Showing posts with label कादंब-यांच्या जन्मकथा. Show all posts
Showing posts with label कादंब-यांच्या जन्मकथा. Show all posts

Wednesday, December 12, 2018

रक्त हिटलरचे


Image result for rakta hitlarache storytel


हिटलर हे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे खलपात्र आहे. असे असले तरी तो ब-याच लोकांचा नायकही आहे. विसाव्या शतकाचा प्रथमार्ध गाजवला तो त्यानेच. त्याच्या समोर तत्कालीन अनेक खलपुरुष झाकोळले गेले. ज्याने दोन अणुबॉम्ब टाकुन क्षणार्धात दोन-अडिच लाख माणसं मारुन टाकनारा व किरणोत्सर्गाने लक्षावधी लोकांचे जीवन होरपळून काढणरा क्रुरकर्मा, जो ट्रुमन, त्याबद्दल मात्र सहसा कोणी कटुतेने बोलतांना तुम्हाला दिसणार नाहीत. क्रौर्याचा इतिहास जवळपास सर्वच राष्ट्रांनी जपला आहे. असे असले तरी कशाला क्रौर्य म्हणायचे आणि कशाला नाही हे अत्यंत सोयिने ठरवले जाते. क्रौर्य हे कोणाचेही वाइटच असते म्हणून सर्वच क्रुरांचा निषेध केला पाहिजे हे माणसाला पटत नाही हेही अजबच असले तरी मानवी सत्य आहे.

असो. कादंबरीकार म्हणून मला द्वितीय महायुद्धाचा काळ हा आव्हानात्मक वाटत असला तरी मी त्यावर लिहिले नाही. पण एकदा हिटलरचा विचार करीत असता सहज मनात कल्पना आली, या हिटलरला मुलगा असता, त्याला वाचवुन एकनिष्ठ नाझींनी त्याला दुर कोठेतरी अज्ञात ठिकाणी हलवले असते तर तो मुलगा मोठा झाल्यावर त्याने काय केले असते?

इव्हा ब्राउन ही त्याची प्रेयसी होती हे सर्वज्ञात आहे. आत्महत्या करण्याआधी त्यांनी लग्नही केले होते असे मानले जाते. या इव्हानेच त्या मुलाला जन्म देताच मुलाला सुरक्षितपणे हिटलरने अन्यत्र हलवले असणे या कल्पनेत अशक्य नव्हते. मी सर्व संभावनांवर विचार करु लागलो. न्युरेंबर्ग खटल्याचे काही कागदपत्रही तपासले. अनेक नाझी नेते अर्जेंटिनासारख्या देशात पळून गेले होते. खटल्यात ते कधीही समोर आले नव्हते. मोसादने काहींना शोधुन ठार मारले असले तरी काही अजुनही अज्ञातवासातच होते. मार्टिन बोरमान हा असाच एक हिटलरचा हस्तक. त्याचीही माहिती काढली. त्यातुन ही कथा फुलारत गेली. तिचेच नांव "रक्त हिटलरचे"

या कादंबरीचा नायक अर्थातच समीर चक्रवर्ती. त्यावेळीस जगात अजब घटना घडत होत्या. जर्मनीला दुभागणारी भिंत पाडली गेली होती. नवनाझीवाद जर्मनीत फोफावू लागला होता. हे वर्तमानातले सत्य मला कादंबरीची विश्वसनीय पार्श्वभुमी तयार करतांना कामाला आले. कादंबरीत मी याच काळात रॅम्से द टेक्सन हे विचित्र नांव धारण करणा-या आंतरराष्ट्रीय माफियाचा उदय दाखवला. त्याचे खरे हेतु गुन्हेगारीचे दिसत नाहीत हे तो जेंव्हा क्युबात झालेल्या अटकेनंतरही पलायन करतो तेंव्हा इंटरपोलच्या लक्षात येते. फ्रांसमध्ये समीर चक्रवर्तीला पाचारण करण्यात येते. डेव्हन नांवाचा अधिकारी टेक्सनला शोधुन ठार मारायची कामगिरी समीरला देतो. समीर अथक संघर्षातुन, रहस्याच्या गुंत्यातुन शेवटी टेक्सनला शोधतो. यातुन आंतरराष्ट्रीय राजकारण, गुन्हेगारी आणि समाजव्यवस्थेचेही गुंतागुंतीचे बनलेले धागेदोरे उलगडत राहतात. समीर या प्रक्रियेत त्यालाच नव्हे तर त्याच्या जन्मरहस्यालाही शोधतो. पण तो त्याला ठार मारत नाही. त्याला सुभाषबाबु आठवतात आणि तो त्याला पोलिसांहाती सोपवतो.

थरार कादंबरी लिहिने अनेकांना सोपे वाटते, पण ते तसे नसते. वास्तव आणि कल्पनांचा मेळ अशा कादंब-यांत घालतांना सर्वात अधिक कष्ट घ्यावे लागतात. ही कादंबरी खूप गाजली. खूप जणांनी तिची तुलना "सेवन्थ सिक्रेट"शीही केली. सेवन्थ सिक्रेटमध्ये हिटलरने आत्महत्या केलेलीच नव्हती, तो नंतरही जीवंतच होता असे दाखवून एक रहस्य गुंफले होते. ती कादंबरी उत्कृष्ठच होती यात वादच नाही. पण हिटलरला मुलगा असणे व त्याने आधुनिक काळात नवनाझीवादाचे प्रवर्तन करणे वास्तवाशी जवळीक साधणारी कल्पना होती. कारण जर्मनीत तेंव्हा तसे घडतही होते.

रहस्य, थरार, जर्मनी, फ्रांस ते अर्जेंटिनापर्यंत पसरलेले या कथेचे धागेदोरे आणि त्यातील हिटलरपुत्राचे थर्ड राईश पुन्ह उभारण्याचे स्वप्न या भोवती फिरणारी ही कादंबरी. या कादंबरीने मला मराठीतील पहिला आंतरराष्ट्रीय थरारकादंबरीकार होण्याची संधीही मिळाली. या कादंबरीच्या आठ आवृत्या झाल्या.

आता ही कादंबरी श्राव्य माध्यमात जागतिक पातळीवरच्या स्टोरीटेल या स्विडीश प्रकाशन संस्थेतर्फे प्रसिद्ध झाली आहे. समीर चक्रवर्ती हा खरा भारतीय महानायक त्यामुळे जगभरच्या थरारप्रेमींना पुन्हा भेटतो आहे. लोकप्रिय होतो आहे. हा थरार ऐकण्यासाठी https://www.storytel.com/in/en/books/116434-RAKTA-HITLERCHE या लिंकला भेट द्या.

Saturday, January 13, 2018

भारतीय सार्वभौमतेला "धोका"?


Image result for dhoka storytel


एकीकडे इसिस भारतीय पंतप्रधानांन मारायची कटकारस्थाने करतेय. त्याच वेळीस भारत अफगाणिस्तानशी असेलेल्या आपल्या राजकीय जवळीकीचा लाभ घेत पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी पख्तुनीस्तान आणि बलोचीस्तानच्या स्वतंत्रतावादी बंडखोरांचा उठाव घडवून आणत पाकिस्तानचे तीन तुकडे करण्याच्या मोहिमेच्या अंतिम टप्प्यात आहे. आणि फ्रांसमध्ये आपल्या नवीन प्रियतमेसोबत प्रणयी सुट्टी घालवत असलेल्या समीर चक्रवर्तीकडे एक विचित्र कामगिरी येते...काय तर येत्या तीन महिन्यात विखुरलेले खलिस्तानवादी, काश्मिरमधील फुटीरतावादी आणि आयएसआयचे उच्चस्तरीय हेर एकत्र भेटनार आहेत...ते जेंव्हाही भेटतील तेंव्हा ते भेटीचे
स्थानच उडवुन टाकायची. समीरला या कामगिरीत काळेबेरे वाते. फ्रांसची गुप्तहेर संघटनाही त्याला सावध करते. पण चौकशी करता अशी भेट होणे असंभाव्य नाही हेही समीरच्या लक्षात येते,. तो ती कामगिरी स्विकारतो आणि सुरु होतो एक भयंकर कतकारस्थानांचा सापला, थरारक आणि जीवघेण्या रहस्यांची मालिका...आणि समीरला कळते...त्याच्याशी सपशेल धोका करण्यात आला आहे. आता भारतीय पंतप्रधानांना कोणी मारले हे त्याला शोधणे भाग आहे कारण तो आळच त्याच्यावर आला आहे! इसिसचा सर्वेसर्वा बगदादीला ठार मारल्याखेरीज त्याचे समाधान होणार नाही!

कोणी रचले हे कारस्थान? बगदादी खरेच ठार मारला जातो काय, भारत बलोचीस्तान व पख्तुनीस्तानातील उठाव खरेच घडवून आणतो काय? आणि यासोबतच आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि महासत्तांचे जीवघेणे राजकारण म्हणजे गेल्याच वर्षी मी लिहिलेली "धोका" ही कादंबरी. नायक अर्थात समीर चक्रवर्ती. "समीर चक्रवर्ती ची एक अद्भुत कामगिरी. जगातील सत्ता टिकवण्यासाठी प्रत्येक जण कशा खेळी खेळतो. त्या सर्वांशी समीर कसा लढतो. आंतरराष्ट्रीय राजकारणात तो टिकतो का? कोणते भयंकर षडयंत्र त्याला कळते. पुढे काय काय होते ? अत्यंत उत्कंठावर्धक आणि अगदी आगळी वेगळी कादंबरी..." ही एका वाचकाची प्रतिक्रिया!

इसिसला केंद्रीभुत धरत ही बहुदा पहिलीच भारतीय थरार कादंबरी असेल. यात इसिसचे जग उलगडले जाते. भारताचे अफगाणिस्तान व बलोची-पख्तुनी स्वातंत्र्य चळवळीशी असलेले हितसंबंधही उलगडले जातात. आणि महत्वाची बाब म्हणजे ही कादंबरी मी लिहिलीय ती वाचन्यासाठी नव्हे तर "ऐकण्यासाठी"! स्टोरीटेल या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने श्राव्य माध्यमात जागतीक प्रकाशन क्षेत्रात मोठे काम केले आहे. आता त्यांनी भारतात पाऊल ठेवले असुन मराठी व हिंदी भाषांतील कादंब-या श्राव्य माध्यमासाठी प्रकाशित करायच्या ठरवले आहे. नवनवीन प्रयोग करणे मला आवडते. त्यातुन ही ऐकण्यासाठीची थरार कादंबरी श्रोत्यांसाठी प्रकाशित झालीही आहे आणि ती प्रचंड प्रमाणात लोकप्रियही होते आहे. 

भविष्यात छापील पुस्तकांबरोबरच जसे ई-बुक्सही येत आहेत तसेच श्रवणभक्तांसाठीही श्राव्य पुस्तके आता येत आहेत. वाचायचे नसेल तर ऐका...पण साहित्याशी संबंध ठेवा, स्वत:ला प्रगल्भ करा हेच या क्षेत्रात होत असणारी क्रांती सांगत आहे. त्यासाठी स्टोरीटेलचे स्वतंत्र App  आहे. ते नाममात्र किंमतीत डाउनलोड केले की एकच नव्हे तर लाखोंनी मराठी, हिंदी व इंग्रजी कादंब-या तुम्हाला ऐकायला उपलब्ध होतील. सुरुवातीला तर काही दिवस हे App मोफत आहे. प्रत्येक व्यक्ती कोठेही, कधीही सहजपणे आपल्या आवडीची पुस्तके ऐकू शकतील.

"धोका" कादंबरी श्राव्य माध्यमासाठी लिहून तुम्ही धोका पत्करला काय असे माझे काही वाचक विचारतात. माझे म्हणने हे आहे की भविष्यातील क्रांतीला आताच स्विकारण्यासारख यशाचा राजमार्ग नाही. हजारो वाचक लाखो श्रोत्यांत जेंव्हा बदलतात तेंव्हाचे समाधान काही औरच आहे. आणि ही कादंबरी एवढी थरारक आहे की ऐकतांना आपण चित्रपटच पहात आहोत असा आभास निर्माण होतो! आणि हे माझे नव्हे तर ज्यांनी ज्यांनी ही कादंबरी ऐकली त्यांचे मत आहे! माझ्या अजुनही काही कादंब-या श्राव्य माध्यमात येत राहतील! धोका अवश्य ऐका! सांगा!
वानगीदाखल ऐकायला येथे क्लिक करा-https://www.storytel.in/books/117770-Dhoka-S1E1

(Published in saptahik Chaprak)


Tuesday, January 2, 2018

पंतप्रधानांनाच "ब्लॅकमेल" केले जाते तेंव्हा...


Inline image 1



भारतीय राजकारणात प्रचंड वादळ माजवणारे बोफोर्स प्रकरण कोणाला आठवत नाही? माजी पंतप्रधान राजीव गांधी या प्रकरणात पुरते बदनाम झाले होते. य प्रकरणाचे पडसाद अगदी आताही अधुन मधुन उमटत असतात. हे प्रकरण उजेडात येत होते आणि या प्रकरणामागील अनेक आंतरराष्ट्रीय कट-कारस्थानांच्या थिय-याही चर्चेत होत्या. त्या होत्या असे जसे सिद्ध झाले नाही तसेच त्या नव्हत्या हेही सिद्ध झाले नाही. पण माझ्या सारख्या रहस्य-थरार लेखकाला अशी प्रकरणे आव्हान देणार यात शंका नव्हती. मी या प्रकरणाला पुर्णतया वेगळे वळण देत एक थरार कादंबरी जन्माला घातली. तिचा नायक होता अर्थातच एकांडा शिलेदार समीर चक्रवर्ती!

ग्राहाम मरे हा एक बडा अमेरिकन उद्योगपती. तोफा, क्षेपणास्त्रे, जहाज बांधणी ते बांधकाम क्षेत्रात अग्रेसर. जगभरातील सरकारे याच्या इशा-यावर बनतात वा कोसळतात अशी अफवा असलेला माणूस. पण नव्या प्रकारच्या संशोधनांमुळे त्याच्या तोफा-क्षेपणास्त्रे पुर्वीएवढ्या मागणीत नाहीत. अगदी आखाती राष्ट्रेही त्याला भीक घालत नाहीत. अशा स्थितीत एकमेव ग्राहक म्हणून त्याच्या टीमसमोर भारत हे एकमेव नांव संभाव्य ग्राहक म्हणून येते. पण भारतही आपल्या तोफा घेईल की नाही याबाबत तो साशंक असतो.

आणि अशाच काळात त्याला एका माफियातर्फे एक भयानक माहिती समजते. मरे आनंदाने उड्या मारायचाच काय तो बाकी राहतो. त्यातून मरेलाही पडद्यावर न आणता सुरु होते एक "ब्लॅकमेल" प्रकरण! ब्लॅकमेल केले जाते ते चक्क भारतीय पंतप्रधानांना! त्या माफियांच्या विसंगत मागण्या मान्य न केल्यास होणारा परिणाम म्हणजे पंतप्रधान पद जाणे...आणि कायमचे बदनाम होणे! बरे, मागण्या मान्य कराव्यात तर देशाचे अपरिमित नुकसान! हेरखात्यांनाही यात गोवता येत नाही. मग पंतप्रधान चौधरी आंतरराष्ट्रीय एकल-दहशतवादी-हेर समीर चक्रवर्तीलाच या प्रकरणात निमंत्रित करतात. समीर ही केस हाती घेतो. इटली ते अमेरिका असा थरारक आणि रहस्यमय प्रवास करत आणि जीवावरचे धोके घेत तो या प्रकरणाच्या तळाशी पोहोचतो आणि एक सुंदर छोकरी गटवत रहस्यभेद कसा करतो याची थरारक आणि प्रणयरम्यही कथा म्हणजे "ब्लॅकमेल" ही कादंबरी. 

समीर चक्रवर्तीला नायक बनवत मी जवळपास आठ कादंब-या लिहिल्या. भारताचा म्हणून हा तसा एकमेव महानायक. नीति-अनीतीची फारशी फिकीर न करता, बुद्धीकौशल्य आणि सामर्थ्य पणाला लावून हाती घेतलेली कामगिरी, मग ते कोठेही आणि कोणाही विरुद्ध असो, यशस्वी करणारा. समीर चक्रवर्तीच्या थरार कथा लिहिणे ही एक आनंददायी आणि आव्हानदायी बाब. वाचकांनाही या कादंब-या आवडत गेल्या. अलीकडेच ही कादंबरी स्टोरीटेल या स्विडिश कंपनीच्या भारतीय विभागातर्फे श्राव्य स्वरुपात लौंच झाली आहे. श्राव्य स्वरुपात आलेली ही समीर चक्रवर्ती नायक असलेली तिसरी कादंबरी. ज्या स्विडिश कंपनी बोफोर्समुळे मला ही कादंबरी सुचली त्याच देशातील प्रकाशन संस्थेने ही कादंबरी श्राव्य स्वरुपात प्रकाशित करावी हा एक योगायोगच. अर्थात माझे आयुष्यच अगणित योगायोगांनी भरलेले आहे हेही खरे.

ही कादंबरी ऐकण्यासाठी स्टोरीटेलचे सदस्य व्हा...खालील लिंकला भेट द्या!

https://www.storytel.in/books/130544-Blackmail

(Published in Saptahik Chaprak)

Thursday, November 23, 2017

"असूरवेद"...एक सांस्कृतीक थरार


Inline image 1




आपल्याकडे सांस्कृतिक अभ्यासाबद्दल व त्यानुषंगिक साहित्याबद्दल फारच बाळबोध कल्पना आहेत. किंबहुना सांस्कृतिक साहित्याचे वाचन एकतर धार्मिक श्रद्धाळू मंडळी तरी करते किंवा काही प्रमाणात धर्म-संस्कृतीचे अभ्यासक तरी करतात. अभ्यासकांचे लेखन बव्हंशी अकारण तत्वज्जड असणे स्वाभाविक आहे आणि मग सामान्य माणूस त्यापासून दूर पळणेच पसंत करतो. शिवाय आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या इतिहासाकडे पाहण्याचे ठराविक दृष्टीकोण आहेत व ते ब्राह्मण-ब्राह्मणेतर परिघात फिरतांना दिसतात. त्यामुळे होणारे आकलन हे कसेही झाले तरी एकांगीच ठरते. त्यातून भरीव काही हाती लागण्याचा संभव नसतो.

मी गेली ३०-३५ वर्ष भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाला वाहून घेतलेली आहेत. मी स्थितीवादी संशोधक नसल्याने माझ्या विचारांत व निष्कर्षांत जसजसे नवनवे पुरावे समोर येत गेले तसतसे बदलही झाले आहेत. ते बदल माझ्या आजवरच्या या विषयावरील पुस्तके व लेख यातून सहज टिपता येतात. भारतातील सामाजिक संघर्ष ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाभोवती फिरता ठेवण्यात काही जणांचे स्वार्थ दडलेले आहेत हे माझ्या लक्षात आले. हा वाद ब्राह्मण-ब्राह्मणेतर नसून असला तर तो वैदिक-वैदिकेतर वाद आहे व असे असुनही काहीना राजकीय व सामाजित स्वार्थापोटी केवळ ब्राह्मण द्वेष हाच केंद्रबिंदू बनवत स्वत:ला मात्र त्यापासून बाजुला ठेवायचे आहे हेही माझ्या लक्षात आले. त्यानुसार माझी पुढची मांडणी झाली. या विषयांवर लिहित असतांना अनेकांनी मला वैदिकेतरांचे धार्मिक साहित्य काय असे प्रश्न उपहासाने विचारायला सुरुवात केली. त्याची मी उत्तरे दिली असली तरी ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे सोपे नव्हते. त्यासाठी मी सांस्कृतीक थरार कादंबरी लिहिण्याचा घाट घातला. 

भारतातील प्राचीन संस्कृती म्हणजे असूर-यक्षादि संस्कृती. वेद हा शब्द फक्त वैदिकांच्या चार वेदांपुरता मर्यादित नसून वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा असल्याने चार वेदांनाच प्रमाण मानणारा तो वैदिक असा समज असला तरी वैदिकेतर संस्कृतीचेही वेद होते याचे पुरावे मला मिळत गेले. गोपथ ब्राह्मणाने या वेदांचा "उपवेद" म्हणून उल्लेख केला असला तरी त्यांच्या शिर्षकावरुनच ते वैदिकेतर यज्ञसंस्कृतीपुर्व लोकांचे वेद होते हे सहज लक्षात येते. पिशाच्च, गंधर्व, सर्प या वेदांबरोबरच महत्वाचा एक वेद होता व तो म्हणजे असूरवेद! आज तो अस्तित्वात नाही. हाच काय, अन्य कोणताही वेद अस्तित्वात नाही. समजा अलीकडच्या काळातील कोणा संशोधकाला "असूरवेद" सापडलाच तर आधुनिक भारतात काय उत्पात माजेल या कल्पनेवर आधारीत ही कादंबरी. कादंबरीचा नायक नवबौद्ध गौतम कांबळे तर आपल्या संशोधक वडिलांच्या खुन्यांचा शोध घेण्यासाठी आटापिटा करणारी सायली जोशी. सर्व प्रकारच्या संघटना कोणत्या जहरी संघर्षात जातात याचा आलेख म्हणजे ही कादंबरी. 

ही कादंबरी प्रचंड यशस्वी ठरली. या कादंबरीवर एका ओळीचेही परिक्षण कोठे आले नसतांनाही याच्या पाच वर्षत तीन आवृत्त्या झाल्या. चवथी आवृत्ती आता प्राजक्त प्रकाशनातर्फे येते आहे. या कादंबरीचे नाट्य रुपांतरही झाले आणि राज्य नाट्य स्पर्धेत त्याला पहिले पारितोषिकही मिळाले. सुनील हरिश्चन्द्र या तरुणाने संहितेवर खुपच मेहनत घेतली होती व सारे विरोध धुत्कारण्याचे साहसही त्याच्यात होते. नाटकावर मात्र विस्तृत चर्चा झाली. या कादंबरीवर चित्रपट करण्याची अनेकांची इच्छा असली तरी साहसाअभावी ते अजून तरी झाले नसले तरी लवकरच या कादंबरीवर चित्रपट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असूरवेदात काय होते हे समजण्याची आज तरी शक्यता नाही. पण इतिहासात असे अनेक बहुमोल ग्रंथ, जे सांस्कृतिक इतिहास समजावून घ्यायला उपयुक्त ठरले असते, धार्मिक संघर्षांत ते नष्ट झालेले आहेत.  ते जाऊद्या, जुना इतिहास जपणरी स्थानेही आज आपल्या डोळ्यांदेखत नष्ट होत आहेत आणि तरीही आपण इतिहास-संस्कृतीबद्दल हिरीरीने बोलतो हाही एक विरोधाभास आहे. असो. असूरवेदने मराठी साहित्यात एका नव्या साहित्यप्रकाराचे थरारक दालन उघडले हे मात्र खरे. 

Tuesday, August 22, 2017

समाजव्यवस्थेचे "पानिपत" दाखवणारी कादंबरी!




"...आणि पानिपत" ही कादंबरी कशी सुचली याची कथा फार मागे जाते. मी क्लिओपात्रा, ओडिसी सारख्या वेगळ्या संस्कृत्यांच्या पार्श्वभुमीवर कादंब-या लिहिल्या होत्या तसेच अखेरच सम्राट सारखी भारतीय इतिहासावरचीही कादंबरी लिहिली होती. मीच नव्हे तर सर्वच ऐतिहासिक कादंब-या या सरदार, राजे-महाराजे-महाराण्या यांना नायक/नायिका बनवत लिहिल्या गेलेल्या होत्या. आणि नेमके हेच मला आता खटकू लागले होते.. सामान्य माणसांचे जीवन, त्याची जगण्याची व संस्कृती घडवण्याची धडपड यांना कोठेच स्थान नव्हते. युद्धे झाली की सर्वात अधिक ससेहोलपट या सामान्यांचीच होणार. मग युद्ध हरो की जिंको. तरीही जनसामान्यांच्या आकांक्षाच शेवटी राजसत्तेवर अंमल गाजवत असतात. संस्कृती घडवतात ते निर्माणकर्ते लोक. म्हणजेच शेतकरी, लोहार, कुंभार, सुतार ते सेवा देणारे लोक. अर्थव्यवस्था उन्नत होणार की अवनत हेही यांच्याच हाती. सत्तेचे काम त्यांना पुरेसे स्वातंत्र्य देणे. जे देत नाहीत तेथे संस्कृती ठप्प होणार हे ओघाने आलेच! इतिहासात एवढ्या मोठ्या उलाढाली झाल्या, त्यात सामान्य माणसाचे स्थान साहित्यात काय हा प्रश्न विचारला तर उत्तर हताश करणारे येते. त्यांच्या दृष्टीकोनातून इतिहास कसा घडला हे दर्शवणे तर आजिबात नाहीच! इतिहासाचा खरा नायक असा दडपला गेला.

मी पानिपतची पार्श्वभुमी फार जाणीवपुर्वक निवडली. ही एक शोकांतिका आहे. केवळ राजकीय नव्हे तर सामाजिकही. इतिहासाचे अजब संक्रमण या इतिहासाने घडवले. हे युद्ध घडलेही मुळात संक्रमणावस्थेतील उत्तर व दक्षीणेतील राजकीय व त्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक गोंधळामुळे. हा गोंधळ एका सामान्य माणसाच्या दृष्टीकोणातून टिपण्याचा मी निर्णय घेतला. संपुर्ण समाजव्यवस्थेनेच ज्या समाजाची शोकांतिका घडवली त्या तळागाळातील महार समाजातील पात्रे नायक म्हणून मी निश्चित केली आणि या कादंबरीच्या लेखनाला सुरुवात केली. ऐतिहासिक घटनांची माहिती देणारी भरपूर पुस्तके उपलब्ध असली तरी सामाजिक इतिहासाची मात्र पुरेपूर वानवा असल्याने त्यासाठी तत्कालीन उत्तर व महाराष्ट्रातील सामाजिक संदर्भ मिळवणे हे महादुष्कर काम होते. २००७ पासून मी सुरुवात केली ती सामाजिक संदर्भ मिळवायची. दरम्यान "महार कोण होते?" हे संशोधनपर पुस्तक माझ्याकडून लिहून झाले. कारण या समाजाचा इतिहासही तोवर ठराविक दृष्टीकोनातून लिहिला गेल्याचे मला आढळत गेले. धर्मांतरित होऊन नंतर दिल्लीचा अल्पकालीन का होईना पातशहा बनलेल्या पुर्वाश्रमीचा परवारी (गुजरातेतील अस्पृष्य) असलेल्या खुश्रूखानाचा इतिहासही धुंडाळला व धर्मांतराची कारणेही समजावून घेतली. तत्कालीन समाजजीवन, समाजिक प्रश्न, संघर्ष आणि समेट, रयत आणि जमीनदारांतले संबंध, गांवगाडा हे सारे कसोशीने शोधावे लागले. हे सारे झाल्यावर लिहायला सुरुवात केली.

ही कादंबरी लिहित असतांना मी महार झालो होतो. त्या काळातील महाराच्या सुख-दु:खांना स्वत: जगत होतो. लिहित असतांना मी इतक्या वेळेला रडलो की हस्तलिखिताची पानेच्या पाने अश्रुंच्या थेंबांनी भरून गेली. हा माझ्यासाठी एकमेव वेदनादायक लेखन प्रवास होता. संभाजी महाराजांची वढुला हत्या झाली ते पानिपतचा दुर्दैवी अंत हा १६८९ ते १७६१ एवढा प्रदिर्घ प्रवास चार पिढ्यांच्या माध्यमातून मी मांडत होतो. इतिहास पार्श्वभुमीला ठेवत या कादंबरीतील घटना घडतात. यातील हे चारही नायक वेगवेगळ्या स्वभावांचे. भिमनाक ते भिमनाक असा तो प्रवास. जगण्याचा जीवघेणा संघर्ष आणि पार्श्वभुमीला पानिपतचे संहारक युद्ध.

कादंबरीचे कथानक सांगण्याचे येथे प्रयोजन नाही. ही मराठीतील ख-या अर्थाने पहिली (व आजवर शेवटची) सबाल्टर्न कादंबरी. एप्रिल २०१० मध्ये ही तब्बल ४७२ पानांची कादंबरी प्राजक्त प्रकाशनाने अत्यंत देखण्या स्वरुपात प्रकाशित केली. म्हणजे आता सात वर्ष होत आलीत. कादंबरी वाचून अनेकांनी वरुडे गांवाला भेट दिली व रायनाक महाराची अजून काही माहिती तेथे मिळते काय याचा शोधही घेतला. काहीच माहिती मिळत नाही म्हणून मला फोन करून विचारले. यातील पात्रे इतिहासात खरेच होऊन गेली असणार कारण ती तेवढी जीवंत वाटतात असे त्यांचे म्हणणे. प्रत्यक्षात यातील इतिहासातील सोडून सर्वच पात्रे काल्पनिक आहेत हे सांगुनही वाचकांना पटत नाही. माधुरी नाईक यांनी पुणे जिल्ह्याची माहिती देणा-या पुस्तकात वरुडे गांवाचा उल्लेख इतिहासात घडून गेलेल्या भिमनाक महाराचे गांव म्हणून करत चक्क या घराण्याची कादंबरीत आलेली माहिती चार पानांत छापली आहे!

हे सगळे झाले. पण ही आवृत्ती मात्र आजतागायत संपली नाही. माझी सर्वात अपयशी कादंबरी म्हणून मी या कादंबरीचा उल्लेख करेन. याला अनेक कारणे आहेत. महार आणि तोही ऐतिहासिक कादंबरीचा नायक असू शकतो ही कल्पना बहुदा आपल्याला सहन होत नाही हे माझ्या लक्षात आले. (असूरवेदचा नवबौद्ध नायक मात्र स्विकारला गेला हे समाजमानसिकतेचे वेगळेच चित्र दाखवते.) एक महार खुद्द घायाळ पडलेल्या भाऊसाहेब पेशव्याला पानिपतच्या रणातून बाहेर काढतो ही बाब पेशवेसमर्थकांनाही रुचण्याची शक्यता नाही. नवबौद्ध समाजाला शक्यतो आपल्या जुन्या इतिहासाची आठवण नको वाटते आणि अन्य समाजघटक कथनाच्या ओघात आलेल्या तत्कालीन समाजस्थितीचे (व आपल्या पुर्वजांच्या वर्तनाचे) चित्रण सहन करू शकत नाही. "कर्मठ मोरबा ब्राह्मण बदलूच शकत नाही, ब्राह्मण कधीच बदलत नाही!" हे मत तर एका विदुषी प्राध्यापिकेने या कादंबरीवरच्या एका चर्चासत्रात जाहीरपणे मांडले होते. म्हणजे केवळ आपल्या आजच्या सामाजिक भुमिका इतिहासावर (व त्यातही कादंबरीवर) लादत आपण कळत-नकळत साहित्याचा आणि इतिहासाचाही मुडदा पाडायला मागेपुढे पहात नाही. कादंबरी खपली नाही. अधिकाधिक वाचकांपर्यंत गेली नाही याची खंत एक लेखक म्हणून मला आहेच पण त्याहीपेक्षा मोठी खंत ही आहे कि आपण पानिपतकालात ज्या मानसिकतेत वावरत होतो ती मानसिकता अजून बदललेली नाही. आम्ही आधुनिक तर सोडाच, माणुसही झालो नाही हेच काय ते खरे. "...आणि पानिपत" लिहिण्याचा प्रवास वेदनादायक होता पण तो सृजनाच्या वेदनांनी तरी भरलेला होता. नंतरचा प्रवास अजुनही मानसिक तिढ्यात अडकून बसलेल्या समाजाबद्दल वाटणा-या वेदनांनी भरला आहे.

"माझी जात कंची?" हा प्रश्न महार कोण होते, असूरवेद आणि या कादंबरीमुळे तर एवढा उसळला कि जाहीर मंचावरही हे प्रश्न विचारले गेले. मसापमधे अशीच घटना घडली असता वि. भा. देशपांडेंनी या प्रश्नाला समर्पक उत्तर दिले खरे...पण लेखकाची जात, त्याच्या नायकाची जात, त्याच्या खलनायकाची जात, त्याच्या नायिकेची जात चर्चेचा विषय बनावी? .....छी! मला या मानसिकतेची घृणा आहे. माझा भिमनाक महार या गर्तेतून मानवी समाजाला कधीतरी बाहेर काढेल, त्याची सामाजिक सुरक्षेची कवचकुंडले तोडून टाकेल आणि मुक्त अवकाशात तो फक्त भिम राहील आणि बाकी सारी कसलेही लेबल नसलेली माणसं...बस...या दिवसाच्या प्रतिक्षेत मी आहे.

Thursday, June 15, 2017

भटके स्थिर होऊ लागतात तेंव्हा...!


Inline image 1


एके काळी माणूस भटका होता. तो टोळ्या करून रहायचा. त्याचे जगण्या-मरणाचे प्रश्न जास्त टोकदार होते. त्याच्या भावनांना नैसर्गिक तीव्र धारही होती. टोळ्या-टोळ्यांत त्याच्या अस्मिता, स्त्रीया आणि सुपीक भागांवरील मालकीवरून सतत युद्धे होत. तात्पुरते तह व मैत्र्याही होत. पुन्हा संघर्ष डोके वर काढत असे. पुढे शेतीच्या शोधामुळे काही भागांत नागर संस्कृती विकसीत झाली. मनुष्य स्थिरावला. त्याने काही शतके हे स्थित्यंतर पचवण्यात घालवले तर काही भुप्रदेशांतील टोळ्या मात्र भटक्याच राहिल्या. मध्य आशियातील अशीच एका युएची जमातीतील कुशाण ही एक टोळी. नागर समाजाच्याच आसपास वावरणारी पण नागरी जीवनाचा तिरस्कार करणारी. शक, तार्तार आणि सर्वात महत्वाचे हाडवैरी म्हणजे खुद्द युएचीच! पिढ्यानुपिढ्या रक्ताने आपला इतिहास लिहित राहिलेल्या या टोळ्या आपल्याच जगण्याच्या आणि मरण्याच्या मस्तीत राहिलेल्या. शेवटी कुशाण टोळीला भारतात आश्रयाला यावे लागते, पण येथली राजकीय सत्ताच एवढ्या दुबळ्या होत्या की कुशाणांना सत्तेचे दावे आपल्या हाती घ्यावे लागले.

ही झाली माझ्या "कुशाण" (इंग्रजी- लास्ट ऑफ वाँडरर्स) या कादंबरीची पार्श्वभुमी. भटक्या जीवनातील माणसे नागरी जीवनात स्थिर होवू पाहतात तेंव्हा जे मनोवैज्ञानिक संक्रमण होत असते ते विलक्षण असते. स्थिर जीवन सुखद असते. आकर्षक असते. ही एक वेगळी अशी व्यवस्था असते जेथे श्रमविभाजनीमुळे इतकी सुखे अचानक येतात की जगण्याच्या अनेक प्रेरणा आणि संघर्षांना तिलांजली द्यावीच लागते. युद्धे असतात पण त्यात तो जोम नसतो. जगणे उरते पण त्यात जगण्याचा जल्लोष नसतो. एका अर्थाने जगणे बेचव वाटू लागते. जुने...खुल्या माळरानांवरील मृत्युच्या छायेखालील संघर्षरत साधे जगणे साद देवू लागते. पण मागे जाता येत नाही. अनेकदा मनुष्यच मनुष्याच्या विनाशाची वाट निवडतो आणि नेमके खरे काय हे समजेनासे होते. आदिम धर्म येथे नागरी जीवनात गुंतागुंतीचा बनलेला असतो. एवढेच नव्हे तर तत्वज्ञान नांवाचा माणसाला कोठेच न नेणारा राक्षस बोकांडी बसलेला असतो. आणि तरीही हेही जीवन हवेहवेसे वाटत असते. नेमके काय हवे हा संघर्ष उडतो आणि तो टिपणे, सांगणे हाच काय या कादंबरीलेखनामागील हेतू. या कादंबरीत ग्रीक सेनानी वेंटिलियस हा युएची वीर हविष्काला मरणासन्न असतांना वरुन विलोभनीय वाटणा-या नागरी संस्कृतीच्या सडक्या अंगाचे जे दर्शन घडवतो, ते मलाही आवडणारे!

मला ही कादंबरी सुचायला कारण झाले ते मीच आणि माझ्यासारखेच खेड्यांतून शहरात शिकायला आलेले बांधव. शहर हे मला वेगळेच जग होते. येथील रितीभाती वेगळ्या, भाषा वेगळी, मानवी संबंध वेगळे...एवढेच नव्हे तर येथल्या मैत्र्याही वेगळ्या. खेड्यातून आलेल्या मला भांबावून सोडणा-या, न्युनगंडाने पछाडणा-या तरीही या शहरी लोकांप्रमानेच वागायचे-बोलण्याचे-कपडे घालण्याचे आकर्षण असणारा. हे संक्रमण मानसिकदृष्ट्या पचवणे सोपे नसते. याच संक्रमणाचा आदिम बंध मला सम्राट कनिष्काच्या इतिहासाचा शोध घेतांना सापडला. त्यांचे टोळीजीवन, पुरुषांची संख्या कमी झाल्यावर विवाह-नातेसंबंधांनाही तिलांजली देत लोकसंख्या वाढवणारी रूढ नीति, त्यांची धमासान युद्धे, विश्वासघात आणि सूड, अनवरत भटकंती आणि भारतात आल्यानंतर सन्माननीय सत्ताधारी म्हणून स्थिर होत असतांनाचे मानसिक द्वंद्व मी आजच्या वर्तमानातील ग्रामीण भागातून शहरांत स्थलांतरित होणा-यांच्यातही पाहिले. अर्थात कुशाणांच्या संघर्षाची धार आदिम होती, जास्त टोकदार होती, म्हणून मी त्याच पार्श्वभुमीवर (इतिहासात काही बदलही करून) ही कादंबरी लिहिली. आजवर तीन आवृत्त्याही झाल्या. अर्थात या कादंबरीवर मराठीत एक अवाक्षरही लिहिले गेले नाही. इंग्रजी आवृत्तीबाबत मात्र असे झाले नाही. प्रसिद्ध अमेरिकन लेखिका व समीक्षक सांड्रा सांचेझ यांनी या कादंबरीला महाकाव्य म्हणत आदिम भटक्या जमाती आणि स्थिर संस्कृत्या यातील दिर्घ तुलना करणारा प्रबंधवजा लेख कादंबरीला आधार घेत लिहिला. अमेरिकन कवी रॅण्डल रॉस यांनी मला "साध्या इतिहासात मानवी स्वभावाच्या गुंतागुंती शोधत त्यावर महानाट्य लिहिणारा आधुनिक शेक्सपियर" म्हटले. इतरही अनेकांनी लिहिले. इंग्रजीत चक्क दोन आवृत्त्या झाल्या. असो. 

आपल्याकडे मुळात ऐतिहासिक कादंबरीबद्दल बालिश व्याख्या असल्याने येथे समीक्षकीय प्रतिसाद न मिळाल्याचे नवल वाटत नाही. पण ही कादंबरी लिहिणे, नंतर ती इंग्रजीतही अनुवादित करत जागतिक वचकांसमोर नेणे हे एक आव्हानच होते. आजही या कादंबरीतील प्रश्न तेच आहेत. संघर्ष तोच आहे. त्या वेदनेतून मनुष्य आजही मूक्त नाही. कोणते जगणे श्रेय:स्कर हा प्रश्न अजुनही सुटलेला नाही. पण कधीतरी माणसाला त्याच पुरातन मुक्ततेचा मार्ग सापडेल ही आशा आहे.

Saturday, June 3, 2017

अद्भुताच्या जगातील हिरण्यदुर्ग!


Inline image 1


मला गुढाचे, अद्भुताचे अनिवार आकर्षण राहिले आहे. लहानपणी गो. ना. दतारांच्या कादंब-यांची मी पारायणे केली. नंतर समजले की या कादंब-या दातारांनी परकीय कथानकांवर बेमालुमपणे देशी साज चढवलेल्या आहेत. दातारांनी ते मान्यच केले असल्याने त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला होता. नंतर या प्रकारचे फारसे लेखन मराठीत आले नाही. मर्मभेद नांवाची एक कादंबरी आली होती. तिचेही मूळ कथानक विदेशी आहे हे सहज लक्षात येण्यासारखे असले तरी लेखकाने ते मात्र कबूल केलेले नव्हते. असो.

माझ्या मनोविश्वात गुढरम्यता नेहमी घुमत असते. जीवनातील रहस्ये उलगडायची तर साहित्यातील सर्व प्रकार हाताळले पाहिजेत. सामाजिक कादंबरीही एका अर्थाने रहस्यकादंबरीच असते. किंबहुना जीवनात विलक्षण रहस्य भरलेले आहे आणि त्या रहस्याच्या शोधात अखिल मानवजात गुप्तहेराप्रमाणे निरंतर गढलेली आहे. अज्ञातात विलक्षण गुढे लपलेली आहेत यावर प्रत्येकाची श्रद्धा आहे. आदिम काळच्या मानवाच्या मनात विलक्षण मिथके जन्मली ती यामुळेच. तशी विराट मिथके आज जन्मावीत एवढी प्रतिभा माणसाकडे बहुदा उरलेली नसावी. तरीही काही तुरळक प्रतिभावंत आपल्या लेखणीच्या सहाय्याने एक विलक्षण, काल्पनिक असले तरी सत्याभास देणारे जग निर्माण करण्याचा प्रयत्न करतच असतात.

हिरण्यदूर्ग कादंबरी ही अशीच अद्भुतरम्य पण या मातीची. हे मला सुचली ती १९९३-९४ च्या आसपास. सुचायला खास असे काही कारण घडले नाही. तुरळक व तुटक अशी जी कथेची स्वप्नदृष्ये होती तीच काय ती मोहिनी घालत होती. ती मोहिनी अनावर झाली आणि मी लेखनही सुरू केले. जवळपास छापील ९६ पाने लिहुन आणि छापुनही झाले. मुखपृष्ठही छापले गेले. दुर्दैव असे की ज्या मुद्रणालयात ही कादंबरी छापली जात होती त्यावर आली सहकारी बँकेची जप्ती. मुद्रणालय सीलबंद केले गेले. सगळे छापील फॉर्म गायब झाले आणि मी आधी लिहिलेले हस्तलिखितही. पुन्हा लिहिणे शक्य नाही म्हणून लेखन थांबले ते थांबलेच. (मुड न लागल्याने वा मला कंटाळा आला म्हणून अर्धवट सोडून दिलेल्या जवळपास ४८ कादंब-या आहेत.)

त्यानंतर तब्बल २० वर्ष गेली. मनाच्या कोप-यात सिंहभद्र, केतुमाल आणि रहस्यांचे केंद्रबिंदू असलेला हिरण्यदूर्ग पुन्हा डोके वर काढू लागला. न राहवून मी परत लेखनाला सुरुवात केली. अर्थात मुळ कथेत पुर्ण बदल झाला होता. मुळ कथा नेमकी काय होती हे मलाही आता आठवत नाही. ते वेगळेच कथानक होते एवढे मात्र नक्की. मुख्य पात्रांचे नांवे मात्र सिंहभद्र आणि केतुमाल हीच होती. त्यातील अद्भुतही वेगळेच होते. आता प्रकाशित झालेल्या कादंबरीत एवढी सोडली तर कोणतीही साम्ये नाहीत. आजही जर यदाकदाचित मुळ हिरण्यदुर्ग सापडली तर ती पुर्ण करुन एक नवीच कादंबरी तयार होईल. ही कादंबरी लवकर पुर्ण होऊ शकली ती सागर भंडारे या माझ्या मित्राने खुपच पाठलाग केला म्हणून. प्राजक्त प्रकाशनाच्या बंधुवत जालिंदर चांदगुडे यांनी ती देखण्या स्वरुपात प्रकाशितही केली. अनेक आघाडीच्या वृत्तपत्रांत तिची परिक्षणेही प्रसिद्ध झाली. वाचकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. 

मी गरुड व नागवंशातील अथक संघर्षाच्या पुराकथेला या कादंबरीत खुबीने वापरत एक वेगळे जग निर्माण केले. इतिहास प्रसिद्ध सातवाहन घराण्यातील शक्तीश्री आणि त्याचा कवी राजपुत्र हाल सातवाहनांना कादंबरीतील महत्वाचे पात्र बनवले. सातपुड्याची धिरोदात्त पण गुढगहन पर्वतराजी पार्श्वभुमीला घेत सिंहभद्र आणि केतुमालातील युगानुयुगे सुरु असलेला अद्भूत पण रक्तरंजित संघर्ष चितारला. या निमित्ताने मला निखळ भारतीय म्हणता येईल अशी अद्भुतरम्य कादंबरी लिहिता आली याचे समाधान आहेच! वाचकही समाधान पावतो आहे हा आनंद वेगळाच!

Tuesday, September 29, 2015

शून्य महाभारत...



१९९१ सालची गोष्ट आहे. मी तेंव्हा औंध येथे राहत होतो. माझे एक प्रकाशक मित्र आणि मी एके सकाळी औंधमधीलच त्यांच्या एका मित्राला भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या गप्पा चालू होत्या. त्यात माझा सहभाग काहीच नसल्याने हालचे निरिक्षण करत होतो. नजर भिंतीवरील क्यलेंडरवर पडली. त्यावर एक चित्र, अनेकदा आधीही पाहिलेले, कृष्ण गीता सांगतोय आणि अर्जून अत्यंत विनम्रतेने गुढग्यावर बसून ऐकतोय.
मी त्या चित्रात जरा गुंगून गेलो. क्षणात असे वाटले कि समजा महाभारत युद्धात कृष्ण जर कौरवांच्या बाजुला गेला असता तर? बरे, त्यात अशक्य काहीच नव्हते.

कृष्णाकडे मदत मागायला दुर्योधनही गेला होता आणि अर्जुनही. आधी कोण आले यावर निकाल न देता आधी कोणाला पाहिले यावर कृष्णाने आपली सेना आणि शस्त्र हाती न घेणारा कृष्ण यात निवड करायला अर्जुनाला सांगितले. पण आधी आला होता तो दुर्योधन. समजा पहिला प्रश्न दुर्योधनाला विचारला असता तर आणि त्याने कृष्णालाच मागून घेतले असते तर?

या कल्पनेने मला अनेक वर्ष झपाटले. शेवटी ९७-९८ मद्ध्ये कधीतरी ही कादंबरी प्रत्यक्ष लिहायला घेतली. तत्वज्ञान किती निसरडे आहे आणि गतकाळातील त्याच घटना याचे बाजू बदलताच संदर्भ कसे बदलतात आणि नवी गीताही कसा आकार घेऊ शकते याचे विदारक दर्शन मी अवघ्या शंभरेक पानांत केले. द्रोण, भिष्म आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे द्रौपदीची चिरवेदना अभिव्यक्त केली. नवी गीताही लिहिली. पांडवांचे कृष्णाने बदललेल्या भुमिकेवरचे जे बदललेले विचार आहेत ते मानवी तळाला ढवळून काढणारे आहेत.
मानवी जीवन आणि त्याकडे पहायचे आपले दृष्टीकोन हे स्थायी नसतात. क्षणभंगूर असतात. आपल्याला जे प्रिय वाटते ते प्रिय वाटायला लावलेही गेलेले असू शकते. शेवटी मानवी जीवन काय आहे?

विभ्रमांतील भ्रम आणि आपण तरीही किती उरफोड करत आपल्यालाच सत्य माहित आहे असा आव आनत असतो! जीवन त्यामुळेच विलक्षण आणि जगण्यायोगे बनून जाते...

शून्य महाभारत...

यातुनच मानवी कोलाहलाची अंतिम शुन्यता मी दाखवली आहे!

(नवीन आवृत्ती प्राजक्त प्रकाशनाने प्रकाशित केली आहे व तिला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. वाचकांच्या मेल्स आनंद देवून जातात. लोक विचार करत नाही, तळगर्भात जायचा प्रयत्न करत नाहीत हा समजही भ्रम या सदरात मोडतो!)

Saturday, June 16, 2012

क्लिओपात्रा: ...माझी सर्वाधिक गाजलेली कादंबरी...



माझी आजवर सर्वात गाजलेली, विकली गेलेली कादंबरी म्हणजे "क्लिओपात्रा" ही होय. आजवर तिच्या जवळपास ५५००० प्रती विकल्या गेलेल्या आहेत. सध्या बाजारात एकही प्रत शिल्लक नसून नवीन आवृत्तीचा हट्ट अनेक वाचकांनी धरला आहे. लवकरच नवी आवृत्ती प्रसिद्ध होईल.

क्लिओपात्राकडे मी आकर्षित झालो याला कारण घडले ते म्हणजे माझी हैद्राबादच्या सालारजंग संग्रहालयाला दिलेली भेट. या संग्रहालयात क्लिओपात्राचा अत्यंत सुंदर अर्धपुतळा आहे. अन्य असंख्य ग्रीक कलाकृतींबरोबरच याही पुतळ्याने मला मोहविले. मी पुण्याला आल्यानंतर मग तिचीही माहिती जमा करायला सुरुवात केली. १९९० साली इंटरनेटचा जन्म व्हायचाच होता. त्यामुळे विदेशी संदर्भ साधने मिळवणे ही एक जवळपास अवघड अशेच बाब होती. तोवर क्लिओपात्रावरची शेक्सपियरचीच नाटके उपलब्ध होती. क्लिओपात्रावर इंग्रजीतही कोणी कादंबरी लिहिल्यचे दिसत नव्हते. अशा वेळीस माझ्या मदतीला धावले जयकर ग्रंथालय आणि फर्ग्युसन रस्त्यावरील ब्रिटिश लायब्ररी. येथे मला मुबलक संदर्भग्रंथ मिळाले. अगदी सीझरचे आत्मचरित्रही. जसजसे मी अनेक ग्रंथ वाचत गेलो, एक वेगळीच क्लिओपात्रा माझ्या डोळ्यांसमोर साकार होत गेली.

क्लिओपात्रा नुसती अद्वितीय सुंदरी नव्हती. अत्यंत ध्येयवेडी, यशासाठी प्रसंगी क्रुर होणारी, सत्तेच्या मार्गात कोणालाही आडवे न येवू देणारी, आपल्या सौंदर्याचा स्वार्थासाठी मन:पुत उपयोग करुन घेणारी पण तेवढेच आत्मविव्हळ असनारी क्लिओपात्रा. क्लिओपात्रा या नावातच एक अद्भुत मोहिनी आहे...दोन हजार वर्ष झालीत तिला होवुन, परंतु तिचे अद्भुत सौंदर्य, अचाट बुद्धीमत्ता, तिचे कुटील राजकारण, तिची प्रेम-प्रकरणे शेक्सपियरसारख्या नाटककारांपासुन ते चित्रपटनिर्माते, कवि, चित्रकार यांच्यावर एक गारुड टाकत राहिले आहे. ती होती इजिप्तची सम्राद्न्यी, पराकोटीचा संघर्ष करत तिने सत्ता मिळवली खरी...पण रोमन साम्राज्यवादाला आपण तोंड देवु शकणार नाही हे लक्षात येताच तिने शस्त्र म्हणुन आपल्या सौंदर्याचा मुक्त हस्ताने वापर केला. तिने ज्युलियस सीझर, मार्क अंटोनी आणि सीझरचाच पुतन्या ओक्टोव्हियस सीझर यांना एकामागोमाग एक आपल्या जाळ्यात ओढले...पारतंत्र्य टाळले...पण शेवटी तिने आत्मघात करुन घ्यावा लागला.

प्टोलेमी (७ वा) या ग्रीकवंशीय सम्राटाची ही एक मुलगी, तिचा जन्म सनपुर्व ६९ मद्धे झाला. तिचा भावु प्टोलेमी (८ वा) जरी तिच्यापेक्षा लहान असला तरी महत्वाकांक्षी होता...त्याने क्लिओपात्राचा अडसर नको म्हणुन तिला व एका लहान बहिणीला (आर्सिनी)इजिप्तबाहेर हाकलले...पराकोटीचा यातनादायक विजनवास भोगत तिने प्रथम पोम्पी या रोमन योद्ध्याची मदत घेतली...पण इजिप्तवरचे त्याचे आक्रमण फसले...त्याचा अलेक्झांड्रियाच्या बंदरावर उतरताच खुन करण्यात आला. निराश न होता ती सीझर या महायोद्ध्याच्या प्रेमात पडल्याचे नाटक करुन त्याची मदत घेवुन सम्राद्न्यी बनली. सीझर व तिचे प्रेमप्रकरण फार काळ टिकले नाही...सीझरचा रोममद्धे खुन झाला. (या हत्येत तिचाही अप्रत्यक्ष सहभाग होता.) मग ती मार्क अंटोनी या सीझर खालोखाल दबदबा असलेल्या वीराच्या प्रेमात (?) पडली...पण सीझरचा पुतन्या ओक्टोव्हियस सीझरचा डोळा इजिप्तवर होता. त्याने आक्रमण करताच अंटोनी क्लिओपात्राच्या बाजुने युद्धात उतरला खरा...पण सौन्दर्याचा वापर सत्तेसाठी करण्यास चटावलेल्या क्लिओपात्राने ओक्टोव्हियसवर जाळे फेकायला सुरुवात केली.. पण हे कळताच व्यथित अंटोनीने आत्मघात करुन घेतला. ओक्टोव्हियस मात्र आपल्या जाळ्यात फसत नाही...इजिप्तचे साम्राज्य वाचत नाही आणि अंटोनीने आपल्यावरील अतीव प्रेमामुळे आत्मघात करुन घेतला आहे हे कळताच तिने स्वता:ला विषारी सापांचा दंश करुन घेउन आत्महत्या केली.

जागतीक इतिहासात असे गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व झाले नाही त्यामुळे साहित्यिक-कलावंतांवर तिच्या व्यक्तित्वाची मोहिनी आहे...तिच्या व्यक्तिमत्वाचे पदर वेगवेगळ्या द्रुष्टीकोणातुन उलगडण्याचे असंख्य प्रयत्न झाले आहेत आणि पुढेही होतील.

मी प्रथमच या अलौकिक व्यामिश्र अशा व्यक्तिमत्वावर मराठीत कादंबरी लिहिली. (तोवर बहुदा इंग्रजीतही तिच्यावर कादंबरी नव्हती.) क्लिओपात्राचे व्यक्तिमत्व शब्दांत उतरवणे हे आव्हानच होते. बरे तिचा जीवनपट तसा अवाढव्य...असंख्य आणि तीही भव्यदिव्य व्यक्तिमत्वे...ब्रुटस हा खलपुरुष म्हणुन आपल्याला माहित असला तरी अत्यंत भावनाप्रधान व लोकशाहीवर अतुट श्रद्धा ठेवणारा, सीझरचा मित्र असुनही केवळ लोकशाही सुरक्षित रहावी म्हणुन सीझरवर शेवटचा वार करणारा...यातील सर्वच पात्रे चितारणे एवढे सोपे नव्हते. त्यांच्या, विशेषत: क्लिओपात्राच्या, भाव-भावनांचे कल्लोळ व्यक्त करणे हे एक आव्हान तर होतेच...पण त्याहीपेक्षा मोठे आव्हान होते ते मराठी वाचकांपर्यंत क्लिओपात्रा नीट पोहोचवणे. याचे कारण म्हणजे मराठीत शिवकाळ, पेशवाई काळ ते सरळ रामायण-महाभारतातील कथा/व्यक्तित्वांवरच कादंब-या वाचण्याची सवय असणा-या वाचकांना ही परकीय क्लिओपात्रा कितपत भावेल अशी शंका मला व माझ्याहीपेक्षा माझ्या प्रकाशकाला होती.

पण क्लिओपात्राने इतिहास घडवला. न. सं. इनामदारांसारख्या प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीलेखकानेही या कादंबरीचे जाहीर कौतुक केले. जवळपास सर्वच वृत्तपत्रांनी या कादंबरीची परिक्षणे प्रसिद्ध केली. हजारेक प्रतींच्या आवृतीची सवय असलेल्या मराठी प्रकाशन विश्वाला दहा-दहा हजार प्रतींची आवृती असू शकते हे क्लिओपात्राच्या निमित्ताने कळाले.  ही कादंबरी वाचुन अनेकांनी इजिप्तला भेटीही दिल्या व आधी आणि आल्यावरही माझ्याशी संवादही साधला आहे.


हे यश अर्थात माझे नसुन क्लिओपात्रा या अनवट गुढाला आहे. ही कादंबरी लिहुन मी मराठीत परकीय इतिहासाच्या पार्श्वभुमीवर आधारीत कादंबरीलेखनाची मुहुर्तमेढ रोवली, याचाही मला अभिमान अर्थातच आहे.



-संजय सोनवणी

Sunday, May 22, 2011

कादंब-यांच्या जन्मकथा: सव्यसाची

बाबरी मशीद पडली. दंगे उसळले. नंतर दाउद ग्यांगने देशभर विस्फोट करुन हजारों निरपराधांचा बळी घेतला. या प्रतिगामी शक्तिंच्या प्रबळ असण्याच्या काळात (हिंदुत्ववादी असोत कि मुस्लिम) देशात एक नवी अर्थ क्रांतीही घडत होती. भारत जागतिकिकरणाच्या लाटेत, नाईलाजाने का होईना) सामील होऊ लागला होता. एरवी ज्या वर्गाने उद्योगधंद्यात पडण्याचे स्वप्नही पाहिले नसते असा नव-उद्योजक वर्ग जोमाने पुढे येवू लागला. त्यात मीही होतो. देशात वेगाने आर्थिक बदल घडु लागले. मानवी जीवनाचा चेहरा-मोहरा झपाट्याने बदलू लागला. नव्या आशा-आकांक्षांची रुजुवात व्हायला लागली. मानवी संबंधांत बदल घडु लागले. गुन्हेगारी जगही पुर्वापार मटका-स्मगलिंगच्या पारंपारिक गुन्हेगारीतुन बाहेर पडत सुपारी किंग, खंडणी बहाद्दर ते परकीय शक्तींचे हस्तक होत देशद्रोही विघातक कार्यातही गुंतू लागले. मला स्वत:ला १९९८ साली खंडणी प्रकरणाला तोंड द्यावे लागले. मी खंदणीबहाद्दरांना गजाआड केले हे खरे, पण सर्वांनाच असे साहस दाखवायला जमत नाही. एक नवी समांतर काळी अर्थव्यवस्था झपाट्याने वाढू लागली. मी १९८३ ते ९० सालापर्यंत पत्रकार होतो. तेंव्हाची पत्रकारीय नीतिमुल्येही आता झपाट्याने बदलू लागली असे मी पाहू लागलो. एकुणात सर्वच समाज घुसळला जात होता. कोठे संभ्रम तर कोठे दु:साहसवाद.

हा बदल विलक्षण होता. सामाजिक दरी वाढवणारा होता आणी मला जागतिकीकरणाचा राग यायला लागला. देशांतर्गत खुले आर्थिक धोरण आधी स्वीकारुन, लायसेंस राज नष्ट करत देशांतर्गत स्पर्धा निर्माण करत मगच विदेशी कंपन्यांना परवानगी द्यायला हवी होती असे माझे मत बनले होते. आजवर देशांतर्गत लायसेन्स राजमुळे ख-या स्पर्धेत कधीच न उतरलेले उद्योजक एकाएकी मुक्त केले म्हणजे परकीय कंपन्यांशी स्पर्धा करू शकतील हे अशक्यच होते. झालेही तसेच. भारतीय उद्योजकांनी सपाट्याने परकीय कंपन्यांशी संधान बांधत एक तर आपले उद्योग तरी विकले वा तांत्रिक-आर्थिक सहकार्य करार करत आपापले स्वातंत्र्य विकायला काढले. त्यातच पुढे शेयर बाजारात सट्टेबाजांनी या संधीचा कूफायदा घेतला त्यातुनच हर्षद मेहता प्रकरणही झाले.

या सर्व बाबी मी बारकाईने पहात होतो...चिंतन करत होतो. त्यातच राजकारणानेही वेगळे वळण घेतले होते. बाबरी मशीदीच्या पतनानंतर राजकीय समिकरणेही बदलली होती व जातीयवादी शक्ती सत्तेवर येऊ घातली होती.त्यांचेही तत्वज्ञान होते व त्या तत्वज्ञानाच्या प्रवाहात सामील होणारेही अगणित होते.

या सा-या परिवर्तनाचे, सामान्यांच्या या सा-यात होत असणा-या ससेहोलपटीचे चित्रण मला करावे वाटणे स्वाभाविक होते. मी या बदलाचा केंद्रबिंदू म्हणजे राजीवजींचे ह्त्त्या, जागतिकिकरणास सुरुवात आणि ते जातीयवादी शक्तींचा उद्रेक होत बाबरी मशिदीचे पतन एवढ्याच कालखंडात घ्यायचे ठरवून लेखन सुरू केले.

सुरुवात करतांना यात नेमकी किती पात्रे असतील, नायक कोण असेल असा कसलाही विचार मी केला नव्हता. जीवन मुजुमदार, नीलांबरी यापासुन सुरुवात करत मी जसजसा पुढे लिहित गेलो तसतशी असंख्य पात्रे आपसुक कथाक्रमात येत गेली. मानवी जीवनातील व्यक्तिगत संबंध आणि त्यावर परिस्थितीच्या दबावामुळे येणारे ताणतणाव दाखवत या सा-या कथेला मी राष्ट्रीय पार्श्वभूमी देत गेलो.

नीलांबरीचा बाप सव्यसाची हा अंडरवर्ल्डचा एक प्रमूख असावा हे काही पुर्वनिश्चित नव्हते. परंतु मला त्याही विश्वाची दखल घेत एका अवाढव्य उद्योगसमुहाच्या मालकाची पत्नी ही काळ्या जगाच्या सम्राटाचे मुलगी आहे हे दाखवणे कथौघात आवश्यक वाटले. आणि मी तेही नातेसंबंध चित्रित करत गेलो. यातील इन्स्पेक्टर बसू हे अत्यंत आव्हानात्मक पात्र असेच सुचले आणि त्याच्या माध्यमातून मला नुसती कथाच फुलवता आली नाही तर मानवी कारुण्याची अनेक रुपे दाखवता आली.

पण सर्वात महत्वाचे पात्र म्हणजे डेबु...एक साधा झोपडपट्टीतला गुंड... त्याची बायको आणि त्याची रखेली. या पात्रांच्या माध्यमातून मी एकून कथेला सुसंगत, पण वेगळेच विश्व चितारले.

ही कादंबरी लिहित असता मी दर वेळीस विचार करायचो...पुढच्या तरी प्रकरणात मी या कादंबरीचा खरा नायक सव्यसाचीला पुढे अणेल. पण जसजसे लिहित गेलो तसतसे मला त्याची आवश्यकता वाटेना झाली. सव्यसाची हे त्या काळाचे प्रतीक म्हणुनच ठेवायचे असा निर्णय मी घेतला. त्यामुळे संपुर्ण कादंबरीत प्रत्यक्षात हे पात्र कोठेच अवतरत नाही. पण त्यामुळे कादंबरीला वेगळेच परिमाण प्राप्त झाले हेही तेवढेच खरे. एक नवी प्रतिकात्मता मिळाली.

या कादंबरीत असंख्य व्यक्तित्वे आहेत. त्या अर्थाने या कादंबरीला नायक नाहीच. या कादंबरीत सर्वच स्तरांवरील पात्रे आहेत. आणि ती सर्वच कोणत्या ना कोणत्या पातळीवर जनसमाजाचे प्रतिनिधित्व करतात.

या कादंबरीचा शेवट हा मात्र माझा अत्यंत लाडका आहे कारण आपली पत्नी दुस-यापासून गरोदर आहे हे कळुनही हरलेला खचलेला जीवन मुजुमदार जेंव्हा हुगळीच्या काठी वैश्विक परिप्रेक्षात जीवनाचा...त्यातील अनिश्चिततेचा विचार करतो...चिंतन करतो आणि क्षमाशील बनतो...हा भाग लिहितांना आव्हानात्मक होता.

या कादंबरीतील अनेक प्रसंग मुळातच वाचावे असे आहेत.

ही कादंबरी मी कलकत्त्याच्या पार्श्वभूमीवर लिहिली. त्यासाठे मी आधी कलकत्त्याला जावून २ महिने राहिलो...तेथील गल्ल्याबोळ ते उच्चभ्रु अशा साल्ट लेक सिटी परिसरातही राहिलो. बंगाली रीतिरिवाज-संस्क्रुती समजावून घेतली. ते आवश्यकच होते.

का?

या प्रश्नाचे उतर तत्कालीन स्थितीत दडलेले आहे आणि ते नंतर जेंव्हा खुद्द दैनिक सामनात या कादंबरीचे परिक्षण आले त्यातही गर्भित आहे. सामनात म्हटले आहे कि लेखकाने खरे महाराष्ट्रातील कथानक कलकत्त्यात नेवून चतुराई केली आहे कारण त्यातील अनेक पात्रे महाराष्ट्रातील वास्तवाशी जुळतात...अन्यथा ही कादंबरी आणि ती छापणारा प्रेस जाळून टाकला गेला असता. आणि ते खरेही आहे. हिंदुत्ववादी मंडळी या कादंबरीवर खूप नाराज होती. त्यांनी मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेक धमक्याही दिल्या...पण बधणारा मी थोडाच?

ते महत्वाचे नाही. बंगाली संस्क्रुतीचे मला लहाणपणापासुनचे आकर्षण आहे. मी असंख्य बंगाली कादंब-या वाचल्या आहेत एवढेच नव्हे तर मी थोडीफार बंगाली शिकलेलोही आहे. शिल्पी नावाची एक बंगाली तरूणी माझे मैत्रीणही होती आणि तिचे नाव मला एवढे आवडायचे कि मी एका कादंबरीचे नावच "शिल्पी" असे केले होते.

असो. ही कादंबरी माझी आजवरची सर्वात मोठी कादंबरी. ५५० वरच्या पानांची. तिचे स्वागत चांगले झाले. दुसरी आव्रुत्ती वर्षभरात निघाली. असे भाग्य शक्यतो ऐतिहासिक कादंब-यांनाच महाराष्ट्रात मिळते. मराठी माणूस हा वर्तमान, वर्तमानातील प्रश्न याबाबत असंवेदनशील असतो....धड माहित नसलेल्या इतिहासाबाबतची त्याची संवेदनशिलता मात्र टोकाची असते हे आपण आजही पहात आहोतच.

तरीही या कादंबरीचे व्यापक समिक्षा झाली. वाचकांनी या कादंबरीचा दुसरा भाग लिहावा यासाठी गा-हाणी घातली. पण दुसरा भाग मी लिहायचा विचारही केला नाही कारण...दुसरे भाग हे दुय्यमच होतात...लेखक आपल्यच मानसपुत्रांच्या प्रेमात पडलेला असतो...शेवटी पहिल्या धारेची ती पहिल्या धारेची...

http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5510253221764501349?BookName=Savyasachi

Saturday, May 21, 2011

कादंब-यांच्या जन्मकथा: ऒडिसी

मी १९९० साली हैदराबाद येथे चेन्नई (तेंव्हा मद्रास) येथुन परत येत असताना एका दिवसासाठी थांबलो होतो. तेथे मला वेळ होता म्हणुन सालारजंग म्युझियम पहायला गेलो. तेथील अवाढव्य चित्रदालनात जगविख्यात चित्रकारांची चित्रे वा त्यांच्या बेमालुम प्रती होत्या. येथेच मी जगप्रसिद्ध सुंदरी क्लीओपात्राचा अर्ध-पुतळाही पाहिला...अर्थात तोवर माझी क्लीओपात्रावरील कादंबरी प्रसिद्धही झालेली होती, पण तिचे हे वेगळे दर्शन सुखावणारे होते हे खरेच. असो. मी चित्रदालनात विस्मित होऊन एकाहुन एक श्रेष्ठ चित्र-कलाक्रुती पहात असतांना मी एका चित्राशी येउन थांबलो...आणि पायच उचलेनात. ते चित्र स्त्री सौंदर्याचे करुणामय दर्शन घडवणारे होते. हे चित्र अरियाडनी या ग्रीक पुराकथेतील प्रियकराने त्यागलेल्या तरुणीचे आहे एवढेच चित्राखालील मजकुराने मला कळाले. पण एकंदरीत त्या चित्रातील करूण भावाने मला पछाडले.

तोवर मला ग्रीक पुराकथांशी साधी तोंडओळखही नव्हती. मी रेल्वेने पुण्याला येत असतांना त्यावरच विचार करत होतो. पुण्यात आल्यावर मी काही मित्रांना अरियादनीबद्दल माहिती आहे का असे विचारले. पण कोणालाच माहित नव्हते. ज्याअर्थी ही स्त्री एका जगप्रसिद्ध चित्राचा विषय बनली म्हणजे ती पुरा-प्रसिद्ध असणार हे तर उघडच होते. तेंव्हा इंटरनेट नामक म्हटले तर उपयुक्त आणि म्हटले तर भस्मासूर या तंत्रद्न्यानाचा आपल्याकडे गंधही नव्हता. मी ब्रिटिश लायब्ररीचा सदस्य होतोच. तेथे शोध घेता घेता मला ग्रीक पुराकथांवरील अपरंपार सामग्री मिळाली. अरियादनीला तिच्या प्रियकराने, थिसियसने एका निर्जन बेटावर त्यागल्याने दु:खसंतप्त अरियादनीच्या अंतरीची गुढे उलगडली.

मग लक्षात आले...ग्रीक पुराकथा आपल्याकडे माहितच नाहीत...पण तरीही ग्रीक पुरा-व्यक्ती मात्र प्रिय आहेत. असंख्य वास्तु-वस्तु ते सिनेमाग्रुहांची नावे ग्रीक पुराकथांमधीलच आहेत. पण त्यामागील इतिहास कोणालाच माहित नाही. यातुनच "ग्रीक संस्क्रुती कोश"  कल्पना माझ्या मनात रुजली. या कोशात सर्वच ग्रीक व्यक्तिरेखा, वास्तू, देवता, खलनायक, सांस्क्रुती, शास्त्र, तत्वद्न्यान ई सर्वच सामावले जावे हे मी मनावर घेतले. आणि एकदा एखादा विषय डोक्यात घुसला कि त्याचा फडशा पाडल्याखेरीज थांबायचे नाही हा माझा स्वभाव. मग काय...मी हात धुउन कोशपुर्तीसाठी मागे लागलो. अधिक माहितीसाठी पार दिल्ली येथील ग्रीक दुतावासाचीही मदत मिळवली.

कोश सुरू करण्याआधी मला पुराकथा ते प्राचीन इतिहास याचा अभ्यास करणे आधी क्रमप्राप्तच होते. आणि स्वाभाविकपणे भारतीय पुराकथा नि तत्वद्न्यान आणि ग्रीक पुराकथा नि तत्वद्न्यान यांची तुलनाही होतच होती. या अभ्यासाने मला फार वेगळी द्रुष्टी दिली. भारतीय पुराकथा या बव्हंशी अतिअवास्तववादी व भावनीक धर्मगंडाने व्यापल्या असून ग्रीक पुराकथा या तुलनेने अति-मानववादी आहेत हे लक्षाय्त येवू लागले. म्हणजे ग्रीक देवता या मानवी स्वभावाचे अतिरिक्त दैवतीकरण होते. राग-लोभ-मत्सर-कपट-स्वैराचार-ऐन वेळीस बाजू बदलने ईईई मानवी स्वभाव देवतांचेही होतेच. तत्वद्न्यानाबद्दल म्हणाल तर ग्रीक तत्वद्न्यान हे मुळात वास्तववादी आहे...भौतिकवादी...ईहवादी आहे तर भारतीय तत्वद्न्यान हे मुलत: भावनीक, पारलौकिकवादी आध्यात्मिक आहे. युरोपची शास्त्रीय जडन-घडन कशी झाली असेल हे मी समजू शकलो. पुर्व आणि पस्चिमेतील हा मानसशास्त्रीय फरक मला नवलाचा वाटला हेही खरे. आणि तो माझा पुढील संशोधनाचा विषयही बनला.

मी कोश लिहिण्याचे काम सुरू केले. कोष लिहिणे आणि तोही एक-हाती हे सोपे नसते. जवळपास ३०० नोंदी झाल्या तेंव्हा मी ऒडिसियस या पात्राजवळ आलो. ऒडीसी आणि इलियड ही महाकाव्ये पुन्हा वाचायला घेतली. तेंव्हा मीही जीवनातील एका विलक्षण टप्प्याजवळ होतो आणि अविरत संघर्ष सुरू होता. ओडीसियस पुन्हा वाचतांना मला माझ्या आणि ओडिसियसमधील स्वभाव साधर्म्याची जाण होवू लागली. अत्यंत चतूर, तत्कालीन जगातील सर्वात बुद्धीमान म्हणुन गणल्या गेलेल्या ओडीसियसच्या झालेली घोर फसवणुकी, त्यावरही त्याने केलेली मात आणि संकटांना निमंत्रीत करत रहात त्यांना पुन्हा पुन्हा निरस्त करण्याचा आत्मघातकी स्वभाव याची मला विलक्षण मोहिनी पडणे स्वाभाविकच होते.

मी ओडीसियसवर कादंबरी लिहिण्याचा निर्णय घेतला. कोश बाजुला ठेवला. कादंबरी म्हणुन माझे स्वातंत्र्य वापरत, ही कादंबरी फक्त ओडीसियसचीही होता कामा नये तर ट्रोय युद्धातून परतलेल्या अगमेम्निओन-आणि त्याच्या वाट्याला जयानंतर आलेली अभागी कसांड्रा, मनलेउस आणि जिच्यासाठी हा घोर संगर झाला ती त्याची बायको हेलन, अगमेम्नोनची सुडासाठी त्याच्या परत येण्याची वाट पहात असणारी त्याची पत्नी (आणि हेलनची थोरली बहीण) क्लायटेम्नेस्ट्रा...ही पात्रे मुळ कथांना विशेष धक्का न लावता मी माझ्या पद्धतीने आणि भारतीय तत्वद्न्यानाचे अवगुंठण घालत फुलवत नेली. ओडिसियसचे औदर्य, त्याचे जीवनाबद्दलची निर्माण होत आलेली वितुर्ष्णा याचे चित्रन करत तो जेंव्हा अजरामरतेची देवता, अजोड सौंदर्यवती क्यालिप्सोच्या मायाजाळात तात्पुरता सापडतो...आणि शेवटी अमरता नव्हे हवे ते मानवी जीवन या सिद्धांतापर्यंत येतो. हा सिद्धांत मांडतांना मी फारच भावूक झालो होतो. येथे मराठी व्रुत्तांत देता येत नाहीय...पण इंग्रजी अनुवादित याच कादंबरीचा मी तो थोडा अंश देतो...
Life without strife is meaningless. Life without mystery is worthless. Life without uncertainty is a poison. Life without pain is like a food devoid of spices. I want to live that life.
“True, Calypso, I want to go back to my people where I can find complete solace, no matter what dangers I may have to take upon me. True, that people lack in complete faith and devotion. I know they often turn to be treacherous when their instincts overpower them. But I can’t hate them because I know, though seldom, a lamp of humanity kindles in them. Look at my friend, Polymus, I don’t know in what condition he is, but he has been my honest companion in my strife. I love them despite all their lacunas. Being human is a scarce gift, but to gain that gift we humans wage a war against circumstances in an attempt to rise above ourselves. This makes me love the people. For this love of people I can go to any extent, commit any grave sin… to make them happy and content…and fulfilled.
“Human life is nothing but an unwritten saga of tragedies, frustrations, treacheries, agonies and strife. Calypso, you are a goddess. You never can understand this strife… struggle and a fulfillment over worthless victories. You simply cannot understand the lamps of hopes lit in every mortal heart! You cannot understand the agonies of defeat and the pain and the blazing torch we bear in our heart to defeat the pains.
“We walk over a thin rope of life, hung over the crevice of the death with expectations and hopes.
“You never can understand this!
“Yes- we hate. We get bloodthirsty sometimes. Many a times we do confront annihilation. But again we rise up with our ever-strong ambitions. We feel ashamed on our foolishness of the past and again are ready to repeat it with no awakening whatsoever.
“So ignorant and foolish often are we, Calypso! What provides some meaning to our life is our ignorance. Ignorance makes us curious. Ignorance makes us blind at the bare truths of the life. It is ignorance on whose foundations our civilisations are constructed. The moment complete knowledge will come to us our civilisation will cease to be.
“If we can see what is hidden in the secret stores of future like the burning sun, our life will come to a standstill. Our ambitious, fear and greed will vaporize, for there won’t be any place to go when the future is known and the life is infinite. Life will then become insipid, Calypso.
“We hope because we are ignorant. That is why we built the fortresses of confidence on uncertain grounds. That’s why we struggle to stand up through the turmoil of life. We suffer and we collapse with an irresistible urge to stand up again, to face inevitable and unknown. Without hopes our life would have become hell.
“Let me go back, Calypso. Life here is beautiful but unexciting. I am not used to live without strife and testing my follies over and over again. Love and peace are the islands of charm for me in the ocean of struggle. Struggle is foundation of our life. I am dead without its presence. What is the use of this happiness, O celestial beauty?
“I am a human and it is great to be human.”

ही कादंबरी इंग्रजीत http://sanjay-sonawani.blogspot.com/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे. असो.

मी ही कादंबरी अप्रत्यक्षपणे मलाच अर्पण केली. म्हणजे "माझ्यातही दडुन बसलाय एक ओडीसियस...संकटांना आव्हान देत...त्यालाच...". कदाचित हा माझा उर्मटपणा असेल पण तो मी केलाय.

या कादंबरीची विशेष समिक्षा झाली नाही कारण मुळात ग्रीक पुराकथा येथे कोणालाच माहित नाहीत. पण ही कादंबरी माझी अत्यंत लाडकी कादंबरी आहे कारण ती मानव आणि अपरिहार्य नियतीतील संघर्ष, मानवी भाव-भावना, नीतितत्वे केवढ्या बदलत्या असतात याचे एक अत्यंत वेगळे दर्शन मला घडवता आले...कारण जणु काही हेलन, अगमेम्नोन, मन्लेऊस, क्लायटेम्नेस्ट्रा आणि ओडिसियसच्या रुपांतुन मीच जगत होतो.

कादंबरी संपत येणे हे प्रत्येक लेखकाला व्यथित करणारे असते. या कादंबरीचा शेवट करतांना मात्र मी व्यथित नव्हतो...मी लिहिले...

Old Odysseus is not yet devoid of ambitions and curiosity. Still he is sailing through the raging ocean. He is still unbeatable by the storms and calamities that befall him like a punctual cycle of nature. His vane eyes are still transfixed on the distant horizon. He is tireless. What is it that he searches on the faint outline of the horizon? Helen? Penelope? Or that unknown beauty of eternity? In his soul remains the same agitated zeal. “I have to course ahead…just ahead...” He cannot stop. He cannot be defeated.
He doesn’t know to stop. Until the oar in his hand slips down, until the glow in his eyes is dead, he is determined to go ahead.
His journey is not momentary.
It is boundless… infinite.

मी या कादंबरीत मानव जातीचा परिस्तिस्थीवर सातत्याने मात करण्याच्या नैसर्गिक व्रुत्तीवर प्रकाश टाकत त्याच्या झुंझार व्रुत्तीला प्रकट केले आणि म्हणुनच ही कादंबरी मला प्रिय आहे.

Wednesday, May 18, 2011

कादंब-यांच्या जन्मकथा: डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर


Death Of The Primeminister ( Marathi )


Death Of The Prime Minister ( English )

ही कादंबरी मी जेंव्हा लिहिली तेंव्हा अवघ्या विशीत होतो. इंदिराजींची नुकतीच हत्त्या झाली होती. आपल्याकडे अफवा-बोलवा पसरवण्याचे प्रमाण कमी नाही आणि अनेकदा ते फ्यंटसीलाही लाजवेल एवढे कल्पक होते. जेंव्हा जक्कल-सुतारला फाशी दिली गेली त्यानंतर अफवा पसरली होती कि त्यांना फाशी दिलेलीच नाही उलट त्यांच्या अपार खुनशी बुद्धीमत्तेचा वापर करून घेण्यासाठी भारत सरकारने त्यांना पाकिस्तानात घुसवले आहे आणि तेथे त्यांच्याकरवी घातपात केले जाणार आहेत. फाशी दिली ही हुलच आहे. त्यावर विश्वास ठेवणारे कमी नव्हते आणि त्यात मीही एक होतो.

तर इंदिराजींची हत्त्या झाल्यानंतर अशीच अफवा पसरली कि आपली हत्त्या झाल्याचे नाटक इंदिराजींनी मुद्दाम केले असून ही विरोधक आणि खलिस्तानी दहशतवाद्यांना शह  देण्याची चाल आहे. प्रत्यक्षात ज्या स्त्रीवर गोळ्या झाडल्या गेल्या त्या इंदिराजींच्या डमी होत्या. इंदिराजींच्य ३ डमी असून धोकेदायक ठिकाणी जातांना त्या या डमींचा वापर करत असत. होती कि नाही फ्यांटास्टिक अफवा.

तत्पुर्वी माझ्या काही सामाजिक कादंब-या प्रसिद्ध झाल्या होत्या. मला फ्यंटसी आणि थराराचे आकर्षण होतेच. मी या अफवेचा वापर करत मराठीतील पहिलीच (फक्त माझी नव्हे) राजकीय थरारकथा लिहिली. याचे नामकरण मी "जेंव्हा पंतप्रधान मारले जातात..." असे केले होते पण माझ्या मित्रांनी मला इंग्रजी टायटल द्यावे असे सुचवले आणि मग हे "डेथ ऑफ  द प्राइम मिनिस्टर" हे नामकरण सिद्ध झाले.

या कादंबरीने माझी ओळख थरार-कादंबरीकार अशी झाली. तिच्या पुढे अनेक आव्रुत्त्याही झाल्या. एवढेच नव्हे तर नंतर मी जवळपास २०-२२ राजकीय-आंतरराष्ट्रीय थरार कादंब-या लिहिल्या आणि त्याही खूप नावाजल्या गेल्या. काही इंग्रजीतही प्रसिद्ध झाल्या.


या प्रस्तूत कादंबरीचे इंग्रजी भाषांतर पुढे पत्रकार कामिल पारखे यांनी केले. तेही प्रसिद्ध झाले. तोवर इंग्रजीतील रहस्य-थरार-गुढ कादंब-यांची कथानके मराठी रुप घेऊन अवतरत होती. पण मराठी थरार कादंबरी इंग्रजीत जाण्याची ही पहिलीच घटना होती. याचे खूप कौतुक झाले. समिक्षक रविप्रकाश कुलकर्णी यांनी यावर लोकप्रभामद्धे विस्तृत लेख लिहून दादही दिली. इंग्रजी व्रुत्तपत्त्रांनी मराठीचा लुडलुम अशी प्रशंसाही केली.

अर्थात या कादंबरीपुरता तरी मी एवढ्या प्रशंसेला लायक नव्हतो. आज वळुन पहातांना या कादंबरीतील त्रुटी ठळकपणे जाणवतात. मी तेंव्हा हिंदी व्रुत्तपत्त्रात काम करत असल्याने माझी मराठी बिघडल्याचे चित्र या कादंबरीत जाणवते. थरार शैली ज्या पद्धतीने विकसीत असायला हवी होती तसे यात नाही. अर्थात ही माझी पहिलीच थरार कादंबरी होती आणि राजकारणाचे सुक्ष्म धागे जेवढे मांडायला हवे होते त्यात मी अपयशी ठरलो. पुढे मी हळुहळु शिकत गेलो.

या कादंबरीने मराठीत जरी राजकीय थरारकथांचे नवे दालन उघडले गेले असले तरी सामंतांचा अपवाद वगळता त्यात लेखकांची फारशी भर पडली नाही.त्यामागे अनेक कारणे आहेत. मराठी समिक्षक अशा कादंब-याना मुळात साहित्य मानत नाहीत हे एक आणि बव्हंशी मराठी लेखकांचे मनोविश्व-अनुभवविश्व पराकोटीचे मर्यादित असते हेही एक.

पण वाचकांना आनंद देता आला हेही नसे थोडके!

जनकोजी शिंदे

       दत्ताजी शिंदेचा बुराडी घाटावर मृत्यू झाला याच्या पेशवे दरबारीही तीव्र प्रतिक्रिया उमटली . तरीही १४ मार्चपर्यंत अब्दालीला रोखण्या...