Friday, April 22, 2011

धर्म...जात...महापुरुष आणि आपण!

धर्माची निर्मितीच मुळात भयाच्या आधारावर झाली. भयाने मानवी जीवन अव्याहत व्यापलेले आहे. नैसर्गिक आपत्ति, निसर्गाची न उलगडणारी गुढे आणि म्रुत्यु...जो सारेच हरपुन नेतो...त्याच्या अनिवार भयाने मानवी मन आदिम काळापासुन ग्रसित आहे. या सर्व अद्न्यात शक्ती/संकटांपासुन मानवाने शोधलेली युक्ती म्हणजे धर्म. या अद्न्यात शक्तिंना प्रसन्न केले म्हणजे आपण या संकटांपासुन दुर राहु या भावनेतुन मानवाने ज्या दैवत शक्ती कल्पिल्या...जी कर्मकांडे निर्माण केली तो म्हणजे धर्म. तो बदलत राहिला आहे. तो त्या-त्या भौतिक परिस्थित्यांत वेगळा राहीला आहे. छोटे उदाहरण म्हणजे वाळवंटात हिरवळ नसल्याने अरबी लोकांनी जसा हिरव्या रंगाला पावित्र्य दिले तसेच चंद्र हाच रात्री दिशादर्शक असल्याने त्यालाही महत्ता दिली. जेही मानवी जीवनाला मदतकारक होते त्याला दैवत्व बहाल केले गेले तसेच जेही अहितकर होते...विनाशक होते त्याला जास्त महानत्व देत त्या नैसर्गिक शक्तिंचे दैवत्विकरन केले. मानवी मन हे नेहमीच असुरक्षित राहिले आहे याला वर्तमान परिस्तिती आणि आदिम सुप्त भावना जबाबदार आहेत.
म्हणुनच धर्म, जात, प्रांत, वंश, संस्क्रुती या आधारावर माणसांना एकत्र करता येणे सोपे जाते. एकत्र आलो तर आपण ऐहिक आणि पारलौकिक संकटांतुन मुक्त होवू अशी आशा त्याला असते. पण दुर्दैवाने या दैविकत्वाची चाहुल आजतागायत कोणत्याही महामानव ठरवलेल्या लोकांनाही झाली आहे याचे उदाहरण सहसा मिळत नाही. अपवाद असतात पण अपवादच नियम ठरवत असतात.
उलट या कथित महाभागांचे अनुयायी म्हणवून मिरवणारे महाभाग याच असुरक्षिततेचे मानदंड वापरत नवी भयभीत सत्त्ता निर्माण करण्याच्या प्रयत्नांत असतात.
भारतात धर्म, जाती, प्रांत या आधारावर त्या त्या समाज घटकांच्या भयभीत मानसिकतेचा वापर करत संघटना निर्माण झालेल्या आहेत. या संघटनांचे नेते नकळत एका कल्पित दैवत्व-व्युहात सापडलेले दिसतात. गांधी अहिंसक हुकुमशहा होते तर हिटलर हा हिंसक हुकुमशहा होता. फरक हिंसेचा आहे...एवढाच. पण ही चिकित्सा गांधीप्रेमियांना आवडत नाही. हिटलरची प्रेमबाळे या देशातही आहेतच. त्यांनाही हुकुमशाहीच हवी असते आणि ते म्हनतील तसेच शासन, समाज व्यवस्था आणि सरकार चालले पाहिजे असा अट्टाग्रह असतो. किमान आपापल्या जातीतिल लोकांनी, आपापल्या धर्मातील लोकांनी आम्ही सांगतो तशीच जात आहे, धर्म आहे असा अट्टाग्रह असतो. आणि कथित त्या-त्या जातीचे-धर्माचे-प्रांतांचे लोक या भावनिक भयातुन मुक्त होण्यासाठी या संघटनांचा भाग बनत असतात. संघटन केले तर प्रतिपक्षाला संखेच्या बळावर शह देता येईल, प्रसंगी रस्त्यांवर उतरावे लागले तरी आपण यशस्वी होवू असा वास्तववादी वा अवास्तववादी दावा करणे सोपे जाते. पटवणे सोपे जाते.
आणि यातुन भारत नामक देशात काही विखारी मतप्रवाह निर्माण झाले आहेत आणि त्यांचा समाचार घ्यायलाच हवा.

रा.स्व.संघ., बजरंग दल ते सनातन प्रभात वाल्यांची मानसिकता अशी बनवली गेली आहे कि जणु मुसलिम हाच काय तो देशाचा-राष्ट्राचा शत्रु आहे आणि त्याला संपवले कि देशाची प्रगती कोणीही रोखु शकणार नाही. मुस्लिम्द्वेष या आधारावर हिंदु नावाची जमात आजतागायत एकत्र आलेली नाही याचे कारण समजावून घेण्याची कुवत या नेत्यांत नाही. ८५% हिंदु असणा-या देशात आजतागायत हिंदुत्ववादी पक्ष सार्वभोम सत्त्ताधारी का झाला नाही हा प्रश्न या निमित्ताने उठतो. पण याचा दुसरा अर्थ असा आहे कि हे ८५% हिंदु मुळात स्वता:ला हिंदू समजतात कि नाही? असले तर या संघटनांना त्यांचे हिदुत्वीकरण करण्याचे अव्याहत प्रयत्न का करावे लागतात? आणि तरीही ते त्यात आजतागायत यशस्वी का होत नाहीत? याचे उत्तर एवढेच आहे कि मुळात हिंदु असल्याने वा नसल्याने या देशात कोणाला विशेष फरक पडत नाही. अगदी हिंदुंनाच...कारण येथे जात ही धर्मापेख्शा श्रेष्ठ आहे. धर्माच्या आधारावर कितीही विषमता असली तरी जातीय आधारावर प्रत्येक जात ही अन्य जातींपेक्षा महानच असते. खुद्द ब्राहम्णांत ५५० पेक्षा अधिक जाती आहेत आणि त्याही एकमेकांत श्रेष्ठत्वाचा संघर्षात असतात. इतरांचे वेगळे काही नाही. ब्राह्मणांनी हा देश बिघडवला/धर्म बिघडवला हा आरोप करतांना स्वजातीयांना एकत्र आणता येईलही. संघटना उभ्या राहतीलही. ब्राह्मणांचा विखारी द्वेष करता येईलही. पण ब्राह्मण हा स्वतंत्र्य पण जातीत वाटला गेलेला समुदाय आहे तसाच अन्य जातीयांचाही आहे...कुलदेवते ते श्रद्धा वेगळ्या आहेत...काही समानही आहेत...पण या देशात प्रत्येक जात हा एक स्वतंत्र्य धर्म आहे.

या असंख्य धर्मियांच्या जातसमुहांचा संघ म्हणजे "हिंदु" का? हा एक विचारणीय प्रश्न आहे. शिवपुजक आहे म्हणजे शैव असा सिद्धांत मलाच मोडकळीत काढावा लागत आहे. द्न्यानेश्वर हे नाथ पंथीय होते (ते कधीच वारकरी संप्रदायाचे नव्हते.) म्हणजे शैव होते तर ते वैष्णव कधी झाले? केवळ गीतेवर टीका लिहिल्याने? त्यांचे "अम्रुतानुभव" पुन्हा नीट वाचा. शिवपुजक असतांना शिवाबद्दलच्या विभिन्न विचारधारांचा संयुक्य समुह म्हनजे शैव असे म्हणता येणे सहज असले तरी वीर-शैव-लिंगायत-तांत्रिकदि संप्रदाय एकमेकांचा तिरस्कारच करतांना दिसतात. म्हणजे शैव म्हनने जसे एकार्थाने निरर्थक होवुन जाते तसेच वैष्णवांचे होते.
वैदिकांचा तर येथे प्रश्नच नाही.

या पार्श्वभुमीवर विभिन्नार्थाने का होयिना, विखंडित पण श्रद्धार्थाने का होईना, शिव वा विष्णु पुज्य असतो हे तर खरेच आहे. हरिहरेश्वर ऐक्य उद्घोषित आहेच. या दोन्ही विचारधारांतील साम्य म्हणजे जाती प्रथेला येथे तत्वार्थाने अर्थ नाही. पण या देशातील लोक वैचारीक हराम्खोर एवढे कि जाती सोडुच शकले नाहीत.

मग त्याला कथित महापुरुष कसे अपवाद राहणार? शिवाजी महाराजांच्या नावातच शिव असुनही त्यांना वैष्णव ठरवण्याचे प्रयत्न त्याच काळापासुन केले गेले. महाराजांना क्षत्रियत्वाची गरज नसतांनाही त्यांना ख्षत्रियत्वाचे सेर्टिफ़िकेट दलालांहातुन मिळवुन घ्यावे लागले. गागाभट्ट तेनदा फिरलेला अमनुश्यत्वाचा पुरावा देणारा तीनदा फिरला. चन्द्रशेखर शिखरेंनी त्यांच्या "प्रतिइतिहास" या पुस्तकातही या ब्राह्मणी दलालीचे विस्त्रुत साधार वर्णन केलेले आहे. प्रचंड दक्षिणा घेवुनच या गागाभट्टने महाराजांचे क्षत्रियत्व मान्य करत राज्याभिषेक केला...पण दुर्दैव हे कि मुळात गागाभट्टाने जो शिवराज्याभिषेक केला तो वैदिक नव्हे तर पौराणिक पद्धतीने. म्हणजेच गागाभट्टाने महाराजांना क्षत्रिय मानलेच नव्हते.

वेदोक्त क्षत्रियांसाठी असते तर पुराणोक्त शुद्रांसाठी.

शिवाजी महाराज ब्राह्मणांसाठी जर शुद्रच होते आणि त्यांचे कार्य लोकोत्तरच होते तर त्यांनी क्षत्रियत्व मागितले (जे कधी मिळालेच नाही) तर ते नकळतपणे मनुस्म्रुतीलाच बळकटी देत होते हे माझे विधान या वरील परिप्रेक्षात पहा. ते महापुरुष होते म्हणुन त्यांचा गौरव गाण्याचा ठेका स्वता:ला मराठा समजणा-यांनी घेण्याची काहीएक गरज नाही. कारण तत्कालीन सर्वच मराठे (?) अगदि महाराजांचे सरदार आणि शत्रु-पक्षीय असंख्य मराठे महाराजांना शुद्रच मानत होते. महाराजांना कथित रुपाने क्षत्रीय ठरवले म्हणुन अन्य मराठे क्षत्रिय ठरले नाहीत हे शल्य अगदी नागपुरकर भोसलेंना शेवटपर्यंत छळत होते. त्यामुळेच कि काय...महाराजांनी ज्यासाठी अट्टाहास केला होता तो प्रयत्न फक ब्राह्मणांमुळेच नव्हे तर तत्कालीन स्वता:ला मराठा समजणा-यांमुळेही सपशेल अयशस्वी ठरला.

त्यांचा अवेळी म्रुत्यु झाला.

का?

हे फक्त ब्राह्मणांवर ढकलण्याऐवजी पुन्हा एकदा इतिहासाची चिकित्सा करा.
आपलेही लोक तेवढेच नालायक होते यावर विचार करा!
हे सारे लक्षात न घेता...किंवा समजुनही अडाण्याचे सोंग घेणारे स्वता:ची वंचना करत, आपापले असामान्य अल्प्द्न्यान दाखवत शिव्या ( मला माफ करा...हा शब्द कोणी वापरु नका कारण तो शिवाचा अनमान करतो...) न देता पुराव्यांसहीत टीका करा. मी तुमचे स्वागतच करतो.

पण अनेक मुद्दे राहिले आहेत.

उद्या भेटुयात.....

10 comments:

  1. sanjaji aapan konate purave magato..apan mandalele mata yogyaa asle tari tarkashtra ha bhag mahtvacha asto..to aapan svikarit nahai..babapaala bap mhanayachi kasali chinata jatichyaa uatarandi chadvinaare tumhaalaa god vatatat..aani chuke alkala mhana ki abhyaa manuparamparene nasaleel maratahe.doshi vatata..chukalaa asel pana ka yachi chikitsa mahtvhachi aahe..dukhane dokyaache ahhe..aani tumhai malam payalaa lavata..ajajar bara hoanar nahi ati abhyaas aslyaach aava ananre.ase kahi baralat astata

    ReplyDelete
  2. संजय सोनवणी तुम्ही ज्यावेळी छशिवरायांनसारख्या लोकोत्तर महापुरुशाबद्दल बोलता त्यावेळी तुम्ही फार विचार करून बोलले पाहिजे. सोनवणी तुम्ही मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करताना तुम्हाला एखाद्या राज्याच्या जीवनातील राज्याभिषेकाची आवश्यकता समजायला हवी होती. पण ती तुम्ही समजून न घेताच बेताल वक्तव्य करीत सुटलात. म्हणून मला प्रतिक्रिया देणे आवश्यक वाटले. तुम्ही बहुजन महापुरुषांच्या संघर्षाला कमी लेखून वातावरण बिघाडविण्याचा प्रयत्न करीत आहात. बामणी परंपरेने शिवरायांनी राज्याभिषेक केला व ते क्षत्रीय्त्वाच्या पाठीमागे लागले होते अस सांगून त्यांना आज तुम्ही मनुवादी ठरवीत असाल तर उद्या तुम्ही काळाराम मंदिर प्रवेशाच्या प्रकरणावरून मनुस्मृती जळणाऱ्या बाबासाहेबांनाहि मनुवादी ठरवाल. परवा वेदोक्त प्रकरणावरून शाहू महाराजांना तुम्ही मानुस्मृतीवादी ठरवाल. मग आमच्या जवळ कोण राहील याचा तुम्ही विचार केला आहे का? फेसबुक वरील भटांच्या तुमच्या लेखावरच्या प्रतिक्रिया वाचून मला वाटते सोनवणीने भटांची सुपारी घेतली आहे

    ReplyDelete
  3. माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या...सातवाहनांपैकी किती राजंचा राज्याभिषेक झाला होता? देवगिरीच्या यादवांचा राज्याभिषेक झाला होता काय? झाला असल्यास कोणाचा आणि कधी? यादव, चालुक्य, सातवाहन, राष्ट्रकुट राजांचे वेदोक्त उपनयन झाले होते काय? मुस्लिम सत्तांना केवळ राज्याभिषेक झाला म्हणुन महाराजांशीचा लढा थांबवला असता काय? राजांच्या राज्याबिषेकापुर्वी आणि नंतरही राजपुतांनी मराठ्यांना आपले मानले काय? खुद्द मराठा सरदारांचे मत काय होते? मला इतिहास समजत नाही...मला क्रुपया इतिहास साक्षर करा ही विनंती. दुसरे असे कि मी भट आहे वा भटांची सुपारी घेतली आहे असा अंदाज/आरोप अनेक निरिक्षर करत आहेत. क्रुपया मलाच माझी जात सांगा आणि मला सुपारी कोणी दिली तेही सांगा. सुपारी दिलेल्याचे नाव सांगणा-यास काही टक्का मी देण्यास काहीएक काच्कुच करणार नाही.

    ReplyDelete
  4. ya chartet arath ahe ki nahimahit nahi. aso.

    ReplyDelete
  5. खरी लडाइ हिन्दुत्ववादी छावनीसी आहे, हे सुत्र सुट्ता कामा नये.ब्रिगेड व बामसेफ़ ते विसरले आहेत काय?सोनवनी यान्चे विवेचन मुद्देसुद आहे. तलमल मोटी आहे.विचार कलह हौउ द्या.

    ReplyDelete
  6. bhute ..... bhut kala sathi ka bhandhtay ?

    ReplyDelete
  7. तुम्ही सांगत आहात त्या सर्व राजांचा मंचकारोहण सोहळा झालेला आहे एवढच काय इंग्लंड फ्रांस आणि जगातील सर्व राजांचे हे विधी झालेले आहेत.

    ReplyDelete
  8. Bravo....Its not easy to state the facts..

    ReplyDelete
  9. bravo ....sanjayjii me tumcha prasanshk ahe

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...