Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Thursday, March 6, 2025

माणूस जिवंत करण्यासाठी!

 आमचे डोळे फुटलेले आहेत

कानात लाव्हा भरला आहे

कोणत्या ज्वालामुखीवर आम्ही बसलो आहोत

हे कळेना व्हावे एवढे बौद्धिक बधीर आम्ही झालो आहोत

पिशाच्चे नंगानाच करत आहेत चारी बाजूंनी

राज्यकर्ते आणि राज्यकर्ते होऊ पाहणाऱ्या

हैवानांचा हैवानांशी संघर्ष

आम्हाला मनोरंजक वाटतो आहे

त्यातच आम्ही आमच्या वांझ मनोरंजनांची

आणि झगड्याची सोय लावत

एकमेकांचा जीव घेण्यासाठी

आतुर झालो आहोत....

वेदनांमध्ये क्रूर आनंद घेण्यात आम्हाला तृप्तता वाटू लागलीय

आणि

स्मशानांतली धग आम्हाला अपार शांती देऊ लागलीय...

ही कोणती अभद्र शांती उपभोगतोय आम्ही?

हा कोणता नृशंस आनंद प्रिय वाटतोय आम्हाला?

अरे, जिवंत करा तुमचे फुटलेले डोळे

आणि करा साफ

लाव्हा भरलेले कान

आणि जरा बघा कोणता विनाश चालून येतोय

आणि जरा ऐका

विझत चाललेल्या आत्म्यांचे अखेरचे आक्रोश...

अरे उठून सज्ज व्हा या हैवानांचा

नाश करण्यासाठी

माणूस जिवंत करण्यासाठी!


-संजय सोनवणी

Monday, May 27, 2024

 On your wrinkled face

Is dancing a moonbeam

Trickled from a hole in our

Thatched roof

As if the Lord is caressing

Your pains,

Stored in every fold of your exhausted face…


O mother,

When shall your perpetual strife come to an end?

Working on the farms

And tending the cattle

Under the torrential rains or burning heat

With circumstances ravaging

Your mighty dreams

Those you have seen in me

And in your buried ambitions!


Wednesday, November 29, 2023

येते अवचित भान

 येते अवचित भान

रात्रीस कधी दिवसाचे

पदरात गोळा करी आभाळ

चंद्र अन ता-यांचे..

पांघरून उजळता शेला

भाळी कुंकव ते सुर्याचे

मार्दवी उषा हसवते गाली

पण स्मरण रात्र क्षणांचे

प्रणयी आभाळाचे

अन गात्र गात्र चिंबण्याचे...
पुन्हा रात्र होण्याचे....

Tuesday, November 28, 2023

असा मी माणुस नाही

 कोणाचा कायमचा

राग धरेल

द्वेष करेल
असा मी माणुस नाही
आज रागावलो तर
त्यासाठी व्यथित होणार नाही
मैत्र पुन्हा जुळवणार नाही
असाही मी माणुस नाही...
माझ्यावर जे रागावले
तर तो त्यांचा अधिकारच
मी त्या रागाच्या कारणांचा
विचार करणार नाही
असा मी माणुस नाही...
मी माझ्या वाटेत आलेला
पत्थर
(कदाचित सर्वांच्या)
हटवायच्या प्रयत्नांत मात्र
निरंतर
थकलो तरी
हटवायसाठी
झटेल निरंतर
कारण तो मला माझ्या
(कदाचित तुमच्याही)
मानवतेच्या दृष्टीला
अंध करतोय
असा पत्थर...
आकाशव्यापी....
हटवायचाय तो मला (नि तुम्हालाही)
माझा राग कोणा व्यक्तीवर
समुदायावर नाही
असलाच तर तो
केवळ माझ्यावर आहे!
म्हणुन तुमच्या रागाचेही
गीत मी
गाऊ शकतो...
वेदनांत आनंद शोधु शकतो!
पण तो पत्थर हटत नाही
काही केल्या...
ती वेदना
मात्र आता तरी
चिरंतन वाटतेय!
पण गड्या
माहित एक झालेय मला
या जगात चिरंतन काहीच नाही
तर ही वेदना
चिरंतन कशी?
कधी ना कधी
किमान
थडग्यावरती
अखेर विसावेल...!

Tuesday, September 5, 2023

माणुसकीच्या वेणा

माणुसकीच्या वेणा

साद देत राहतात
या शवाला...
जिवंत राहते हे शव
मृतांच्या दाटीत!

Tuesday, July 18, 2023

कधी कधी

 कधी कधी

झाकोळून येतो विषाद
आणि फणे काढतात
अनंत प्रश्नांचे सर्प
त्यांच्या जहरी फुत्कारांत
विरून जाते
नियतीच्या
चेह-यावरील हास्य
उरते सारे केवळ विद्रूप
आणि
जीवघेणे!
-संजय सोनवणी

Monday, June 12, 2023

जीवनाचे सौंदर्य

 जीवनाचे सौंदर्य

काव्यात नाही
गीतात नाही
संगीतात नाही
ना तत्वज्ञानात ना भक्तीत
मैत्रीत न प्रीतीत
ते हे सारे जगण्यात आहे!
मनसोक्त जगुयात!
-संजय सोनवणी

Tuesday, November 15, 2022

आत्महत्येची स्वगते!

 कवी कविता लिहितो

तेंव्हा तो आपल्या आत्महत्येची

स्वगते लिहित असतो....

ती आत्महत्येची स्वगते

त्याला जिवंत ठेवतात

ती स्वगते अमर होतील...

या मृतप्राय आशेमुळे!

बाकी कवी तसा कोणीच नसतो

आणि म्हणून कविताही नसते!

असतात ती

क्षणोक्षणीच्या

विश्वात जगू पाहणा-यांच्या

आत्महत्येची स्वगते!

Saturday, November 12, 2022

एवढेच आहे उरलेले!

 स्वत:च स्वत:ला धीर द्यायचा

आपलेच पराभूत आणि
विजयी क्षण आठवायचे
आणि या कालांधारात
उद्याच्या
असल्या नसल्या
सूर्यांचे स्वप्न पाहत
पाय पोटाशी घेऊन
या बेफाम थंडीत कुडकुडत
न संपणारी
रात्र सहन करायचे....
एवढेच आहे उरलेले!

Thursday, November 3, 2022

He has started….

  


 

He has started

From the south to the North

Embracing the questions

Those have no answers

Planes, choppers, bulletproof cars

Though all are at his disposal

Treading dusty path

He has started…!

 

Taking disadvantage of the crowd

Where his father was

Assassinated 

Tearing him to the shreds

Trusting the same people

Fearlessly, he has started through them

Making violent sentiments feel ashamed!

 

Long ago O I have heard

The kings and the emperors

With huge armies would march on

For the wars to distant places

And ruthlessly

Beheading enemy

Would spill the blood

But unarmed he is

The immense love and humanitarian dialogue

Are his only weapons

He doesn’t speak of winning the states

Doesn’t speak of winning elections

Crossing all boundaries

To go beyond mundane politics

Embracing all likeminded

He has started!

 

His arms spread open

To embrace those

Lonely in the system

And destitute with dreams shattered

Consoling them

With the warmth of selfless love

Like a sage

He has started!

 

In him people see

Sympathetic elder

Or loving brother,

Adorable son to some

The man in his fifties

Is a close relative to all

Whom they can trust

Such a march of love…

Spreading the message of affection

He has started!

 

When  he embraces

People cry in unbearable agonies

Those are caused by the system

And the gloom of hatred…distrust…

Let out helpless tears

Of their sufferings

And feeling deep consolation 

Smile with the hope of tomorrow!

 

What is the use of this march?

What use is talking to people?

Some ask in mockery

The same questions were raised

When Mahatma's  Dandi march had began

And when Baba Amte had started

His mission to connect people

History has sufficiently answered

Such

Ridiculing questions!

 

-          Heramb Kulkarni

(Trnsliterated by Sanjay Sonawani)

Friday, May 27, 2022

सत्याचा एंटिव्हायरस

 पेटून उठतील ना लोक

हो नक्कीच
आज त्यांचे रक्त शेण झालं असलं
मेंदुत गुलामीचा व्हायरस घुसला असला
आणि जे सांगितलं जातंय
तेवढच सत्य आहे
असं त्यांना वाटत असलं
आणि कन्हत कुथत
जगत जरी असले ते
तरी सत्याचा एंटिव्हायरस
करेल ना त्यांना जागं
एक दिवस
तू फक्त सांगत रहा
त्याच निर्भयतेने!
होय...
पेटून उठतील ना लोक...
एक दिवस!

Friday, October 15, 2021

ती नाजूक पावले

 ती नाजूक पावले
स्वप्नात
अजुनही
कधी कधी
वाजतात
स्वप्न विखरून पडते
त्या नाजूक पायतळी
....
तिने जायलाच हवे होते काय?

Monday, July 19, 2021

कोण अनाम महाकवी

 कोण अनाम महाकवी

ईश्वराचे हे चिरंतन गीत
माझ्याअंत:करणात
चैतन्याचे अंकुर फुलवत
गातोय?
मी मोहोरलोय
नम्रातीनम्र झालोय
या अनंत विश्वात भरून राहिलेल्या
ईश्वरी आविष्कारासमोर...
पाउस कोसळतोय
जसा परमपित्याचा आशीर्वाद!
Shailesh Wadekar, Dinesh Sharma and 27 others
2 comments
Like
Comment
Share

कधी कधी

 कधी कधी

जीवनच असे बनून जाते

कि रात्रीचे पावसाळे होतात
कालांधाराचा पाऊस झेलत
उजेडाचे आडोसे शोधावे लागतात...
उजेडाची व्याख्याही बदलत जाते
काजव्यांनाच सूर्य म्हणायची वेळ येते!
(सूर्य पाहिलाच नाही कधी...)
अशा काळात जगतोयत आम्ही
ज्या काळात फक्त आग ओकत्या हिंस्त्रतेचे
डोळे दशदिशांतून
ओसंडत येतात
ती श्वापदे आपले बळी शोधण्यासाठी आपली ओंगळ
बोटे अंधाराच्या फटींत घुसडतात
...
खूप सूर्य
गर्भांतच
मरून पडलेले सापडतात...
आम्ही अंधार-वर्षा
तुडवत राहतो
या क्षितीजापासून
त्या क्षितीजापर्यंत
एक गर्भ-सूर्य जपण्याच्या प्रयत्नात...

Monday, May 17, 2021

“सकारात्मक”

 केंद्र सरकार क्रूर, अमानुष, हिंस्त्र आहे

असे म्हणून कशाला शिव्याशाप देत
आपली जुबान खराब करता आहात?
आपल्या असकारात्मक अक्कलेचे
दिवाळे कशाला काढत आहात?
बेड नाही, ऑक्सिजन नाही, औषधे नाहीत
किंवा लस नाही म्हणून कशाला
स्वत:ला व्यर्थ त्रास करून घेता आहात?
रोजगार रोज जाताहेत
जमा पुंजी व्यवस्थेच्या जबड्यात
जगण्यासाठी घालवली जाते आहे
अर्थव्यवस्था अखेरचे आचके देते आहे
स्वप्नांचे महाल डोळ्यादेखत उध्वस्त होताहेत
म्हणून कशाला चिंतीत होता?
हा कसला मनोरोग झालाय तुम्हाला?
अरे, हे बघा,
किती भाग्यवान आहात तुम्ही माहिताय?
अजून तुमचे नाव मेलेल्यांच्या यादीत गेलेले नाही
तुमचे प्रेत नदीत, खड्ड्यात किंवा खाईत भिरकावले गेलेले नाही
किंवा अंत्य संस्काराच्या लायनीत स्मशानाबाहेर
पडलेले नाही
बघा कि जरा डोळे उघडून
पाउस अजून तरी नियमाने पडतोय
म्हणजे पीक येणारच आहे
जनावरासाठी चाराछावण्या काढाव्या लागणार नाहीत
कि सध्या किमान पाण्याचे टेंकर बोलवावे लागणार नाहीत
दयाळू लोकांनी तुमच्यासाठी अन्नछत्रांची व्यवस्थाही केलेली आहेच
म्हणजेच तुम्ही श्वास कोंडून तडफडून जर मेले नाहीत
तर तुम्ही किमान तहान-भुकेने तरी मरणार नाही आहात...
खात्रीने सांगतो!
आणि किती मरतात अखेर?
६ कि ७ टक्के फक्त
आणि तेही कोरोना झालेल्यांपैकी
...हो कि नाही?
अरे, म्हंजे तुम्ही अजून तरी चक्क नशीबवान
९४% मध्ये आहात !
कोणी सुरक्षित बाहेर तर
कोणी काठावर, किंवा कोणी मध्यात किंवा कोणी मरणाच्या सीमेवर...
पण आहात तर जिवंतच ना?
आणि तरी तुम्हाला
“सकारात्मक”
कसे राहता येत नाही म्हणतो मी?
महान नेत्याचे साधे एवढेही ऐकता येत नाही?
देशद्रोही कोठले!
-संजय सोनवणी

Monday, October 19, 2020

कविता केल्या जात नाहीत

 कविता केल्या जात नाहीत

कविता रचल्या जात नाहीत.

कविता लिहिल्या जात नाहीत....

कोणाचे दु:ख बघून नकळत
डोळ्यातून ओघळणारे अश्रुबिंदू
किंवा कोणाचा आनंद पाहुन
फुलणारे निरागस हास्य...
जगातील याच काय त्या
श्रेष्ठ कविता होत!
शब्द कवितांचे शत्रू आहेत!
शब्दात पकडली जातात ती कलेवरे.
कविता निशब्दच असते...!

ऐसे केले या गोपाळे....

शेख महमद यांच्या उदात्त पार्श्वभूमीवर लिहिलेली ही पटकथा. कथासूत्र   आंबेडकर जयंतीला निर्माण झालेला तणाव अजूनही त्या ३० - ४० हजार लोकवस...