Showing posts with label Mutual Fund. Show all posts
Showing posts with label Mutual Fund. Show all posts

Tuesday, September 18, 2018

दिर्घकालीन गुंतवणूकीसाठी रिलायंस ऑपॉर्चुनिटीज फंड (सिरीज ए)



शेयर बाजारात जेंव्हा उलथा-पालथी होत असतात तो काळ नवीन संधींनाही जन्म देत असतो हे अनेकदा गुंतवणुकदारांच्या लक्षात येत नाही. तेजीवाल्यांचा काळ असो की मंदीवाल्यांचा, ते शेयर्सच्या किंमती कमी अधिक करण्याच्या प्रयत्नांत काही विसंगती सोडून देत असतात. उदाहणार्थ काही ठरावीक शेयर्सचे भाव खुपच जास्त वाढतात व सेंसेक्सही त्यामुळे उंचावला गेलेला दिसतो तर काहींचे भाव खुपच कमी होतात व सेंसेक्सच कोसळलेला आपल्याला दिसतो. यात अनेकदा ब-याच शेअर्सचे चुकीचे मुल्यांकण होत असल्याने त्यांचे भाव मात्र योग्यतेपेक्षा किमान पातळीवर रेंगाळत असतांना दिसतात. यालाच शेअर्सचे चुकीचे मुल्यांकण म्हणतात. अशा चुकीच्या मुल्यांकणात भविष्यकाळासाठी अनेक संधी लपलेल्या असतात, पण त्या आधीच ओळखाव्या लागतात. भविष्यकालात नेमके काय घडू शकते याचे काही निर्णायक घटक असतात. त्यांचा साकल्याने विचार व विश्लेशन करुन हुशार गुंतवणूकदार योग्य त्या गुंतवणुकी करत असतो.

उदाहणार्थ २००३ ते २००८ या काळात तेजीवाल्या दलालांनी फार्मा आणि आयटी क्षेत्राकडे दुर्लक्ष केले होते. पण नंतर याच दोन क्षेत्रांनी तेजीत आघाडी घेतली होती. २००७-८ साली एकट्या भारती एयरटेलचे बाजारमुल्य सर्व फार्मा कंपन्यांच्या एकुण बाजारमुल्याएवढे होते. पण २०१३ साली एकट्या सन फार्माचे बाजारमुल्य एकुण इंजिनियरिंग उद्योगाच्या बाजारमुल्याच्या दीडपट होते. ज्या गुंतवणूकदारांनी योग्य वेळी योग्य गुंतवणूक केली ते अर्थात लाभात राहिले. पण सर्वांनाच हे अंदाज आधीच करता येतात असे नाही. परिणामी गुंतवणुकीवरील परताव्याचे अंदाज अनेक वेळा चुकतात. 

सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचे पाहिले तर केवळ पाच स्टॉक्सनी निफ्टीच्या परताव्यात ६६‍% भर घातल्याचे दिसुन येईल आणि तळाच्या ५ स्टॉक्सने २५ ते ३०%नी घसरण दाखवल्याचे लक्षात येईल. (CYTD बेसीसवर). पण कोणत्याही शेयरच्या मुल्यात झालेली वध अथवा घट कायमस्वरुपी रहात नसते. त्यांच्या मुल्यांवर परिणाम करणारे घटकांचे ऐतिहासिक आकडेवारीचे तक्ते आणि भविष्यातील संभाव्य ट्रेंड्सच्या आधारावर निवडक शेयर्समध्ये संधी शोधता येतात.

आणि नेमक्या या तत्वाचा विचार करुन रिलायंस ऑपॉर्चुनिटीज फंड (सिरीज ए) या म्युच्युअल फंड योजनेला सात सप्टेंबर २०१८ रोजी बाजारात आणले असून येत्या २१ सप्टेंबरपर्यंत खुल्या असलेल्या या योजनेत सध्या योग्य बाजारमुल्य असलेल्या शेअर्सचा मजबूत पोर्टफोलियो बनवण्याची योजना आहे. ज्या कंपन्यांची कामगिरी पुढील दोन-तीन वर्षांत चांगली होणे दृष्टीपथात आहे अशाच निवडक कंपन्यांत हा फंड गुंतवणूक करणार आहे. यात ज्या कंपन्यांचे बाजारमुल्य त्या कंपन्यांच्या नफ्यापेक्षा बरेच कमी झाले आहे अशा कंपन्या, तसेच ज्या कंपन्यांचा लाभांश मुंबई शेयर बाजाराच्या सर्वोच्च १०० इंडेक्समधील कंपन्यांपेक्षा अधिक आहे अशा कंपन्या इतर अनेक निकष लावून गुंतवणुकीसाठी निवडण्यात येणार आहेत. येत्या अधिकाधिक ३ वर्षांत ज्या कंपन्यांचा विकासदर अधिक असण्याची शक्यता आहे अशाच कंपन्यांत किमान धोका पत्करत गुंतवणूक करण्याची या फंडाची योजना आहे.

अशा निवडक पंचवीस ते तीस स्टॉक्सवरच लक्ष या फंडाकडून केंद्रीत केले जाईल असे फंडाने आपल्या ऑफरमध्ये म्हटले आहे. हे स्टॉक्स घेतांना योग्य त्याच मुल्यांकणाचा विचार केला जाईल म्हणजे किमान किंमतीत खरेदी करणे. या फंडाच्या पोर्टफोलियोत एनर्जी, हेल्दकेअर, फिनांशियल यासारख्या क्षेत्रातील स्टॉक्स असण्याची शक्यता आहे. या योजनेत ग्रोथ पर्यात्य जसा उपलब्ध आहे तसाच डिव्हिडंड हाही पर्याय आहे. आपल्या गरजेप्रमाणे गुंतवणूकदार योग्य पर्यायाची निवड करु शकतात.

या फंडाची गुंतवणूक योजना दिर्घकालीन ट्रेंड लक्षात घेऊन केली जाणार असल्याने हा फंड साडेतीन वर्ष मुदतीचा क्लोज एंडेड फंड असणार आहे. म्हणजेच या मुदतीआधी या फंडाचे युनिटस विकता येणार नाहीत.

ज्या गुंतवनूकदारांना साडेतीन वा त्याहुन अधिक काळासाठी व चांगला संभाव्य परतावा देऊ शकणा-या योजनेत गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी रिलायंस ऑपॉर्चुनिटीज फंड (सिरीज १)  ही म्युच्युअल फंड योजना एक चांगला पर्याय ठरु शकेल. या फंडाच्या योजनेची लिंक https://www.reliancemutual.com/InvestorServices/ApplicationForms/KIM-cum-Application-Form-Reliance-India-Opportunities-fund-Series-A.pdf

(वैधानिक सुचना- म्युचुअल फंडातील गुंतवणूक ही भाग-भांडवल बाजारातील जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापुर्वी योजनेची कागदपत्र नीट अभ्यासावीत अथवा आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)


Tuesday, June 26, 2018

सुरक्षित गुंतवणुकीसाठी "रिलायंस निवेश लक्ष्य"



म्युच्युअल फंडाद्वारे सर्व प्रकारची आर्थिक उद्दिष्टे पुर्ण करण्याची संधी मिळते हे आपण पाहिले आहे. यासाठीच वेगवेगळी उद्दिष्टपुर्ती करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड डिझाईन करण्यात आलेले असतात. केवळ इक्विटी प्रकारच्या, तुलनेने अधिक जोखिम असणा-या ( म्हणूनच अधिक परतावाही असु शकणा-या) फंडांमध्ये सर्व गुंतवणूक करण्यापेक्षा जोखिम नसलेले आणि दिर्घकाळात सुरक्षित चांगला परतावा देणारेही फंड गुंतवणुकीसठी वापरावेत असा सल्ला अर्थ तज्ञ अनेकदा देत असतात. दिर्घ काळासाठी सुरक्षित गुंतवणूक करु इच्छिणा-यांसाठी डेट फंड हा पर्याय आघाडीवर असुन त्यात अधिक सुविधा देणारा "रिलायंस निवेश लक्ष्य" हा ओपन एंडेड डेट म्युचुअल फंड नुकताच गुंतवणुकदारांसाठी खुला झाला आहे.

डेट फंड म्हणजे काय हे आपण आधी समजावून घ्यायला हवे. या फंडातील रक्कम सरकारी अन्य रोखे आणि मनी मार्केटमध्ये गुंतवली जाते. यात स्थिर परतावा मिळण्याची खात्री असते. भांडवल बाजारातील चढ-उताराचा यावर काहीही परिणाम होत नाही कारण शेयर मार्केटशी या गुंतवणुकीचा संबंध नसतो. सरकारचेच रोक्यांबद्दलच्या व्याजदराबाबतचे धोरण बदलले तरच हॊ शकला तर किंचित परिणाम या गुंतवणुकीवर होऊ शकतो. पण या निर्माण झाल्या तरच आणि त्याही तात्कालिक अवस्था राहतात. दिर्घ काळासाठी गुंतवणूक केली तर गुंतवणुकदारांना चांगला आणि खात्रीशिर लाभ मिळु शकण्याची सुविधा या प्रकारच्या फंडामध्ये असते. त्यामुळेच रिलायंस निवेश लक्ष्य नव्या आणि सुनियोजित प्रकारे आखणी केलेल्या फंडाचे गुंतवणूक लक्ष्य २५ ते ३० वर्षांसाठीचे आहे.

गुंतवणूकदार आपल्या मुलांचे भावी शिक्षण, आपल्या निवृत्तीनंतरच्या काळासाठीची तरतुद आणि इतर अन्य कोणत्याही दिर्घकालीन उद्दिष्टाची पुर्ती करण्यासाठी गुंतवणूक करु इच्छितात त्यांच्यासाठी "रिलायंस निवेश लक्ष्य" हा एक उत्तम पर्याय असू शकतो. "रिलायंस निवेश लक्ष्य" या फंडाने % ते .१३% या वार्षिक परतावा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी मनी मार्केट आणि सरकारी रोख्यांत गुंतवणूकी केल्या जातील आणि त्यांचे वितरण परिस्थितीप्रमाणे बदलण्यात येईल त्यामुळे सरकारी धोरणांत यदाकदाचित नकारात्मक बदल जरी झाला तरी परताव्यावर परिणाम होऊ देण्याचा प्रयत्न केला जाईल.

सुरक्षित गुंतवणुकीसाठी मुदत ठेवी हा एक सुरक्षित पर्याय आजवर मानला जात होता. पण सध्या एनपीएच्या समस्येने जवळपास सर्वच बँकांना ग्रासले आहे. शिवाय गेल्या काही वर्षांत मुदत ठेवींवरील व्याजात घटच होत आलेली आहे. भारतातच २०१० साली मुदत ठेवींवर ११% व्याज मिळत होते. ते आता केवळ .% वर आले आहे. म्हणजे परताव्यात घटच होत आली आहे भविष्यातही हाच ट्रेंड राहण्याची शक्यता आहे. त्यात मुदत ठेवींवरील व्याज हे करांच्या कक्षेत येते वजावट मिळत नाही. पण डेट फंडात करबचतीचे मार्ग काही प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांना मुदत ठेवींपेक्षा अधिक परतावा आणि सुरक्षितता मिळु शकते हे आपल्या लक्षात येईल.

रिलायंस निवेश लक्ष्य फंडाचे धोरण असे आहे की २५ ते ३० वर्ष या दिर्घ मुदतीच्या सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करुन गुंतवणुकदारांना सुरक्षित खात्रीशिर परतावा देणे. सरकारी रोख्यांमधील गुंतवणूक ही सरकारद्वाराच हमीप्राप्त असल्याने गुंतवणुकदार निर्घोर राहू शकतात. आपली मुले, नातवंडे यांच्या भविष्याची तरतूद करुन ठेवण्याचा हा उत्कृष्ठ मार्ग हा फंड देतो. सेवानिवृत्तीचा काळ चांगला घालवण्यासाठीही हा फंड आकर्षक ठरतो

शिवाय अचानक कोणाला पैशांची गरज असल्यास त्याला आपली गुंतवणूक केंव्हाही काढुनही घेता येते. त्यामुळे लिक्विडिटी हीसुद्धा समस्या उरत नाही. गुंतवणूकीच्या दिवसापासुन तीन वर्षांनंतर या फंडावर येणा-या व्याजाला इंडेक्सेशन करसवलती मिळतात, त्यामुळे करबचतही होऊ शकते. कोणाला नियमित विथड्रॉवल करायचे असल्यास तीही सुविधा या फंडाने दिली आहे.

वरील बाबी लक्षात घेता दिर्घकालीन वित्तीय उद्दिष्ट असलेल्या गुंतवणुकदारांसाठी एक नवे आकर्षक वित्तीय साधन रिलायंस निवेश लक्ष्यच्या रुपाने उपलब्ध झाले आहे. हा फंड गुंतवणुकदारांसाठी १८ जुनला खुला झाला असुन अंतिम मुदत ही जुलै २०१८ आहे. आपल्या गुंतवणुक सल्लागाराचा सल्ला घेऊन आणि या फंडाची कागदपत्रे पाहून आपण आपल्या गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकता.


या वेबसाईटवरही आपल्याला या फंडाची माहिती मिळेल

Monday, June 4, 2018

आर्थिक शर्यत जिंकण्यासाठी रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड




सर्व दिवस सारखे नसतात हे आपण दैनंदिन व्यवहारांतुनही अनुभवत असतो. अर्थव्यवहारात तर ही बाब प्रकर्षाने पहायला मिळते. भांडवल बाजारात कोणत्या ना कोणत्या कारणाने अचानक चढ-उतार सुरु होतात हे आपण सेन्सेक्सच्या मागच्या इतिहासाकडे पाहिले तरी सहज लक्षात येते. भांडवलबाजारात व्य्कतीगत पातळीवर गुंतवणूक करणारे नेमके बाजार जेंव्हा वाढता (खरे तर महागडा) होत जात असतो तेंव्हा गुंतवणुक करायला पुढे सरसावतात आणि अनेकदा पस्तावतात. खरे तर सामान्य गुंतवणुकदार अशा वेळीस भांबाऊन जातो. आपल्या मुळच्या गुंतवणुक वाढीच्या ध्येयाचे काय हा प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतो. आर्थिक गुंतवणुकीतुन अधिकाधिक पण सुरक्षित परतावा मिळवणे ही एक अडथळ्यांची ट्रायथेलान शर्यत ठरते आणि ती जिंकण्यासाठीही म्युचुअल फंड असतात. रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड हा या शर्यतीत जिंकण्यासाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचा प्राधान्याने विचात करण्यास हरकत नाही.

म्युच्युअल फंड हे अशा सामान्य गुंतवणुकदारांसाठीच असतात जे गुंतवणुकदाराच्या उद्दिष्टांचे भान ठेवतात. बॅलंस्ड (संतुलित) म्युच्युअल फंड हे अशा आकस्मिक चढ-उतारांना तोंड देत गुंतवणुकदाराची उद्दिष्ट पूर्ती करण्याच्या उद्देशानेच आरेखित केलेले असतात. रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड (Reliance Balanced Advantage Fund) हा भांडवलबाजारातील अस्थिरतेचा विपरित परिणाम गुंतवणुकदाराच्या गुंतवणूकीवर होणार नाही अशा पद्धतीने गुंतवणूक संतुलित प्रमाणात विभागते. त्यामुळे भांडवलबाजारातील "रिस्क" हा घटक न्युनतम व्हायला मदत होते.

त्यामुळे बॅलंस्ड फंडांकडे गुंतवणुकदारांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढु लागला आहे. २०१६ मध्ये या प्रकारातील एकुण गुंतवणूक ५७,००० कोटी रुपये होती ती २०१७ मध्ये १, ३५,००० कोटी एवढी झाली. आणि त्यात उत्तरोत्तर वाढच होत आहे, यचे कारण या म्युचुअल फंड प्रकारात धोक्याचे प्रमाण किमान असुन परताव्याची शक्यता अधिकाधिक असते.

रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड शेयर बाजारातील अनिश्चितता लक्षात घेऊन आपली शेयर बाजार आणि अन्य साधने यांतील गुंतवणूक निर्धारित करतो. त्यासाठी महत्वाची अशी तीन पथ्ये पाळली जातात. पहिली बाब म्हणजे भावनिक पुर्वग्रह टाळत शेयर प्रकारात किती आणि कधी गुंतवणूक करायची अथवा काढून घ्यायची याचा माहितीपुर्ण आणि तथ्यांवर आधारित निर्णय या प्रकारात घेतला जातो. म्हणजे शेयरबाजार जेंव्हा चढा असतो तेंव्हा गुंतवणूक काढून घेतली जाते कारण चढानंतर उतार हा अर्थव्यवस्थेचा स्थायीभाव असतो. चांगल्या कंपन्यांत गुंतवणूक विखुरक्ली जाते व धोक्याचे पातली किमान केली जाते. म्हणजेच ज्या मोठ्या पहिल्या शंभरात आहेत त्या कंपन्यांतच गुंतवणुक केली जाते जेथे अस्थैर्याची लागण किमान असते. गुंतवणूकीतील २५ ते ३५ हिस्सा हा कर्ज ((Debt) प्रकारात गुंतवला जातो. त्यामुळे एक खात्रीशिर स्थिर उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो व गुंतवणूकीचे प्रमाण हे संतुलित ठेवले जाते. म्हणजेच रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड हा हायब्रीड (मिश्र) प्रकारातील म्युच्युअल फंड आहे आणि या गुंतवणुकीत संतुलन साधले गेले असल्याने गुंतवणुकदाराला भांडवल बाजारातील अस्थैर्याची विशेष काळजी करण्याची गरज भासत नाही.

मागील पाच वर्षातील या फंडाच्या कामगिरीवरुन या फंडाचा तीन वर्षांचा सरासरी परतावा हा सेन्सेक्सच्या १०% परताव्याच्या तुलनेत १३% एवढा राहिलेला आहे. तीन वर्षाच्या कोणत्याही सरासरीत, जेंव्हा सेन्सेक्सने अनेक वेळा खालच्या पातळ्या गाठल्या तेंव्हाही या फंडाने परताव्याची उणे पातळी कधीही गाठलेली नाही हेही विशेष आहे. धोरणात्मक गुंतवणुकीमुळे भांडवलबाजारात सध्या मोठी अस्थिरता असली तरी या फंडाच्या कामगिरीत स्थैर्य आणि सातत्य राहिले आहे.

ट्रायथेलानमध्ये ज्या प्रमाणे सर्व प्रकारच्या अडथळ्यांवर मात करीत शर्यत जिंकायची असते तशीच आर्थिक शर्यत जिंकायचा मार्ग रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड उपलब्ध करुन देतो. ज्या गुंतवणुकदारांना पारंपारिक गुंतवणुकीतून, उदाहणार्थ मुदत ठेवींवर मिळणा-या परताव्यापेक्षा अधिक परतावा आहे पण त्याच वेळेस धोकाही पत्करायचा नाही अशा गुंतवणुकदारांसाठी रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड हा उत्तम पर्याय असू शकतो. रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंडाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा.

https://www.reliancemutual.com/FundsAndPerformance/Pages/Reliance-Balanced-Advantage-Fund.aspx

संदर्भ: १. https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/advantages-of-investing-in-balanced-funds/articleshow/61234211.cms




व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...