अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन मुळात आजचे नाही. भ्रष्टाचार निर्मुलन समित्यांची संख्या एके काळी नुसती अवाढव्य नव्हती तर तीच एके प्रकारे blackmailing ची हत्यरे वापरत पैसे उकलण्याचा धंदा करत होती. आता लोकपाल विधेयकाबाबत जोही काही आंदोलनाचा प्रकार देशात घदला आहे...अवघ्या ४ दिवसांत हे आंदोलन संपले आहे आणि गेल्या चार दिवसांत मी जो काही उन्माद पाहिला आहे यावरुन भारतीय जनता खरोखर भ्रष्टाचाराचा द्वेष करते असे चित्र प्रोजेक्ट झाले आहे...ते मुळात वास्तव आहे काय? या विषयामुळे भारतात खरोखर जस्मीन क्रांती अवतरणार आहे काय़? हे प्रश्न निर्माण होतात.
खरे तर या प्रश्नांचे उत्तर आहे कि मुळातच भारतीय जनमानस सन्माननीय अपवाद वगळता भ्रष्ट आहे. हे बदललेले लोकपाल विधेयक संम्मत होणे म्हणजे नव्या भ्रष्टाचा-यांना जन्म देणे असा आहे. मुळात भ्रष्ताचार हा उभयपक्षी असतो. देणारा आणि घेणारा अशा वाटण्या पडतात. भ्रष्टाचार जन्माला येतो कारण विधीवत कामे वेळेवर होत नाहीत वा अन्याय्य मार्गाने एखादी संपत्ती हडप करायची असते म्हणुन. या विधेयकात भ्रष्टाचाराच्या देणा-या बाजुचा काय परामर्श घेतला आहे हे अद्याप समजायचे आहे. न्यायाधीश, सेनानी, पुरस्कारप्राप्त सन्मान्य गणले गेलेले किती धुतल्या तांदळासारखे आहेत हे कळण्याचे सामान्यांना एकही साधन उपलब्ध नाही. किंबहुना हे आपल्याला माहित असण्याची गरज आहे हे क्वचितच कळते. माहिती अधिकाराचा उपयोग कशासाठी बव्हंशी केला जात आहे हे आता समजले नसेल तर तो सर्वांचा वेडेपणा आहे.
सध्या लोकपाल विधेयकावर दोन मतप्रवाह आहेत...१. यामागे आर.आर.एस. चा हात आहे. २. शरद पवार यांना टार्गेट करण्याची ही कोन्ग्रेसी रणनीति आहे. ३. हा खरोखरच भ्रष्टाचार निर्मुलनाचा कार्यक्रम आहे.
यावर माझे मत हे कि सरकार एकतर दुध्खुळे आहे किंवा त्यालाही यातुन काहीतरी साध्य करायचे आहे...राजकीय फायदे...हे ते एक कारण असु शकते. सरकार हे बिल खरोखर पास करेल काय? थोडी वाट पाहुयात. आर.एस.एस. यामागे आहे (कारण रामदेव ते अनेक साधु यात पडल्याने व शिवसेना...या पक्षानेही समर्थन दिल्याने...(शिवसेना जर या विधेयकाच्या एकाही कलमात अडकली तर भाळासाहेब ते उद्धवजींचे काय होईल?) असा समज होणे स्वाभाविक आहे. पण तो प्रामाणिक आहे काय? अण्णांवर "वापरले जाण्याचे" आरोप अनेकदा झाले आहेत. या वेळी ते कोण आहेत हे लवकरच कळेल अशी आशा आहे. तरुणांनी अण्णांच्या या उपोषणाला फारच उत्स्फुर्त (?) पाठिंबा दिला...पण यातील किती "देणा-यांच्या" बाजुने होते याचा विचार ज्याचा त्याने करावा. क्यपिटेशन फी ते ज्युनियर के.जी. त प्रवेश मिळवण्यासाठी लाखो रुपये मोजणा-यांनी आपल्या बापाला "हे पैसे कोठुन आनले" ते न विचारता, चंगळवादी भुमिका घेत मस्ती करत "आम्हीही भ्रष्टाचार विरोधी." अशी शेखी मिरवत मेनबत्त्या पेटवत अण्णांना पाठबळ देतात...हे अयोग्य आहे असे मला म्हनायचे नाही...किमान भ्रष्टाचार हा चुकीचा आहे एवढे क्रुतीशील नसले तरी मनोमन मान्य आहे असे त्यांना वाटले याचे अप्रुप आहेच. पण हे पुरेसे आहे काय?
मुळात अण्णांची भुमिका प्रामाणिक आहे काय? असती तर त्यांना हे सारे इषारे खुप आधी देता आले असते. मी म्हणेल तेच लोक समितीत असावेत याचा अर्थ ही नव-हुकुमशाही नव्हे तर काय आहे? भ्रष्टाचार दुर करता येईल अशा सरळ-साध्या बाबींना हात न घालता सरळ कायदाच व्हावा...आणि भारतात कोणता कायदा आजवर सरळ अन्याय न करता पाळला गेला आहे बरे? आणि लोकपाल विधेयक सम्मत झाले तर त्यांचे प्रतिनिधी केवळ निव्रुत्त न्यायाधिश, पुरस्कार विजेते आहेत म्हणुन प्रामाणिकच असतील याबाबत एवढी खात्री का बरे? हे प्रतिसरकार कोणत्या नियमांनी चालेल? कि त्यावरही नियंत्रण ठेवायला नवी यंत्रणा बनवावी लागेल?
भ्रष्टाचार ही एक मानसिकता आहे. कायद्यांनी ती कधीही बदलु शकत नाही. उच्च नीतिमुल्ये जेंव्हा बाळपणापासुन शिकवली जातात आणि साराच समाज जेंव्हा त्या नैतिकतेचा पुरेपुर अनुसरण करत असतो तेंव्हाच समाज नैतिक होतो. कायदे हे नेहमीच अनैतिकांच्या फायद्याची केंद्रे असतात. अण्णा जिंकले नाहीत तर हरले आहेत असे मला स्पष्टपणे नमुद करायचे आहे. अण्ण नव्हे तर त्यांना पाठिंबा देनारेही हरले आहेत. खरा मुलभुत प्रश्न चीप प्रसिद्धीच्या मार्गासाठी छपवुन भलतेच चित्र उभे करण्यात आले आहे. पण कदाचित आज त्यांना त्यांची चुक कळणार नाही...
उद्या खूप उशीर झाला असेल.
आधी काही झोटींग होते...
नंतर रक्तप्राशनकर्ते एवढे असतील कि ईसाप पुन्हा आठवावा लागेल...
Subscribe to:
Post Comments (Atom)
सिंधू संस्कृतीची मालकी!
सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...
लोकपाल बिलाच्या संदर्भाने अवघा देश घुसडून निघाल्या सारखे वाटले .अण्णा हजारे यांनी उपोषणातून त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या ...ते जिंकले ...सरकार हरले ....असे चित्र प्रसार माध्यमांनी उभे केले .सर्वसामान्य जनता प्रसार माध्यमांच्या बातम्या पाहून आणि त्यांचे analysis ऐकून हरखून गेली कि चला आता भ्रष्टाचार संपून जाईल ...परंतु अण्णानि ज्या गोष्टी साठी एव्हढा कातोडा केला ती गोष्ट नेमकी काय होती हि बाब १२१ कोटी जनते पैकी कोणाला समजली हा मात्र संशोधनाचा विषय होईल.लोकपाल विधेयकात नक्की काय होते ? किंवा लोकपाल विधेयक काय आहे ? ...हे जे तरुण १८ वर्ष वयाचे आहेत आणि निवडणुकीत मतदान करणार आहेत त्या तरुणांपैकी किती जनांना कळली हे एकतर अण्णाच जाणो वा अण्णांचा देवच जाने .
ReplyDeleteअण्णांनी एक प्रकारे केलेली हि हुकुमशाहीच आहे असे मला वाटते .
कारण कायदा व विधेयक संसद तयार करते त्याची मंजुरी घेते .नंतर ते लागू करते .म्हणजे संपूर्ण भारत देशात जे मतदार आहेत त्यांनी ज्या लोकांना निवडून दिलेले आहे त्या पैकी एकही खासदार असा नाही का कि ज्याला हे बिल हवे होते अन्नांनी हे आंदोलन केले व त्यांना ते आंदोलन करावे लागले याचे २ अर्थ निघतात
१) ५४३ पैकी सर्व जन भ्रष्टाचारी आहेत .
२)अण्णा कोठेतरी काहीतरी चुकत आहेत
आता प्रश्न हा उभा राहतो कि ...लोकांनी ज्यांना निवडून दिलेले आहे त्या लोकांनी त्यांना ज्या प्रक्रियेतून प्रतिनिधित्व दिले ती प्रक्रिया चुकीची असेल .....किव्वा जनता व मतदारच चुकीचा असेल कारण ज्या जनतेने निवडणूक प्रक्रियेतून प्रतिनिधी पाठवले प्रसार माध्यमांनी त्याच जनतेला अण्णांना पाठींबा देतांना दाखविले मग खरे कोण ?
मतदार प्रक्रिया कि प्रसार माध्यमे ?
कि हा फार मोठा स्टंट आहे ?
कि आणखी काही ...कि सत्ता बाह्य सत्ता केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न ?
कि world cup च्या माध्यमातून शहरी तरुण मध्ये अचानक जागृत झालेली देशभक्ती ची लाट कॅश करण्याचा प्रयत्न ......( हे सर्व जस्मिन क्रांती tun prerna getlya sarkhe vatte )
avadala lekh....
ReplyDeleteछान सोनवणेजी, योग्य ती जाणीव करून दिलीत आपण.......
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteavadala lekh. bamani vyavastha todlyashivay paryay nahi
ReplyDeleteआण्णा हजारे, किरण बेदी, अरविंद केजरीवाल यांच्या प्रयत्नांबद्दल चुकीचा प्रचार करण्याचा इथे Bogवर अत्यंत खेदजनक, राजकीय हेतुपुरस्कृत प्रयत्न होत आहे... आपण काही करायचे नाही पण दुसरा करतोय तर त्याचा पाय खेचायचा अशी मानसिकता दिसते.
ReplyDeleteउगीचच काही गोष्टींना 'ठरवून' विरोध करायचा आणि त्या गोष्टी कशा चुकीच्या आहेत याच्याबद्दल अर्थहीन स्पष्टीकरण द्यायचे ही मानसिकता बदलली पाहिजे..
आणि रामदेव बाबांवर एवढा आकस का..? ज्या भ्रष्ट नेत्याची अप्रत्यक्ष वकिली तुम्ही इथे करत आहात त्यापेक्षा ते बरेच म्हटले पाहिजेत निदान त्यांची पाटी कोरी असली तरी बरबटलेली नाही..
आण्णाना हुकुमशहा असे संबोधून, आपण त्यांच्या प्रामाणिकपनावर संशय घेता पण ज्या महाभ्रष्ट पुढाऱ्याचा तुम्ही उदो-उदो करताय, त्याच्या बद्दल आधी जाणून घेण्याचे थोडेसे कष्ट करा किंवा डोळ्यावरचे झापड दूर करा आपोआप चित्र स्पष्ट होईल,
तुमच्या याच नेत्याने अन्ना हजारेंची सुपारी दिल्याचं मागल्या वर्षी जगजाहीर झालेच होते...
सारा देश आणि मिडियाला त्यांच्या भ्रष्टाचाराची कल्पना आहे पण कोणी बोलण्याचे धाडस करीत नाही आणि अण्णांनी तो केला त्यामुळे झालेली जळफळाट, विरोध करणाऱ्यांच्या मानसिकतेतून दिसते...
'लोकां सांगे ब्रम्हज्ञान, आपण कोरडे पाषाण' असा प्रकार नसावा..
मुळात या आंदोलनाला विरोध करण्याआधी ते समजून घ्या.. आणि
जर खरंच सध्याच्या लोकपाल मसुद्यात त्रुटी जाणवत असतील तर पुढे येऊन त्या दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा पर्यायी उपाय सुचवा..
'उंटावरून शेळ्या हाकण्यात काहीही अर्थ नाही...'
-- आपला एक हितचिंतक.
@captian, first of all I have not praised Sharad pawar anywhere...I have just stated one of the possible reason that is being discussed as Annaa took his first wicket. Sharad Pawar is the fraudest of fraudest person...I have no doubt about it. But Ramdev's slate too is not as clean as you claim. Annaa is being used by someone...I am sure some or other day it will be exposed. To say goodbye to corruption is not making the laws but crate public awareness...
ReplyDeleteधर्मात धारयते: प्रजा: वा जेथे शासन नसेल...तर शासित कोठुन?, दंड्नीय अपराधच नसतील तर दंड कोठुन? या उदात्त औपनिषदिक विचारांपासुन भारतीय समाज दूर गेला आणि तेथेच अधोगती सुरु झाली आणि आजही ती चालुच आहे. समाजाच्या मनोव्रुत्ती बदलण्यासाठी आम्ही काय करत आहोत...काय करणार आहोत हा खरा प्रश्न आहे.
ReplyDeleteकायद्यांनी, कठोर शिक्षांनी समाज बदलला असता तर आज मुळात कोणत्याही प्रकारचे गुन्हेगार कसे राहिले असते? पुरातन काळापसुन कायदे/शिक्षा/परलोकातील नरकवासाच्या भित्या दाखवूनही माणुस बदललेला दिसत नाही. यासाठी समाजच जबाबदार नाही का? या समाजाला त्याच्या गुन्ह्यासाठी कोणत्या तुरुंगात डांबायचे?
खरे तर समाजानेच समाजाला धारण करुन त्याचे नैतिक उत्थान करायला हवे. समाजानेच समाजाला आधर देत समाजाला सम्यक पातळीवर आणीत दु:क्ख आणि वेदनांचे निराकारण करायला हवे. ज्या समाजाला शासनाची/कायद्यांची गरज भासते तो समाज मानसिक द्रुष्ट्या अधु आणि जगण्यायोग्य नसतो. असा समाज कधीही नैतीक/आध्यात्मिक वा ऐहिक प्रगती करु शकत नाही हे पक्के समजुन चालावे.
सरकारचा मानवी जीवनातील हस्तक्षेप कमीत कमी होत जावा हीच कोणत्याही सुसंस्क्रुत सभ्य समाजाची अपेक्षा असते. पण तो वाढवत न्यावा यासाठी सारा समाज आंदोलने करतो तेंव्हाच असा समाज आपल्या सामाजिक वैचारिकतेची दिवाळखोरी सिद्ध करत असतो. आपला समाज त्याला अपवाद नाही याचा खेद वाटतो.
ReplyDeletewhat do u mean by "But Ramdev's slate too is not as clean as you claim."kindly explain.
ReplyDelete@Bharat Swabhiman...do you know raelly what yoga is? Like instant food ramdev is teaching an instant yoga and laziest of the populace is following it blindly...isn't it cultural corruption? Culturally corupt people too need the same punishment financially fraudulent people get...
ReplyDeletePan Majyamate, itkya 250 city madhun je kahi pratekani anna hajare yana support dila, tya pratek janani jar swatachya manashi tharvle ki mi corruption karnar nahi....ani kunala karu denar nahi.....tari problem solve hoil.....fakta spport karun chalnar nahi tar...swatha avalamban karayla have...
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete@sanjay Sonawani...
ReplyDelete1)'Anna is being used by someone' असा अंदाज व्यक्त करत आपण या आंदोलनाला विरोध करत आहात. क्षणभर समजा असं काही असेलही, तरी फरक काय पडतो..? या आंदोलनामुळे जो हेतू साध्य होणार आहे तो काय गैर आहे..?
या संबधात आजच्या DNA मध्ये दीपक लोखंडे यांनी लिहलेला लेख सूचक आहे.. ते म्हणतात,
"Is anna hazare right person to lead the fight against corruption...? Mostly yes, probably not.
but then the cause that he is fighting for is far greater than anything else.
So lets celebrate this victory which is far sweeter than your morning cuppa.
its the cause that has won. Not a person."
पहा.. जि शंका तुम्ही व्यक्त करता ती थोडक्यात त्यानीही व्यक्त केलीच आहे, पण त्यापलीकडे जाऊन डोळसपणे विचार करुण त्यांनी आण्णाच्या मूळ गर्भित हेतूला पाठिंबा दिला आहे.
सोईस्कर अर्थ लावण्यासोबतच असा डोळसपणा आपणही दाखवावा...
या लेखाची लिंक पहा:-
http://epaper.dnaindia.com/epapermain.aspx?queryed=42&username=&useremailid=&parenteditioncode=40&eddate=4%2f10%2f2011
2)आपला दुसरा प्रतिपक्ष "To say goodbye to corruption is not making the laws but crate public awareness..."
फक्त लोक जागृतीनेच कायद्याशिवाय काही शक्य होते का हो..?
असे असते तर मग अल्पसंख्यांच्या हितासाठी Reservation, Atrocity असे कायदे का निर्माण केले गेले..? किंवा स्त्री-भृण हत्या रोखण्यासाठी कायदे का निर्माण केले गेले..?
लोक्जागृतीला कायद्याची जोड असणे अनिवार्य आहे.
त्यामुळे 'is not making the laws' हा आपला युक्तिवाद दुटप्पी आहे... केवळ लोकपाल संदर्भातील आंदोलनाला विरोध करण्यासाठी केला गेलेला आहे..
'लोकपाल'बाबत तुम्ही सोईस्कर तेवढेच मुद्दे मांडत आहात..
@captian: 1. First of all I have not shown any kind of protest to Anna hajare's movement. What movement is going to acheive is to be seen. My point is neglected...In my opinion every law creats new open feilds for corruption. For example take Domestic Violence Act for instance...the cause behind it was and is novel...but 80% bogus cases are being filed under this act...
ReplyDeleteTake RTI for instance...this is being used mostly for blackmailing. Anti-corruption beuro is corrupt. Most of the judicial body too is corrupt. In my opinion laws are not helping much...making new laws will open new avenues for corruption...hence first of all we need a wide movement amongst the society against the sentiment of being either part (giver or taker) of the corruption.
It is very sad to see you saying RTI is used mostly for blackmailing. Can you give an example how this can be done? If someone is getting blackmailed by RTI, then he must have done some corruption.
ReplyDeleteThe RTI has given a special right to people. Earlier people had no way to know other than what Babu says. Now, as RTI is there you can get your work fast.
I have experience, in the PR card of my home, the Nazul department made the area smaller. I appealed them many times, fought for months and lost much money but no help. When I filed a RTI application, I got the area corrected in a week.
So are you against the laws of RTI?
Also, the laws of Domestic Violence and Atrocity and misused a number of times. Would you support to scrap those laws too?
Here again you are missing the point. Wrong is not with the laws...that is we the people. All present laws are actually strong enough to punish the guiklty. But the enforcing machinery is corrupt. My point is we need wide awareness, to promote the culture in entire society that is anti-corruption. This new bill too is going to open new avenues of corruption...Lwas are misused, will continue to be misused if we nourish the same mentality.
ReplyDeletesir ... so now are you gonna teach us how to do yoga ??
ReplyDelete1 simple question if millions of people are getting benefit of it then what is the problem with you
Dear Sandeep, first of let me congratulate you for excellent photographs you have published on your blog. Friend Yoga shastra is not as easy to get in to it instantly and except temporary psychological satisfaction it doesnt yeild anything that can actually acheive true aim of Yoga i.e. salvation. Yogaguru Ayyangaar is true one but he has rare followers because real yoga is not that simple. Yoga is very difficult path to follow. Here I cannot give lecture on this, but Ramdev's instant yoga gets followers in millions only because it gives temporal satisfaction. Not wrong with it...but it is not real yoga....
ReplyDeleteभावनीक लाटेवर स्वार होणे सामान्यांना नेहमीच आवडते. पण त्यातुन आपणच आपल्यावर नवी संकटे ओढवून घेत आहोत याची मात्र जाण नसते. "क्रांतीकारी" होणे कोणाला आवडत नाही? पण हे क्रांतिकार्य एका नाशाकडुन दुस-या नाशाकडे नेवू शकते याचे भान समाजालाच रहात नाही. भुतकाळातील असंख्य अन्याय्य गोष्टी मानसाने भावनिकतेच्या आणि संभाव्य सुरक्षिततेच्या भावनेतुन ओढवून घेतल्या. अगदी जातीव्यवस्थाही..धर्मशाह्याही...आणि हुकुमशाह्याही. स्वत: बदलायचे नाही...पण अलौकिक क्रांतिकारकाचा थाटही मिरवायचा या अप्रबुद्ध भावनेतुन अशा एका गुलामीतुन दुस-या गुलामीकडे नेणा-या तथाकथित क्रांत्या होतच असतात. जे बदलायला हवे ते बदलायचे नाही, ज्या गोष्टी नागरिकांच्याच हातात आहेत त्या वापरायच्याच नाहित, भ्रष्ट व्यवस्थेचे सर्व फायदे उचलायचे आणि भ्रष्टाचाराचा विरोध करायला आणिक कोणी तत्व-भ्रष्ट आला कि त्याला देवत्व देवून आपल्या आर्थिक, मानसिक, तात्विक भ्रष्टाचाराला एक सुरेख पांघरून घेत त्याला शेंदुर फासुन मोकळे व्हायचे हा पुरातन मानवी उद्योग आहे. एक टोळी जावून दुसरी टोळी येते. ही सारी आत्मवंचना आहे हे कधी लक्षात येणार?
ReplyDeleteपण "मी बदलतो..." असे कोण म्हननार?
सत्ताकेंद्रे निर्माण करनारेही आपणच...भ्रष्ट जीवन जगनारेही आपनच...सत्ताकेंद्रे भ्रष्ट आहेत म्हणुन प्रतिसत्ताकेन्द्रे निर्माण करणारेही आपनच...
आता भविष्यात या प्रतिसत्ताकेंद्रांविरुद्ध एक नवी क्रांती घडवून प्रति-प्रति-सत्ता केंद्र निर्माण करण्यासाठी आजच सज्ज राहुयात.
Sir, asech kahi manat hote.... Shabd tumche amchya bhavana mandatat....
ReplyDeleteThank You
"सरकारचा मानवी जीवनातील हस्तक्षेप कमीत कमी होत जावा हीच कोणत्याही सुसंस्क्रुत सभ्य समाजाची अपेक्षा असते. पण तो वाढवत न्यावा यासाठी सारा समाज आंदोलने करतो तेंव्हाच असा समाज आपल्या सामाजिक वैचारिकतेची दिवाळखोरी सिद्ध करत असतो."
ReplyDeleteहे तुमच विधान खूप महत्वाचे आहे. याचा अर्थ समजावून घेण गरजेच आहे. अप्रतिम संजयजी.
मला बाकीच्या लोकांबद्दल काही बोलायचे नाहीये.. परंतु भ्रष्टाचार ही एक मानसिकता आहे. कायद्यांनी ती कधीही बदलु शकत नाही. हे योग्य विधान आहे. पण आज मी का म्हणुन बदलायचे? त्याने बदलुद्यात मग मी पाहीन, ही वृत्ती दिसून येते. नुसता स्वार्थीपणा. पैशाने तर खरचं माज केलाय. एकमेकांना पाण्यात पाहण्याची वृत्ती वाढत चाललीये, बापच जर तसा वागत असेन तर पोरालाही चांगले बाळकडू मिळणे कठीण.पैशाचे गुलाम झालोत आज आपण हे दुर्दैव...
ReplyDelete