जे हिंसक व भडकावू वक्तव्य केले त्याबद्दल त्याला आयुष्यभरासाठी डांबून ठेवले पाहिजे. काळ्यापाण्याची शिक्षा अशा देशविघातक व हिंसक लोकांसाठी परत सुरु केली पाहिजे. त्याच्या पक्षावर बंदी घातली गेली पाहिजे. आधी हिंसा मानसिक पातळीवर अवतरते आणि ती संधी मिळाल्यावर कधी ना कधी प्रत्यक्ष कृतीत बदलते हे विसरता कामा नये. त्यामुळे प्रत्यक्ष कृती होण्याआधीच अशा विकृतांना जेरबंद केले पाहिजे. त्याच वेळीस एखाद्या जातीची कत्तल करु, त्यांच्या स्त्रीयांवर बलात्कार करू अशी अतिरेकी मते व्यक्त करणा-यांवर तसेच धार्मिक वर्चस्वतावाद गाजवणा-यांवरही तेवढीच कठोर कारवाई व्हायला पाहिजे. देशाचे नागरिक म्हणुन आम्हाला शांततेने राहण्याचा अधिकार आहे. तो आम्हालाच मिळवावा लागणार आहे. भेकड लोकच संघटना बांधतात...आणि झुंडीची अरेरावी सुरु करतात. आम्हाला अशा सर्वच देशविघातक संघटनांपासून सावध रहायला हवे.

वसुंधरा मित्र परिवाराचे अध्यक्ष धनंजय झुरंगे यांनी पाकिस्तान आणि ओवेसीवर प्रचंड हल्ला चढवला आणि त्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली.

अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार श्री अरुण खोरे म्हणाले: सर्वत्र वाढणारी असहिष्णुता आणि क्रौर्याची मानसिक विकृती वाढत चालली असून ती आता कृतीतही बदलू लागली आहे. पाकिस्तानी सैनिकांच्या या अमानवी क्रुतीचा निषेध केला गेलाच पाहिजे. त्याचवेळीस मुत्सद्दी पातळीवरून पाकिस्तानवर दडपण आणायला हवे. युद्ध हे या समस्येवरील उत्तर नाही. युद्धातून निर्माण होणा-या समस्या अधिक व्यापक असतात याचेही भान ठेवायला हवे. मी पाकिस्तानचा निषेध करतो आणि सरकार त्यांच्या कृतीबद्दल योग्य ती पावले उचलेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

पाकिस्तान व ओवेसीचा निषेध करण्यासाठी भगिनीवर्गही मोठ्या प्रमाणात आला होता.

शेवटी राष्ट्रगीत झाले व "भारत माता कि जय" च्या उत्स्फुर्त घोषणांनंतर धि:कार सभा विसर्जित करण्यात आली. या धि:कार सभेला ६०-७० नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. गौतम कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आरेखन व संयोजन महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचे सचीव श्री. प्रकाश खाडे यांनी केले.
 मी सर्वांचा आभारी आहे.


(टीप: या धि:कार सभेला फेसबुकवरून टाईपरायटर बडवत देशप्रेमाचे उर बडवणारे अनेक मित्र वारंवारच्या आवाहनानंतर आणि अनेकांनी "येतो" असे जाहीरपणे सांगुनही काही तरी उगवतील अशी अपेक्षा होती...वारंवारच्या आवाहनानंतरही  कवि संतोष देशपांडे आणि अभिराम दीक्षित वगळता कोणीही उगवले नाही. मी त्यांच्या राष्ट्रप्रेमाला शुभेच्छा देतो.)



Wednesday, January 26, 2011

My Speech on release of "The Awakening..."


माजी पंतप्रधान, महाविद्वान कै. नरसिंह राव यांनी माझ्या "द अवेकनिंग" या इंग्रजी कादंबरीचे २ मे, २००२ रोजी दिल्ली येथे हयात मध्ये प्रकाशन केले होते...म्रुत्युवर चिंतन करणा-या या कादंबरी प्रकाशनावेळीचे माझे हे प्रास्तविक भाषण...मा. श्री. राव नंतर जे बोलले त्या विद्वत्तेला तर तोडच नाही...

Image result for sanjay sonawani the awakening

I do not have enough words to express my gratitude towards Hon’ble Mr. Narasimha Rao for releasing my novel at his auspicious hands. This is a dream evening for me.

In brief I would like to tell why I wrote this novel “The Awakening”.

Yakshya in Mahabhrata had posed a question before Yudhisthira, “what is the funniest thing in humane life?” Wise Yudhisthira had answered, “funniest thing on this earth is, the people those all the time see some or other die, always are confident that death never will grab them.” Yes, this really is a funniest thing. This is why people kill people, in wars, in riots, in terrorist attacks…as if human life has no value whatsoever. Death dances on this earth in its vicious forms. And yet we are not ready to learn a lesson from death, no matter whether it is human doing or nature’s wrath. It was Gautam Buddha, who left his house in the quest of attaining eternity because he had come across the brutal truth of the life, death. That changed him overnight. He became an eternal seeker. But, if we look at the current world, it seems that death is begetting the death. We certainly are living on the vortex of violence, Lord Rama too would have felt ashamed of.

Since primitive times death has ruled very psyche of the mankind. They were afraid of death that suddenly would pluck away the life force from their or others body. The primitive concept of religion emerged from the very existence of the death they had no solution for. Creation of God’s, their being immortal, supernatural was sheer imagination of terrified mankind. Religions too appeared one after other to subdue the fear of the death, values and principles were created to beat or prolong the death. Millions of rituals, faiths, ways of life were discovered to console the feared mankind. It was nothing but a solace. “Jeevet Sharadah Shatam…”, prayed Vedics, for people wanted to live as longer as they could. Stories of humane immortals like of Callipso in Homeric epics or sapta Chiranjeeva in Indian myths was nothing but a consolation to the troubled minds. Egyptian’s mummified dead with only hope that some day they will come back to the life. Christians do bury the dead with the only hope that on the day of judgement the Lord will awaken all the dead and he will pass his judgement.

Hindu philosophers as usual were wise. They provided a simple solution to a most complicated question to its followers stating that it is body that dies, soul is immortal. Like a person that changes from one to other home, it too changes the body. Millions of Hindu believes in this philosophy. Same time there are many those tend to trust if they perform certain kind of tantrik rituals, they can put life in dead. They can become immortals. A quest to equal with the gods is still all awake not only in the so called ignorant orthodox masses but in so called modern scientists too. Stories of hundreds of sages who are living for centuries too are a matter of common gossip and faith in the world. Also many do tend to trust in the concept of reincarnation of not only God’s but sages too. The concept of sins and virtues are connected with nothing but death or life after the death. Horrifying pictures of hell are created only to threaten people.

World today has developed a new concept of terrorism, it is nothing but psycho-transmutation to enforce ones fear on others. Those who, in their own schizophrenic paranoia tend to shed blood, only because they themselves are afraid of their own existence, is a matter of concern for the modern world. We have today lot many groups of this kind. Laden too is no exception and nor the America.
In fact entire human society is living on the breath of fear and day after day, true or false, fears are getting intense. Everybody is afraid of others. Everybody is seeking security, either in masses of his likes or in law. And unfortunately it appears that it has psycho-transformed in the some segments in the form of the violence. As Mahatma Gandhi had said, violence is nothing but cowardice. Cowardice comes to those only who are terrified.

In a way till today death rules our life. Our faiths, our sentiments and our dreams are influenced by the very fact named death we want to neglect, as Yudhisthira had said in Mahabharata. Our scientists want to discover the genes that can help human being to live longer. They want to recreate a living being in the form of cloning. In fact each and one want to be immortal, thinks he is immortal. Same time, irony is, the same mankind keeps on inventing new tools to massacre people. This is the way our modern times have been shaped.

I started writing this novel 4 years ago though concept was shaped in my mind almost over 7 years ago. I wanted to explore in the matter of the death through primitive perspective, for I know rational minds tend to be rather argumentative than practice. Though unfortunately we tend to think of primitives, as ignorant herd of irrational mindsets, we can not forget it were those who created the monuments that even after applying our present technology, we never can recreate or replicate them.
Every society has its own needs and all the discoveries are nothing but psychological needs of those particular times. If we ask why they wanted to build pyramids, the answer is why do we then need atom bombs? Why do we need probing satellites or superior techniques that can kill maximum people in a moment? It has become our psychology that we need killing and we are having it. Hindu’s say kill Muslim and Muslim say kill Hindu’s for it has become question of survival and co-existence. In same breath Israelis are killing Palestinians and vis a versa. There are enemies of America those want to destroy it and at the same time, America wants to command every particle of this earth. Scales of enmity and destruction may be different, but fact remains that everyone is in the process to threaten others mortally. We have reached a phase, from creation to destruction.

I, in this novel, chose primitive times to shape my story, for I only could find simple minded people in those ancient times. Where ethics were simple and direct, philosophies not as complicated, as we have today that no one ever practices. It helped me to create the characters that could suit my primitive mind. I time-transcended Sheba of Jericho, who happened to live in the times of King Solomon to the contemporary era of Jesus Christ. Sheba in this novel is not the historical Sheba, though, nor is the Jericho. The quest of attaining immortality that was seeded in her by a slave, with whom, as a ritual, she had had sex and was about to slain him to bath in his blood that could bring her the supreme beauty, changed her.

But are the changes enough? Most of the times seekers never reach to any solution or destination, no matter how many pains they has to undergo in their quest. But there are people, who never can explain why they are living the life the way they are, they don’t have Guru’s nor they practice anything to attain physical or spirituals bliss, they simply live the life the way it comes to them, without remorse or rejoice. They are one who truly does meet the difference between life and death. Let us not forget that knowing the truth, realizing the truth and practicing the truth are altogether different things. This is what I have tried to explain in this novel.

A petty being I am and yet I have tried to take a large bite I am not capable enough to intake by writing this novel.

I again express my gratitude towards Mr. Rao for his kind blessings. I know my speaking before him is nothing but a babble of a child. But I pray to forgive me for my impudence. I thank all the dignitaries and guests present for being patient with me.

Thanks.

श्री. नरसिंह राव माझ्या "द अवेकनिंग" कादंबरीवर जवळपास दीड तास बोलले. संपुर्ण भाषण येथे देत नाही पण महत्वाचे मुद्दे देतो...
१. भारतीय चिंतनात्मकता ही मृत्युचा जाणीवांशी खिळलेली असून आपले तत्वज्ञान म्रुत्युभोवती फिरते. पुनर्जन्म आणि मोक्षाची संकल्पना ही पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वैज्ञानिक शोधाच्याच तोडीची होती, कारण हेच एक अनेक सत्यांपैकी एक सत्य आहे.
२. अठरा अक्षौहोनी सैन्याचे मृत्यु पाहुन, गुरुजन...आप्तजनांचे मृत्यु पाहुनही युधिष्ठिराला मृत्युचे शाश्वत सत्य समजले नाही. एकामागुन एक भावंडे स्वर्गाच्या वाटेवर चालत असतांना मरत असतांना पाहिल्यावरच त्याला मृत्युचे शाश्वत सत्य समजले आणि त्याने आपल्या कुत्र्याला आधी स्वर्गाचे द्वार दाखवले. इतर मरतात तेंव्हा माणुस कोडगा राहतो...जवळचेच जायला लागले कि मग मात्र स्वत:च्या मृत्युबाबतही मग माणुस उदासीन होतो ही मानवाची मुलभुत मानसिकता आहे.
३. ग्रीक मित्थकथा हेडीज या म्रुत्युचा सम्राटाबद्दल बोलतात. चिरंतन संगितामुळे हेडीजमधुन ओर्फियस आपल्या प्रेयसीला बाहेर काढु शकतो...ओडिसियस आपल्या मातेला भेटु शकतो...ही मनाची गुढगर्भ द्वारे आपणहे किलकिली करुन मृत्युला जिंकू शकतो. संजयने या कादंबरीतुन एक अद्भुत संदेश दिलाय. मी आता वयोवृद्ध झालो आहे आणि संजयच्या कादंबरीतील सामंगासारखी माझी मनस्थिती आहे. मला मृत्यु नकोय...तो टाळता आला तर हवाच आहे...पण तो टाळता येत नाही याची अंतर्यामी जाणीवही आहे. मला शीबासारखे होता आले असते तर किती बरे झाले असते! मीही मृत्युवर विजय मिळवण्यासाठी झपाटुन प्रतिभा पणाला लावली असती...
४. नचिकेताने यमाशीही वितंड घातले. मृत्युचे सनातन रहस्य शोधायला. त्याने यमाचे सारे वर नाकारले. चिरंतनाची हाव मानवाला पुरातन आहे. चिरंतनाच्या अपेक्षेत आपण विध्वंसकही होत जातो ते का हाही मानवी समाजासमोरील मोठाच प्रश्न आहे. गुजरातेतील हिंसाचारावर संजय आताच बोलला...एक मृत्युवर विजय मिळवू पहानाराच अशा कालात जाहीर बोलु शकतो. संजयमद्धे अपार धाडस आहे. ज्या वयात त्याने प्रेममय कादंब-या लिहायच्या त्या वयात तो मृत्युसारख्या आम्ही म्हाता-यांनीच चर्चा करायच्या विषयावर एवढ्या आत्मियतेने लिहितो आहे..
५. मला वाटते, शेवटी मृत्यु आहे तरी काय? काळाच्या अभेद्य भिंतीवरील एक ओरखडा कि वाहत्या पाण्यावर नियतीने मारलेली एक रेघ, जी आता आहे नंतर नाही. आपंण अस्तित्वात आहोत कि निरास्तित्वात. अस्तित्वाचा अर्थ काय आणि मग निरास्तित्वाचाही अर्थ काय? कि कशालाच काही अर्थ नसून आपण सर्वातच एक अर्थ शोधत बसतो? सूख म्हणजे तरी काय आणि दु:ख म्हणजे तरी नेमके काय? संजयने असंख्य प्रश्नांची रेवडी माझ्या मनात उडवून दिली आहे आणि कदाचित हेच त्याच्या कादंबरीचे अननुभुत असे वैशिष्ट्य आहे.
६. मानवी मनाला मुलभुततेत नेणारे, अस्तित्वाला ओचकारणारे अनेक प्रश्न मलाही पडतात. मीही एक अन्वेक्षक आहे. मलाही आहे त्या अस्तित्वाला आव्हान देणारे प्रश्न विचारावेसे वाटतात. मी विचारतोही. अहं ब्रह्मास्मि... असाही एक उद्गार कोठुन तरी उठतो. असेल का मी ब्रह्म? असलो समजा तर मग नेमके ब्रह्म म्हनजे तरी काय? मी ब्रह्म असेल तर मी नेमका आहे तरी काय? प्रश्न उमटतात खरे. संजय सांगतो या कादंबरीत...आहे तेथे थांब...पण कसे? हा कालप्रवास कोणालाच थांबु देत नाही त्याचे काय करायचे? क्षणाचीही उसंत हा महांकाल आपल्याला देत नाही. आपण प्रतिक्षणी मृत्युकडेच जात असतो हे सत्य आपण समजावूनच घेत नाही.
(श्री. राव इंग्रजी, हिंदी, मराठी आणि कोठे तेलगुतही बोलले...पण त्यांचे हे चिरस्मरनीय भाषण...)

ऐसे केले या गोपाळे....

शेख महमद यांच्या उदात्त पार्श्वभूमीवर लिहिलेली ही पटकथा. कथासूत्र   आंबेडकर जयंतीला निर्माण झालेला तणाव अजूनही त्या ३० - ४० हजार लोकवस...