प्राचीन काळापासून मानवी जीवनात/विचारांत/धर्म श्रद्धांत/राजकीय विचारांत परिवर्तन घडवून आनन्यासाठी अने चळवळी झाल्या आहेत. प्रस्थापित शैव सिद्धांताना आव्हान देण्यासाठी भारतात मूर्ती/प्रतिमा पूजा विरहित वैदिक धर्माचा उदय झाला. चार्वाकाने तर ईश्वराचे/वेदांचे अस्तित्व नाकारणारा अत्यंत भौतीकतावादी मुलभूत सिद्धांत मांडला. याच काळात इहवाद हाच मुळात विघातक असून, सर्व दुक्खांचे कारण असून त्याचा त्याग करून जन्म-मृत्युच्या चक्रातून बाहेर पडणे हेच ध्येय मानणारा श्रमण संप्रदाय पुढे आला. सत्य/अहिंसा/अस्तेय/ब्रह्मचर्य/ अपरिग्रह हे सिद्धांत श्रमण संस्कृतीने दिले. पुढे याचीच परिणती म्हणजे मस्खरी गोशाल, बौद्ध, महावीर हे क्रांतीकारी विचारवंत पुढे आले. मस्खारी गोशाल मागे पडला असला तरी गौतमाने व महावीराने श्रमण संस्कृतीतून दोन मोठ्या धर्मांची निर्मिती केली. कालौघात वैदिक तत्वज्ञान व वर्ण्व्यवस्था राहिली पण वैदिक कर्मकांडे आणि वैदिक दैवते मागे पडली. शैव पूजा कायम राहिली, पण पौरोहित्य वैदिकांच्या हाती गेले. बुद्ध धर्म मुळचे स्वरूप हरपून बसला आणि नंतर खुद्द बुद्धाच्याच मूर्ती बनू लागल्या. जैन धर्म तीन घटकांत वाटला गेला आणि मूळ तत्वद्न्यानाशी फारकत घेवून (काही तत्वे वगळता) आपले अस्तित्व टिकवता झाला. ही अत्यंत थोडकी उदाहरणे मी देत आहे.
राजकीय संदर्भात पाहिले तर नगर राज्यांची सिंधू कल्पना नंतर मागे पडली आणि गणराज्य संकल्पना पुढे आली. या संकल्पनेला आव्हान देणारा बिम्बिसाराचा पुत्र अजातशत्रू याने साम्राज्य ही संकल्पना पुढे आणली. पन अन्यायी राज्यव्यवस्थान्च्या विरोधात अनेक चळवळी झाल्या आहेत. मृच्च्हकतिक नाटकात त्याचे प्रतिबिंब दिसते. शिवाजी महाराजांचे उदाहरण माहीतच आहे. पण राज्य/साम्राज्ज्य ही संकल्पना भविष्यात इंग्रजांचे राज्य येईपर्यंत कायम राहिली. या व्यवस्थे विरुद्धही हिंसक/अहिंसक स्वरूपाच्या चळवळी झाल्या. स्वातंत्र्य मिळवून त्या काही प्रमाणात यशस्वी झाल्या.
धार्मिक असमतेच्या विरुद्ध मध्ययुगात अनेक चळवळी झाल्या. संतांच्या समतेच्या चळवळी आपल्यास माहीतच आहेत. त्या तर पुरेपूर अयशस्वी झाल्याचा इतिहास आहे.
आधुनिक काळातही ब्राह्मण- ब्राह्मणेतर वादांच्या, अन्य वादान्सोबत अनेक चळवळी सुरूच आहेत. उदा. पर्यावरण वादी चळवळी. राजकीय चळवळी, इस्लामिक मुलतत्ववादी ते इस्लामिक पुरोगामी चळवळी. . इ.इ.इ.
हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे या चळवळी सर्वस्वी यशस्वी होतात का? चळवळींचे ध्येय साध्य होते काय? शाश्वत विकासाचे लक्ष्य साध्य होते काय? हे पडलेले प्रश्न. पुरातन काळापासून ज्याही काही चळवळी झाल्या, मग त्या धार्मिक असोत कि सामाजिक वा राजकीय, त्यांच्या मृत्यूची बीजे त्या-त्या चळवळींतील मुलभूत तत्वाद्न्यानातील दोष वा अनुयायांचे व्यक्तिगत स्वार्थ वा नेत्याचे तत्वज्ञान समजण्यातील अपयश यात पेरली गेली असल्याचे आपल्या लक्षात येईल. कोणत्या चळवळीचा हेतू काय यावर तिचे यशापयश अवलंबून असते असे म्हणता येणार नाही. बौद्ध चळवळ उदात्त असूनही ती अपयशी ठरली. करुणा/मानवता/समता ती चळवळ तेंव्हाही आणि आताही देवू शकत नाही. शिवाजी महाराजांचे अनुयायी फक्त काही काळ त्यांची धोरणे जपू शकले. आताची बहुजनीय चळवळ सम्यक/एकात्म तत्वद्न्यानाच्या अभावी गटांगळ्या खावू लागली आहे. आर. एस. एस. ची हिंदुत्ववादी चळवळ कोठे चालली आहे हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे. थोडक्यात मानवी समाजाला पुढे नेण्या ऐवजी चळवळीच काही काळ यशस्वी होवूनही नेमक्या कोठे फसतात आणि मृत्यू डोहात डूबतात यावर संशोधन गरजेचे आहे.
मेलेल्या वा मृत्युपंथाला लागलेल्या वा नवेच सूत्र पकडत मूळ चळवळीपासून फारकत घेणार्या नव-चळवळी पुन्हा मृत्युपंथाला लागतात हा ज्ञात इतिहास आहे. शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकर ही नावे घेत महाराष्ट्रातच किती परस्परविरोधी चळवळी आहेत हे आपल्याला माहीतच आहे. सनातन धर्माचे (वैदिक) नाव घेत, पुरातन संस्कृतीचे उत्थान करणे हेच ध्येय असे माननार्या चळवळीन्चीही कमतरता नव्हती आणि नाही.
पण या सार्यांत (कोणती योग्य आणि कोणती अयोग्य हे येथे मत न नोंदवता) मानवी आत्मा या चलवलीनी गमावला आहे असे म्हणावे वाटते. त्यामुळे आधुनिक समाजाचे (मग ते कोणत्याही जाती-धर्माचे असोत) कितपत हित होणार आहे हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्यावर निरपेक्ष चिंतन करण्याची गरज वाटते.
चळवळी या मानवी समुदायाला वर्तमानाच्या सापेक्ष स्थिती पेक्षा अजून पुढे नेण्यासाठी असतात. वर्तमानातील अन्न्यायी
संदर्भ खोडून सम्यक ज्ञानमय समाज निर्मितीसाठी असतात. आज आपण पुरातन व्यवस्थांबाहेर आलो आहोत, पण मनोवृत्ती हिंसकच राहिल्या आहेत. त्या चळवळी यशस्वी कशा होवू देणार? आजवर सत्यार्थाने एकाही चळवळ यशस्वी झालेली नाही, नाहीतर आज महात्मा गांधीना शिव्या देणारे, त्याना नाकारणारे कसे असले असते? ते गांधींचे वा त्यांच्या तत्वद्न्यानाचे वा त्यांच्या अनुयायांचे अपयश आहे आणि हीच बाब प्रत्येक चळवळीच्या अध्वर्युन्ना लावता येईल.
आजच्या चळवळी ज्याही काही आहेत, मग त्या राजकीय असोत, सामाजिक असोत, कि धार्मिक...त्यांचीही मृत्यू घंटा वाजताना मला ऐकू येत आहे.
या चळवळींच्या नेत्या-अनुयायांना ऐकू येतेय काय?
Saturday, February 5, 2011
Subscribe to:
Comments (Atom)
Linguistic Theories
The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...