Saturday, September 15, 2012

वंजारी समाजाचा इतिहास


आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शोध लागण्यापुर्वी पुरातन काळापासुन ही मालवाहतुक/मालपुरवठा करणारा एक मोठा समाज होता ज्याला आपण महाराष्ट्रात वंजारी म्हणतो. फिरता व्यापार करणारे म्हणजे वण-चारी...याचेच रुपांतर "वंजारी" या शब्दात झाले असे इतिहासात डोकावुन पाहता दिसते. या आद्य मालवाहतुकदारांचा...मालपुरवठादारांचा इतिहास पुरातन तर आहेच पण मानवी जीवनाला तेवढाच उपकारक ठरलेला आहे.

पुरातन काळी भारतात अरण्ये खुप होती. बैलगाड्या जावू शकतील असे फार रस्तेही नव्हते. भारत हा एक खंडप्राय देश. भुगोलही विचित्र. प्रचंड पर्वतरांगा. अलंघ्य नद्यांची रेलचेल. क्वचितच रहदारी करता येतील असे नाणेघाटासारखे घाट...पण ते बैलगाड्यांना अनुपयुक्त. बरे एका राज्यातील माल दुस-या राज्यांतील नागरिकांच्या गरजांसाठी/व्यापा-यांसाठी वाहतुक यंत्रणेची गरज तर होतीच. सिंधु संस्क्रुतीच्या कालापासुनच भारतात नैसर्गिक ते कृत्रीम बंदरे बनु लागली होती. या बंदरांतुन विदेशात माल निर्यात केला जायचा तसाच आयातही केला जायचा. हा बंदरांपर्यंत पोहोचवणे ते आयात माल देशात इच्छित स्थळी पोहोचवण्याची सुविधा नसती तर या आयात-निर्यातीचे काम अशक्यप्राय असेच होते.

हे तत्कालीन सुविधांचा पुरेपुर अभाव पाहता विविध समाजघटकांतील ही गरज पुरी करायला पुढे आले. बैलगाड्यांचा उपयोग नसल्याने बैलांचा मोठ्या प्रमाणावर मालवाहतुकीसाठी वापर करायला सुरुवात केली. कापडांचे तागे, धान्य, मीठ, मसाले असे पदार्थ बैलांवर शिस्तशीर लादुन ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवले जावू लागले. तिकडुन तेथील माल लादुन आनला जावू लागला. त्याचबरोबर हे वंजारी स्वत: व्यापारही करत.

मालवाहतुकीसाठी बैलांची गरज असल्याने हा समाज पशुंच्या पैदाशीतही अग्रेसर राहिला.

कोकणातुन व गुजरातेतील क्च्छमधुन मीठ आणत देशभर वितरण करणारा एक स्पेशालिस्ट वर्गही यातुनच निर्माण झाला. मीठाची गरज सर्वत्र. आगरी समाजाकडुन ते उचलायचे आणि देशभर विकायचे. त्या काळात मीठाची किंमत मोठी होती. लवण (मीठ) वाहतुक करणारे ते "लमान" (लभान) हा पोटभेद त्यातुनच निर्माण झाला.

आजचे घाट, रस्ते हे मुळच्या वंजारी मार्गांवरच बनले आहेत. या मार्गांवरुन एकेक वंजारी कुटुंब शेकडो बैलांचे तांडे घेवून देशभर मालवाहतुक करत असत. वाटेत चोर-दरोडेखोरांच्या धाडी पडण्याच्या घटना नित्य असल्याने प्रतिकारासाठी आपसुक वंजारी समाज लढवैय्याही बनलेला होता. मुळ व्यवसायच भटक्या स्वरुपाचा असल्याने आणि विविध जाती-जमातींशी, अगदी परकिय व्यापा-यांशीही नित्य संपर्ज येत असल्याने वंजा-यांची एक स्वतंत्र व वैशिष्ट्यपुर्ण संस्कृतीही बनत गेली. इतर कोणत्याही समाजापासुन वेगळे पडल्याने एक स्वतंत्र मानसिकता...भटकेपणाची नैसर्गिक उर्मी यातुन त्यांचे स्वत:चे संगीत...काव्यही उमलत गेले. भाषाही वेगळी बनत गेली. हे सारे नैसर्गिक व स्वाभाविक असेच होते. वंजारी-लमाणांच्या तांड्यांचे आकर्षण तत्कालीन कवी/नाटककारांमद्धेही होते. दंडीने त्याच्या दशकुमारचरितात तांड्यांच्या एका थांब्याचे व रात्रीच्या त्यांच्या आनंदी गीतांचे/नृत्यांचे अत्यंत सुंदर वर्णन करुन ठेवले आहे.

वंजारी समाजाचे कार्य फक्त नागरी व व्यापा-यांसाठीचा मालपुरवठा करणे येथेच संपत नाही. या समाजाचे राजव्यवस्थांसाठीचे सर्वात मोठे योगदान म्हणजे युद्धकाळात सैन्यासाठी अन्नधान्याचा पुरवठा करणे. हे काम वंजारी समाज पुरातन कालापासुन करत आला असला तरी तत्कालीन युद्धे नजीकच्याच सीमावर्ती राजांशीच शक्यतो होत असल्याने सैन्यासाठीच्या अन्नधान्य वाहतुकीची व्याप्ती कमी होती. पण पुढे युद्धांचा परिसर विस्तारत गेला. मध्ययुगात इस्लामी सत्ता आल्यानंतर सतत युद्धायमान परिस्थित्या जशा बनत गेल्या तसतसे या क्षेत्रातील वंजारी/लमानांचे योगदान वाढत गेले. महिनोनमहिने सैन्याचे तळ एकेका ठिकाणी पडत. सैन्य असो कि बाजारबुणगे, शाश्वत अन्नधान्य पुरवठ्याशिवाय जगणे शक्य नव्हते. सैन्य पोटावर चालते हे म्हणतात ते खोटे नाही. वाटेतला मुक्काम असो कि युद्धभुमीवरील, वंजारी/लमाणांचे तांडे अन्नधान्य पुरवठा अव्याहतपणे करत असत. हा समाज कोणत्या अशा विशिष्ट बाजुसाठीच पुरवठा करत नसल्याने, तटस्थ असल्याने  वंजा-यांवर कोणताही पक्ष बळजबरी करत नसे वा हल्ले करुन त्यांची लुटमारही करत नसे याचे कारंण म्हणजे त्यांच्या अस्तित्वाखेरीज युद्धे लढता येणे अशक्य आहे याची जाणीव सर्वांनाच असे. सैन्याला अन्नधान्य पुरवठा करण्याचे काम अगदी ब्रिटिशकाळापर्यंत चालु होते. चेउल येथील बंदरात हजारो बैलांचे वंजारी तांडे येत असत, याची नोंद कोलाबा ग्यझेटियरने केलेली आहे. अनेक वंजारी/चारण/लमानांना मोगलांनी वतने दिली असल्याच्याही नोंदी मिळतात.

थोडक्यात अठराव्या शतकापर्यंत मालवाहतुक, फिरता व्यापार यात वंजारी समाजाचे प्राबल्य होते. परंतु ब्रिटिशकाळात रस्ते बनु लागले. औद्योगिक क्रांतीमुळे वाहतुकीची आधुनिक साधने आली व वाहतुकीचा वेगही वाढला. रेल्वेने तर पुरती क्रांतीच घडवली. बैलांच्या पाठीवर सामान लादुन भ्रमंती करनारा वंजारी/लमाण समाज दूर फेकला जावू लागला. त्याची गरजच संपुष्टात आली. चार-पाच हजार वर्ष अव्याहतपणे भटकत राहुन व्यवसाय करणा-यांचे पेकाट मोडले नसते तरच नवल! हा सर्वच समाज यामुळे एका विचित्र वळनावर आला. स्थिर होणे भाग पडले. ही सक्तीची स्थिरता होती. काही शेतीकडे वळाले, तर काही मोलमजुरीकडे.


अनेक वंशातुन निर्माण झालेला समाज

संपूर्ण भारतात विखुरलेली, परंतु काही राज्यांत अनुसूचित जमात व काही राज्यांत अनुसूचीबाहेर असलेली ही एके काळची भटकी जमात. यांची वस्ती प्रामुख्याने राजस्थान, आंध्रप्रदेश, ओरिसा, कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब व बिहार , मध्य प्रदेश, महाराष्ट्र व हरयाणा या राज्यांत आढळते. बंजारा जमातीच्या अनेक शाखोपशाखा आहेत. प्रदेशपरत्वे या लोकांना बंजारी, लमाणी, लंबाडी, सुकलीर लमाण, मथुरा लमाण, न्हावी बंजारा, शिंगवाले बंजारा, चारण बंजारा, गोर बंजारा, कचलीवाले बंजारा, यांसारखी विविध नावे आहेत. स्थलपरत्वे त्यांच्या चालीरीती, देवदेवता व अंत्यसंस्कार यांतही काहीसा फरक आढळतो. महाराष्ट्र्रात काही जिल्हयात आढळणारी वणजारी किंवा वंजारी ही जात बंजारा वा बनजारी जमातीहून सांस्कृतिक दृष्टया निराळी आहे. याचे कारण म्हनजे या समाजाचे गेल्या दोनेकशे वर्षांत झालेले महाराष्ट्रीकरण. परंतु सर्वांचा व्यवसाय एकच होता. अर्थात विविध वंशाचे लोक या व्यवसायात सामील झाल्याने त्यांची प्रदेशनिहाय नांवे वेगळी झाली हे वरील यादीवरुन लक्षात येईल. अनेक वंजारी स्वत:ला राजपूत कुळीतील राणाप्रतापाचे वंशज समजतात. राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते मुसलमानांबरोबर दक्षिणेस आले असावेत असेही मानले जाते, पण ते ऐतिहासिक वास्तव नाही. त्यांच्यात अनेक उपजमांतीचे लोक आहेत. बिहार व ओरिसा या राज्यांत त्यांना आदिवासी म्हणून मान्यता मिळाली नाही. इतरत्र त्यांना अनुसूचित जमातींत समाविष्ट केले आहे. तर महाराष्ट्र्र राज्यात त्यांना भटक्या विमुक्त जातीचा दर्जा दिलेला आहे. आंध्र प्रदेशात ते सुगाळी, दिल्लीत शिरकिवन, राजस्थान व केरळात गवरिया व गूजरातमध्ये चारण म्हणून ओळखले जातात. लोदी घराण्यातील सिकंदरशाह याने १५०२ मध्ये धोलपूरवर स्वारी केली, तेव्हा बंजारांचा प्रथम उल्लेख केलेला आढळतो. एन.एफ. कंबलीज याने या जमाती संबंधीचे संशोधन प्रथम प्रसिध्द केले. त्यांच्या मते बंजारांच्या चार प्रमुख पोटजाती आहेत चारण, मथुरिया, लमाण आणि घाडी, यांपैकी चारण हे संख्येने जास्त आहेत. त्यांच्यात पुन्हा राठोड, परमार चाहमान, जाडोत, किंवा मुखिया अशा चार कुळी आहेत.

थोडक्यात विविध वंशीय व प्रांतीय लोक या व्यवसायात आल्याने हे सर्व पोटभेद पडले असले तरी समस्या समान आहेत. व्यवसाय म्हणुन बंजारा-वंजारी-चारण हे सारे एकच हा समाजशास्त्रीय इतिहास आहे.

वंजारी समाजही पुरातन काळी मातृसत्ताक पद्धती पाळनाराच होता. महाराष्ट्रातील वंजा-यांची श्रद्धास्थाने म्हणजे जेजुरीचा खंडोबा आणि तुळजाभवानी. या समाजातुन उदयाला आलेले थोर संत म्हणजे भगवानबाबा महाराज. वंजारी समाजाची भगवानबाबांवर अपार श्रद्धा आहे.

आजचे वास्तव

आज महाराष्ट्रातील वंजारी समाजाची अवस्था अवांच्छित समाजघटक अशी बनली आहे. आज काही प्रमानात शेती तर असम्ख्य वंजारी उसतोदणी कामगार म्हणुन राबत आहेत. आर्थिक स्थिती ही अत्यंत दुर्बळ झालेली आहे. आजही हा समाज स्वत:च्या अस्तित्वाच्या शोधात आहे. आजही शिक्षणाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर आहे. परभणी, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत वंजा-यांची संख्या मोठ्या प्रमानावर आहे. याचे कारण म्हनजे हा भाग सातवाहन ते यादव काळापर्यंत व्यापाराची मध्यवर्ती केंद्रे होती.

महाराष्ट्रात याच समाजातुन उदयाला आलेले महत्वाचे राजकीय नेतृत्व म्हनजे गोपीनाथ मुंडे. वंजारी समाजाचे ते एकमेव आशास्थान असले तरी महाराष्ट्राच्या जातीय राजकारणात त्यांना शह देण्याची अन्य जातींतील नेतृत्वांची प्रवृत्ती एकार्थाने विघातक अशीच आहे. सध्या बहुजन समाजाचे ऐक्य करण्याचे प्रयत्न चालु आहेत त्यात महादेव जानकर, छगन भुजबळ व गोपीनाथ मुंडे हे पुढाकार घेत आहेत. भविष्यात काय होइल हे सांगता येत नसले तरी आज वंजारी समाजाला सापत्नभावाची वागणुक मिळते आहे हेही तेवढेच सत्य आहे. ही स्थिती कशी बदलवायची हे आपल्या सर्वच समाजासमोरील आव्हान आहे.

40 comments:

 1. क्या बात है...सर्! ह्या जातींचा इतिहास शोधण्याचे आपण हाती घेतलेले काम फारच स्पृहणीय आहे. माझ्याही डोक्यात बरेच दिवस हा विषय घोंघावत आहे. तुमच्या कामामुळे उत्साह आला. वंजारी समाजावर आधी कुणी काम केलेय का? छान लेख.

  फक्त एक छोटीशी सूचना की दशकुमारचरित हे दंडीचे आहे. बाणभट्टाच्या लेखनात अशा तांद्याचे वर्णन आल्याचे मला आता तरी स्मरत नाही. बाकी फारच अभिनव लेख! धन्यवाद!

  ReplyDelete
 2. बंजारा या शब्दामुळे फसून तम्ही वंजारी समाजाची गाठ लमाणाशी बांधली आहे. या दोन्ही जमाती भिन्न आहेत. 'वड्याचे तेल वांग्यावर' यालाच म्हणत असावेत.

  ReplyDelete
 3. अत्यंत अपूर्ण , पुस्तकी , खूप मागील भूतकाळातील , वरवरची माहिती. ..तुम्ही वंजारी लोकांशी बोलला का नाहीत? आज महाराष्ट्रातील राजकारणात जितेंद्र आव्हाड सारखे वंजारी सुद्धा आहेत.. तुम्ही जे गरिबी बद्दल म्हणालात ..खूप गम्मत वाटली . एक सर्व साधारण शेतकरी वंजारी सुद्धा ४०-५० लाखांचा धनी असतो. शहरातील वंजारी तर विचारूच नका. तुम्ही मनोहर कदमांचे "तेलेगु समाजच इतिहास "हे पुस्तक वाचावे. वंजारी समाजची एक दिरेक्तरी प्रसिद्ध होते ती पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल कि हा समाज उच्च मध्यमवर्गीय आहे. मी हे ठामपणे सांगते. मुंबईत राहणारा सर्व शाधारण वंजारी माणूस किमान ३ बेडरूम च्या घरात राहतो. आणि सुखवस्तू आहे. शिक्षण असू दे नाहीतर व्यापार ह्या सर्वात तो पुढे. आहे. माझ्या ,आते तुम्ही हा लेख फक्त माहिती गोळा करून घेतला आहे.ह्यातील सर्व संधर्भ जुने अत्यंत जुने आहेत. तुम्हाला ह्या समाजातील लोकांशी बोलालायला हवे होते.

  ReplyDelete
  Replies
  1. हरे कृष्ण
   तुम्ही अगदी खरे वास्तव सांगीतले आहे ताई

   Delete
  2. सुलक्षणा ताई... मी एका कामानिमित्त संदर्भ शोधताना वरील लेख हातात आला आणि तुमची प्रतिक्रीया वाचली. तुमच्या म्हणण्यानुसार सौनवणी सर वंजारी लोकांशी बोलले असते तर त्यांना अनेक गौष्टी अधिकच्या कळाल्या असत्या.
   उदा.१)ज्यांच्या पिढ्यान पिढ्या उसतोड करण्यात गेल्या , आजही जात आहेत आणि अजुन किती पिढ्या उसतोड करतील सांगता येणार नाही.
   २) तुम्ही जो ४०, ५० लाख चे धनी असलेल्या वंजार्‍यांचा उल्लेख केला... वंजारी लोकसंख्या असलेल्या संपूर्ण गावाचे उत्पन्न नसलेली गावे सापडली असती.
   ३)मुंबईत ३ बेडरूमवाले वंजारी असतीलच पण त्याच मुंबईत रेल्वेमधे हमाल असणार्‍या एकून हमालापैकी ४५% हमाल वंजारी असून त्यातील १५% हमाल प्लॅटफाॅर्मवरच झोपतात... त्याकाळात गावाकडे त्यांची माणसं उसतोड करीत गावोगाव फिरत असतात.
   ४) प्रत्येक समाजात काही अल्प प्रमाणात लोक श्रीमंत असतातच. याचा अर्थ सगळा समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न असतोच असे नाही. अगदी ब्राम्हण, मारवाडीही याला अपवाद नाहीत.
   ५)आणि आर्थीक दृष्ट्या संपन्न असलेला समाज पुढारलेला समाजही प्रगत असतोच असे नाही. वंजारी समाजातील अनेक तरूण शिकून उच्च पदावर गेलेत. पण नितीमत्तेने सेवा करताना आपली कौटूंबिक आर्थीक स्थिती फारशी मोठी केली नाही.(करू शकत असले तरी) म्हणून अशा वंजारी अधिकार्‍यांचा दबदबा प्रशासनात दिसून येतो.
   ताई, तूम्ही कोणता वंजारी समाज पाहून समस्त वंजारी समाजाबद्दल मत व्यक्त करताय ? डिरेक्टरीच्या बाहेर ही मोठा समाज आहे.
   संजय सोनवणी सर, आपले अभिनंदन ! किमान यामुळे वंजारी समाजाच्या समस्या पुढे येण्यास मदत तरी नक्की होईल.
   धन्यवाद !

   Delete
  3. Rajendra Sir. MI tumchhyashi sahamat aahe

   Delete
 4. अभ्यासपुर्ण मांडणी.संशोधन आणि वास्तव यांचे उत्तम चित्रण.धन्यवाद.
  टिकाकारांना सगळाच वंजारी समाज जर श्रीमंत आहे असे म्हणायचे असेल तर त्यांनी त्यासाठी आधार द्यायला हवेत. त्यांची माहिती हे त्यांचे मत झाले.त्याला लिखित पुरावा दिल्याशिवाय ते स्विकारार्ह ठरत नाही.
  टिकाकारांचा "सगळा वंजारी समाज आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे" हा दावा पटणारा नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. सोनवणी साहेब आपल्या ब्लॉग साठी धन्यवाद.पण आपण काही चुकीची मते यात मांडली आहेत.आपण या समाजास क्षत्रिय का मानले नाही.हे आम्हाला कळले नाही.राणा प्रताप याचे वंशज आहेत असे कोणाचे मत नाही पण हा समाज लढवय्या आहे.आणि इतिहासात याचे अनेक उल्लेख आढळतात.हा समाज एसटी वा आदिवासी कोणत्याही राज्यात नक्कीच नाही जे आपण नमूद केले आहे...याचा आम्ही निषेध करतो.कृपया आपले ज्ञान तपासा आणि ते अर्धवट असेल तर ते पूर्ण करा.आणि जरा मराठा समाजाच्या क्षत्रिय पानाच्या दाव्या वर बोला.कारण कुणबी समाज हा क्षत्रिय नाही तरीही तो स्वत: ला क्षत्रिय वा महाराजाचे खरे वंशज मानतो...आज वर्ण व्यवस्था संपली आहे.पण स्वाभिमान - निष्टा- दिलेला शब्द पाळणे-कोण समोर न झुकणे अशे काही गुणधर्म समाज पाळतो त्यामुळे यात कृपया बदल करा.

   Delete
  2. तुम्हाला वंजारी समाज क्षत्रीय आहे असे मानायचे असेल तर मानायला कोनाची हरकत आहे? वंजारी समाज लढवैय्या होता हे मी लिहिलेच आहे आणि ते काही वेगळे सांगत नाही. राहिले एस. टी. आदिवासी ई. बाबत. कर्नाटकात हा समाज एस.टी.त मोडतो व तसे निर्णय हायकोर्टाने दिलेले आहेत. वंजारींना आदिवासीत सामाविष्ट करण्याची मागणी दोन राज्यांत आहे...ती मान्य झालेली नाही हेही मी लिहिले आहे. आपण नीट लेख वाचावा. राहिले मराठा-कुणबी समाज क्षत्रीय आहेत कि नाही याबाबत...मी वर्णव्यवस्था मानत नाही. जे मानतात ते मनुवादी असतात असे माझे स्पष्ट मत आहे. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चर्चा माझ्या ब्लोगवर अपेक्षीत नाही.

   Delete
 5. ठिक आहे पण काही गोष्टी चुक आहेत.

  ReplyDelete
 6. narke sir ,tumchyasathi hi mahiti मी वंजारी समाजातील आहे .मी गेल्या ८ वर्षापासून दुबईत वास्तव्यास आहे .वरील वंजारी समाजाच्या इतिहासतील मी सर्व बाबींशी सहमत नाही.
  वंजारी समाजात डॉक्टर ,इन्जिनेअर ,न्यायधीश ,वकील ,प्राध्यापक ,कुलगुरू ,बिझिनेसमन ,नौकारदार वर्ग ,सरकारी ओफिसिर ,पोलीस ऑफिसर ,आय ए एस ,आय पी एस ,सीमेवर लढणारे जवान ,वैमानिक ,क्रिकेटर {संजय बांगर } एवढेच नव्हे तर ,अमेरिकेतील नासा {बालासाहेब दराडे } मध्ये सुद्धा काम करतात. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते ,मराठवाड्यात गेल्या 20 वर्षापासून सर्वात जास्त आयकर भरणारा मनुष्य हि वंजारी आहे . तुकाराम दिघोळे जे महाराष्ट्राचे उर्जा मंत्री होतेIPS भारत आंधळे , १ लाख नेत्रदान शास्राक्रिया करणारे dr त्याताराव लहाने आणि आज मुंबई मध्ये निदान ५०० हून अधिक पोलीस वंजारी समाजातील आहे

  ReplyDelete
  Replies
  1. बेळगे म्यडम, वंजारी समाजात अनेक थोर व गर्भश्रीमंत व्यक्ती आहेत याबाबत दुमत असण्याचे कारणच नाही. तसे सर्वच समाजांत असतात. प्रश्न उपेक्षित समाज बांधवांच्या उत्थानाचा आहे. त्यामागील तळमळ समजावून न घेता आक्षेप/निषेध करणे फार सोपे असते. पण त्यासाठी प्रयत्न करणे अवघड असते. स्वत:चे कल्याण झाले म्हणुन सर्वांचेच झाले आहे असे जे मानतात ते भांडवलशहांपेक्षा क्रुर असतात. स्वार्थी व अप्पलपोट्टे असतात. मी शोषित व वंचितांच्या बाजुने आहे...तथाकथित उच्चवर्णीय/वर्गीयांच्या बाजुने नाही. तुम्ही जेवढी यादी दिली आहे त्यापेक्षा अधिक म्हनजे जवळपास ८०‍% समाजबांधव कोणता जीवनसंघर्ष करत आहेत हे डोळे उघडुन पहावे. भासकरराव आव्हाडांच्या प्रेरणेने बनलेल्या वेबसाईटवर तुम्हाला याचे मी लिहिले त्यापेक्षा अधिक ज्वलंत चित्रण वाचायला मिळेल.

   Delete
  2. बंजारा आणि वंजारी हे एकदम भिन्न आहेत. बंजारा समाजाच्या चालिरिति, भाषा, वेशभूषा ह्या एकदम वेगळ्या आहेत, कुठे च काहीच साम्य नाही हो। बंजारा समाजवार घुंहेहर जमात म्हणून ठप्पा ब्रिटिश लोकनि लावला होता, आजही महाराष्ट्रात ग्रामीण भागात किंवा आंध्र प्रदेश मधे ह्या समाजा बद्दल हीच भावना बऱ्याच लोकांची आहे। नागपुरला सर्वाधिक इनकम टैक्स भरणाऱ्या 19 लोकांच्या यादीत केवल 2 मराठी नावे असतात बाकी 8 नावे हे हिंदी भाषिक लोकांची असतात। 2 मराठी नावे ही वंजारी समाज बंधवांचीच असतात।

   Delete
 7. swatantryaveer saavarkaranche sahkari kavi govind urf aba darekar he vanajari hote.tyancjhe ajoba mandiratil pothya sambhalnyache kam karit hote tar vadil gavandikam karit hote.kavi govind he donhi payanni pangu hote.tinhee savarkar bandhunna atak jhalyanantar kavi govindanni mandirat bhajane mhanon milaalela shidha savarkaranchya patnees nevun dyavayaachaa.savarkar kutumbane savarkar andamaanaat asatana vanjaaryaanchya bhikshevar udar nirvaah kelaa.savarkar kutumbachi poorn malmatta britshanni japt keli hoti.

  ReplyDelete
 8. सोनवणीजी, वंजारी समाजाविषयी आपण जे लिखाण व संशोधन करत आहात,त्याबद्दल आपले आभार.इतिहास हा इतिहास असतो आणि त्यात काही घडले असेल तर आपण आज ते बदलू शकत नाही.ते तमाम समाज बांधवांनी लक्षात घ्यावे.मुळात वंजारी समजा विषयी आजवर कोणाही इतिहासतज्ञा ने विस्तृत लिखाण केलेले नाही.हाच मुळात या समाजावर अन्याय आहे.एव्हढी मोठी ऐतिहासिक परंपरा व वारसा लाभलेला हा समाज क्षत्रिय असून अनेक राजे,नल्ला व फत्ता यासारखे शूरवीर सरदार,सैनिक,धर्माजी मुंडे सारखे क्रांतिकारक या समाजात होऊन गेले.पण या विषयी कोणीच जास्त काही लिहिले नाही.त्यामुळे आपण कोणी भटके आहोत अशी समजूत महाराष्ट्रातील इतर समाजाची झाली.व त्यांनी कायम या समाजाला दुर्लीक्षित ठेवले.पण गोपीनाथ मुंडे राजकारणात मोठे झाल्यानंतर बराच फरक पडला.पण आता पुन्हा एकदा वंजारी समाजाला टार्गेट केले जात आहे.असो समाजाला मी आवाहन करतो आपण संभाजी ब्रिगेड सारखे तार्गत नाहीत.आज त्यांना हवा तसा इतिहास ते लिहून घेत आहेत.तो कदाचित त्यांना स्वत:ला मान्य असेल पण इतर समाजाचे काय.अगदी आपल्यासारख्या बहुजानाचे जे ते नेहमी नाव घेतात,त्यांना तरी असा इतिहास मान्य असेल का? त्यामुळे सोनवणी अभ्यासपूर्वक लिहित आहेत त्यांना लिहू द्या.उगाच विरोध करू नका..कदाचित जसे इतिहासतज्ञ सतीश साळुंके ला धर्माजी मुंडे सारखा लढवय्या क्रांतिकारक इतिहासात सापडला.सोनवणीजी ला कोणी सापडेल.... ज्यामुळे आपली छाती अभिमानाने फुलून येईल.

  ReplyDelete
  Replies
  1. Sabhaji Brigadene kay have tase lihun ghetle tyache example dya.

   Delete
 9. वंजारी समाजाला सांस्कृतिक न्याय मिळणार आहे का ?
  वंजारी समाज हा महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश उत्तरप्रदेश छातीस्गड राज...स्तान हरियाना पंजाब जम्मू काश्मीर या राज्जात कमी जास्त लोक्संखेने आणि प्रमुख ४ पोट जातीत विभागल्या मुळे एकता नसलेला पण भारतातील एक प्रमुख क्षत्रिय भटका समाज
  भारतात विविध राजांत सर्व समाजांना मिळून मिश्लून राहणारा कुणबी शेतकरी पशुपालक समाज उपेक्षित राहिल्याने प्रगती थाबलेला समाज जाती व्यवस्थेचे चटके इतर क्षत्रिय समाजापेक्षा सर्वात जास्त सोसलेला समाज .या कारणाने आरक्षण मिळण्याने आज उभारत असेलेला समाज पण इतर क्षत्रिय समाजाकडून क्षत्रिय असूनही मान न मिळालेला समाज
  वंजारी समाजाचा त्यागाचा शौर्य पराक्रमाचा इतिहास आहे वंजारी समाज हा क्षत्रिय वंश असेलेला पण देशोदेशी भटकंती करणारा बलशाली व कडवट लढाऊ गट आहे .महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा औरंगजेब भेटी वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वताच्या सोबत निवडक १००० लोकांमध्ये ७०० वंजारी लोक निवडण्याचे कारणही हेच कि वंजारी समाज हा क्षत्रिय बलशाली व कडवट लढाऊ बाण्याचा आहे .तसेच राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेबांच्या माहेरगावी शिंदखेड राजा परिसरातील हजारो वंजारी तरुण मावळे शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी होते . तसेच राजस्तानात महाराणा प्रताप जेव्हा दिलीच्या पातशहा सोबत एकाकी लढत होते तेव्हाही हाच वंजारी समाज तेथे आपले शौर्य पराक्रमाचा इतिहास उभारत होता कारण महाराणा प्रताप यांचे प्रमुख सरदार मल्ला व फत्ता वंजारी हे निष्ठेने लढत होते त्यांच्या समाध्या उदयपुर किल्ल्यात आजही उभ्या आहेत .वंजारी हा क्षत्रिय वंश असेलेला महाराणी दुर्गावती १० लाख बैल वापरून संपूर्ण भारतात विविध राजांना युद्धात दारुगोळा शात्स्त्रात व मीठ मसाला आनाधान्न्य पुरवठा करत आसे . क्षत्रिय वंश असेलेला पण देशोदेशी भटकंती करणारा वंजारी समाज हा तत्कालीन समाज धुरिणांनी भटका या बिरुदाने बाजूला टाकला व काळाच्या ओघात आपली मूळ ओळख विसरून एक उपेक्षित समाज म्हणून पुढे चालत गेला .आणि आजही उपेक्षित राहिला आहे
  आज इतिहासाची नवीन मांडणी करत आहेत स्वतावरच्या अन्यायाचा विरोध करत आहेत पूर्वी इतिहास लिहताना वंजार्यांचे क्षत्रियत्व मुदामून उपेक्षिले आता काय हे पाहणे महत्वाचे आहे .आणि हजारो वर्षाचा उपेक्षित पण झटकून पुन्ना तेजस्वी इतिहास निर्माण करण्याचा निर्धार करावा .वंजारी सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेच्या माध्यमातून आम्ही वंजारी समाजाला सामाजिक सांस्कृतिक न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत .मा. संजय सोनवणीजी,आपण वंजारी समाजाविषयी जे लिखाण व संशोधन करत आहात,त्याबद्दल आपले आभार व आपल्या पुढील
  लिखाण व संशोधन कार्यास हार्दिक सुभेच्या
  -राहुल जाधवर अध्यक्ष वंजारी सेवा संघ महाराष्ट्र 9403545450

  ReplyDelete
  Replies
  1. राहुलजी, तुमच्या सामाजिक कार्यालाही अनंत शुभेच्छा. समाज उन्नत होवो...खूप पुढे जावो...इतिहास उज्ज्वल होताच, भवितव्यही तेवढेच उज्ज्वल राहो. बहुजनांच्या इतिहासात तुमच्या समाजाचे फार मोठे योगदान आहे. तो इतिहासही अधिकाधिक पुढे येवो आणि उर्वरीत समाजघटकांनाही त्याची जाण येवो ही अपेक्षा.

   Delete
 10. In every community there is economical imbalance,some people get become high profile and forget there community members status(How they are living in society?)

  Real picture of vanjari caste revealed.

  ReplyDelete
 11. वंजारी समाजात श्रीमंत आणि गरीब किती असा विषय वाचला
  प्रत्येक समाजात गरीब-श्रीमंत असतातच.
  इंग्रजांनी त्यांच्या गरजेसाठी मध्यम वर्ग निर्माण केला.
  गेली १५० वर्ष ,आपण मध्यम वर्गावर जास्त अवलंबून आहोत.
  मध्यमवर्ग निवडणूकात फार मोठ्ठी भूमिका पार पाडतो.
  आता आपण असे बघू या - तथाकथित जातीनिहाय उद्योग करणारे किती आहेत ?
  वर पासून खाल पर्यंत ओळीने मांडू या. आत्ता जातींचा विचार , चालू आहे म्हणून वर खाली हे शब्द वापरले आहेत..
  सोनार काम करणारे सोनार किती आहेत.भिक्षुकी करणारे ब्राह्मण / सैन्यात असणारे मराठा(क्षत्रिय ) / फुलांचा व्यापार करणारे माळी /
  देवाचे गुरव /मेंढपाळ धनगर / भटके वंजारी /चामड्याचे काम करणारे चांभार / न्हावी /महार . . . .
  तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये जरी पहिले तरी चित्र काय दिसते ?सर्व राखीव जागांच्या कोट्यामुळे हे पूर्वीचे आपापले जातीनिहाय
  उद्योग सोडून सफेद कौलरचे (कनिष्ठ ) मध्यमवर्गीय झाले आहेत.त्यांची परिस्थिती त्यांच्याच जातीतील इतरांपेक्षा बरीच आर्थिक
  दृष्ट्या भक्कम असते . भ्रष्टाचाराला अनुरूप असेल तर विचारायलाच नको.पण त्यात सुद्धा शिक्षणाचे महत्व आहेच. रिझर्वेशन लागू झाल्यापासून
  त्याचा योग्य -फायदा -काही मागास वर्गीयानी योग्य प्रकारे उठवला आणि त्याची फळे सर्व समाजाला दिसू लागली आजच्या घडीला २ पिढ्या -
  सरकारी नोकरीचे २५ ते ३० वर्षांची मानली आहे.-असे फायदे भोगलेला
  एक मध्यम वर्ग तयार झाला आहे.आहे.तो पूर्वीचा मागास-पण आत्ता सरकारी खुर्चीची जादू स्वतः भोगलेला असा आहे.
  आत्ता गम्मत अशी झाली आहे की मराठा सोडून सर्वाना हे फायदे मिळत आहेत.
  ब्राह्मण हुषार ,त्यानी या जंजाळातून कधीच बाहेर पडून पुढची झेप घेतली आणि न भूतो न भविष्यती असे यश मिळाले त्यांना.
  ब्राह्मणांना सरकारी डबक्यातून बाहेर काढण्याचे फार मोट्ठे काम या आरक्षणाने करून त्यांच्यावर उपकारच केले आहेत.
  त्यांच्या खानदानी धुंदीतून जागा झालेला मराठा समाज धड त्यांची ९६ कुळी प्रतिमा सोडून ,आरक्षणाच्या रांगेत उभे राहायला
  कमीपणाचे मानत होता -पण पोटाचा प्रश्न आहे -.शेवटी कुणबी म्हणवून घेत आज त्यांच्याही रांगा लागल्या आहेत.वाढत चालल्या आहेत.
  आत्ता उरलेल्या जमीनदार लोकांना रोजगारासाठी माणसे मिळे नाहीशी झाली.शेती महाग वाटायला लागली.पिढ्यान पिढ्या हाक टाकली की
  जे लोक माना खाली घालून दाराशी हजर होत होते त्यांच्याच पुढे आज ,ते आरक्षणाच्या सरकारी खुर्चीत बसल्यावर "होय साहेब-नाही साहेब "
  करत त्यांच्या सहीसाठी वाट बघायची वेळ आली आहे ;आरक्षणाने हा मोठ्ठा बदल घडवलाय.आणि मराठा समाजाला त्यात धोका दिसू लागला आहे.
  इतर समाजाने शहराचा रस्ता धरला आहे. उच्च शेतकरी जमीनदार पण पुण्याला बंगले बांधून रहात होता.पण मूळ ठिकाणीच सुरुंग लागल्यामुळे त्याचे धाबे दणाणले आहे.
  खरा लढा हा असा आहे.पण ब्राह्मणाचे नाव घेऊन ,सारखे मनु, मनु करत इतरांना भडकावण्याचे उद्योग मराठा समाज आणि त्यांना बळी पडलेला बहुजन समाज यांनी बंद करावा
  जग कुठे चालले आहे आणि आपण सारखे छ.शाहू,टिळक,ब्राह्मण ,पेशवे असे करत जुने उगाळत बसलो तर नुकसान कुणाचे आहे ?
  ब्राह्मणांचे तर नक्कीच नाही ह्याचे भान ठेवावे.

  ReplyDelete
 12. तसे पाहिले तर वरील मांडलेले विचार लोकाना आधीच माहीत असतील.आपल्या प्रत्येकाच्या मानेवर बसलेले जातीचे भूत फार गमतीदार आहे.
  जणू जात या कल्पनेच्या आपण प्रेमात पडलो आहोत.पण आज जास्तीत जास्त आंतरजातीय विवाह ब्राह्मण वर्गातच होतात.
  कल्पना लादणारा पण ब्राह्मण - आणि त्या झुगारून देणारा पण ब्राह्मण !
  खरी मेख वर्गीय लढ्यात आहे.
  माझ्याकडे संजय सोनवणी आणि ह.मो.मराठे यांच्या ब्राह्मण वादाबद्दलच्या सर्व पुस्तिका आहेत.
  ग्रंथ वेगळे ,पुस्तक वेगळे आणि या पुस्तिका वेगळ्या.

  डॉ.रा,चिं.ढेरे, नरहर कुरुंदकर, कै.सेतुमाधव पगडी,कै.न.र.फाटक,कै.प्रा.शेजवलकर,कै.इतिहासाचार्य राजवाडे यांची -पुस्तके आणि ग्रंथ-सर्व लिखाण मी वाचले आहे.
  त्यातले बरेचसे माझ्या संग्रही आहे.त्यांच्या प्रगल्भतेचा ,अभ्यासाचा आवाका पाहीला की मन थक्क होते.
  दुसरीकडे डॉ.इरावती कर्वे,दुर्गा भागवत या स्त्रियांची चिंतनाची भरारी आणि संशोधनाची जिद्द पाहिली की मन अचंबित होते.
  डॉ.ढेरे यांचे शिखर शिंगणापूर चा शंभू, विठ्ठल-एक महासमन्वय-तसेच दत्त संप्रदाय बद्दल चे त्यांचे परखड संशोधन मती गुंग करते.
  कै.नरहर कुरुंदकरांची "श्रीमान योगी "ची नुसती प्रस्तावना सुद्धा किती अभ्यासपूर्ण आहे.

  त्या मानाने संजय सोनवणी हे फारच उथळ वाटतात .सकस वाचन केलेल्यांना त्यात अभ्यासूपणापेक्षा काहीतरी वेगळेच जाणवते.
  त्यांच्या लेखनावरच्या इतरांच्या प्रतिक्रियापण विचित्र असतात. काही काही तर असभ्य म्हणता येईल अशा असतात.

  भय्या पाटील ,अनिता पाटील,गायकवाड,खेडकर यांचे लिखाण आणि संभाजी ब्रिगेड चे सर्व लेखन फारच प्रचारकी वाटते.
  पूर्वी ग्रीक आणि रोमन संस्कृतीत एकत्र येऊन चर्चा होत असे.अगदी विरुद्ध विचारांचे विद्वान हिरीरीने आपापली मते मांडत असत.
  आपल्याकडे भारत इतिहास संशोधन संस्था,भांडारकर संशोधन संस्था,वसंत व्याख्यानमाला (पूर्वीची),अशी अनेक ठिकाणे आहेत.
  पण त्यांची नावे बदनाम करण्याचाच हल्ली एक धडक कार्यक्रम झालेला दिसतो.
  युरोपप्रमाणे आपल्याकडे खरे रेनासंस झालेच नाही त्यामुळे सगळेच बेतलेले ,विचार,भौतिक संशोधन,काहीच मूलगामी नाही.

  ReplyDelete
 13. J Wilson che " Abortiginal tribes of bombay presidency" pustak vacha mhanje vanjari samajala vanjari aslyacha nakkich abhiman vatel

  ReplyDelete
 14. VANJARI SAMJABADAL LIHILE TYABADAL DNYAWAD TUMHA SARVANCHE PAN AJUN HI KAHI TIKANI VANJARI SAMAJ VANCHIT AHE PRAVAHAT NAHI TYACHA SAMAVESH ST MADHE KARAVA,,,

  ReplyDelete
 15. खुप छान माहिति मिळालि सोनवणे सर,ह्या माहितिचा दुसरा पार्ट लिहाल अशि अपेक्षा आणि विनंति करतो....

  तुमचे इतर लेखहि मि नेहमि वाचत असतो

  -नितिन विठ्ठल सानप. 8237471784

  ReplyDelete
 16. प्रिय वंजारी बांधवानो,
  जय सेवालाल!
  मी एक बंजारा समाजाचा व्यक्ती आहे,मी आपनांस सांगू इच्छितो कि माझ्या सर्वेक्षणानुसार बंजारा आणि वंजारी समाजाचा किमान महाराष्ट्रात तरी सांस्कृतिकदृष्ट्या काहीही संबंध नाही, आम्ही लोकांनी आत्तापर्यंत आमची राजस्थानी संस्कृती सोडलेली नाही, आमच्या सर्व प्रथा सुद्धा पूर्वीप्रमाणेच टिकून आहेत, आमचे गोत्र आणि आमचे नाव व आडनाव सुद्धा आमची राजपूत संस्कृती दर्शवतात जसे राठोड, चौहान, राणावत, पवार(परमार), शेखावत. आमची संस्कृती हि अतिप्राचीन सिंधू संस्कृतीमधून उदयास आलेली आहे.आमचे थोर पुरुष,

  गुरू सेवालाल, वसंतराव नाईक, महाराजा सवाई मानसिंह, लाखासिंह बंजारा, आला उदल, जंगी भुकिया,माखनशाह बंजारा, श्री रामदेवरा, रणजितसिंह नाईक, सुधाकरराव नाईक,....यादी खूप मोठी आहे.

  तरी आपणांस नम्र विनंती आहे कि आपण तुमच्या वंजारी समाजाचे नाव आमच्या बंजारा समाजसोबत जोडून चुकीचा इतिहास सांगू नये...आमच्या समाजाचा इतिहास मी या पुढील पोस्ट मध्ये टाकत आहे, कृपया यापुढील पोस्ट देखील वाचावी.....

  ReplyDelete
 17. जय सेवालाल
  सदरील कमेन्ट मध्ये जे दोन सरदारांची नावे आहेत ति लमाण्याच्या जातीची नाहीत.
  त्यांची खरी जात भिल्ल असुन त्याचा लमाण्याच्या जातीशी दुरदुरचा संबंध नाही राहीला प्रश्न वंजारी अन बंजारा समाजाचा
  खरच यांचा कसलाच संबंध नाही हे वरील कमेन्टस् वाचुन लक्षात येते
  उसतोडे म्हणुन वंजारी समाजला हिनवले जाते पण सर्वच समाज(ग्रामीण)यात गुंतले आहेत काही तर थेट मॅारीशस ब्राजील मध्ये नेले गेलेत गुलाम म्हणुन त्यात मराठा सुद्धा आहेत
  हं वंजारी समाजाबद्दल हि एक गोष्ठ मात्र खात्रीने सांगता येइल की ते अत्यंत कुशाग्र बुद्धि चे असतात
  धन्यवाद!

  ReplyDelete
 18. आदरणीय सोनवणी सर आपण वंजारी समाजाबद्दल लिहिले त्यासाठी धन्यवाद!
  वंजारी समाजचा इतिहास तसा धुसरच पण म्हणुन काही वंजारी समाजाने वाटेल तसा इतिहास लिहीला नाही कारण हा समाज रोजच्या जगण्यासाठी धरपडत होता,त्यामुळे इतिहासाच्या भानगडीत तो कधी पडला नाही.पण वंजारी समाजाचे भाट वंजारी समाजाच्या इतिहासाचा थोडा बहुत उलगडा करु शकतात,ते राजस्थानचे रहिवाशी असुन जातीने वंजारीच आहेत.
  वंजारी व बंजारा या दोन्ही जाती भिन्न आहेत,यासाठी महाराष्ट्र सरकार ने वाधवा कमिशन नेमुन ते सिद्ध केल आहे.वंजारी समाजातील काही व्यक्तिंनी इतिहास संशोधन केले आहे,त्याबद्दलचा अधिक तपशील तपासुन दुसरा भाग जरुर प्रसिद्ध करावा ही विनंती.
  वंजारी समाजाबद्दल बोलायचे झाले तर वंजारी हे आर्य आहेत यात शंका नाही,क्षत्रिय आहेत यातही शंका नाही पण हे इतर लोक स्वीकारतील याची खात्री नाही,विशेष म्हणजे वंजारी समाजालाही याच व इतिहासाच देणघेण नाही.
  परंतु वंजारी समाज भविष्यात इतिहास घडवेल याची खात्री मात्र आहे.

  ReplyDelete
 19. EKADAM MAST
  VANJARI SAMJABADAL JE LEHIHLE
  TYSATI THANKS

  ReplyDelete
 20. THANKS FOR INFORMATION ABOUT Vanjari samaj

  ReplyDelete
 21. Yakdam mast je vanjari samajasathi lihile te

  ReplyDelete
 22. Yakdam mast je vanjari samajasathi lihile te

  ReplyDelete
 23. Thanks for information about vanjari samaj

  ReplyDelete