Sunday, August 5, 2012

निवेदन व निषेध


मा. संपादक,
दै. पुढारी,
सांगली आवृत्ती,
सांगली.

निवेदन व निषेध

आज दि. ६ आगस्टच्या दै. पुढारी (सांगली आवृती) पष्ठ क्र. ३ वर "अहिल्यामाईंच्या बदनामीचा जातीयवाद्यांचाच कट" या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले असून फ़ेसबुकवर मानव भोसले असे बनावट नांव वापरुन संजय सोनवणीनेच धनगर समाजाची बदनामी केली आहे असा संभाजी ब्रिगेडने (सांगली) केलेला संतापजनक, अत्यंत खालच्या पातळीचा आरोप प्रसिद्ध केला आहे. असे आरोप प्रसिद्ध करत असतांना किमान पुराव्यांची आवश्यकता असते हे पुढारीसारख्या जबाबदार वृत्तपत्राने विसरावे व बदनामीकारक मजकुर सरळ प्रसिद्ध करुन मोकळे व्हावे हे या वृत्तपत्राला शोभादायक नाही. याबद्दल मी आपला व संभाजी ब्रिगेड (सांगली) पदाधिका-यांचा निषेध करत आहे.

मी फ़ेसबुकवर कोणत्याही नांवाने वावरत नाही. माझा स्वत:चा माझ्याच नांवाने पुर्वी अकाउंट होता तो बंद करुन आता दीड वर्ष झालेली आहेत. त्यानंतर मी कधीही कोणत्याही नांवाने फ़ेसबुकवर गेलेलो नाही. बोगस अकाउंट शोधण्याचे तंत्र सायबर विभागाला माहित आहे. मानव भोसले या फेसबुकवरील अकाउंटविरुद्ध महाराष्ट्रात ठिकठिकाणी (उदा. बारामती, पुणे) तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मी माझ्या ब्लोगवरही २८ जुलै रोजीच मानव भोसलेचा " महाराणी अहल्याबाई व धनगरांची बदनामी..." या शिर्षकाखाली तीव्र निषेध नोंदवला आहे. ( संदर्भासाठी पहा     http://sanjaysonawani.blogspot.in/2012/07/blog-post_28.html ) वाघ्या प्रकरणी मी वाघ्याची बाजु सातत्याने घेतल्याने व वाघ्याचा संभाजी ब्रिगेड्ने हटवलेला पुतळा दुस-याच दिवशी शासनाने जाग्यावर बसवल्याने निराश झालेल्या संभाजी ब्रिगेडने केवळ द्वेषापोटी मानव भोसले म्हनजे मीच असे धादांत असत्य ठोकुन द्यावे आणि आपल्यासारख्या जबाबदार वृत्तपत्राने कसलीही शहानिशा न करता ते प्रसिद्ध करावे याची करावी तेवढी निंदा कमीच आहे.

सायबर सेलने IT Amendment Act 2008 नुसार या मानव भोसले या कथित अकाउंटचा शोध घ्यावा, म्हणजे यामागे नेमके कोण आहे हे सामोरे येईल. असे न करता द्वेषमुलक बुद्धीने माझे नांव घेत बदनामी करावी हे इंडियन पिनल कोड ४९९ नुसार फौजदारी कायद्यानुसार बदनामीकारक आरोप करणारे व तो प्रसिद्ध करणारे यांच्याविरुद्ध दंडनीय अपराध कृत्य आहे हे आपणास विदित असेलच. शिवाय मानहानीसाठी नुकसानभरपाईचा सिव्हिल खटलाही दाखल करता येवू शकतो हेही आपणास माहित असेलच आणि हा दंडनीय गुन्हा संबब्रिगेडचे सांगली येथील आपण वृत्तात नमुद केलेले सर्व पदाधिकारी व आपणाकडुन घडला आहे.

वरील निवेदन दोन दिवसांत ठळकपणे प्रसिद्ध करावे अन्यथा मला वरील दंडसंहितेतील कलमाअंतर्गत सर्व संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करावे लागतील याची कृपया नोंद घ्यावी.

धन्यवाद,
आपला,
संजय सोनवणी


(दै. पुढारीतील वृत्त वाचण्यासाठी http://epaper.pudhari.com/epapermain.aspx#   Page 3)





Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...