दुस-या दिवशी “स्वीट सरेंडर” या गाण्यावर शुटींग सुरु झाले ते पाचगणीच्या टेबल टॉपवर. क्रेन, ट्रॉली असा शूटिंगला लागणारा सर्व सरंजाम होता. मिलिंद गुणाजी आणि शर्वरी जमेनीससह सारे शुटींगमध्ये व्यस्त झाले. मी काही वेळ उत्सुकतेने पहिले पण नंतर कंटाळलो. तेवढ्यात एक दहा-बारा वर्षाचा मुलगा माझ्याजवळ आला आणि माझ्याशी गप्पा मारू लागला.
Sunday, September 14, 2025
दत्तक घ्यायची गोष्ट...
Monday, August 18, 2025
My daughters thoughts on me...
The following thoughts were published on social media, written by my daughter Sonal. It is not that I remember all that she has said, but I feel proud that Sonal has such profound sentiments about me. I don't think I am worthy enough of her portrayal of me. I could not support her emotionally and financially when she was in need. I have made a few serious mistakes in my life that I couldn't amend due to my stubborn nature, and I know it must have hurt my kids a great deal. I also am not happy about it, but I have my own limitations, which I know and repent of, but can't help. But both the kids made their own paths and are challenging the higher heights through their tireless work and immense compassion towards the world with noble deeds, which I always expected from them.
Sonal is devoted to psychology and is always in an attempt to provide solutions to people who are in a state of disturbed mindsets through her firm "CEDAR". Her book "Breaking Point," published by Himalaya Publishing House, is also helping people who are facing relationship problems. A reader states on Amazon, "Really a Great book to understand the relationship between a couple. The author has explained various factors that help to remove negativities and strengthen the bond. A must-read for every couple." I think this one reaction speaks a lot about her writing.
The fact is, I am not used to praise, and if someone does so, my eyes get watery and my voice choked. Here is my daughter, who has suffered because of me is praising my deeds of the past, those she says helped her. I am overwhelmed because this made me feel proud that my daughter is so kind that she forgot what wrong I have done to her, but remembered the good things about me. And this is what she does with the world as well, I know.
Says Sonal Sonawani - Kharde

CHAIRMAN'S SPEECH
FROM CHAIRMAN'S SPEECH- WASHINGTON SOFTWARES LIMITED (2001)
Thursday, September 8, 2022
लढे
राकेश पाटील म्हणतात-
Sanjay Sonawaniसर, Sunil Khobragadeजी, ह्यांची अत्यंत माहितीपूर्ण अशी प्रतिक्रिया वाचली. त्यांनी उत्तम
उद्बोधक प्रतिवाद केला आहे आणि अशा अभ्यासपूर्ण चर्चा ह्यानिमित्ताने होणे
अपेक्षितही आहे.
ह्यानिमित्ताने लक्षात आलेल्या काही
बाबी :
1. सदर कायदा काँग्रेसच्या राजीव गांधी सरकारने 1989 च्या उत्तरार्धात ( निवडणुकांच्या तोंडावर) मंजूर केला आहे.
2. खोब्रागडे ह्यांच्या माहितीनुसार
सदर कायद्यातील कलम 18 हे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने
रद्दबातल ठरविले होते.
<<<1994 साली रामकृष्ण
बालोथिया व इतर यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात विशेष रजा याचिका दाखल करून या
कायद्यातील कलम 18 मुळे ( या कलमानुसार अत्याचार
करणाऱ्या आरोपीला कोणत्याही न्यायालयाने अटकपूर्व जामीन देऊ नये अशी तरतूद आहे )
संविधानातील अनुच्छेद 14 व अनुच्छेद 21 चा भंग होतो.यामुळे अनुसूचित जाती/जमातीं (अत्याचार प्रतिबंध)
कायदा संपूर्णपणे नाही परंतु या कायद्यातील कलाम 18 संविधानविरोधी आहे असा निर्णय दिला होता. मध्य प्रदेश उच्च
न्यायालयाच्या या निकालाविरुद्ध तत्कालीन मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात
अपील केले. या अपिलावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुजाता
मनोहर व न्यायमूर्ती जीवन रेड्डी यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय
रद्दबातल ठरविला आणि अनुसूचित जाती/जमातीं (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ ची
घटनात्मक वैधता अधोरेखित केली.( AIR 1995 SC 1198 ) >>>
अर्थात पुन्हा काँग्रेसच्याच
दिग्विजय सिंग सरकारने उच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊन कलम 18 कायम राहील ह्याची दक्षता घेतली.
कायदा अस्तित्वात आल्यापासून ते सदर
निकाल ह्या घटना 90 च्या दशकातील. आता त्यांनतर
एकविसाव्या शतकातील 16 वर्षे उलटली आहेत. तेव्हा
कायद्यातील काही तरतुदी, घटनात्मकता वगैरे बद्दल संविधानिक
मार्गाने चर्चा, आव्हान इ. व्हायला काही हरकत नाही.
न्यायसंस्थेवर, संविधानावर विश्वास असणाऱ्या सर्व
भारतीयांना त्याचे वावगे असण्याचे काही कारण नसावे.
त्यानिमित्ताने
<<धनगर लेखक संजय सोनवणी>>
किंवा
<<संजय सोनवणी हे सुद्धा मराठा
जातींच्या दहशतवादाच्या छायेत जगणाऱ्या धनगर जातीचे आहेत>>
हे जातीवाचक उल्लेख मात्र आयु.
खोब्रागडे ह्यांनी टाळले असते तर त्यांच्या माहितीपूर्ण पोस्टची परिणामकारकता, विश्वासार्हता मुळीच कमी झाली नसती. विचारांचा प्रतिवाद करताना
कुणाची जात शोधण्याच्या उपद्व्यापाची आवश्यकता पडायला नको होती. खरंतर हा
प्रतिजातीयवाद जो ह्यानिमित्ताने स्पष्ट होताना दिसतो तोही एकूणच समाजाच्या
आरोग्यासाठी घातकच आहे. ज्याची चर्चा सुरु आहे त्या एट्रोसिटी कायद्याची
सर्वसमावेशकता किती आवश्यक आहे, हेच त्यातून
प्रतिबिंबित होत नाही का?
तसेच <<( अलीकडे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे कट्टर विरोधक
असलेले अनिवासी भारतीय निओ लिबरल संजीव सभलोक यांनी स्थापन केलेल्या स्वर्ण भारत
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. ) >> ते बाबासाहेबांच्या कोणत्या विचारांचे कट्टर विरोधक आहेत, हे खोब्रागडे ह्यांनी सविस्तर मांडायला हवे आणि स्वर्ण भारत पार्टी-संजीव सभलोक ह्यांनीदेखील आपली भूमिका सुस्पष्ट केली
पाहिजे!
(अपूर्ण ...)
संजय क्षीरसागर म्हणाले...
tdreSpsoonclu196e131469mf0matammg30mS3l2h79br5900t eectup 1a ·
अॅट्रोसिटी अॅक्ट संदर्भात श्री.
संजय सोनवणींनी मांडलेल्या भूमिकेला माझं संपूर्ण समर्थन आहे. या कायद्याची संहिता
वाचली असता हा कायदा काही प्रमाणात एकांगी बनल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे आपल्याकडे कायदे व कायदे
वापरणारी जनता यांच्यात किमान पाच पन्नास वर्षांचे मानसिक अंतर असल्याचेही लक्षात
घेणे गरजेचे आहे.
अत्याचार प्रतिबंधक कायद्यांचा मूळ
हेतू काहीही असला तरी त्यांचा वापर अनेकदा स्वस्वार्थ साधण्याकरताच केला जातो हि
वस्तुस्थिती नाकारण्यात काहीच अर्थ नाही. अशा स्थितीत अॅट्रोसिटी कायद्याचा
दुरुपयोग होणं काही नवीन नाही वा त्यात नवलाची गोष्ट नाही.
प्रस्तुत कायदा रद्द व्हावा अशी जरी
बहुसंख्यकांची प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष मागणी असली तरी देशातील स्थिती लक्षात घेता
या कायद्याची गरजही लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे यात सुधारणेला वाव
असून तो अधिकाधिक व्यापक करणे योग्य होईल.
उदाहरणार्थ, हा विशिष्ट जाती समूहाचा संरक्षक न करता सर्वच जाती - धर्मियांचा
यात समावेश करून, ' बामनाची अवलाद , मराठ्याची जात ' अशा तऱ्हेची
विशेषणंही जातीय हेटाळणीच्या, अपमानास्पद
अत्याचाराच्या कृत्याखाली यावीत. ( इथे उदाहरणादाखल नमूद केलेल्या जाती केवळ
उदाहरणार्थ आहेत. कॉमेंट मध्ये थयथयाट करण्यासाठी नाही. )
प्रस्तुत कायद्या अंतर्गत तक्रार
दाखल करून घेण्यास टाळाटाळ / हयगय करणाऱ्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल होण्याची
तरतूद अंतर्भूत आहे. ती सर्वच गुन्ह्यांकरता व्हावी. जामीनाच्या संदर्भातील अट
जाचक आहे. ती शिथिल व्हावी. मुख्य म्हणजे गुन्हा दाखल झाल्यावर त्याची सत्यासत्यता
पडताळून पाहण्याची काहीएक तरतूद असावी. अॅट्रोसिटी संदर्भात खोटा गुन्हा दाखल
केल्याचे सिद्ध झाल्यास त्या संदर्भात केल्या जाणाऱ्या कारवाई, शिक्षेचीही तरतूद व्हावी. किंवा इतर प्रकरणांत खोटा गुन्हा दाकःल
करण्याची जी शिक्षा असेल तीच इथे लागू करावी. तसेच या कायद्यान्वये केल्या
गेलेल्या कार्यवाहीस कायदेशीर आव्हान न देण्याची जी तरतूद आहे ती रद्द व्हावी.
कारण यामुळे न्यायालयीन प्रक्रिया एकतर्फी होते असं माझं मत आहे. किंबहुना याच
नव्हे तर कोणत्याही कायद्या अंतर्गत केल्या जाणाऱ्या कार्यवाहीस कायदेशीर आव्हान
देण्याची तरतूद असेल तर आणि तरच नागरी हक्कांचे संरक्षण होऊ शकते असे माझे
प्रामाणिक मत आहे.
आपल्याकडील जातीय भावना, बोलीभाषेतील जातीय म्हणी वा प्रचलित शब्द यांची वारंवार गल्लत
होते. जेणेकरून जातीवरून अपमानास्पद शिवीगाळ केल्याची भावना मनात बळावते.
यादृष्टीने प्रस्तुत कायद्यात जरी तरतूद करण्यात आली असली तरी, ती बरीचशी अन्यायकारक आहे. जरी हे गृहीत धरलं कि स. १९८९ मध्ये
जेव्हा हा कायदा करण्यात आला तेव्हाची परिस्थिती खरोखरच भयानक होती तरीही २७ वर्षांच्या
--- दोन अडीच दशकांच्या स्थितीत काहीच फरक पडला नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल.
बदलत्या काळानुसार आपल्यालाही बदलणं भागच आहे. मग जो नियम व्यक्तींना, संस्थांना लागू होतो, तो कायद्याला का लागू होऊ नये ?
तूर्तास इतकेच.
Saturday, July 17, 2021
आधी संजय सोनवणी खोदा !!
Friday, July 9, 2021
काळ ही भावनिक बाब ?
मी जगातील सर्वात आळशी प्राणी आहे. मी स्वप्नात एक कादंबरी वाचली होती. नववीत असतांना. त्या कादंबरीचे मुखपृष्ठ ते आतील मजकुर मला आजही तोंडपाठ आहे. "व्यंकू शिबू" हे शिर्षक. मी ही कादंबरी इंग्रजीत (मराठीवर रागावल्याने) २००२ साली लिहायला सुरुवात केली होती. अर्धीमुर्धी झाली. ती सुटली ती सुटलीच. सुटलेली पुस्तके ही पुर्ण झालेल्या पुस्तकांपेक्षा जास्त आहेत आणि तेवढी तरी जपून ठेवण्याची शिस्त मला माहित नाही. त्यामुळे काय सुटले ते सुटले. पुर्ण झालेच तर झाले. नाही झाले तरी काय अडलेय? (कोणाचेही?) मी लिहितो हा माझाच मला शोध आहे, मला पडलेल्या, बालसुलभही असतील, प्रश्नांचा शोध आहे. कदाचित सर्वांचाच शोध आहे. मला कधी कधी वाटतेही कि मी एवढा आळशी जन्मायला नको होते. पण काय करणार?
Sunday, December 29, 2019
धनगर आणि मी
कधी मनोहर जलाशयावर घेऊनी मज चालला"
Friday, November 3, 2017
मीच माझं आभाळ चोरलंय...

मी गेली साताठ वर्ष संगणकावर लेखन करतो. म्हणजे टायपतो. उजव्या हातालाच खिडकी आहे. मला खुले अवकाश फार आवडते. मी येथे रहायला आलो तेंव्हा या खिडकीपार कोणतीही इमारत नव्हती. आता एक उंचच उंच इमारत उभी राहतेय. माझं आभाळ चोरलं गेलय. खरं म्हणजे हाताने लिहायची मजा टायपण्यात नाही. मनात येणा-या विचारांचा धो-धो प्रवाह आणि या टायपण्याचा वेग काही केल्या मॅच होत नाही. हातातून सरळ मन झरतं, संगणकावर तसे होत नाही. पण माझं हस्ताक्षर इतकं भयंकर होऊन जातं त्या वेगात लिहितांना की आता ते बरोबर वाचून टायपणारे डीटीपीचे लोकही राहिले नाहीत. टायपतच लिहिणे भाग आहे. शिवाय प्रकाशकांपासून संपादकांची सोयही त्याने होते. पण माझं अवकाश संकुचित झालं आहे. मी हातानं जे लिहिलं असतं ते असं नक्कीच लिहिलं नसतं. हात कागदाशी बोलायचे. ते आता बंद झालं आहे. अनेकदा असं वाटतं, माझ्यातल्या लेखकाला मी छाटुन आधुनिकीकरणाच्या छोट्याशा पेटा-यात कोंबला आहे. मीच माझं आभाळ चोरलं आहे.
कसं आहे हे जग? पहायला मी खूप पाहिलं. म्हणजे भौतिक जग म्हणाल तर अर्धे जग तर नक्कीच. ते मनसोक्त भोगलेही. तरीही पाहिलं काय म्हणावं तर फार फार तर काही जागा सांगता आल्या, अनुभव सांगता आले तरी काहीही पाहिलं नाही हेही तेवढेच खरे. शरीराचा सांगाडा इकडून तिकडे हिंडला आणि सांगाडे पाहिले, अनुभवले, भोगले एवढेच. खरे तर जग पाहतांना मला जगाबद्दल समरस भावना कधीच जागली नाही. म्हणजे जणू काही मी या जगाचा हिस्सा नाहीच. अनेकदा मलाही याचे आश्चर्य वाटत आलेय की मी कोणा परग्रहावरून तर नाही ना आलोय? म्हणजे बघा, तुमची धिंड निघालीय. अट्टल गुन्हेगारासारख्या बेड्या तुमच्या हातात घालून, बेड्यातून दोरखंड ओवत काढून बैलांना जसे रांगेत मिरवले जाते तसे रस्त्याने अट्टल गुन्हेगारांबरोबर नेले जातेय. काय वाटेल तुम्हाला? मला काहीच वाटले नाही. धिंडीचे वास्तव लक्षात आले आणि माझ्या शरीरातून आत्मा जसा बाहेर पडला, जवळच्या इमारतीच्या कौलांवर, झाडांच्या शेंड्यांवर बसून मी जसजसा नेला जात होतो तसा बसत राहिला. मला पहात राहिला. जसे काही हे माझ्याशी होत नव्हतेच. अत्यंत निर्विकारपणे मी बाजारपेठेतुन मलाच जातांना पहात होतो. लोकांच्या कुत्सित नजरा, उपहास आणि करमणूक मी स्वत:च एन्जोय करत होतो. जेंव्हा परत आणतांना मात्र मागच्या दाराने बिनबेड्यांचे आणले गेले तेंव्हा तर मी चक्क हसत होतो. कोणावर हे नाही माहित मला पण हसलो खरा.
समजा तुम्ही अकरा वर्षाचे आहात. तुमची तीन धाकटी भावंडे तुमच्यासोबत आहेत. सर्वात महत्वाची म्हणजे आई. तीही सोबत आहे. वडिल परागंदा झालेले आहेत. त्यांच्या शोधाला तुम्ही विनातिकीट निघाला आहात आणि एका रेल्वे जंक्शनवर आईच तुम्हा सर्वांना सोडून देते. एकटी तिच्या माहेरी निघून जाते. तुम्ही काय विचार कराल? किंवा आयुष्यात अशी घटना तुमच्यावर काय परिणाम करेल? एक लेखक म्हणून मी कल्पना करू शकतो. पण मला काय वाटले? काहीही नाही. आजही काहीच वाटत नाही. हे सारे एका सांगाड्याशी झाले. माझ्याशी नाही. बरे हे जाऊद्या. तुम्ही विवाहित आहात. एक मुलगी तुमच्या खूप प्रेमात पडते. इतकी की तिचे लग्न ठरले तरी ती तुमच्या कडून मुल मागते. तुम्ही देता. नंतर ती येते ती त्या मुलीला घेऊनच. त्या मुलीकडे पाहतांना तुम्हाला काय वाटेल? तिच्याकडे पाहतांना काय वाटेल? मला तरी काहीच वाटले नाही. म्हणजे मी बोलत होतो, हसत होतो वगैरे खरं. पण वाटलं काहीच नाही. आता ती कोठे आहे हेही मला माहित नाही. म्हणजे मी कधी चौकशीच केली नाही.
म्हणजे मी एक सांगाडाच नाही का? सांगाड्याला भावना नसतात. जगतांना मी भावना पाळल्या असं मला वाटत नाही. मी या फार थोड्या घटना सांगितल्या. एक विवाहित स्त्री माझ्या प्रेमात पडली. दोन वर्षात जवळपास ३०-३२ रात्री मी तिच्याबरोबर घालवल्या. असंख्य रोमांटिक क्षण आले. पण मी तिच्याशी एकदाही संभोग केला नाही. पण मी दोन लग्ने केलीत आणि निभावलीत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला माणूस ठरवत नाहीत. माझे मित्र मला आत्मचरित्र लिहा म्हणतात. खरे आहे. जीवनात सांगण्यासारखे एवढे आहे की जगातील कोणत्याही जगप्रसिद्ध चित्तथरारक कादंबरीलाही त्यांची सर येणार नाही. पण मी नाही लिहित. म्हणजे तसा प्रयत्न केला नव्हता असे नाही. पण नाही जमले. खरे म्हणजे आत्मचरित्र लिहायचे म्हणजे स्वत:वर तरी प्रेम हवे की नको? मला माझ्याबद्दल प्रेम नाही. उदासीनता असली तर असेल. खरे तर मला आठवायचाही कंटाळा येतो. लिहायचा तर मला त्याहून मोठा कंटाळा.
असो. हे जरा व्यक्तिगत झालं. पण अर्चनाताई मला लेखकाच्या नजरेत्न लिहा म्हणून सांगताहेत तर त्यात व्यक्तिगतच येणार. व्यक्तिगत जीवन सांगाडा म्हणून जगलो असलो तरी सांगाड्याचे लेखकीय जीवन मात्र तसे नाही. ते रसरशीत आहे. म्हणजे मला तरी ते तसे वाटते. आणि तेही मला लेखक म्हनायचे ठरले तरच. मी जगाची पर्वा फारशी कधीच केली नाही. किंबहुना मी मला या जगाचा भाग कधीच समजलो नाही. माझे जग हे कल्पनांतले जग आहे जे माझ्यासाठी खरे आहे. माझी पात्रे वाचकांना निरस वाटली तरी माझ्यासाठी ती जीवंत आहेत. जगणारी आहेत. आणि त्यांच्या सोबतीत मी एवढा रमलेलो असतो की हे बाहेरचे जग काही वाटून घेण्याच्या गरजेचे आहे असे मला कधी वाटतही नाही.
म्हणजे बघा, मी एखादे भावपुर्ण गाणे ऐकतो किंवा मीच दिलेले संगीत अनाहतपणे कधी गुंजत असते तेंव्हा मी रडतो. तसे हास्यास्पद असले तरी पडद्यावरचे भावूक प्रसंग माझ्या डोळ्यात पाणी आनतात. मी लिहितांना माझ्या पात्रांशी समरस एवढा होतो की त्यांच्या वेदनांनी कळवळून मी रडतो. माझी पात्रे मीच निर्माण केलेल्या रहस्याशी झगडत असतात तेंव्हा मी त्या रहस्याच्या खोल डोहात तळाशी जाऊ पहात असतो. मला आणि माझ्या नायकांना एकाच वेळेस रहस्य उलगडते. मला माझ्या कादंबरीचा शेवट सोडा, पहिली ओळ लिहिल्यावर दुसरी काय असनार हेही मला माहित नसते. लिहिता लिहिता मलाच मी आणि माझी पात्रे उलगडली जातात. कादंबरीची कथा मला आधीच माहित झाली तर मी ती कादंबरी पुढे लिहितच नाही. मग आराखडा बनवणे, पात्रांचे परस्परसंबध आधीच निश्चित करुन मग बेतल्यासारखी कादंबरी लिहिणे तर दुरच.
खरे तर लिहिले आणि पुस्तके प्रसिद्ध झालीत म्हणून मला लेखक म्हणयचे. मी मला लेखक मानत नाही. कवी नाही की नाटककार नाही. संशोधकही नाही की तत्वचिंतकही नाही. म्हणजे बघा मी नीतिशास्त्र लिहित होतो तेंव्हा मी सहज माझ्या एका मित्राला सांगितलं. तो फिस्सकन हसला. मी आणि नीति? हसण्यासारखेच आहे हे खरे आहे. पण मी अशा असंख्य हास्यास्पद गोष्टी केल्या आहेत. नीतिशास्त्र मी पुर्ण कोठे केले तर तुरुंगात जामीनाची वाट पहात असतांना. तेही टिळक यार्डमध्ये. अहो, लोकमान्य टिळक देशभक्तीसाठी जेलमधे गेले आणि तेथे गीतारहस्य लिहिले आणि मी फसवणुकीच्या आरोपाखाली जेलमधे गेलो आणि नीतिशास्त्र लिहिले. आता हे हास्यास्पदच आहे हे तुम्हालाही पटेल.
तर काय सांगत होतो...लिहिण्याबद्दल. हां. तर मी लिहिले म्हणून लेखक. इतिहासाचे उत्खनन केले म्हणून संशोधक. तत्वज्ञानावर लिहिले म्हणून चिंतक. कविता लिहिल्या म्हणून कवी आणि नाटके लिहिली म्हणून नाटककार. आता लिहिले म्हणजे लेखक होतो हे खरे असले तरी न लिहिताही लेखक असू शकतातच. किंबहुना अशा महान लेखकांची संख्या अंमळ जास्तच भरेल. लिहायची कलाच सापडली नव्हती तेंव्हा किंवा आजही अनेक निरक्षर असतात याचा अर्थ त्यांच्याकडे कसलेच सांगण्यासारखे चिंतन, विचार अथवा कथा नसतात असे थोडीच आहे. तर काय तर मी लिहितो म्हणून लेखक. पण तसे तरी खरेच आहे काय? आता विचार करतोय तर हे पटते की मी लिहिले म्हणून लेखक. तसे पाहिले तर मी नसते लिहिले तरी चालले असते. पण तरीही लिहिले म्हणजे काहीतरी असले तर पाहिजे.
खरे म्हणजे मी एक शोधक आहे. शोधक म्हणण्यापेक्षा अन्वेक्षक म्हणणे योग्य राहील. एक खाजगी डिटेक्टीव्ह म्हणून मी असंख्य खाजगी रहस्ये उलगडली. जगणे हेही एक रहस्यच. कळू न म्हणता न कळनारे. या रहस्यात सुसंगतींपेक्षा विसंगतीच जास्त. आणि मला विसंगती पटकन दिसतात. समोरच असणारी सामान्य बाब दुर्लक्षित करत इतिहासकार असोत की उत्खननकार, ते जे निष्कर्ष काढतात त्यातल्या विसंगत्या मला मात्र लगेच समजतात. या विसंगत्यांना टिपत त्यांना सुसंगत करण्याचा माझा व्याप म्हणजे माझे लेखन. जगणेही अशाच विसंगत्यांनी भरलेले. त्या विसंगत्यांचे सुसंगत ताणेबाणे म्हणजे कादंबरी किंवा कथा. किंवा तत्वज्ञान. किंवा नाटक. अगदी चित्रपटही. नाट्य निर्माण होते तेच मुळी जीवनाच्या अपार विसंगतीतून! आणि या विसंगत्या कोठे नाहीत? त्या इतिहासात आहेत. त्या जगण्यात आहेत. त्या समाजात आहेत. विचारवंतांत आहेत. लेखकांत आहेत. त्यांच्या साहित्यातही आहेत.
आणि मी स्वत: तर विसंगतीचा मुर्तीमंत असुसंगत पुतळा आहे. माझ्या जगण्यात कसलीही सुसंगती नाही. त्या विसंगतीला सुसंगत करण्याचा मी कितीही प्रयत्न केला तरी ते सुसंगतपणे मला समजलेले नाही. म्हणजे जीवन कोणालाच समजत नाही हे खरे असले तरी किमान त्यात कोठेतरी सुसंगती लावता येते. मला ती लावता येत नाही. कारण सारेच विसंगत आहे.
मी एके काळी प्रचंड वाचक होतो. आजही आहे. पण वाचनाचे विषय बदलले आहेत. आधी मी कादंब-या खूप वाचायचो. आता इतिहास बोकांडी घेतला आहे. आणि मी मात्र कादंब-या लिहितोय पण वाचत एकही नाहीहे. म्हणजे प्रयत्न केला नाही असे नाही. पण नेमाड्यांच्या हिंदूमुळे माझा तो प्रयत्न अयशस्वीच ठरला. मी कादंब-या वाचायचो त्या काळात मला सुसंगती-विसंगती अस्पष्टपणे कळायच्या. त्यामुळे नावडत्या कादंब-या क्वचित असायच्या. पण आवडत्या म्हनावे तर तसेही काही नाही. आउटसाईडर वाचली तेंव्हा जरा अस्वस्थ झालो होतो हे खरे. कदाचित मी स्वत:ला नकळत आउटसायडर समजत असल्यामुळे तसे झाले असावे. पाडस आवडली ती त्यातील निरागस स्वप्नाळुपणाकडून निर्दय वास्तवी प्रौढतेकडे प्रवास करणा-या ज्योडीमुळे...नि त्याचा बाप पेनीमुळे. पण डोक्यात बसली अशी एकही कादंबरी नाही, नाटक नाही की कविताही नाही. पण सारे वाचलेले साहित्य मिळून एक विक्षिप्त कोलाज मात्र तयार झाला. Form समजण्यापलीकडे त्यांचा मला काही विशेष उपयोग झाला असे नाही. तत्वज्ञानातही तेच झाले. विसंगत्याच जास्त. मग ते ग्रीक तत्वज्ञान असो की भारतीय. बौद्ध तत्वज्ज्ञान तर विसंगत्यांचा पुतळाच.
आपला इतिहास पहावा तर तोही तसाच. म्हणजे बघा ना, आपल्या भटक्या मेंढपाळाला...धनगराला इतिहास नसतो. फासेपारध्याला नसतो की सुतार-लोहाराला नसतो. महार-मांग-ढोर तर इतिहासातही अस्पृष्यच. अलीकडे त्या त्या जातींनीच आपापला इतिहास शोधायचा प्रयत्न सुरु केलाय पण त्यातही भ्रमांनी भरलेला अभिनिवेशच जास्त. बरे, भ्रम येतात कोठून तर ज्या साहित्यात त्यांचा इतिहास सापडण्याची सुतराम शक्यता नाही त्या साहित्याचा संदर्भ घेत आपल्या समजुती त्यावर लादल्याने. बरे, काहींना इतिहास आहे आणि काहींना इतिहास नाही असे कसे होईल? प्रश्न पडला आणि शोधाची सुरुवात झाली. विसंगत्या सुसंगत करण्याच्या प्रयत्नांत अनेक जातींचाच नव्हे तर जातिसंस्थेचाच इतिहास लिहून झाला. आता, लोकांना विसंगत्यांतून शोधलेली सुसंगती आपल्या मनाविरुद्ध असेल, समजुतींविरुद्ध असेल, प्रस्थापित मतांविरुद्ध असेल तर तो कोणाला आवडण्याची शक्यता नसते. आपल्याला समजुतींवर जगणे जास्त आवडते. अणि तरीही आपण परत "आमचा इतिहास का लिहिला गेला नाही?" हे कंठशोष करून विचारतो. ही विसंगती आहे. विसंगत्याही सुसंगतपणे समजावून घ्याव्यात हे मात्र कोणाला वाटत नाही. बरे, इतिहासच शोधायचा तर खूप मागे जावे लागते. अगदी पुरा मानवापर्यंतच नव्हे तर सृष्टीच्या जन्माच्या इतिहासाकडेही जावे लागते. मी गेलो. सारे सिद्धांत तपासत त्यातील विसंगत्या शोधत मी नवाच सिद्धांत मांडला. विश्वनिर्मितीचा सिद्धांत. सारे विश्वच आले तरी कोठून हाच काय तो शोध. अंतिम उत्तर कोणाकडेही नाही, सापडण्याची सध्या तरी सुतराम शक्यता नाही. याचा अर्थ शोध घेऊच नये असा तर नाही?
मला मृत्युचे अनावर कुतुहल आहे. मला मृत्युची भिती वाटत नाही असे मला वाटत होते. पण एका अपघातातून वाचलो आणि त्यावर शिक्कामोर्तब झाले. एका गुंडाने खंडणीसाठी माझ्यावर पिस्तूल रोखले आणि तरीही त्याला मी जे उत्तर दिले ते तो अजुनही विसरला नसेल. ही घटना घडली आणि मी त्याच रात्री एक गीत लिहिले, संगीतही दिले आणि पहाटे फोन करून मित्रालाही ऐकवून त्याचे शिव्याशाप खाल्ले. ते जाऊद्या. पण तरीही मृत्युचे कुतुहल कधी सुटले नाही. सारे धर्म, सारी तत्वज्ञाने अखेर मृत्युच्या चिंतनाशी, त्याबद्दल वाटत असलेल्या भयापाशी येऊन थांबतात...दिलासा कोणी पुनर्जन्मात शोधतो तर कोणी आत्म्याच्या अजरामरतेत. कोणी इश्वरात शोधतो तर कोणी बुवा-बापुत. पण आत्मा आहे काय? परमेश्वर खरेच आहे काय? शोध थांबत नाही. मी नववीत असतांना चक्क एक धर्मच स्थापन केला होता व तो भर पडत गेलेल्या तेरा अनुयायांसह चक्क पाच-सहा वर्ष टिकलाही. मी द अवेकनिंग कादंबरी लिहिली तीच मुळी मृत्युच्या शोधासाठी. नीतिशास्त्र लिहिले तेच मुळात या सनातन भयाची तत्वमिमांसा करण्यासाठी. सांगाड्याशी काय होते आहे याचा विचार करायला मला कधी फारसा वेळ मिळाला नाही. किंबहुना व्यक्तिगत सुख-दु:खांनी मी कधी उद्वेलितही झालेलो नाही. सारे क्षणिक आणि तात्पुरते. कधी कशात रमलो नाही. अगदी पुस्तकही प्रकाशित होईपर्यंतच काय असते ती उत्सुकता. नंतर मी त्याकडे ढुंकुनही पहात नाही. माझी पुस्तके, इकडे-तिकडे प्रसिद्ध झालेले फुटकळ लेखन मी कधी जपले नाही.
खरे म्हणजे मी सामाजिक आजिबात नाही. लोकांत मिसळायला मला मुळीच आवडत नाही. मला आधीपासुन मित्रच कमी. त्यातले अनेक गेले त्याचीही खंत नाही. नवे होत गेले. पण हाताच्या बोटावर मोजता येतील तेवढेच. पण तेही कायम राहतील अशी आशाही मी कधी बाळगली नाही. आणि विसंगती ही की मी तरीही सामाजिक आहे. माणसांचा कल्लोळ नेहमी माझ्या मनात उसळत असतो. मी पालांवरील वडारांच्या, फासेपारध्यांच्या किंवा डोगरतळी मेंढरं चारणा-या धनगरांच्या, किंवा मानसिक द्वंद्वाने पछाडलेल्या दुभंग होताहेत की काय अशा धर्मांतरीत पुर्वास्पृष्यांच्या व्यथा, वेदना, आशा, आकांक्षांत जगत असतो. मला दु:ख हे नेहमी सामुहिक स्वरुपात दिसते. ते किंबहुना एक स्वतंत्र रुप धारण करत मला म्हणत राहते..."बघ माझ्याकडे...कसा करणार नष्ट मला?" आणि ते हसत असते. मला आव्हान देत राहते. हतबलतेने मी ग्रासून जातो. आशाही तशाच आणि आजवर मात करण्याच्या उमेदीही तशाच. अन्यायाचीही मी कधीही जातवार विभागणी करु शकलो नाही. अन्याय म्हणजे अन्याय. मी सोयीने कधी प्रतिगामी ठरवला जातो किंवा पुरोगामी. मी सोयीने कधी याचा द्वेष्टा ठरवला जातो किंवा त्याचा. सांगाड्याला याचा फरक पडत नाही. या सांगाड्यापार असलेला जो मी आहे तो यातुनही मानवी मनाचा आणि त्यातील अपरंपार विसंगत्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत रहातो. जमेल तसे उत्तर शोधत रहातो. ते सापडत नाही. त्याने मात्र मी उदास होतो. खिन्न होतो. पण पुन्हा पेटतो. नव्या दमाने उत्तरे शोधायला वेगवेगळे पवित्रे घेत स्वत:शीच लढत रहातो.
एक सांगाडा आहे आंणि एक मी आहे. हे द्वंद्व आहे. म्हणजे व्यक्तिगत सुख-दु:खे माझ्यावर कधी राज्यच करू शकली नाहीत. केले असेल तर अत्यंत तात्कालिक. कशातच रमणे हा मुळी माझा स्वभाव नाही. किंबहुना माझी पात्रेही बव्हंशी अशीच. अविरत कशा न कशाचा शोध घेणारी. माझी पुस्तकेही तशीच. माझ्या नजरेतून जग काही विशेष नाही. ते तसेच आहे जसे हजारो वर्षांपुर्वी होते. बदल बाह्य आहेत. समस्या नवनव्या लेबलात आहेत ख-या पण त्यांचा मुळगाभा तोच आहे. तत्वज्ञानही तेच आहे आणि वर्तनसापेक्षताही तीच आहे. संदर्भ बदलत असतील, माध्यमं बदलत असतील, पण आक्रोशही तोच आहे. या तोच तोच पणाचा लोकांना कंटाळा येत नाही हेच खरे नवल आहे. माझ्या दु:खात, सुखात, यशात किंवा अपयशात काहीच नवीन नाही. मग माझ्या नजरेतून जगात नवीन काय दिसणार? हो, दिसला, तर या कंटाळ्यावर मात करत प्रत्यक्ष जगण्याला सांगाडा करुन टाकत त्याहीपार असलेल्या अगणित ’स्वं’चा निरंतर शोध.
मी अनेक लेबले चिकटवला गेलेला माणुस आहे. मी निर्दय किंवा टोकाचा बेपर्वा वाटावा इतका अलिप्तही आहे. तथाकथित अनैतिक तर आहेच आहे. या लेबलांत मला अनेकजण शोधतात. त्यांना मी कसा सापडेल? या लेखात अगणित वेळा "मी" हा शब्द आलाय. पण तेही अपरिहार्य आहे. कारण मी आहेच. या "स्व" ला तिलांजलि देण्याचा मार्ग मला अजून तरी सापडलेला नाही. आणि भुतकाळातील लोकांनी दिलेल्या उत्तरांवर मी कधीच अवलंबूनही राहिलेलो नाही. पण माझ्या दोन मी आहेत. एक लेबलवाला, म्हणून अनेक दिसणारा - वाटनारा ’मी’ आणि दुसरा जीवनाचा निरंतर शोध घेणारा ’मी’. या दोन "मीं"मध्ये द्वंद्व होतच नाही असे नाही. पण जिंकतो तो दुसरा ’मी’.
तर, सांगायचा मुद्दा हा की मी लिहिलं म्हणून लेखक आहे. तसं काही मी ठरवलं नव्हतं. खरे तर जीवनात काय बनायचं हेही मी ठरवलेलं नव्हतं. कोणी मला तसं सांगितलंही नाही आणि सांगितलं असतं तर मी ऐकलं असत असंही नाही. जे होत गेलं ते मी होऊ दिलं. जीवन जसे आले तसे ते मी स्विकारत गेलो. हेच हवे नि ते नको असले नखरे मी केले नाहीत. हे असेच का ते तसेच का असले फालतू प्रश्न मला कधीच पडले नाही. हे हवे... ते नको याचा मग काही संबंधच नव्हता. मी उद्योजकही झालो ते काही महत्वाकांक्षेने वगैरे पेटून नव्हे. त्यामुळे उद्योग उभारले आणि ते डोळ्यांदेखत नष्टही झाले याचे मला तात्पुरते सोडले तर आनंद-दु:ख काहीच नाही. किंबहुना व्यक्तिगत गतकाळाकडे पहायला वेळही मिळत नाही आणि मिळाला तरी मागे पहायची गरजही वाटत नाही. कारण जीवनाचा शोध थांबत नाही. जीवन व्यक्तिगत असणे, त्यात रमणे, काटेरी जखमा कुरवाळत बसणे, गतकालीन यशांवर हुरहुरणे हे सारे करण्यासाठी लागणारे स्वप्रेम माझ्यात नाही. जेही झाले, बस...झाले.
तर शेवटी माझ्या नजरेतून काय आहे? माझे आभाळ चोरले गेले आहे आणि ते अज्ञात क्षितीज मला दिसेनासे झाले आहे. माझा आत्मा मला सामावून न घेऊ शकणा-या पेटा-यात बंदिस्त केला जातो आहे आणि ती तडफडच काय ती तेवढी मला अस्वस्थ करते आहे. या गगनचूंबी सामुदायिक आक्रोशांच्या तटबंद्या मला भेदता येत नाहीहेत. या वेदनांनी माझे आभाळ चोरले आहे. द्वेषांच्या उद्रेकणा-या सैतानी प्रेरणा मला एका पेटा-यात बंदिस्त करू पहात आहेत. जीवन विसंगतींनी भरलेले आहे. या विसंगतींचा शोध घेऊन घेऊन दमलो असलो तरी मी या अभेद्य वाटणा-या तटबंद्या एक दिवस कोसळवेल ही माझी अजरामर उमेद मात्र आजही कायम आहे. सांगाड्याचं काय...तो आज असेल उद्या नसेल. पण हा माझ्यातील "मी" हा सर्वांत असलेला "मी" आहे. आणि तो निरंतर शोधक आहे. असण्याचा आणि नसल्याचा, उत्पत्तीचा आणि विनाशाचा शोध घेणारा "मी". त्याला कसल्याही व्यक्तिगत व्यथा नाहीत कि वेदना नाहीत. आनंद नाही की दु:ख नाही. तो भावनोद्रेकी असुनही भावनाहीन असल्याने नैतिकही नाही की अनैतिकही नाही. या "मी" चा प्रवास अनादि आणि अजरामर आहे. जीवनात भरलेल्या अगणित विसंगत्यांना एक दिवस हे सर्व "मी" सुसंगत बनवत एका सुस्वर लयीत बदलवतील ही आशा आहे. मी लेखक नाही. मी जीवनाचा शोधक आहे.
(Published in "Dilasa" Deepavali issue, 2017)
Monday, January 4, 2016
माझ्या लग्नाची गोष्ट...
१९७९. मी एफ. वाय. बी. कोमला होतो. डा. अशोक वैद्य यांचा कंपाउंडर म्हणून काम करायचो. नियमित कोलेज कधे केले नाही. फक्त सेमिनार व परिक्षेपुरता जायचो. पाबळ (तेच मस्तानीचे) येथे रहायचो. कोलेज राजगुरुनगरला. एसटीचा पास ४० रुपयांत मिळायचा. तेवढे पैसे नसायचेच. त्यामुले ते कधी शक्य झाले नाही. सेमिनार-परिक्षेला वाळूच्या ट्रकने जायचो. डा. अशोक वैद्य यांचे एक मित्र होते पुण्याला. कलतारसिंग पंजाबी. त्यांच्याबरोबर एकदा पुण्यात आलो. त्यांच्या घरी गेलो. तेथे भेट झाली पुष्पा पंजाबीशी. तिचा नववीचा रिझल्ट आला होता. उत्साहाने दाखवत होती. मी प्रेमात पडलो.
कधी व्यक्त केले नाही. डायरी मात्र लिहू लागलो. पुण्याला मला एकटे येता येणे शक्यच नसायचे. पैसे कोठायत? गेलो तर वैद्यजींबरोबर. आम्ही गप्पा खूप मारायचो. त्या काळात मी रशियन कादंब-या अनेक वाचत असल्याने इंप्रेशन मारायला टोल्स्टाय ते शोलोखोव यांच्यावरच जास्त बोलायचो. कपडे म्हणाल तर पायजमा व छपरी शर्ट. ( त्या शर्टाचीही एक कहाणी आहे.) आपल्यातल्या न्यूनता माणूस दुस-या अंगाने भरुन काढायचा प्रयत्न करतो म्हणतात...मी माझी अक्कल पाजळायचा उद्योग केला.
ती दहावी पास झाली. तिला अकरावीला प्रवेश मिळावा म्हणून अनेक कोलेजांचे फोर्म रांगेत उभे राहून आणले. पण प्रयत्न होता सेंट मीराजचा. आणि लागला नंबर सेंट मिराजमद्ध्ये. कारण ती फक्त मुलींची शाळा-कोलेज वगैरे. किमान संभाव्य स्पर्धकांचा मी असा बालीश बंदोबस्त केला.
अजून तिला मी तिच्यावर प्रेम करतो हे माहित नव्हते. मी सांगायची हिंम्मत करणे शक्य नव्हते. वर्षामागून वर्षे गेली. मी एम. कोम. करायला पुण्यात आलो. आधी एका मराठी नंतर हिंदी पेपरमद्ध्ये काम करत शिकत होतो. पगार होता दिडशे रुपये. तेंव्हा खानावळ होती महिना २५० ते ३०० रुपयांची. एक वेळचीच खानावळ लावत महिना ५ रुपये भाड्याचे शनिवार वाड्याजवळील शिक्षकांच्या मुलांच्यासाठी असलेल्या होस्टेलमधे आधी आणि नंतर खुद्द दैनिकाच्याच कार्यालयात राहत होतो. डा. वैद्य पाबळलाच सुटल्याने तिच्या घरी जायला निमित्तही नव्हते. माझ्या मित्रांना पिडत तिच्या इमारतीखाली तासंतास उभा रहात ती दिसेल या आशेने उभा रहायचो.
एकदा तिच्या घरी जायची संधी मिळवली. माझ्या हाती त्या दिवशी माझी डायरी होती. घरी ती होती. तिची मम्मीही होती. (बाप महाखडूस) गप्पा मारत बसलो. तिने मला अचानक माझी डायरी मागितली. मी काही देईना. तिने घेतलीच. दोनचार पाने उलटली. मी आता जातो जीव कि नंतर असा बसलो. म्हटलो आता खा खेटर. या घरातला आजचा शेवटचा दिवस नि हे शेवटचे दर्शन. तिचा चेहरा गंभीर झाला. डायरी माझ्या हाती दिली. "तुज्याकडून ही अपेक्षा नव्हती..." ती म्हणाली. मी गारेगार झालो होतो. मी "येतो..." म्हणून जे सटकलो तो सटकलोच.
आता तिला माझ्या मनात काय आहे हे तर माहित होतेच. माझी आर्थिक स्थिती तर दरिद्र वस्त्रे घालून बसलेली. पण म्हणतात ना...दिल है कि मानता नहीं. मी तिला कोलेजच्या बाहेर तिष्ठत भेटायचा प्रयत्न करायचो...तर ती झुरळाकडे टाकावा तसा कटाक्ष टाके. तिच्या मैत्रिणींना माझी दया येई. माझी निष्ठा पाहून तर एक मैतरणी मला म्हणाली, असला लवर मला मिळायला हवा होता. (कोणता चित्रपट पाहून आली होती कोणासठाऊक!) ती काही त्या लायकीची मला वाटलीच नाही पण मी तिलाच माझा पोस्टवुमन बनवले. माझी प्रदिर्घ (तेवढी मी कथाही लिहित नाही) पत्रे तिच्या माध्यमातून तिला पाठवे. उत्तर कधी आले नाही. तिच्या वाढदिवसाला तर मी एकदा कोलेजच्या पत्त्यावर चक्क तार पाठवली. तिच्या मास्तरणीने तिला झाप झाप झापले हे मला नंतर समजले. पण मामला काही केल्या फिट होईना. उलट बिघडला.
सात वर्ष गेली. तोवर माझी काही पुस्तके प्रसिद्धही झाली होती. आवर्जुन धाकाकत्या हृदयाने मैत्रीणीमार्फत पाठवलीही होती. तिला त्याचे कसले कौतूक?
पण १९८६ साल पावलं. माझा प्री-थिसीस एका इंग्लंडमधील विद्यापीठाने स्विकारला आणि मला आशिया खंडातील धर्मांवर तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी निमंत्रित केलं. माझा जीव तर इकडे. मी कळवळून शेवटचं पत्र लिहिलं. "आता तरी हो म्हण...नाहीतर मी चाललो इंग्लंडला..." आणि काय चमत्कार....दुस-या दिवशीच मला उत्तर मिळाले. पहिले उत्तर!
झाले. इंग्लंड रद्द! ती भेटली बाहेर. हृदय तळहातावर ठेवून बोललो. तशी ती भावनिक नाही. पण त्या दिवशी तीही भावूक होती. मी अजून दरिद्रीच होतो. भविष्याची स्वप्ने दाखवायची माझी लायकीच नव्हती.
नंतर मी व्यवसायात पडलो...जाहिरात व्यवसायात. आणि पैशांचा माझ्याकडे ओघ सुरु झाला. भाड्याच्या सायकलने पुणे पालथे घालणारा मी चक्क एम-५० चा मालक झालो. नंतर फियाटही घेतली. (नंतर माझ्या आयुष्यात सगळ्या अत्याधुनिक कार्स येवून गेल्या) एम्प्रेस गार्डन हे आमचे संकेतस्थळ बनले. दर सोमवारी आम्ही भेटायचो. हा सोमवार एवढा मित्र-मैत्रीणींत गाजलेला कि अमिता नायडू "Waiting on Monday!" नांवाची कादंबरी लिहिन म्हणत होती.
१९८९ आले. मी तिला एम्प्रेस गार्डनमधुन तिच्या घराच्या जवळ कोप-यावर सोडायला आलो. कसे कोणास ठाऊक कलतारसिंग पंजाबींनी आम्हाला पाहिलं. काही बोलले नाहीत. घरी जाऊन पोरीवर जाळ काढला. ते तिला घेऊन दुस-या दिवशी माझ्या कार्यालयात रिक्षाने आले. प्रशांत पोखरकरांसोबत मी तेंव्हा चित्रपट पहायला गेलेलो. वाचलो. कारण महाराज सुरा बरोबर घेऊन आलेले.
पण नंतर वार्ता समजली. मी हतबुद्ध झालो. मी आमचे दादाजी उर्फ दिनेश गंगावणेंना कळवले. ते म्हणाले...आलोच! आम्ही भेटलो. आम्ही तिच्या घरावर धाड घालायचा निर्णय घेतला. त्याच सायंकाळी मी आणि दादाजी तिच्या घरात हजर. बापाने मला पाहिले आणि सन्नकण त्यांच्या मुलीच्या थोबाडीत वाजवली. काही चर्चा करावी अशी स्थिती नव्हती. मी राणीला (हे तिचे घरातील नांव) म्हणालो..."चल..."
एका सेकंदात ती बाहेर पडली. आम्हीही बाहेर पडलो. दार बंद करून बाहेरची कडी लावली. खाली आलो. दादाजींनी रिक्षा करुन दिली. सरळ चिखली गाठली. आईने आम्हा उभयतांना पाहिले. आया मनकवड्या. घरात घेतले. काही विचारत बसली नाही. दादा घरात आले...वेगळे वातावरण पाहून बालसुलभ प्रश्न विचारले...पंचांग काढले...म्हणाले...परवा आळंदीला जावून लग्न लावून टाकु.
तिचा जीव किती भांड्यात पडला मला माहित नाही...पण मला तर स्वर्ग जिंकलो असे झाले होते. खिशात पैसे नव्हते. पिंपरीला माझा क्लायंट होते. परमानंद झमतानी. त्यांना परिस्थिती सांगितली. त्यांनी ड्रावरमधून एक सेकंदात ३,००० रुपये काढून दिले. खरे तर एक मराठी पोरगा सिंधी मुलीशी लग्न करतोय म्हटल्यावर त्यांनी, एकुणातील जातीय/प्रांतवादी स्थिती पाहता मदत नसती केली तरी वाईट वाटले नसते. पण केली. मी घरी येईपर्यंत माझ्या बहिणीचेही पिनाककांत दत्त यांच्याबरोबर प्रलंबित असलेले लग्न आळंदीलाच करायचे ठरले होते.
दुधात साखर.
आम्ही घरचे पाचसहा आणि नियोजित वधू-वर एका मालवाहतूक टेंपोत बसून-लटकून आळंदीला पोहोचलो. कोणत्यातरी देवळात आमचे लग्न लागले. दोन हजार रुपये खर्च आला. (दोन लग्नांचा, म्हणजे हजारी एक लग्न पडले.) सायंकाळी आम्ही नव्या भावनिक जगात जायला, नवी आव्हाने घ्यायला सज्ज झालो.
सासरे नंतर मुलगी झाल्यानंतरसुद्धा भेटायला आले नाहीत. सासू तर आईच. मी नसतांना लेकीला भेटून जायची. सास-यांना मी भेटलो लग्नानंतर तब्बल पंधरा वर्षांनंतर.
झमतानींना मी ३००० रुपये परत करू शकलो नाही...म्हणजे त्यांनी घेतलेच नाहीत. त्यांचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी. त्यांचा फोन आला नाही असा एक वाढदिवस गेला नाही.
हे का सांगत आहे?
प्रेम ही शक्ती आहे. लग्नात तुम्ही किती उधळता याने तुमचे प्रेम किंवा प्रतिष्ठा ठरत नाही. प्रतिष्ठा ही नेक जगूनच मिळते. एकमेकांचे होऊनच मिळते. लग्न करतो म्हणजे आपण एकमेकांना वचन देतो...समाजासमोर! ते वैभव दाखवण्यासाठी नाही. निष्ठा आणि समर्पण दाखवण्यासाठी! मी नंतर चांगलाच वागलो असे नाही. मी रुढ सामाजिक संकेत धिडकारले आणि प्रेमाचे अद्वितीय आविष्कार भोगले...जगलो....पण तेही निष्ठेने,..सवंगपणे नाही.
लग्नात तुम्ही किती खर्च करता हे महत्वाचे नाही....तुम्हाला प्रेम करता येते का, निस्सीम मन:पूत जगता येते का...
हा खरा प्रश्न आहे!
Wednesday, July 23, 2014
कवट्या महांकाळ....
"सहदेव भाडळी" हे तांत्रिक पुस्तक आमच्या लहाणपणी फारच लोकप्रिय होते. त्यासोबत अशी अनेक तंत्र-मंत्रांची पुस्तके सर्क्युलेट व्हायची. मी मिळेल ती पुस्तके वाचत असे त्यात हीसुद्धा. त्यात काही प्रयोगशील असेल तर प्रयोगही करत बसायचो. म्हणजे कार्व्हरचे पुस्तक वाचले तर शेगदाण्यांपासून दूध बनवायचाही प्रयोग केला...त्याचा चहा करायला लावून तोंड वाकडेही करून घेतले. असो. आता या पुस्तकांचा पगडा बसला आणि तांत्रिक साधना करून अद्भूत शक्तींना वश करायचे मनावर घेतले.
मी तेंव्हा सातवीत होतो. मला तेंव्हा मित्र असे नव्हतेच. मी एकटा माझ्याच स्वप्नरंजनांत भटकत असे. त्यामुळे सारा परिसर पायतळी अनेकदा तुडवलेला. कोठे काय हे सगळे पाठ. साधनेला साधनं लागतातच. पहिली हवी होती ती माणसाची कवटी. ती तर हवीच. वरुड्याच्या शिवेजवळ एक जुनाट मसनवटा होता. दुर्लक्षित, झुडपांनी व्यापलेला...केवळ विशिष्ट आकारांच्या उंचवट्यांमुळे तेथे कधी काळी माणसं गाडली आहेत हे लक्षात यायचं. आता एखादं थडगं उकरणं भाग होतं. लोकांनी पाहिलं तर दगडं फेकून मारलं असतं. गांवाकडे सहा-सातनंतर सुमसाम व्हायची. वीज नव्हतीच. त्यामुळे रात्र म्हणजे काय सुम्म रात्रच. मी दिवस मावळल्यानंतरची वेळ ठरवली. एके दिवशी दिवसाच जावून कोणतं थडगं उकरायला सोपं जाईल याचा अदमास घ्यायचा प्रयत्न केला. जुनाट असल्याने वरची माती जाम घट्ट झालेली, त्यावर गवत उगवलेले..काहींना तर झुडपांनीच अदृष्य करुन टाकलेलं. आता थडगं किती खोल असतं हे मला काय बोडक्याचं माहित? पण एक निवडलं...आणि त्याच संध्याकाळी कपचीदार दगडानं उकराउकरी चालू केली.
प्रार्थना एकच होती जी बाजू उकरतोय ती डोक्याकडचीच निघू दे. कारण दगडानं उकरणं एवढं सोपं जात नव्हतं. अंधार वाढू लागला तसा सारी झुडपंही मला भुतांगत दिसायला लागली. पण म्हटलं...तुम्हाला लेको वश करून नाचवणार आहे...भेदर्लो असलो तरी बरच उकरलं...पण अजुन काय गवसेना...
बरंच खोदावं लागणर हे पुन्हा सकाळी जाउन पाहिल्यावर लक्षात आले. थोडी उकराउकर करत अंदाज घ्यायचा प्रयत्नही केला. पुन्हा अंधार पडायला लागल्यावर तिकडं.
तीन दिवसानंतर बराच खाली गेलो. त्याच्या दुस-या दिवशी मग दिवसाच उद्योग केला. थोड्या प्रयत्नांतच मी खजिन्याजवळ पोचलो. चक्क मान वळवलेली, मणक्यापासून सुटी झालेली कवटी दात विचकत पहुडलेली. वर उचलली. मातीचे ओघळ तोंडातून डोळ्यांतुन बदाबदा पडले. भराभरा जमेल तशी माती पुन्हा लोटली. जवळच एक छॊटा ओढा होता. निरगुडीच्या दाटीत लपवली. जागा लांबून दहा वेळा तरी पाहिली असेल...कारण तिला हलवायचे म्हणजे रात्रीच ते काम करावे लागणार होते. जागा विसरून चालणार नव्हतं.
आनंदाच्या लाटांवर स्वार मी घरी आलो. (शाळेत मी क्वचित जायचो.) त्या दिवशीची कामे केली. सायंकाळी परत तिकडे. कोणी नाही हे पाहून कवटीचा ताबा घेतला. माळ ओलांडला आणि ओढ्याला माळाईच्या डोहाजवळ आलो. तीच माझ्या साधनेची जागा असनार होती. त्या डोहाकाठी एक शमीचं वाळकुटलेलं खुजं जुनाट झाड झाड होतं. त्याखालीच माळाईचा शेंदरी तांदळा. मी झाडावरच्या दुबेळक्यातल्या फातलेल्या जागेत कवटी घुसवली. खाली उतरलो. कोणाला दिसनार नाही ना याचा अदमास घेतला. परतलो ते मध्यरात्री परत येण्यासाठीच.
आम्ही तेंव्हा जिजाबाच्या वड्यात रहायचो. म्हणजे चार बाय दहाची खोली होती. स्वयंपाकासाठी आणि जरुरी सामान ठेवण्यापुरती ती कामाची. बाकी आम्ही ओसरीत नाहीतर खालच्या अंगणात झोपायचो. सारे लवकर झोपी जात त्यामुळे सटकणे हे काही अवजड काम नव्हतेच.
अनावर उत्सुकतेने मी साधनेचे तंत्र पुन्हापुन्हा आठवत होतो. मंत्र तर पाठ कधीच झालेले. आपल्याला दिव्य शक्ती प्राप्त झाल्यावर काय काय करायचे याचे स्वप्नरंजन. सारे झोपलेत याची खात्री करत करत बराच वेळ गेला मग निघालो.
रात्र कितीही झाली तरी चांदण्याचा धुसर प्रकाश असतोच. खेड्यातल्या माणसाला तो पुरतो. मी माळ ओलांडला. शमीवरची कवटी ताब्यात घेतली. छती धडधडत होती हे खरे. पण आलो डोहाच्या काठावर. ब-यापैकी पानी होते. (आजही असते. हा डोह मी "...आणि पानिपत" मद्ध्ये एक पात्रच बनवून टाकला आहे. या डोहाशी माझ्या अनेक रमणीय आणि तेवढ्याच दु:खद आठवणी निगडित आहेत.)
शर्ट व चड्डी काढली. नागडा झालो. कवटी घेऊन पाण्यात उतरलो. छातीपर्यंत पाण्यात आलो. कवटी दोन्ही हातात घेतली. हात उंचावले. "ऒम -हीं क्लीं स्त्रीं..." पासुन पुनश्चरणे सुरू झाली. हळु हळु भिती गेली. मंत्र मी मोठ्यानेच म्हणत होतो. तेथे ऐकायला येणार तरी कोण होते म्हणा...
भुतांशिवाय?
किती वेळ गेला हे माहित नाही. पुस्तकातील वाक्य आठवत होतो...साधकाने संयम ठेवला पाहिजे...निष्ठेने वाट पहावी लागते वगैरे. माझ्यात सम्यमच संयम दाटून भरला असल्याने मला घाई नव्हती. पण मी भुतांना वश करणार होतो हे नक्की...
अनेक दिवस असेच गेले. काही खाडेही झाले. भूत काही दिसलं नाही मग वश काय होणार?
अजून काही दिवस गेले आणि मी कवटी डोहात फेकून दिली.
नवे प्रयोग समोर दिसायला लागले होते ना....!
ऐसे केले या गोपाळे....
शेख महमद यांच्या उदात्त पार्श्वभूमीवर लिहिलेली ही पटकथा. कथासूत्र आंबेडकर जयंतीला निर्माण झालेला तणाव अजूनही त्या ३० - ४० हजार लोकवस...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...