Wednesday, February 8, 2012

"मराठ्यांनो षंढ झाला आहात काय?" - डा. बालाजी जाधव
मी डा. बालाजी जाधव यांचे "मराठ्यांनो षंढ झाला आहात काय?" ही पुस्तिका वाचली. डा. जाधव बहुदा तरुण असावेत आणि तरुणांमद्धे जो एक स्वाभाविक उद्रेक आणि संताप असतो त्याचे दर्शन त्यांचा या पुस्तिकेत दिसते. परंतु असे लेखन करत असतांना आपणच आपल्या मुळ विचारांशी प्रतारणा करत जातो याचे भान उद्रेकी तरुणांनी ठेवले पाहिजे असे वाटले म्हणुन हे परिक्षणवजा विचारमंथन मी मांडत आहे. उदाहरनार्थ जाधवांना धर्मवीर ही संद्न्या नको आहे...पण क्षात्रवीर म्हटलेले चालते. (प्रुष्ठ २९-३०). याचा अर्थ ते नकळत चातुर्वर्ण्य मान्य करतात. संभाजी महाराज हे ना क्षात्रवीर होते, ना धर्मवीर...ते राष्ट्रवीर होते असे म्हणणे अधिक संयुक्तिक राहील. परंतु यात लेखकाची चुक नसुन जे संस्कार जाणीवपुर्वक काही हिंदुत्ववादी संघटना घडवत आले आहेत त्याची ही अन्याय्य परिणती आहे.

तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन झाले नसुन त्यांची हत्त्या झाली असे डा. जाधव म्हणतात आणि ते तार्किकद्रुष्ट्या बरोबरही आहे. किंबहुना मी एकमेव चित्रकार आहे ज्याने तुकारामांच्या खुनाचे चित्र काढले आहे. परंतु याच तुकारामांचे दशावतारी स्वरुपात जेंव्हा देहुत शिल्पे उभारली जातात तेंव्हा मात्र मराठावादी संघटना काय करतात हा प्रश्न आहे. "मराठा ही एक लढवैय्यी जात आहे..." असे ते आपल्या पहिल्याच प्रकरणात लिहितात. ते खरे असेल एके काळी, परंतु सध्या तरी मराठा ही सत्तेसठी हपापलेली आणि स्व-बांधवांना, स्वजातेयांना वापरुन घेत त्यांना पायतळी तुडवत वाट्टेल त्या तडजोडी करत स्वनाशाकडे वाटचाल करणारे जात बनली आहे हे दुर्दैवाने नमुद करावे लागते.

दुसरे असे कि गोतिये नामक रास्ववादी, जन्माने फ्रेंच माणसाने अलीकडेच पुण्यात लोहगांवात शिवाजी महाराजांचे मंदिर उभारले. मी त्या विरोधात तीन महिन्यांपुर्वी एकामागोमाग तीन लेख लिहिले. निवडनुक आचारसंहिता वगैरे त्या मधल्या दोन महिन्यांच्या काळातही एकाहे मराठा संघटनेने त्या दैवत्वीकरणाचा निषेध केला नाही. उलट अलीकडेच या मंदिराचे उद्घाटन झाले. त्या महान कार्यक्रमात राष्ज्ट्रवादीच्या महान नेत्याची पत्नी सुहास्य हजर होती...हे राजकारण आहे असा युक्तिवाद मला नंतर याच चळवळीतल्याच काही मराठा बांधवांनी ऐकवला. परंतु तुम्ही करता ते राजकारण...बाकी मात्र ब्राह्मणांचे हस्तक असा युक्तिवाद करतांना आपणच आपली घोर फसवणुक करुन घेत आहोत याचे भान असायला नको काय? राजकारण जेंव्हा समाजकारणापेक्षा श्रेष्ठ आहे असा आभास होवु लागतो त्यातच त्या-त्या समाजाच्या अवमुल्यणाची बीजे रोवली गेलेली असतात हे भान मराठ्यांनी करुन घ्यायला हवे असे मला या पुस्तकाच्या निमिताने वाटते.

मराठा समाज हा एका दलदलीत अडकला आहे. सत्ताकारणाचा हव्यास हा मराठा समाजाचा मुलमंत्र बनला आहे. सर्वसामान्य मराठे या वातावरणात एवढे मश्गुल आहेत कि स्वत:ची लाजीरवाणी स्थिती त्यांच्या लक्षातच येत नाहीय. म्हणुन ते इतिहासाचे मुडदे उखडण्याच्या मागे लावले गेले आहेत. इतिहास हा अफुची गोळी बनवला जात आहे. इतिहासाचे तटस्थ विश्लेषन करणे व त्या इतिहासापासुन शिकणे व चुका दुरुस्त करणे हे वेगळे, परंतु प्रतिइतिहास लिहिण्याच्या नादात आपण वर्तमानाच्या बेड्या मात्र घट्ट करत नेत आहोत याचे भान यायला हवे. खरे तर ब्राह्मणांनी गतकालात जी पापे केली असतील ती केली, परंतु वर्तमानात मात्र
प्रत्यक्षात मराठा नेतेच त्यांचे पाय-पंख कापत चालले आहेत याचे भान त्यांना नाही. मराठे आणि ब्राह्मण समाज यांचे साटेलोटे आजचे नाही. कार्यकर्त्यांना ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात अदकावुन द्यायचे आणि नेत्यांनी मात्र ब्राह्मनी संस्था-पक्षांशी आतुन सौदेबाजी करायची ही बाब या भाबड्या मराठा तरुणांच्या लक्षात येत नाही हे एक दुर्दैव आहे. राष्ट्रवादीने अक्षरश: वेदाचार्य (म्हणजे सध्या तरी एवढा कर्मठ माणुस सापडणार नाही) मोरेश्वरशास्त्री घैसासांच्या पत्नीला तिकिट दिले याचा निषेध या मराठ्यांनी (म्हणजे मराठावादी संघटनांनी) का केला नाही याचे उत्तर जर "राजकारण" हे असेल तर मराठा हे षंढ आहेत हे बालाजी जाधव यांचे मत योग्य आहे असे नाईलाजाने म्हणावे लागेल.

ब्राह्मणशाही कि मराठाशाही यात कोणाला निवडायचे हा प्रश्न आता उद्भवु लागला आहे याचे कारण मराठा राजकारणात आहे. गोतिये शिवाजी महाराजांचे मंदिर बनवतोय...वाईट वाटते...पण मतदार राजा दुखवायचा नाही...मग असुद्यात कि ते...काय बिघडले...हे मराठेच म्हणनार...मग लेखकाच्या पुस्तकाचे शिर्षक योग्यच आहे असे म्हणने भाग आहे.

म्हनजे शिवाजी महाराजांचे दैवतीकरण कसल्याही स्थितीत होता कामा नये यासाठी संघर्ष करणारे, नवे नवे शत्रु अंगावर ओढुन घेणारे आम्ही मर्द महामुर्खच कि!

शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे नांव घेत वारंवार ब्राह्मणी कथा जशा येतात तशा विरोधी अर्थाने नव्या बनवत आणि प्रचार करत समाज एकत्र येईल आणि मराठ्यांचे नव सांस्क्रुतीक वर्चस्व स्वीकारेल असा भ्रम या नव-विचारवंतांना झाला आहे कि काय असा प्रश्न उपस्थित होतो. डा. बालाजी जाधव हे एन्याय्य व्यवस्थेविरुद्ध पोटतिडिकेने लिहितात, परंतु अभ्यास आणि अधिक चिंतनाची आवश्यकता आहे. मराठा समाजात वानवा आहे ती तटस्थ चिंतकांची. रा.स्व.वाद्यांनी मुस्लिमांना टार्गेट करायचे, पण घातपातांसाठी त्यांचीच मदत घ्यायची हे नाटक देशपातळीवर जसे सुरु आहे तसेच येथे ब्राह्मनांना जाहीरपणे शिव्या द्यायच्या आणि आतुन त्यांचीच मदत घ्यायची आणि बहुजनांना ठकवायचे हा उद्योग तरुणांच्या तरी ध्यानी यायला हवा. "प्रुथ्वी नि:ब्राह्मण करा..." असे डा. जाधव एका प्रकरणात (प्रुष्ठ २१) म्हणतात. रा.स्व. वाले मुस्लिमांच्या कत्तलीची भाषा करतात तसेच हे विधान आहे. मुस्लिम विरोध केला तर हिंदु एकत्र येतील आणि ब्राह्मण विरोध केला तर मराठेतर बहुजन मराठ्यांच्या मागे येतील हे समजने हे सत्ताकेंद्रित भावनेपोटीचे राजकारण आहे. रास्ववाद्यांना या घोषणेचा फायदा जसा झाला नाही तसाच तो मराठावादी संघटना व पक्षालाही होत नाही. द्वेषाच्या पायावर कोनतेही राजकारण किमान या देशात तरी यशस्वी होत नाही...होनार नाही हा बोध किमान विचारवंतांनी तरी घ्यावा ही या लेखामागील तळमळ आहे.

बरे इतिहासाचे पुनर्लेखन करतांना शिवाजी महाराजांपुर्वीचा इतिहास आणि संभाजी महाराजांनंतरचा इतिहास सांगायला का टाळाटाळ केली जाते? ताराराणी, राजाराम महाराज यांबाबत किती लेखन आहे बरे? शिवपुर्व काळातील इतिहासाबद्दल का लेखन होत नाही? याचे कारण आहे जिजाऊ, शिवाजी व संभाजी यांच्या नांवाचा वर्तमानात राजकारंणासाठी, भावना पेटवण्यासाठी उपयोग सहजी करता येतो म्हणुन कि काय?

संत तुकारामांबद्दल सर्वांनाच आदर आहे. पण मराठ्यांना तो अलीकडेच वाटु लागला. तोही केंव्हा तर मराठा हे कुणबी आहेत असा जावईशोध त्यांनी लावला तेंव्हा. तुकोबा हे कुणबी होते आणि त्यांनी त्यांच्या अभंगात अभिमानाने म्हटलेच आहे. परंतु तुकोबांनी कोठेही आपण मराठा असल्याचा उल्लेख केलेला नाही हे का विसरले जाते? मराठा आणि कुणबी या सर्वस्वी वेगळ्या जाती आहेत. अभिप्रायार्थचे हे पुस्तक सरळ मराठा जातीबद्दल असल्याने मी हे स्पष्ट करत आहे. काही मराठा संघटना आपण बहुजनवादी आहोत असा आव आणत होत्या परंतु आरक्षणाच्या लढाईत उतरत त्यांनी आपला खरा चेहरा दाखवला यावरही व्यापक चिंतन व्हायला हवे. मराठ्यांनी आपले हित पाहु नये कि काय? मी म्हणतो अवश्य पाहिलेच पाहिजे, त्यासाठी बहुजनवादी बुरखा घेण्याची मुळीच आवश्यकता नाही.

बालाजी जाधव यांच्या लेखनात मराठ्यांच्या हलाखीची वर्णने आहेत. ती खरीच आहेत. मी सहमत आहे. महाराष्ट्रातील दीड-दोनशे मराठा घराणी सोडली तर उर्वरीत मराठे हे पुर्ण-ते अर्धवेळ बेरोजगार आहेत. राजकारण्यांच्या-राजकारणाच्या नादी लागत कसलीही सर्जनात्मकता (अपवाद आहेत) न दाखवता, स्व प्रगतीचे मार्ग न धुंडाळता आपापली आयुष्ये सत्तेच्या स्वप्नात वाया घालवत आहेत. परंतु प्रत्येक राजकीय घराण्यांनी (यात मराठाच नव्हे तर अन्यही आले) त्यांची भावी पिढ्यांचीही सोय लावुन ठेवली आहे. अशा स्थितीत इतरांना तर सोडाच खुद्द मराठा नव-नेत्यांना हुजरेगिरी केल्याखेरीज संधी नाही हे उघड आहे. आणि ही हुजरेगिरी म्हणजे समाजाला अलेली षंढता आहे हेच जाधवांचे म्हणने खरे करते.

त्याच वेळीस जेथे जमेनींचे भाव चढे आहेत तेथे बापजाद्यांच्या जमीनी गुंठेवारीत विकुन रातोरात कोट्याधीष होत तेच पैसे वारांगणांवर, वारुणीवर ते लगोलग नगरसेवक ते ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी तयार आहेतच! भिकारी व्हायला किती वेळ लागतो? मग हेच "भुमीपुत्र" म्हणत ज्या जमीनी कारखान्यांना विकल्या तेथे ठिय्या मांडुन नोक-यांची भीक मागायला तयारच कि! लग्नावळेंवरचा मराठा समाजातील खर्च हा अचाट वाढला आहे. जेथे स्वत: खर्च करने शक्य नाही तेथे खोटी कर्जे काढत हे उद्योग पार पाडले जातात, हे काय मराठा तरुणांना समजत नाही? मी मला स्वत:लाच माहित असलेली शेकडा उदाहरने तरी देवु शकतो. शिक्षण, द्न्यान, उद्यमशीलता आणि कष्ट यांना प्रतिष्ठा देत प्रगती साध्य करण्या ऐवजी मराठा तरुनांना दास करण्याचे या नव-सरंजामदारी नेत्यांचे लांगुलचालन करण्यात जर मराठा तरुणांना धन्यता वाटत असेल तर शिवशंकर त्यांचे भले करो एवढेच मी म्हणु शकतो.

हे प्रबोधन कोणतीही मराठा संघट्ना करत नाही. उलट मराठ्यांना आरक्षणाचे गाजर दाखवत आपल्या स्वार्थासाठे पुढे रेटत नेतात आणि हे मेंढरांसारखे त्याच वावटळीत आपले भविष्य शोधतात. शेवटी त्यांचा कडेलोट अपरिहार्यपणे होतो हे वास्तव डा. जाधवांसारख्या तरुणांनी मांडायला हवे असे मला कळकळीने वाटते.

मी "मराठ्यांनो षंढ झालात काय?" या पुस्तिकेतुन मी जो अन्वयार्थ काढतो तो असा कि अरे मराठ्यांनो षंढ होवु नका. राजकारणापेक्षा ख-या अर्थकारणाकडे अधिक लक्ष द्या. सत्ता ही सर्वांना मिळु शकत नाही. ज्या घराण्यांच्या , मग ते कोणत्याही जातीचे असोत, ताब्यात ती आहे ते अन्य कोणाला शक्यतो त्यात प्रवेशु देनार नाहीत. सत्ता ते आपल्याच आणि फक्त आपल्याच भावी पिढ्यांसाठी आरक्षित करुन ठेवनार. मराठ्यांना आरक्षण मिळेल तेंव्हा मिळेल...पण त्याची वाट पाहण्यात स्वत:चीच ससेहोलपट आहे हे लक्षात घ्यावे लागेल. हे सरंजामदार तुमचा वापरच करुन घेणार. आणि जे आपला वापर करु देतात ते षंढच असतात याबाबत शंका असण्याचे काहीएक कारण नाही. मराठ्यांनी मराठ्यांचे अहितच केले आहे हे तरी समजावुन घ्या. तुमचे नेते...मग ते सामाजिक असोत कि राजकीय...त्यांची युती धर्मसत्तेच्या प्रतिनिधींशी...बळकट होत चालली आहे...मग तुमच्या या ब्राह्मण द्वेषाला काडीइतकाही अर्थ रहात नाही.

उलट आज आपण काय घालवत चाललो आहोत यावर विचार करायला हवा. बालाजी जाधवांचा संतप्त उद्गार हा बंव्हंशी अन्यायाच्या जाणीवेपोटी आहे...पण अन्यायाची रुपे सर्वांगीनपणे त्यांनी पहावीत तरच त्यांचा विचार हा खरा स्वागतार्ह ठरेल. त्यांचे पुढील लेखन हे अधिक व्यापक सामाजिक विचारांवर आधारित असेल आणि ते समाजाला पुढे नेण्यासाठी अधिक विचार मांडतील अशी अपेक्षा त्यांच्याकडुन ठेवावी असेच त्यांचे मुलभुत विचार आहेत.

मराठ्यांनो षंढ झालात काय?
लेखक: डा. बालाजी जाधव
प्रकाशक: पंचफुला प्रकाशन, औरंगाबाद
मुल्य: रु.३०/-

31 comments:

 1. प्रुथ्वी नि:ब्राह्मण करा. असं बिनधास्त छापणा-या पुस्तकावर बंदी व लेखकावर समाजात तेढ निर्माण करणारे लिखाण केल्यामुळे बंदी का होत नाही? अशा व खेडेकराच्या अनेक गरळ ओकणा-या व भारतीय संविधान पायदळी तुडवणा-या पुस्तकांना शासन बंदी का घालत नाही.
  >>इतिहासाचे मुडदे उखडण्याच्या मागे लावले गेले आहेत. इतिहास हा अफुची गोळी बनवला जात आहे. तुमच्या या मताशी सहमत आहे.

  >>खरे तर ब्राह्मणांनी गतकालात जी पापे केली असतील ती केली,
  कसली पापे? जरा सविस्तर माहिती द्याल का?
  >>. रा.स्व.वाद्यांनी मुस्लिमांना टार्गेट करायचे, पण घातपातांसाठी त्यांचीच मदत घ्यायची
  हे नवीनच ऐकलं मी,याचे पुरावे देऊ शकाल काय?

  >>मोरेश्वरशास्त्री घैसासांच्या पत्नीला तिकिट दिले याचा निषेध या मराठ्यांनी (म्हणजे मराठावादी संघटनांनी) का केला नाही याचे उत्तर जर "राजकारण" हे असेल तर मराठा हे षंढ आहेत हे बालाजी जाधव यांचे मत योग्य आहे असे नाईलाजाने म्हणावे लागेल.
  म्हणजे काय म्हणायचे आहे आपल्याला? ब्राम्हणांना तिकिट देणे हे सर्वथा चुकीचे आहे? म्हणजे त्यांना लोकशाहीत निवडणुकांना उभे राहण्याचा अधिकार नाही असे आपल्याला म्हणावयाचे आहे का? शिवाय राष्ट्रवादीची तशी पॉलिसी असेल तर ती लिखित स्वरुपात उपलब्ध आहे का?
  वरील वाक्यातून तुमचापण ब्राह्मण विरोधी सूर दिसून येतो. लेखक विचारवंत असल्याचा मोठा आव आणत असले तरी आतून ब्राह्मण द्वेषाने पोखरले गेलेले दिसत आहेत.

  ReplyDelete
  Replies
  1. Dear Sadhak, writer of the book belomngs to marathavadi org. and always have anti-brahmin stance, hence the statement. samjhauta Express incident had taken place with the help of ISI. Thanks.

   Delete
  2. Sorry Sir..... Samjhauta xpress incident che tumache mat tumhi media madhil batamya vachunach banavale na.....ani anekanmadhala ekhada chukichya margane gela ..mhanaje ti sanghatanela doshi tharavine mhanaje apan tyatalya aneka changale kam karanaryanvar anyay karato ase nahi ka vatat apalyala...

   Delete
 2. Dear Sonawni,

  Baryach wela tumhi tumchya likhanat lihita ki tumhi kuthlyahi eka jatila wirodh karit naahi athwa jatidwesh ha samajala changla naahi. Tumcha paramamitra Ramteke yache likhan uchchwarniyan wiruddha aste. pan to kadhich jatidwesh karit naslyacha aaw aanat naahi. tumhala kuthlyahi jatiwiruddha lihayche asel (te chook ki barobar ha prashna nirala) te jaroor liha. Pan ugach swataha jatidwesh karat naslyacha aawa aanu naka. Tumch panipatawaril, Dadoji konddewanwaril, Holkaranchya udattikarnawaril likhan ekach gosht warmwar siddha karte ki tumhi dekhil ek prakhar brahmandweshte aahat. aani je tumhi manya karit nahi. mhanun naailajane mala ithe namud karawas watt ki tumhi dekhil ek SHANDHA aahat.

  Wastawik pahata aajchya ghadila dalit samaj jevdi jaat jaat karto tevda itar kuthlahi samaj kartanna disat nahi. swatahawar zalelya anyayasathi dusryanna dosh den he nehamich sop ast. tumchya mhannyapramane jar mahar samaj itka mahan hota tar mag mulat yevde anyay tyane swatahawar hounach ka dile? swatantrya milun aaj 60 hun adhik warshe zaali. tenvapasun tumhi aarakshanachya kubdya gheun chalta aahat. ya kubdyanmule naahi tumchya samajach kahi bhal zaal nahi uchchawarniyanch nuksan zaal, je tumhich baryach tunmchya likhanat manya kelel aahe. Nuksan zaal tar aaplya Bharat deshach. jya jya kshetrat mhanun aarakshana laagu zaali tya tya khestrachi paar waathat zaali. England, South Africaet, Americaet dekhil krushna warniyanwar atyachar zaale. mhanun kahi tyanna aarakhsanachya khirapati nahi watlya gelya. Tarihi Americaet aaj krushnawarniyanchi samajik aani aarthik paristhiti baghitli tar ti ithlya tathakathit mgasawrgiyanpeksha kititari patine changli aahe. Aani hech tyanchya rashtrachya pragatila karnibhut tharlay.

  Jar aaj dalit samajala ek majbut samaj ubharaycha asel tar pahilyanada tyane arakshanasarkhya kubdya zugarun dyawayt. Joparyanta pakshyach pillu ghartyatun baher padun independaently udayla shikat nahi toparyanta tyacha kharya arthane vikas hot nahi.

  Waait yevdyachach watt ki ya jatichya rajkarnamule nuksan hotay te tumchya aamchya ya BHARAT deshach. Joparynat aapan sagle jatibhed wisrun ek bhakkam samaj ubharat naahi toparyant aapan ek saksham Bharat desh nirman karu shakat nahi.


  Ek Sachcha Bharatiy.

  ReplyDelete
  Replies
  1. सच्चा भारतीय, धन्यवाद. पण आपण हाच मजकुर मराठीत टाईप केला असता तर वाचायला सोपे गेले असते. तुम्हाला आरक्षणाबाबत राग आला आहे हे स्पष्ट दिसते आणि मीही आरक्षनाविरुद्धच आहे हे तुम्हाला माहित असेलच अशी आशा आहे. दुसरे असे कि जातीद्वेष आणि प्रव्रुत्ती द्वेष यातील सीमारेखा आपल्या लक्षात आलेली दिसत नाही. कोणत्याही जातीतील एखाद्या मानसावर टीका केली म्हनजे तो मनुष्य हा त्या समग्र जातीविरोधात आहे असा आपला तर्क दिसतो तो तुम्ही पुन्हा तपासुन घ्यायला हवा. दादोजींचा इतिहास मांडने म्हणजे ब्राह्मण द्वेष असे आपल्याला वाटते ते याच भावनेतुन आहे. होळकर वा अन्य इतिहासात दडपली गेलेली व्यक्तित्वे यांचे पुराव्यानिशी संशोधन मांडणे हे आपल्याला अन्याय्य वाटते यातुन आपलीच वर्चस्ववादी भुमिका स्पष्ट होते. आपण आपल्या प्रतिक्रियेत दलितांना मिळणा-या आरक्षणाबद्दल मोठा रोष व्यक्त केला आहे. परंतु आरक्षणाच्या रांगेत उच्चवर्णीयही मग का आहेत यावर आपण आपले विचार मांडले असते तर बरे झाले असते. युरोपियन व अमेरिकन जगातील व्यवस्थेशी भारतीय जातीव्य्वस्थेची तुलना होवु शकत नाही कारण ती जन्मजात आहे हे आपल्या लक्षात आलेले दिसत नाही. तेवढा मन-मोकळेपणा भारतीय मानसाच्या मनी अजुन रुजलेलाच नाही हे वास्तव नाही काय? तुमच्याच लेखात तुम्ही याच विषमतेबद्दल आणि तरीही आरक्षण नको याच भुमिकेशी ठाम नाही आहात काय? दलित समाज जात जात करतो असे तुम्हीच म्हनता, मग अन्य सारेच समाज घटक काय वेगळे करत आहेत? ते जातींच्या-पोटजातींच्या व्युहात (मग त्यात ब्राह्मणही आले) अडकलेले नाहीत असा तुमचा दावा आहे काय? सारेच समाजघटक जातीनिष्ठ महत्तेत अडकले आहेत...त्यात जे उच्चस्थानी असतात ते आपल्या सोईने पुढे जातात तर अन्यांना आपला उद्गार काढण्याची संधीच नसते हे वास्तव आपल्याला दिसत नाही कि काय?

   आणि मी तुम्हाला आव्हान देतो, दादोजी हे नेमके कोण होते हे तुम्हीच सिद्ध करुन दाखवा. मेहंदळे का लपले कस्तुरेंच्या आड? स्वत:ला उत्तर देता येत नाही काय? आहेत पुरावे तर ते मांडण्याला कोणी अडवले आहे? दादोजींबद्दल लिहिले तर ब्राह्मण द्वेष्टा, महारांबद्दल/मांगांबद्दल लिहिले कि महार-मांग प्रेमी, बाबासाहेबांचे एखादे मत खोडले तर लगोलग महार द्वेष्टा...मराठ्यांशी तार्किक वाद घातला कि मराठाद्वेष्टा...ही नाटके आजची नाहीत. मग "पक्षाच्या पिल्लाला स्वतंत्र उडु द्यावे" हे काही हजार वर्ष का विसरला होता? का त्या पिल्लांना, जे आपलेच समाज बांधव होते, त्यांचे पंख कापले? आणि आता म्हणता उडा कि! तुम्ही तरी किती उडालात हो? कोणती द्न्यानाची, विद्न्यानाची क्षितीजे ओलांडली हे तरी सांगा कि! मराठ्यांना शुद्र ठरवणारे हेच, स्वत:ला क्षत्रीय समजणारे हेच मराठे...यातील विसंगती आणि त्यातुन निर्माण झालेला समाज द्रोह याचा अन्वयार्थ लावायला शिका. बरे होईल.

   माझा यायचा तेवढा राग येवु द्यात...हरकत नाही, पण मी वर जे मांडले आहे त्यावर जरा विचार करुन उत्तरे द्या...स्वत:ला सच्चा भारतीय म्हनवता...आनंद आहे, पण मग सच्चा भारतीय समाजाच्य वेदना समजावुन घ्या...

   Delete
  2. सच्चा भारतीय,
   तसेच इतर सर्व मराठीत लेखन करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी
   आपण एक प्रयत्न करून बघा ,
   आपण जी मेलवर लेखन करत जावे तेथे सेटिंग मध्ये जाउन पहिल्या रकान्यात जीमेल डिस्प्ले ल्यांग्वेज मध्ये आदर ल्यान्गावेजेस असे दिसेल तिथे क्लिक करून बघावे
   त्यात नंतर प्रायमरी ल्यान्गवेज इंग्लिश यु के असे येते आणि इतर भाषा अशा रकान्यात मराठी असे निवडायची सोय आहे नंतर स्क्रोल करत शेवटी सेव्ह कडे जावे ,
   त्या तिथेच सेव्ह करण्यापूर्वी शेवटून दुसरे युनिकोड हे ऑप्शन निवडावे अशामुळे आपण कायम माराठीत आपले विचार मांडू शकाल .
   आपले आणि माझे विचार जुलायालाच हवेत असे मुळीच नाही पण ते
   संजय सर म्हणतात तसे मराठीतून मांडले तर ग्रहण करायला आणि उत्तर द्यायला सोपे जातात ,
   धन्यवाद !

   Delete
 3. संजय साहेब,
  बालाजी जाधवच्या पुस्तकाचे परिक्षण व वर्चस्ववादाच्या नव्या रुपाचा समाचार घेतल्या बद्दल तुमचे अभिनंदन.
  --------------------

  तुम्हाला आरक्षणाबाबत राग आला आहे हे स्पष्ट दिसते आणि मीही आरक्षनाविरुद्धच आहे हे तुम्हाला माहित असेलच अशी आशा आहे.>> संजय साहेब या वाक्यानी मी बुचकळ्यात पडलो आहे. तुम्ही आरक्षणला विरोधी करत असल्यामुळे नाईलाजानी मला तुमचा निषेध करावा लागत आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. admin आपल्याला काय म्हणायचे आहे? बालाजी जाधव यांचे पुस्तक कोणत्या आधारे आपल्याला वर्नवर्चस्ववादी वाटते? आपला विषय कृपया पुराव्याच्या आधारे स्पस्ट करा blind statements देऊ नका. हि एका गंभीर विषयावरची चर्चा आहे हे ध्यानात ठेवा.

   Delete
 4. "...मराठ्यांनो षंढ झालात काय?..."
  हे पुस्तक अतिशय उत्तम आहे. लेखकांनी समाजाच्या ज्वलंत भावना पुस्तक रूपाने मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. प्रत्तेकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. ब्राह्मणी विकृत लेखकांनी मराठ्यांचा चुकीचा इतिहास लिहिण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण तो मराठा - बहुजन समाजातील जागरूक तरुणांनी हाणून पडिला सुरुवात केली आहे. आज प्रत्तेक तरुण वाचन करू लागला आहे. जाधव सरांचे अभिनंदन...

  संतोष शिंदे, पुणे
  ९८५०८४२७०३

  ReplyDelete
 5. संतोष शिंदे व खेडेकरी कंपुना जर शिवाजी महाराजांवर एवढेच प्रेम आहे तर गोटीयानी पुण्यात शिवाजीचे दैविकरण केले तेंव्हा मूग गिळून बसण्याचे प्रयोजन काय? भवानीच्या हातून तलावर घेणारा शिवाजीचा पुतळा (मुर्ती?) उभी करुन RSS च्या गडकरीना व सुन्नेत्रा पवारांच्या हस्ते मोठ्या धुम धडक्यात या शिवाजीच्या मंदिराचे उदघाटन केले. हे सर्व ब्रिगेड व खेडॆकरी कंपु मुकाट्याने पाहतो आहे याचा अर्थ शिवाजीचे दैविकरण (म्हणजेच ब्राह्मणीकरण) त्याना मान्य आहे. म्हणजेच खेडेकरी कंपू हा बहुजन विरोधक असल्याचे अधोरेखीत होते. उगीच शिवाजीचा आव आणून लोकांची फसगत करणे बंद करा.

  रामटेके- ९७ ६५५ ३३ ६४०

  ReplyDelete
 6. मराठा समाज हा राज्यकर्ता समाज होता व आहे याच मानसिकतेतून त्यांचे आजचे प्रश्न निर्माण झाले आहेत. जो प्रॉब्लेम मुस्लिमांचा तोच मराठ्यांचा इतकेच म्हणता येईल ! यांचा जिथे फायदा होत असेल तिथे हे सर्व मानपान गुंडाळून पुढे येतील आणि जिथे यांना फायदा मिळणार नाही तिकडे ढुंकून देखील बघणार नाहीत. सारांश, मराठा समाजाला जर आपली प्रगती साधायची आहे तर आपली जात हि राज्यकर्ती जमात होती किंवा शिवाजी - संभाजी यांची परंपरा सांगणे त्यांनी आता बंद केले पाहिजे. गतकालीन वैभवाच्या कल्पनेत दंग राहिल्याने बाकीचे कधीचं पुढे निघून गेले व आपण आहोत तिथेचं राहिले आहोत हे त्यांना आत्ता कुठे समजू लागले आहे पण दुदैवाने या परिस्थितीला ते ब्राम्हणांना जबाबदार धरत आहेत. वस्तुतः, हा सोयीच्या राजकारणाचा एक नमुना आहे. ' आम्हीच तुमची वाट लावली ' असे मराठा नेते, कोणत्या तोंडाने आपल्या कार्यकर्त्यांना सांगणार आहेत ? बाकी, पुस्तकाचे विशेल्षण चांगले झाले आहे. याला पुस्तकाचे परीक्षण म्हणता येणार नाही. कारण, यात लेखकाच्या भूमिकेचा, त्याच्या मतांचा व वास्तव स्थितीचा व्यवस्थित आढावा घेतलेला आहे. परीक्षणात फक्त दोष सांगितेल जातात, त्यावर उपाय वगैरे नाही !

  ReplyDelete
 7. Sonawni Saheb Maze muddesud spashtikaran kahli det aahe.

  सच्चा भारतीय, धन्यवाद. पण आपण हाच मजकुर मराठीत टाईप केला असता तर वाचायला सोपे गेले असते. Khshama asawi Sonawni Saheb parantu me aaplya itka expert blog writer naslyane marathit kase type karawe yabaddal me adnyani aahe.

  ..आणि मीही आरक्षनाविरुद्धच आहे हे तुम्हाला माहित असेलच अशी आशा आहे. Aapan dekhil arakshanawiruddha aahat hey mala prathamach kalle. Tyabaddalche aaplyakadun kahi likhan zaale aslyas athwa aaple kahi spashta wichar aslyas te ithe prakashit kelet tar kalnyas madat hoil.

  दुसरे असे कि जातीद्वेष .....मांडणे हे आपल्याला अन्याय्य वाटते यातुन आपलीच वर्चस्ववादी भुमिका स्पष्ट होते.
  Nahi Sonawni Saheb. Tumchya baddalch maaz mat ha wrachaswawaad nahi. Itihasat anek wyaktinch udattikaran athwa khachchikaran zala asnyachi shakyata aahe pan mag tumhala Brahmin aani Holkarach kase sapadtat? Tumhi lihilya pramane pratyek purawyachya anwayarth mansanurup badlu shakto. Hach dhaga gheun me mhantoy Dadoji Kondevwa (brahman), Vishwas Rao (brahan), Ramdas Swamin (brahman) baddlacha tumcha rosh ha wyaktirosh nasun to ek brhamnadwesh aahe. Jar itkach aapan wrachaswawadadi lokancha dhikkar karta mag kattar warchaswawadi Madhusudan Ramteke (jyane thet Guatam Buddha dekhil kase OBC hote yawar likhan kele) ha aapla paramamitra kasa kaay?

  ...आरक्षणाच्या रांगेत उच्चवर्णीयही मग का आहेत यावर आपण आपले विचार मांडले असते तर बरे झाले असते.
  Astilahi me tyache ajjibbat samrtha nahi karat ulat alsya uchchawarniyancha dhikkar aso.

  युरोपियन व अमेरिकन....
  Krushna warna ha janmatahach yeto Sonawni Saheb. Me Pragat deshatil aani aaplya deshatil magasawargiyanna milnarya aarakshanabaddal lihil hot. Tithe mulat jatiwyawastha aaplya itki tiwra nahich.

  ...सारेच समाजघटक जातीनिष्ठ महत्तेत अडकले आहेत...
  Manya karto aapla sagla samajach yaat gurfatla gelela aahe. Mahar dekhil manganna hinawtat hey dekhil satya aahe. Pan aaj jatichya nawakhali sawlati milawnyachi bhasha jevdi dalit samajakadun keli jaate tevdi itar kuthlyahi samajakdun keli jaat naahi.

  आणि मी तुम्हाला आव्हान देतो, ....
  Sonawni Saheb me kahi aaplya itka gahan dnyan aslela itihas sanshodhak naahi aani Dadoji kon hote ya faltu wadat mala shirayche dekhil nahi. Vishwas Patil aani Babasaheb Purandare yanchya sarkhya thor itihaskaranwar maza vishwas aahe. Tumchya kahi nishkarshanch thodas wishleshan karto. Tumchya mhannyanusar Dadoji Adilshahache subhedar hote. Tyanni ayushybhar tyachi chakri keli, tyanni ji kahi changli kame keli ti tyanchi kartawyech hoti. mhanun tyancha Shivarayanchya itihasashi thet asa kahi sambandha nahi. Ambedkari chalwalichech ghyache zaale tar Babasaheb Ambedkar sodle tar baki sagle nete mukhya prawahatil rajakiya pakshanshi satelote bandhun aahet. mag yawarun asa nishkarsh kadhyaycha ka ki Ramdas Aathawle, Prakash Ambedkar aani Namdev Dhasalansarkhya lokancha Ambedkar chalwalishi kahi sambandha naahi? Khara sangaycha zaal tar dadoji kon hote Brahman hote ka khatriya hote yaat mala interest hi nahi aani nawhta dekhil. Joparyanta daojincha puatlyawarun waad nirman nahi zala towar mala aani mazyasarkhya anek lokanna tyanchi jaat paat mahit dekhil nawhti. Tumchyach sarkhya swatahala itihas sanshodhak mhanawnarya kahi lokanmule Dadoji wa James Lane sarkhi manse prakashzotat aali. Tyamule Dadojinche kharokhar udattikrana zaale aslyas tyas aaplyasarkhich lok jast jawabdar aahet.

  Ek Sachcha Bharatiya

  ReplyDelete
 8. मला वाटते चर्चा भरकटत चालली आहे. क्रुपया लेख नीट वाचावा. या लेखाबाबत मराठा आणि काही ब्राह्मण बांधवांना संताप आला आहे असे स्पष्ट दिसते आहे. याचे उत्तर त्यांच्याच अलिखित युतीत आहे. मी पुन्हा एकदा खाली काही मुद्दे स्पष्ट करतो:

  १. ब्राह्मण आणि मराठेतर महापुरुषांबद्दल लिहिणे याला जे जातीयवाद समजतात त्यांनी आपले डोके तपासुन पहावे. मराठा आणि ब्राह्मणेतरांत कोणी महान झाला नाही या भ्रमातुन बाहेर यावे. मी या दोन्ही समाजांव्यतिरिक्तच्या ख-या संस्क्रुती घदवणा-या महनीयांची यादीच लवकर प्रसिद्ध करत आहे. उगा व्यर्थ जातीउच्चअभिमानात राहु नका.

  २. उघडपणे ब्राह्मणांना शिव्या देनारे, प्रुथ्वी नि:ब्राह्मण करा म्हणनारे राजकारणासाठी म्हणुन ब्राह्मणांशीच साटेलोटे करतात त्या प्रव्रुत्तीशी विरोध आहे. ब्राह्मणांनी कोणत्याही पक्षाची तिकिटे मिळवावीत, निवडनुका लढवाव्यात...निवडुनही यावे...त्याला लोकशाहीत विरोध असण्याचे कारणच नाही पण हा उभयपक्षी अप्पलपोट्टॆपणा आहे आणि तो इतरांना कधीच कळणार नाही या भ्रमात राहु नका.

  ३. हिंदुत्ववादी दहशतवादी संघटनांनी अनेक दहशतवादी क्रुत्त्यांत (उदा. समझौता एक्स्प्रेस कांड) आय एस आयची मदत घेतलेली आहे आणि अन्य कारनाम्यांत मोसादची घ्यायच्या तयारीत होते. त्यांनी आम्हाला हिंदु धर्ममहती सांगण्याच्या फंदात पडु नये. मुस्लिम दहशतवाद ही रा.स्व. संघाच्या कारवायांची अपरिहार्य परिनती आहे. या पापाची फळे सारा नि:ष्पाप समाज भोगतो आहे. सांस्क्रुतिक दहशतवाद तर पराकोटीच्या टोकाला जावु पहात आहे. याची उत्तरे कोण देनार?

  ४. मराठ्यांचे हितच व्हावे अशी माझी भुमिका आहे. तरुण वर्ग आज अत्यंत नैराश्यातुन जात आहे. सत्ताकारणात सर्वच मराठे कितीही प्रयत्न केला तरी सामावले जावु शकत नाहीत. तरीही एकुनातील १०% लोकसंख्येतील ३% मराठे हे सत्तेत आहेत असे श्रीमंत कोकाटे यांनीच नुकतेच दै. सकाळमद्धे लिहिले आहे. म्हनजेच मराठा समाज ३०% या एकुण आपल्या संख्येच्या प्रमानात सत्तेत आहे. एकुण लोकसंख्या पाहिली तर त्या प्रमानात मराठ्यांच्या हाती किमान ७०% सत्ताकेंद्रे आहेत. असे असुनही मराठा समाजाचे हित ते का करु शकले नाहेत हा प्रश्न मी नव्हे तर मराठा बांधवांनीच आपल्या नेत्यांना विचारला पाहिजे. टक्केवारी थोडीफार मागेपुढे होवु शकते...पण अर्थ एकच उरतो.

  ५. मराठा संघटनांचा ब्राह्मणद्वेष हा एक बुरखा आहे...तरुण वर्ग केवळ भावनिक लाटांवर वाहवत नेला जातो आहे. तरुणांनी आत्मचिंतन करत आपल्या विकासाच्या वाटा स्वत:च शोधल्या पाहिजेत नाहीतर हे नेते त्यांचेही बळी घ्यायला कमी करणार नाहीत हा माझ्या लेखाचा एक मतितार्थ आहे.

  ६. सत्ताकारण जेंव्हा सर्वव्यापक, सर्वसमावेशक होते तेंव्हाच त्याला लोकशाही म्हणतात, परंतु सध्या लोकशाही अस्तित्वातच नसुन नवसरंजामदारशाही अवतरलेली आहे. त्याला आपल्याकडे उत्तर नसेल तर सर्वांनाच नव्य गुलामीत जावे लागनार आहे. बाबासाहेब म्हणाले होते...गुलामी येणार पण तिचे स्वरुप वेगळे असेल. ती येतच आहे. तिचे स्वागत करायचे कि विरोध हे सर्वच समाजाला समजायला हवे.

  ७. आम्ही बहुजन या नवसरंजामशाहीचा निषेध करतो. भारताला पुन्हा मध्ययुगात रेटण्याचा डाव यशस्वी होनार नाही....याची खात्री बाळगा. कोणतीही एक जात वर्चस्ववादाचा प्रयत्न करत लोकशाहीचा गळा दाबायचा, लोकांना धादांत असत्य सांगत सांस्क्रुतीक दहशतवाद मांडायचा प्रयत्न करेल तर त्यालाही तेवढाच प्रतिरोध होईल याची खात्री बाळगा.

  या चर्चेत मुळ लिखानाला बगल देत जे वर्चस्ववादी मुद्दे मांडले गेले म्हणुन हे उत्तर.

  धन्यवाद.

  ReplyDelete
 9. सर, मागच्या चर्चेत ’दादोजी कोंडदेव ऊर्फ दादापंत हे शिवाजी महाराजांचे शिक्षक होते’ हे सिद्ध होत असताही तुम्ही ते मान्य केलेले नाही आणि येथे पुन्हा-
  "आणि मी तुम्हाला आव्हान देतो, दादोजी हे नेमके कोण होते हे तुम्हीच सिद्ध करुन दाखवा."
  असे एका प्रतिसादकालाच आव्हान दिलेले आहे.
  तेव्हा - "दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे शिक्षक नव्हते, पुणे सुपे परगण्यावर शहाजी महाराजांनी त्यांची कारभारी म्हणून नेमणूक केलेली नव्ह्ती, ते केवळ विजापूरचे सुभेदार होते, मावळ खोऱ्यावर त्यांचे अधिपत्य होते, मावळातील मलठण किंवा तत्सम गावाचे ते मूळ रहिवासी होते आणि शिवाजी महाराजांच्या बालपणी ते जिवंत होते" - इतके मान्य करावयास तुमची हरकत नसावी. हेही नसे थोडके. प्रत्येकाचे मत कधी काय असावे यावर फक्त त्याचाच हक्क असतो. मते कालौघात बदलतात. असो.

  आता आपण मूळ चर्चेकडे वळू. श्री. बालाजी जाधव यांची (सध्याची) मते त्यांनी आपल्या पुस्तकात मांडलेली आहेत आणि त्यांची भूमिका ब्राह्मणविरोधी आहे हे तर स्पष्टच आहे. त्यामुळे सम्यक मार्गापासून ते ढळलेले आहेतच. याचे कारण सद्यपरिस्थितीत झालेली मराठा समाजाची परवड हे आहे. एकीकडे भूमीपुत्र, बळीराजा, लाखांचा पोशिंदा शेतकरी ही पिढ्यानपिढ्यांची परंपरा आणि दुसरीकडे झपाट्याने होणाया आर्थिक उदारीकरणात मागे पडत असल्याची भावना. एकीकडे इतर नोकरपेशा समाजाची होत असलेली आर्थिक प्रगती आणि प्रचंड कष्ट उपसूनही आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणारा स्वजातीय शेतकरी. एकीकडे जातीय आरक्षणात ’मराठा-क्षत्रिय’ या अभिमानामुळे पुढारलेल्या जातीचा दर्जा तर दुसरीकडे आरक्षण मागावे तर ’कुणबी’ म्हणवून घेण्याची नामुष्की. एकीकडे आपल्याच जातीच्या आधारावर अधिकाधिक श्रीमंत होत चाललेले पुढारी तर दुसरीकडे गावागावात मागे पडत चाललेल्या समाजाचे दृष्य. या साऱ्यांचा परिपाक म्हणून जो असंतोष मराठा जातीत खदखदत आहे त्याचा स्फोट विद्रोहात होऊ नये म्हणून राज्यकर्त्यांनी त्या असंतोषाला इतर जातींकडे वळवलेले आहे. चर्चेत असलेले पुस्तक हे अशाच भरकटलेल्या असंतोषाचे वैचारीक प्रतीक आहे. या विचारांचे लोक एकीकडे तथाकथित वरच्या जातींनी आपल्यावर अन्याय केला म्हणून टाहो फोडतात तर दुसरीकडे तथाकथित खालच्या जातींनी आरक्षणाच्या मार्गाने आमच्या प्रगतीला खीळ घातली असा आरोप करतात. मुळात त्यांनी स्वत:च्या पायाखाली काय जळत आहे ते पाहिले पाहिजे.
  संघर्ष करायचाच तर तो कोणाविरुद्ध करायचा हे त्यांनी ठरवले पाहिजे. इतर जातींवर हल्ले करून काय साध्य होईल? सत्तेत तर त्यांचेच नेते असतात. मग आजपर्यंत (गेल्या साठ वर्षात) त्यांची परिस्थिती का खालवते आहे? त्याला ब्राह्मण कसे जबाबदार आहेत? त्याला दलित कसे जबाबदार आहेत? खेडोपाड्यात पाहिले तर असंख्य ब्राह्मण कुटुंबांनी शहरात कायमचे स्थलांतर/पलायन केलेले आहे. अनेक दलित कुटुंबे मध्यमवर्गीय बनून शहरात गेलेली आहेत. मग या वाईट परिस्थितीचे खरे जबाबदार कोण? याचा त्यांनी विचार केला पाहिजे. त्यांचे प्रश्न सामाजिक नसून आर्थिक आहेत आणि सत्तेतल्या पुढाऱ्यांच्या निर्णयामुळेच त्यांच्यावर आजची परिस्थिती ओढावलेली आहे हे निखळ सत्य आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. व्हिक्टरजी, तुमचे अजबच तर्कट आहे. शिवाजी महाराजांच्या बालपणी दादोजी हयात होते म्हणुत ते शिक्षक...वा! अहो १६३६ पर्यंत शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते शिवनेरीवर. गोमाजी नाईक पानसंबळ यांनी त्यांच्या शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. १६३६ ते १६४२ शिवाजी महाराज बिजापुर येथे होते. पुढील शिक्षण तेथे झाले. पुण्याला पाठवतांना शहाजी महाराजांनी त्यांना राजमुद्रा दिली, हत्ती-घोड्यांचा सरंजाम दिला व खजिनाही दिला... तसेच त्यांच्या नांवावर असलेल्या जहागिरीचा मोकासा शिवाजी महाराजांना क्रमशा १६४२ ते १६४५ पर्यंत दिला. त्याच्या अदिलशहाच्या मान्यतेच्या सनदा उपलब्ध आहेत, त्या जरा डोळ्याखालुन घाला. तरीही तुम्ही पुन्हा पुन्हा दादोजी आलाप करत आहात हे नवलच आहे. मी दादोजी शिवाजी महाराजांचे शिक्षक होते हे कोठेही म्हटलेले नाही वा ते सिद्ध होण्याचा संभव नाही. सुभेदार आपला काम-धंदा सोडुन शिकवण्या घेत बसला होता कि काय? दादोजी सुभेदार नव्हते हे सिद्ध करुन दाखवा नाहीतर ते कोण होते हे तरी सिद्ध करुन दाखवा अन्यथा मी देत असलेली माहिती सत्य आहे हे धरुन पुढे चला असेच मी म्हटले आहे. दादोजी शिक्षक होते हे कधी आणि कोणी सिद्ध केले? एनकेन प्रकारेन दादोजींना का उगा शिक्षक बनवुन त्यांचे अवमुल्यन करता? बिजापुरी अनेक ब्राह्मण पंडितांच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण झाले हे वास्तवच आहे...पण त्यांची नांवे शोधा ना!

   डा बालाजी जाधव यांच्याबाबत जी मते आपण व्यक्त केली आहेत त्याबद्दल मी सहमत आहे. मराठा तरुणांनी स्वबळावर प्रगती केलीच पाहिजे. ब्राह्मण आणि आरक्षण-लाभार्थींचे शत्रुत्व करुन त्यांचे हित होणार नाही. राजसत्तेतील मराठा वा इतरही मंडली सत्तेची समीकरणे सांभाळण्यासाठे लाजीरवाण्या तदजोडी करतात. खुद्द महार समाजातील नेते समाजाची नव्हे तर आपलीच पदे टिकवण्यासाठी अश्लाघ्य धडपड करतात. समाजहितासाठी त्यांनी काय केले आहे हा यक्षप्रश्नच आहे. याचा विचार तरुणांनी करणे भाग आहे व प्रगतीच्या नव्या दिशा शोधल्याच पाहिजेत. आपला क्रोध व संताप हा सर्जनात्मक दिशेकडे वळवला पाहिजे. यासाठी आपण सर्वच काय करु शकतो हेही पहायला हवे. जोवर वास्तव लक्षात येत नाही तोवर मनुष्यप्राणी हा भ्रामक मायाजालात गुरफटुन बसतो. परंतु त्यातुन जी अवस्था निर्माण होते ती ठिकाणावर आनायला अनेक पिढ्यांचा बळी जातो. कटु बोलणे हे कधी कधी गरजेचे असते. कारण त्यातुनच काही झाली तर जाग्रुती घडेल. धन्यवाद.

   Delete
  2. सोनवणी सर, तुम्हाला माझे या पुस्तकाबद्दलचे मत ग्राह्य वाटले हे वाचून समाधान झाले. सर्व जाती-पाती आणि धर्मप्रणाली यांची मोडतोड करून नवे अभ्युदयवादी तत्वज्ञान अंगिकारले पाहिजे हे तुमचे आदर्श मत तर मलाच काय पण कुणाही विचारशील व्यक्तीला पूर्णपणे पटेल असेच आहे.
   धन्यवाद.


   पण दादोजी कोंडदेवांबद्दलचे माझे मत हे अजब तर्कट नाही.

   Delete
  3. पण दादोजी कोंडदेवांबद्दलचे माझे मत हे अजब तर्कट नाही.

   ज्या गोमाजी नाईक पानसंबळांचा उल्लेख आपण केला आहे ते जिजाबाईंच्या शहाजीराजांशी झालेल्या लग्नात जिजाबाईंच्या माहेरावरून (लखुजी जाधवांकडून) आलेले एक जिजाबाईंचे अंगरक्षक (एस्कॉर्ट) होते. त्यांनी शिवाजी महाराजांना साथ दिली. म्हणून त्यांना शिवाजी महाराजांनी हवालदार पदावर बढती दिली. त्यांनी शिवाजी महाराजांना तलवारबाजी शिकवली असेल असे म्हणता येईल. त्यांनी शिवाजी महाराजांना पठाणांची भरती आपल्या सैन्यात करण्यास राजी केले हेही महत्त्वाचे आहेच. हा उल्लेख काही ठिकाणी मिळतो.(डफ आणि सरकार या दोघांनीही तर त्यांचा उल्लेखही केलेला नाही.) त्यामुळे शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करणार्‍यांमध्ये तेही होते हे मान्य केलेच पाहिजे. परंतु दादोजी कोंडदेवांनी शिवाजी महाराजांना योग्य तर्‍हेने राज्य चालवण्याचे स्वतःच्या उदाहरणातून धडे दिले आणि त्यांचे योग्य पालन होईल याकडे लक्ष दिले हे त्यामुळे असिद्ध होत नाही.

   परंतु गोमाजी नाईक पानसंबळांबद्दल जास्तीत जास्त माहिती देणार्‍या इतिहासकारांनीही दादाजी कोंडदेवांबद्दल काय लिहीले आहे हे पाहिले पाहिजे. पानसंबळांबद्दल त्यांनी लिहिलेला इतिहास खरा पण दादजी कोंडदेवांबद्दल लिहिलेला तेवढा खोटा असे म्हणता येईल काय? (पहा : The education of Shivaji हे Life of Shivaji या केळुसकरांच्या / ताकाखावांच्या पुस्तकातील स्वतंत्र प्रकरण.)

   शिवाजी महाराहांच्या उत्तुंग भरारीमध्ये जिजाऊसाहेबांचे आणि शहाजी महाराजांचे मोठेपण तर आकाशाएवढे आहे.

   इतरत्र उल्लेख केल्याप्रमाणे दादाजी कोंडदेव यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला यावर लक्ष्य केंद्रित करण्याचा प्रयत्न झाला आहे. काही झाले तरी दादोजी कोंडदेव हे शहाजी महाराज आणि अदिलशाही या दोहोंनाही उत्तरदायी होते. शहाजी महाराजांना शिवाजी महाराजांच्या स्वतंत्र बाण्यामुळे वारंवार अडचणीत यावे लागे आणि अदिलशहाला उत्तरे द्यावी लागत. आतून शहाजीराजे शिवाजी राजांच्या स्वतंत्र बाण्याशी सहमत असले तरी वरवर तरी ते शिवाजी माझे ऐकत नाही असे भासवत असत. शिवाय अदिलशहाचे सुभेदार म्हणून थेट दादाजींवरही अदिलशहाकडून दबाव होता. अशा दुहेरी कात्रीत सापडलेले पालक दादाजी तरूण शिवाजीला 'आत्मघातकी साहसापासून परावृत्त करणारे' उघड सल्ले देण्यावाचून अन्य काय करू शकत होते? परंतु आतून त्यांनाही एक स्वतंत्र राज्य निर्माण व्हावे असे वाटत होते हे दादाजी नरसप्रभू देशपांडे कुलकर्णी यांना स्वतः शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रामुळे सिद्ध होते. या पत्राचा आधार राजश्री श्री 'दादापंत' हा एकच शब्द आहे अणि हे दादापंत म्हणजे दादोजी कोंडदेव नव्हेतच असे मानले तरी दादोजींनी आपल्या मृत्यूसमयी महाराजांचा हात आपल्या हातात घेऊन जे बोलणे केले त्यात त्यांना 'आपण स्वतंत्रपणानेच वागावे' असा सल्ला दिला हे नाकारता येत नाही. ..he is said to have exhorted Shivaji to look after his family and dependents and to have expressed a cordial wish for his happiness and glory and
   the fulfilment of his noble vow to inaugurate a new state, for the protection of cows and Brahmans and the higher glory of his religion. With these words on his lips, the loyal Dadaji Kondadev expired. He was seventy years old at his death.
   मृत्यूसमयी दिलेली जबानी आजचे कोर्टही मान्य करते.

   सभासद, चिटणीस, ग्रँट डफ, सरकार, कॅन्केड,राजवाडे, सरदेसाई, केळुसकर (ताकाखाव),कुरुंदकर यांच्या पुस्तकात दादाजी कोंडदेव यांचा उल्लेख करणारी स्पष्ट शब्दात दिलेली सर्व मराठी/इंग्रजी वाक्ये येथे देता येतील.
   यातील अनेकांना समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली हे मान्य नाही. ते त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. परंतु यातील एकानेही दादाजी कोंडदेव (ज्यांचा उल्लेख दादोजी, दादापंत असाही होतो) यांनी बाल आणि पौगंडावस्थेतील शिवाजीच्या गार्डियनची (पालकाची) भूमिका निभावली नाही असे सिद्ध केलेले नाही. उलट त्यांनी शिवाजी महाराजांचे शिक्षण केले/करवले असेच सर्वजण म्हणतात. याबाबत कोणाचेही दुमत नाही.
   तेव्हा दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे बालपणातील पालनकर्ता/शैक्षणिक मार्गदर्शक होते हे गेल्या काही शतकातील दिग्गज इतिहासकारांनी अगोदरच सिद्ध केलेले आहे. आमच्यासारखे सोमेगोमे तसे वेगळे काय सिद्ध करणार?

   ही सिद्धता नाकारणारे काही नवे आणि स्पष्ट पुरावे असतील तर ते देऊन सोनवणी सरांनी त्यांच्या वाचकांना उपकृत करावे ही प्रामाणिक आणि नम्र विनंती.

   Delete
  4. Perfect Victor.......!!!

   Delete
 10. Manya aahe ki charcha mul lekhanala dharun bharkatli aahe. pan tumhi lihilel spashtikaran me upasthit kelelya muddyanna(e.g. arakshanabaddal tumch mat, ambedkari chalwaitlya netyan baddalcha prashna, mahar manganmadhil jatibhed) bagal deun soyiskar ritya lihilya sarkhe watte. aapl te baabl aani dusryach te kart. mhanje tumhi lihilat tar samatawaad aani bakichyanni tyawar tika keli tar to warchaswaad. ya muddynawar adhik thalak wa spasht likhan aaplyakadun zalyas aanad hoil.

  ReplyDelete
  Replies
  1. सच्चा भारतीय, आरक्षणाबद्दलची माझी मते याच ब्लोगवर आहेत, त्यामुळे मी त्यांची पुनराव्रुत्ती करत नाही. तुम्ही सामाजिक या लेबलखाली शोध घेतला तर तुम्हाला माझी वेळोअवळची मते सापडतील.

   आंबेडकरी नेत्यांबद्दलची माझी मते वाचण्यासाठी तुम्हाला माझे "महार कोण होते?" हे पुस्तक वाचायचे कष्ट घ्यावे लागतील...परंतु याबाबत एक लेख या ब्लोगवर आहे, तोही तुम्हाला वाचता येईल.

   राहिला प्रश्न महार-मांगांतील संघर्षाचा तर त्यासाठी तुम्हाला माझी "...आणि पानिपत" ही कादंबरी वाचावी लागेल. पण मग देशस्थ, क-हाडे, व-हाडे आणि चित्पावन्यांमधील (त्यातही ऋग्वेदी/सामवेदी/अथर्वनादि) संघर्षाचे काय? संघर्ष प्रत्त्येक जाती-जातींत...अगदी पोटजातींतही आहे...हे वास्तव आहे. ते तर बदलायचा प्रयत्न करायला हवा कि नको? फक्त महार-मांगांबद्दल प्रश्न उपस्थित करुन पाहिला तर तेच वास्तव अन्य जातीघटकांनाही लागु पडते. उदा. मराठा विवाहासाठी शहाणाव कुळी शोधनार आणि निवडनुकीला मात्र कुणब्याचे सर्टिफिकेट घेवुन येणार. पण ख-या कुनब्याला बरोबरीचा माननार नाही. हेच वास्तव ब्राह्मण जाती-पोटजातींतही आहे. हा वर्चस्वतावाद कोनत्या ना कोनत्या पातळीवर अस्तित्वात आहे आणि हेच भिषण समाजद्रोही वास्तव आहे. प्रत्त्येक जाती-पोटजातींची स्वतंत्र सम्मेलने (पार साहित्य सम्मेलनेही...) भरतात हे वास्तव नाही काय? हे थांबवायचे असेल तर प्रथम प्रत्येक समाजातील मानसांच्या मनात जो अंतर्विरोध आहे त्यावरच टीका करत जाग्रुत करायला हवे.

   Delete
 11. Barobar aahe Sonawni Saheb. Jatiya warchaswawad ha saglyach jati dharmat wa deshant aahe. mhanunach mhantle hote me ki warchaswawad (mag to samajik aso, rajakiya aso, arthik aso, bauddhik aso wa warniya aso) manawi swabhaw aahe tyasathi kewal uchchawarniyannach doshi ka tharwa.

  Lekh wachnayche salle denyapeksha tumchi aarakshanabaddalchi spashta mate (mulat jar ti spasht astil tar) kaay aahet hey thodkyat lihile astet tar bare zaale aste.

  Tumchya baryach lekhat uchchawarniyanche ukhale pakhale kadhnyat tumhi dhanyata dakhawlit. Pan mag tumhala jya jaticha sarth abhiman aahe ti Mahar jaat Manganna ka hinawte yawar aapan kadhi likhan kelet ka? Dusrya lokanna dosh denyapeksha swajatiyanna kahi 4 bol sunawlet tar te jast changle hoil.

  ReplyDelete
 12. @ संजयजी & All comment writers :आर्थिक साम्राज्य वादाच्या युगात जातीपातीच्या चर्चा कसल्या करताय? सोडा राव आता सगळे!! याने काय साध्य आणि सिद्ध करायचे आहे ते समजत नाही मला? कृपया अश्या पुस्तकांचे आणि त्यावरील विश्लेषणाचे प्रयोजन काय ते मला समजून सांगता काय?

  ReplyDelete
 13. @संजयजी:
  "मुस्लिम दहशतवाद ही रा.स्व. संघाच्या कारवायांची अपरिहार्य परिनती आहे"
  - या वाक्या बद्दल माझा तीव्र आक्षेप आहे
  - मुस्लीम मुलतत्ववाद हा वसाहतवादी सत्तांकडून मुस्लीम सत्ताचा झालेला पराभव आणि मुस्लिमांवर झालेल्या अन्यायाचा परिपाक आहे अर्थात त्यात मुस्लीम हुकुमशहांच्या स्वार्थाची पूड हि आहेच!
  - भारतात मुस्लीम मुलतत्ववाद वहाबी चळवळ आणि खिलापात चळवळी पर्यंत मागे जातो(अर्थात औरंगजेबाचे "दारूल इस्लाम" चे स्वप्न आणि हिंदुद्वेष यापर्यंत हे मागे जाऊ शकते पण नंतरच्या काळात तो तेवढा धारदार नव्हता, पण मनातला संशय कधी मिटला नाही)
  - राष्ट्रीय सभेचे हिंदू बहुसंख्य स्वरूप आणि तिच्या नेत्यांचे हिंदू म्हणजेच भारत असे संकुचित विचारही यास जबाबदार आहेत.
  - या परिस्थितीचा ब्रिटीशांनी अचूक उपयोग करत त्यास खतपाणी घातले.

  - मुस्लीम समाजचे अशिक्षित असणे आणि त्यांच्या काही मुठ्भर शिक्षित नेते आणि लोभी नाबाबांच्या पुढाकारातून १९०६ मध्ये मुस्लीम लीग ची स्थापना झाली.
  - त्यांच्या आक्रमक मुलतत्ववादाची प्रतिक्रिया म्हणून १९२५ ला रा स्व स ची स्थापना झाली.
  - लीग च्या हटवादी भूमिकेने पाक ची निर्मिती झाली आणि त्याच पाक पुरस्कृत दहशत वादाची फळे आपण आता भोगतो आहोत. तो RSS तयार केला नव्हता.
  - हे मान्य कि आजकाल सिमी उर्फ इंडियन मुजाहिदीन च्या वाढत्या कारवायांना संघाचे ८०-९० च्या दशकातील आक्रमक हिंदुत्ववादहि "काही" प्रमाणात जबाबदार आहे. पण त्या आक्रमक हिंदुत्ववादाला जनसमर्थन मिळण्याला मुस्लीम मुलतत्ववाद, त्यांचा हिंदुना असलेला तीव्र विरोध (काश्मिरी पंडित, त्यापैकी काहीची असलेली राष्ट्रद्रोही भूमिका कारणीभूत आहे.
  - हा सगळा मामला, एक संघटना जि आता बरीच शक्तीहीन झाली असून विश्वासर्ह राहिली नाही तिच्यावर संपूर्ण ढकलणे चुकीचे आहे.

  ReplyDelete
 14. रा स्व संघ मोसाद ची मदत घेण्याच्या तयारीत होती असे तुम्ही म्हणता ते कशावरून? मोसाद हि इझरायली गुप्तचर संघटना आहे हे ठाऊक आहे ना तुम्हाला? आणि ठाऊक असेल तर हेही तुम्हाला ठाऊक असेल कि ती कट्टर ज्यू धार्जिणी संघटना आहे! भारतात घातपात घडवून आणायला RSS ला मदत करण्यामागे मला तरी त्यांचा कोणताच उद्देश दिसत नाही. तुम्हाला तो दिसत असला तर तो सांगावा, असे उगाच उद्वेगाने काहीही लिहू नका. तसे कुठल्याही तपास संस्थेने सिद्ध केले आहे हे मला तरी माहित नाही. आणि रा स्व संघासारख्या हिंदू अतिरेकी संघटनेने आय एस आय ची मदत घेतली असे तुम्ही कशाच्या आधारे म्हणत आहात. मालेगाव स्फोट आणि समझोता स्फोटात वापरलेले डेटोनेटर आपल्याच दारूगोळा कारखान्यातील होते. हे तपासात सिद्ध झालेले आहे आणि स्फोटात वापरलेले अमोनियम नायट्रेट, आपल्या इथे अजूनही सहज अगदी खतांमध्ये उपलब्ध होते व ते शुद्ध करून सहज weapon grade बनवता येते. एकीव बातम्यावर लिहू नका . आणि गद्दारांचे म्हणाल तर ते सगळीकडे आहेत अगदी परराष्ट्र मंत्रालयातील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला गुप्त माहिती ISI पुरवल्याबद्दल अटक केली आहे. नक्षलवादी आणि पूर्वोत्तर राज्यातील फुटीरवादी, पंजाबातील खलिस्तानवादी, हेही आय एस आय कडूनच मदत मिळवतात.

  ReplyDelete
  Replies
  1. बाबरी मशीदीच्या पतनापुर्वी भारतात हिंदु-मुस्लिम दंगे होत असत, परंतु पुर्वनियोजित दहशतवादी कारवाया मात्र बाबरी मशीद पाडल्यानंतर सुरु झाल्या. दंगली आणि दहशतवाद यातील फरक समजावुन घेणे आवश्यक आहे. आरेसेस-भाजपने ते कृत्यच केले नसते तर?
   राहिले या पुस्तकावर मी का लिहिले? अशी शेकडो पुस्तके लाखोंच्या संख्येत महाराष्ट्रात वितरीत होत असतात. त्यातील विखार तुम्हाला माहित नाही. त्यातुन होत असनारे दुष्परिनामही माहित नाहीत असे दिसते. पडद्याआड काय चालले आहे हे दर्शवणे महत्वाचेच आहे.

   Delete
  2. KIndly refer to Col./ Purohit's statement regarding MOSAD.

   Delete
 15. Namaskar,

  Mi Hrishi mi brahman ahe... mala kadhihi kuthalyahi jaticha problem zala nahi... maze maratha samajatil mitra ahet kadhihi mala vegalepana janavala nahi... maza ghari yetat mi jato amhi ekatara jevato... iataka bramhaadvesh ka kela jato... apan he ka visarto apala dharma ek ahe...

  ReplyDelete
 16. //तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन झाले नसुन त्यांची हत्त्या झाली असे डा. जाधव म्हणतात आणि ते तार्किकद्रुष्ट्या बरोबरही आहे. किंबहुना मी एकमेव चित्रकार आहे ज्याने तुकारामांच्या खुनाचे चित्र काढले आहे. //

  संजयजी, तुमच्या ह्या लिखाणावरुन असे दिसते की तुम्ही नास्तिक आहात.जरा विषय सोडुन बोलत आहे पण दक्षिण भारता मध्ये मंत्रालय नावाचे एक ठिकाण आहे.तेथे राघवेंद्र स्वामींची समाधी आहे.ह्यांनी १६७१ रोजी जिवंत समाधी घेतली होती.१९ व्या शतकात एका इंग्रज माणसाला मठाच्या सोयी सुविधां साठी लागणारा पैसा खराच योग्य आहे का हे पाहण्या साठी पाठविण्यात आले होते.तर तेथे त्यांच्या समाधीतुन साक्षात स्वामी प्रकट होऊन त्यांनी मठाची व्यवस्था त्या इंग्रजाला सांगितली.ही खबर १९व्या शतकातल्या The Hindu ह्या पत्राला स्वत: त्या इंग्रजाने सांगितली.
  सांगण्याचा उद्देश असा की जर असे होऊ शकते तर तुकाराम महाराज वैकुंठाला का नाही जाऊ शकत?

  ReplyDelete
 17. संजय सर,
  मी सर्व संतांचा पूर्ण आदर राखत सांगू इच्छितो ,
  श्री राघवेन्द्रस्वामी यांची पत्नी सरस्वती हिने जन्मभर एकवस्त्र वापरले - अत्यंत गरिबीमुळे - आणि कधीही तक्रार केली नाही -
  राघवेन्द्रस्वमिनी सन्यास घेतला त्यावेळेस तिची एकच इच्छा होती की एकदा पतीचे संन्यासी होण्यापूर्वीचे
  मुखदर्शन घ्यावे .पण ते शक्य न झाल्यामुळे तिने विहिरीत जीव देत आत्महत्या केली,
  त्यावेळेस मठात संन्यास विधी चालू होता आणि स्वामिना ती तिथे भूतयोनीत भेटली आणि त्यांनी तिचा पाणी शिंपडून मोक्षाचा मार्ग खुला केला .

  हा सर्व श्रद्धेचा भाग आहे !
  यात अंधश्रद्धा आणि श्रद्धा याचे तारतम्य बाळगले पाहिजे !

  लग्न झालेल्याचे कर्तव्य काय ? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. - नाही का ?
  संत तुकारामांच्या बाबतहि तेच म्हणता येते !ब्राह्मणी वर्चस्वाने त्यांचा बळी घेतला हे अगदी खरे आहे !
  आणि त्यांनी गाथा इंद्रायणीत विसर्जन केली हे पण सत्य आहे पण ती तरंगत वर आली हे खोटे आहे .
  आपण असा विचार केला की त्यांचे अभंग लोकांच्या इतके तोंडात बसले होते की मूळ संहिता जरी गंगार्पण झाली तरी
  घरोघरी त्यांचे अभंग अजरामर झाले होते . त्यांचे लिखित बाड नसले तरी त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही -
  उलट गाथा नदीत बुडवणाऱ्या ब्राह्मणांचा पराभव झाला -
  संत तुकारामाना जे सांगायचे होते ते कधीच जनतेच्या तोंडपाठ झाले असल्याने क्रुद्ध झालेल्या ब्राह्मणांनी त्यांची हत्या केली -
  दुसरी एक गोष्ट -

  छत्रपति शिवाजी महाराजाना भवानीमातेने भवानी तलवार दिली हे म्हणणे जसे अत्यंत मूर्खपणाचे आहे तसेच
  संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले हे म्हणणे म्हणजे उच्च जातीयांनी स्वतःचे पाप लपवण्यासारखे आहे. संत तुकारामांचा काळ आणि श्री राघवेंद्र स्वामी यांचा काळ
  साधारण एक धरला तर इतर तुलना काय करता येईल ?

  इंग्रज ह्या देशात घुसायला बघत होते . युरोपात नवे नवे शोध लागत होते -
  युरोपीय देश मोठमोठी जहाजे बांधत होते , आरमार उभारत होते -नवे मार्ग शोधत होते.
  भारतीय जनता भौतिक जगात मुघलांकडून सणसणीत पराभूत झाली असल्याने एका विचित्र न्यूनगंडात होती -
  त्यात हे अंतिम सत्य शोधण्याचे वारे वहात होते . ते या पराभवामुळेच !

  ReplyDelete
 18. sahjay sir mala tumchyashi contact sadhaycha ahe me kasa sadhu? mala ek imp muddyavar tumchyashi charcha karaychi ahe............pls

  ReplyDelete