Monday, February 6, 2012

दादोजी कोंडदेव...पुन्हा-पुन्हा...निरर्थक!

गजानन भास्कर मेहंदळे यांनी म.टा. ला दिलेल्या मुलाखतीत दादोजी कोंडदेवांची भलावन करणारी व त्यांचा पुतळा उखडण्याबद्दलचा रोष व्यक्त करणारी काही विधाने प्रसिद्ध झाली होती. खरे तर हा प्रकार म्हनजे शिळ्या कढीला उत आनण्याचा प्रकार होता. त्याचा प्रतिरोध म्हणुन मी खालील व्यापक भुमिका मांडली होती जी म.टा. ने प्रसिद्ध केली. ती अशी...इतिहाससंशोधन विश्वसनीय कसे होणार?
1 Jan 2012, 0000 hrs IST

संजय सोनवणी

इतिहास हा मानवी मनावर प्रभाव गाजवणारा फार महत्त्वाचा घटक असतो. इतिहास हा कसा सांगितला गेला आहे, यावर समाजाचे त्याबाबतचे आकलन अवलंबून असले तरी सामान्य माणसांवर प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासापेक्षा वदंतांचा अधिक प्रभाव असतो. इतिहास हा जेत्यांचा वा समाजवर्चस्ववादी घटकांच्या वा वर्चस्ववादी होवू पाहणाऱ्यांच्या मानसिक तुष्टीकरणासाठी लिहिला जात असल्याने तो तटस्थ व निरपेक्ष असतोच असे नाही. दुसरे असे की, इतिहासकार हासुद्धा एक मनुष्यच असल्याने त्याच्या लेखनावर त्याच्या समजुती, पूर्वग्रह आणि त्यानुरुप असलेल्या त्याच्या व्यक्तिगत आकलनाचा प्रभाव पडत असतो. अनेकदा एकाच पुराव्याचे आकलन/विश्लेषण इतिहासकारपरत्वे बदलत असते. या नियमाला अपवाद नसतात असे नाही. परंतु मग त्यांनाही त्यांच्या नव्या संशोधनामुळे सामाजिक पूर्वग्रहांना, रुढ समजुतींना धक्का बसत असल्याने लोकांच्या रोषाला तांेड द्यावे लागते आणि त्यातून जी वादळे निर्माण होतात त्यामुळे पूर्वग्रहविरहित, संपूर्ण ज्ञान-चिकित्सात्मक इतिहाससंशोधनास खीळ बसते.

खरे तर सातत्याने इतिहास संशोधने यासाठीच व्हायला हवीत की कोणावरही अकारण अन्याय होऊ नये, तसेच कोणाचे अकारण उदात्तीकरण झाले असेल तर तेही लोकांसमोर यावे. पण मूळ इतिहास हा वर्चस्ववादी भूमिकेतून लिहिला गेला असल्याने, कोणाचे उदात्तीकरण करायचे, कोणाला बदनाम करून ठेवायचे आणि कोणाला गडप करून टाकायचे ही एकाअर्थाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणत त्याप्रमाणे 'इतिहासविघातक प्रवृत्ती' होती आणि आजही ती शेष असावी हे एक महाराष्ट्राचे दुदैर्र्व आहे.

शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आणला जात असताना, ज्येष्ठ-श्रेष्ठ आणि रात्रंदिवस राबून अनमोल कार्य केलेले संशोधकही दुदैर्र्वाने या इतिहासविघातक दृष्टीपासून मुक्त राहिले नाहीत. खरेतर आज इतिहास अधिकाधिक नि:पक्षपाती होत जाण्याची गरज आहे. परंतु अशा उज्ज्वल इतिहासात आपल्याही जातीघटकाचे वर्चस्व कोणत्या ना कोणत्या रूपात असले पाहिजे, या भावनेतून प्रत्यक्षाप्रत्यक्षरित्या संत रामदास आणि दादोजी कांेडदेवांबाबतचे समज गतशतकापासून जोपासले जात आहेत. दादोजी हे बालपणीचे गुरु तर रामदास हे मोठेपणीचे गुरु अशी ही मांडणी आहे. ते खरे असते आणि निविर्वाद पुराव्यांनी सिद्ध झाले असते तर ते मान्य करायलाही कोणाचीही हरकत नव्हती. पूवीर् न. र. फाटकांनी रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे सत्य खणखणीतपणे मांडले होते. पण अजूनही अनेक इतिहासकार वारंवार तिय्यम दर्जाच्या बनावट साधनांचा आधार घेत वारंवार शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करत असतात. ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहंदळे यांनी 'शिवाजी : हिज लाइफ अॅण्ड पिरियड' या नव्या चरित्रात्मक ग्रंथाच्या निमित्ताने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत (१७ डिसेंबर २०११), शिवाजी महाराजांचे कोणीच गुरु नव्हते असे म्हटले आहे. ते म्हणतात, 'शिवकालाविषयी जे अस्सल पुरावे आहेत त्यात कोठेही दादोजी कांेडदेव हे शिवरायांचे गुरु होते असे म्हटलेले नाही. तसा उल्लेखही कोठे सापडत नाही, हे मी ३० वर्षांपूवीर्च लिहून ठेवले आहे. परंतु त्याचबरोबर माझे असेही म्हणणे आहे की, दादोजी हे चांगले गृहस्थ असल्याची आणि त्यांच्या न्यायदानाविषयी शिफारस करणारी शिवाजी महाराजांची स्वत:ची चार पत्रे उपलब्ध आहेत. म्हणजे तो माणूस नालायक तर नव्हता? शिवाजीराजे किंवा शहाजीराजे यांनी जी कामगिरी सोपवली ती सुविहितपणे पार पाडली होती. मग इतिहासात होऊन गेलेल्या त्या व्यक्तीसाठी एवढा गहजब का?'

इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे मात्र जवळपास तीच इतिहासाची साधने वापरत दादोजी कांेडदेव हे शिवाजी महाराजांचे शिक्षक होते, दादोजींबद्दल शिवाजी महाराजांना पराकोटीचा आदर होता व दादोजींच्या निधनानंतर त्यांना खूप शोक झाला, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.

दादोजी हे आजीवन आदिलशहाचे कांेडाणा व दौंड प्रांताचे सुभेदार होते. या सुभेदारीच्या प्रदेशातच शहाजी महाराजांची पुणे व ३६ गावांची जहागिरी होती. दादोजी जे वतन/जमीनींच्या वादांबाबत निवाडे करत ते आदिलशहाचा सुभेदार या नात्याने, त्याच्या सुभेदारीच्या क्षेत्रात. तेही मलिक अंबरने घालून दिलेल्या महसुल पद्धतीनुसार. मलिक अंबरची ही महसुलाची पद्धत जवळपास देशभर स्वीकारली गेली होती. त्यामुळे ते प्रदेश आपल्या स्वामित्वाखाली आणल्यानंतर त्यासंबधीचे दादोजींचे निवाडे पुढेही शिवाजी महाराजांनी कायम ठेवले, एवढेच त्या चार पत्रांवरून सिद्ध होते. पण यातून त्यांनी शिवाजी महाराज वा शहाजीराजांचे सेवक या नात्याने ते निवाडे केले होते हे कोठे सिद्ध होते?

दादोजी हे आदिलशहाचे मृत्युपावेतो सुभेदार होते. महसुलाच्या हिशोबात काही गफलत झाल्याने आदिलशहाने घोरपडे सरदारांना कांेडाण्यावर चालून जायला सांगितले होते व दादोजींची हार झाल्यानंतर खरे तर देहान्त शासनच व्हायचे, परंतु ब्रह्माहत्या हे महत्पापात गणले गेले असल्याने हातावर निभावले. या संदर्भातील पुरावे दुर्लक्षिण्याचे कारण काय? ते असत्य असतील तर त्याबाबत संशोधनपर चर्चा करून त्यांचा निकाल का लावला जात नाही? 'मग इतिहासात होऊन गेलेल्या या व्यक्तीचा पुतळा उखडून फेकण्याचे कारण काय?' असा प्रश्न गजानन मेहंदळे यांनी विचारला आहे. तो समजा रास्त मानला, तर मग दादोजी व शिवाजी महाराज वा शहाजी महाराज यांचा नेमका संबंध काय, हेही अस्सल पुराव्यांनिशी सिद्ध करायला हवे. दादोजींनी आपल्या हयातीत कांेडाणा शिवाजी महाराजांना का मिळू दिला नाही यावरचेही संशोधन मांडायला हवे. दादोजींबाबत ज्यांना आदर आहे त्यांच्यासाठी त्यांचा स्वतंत्र पुतळा नक्कीच असू शकतो, परंतु ज्या इतिहासाशी त्यांचा संबंध आदिलशहाचा सुभेदार या नात्याने आहे तो बाजूला ठेवून त्यांना शिवेतिहासातील महत्त्वाची व्यक्ती कसे म्हटले जाऊ शकते?

१६३० साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. इतका की लोक मृत जनावरे आणि शेवटी तर मृत माणसांचेही मांस खाऊन जगायचा प्रयत्न करत होते. गावेच्या गावे ओस पडली होती. या दुष्काळाला थोरला दुष्काळ म्हणतात. या दुष्काळाचे हृदयदावक वर्णन व्हॅन ट्विस्ट या डच व्यापाऱ्याने लिहून ठेवले आहे. तुकाराम महाराजांनीही आपल्या अनेक अभंगांत या प्रलयंकारी दुष्काळाची वर्णने केलेली आहेत. दादोजींनी दुष्काळ ओसरल्यानंतर गावे पुन्हा वसवण्याची कामगिरी सुरू केली, ती त्या प्रांताचा सुभेदार या नात्याने. ती त्यांची जबाबदारीच होती. त्यात त्यांची कार्यक्षमता मान्य करायलाच हवी, पण शहाजीराजे आदिलशाहीत गेले ते १६३६ मध्येे हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे शहाजीराजांच्या आज्ञेने त्यांनी गावे वसवली हा दावा निराधार ठरतो. घटनाक्रमात अशी अदलाबदल करून काय साध्य केले जातेे? याला इतिहास संशोधन म्हणायचे का, असा प्रश्न प्रत्येक इतिहासकाराने स्वत:लाच विचारला पाहिजे.

इतिहासकाराच्या सदसद्विवेकबुद्धीवर सर्वसामान्यांचा पराकोटीचा विश्वास असतो. सारी साधने त्यांना सर्वांना अभ्यासने शक्य नसते. इतिहासकाराने इतिहासाचे केलेले मूल्यांकन त्यांच्या दृष्टिकोनात, ज्ञानात नवी भर टाकत असते. त्यातून समाजऐक्याची भावना निर्माण होत असते. आधीचज जातीय अस्मिता टोकदारच नव्हेत तर काटेरी होत आहेत, हे आपण अनुभवत असताना किमान जातीसापेक्ष अहंगंड सुखावण्यासाठी काही विधाने संबंधित पुरावे चचेर्तही न घेता केली गेली तर तो इतिहास, कितीही शिस्त असली तरी, अविश्वसनीय होणार नाही का? इतिहाससंशोधन वर्चस्ववादी मानसिकतेतून झाले तर आपण आपले भवितव्य कसे घडवणार?


खरे तर या लेखात मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर द्यायला हवे होते ते श्री मेहंदळे यांनी. पण बहुदा त्यांना उत्तर सुचले नसावे... पण बराच वेळ घेवुन प्रत्युत्तर दिले ते श्री कौस्तुभ कस्तुरे यांनी माझ्या वरील लेखातील मुख्य मुद्द्यांना पुर्ण बगल देत, लेनचा विक्रुत विषय जो मी टाळला होता तो करत दादोजींना त्यांच्या समाजाचे महापुरुष ठरवत अगदी विनाकारण रामदासांनाही वेठीला धरले. त्यांचा माझ्या वरील लेखाला प्रत्य्त्तर देनारा हा लेख...


वर्चस्ववादी मानसिकता
22 Jan 2012, 0000 hrs IST

SMS NEWS to 58888 for latest updates
कौस्तुभ कस्तुरे

गेल्या काही दिवसात दादोजी कोंडदेव हे मराठ्यांच्या इतिहासातलं वादग्रस्त प्रकरणं ठरलं आहे. इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांनी त्यांच्या मुलाखतीत दादोजी कोंडदेव यांच्या केलेल्या समर्थनाचं संजय सोनवणी यांनी जोरदार खंडन केलं होतं. सोनवणी यांच्या मतांचा प्रतिवाद करणारा हा लेख...

' इतिहास संशोधन विश्वसनीय कसे होणार?' (रविवार, दि. १ जाने.) हा संजय सोनवणी यांचा, ज्येष्ठ इतिहास-संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या प्रतिपादनाचा प्रतिवाद करणारा लेख वाचला. मेहेंदळे हे अत्यंत निरपेक्ष आणि श्रेष्ठ असे इतिहास संशोधक आहेत. त्यांनी दादोजी कोंडदेव मलठणकरांविषयी मांडलेली मतं (संवाद - १८ डिसें. २०११) योग्यच आहेत. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे उल्लेख असणारे प्रत्यक्ष पुरावे नसले तरीही, ते चांगले गृहस्थ असल्याची आणि त्यांच्या न्यायदानाविषयी खुद्द शिवाजी महाराजांची शिफारसपत्र उपलब्ध असताना दादोजींच्या चारित्र्यावर चिखलफेक करणं हा कोणता पराक्रम? कोण कुठला तो जेम्स लेन आणि त्याने त्याच्या पुस्तकात काहीतरी मूर्खासारखं लिहिलं आणि आमच्याच सरकारने आमच्याच महापुरुषाचा पुतळा भर मध्यरात्री दिवाभीतासारखा उखडून टाकला. आजही महाराष्ट्राला संस्कृतीपेक्षाही विकृतीच जवळची वाटते हेच यावरून दिसून येतं. मेहेंदळे यांनी उपस्थित केलेला पुढचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे - 'शिवाजी महाराजांचे दादोजीच नव्हे, तर इतर कोणीच गुरू नव्हता, तसा एकही पुरावा उपलब्ध नाही!' तर मग शिवाजी महाराजांचे गुरू नसलेल्या अनेकांचे पुतळे अजूनही उभेच आहेत त्यांचं काय? देहुरोडमधील तुकाराम हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा लेखी अस्सल पुरावा आज उपलब्ध आहे का? असेल तर तो आधी सादर व्हावा!

सोनवणी म्हणतात की, मूळ इतिहास हा वर्चस्ववादी भूमिकेतून लिहिला गेला आहे आणि कोणाचे उदात्तीकरण वा कोणाला बदनाम करायचे हे आधीपासूनच ठरले होते. अर्थातच याविषयी बोलताना एका कटू पण सत्य गोष्टीकडे लक्ष वेधावे वाटते, ती गोष्ट म्हणजे अर्थात 'जातीयवाद'! दादोजी आणि समर्थ हे दोघेही ब्राह्माण असल्याने ब्राह्माण इतिहासकारांनी त्यांचे स्तोम माजवले, असा अपप्रचार केला जातो. परंतु अस्सल पुरावे मात्र वेगळंच सांगतात. महाराजांच्या समकालीन असणाऱ्या कृष्णाजी अनंत मजालसी उर्फ सभासदाच्या बखरीत किंवा खुद्द परमानंद गोविंद नेवासकरांच्या 'शिवभारता'त, जो अत्यंत विश्वसनीय पुरावा मानला जातो त्यात शहाजीराजांनी दादोजींना जिजाऊ आणि शिवाजी महाराजांसोबत कारभारी म्हणून पाठवले आणि इतकेच नव्हे तर त्यांना 'सरकारकून' म्हणजे 'मुख्य कारभारी' म्हणून नेमल्याचे उल्लेख आहेत. शिवाय भारत इतिहास संशोधक मंडळाच्या 'शिवचरित्र साहित्य खंड' यामध्ये पुणे आणि कर्यात मावळ पुन्हा वसवण्याचे काम दादोजींनी जिजाऊंच्या सल्ल्याने केल्याचा (आदिलशाही सुभेदार म्हणून नव्हे!) स्पष्ट उल्लेख आहे. 'रानातल्या जनावरांचा अन चोरांचा पंतांनी बंदोबस्त केला (संदर्भ : एक्याण्णव कलमी बखर).' इतिहासाचार्य राजवाडे यांनी त्यांच्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाच्या सतराव्या आणि अठराव्या खंडात दादोजींनी केलेले अनेक 'महजरनामे' प्रसिद्ध केले आहेत. याच्या चौथ्या खंडात महाराजांनी दादाजी नरसप्रभू गुप्ते यांना लिहिलेले एक पत्र आहे त्यात महाराज म्हणतात - 'श्री रोहिरेश्वर तुमचे खोरियातील आदि कुलदेव तुमचा डोंगरमाथा पठारालगत स्वयंभू आहे. त्याणी आम्हांस यश दिल्हे... राजश्री दादापंतांचे विद्यमाने (दादोजी कोंडदेवांच्या मदतीने) बाबाचे व तुमचे व आमचे श्रीपासी इमान जाहले...' म्हणजेच शिवाजी महाराजांच्या कार्याला दादोजींचा पाठिंबा होता, ते आदिलशाहीचे 'नाममात्र' सुभेदार होते हे स्पष्टच कळून येते. यातच सोनवणी यांनी उपस्थित केलेल्या 'दादोजींनी शिवाजी महाराज वा दादोजींचे सेवक या नात्याने निवाडे केले हे कोठे सिद्ध होते?' या प्रश्नाचे उत्तर सहज मिळते.

दादोजींनी १६३० ते १६३६च्या दरम्यानची अनेक कामे 'आदिलशाही सुभेदार' या नात्याने केली असतीलही, परंतु १६३६मध्ये त्यांना शहाजीराजांनी आपला कारभारी नेमल्यानंतर या म्हाताऱ्या निष्ठावंत सरकारकुनाने अखेरपर्यंत भोसले घराण्याची सेवाच केली आणि १६३६नंतरची बहुतांश कामे जिजाऊंच्या आज्ञेने केल्याचे अनेक उल्लेख सापडतात. त्यांनी केलेली सुधारणेची कामे ही दुष्काळानंतरची असण्यापेक्षाही आदिलशाही सरदारांनी पुणे प्रांतात घातलेल्या जुलूमी धुमाकूळानंतरची आहेत हेही लक्षात घेतले पाहिजे. इतिहासलेखन हे वर्चस्ववादी भूमिकेतून झाले असे बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा वरील अस्सल साधने तपासून इतिहासाचे मूल्यमापन करणेच अधिक इष्ट ठरेल.

' तथाकथित शिवप्रेमी' केवळ ब्राह्माणद्वेषाने सत्य इतिहास दडपून नवीन प्रतिइतिहास मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे 'महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळा'च्या इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील दादोजींचे उल्लेख वगळून 'शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली' झाल्याचे दाखवले आहे. हे पाहून हसावे का रडावे तेच समजेनासे झाले आहे. इ.स. १६३६च्या सुरुवातीसच शहाजीराजांची 'निजामशाही' मोंगल आणि आदिलशाहाने बुडवली. शाहजहानने आदिलशहाला बजावले की, राजांना महाराष्ट्रात न ठेवता दूर कर्नाटकात पाठवावे. त्याप्रमाणे आदिलशहाने राजांची पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरची जहागीर पूर्ववत चालू ठेवून राजांना कायमचे कर्नाटकात पाठवले. राजे दूर बंगलोरला (बंगळुरु) स्थायिक झाले व अखेरपर्यंत ते पुन्हा परत महाराष्ट्रात आल्याचे उल्लेख नाहीत; तर मग पुण्यात राहणाऱ्या बाल शिवबांचे शिक्षण त्यांच्या देखरेखीखाली कसे झाले?

सोनवणी म्हणतात की, दादोजींचा शिवैतिहासाशी संबंध नसून ते फक्त आदिलशाही सुभेदार होते. तेव्हा सोनवणी यांनी वरील पुरावे तपासून पहावेत. पेशवाईतही महादजी शिंद्यांनी दिल्लीच्या बादशहाकडून स्वत:ला 'वकील-इ-मुतालिक' ही पदवी घेतली होतीच की! परंतु म्हणून काही महादजी पेशव्यांना सोडून मोंगलांचे 'मनसबदार' झाले नव्हते. ते पद फक्त नाममात्र होते. नेमकी हीच गोष्ट दादोजींच्या बाबतीतही आहे.

सोनवणी म्हणतात ते खरे आहे- आधीच जातीय अस्मिता टोकदारच नव्हे, तर काटेरी होत आहेत. मात्र आजपर्यंतचे बहुतांश इतिहाससंशोधन हे निरपेक्षपणे झालेले आहे. म्हणायचेच झाले, तर सध्याच्या तो़डफोड करणाऱ्या शिवप्रेमींची मानसिकता पाहता इतिहासाचे 'कथित पुनलेर्खन' हे वर्चस्ववादी मानसिकतेतून होऊ लागले आहे. दादोजी कोंडदेव मलठणकर आणि रामदासस्वामी हे त्याचे पहिले बळी ठरले.


या लेखाला माझे खालील उत्तर प्रसिद्ध झाले...शक्य असतांनाही मी त्यात दादोजी खुनी कसा होता...त्याच्या हात कापण्यामागील इतिहास सांगत बसलो नाही...कारण त्यांच्या व्यक्तिगत चारित्र्याशी मला काही घेणे-देणे नव्हते. मुख्य मुद्दे होते ते मी खालील प्रत्युत्तरात मांडले आहेत...
खरे वर्चस्ववादी कोण?
5 Feb 2012, 0000 hrs IST

SMS NEWS to 58888 for latest updates
शिवाजीमहाराजांचे गुरू मानल्या गेलेल्या दादोजी कोंडदेव यांच्याविषयी ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदेळे यांनी केलेल्या विधानांवर संजय सोनवणी यांनी आक्षेप घेतला होता. नंतर सोनवणी यांच्या लेखाचा प्रतिरोध करणारा आणि मेहेंदळे व दादोजींची बाजू मांडणारा लेख कौस्तुभ कस्तुरे यांनी लिहिला होता. आता कस्तुरे यांच्या लेखाला उत्तर देणारा संजय सोनवणी यांचा हा लेख छापून, या वादावर इथेच पडदा टाकत आहोत.

कौस्तुभ कस्तुरे यांची 'वर्चस्ववादी मानसिकता' ही गजानन भास्कर मेहंदळे यांनी दादोजी कांेडदेव यांच्या संदर्भात केलेल्या विधानांचे खंडन करणाऱ्या माझ्या 'इतिहास संशोधन विश्वसनीय कसे होणार?' या लेखावरची प्रतिक्रिया वाचली. गजानन भास्कर मेहंदळे या निरपेक्ष आणि श्रेष्ठ अशा इतिहासकाराची दादोजी कोंडदेव मलठणकरांविषयी मांडलेली मते योग्यच आहेत, असा त्यांचा अभिप्रायही वाचला. मूळ मुद्याला बगल देत कसे लेखन करावे हे कस्तुरे यांच्याकडूनच शिकायला हवे हेही पटले. परंतु त्यांनी 'नाममात्र सुभेदार' असे दादोजींचे वर्णन करताना ही 'पदवी' कोठून शोधून काढली हे ते लिहायला विसरलेले दिसतात. त्यांना मोगलकालीन प्रशासनव्यवस्थेचे काडीएवढेही ज्ञान नाही, हे त्यांनीच सिद्ध केले आहे. किंबहुना हीच लबाडी आजतागायत केली जात आहे. किमान दादोजी आदिलशहाचे सुभेदार होते (मग ते नाममात्र का म्हणेनात) हे मान्य तरी केले याबद्दल त्यांचे आभार मानलेच पाहिजेत!

पण कस्तुरेंच्या माहितीसाठी सांगतो की 'सुभेदार' हा नेहमीच केंद्रीय सत्तेचा प्रतिनिधी असे. महसुल/जमीन सीमादींचे वाद-विवाद याबाबत निवाडे करण्याचे अधिकार सर्वस्वी सुभेदाराच्या हाती असत. गावे वसवणे, ज्यायोगे महसूल वाढेल अशी अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणणे, ही कर्तव्ये सुभेदारालाच करावी लागत. कंेदीय सत्ता कधीही महत्त्वाचे किल्ले (उदा. कांेडाणा, पुरंदर) जहागीरदारांच्या नव्हे तर, आपल्यामार्फत सुभेदाराच्या अखत्यारित ठेवत असत. जहागीरदारांच्या अखत्यारित असलेच तर दुय्यम दर्जाचे किल्ले असत. जहागीरदारांना प्रशासकीय प्रक्रियेत व न्यायदानासंदर्भात कसलाही अधिकारच नव्हता. महसूल आणि न्यायदान (प्रशासकीय व्यवस्था) हेच कंेदीय सत्तेची सार्वभौमता ठरवत असते. अशा स्थितीत शहाजी महाराज (व इ.स.१६४२ नंतर स्वराज्याची स्थापना करेपर्यंत शिवाजी महाराज) जहागीरदार असल्यामुळे त्यांना न्यायदान करण्याचा अधिकारच नव्हता, तर मग त्यांचे कारभारी असलेल्या दादोजींना कसा असू शकेल, हा साधा प्रश्न या इतिहासकारांना पडला नसेल (वा माहीत असूनही ते सांगत नसतील तर) आणि 'दादोजी असले तर आदिलशहाचे नाममात्र सुभेदार', होते असे खुळचट विधान केले जात असेल तर ज्येष्ठ-श्रेष्ठ आणि निरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या इतिहासकारांचीच वर्चस्ववादी दांभिक भूमिका वारंवार स्पष्ट होते.

दादोजी कोणत्याही स्थितीत शहाजीराजांनी नियुक्त केलेले कारभारी नव्हते, असूही शकत नाहीत. कारण सुभेदाराचा दर्जा हा कारभाऱ्यापेक्षा मोठा असतो आणि दादोजी आजीवन सुभेदारपदावरच होते, हे मान्य करायला एवढे लाजायचे कारण काय? त्यांचे निवाडे स्वतंत्र झाल्यानंतरही शिवाजी महाराजांनी कायम ठेवले याचा एवढाच अर्थ निघतो की, मलिक अंबरच्या महसूल पद्धतीचे उत्तम आचरण दादोजींनी केले होते. त्याबद्दल त्यांना शाबासकी देता येते. ती देऊ, पण शिवाजीमहाराजांशी त्यांचा संबंध जोडण्याचे काय कारण?

रामदासांचा मुद्दा कस्तुरंेनी जाणीवपूर्वक घुसवला आहे. ते विसरतात की ज्ञानेश्वर, एकनाथ, चक्रधरादि ब्राह्माणांचा बहुजनांनी नेहमीच सन्मान केला आहे. मग वाद रामदासांबद्दल का? कारण भाकड कथा निर्माण करून, त्यांना येनकेनप्रकारेण शिवाजी महाराजांचा आध्यात्मिक गुरू बनवले गेले. कसलेही बनावट दुय्यम-तिय्यम दर्जाचे पुरावे फेकायचे आणि त्यांना अस्सल म्हणवत आपलेच घोडे पुढे रेटायचे हा वर्चस्ववाद कस्तुरंेना वा त्यांच्या समर्थकांना समजत नाही असे नाही. 'ते करतात ते इतिहास संशोधन आणि इतर करतात ते जुने गाडलेले मुडदे उखडणारे विवेचन' अशी त्यांची अत्यंत बालिश मांडणी आहे.

' आमच्याच सरकारने आमच्या महापुरुषाचा पुतळा भर रात्री दिवाभीतासारखा उखडून टाकला', हे कस्तुरंेचे विधान हे मेहंदळंेच्या मुलाखतीतील विधानाची पुढची आवृत्ती आहे. दादोजीसमर्थक दंगा करून शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणतील ही भीती सरकारला असल्याने त्यांनी रात्री पुतळा काढला. ही भीती रास्त होती हे कस्तुरंेनीच सिद्ध करून दाखवले आहे. त्यामागे दादोजींचे नाव काही कारण नसताना शिवचरित्राशी जोडले गेले होते, हे एक कारण तर होतेच; पण लेन नामक कथित इतिहासकाराने पुण्यातील वावड्यांचा हवाला देत ( Street Joke ) शिवाजी महाराजांच्या जैविक पितृत्वाचे श्रेय दादोजींना दिले होते. असल्या नीच मानसिकतेला लाल महालातील अनैतिहासिक पुतळा जर बळ पुरवीत असेल, तर तो तेथून हलवणे हे शासनाचे कर्तव्यच होते आणि शासनाने ते बजावले. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांच्या देहुरोड येथील पुतळ्याबदल कस्तुरंेनी विषय सोडून विधान केले आहे. तो पुतळा मुळात वादग्रस्त नाही. दादोजीहटाव प्रकरण नुसते लेनमुळे नव्हे, तर ज्या विकृती विशिष्ट समाज गेली २५-३० वर्षं खाजगीत चघळत आला आहे, त्याची अपरिहार्य परिणती होती. आजही दादोजींबद्दल खोटे पुरावे देत 'ते गुरु नव्हते, पण भले माणूस तर होते. मग त्यांचा पुतळा उखडायचे काय कारण?' असा आलाप करून जी मानसिकता दर्शवली जात आहे ती बघता लेनचे बोलवते धनी कोण हे ओळखायला मोठ्या बुद्धिमत्तेची गरज नाही. कोणाला दादोजींसारख्या भल्या माणसाचा पुतळा हवा असे वाटत असेल तर तो त्यांनी हवा तेथे उभारावा, मात्र तो जिजाऊ आणि बालशिवरायांसोबत असूच शकत नाही. कारण दादोजींचा शिवैतिहासाशी संबंध असलाच, तर आदिलशहाचा सुभेदार म्हणून आहे. दादोजींना एकाच वेळीस दोन चाकऱ्या करू द्यायला आदिलशहा नक्कीच दुधखुळा नव्हता. सुभेदार आणि सरकारकून यात मोठा कोण असतो? सुभेदाराचा सरकारकून झाला तर ती पदावनती असते, पदोन्नती नव्हे. हे ज्यांना समजत नाही त्यांनी इतिहास सांगण्याच्या फंदात पडू नये आणि आधी स्वत:च वर्चस्ववादी भावनेतून बाहेर येऊन मोकळेपणाने इतिहास स्वीकारावा. सर्वजण त्यांचे स्वागतच करतील.वरील चर्चा वाचता सुद्न्य वाचकांच्या लक्षात येईल कि खरी कळ अकारण कोण काढत आहे? त्यामागे नेमक्या कोणत्या भावना आहेत? अशा पद्धतीने समाज गाडा द्वेषविरहीत कसा चालणार? आम्हाला खोटा इतिहास कितीवेळा कधी उघड तर कधी आडुन सांगणार? कशाला? का उगा त्या शिळ्या कढीला उत आणताय? जे खरे चांगले आहेत त्याबद्दल बोलुयात ना! कशाला दादोजींचे वस्त्रहरण करायला भाग पाडताय? तेही तुमच्याकडे कसलीही उत्तरे नसतांना? आणि कस्तुरे यांना वकील-ए-मुतालिक या पदाचा अर्थच जर माहित नाही तर उगा कशाला इतिहासाबाबत गळे काढावेत आणि दादोजींना नाममात्र सुभेदार म्हणावे? हा सारा बाष्कळपणा सुद्न्यपणे थांबवावा ही त्यांना नम्र सुचना. आजतागायत तुम्ही इतिहासाचा स्वयंपाक करुन हव्या त्या डिश आम्हाला वाढल्या...धन्यवाद...पण आम्ही कधीच या लबाड्या समजु शकणार नाही या भ्रमात राहु नका. वर्चस्ववाद सोडा...
30 comments:

 1. आजपर्यंत इतिहास एका वर्चस्ववादी मानसिकतेतून लिहिला गेला. बहुजन समाजाच्या अज्ञान, अंधश्रद्धा यांचा फायदा घेवून खोटा इतिहास आमच्या माथी मारण्यात आला. परंतु नेहमीच हे चालू राहील असा आशावाद बाळगायचे कारण नाही. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढला ते योग्यच झाले. जेम्स लेन प्रकरणात ब्राम्हणांनी कातडीबचाव भूमिका स्वीकारली. खुलेपणाने जेम्स लेन चा धिक्कार, निषेध ते करू शकले नाहीत. सर्व बहुजन समाज जेम्स लेन विरोधात आक्रमक झाला असताना ब्राम्हण समाज का मुग गिळून गप्प बसला. त्यांच्या मौनाचे रहस्य न समजण्याइतपत बहुजन समाज दुधखुळा नाही. सर्व ब्राम्हण वाईट नाहीत. परंतु बऱ्याच ब्राम्हण लोकांनी समाजाची दिशाभूल करून बहुजन समाज गुलामीत कसा राहील यासाठी प्रयत्न केले. अशा लबाड ब्राम्हणाचे काही चुकले तर त्याचा धिक्कार ब्राम्हण करत नाहीत. खेदाची गोष्ट अशी की ब्राम्हण त्यालाच आपला हिरो करतात. म्हणून बहुजन समाजाला ज्ञानेश्वर जवळचे वाटतात, पण रामदास बद्दल इतका जिव्हाळा वाटत नाही. याउलट ब्राम्हण समाज ज्ञानेश्वरांपेक्षा रामदासाला जास्त महत्व देतो. बहुजन समाजाचा ब्राम्हण समाजाशी झगडा आजचा नाही. या संघर्षामुळे कुणाचाच फायदा नाही. बहुजन समाज आत्ता आत्ता जागृत व्हायला लागलं. आपला इतिहास तो वाचायला लागलं. आपल्यावर ब्राम्हणी व्यवस्थेने लादलेली गुलामी, बंधने तो झिडकारू लागलं. ब्राम्हणांनी हे वास्तव स्वीकारले पाहिजे. पूर्वीसारखी जातीवर्चस्वाची भावना सोडून देवून निष्कपट मनाने वागले पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही आणि त्यामुळेच ब्राम्हण बहुजन हा संघर्ष जास्तच चिघळत चाललंय. दादोजी कोंडदेव, जेम्स लेन या सर्व वादाला ब्राम्हण बहुजन संघर्षाची पार्श्वभूमी आहे.
  संजय सोनवणी सरांनी अतिशय योग्य मांडणी करून मेहंदळे, कस्तुरे यांच्या लेखाचे खानदान केले आहे. सोनवणी सर् आपले खरेच अभिनंदन.

  ReplyDelete
 2. संदर्भ :"लोकप्रभा" वाचक प्रतिक्रिया
  दुवा: http://www.lokprabha.com/lokprabha/20120127/vachak-pratisad.htm

  एवढ्यांतच मी लोकप्रभाच्या ताज्या अंकात "सोनवणी इतिहासाकडे जातीयवादी दृष्टीने बघतात" ही श्री. संकेत देशपांडे यांची वाचक प्रतिक्रिया वाचली. श्री. संजय सोनवणींचा लेख मी देखील वाचला आहे. मला तरी त्यांच्या लेखात श्री. देशपांडे म्हणतात तसे काहीच आढळून आले नाही. श्री. संकेत देशपांडे यांनी कदाचित जाति-अभिमानातून उत्तेजित होऊन असा प्रतिसाद दिला असावा असे त्यांच्या प्रतिक्रियेवरुन दिसते आहे. तसेच याआधीचा दादोजी कोंडदेव यांच्यावरच्या सदर लेखकाच्या लेखाचा उल्लेख प्रतिक्रियाकर्त्याने केला आहे. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे पुराव्यांनिशी सिद्ध झालेले आहे. विष प्राशन करुन आत्महत्या करणारे आणि आपल्या हयातीत कोंढाणा किल्ला स्वराज्यात येऊ न देणारे दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांसारख्या तेजस्वी व लढाऊ व्यक्तीमत्त्वाचे गुरु कसे असू शकतात हे प्रतिसादकर्त्यानेच सांगावे. श्री. सोनवणी यांनी फक्त पुरावे वाचकांसमोर मांडले आहेत. यावरुन ते जातीवाचक आकस ठेवून लिहितात हे कसे? बर तसे म्हणावे तर पुरावे देताना त्याच ज्ञातितील लेखकांचे पुरावे त्यांनी दिलेले आहेत. केवळ करायची म्हणून टीका करु नका. अशा प्रकारचे गैरसमज मनात असणे समाजस्वास्थ्याच्या हितासाठी घातक आहे म्हणून हा लेखन प्रपंच.
  मुख्य म्हणजे पानिपताच्या मोहिमेचे नेत्तृत्व सदाशिवराव भाऊंच्याच हातात सर्वस्वी होते, त्यामुळे मोहिमेचा नेता म्हणून त्यांच्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी ही सर्वस्वी त्यांच्यावर येणारच येणार हे सत्य नाकारुन चालणार नाही. श्री. सोनवणी यांनी पानिपत मोहिमेच्या अपयशाचे मूल्यमापन एक संशोधक या नात्याने करुन वाचकांपुढे ठेवले आहे.

  श्री. संकेत देशपांडे यांनी त्यांची मते मांडताना कोणतेही पुरावे दिलेले नाहियेत हे येथे निदर्शनास आणून देऊ इच्छितो. या उलट श्री सोनवणी यांनी त्यांची मते मांडताना सर्व मान्यताप्राप्त इतिहासकारांचे दाखले दिले आहेत. उदा: 'रियासतकार' "गो. स. सरदेसाई" यांचा (मराठी रियासत-खंड ४), भारताचार्य म्हणून ज्यांना आदराने गौरविले जाते त्या चिं. वि. वैद्य यांच्या "दुर्दैवी रंगू" या पुस्तकाच्या तळटीपेत (ही तळटीप मी स्वतः सोनवणी यांच्या लेखामुळे पुस्तक मिळवून पाहिली आहे) भाऊ युद्धात पडले नसल्याचे मत व्यक्त केलेले आहे. पानिपतातील आजचे रहिवासी देखील "भाऊ भगा" असे म्हणतात. ही ३ पुराव्यांसकट उदाहरणे पाहिली की श्री. सोनवणी पुराव्यांच्या आधारे वस्तुनिष्ठतेच्या जवळ जाऊन पानिपत युद्धाच्या शोकांतिकेचे प्रामाणिक मूल्यमापन करत आहेत हे तर्कबुद्धीला पटते.

  माझी श्री. संकेत देशपांडे यांना विनंती आहे की आजपर्यंत सांगितला गेलेला इतिहासच सत्य आहे या मनोभूमिकेतून बाहेर येऊन त्यांच्याकडे त्यांच्या विधानांना ठामपणे बळकटी देणारे ऐतिहासिक दाखले असतील तर कृपया त्यांनी ते द्यावे. यामुळे पानिपतच्या इतिहासातील सत्य नक्की काय हे लोकांना समजण्यास मदत होईल आणि इतिहास संशोधनासाठी खूप मोलाचा हातभार लागेल.

  Continued...

  ReplyDelete
  Replies
  1. शेवटी असे की श्री सोनवणी यांनी त्यांच्या लेखात कोठेही ज्ञातिविशेष उल्लेख केलेला नाहिये. पेशवा हे एक पद आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. पेशवा हे पद भूषविणारे कोणत्या ज्ञातिचे होते हा श्री सोनवणी यांच्या लेखाचा विषय आहे असे मला अजिबात वाटत नाही.ज्ञातिचा अभिमान आणि उच्च पदामुळे येणार्‍या बर्‍या-वाईट निर्णयांची जबाबदारी या पूर्ण भिन्न गोष्टी आहेत. केवळ पेशवा या पदामुळे लाभलेल्या अमर्याद सत्तेमुळे (जी टिकवण्यासाठी खेळावयास लागणार्‍या) राजकारणाची (जे कोणत्याही काळातल्या सत्ताधार्‍यांमधे अगदी कॉमन आहे) जबाबदारी ही नैतिकतेने पेशव्यांचीच ठरते. मग ते आपल्या ज्ञातिचे असतील तर त्या अनुषंगाने मनात रोष बाळगू नये ही कळकळीची विनंती आहे.
   राहिले राघोबादादांच्या अटकेपार झेंडे फडकवण्याच्या मोहिमेच्या यशाचे श्रेय. तर मोहिमेचे नेत्तृत्व राघोबादादांनी केले त्यामुळे त्यांना हे श्रेय दिले जाते हे तर आहेच. आणि १ कोटी रुपयांच्या कर्जामुळे पेशव्यांनी त्यांच्यावर अन्याय केला असेही श्री. सोनवणी यांनी लिहिले आहे. पण प्रतिसादकर्त्याला टीका करताना ही गोष्ट का दिसली नाही?
   येथे हेही लक्षात घेतले पाहिजे की उत्तर भारतात मराठ्यांच्या सत्तेचा दरारा निर्माण करण्याचे मुख्य काम शिंदे आणि होळकर यांनीच केले आहे. त्यांच्या फौजा वर्षानुवर्षे तिथेच असल्यामुळे त्यांना तिथली भौगोलिक, राजकीय व सर्व प्रकारची माहिती होती. आणि लेखकाने म्हटल्याप्रमाणे अगोदर लुटलेल्या भूमिची मातब्बरी ती काय?
   माझी खात्री आहे की पेशवे हे दुसर्‍या कोणत्याही ज्ञातिचे असते तरी श्री.सोनवणी यांच्यासारख्या संशोधकवृत्तीच्या व्यक्तीचे लेखन बदलले नसते, कारण त्यांनी लेख लिहिताना इतिहासाचे पुराव्यांनिशी संशोधन केले आहे हे त्यांच्या लेखनातून जाणवते आहे. त्यांचे मत चुकीचे असेल तर त्याची मते खोडणारे पुरावे समोर आणावेत अशी माझी नम्र विनंती आहे. मनात किंतु न ठेवता लेखकानी पुराव्यांनिशी मांडलेल्या ऐतिहासिक संशोधनाचे मूल्यांकन करावे अशी मी श्री. संकेत देशपांडे यांना नम्र विनंती करतो.

   धन्यवाद,
   सागर भंडारे

   Delete
 3. मा. सोनावणी सर, दादाजी नरसप्रभु देशपांडे कुलकर्णी यांना १७ एप्रिल १६४५ रोजी छ्त्रपति शिवाजी महाराजांनी लिहिलेले पत्र आपण वाचले आहे काय? ते पत्र खोटे आहे यावर शिक्कामोर्तब करणारे पुरावे असल्यास ते द्यावेत ही कळकळीची विनंती.

  हे पत्र जर खरे असेल तर त्यात शिवाजी महाराजांनी लिहिले आहे - "राजश्री श्री दादाजीपंतांचे विद्यमाने बावाचे व तुमचे व आमचे श्रीपासी इमान जाले ते कायम व वज्रप्राय आहे." या वाक्यातील दादाजीपंत कोण असावेत? रोहिरेश्वराचा उल्लेख या पत्रात का आढळतो? स्वराज्याची प्रतिज्ञा घेताना उपस्थित असणारे हे दादाजीपंत ’राजश्री श्री’ या उपाधीने का उल्लेखलेले आहेत? या प्रश्नांची उत्तरे आपणासारख्या थोर इतिहाससंशोधकाने द्यावीत ही अपेक्षा.

  ReplyDelete
 4. "इतिहासाचार्य राजवाडे यांनी त्यांच्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाच्या सतराव्या आणि अठराव्या खंडात दादोजींनी केलेले अनेक 'महजरनामे' प्रसिद्ध केले आहेत. याच्या चौथ्या खंडात महाराजांनी दादाजी नरसप्रभू गुप्ते यांना लिहिलेले एक पत्र आहे त्यात महाराज म्हणतात - 'श्री रोहिरेश्वर तुमचे खोरियातील आदि कुलदेव तुमचा डोंगरमाथा पठारालगत स्वयंभू आहे. त्याणी आम्हांस यश दिल्हे... राजश्री दादापंतांचे विद्यमाने (दादोजी कोंडदेवांच्या मदतीने) बाबाचे व तुमचे व आमचे श्रीपासी इमान जाहले...' म्हणजेच शिवाजी महाराजांच्या कार्याला दादोजींचा पाठिंबा होता, ते आदिलशाहीचे 'नाममात्र' सुभेदार होते हे स्पष्टच कळून येते. यातच सोनवणी यांनी उपस्थित केलेल्या 'दादोजींनी शिवाजी महाराज वा दादोजींचे सेवक या नात्याने निवाडे केले हे कोठे सिद्ध होते?' या प्रश्नाचे उत्तर सहज मिळते" हे विधान श्री कस्तुरे यांचे आहे.
  व्हिक्टरजी, आणि आपण लिहिले आहे ते असे..."दादाजी नरसप्रभु देशपांडे कुलकर्णी यांना १७ एप्रिल १६४५ रोजी छ्त्रपति शिवाजी महाराजांनी लिहिलेले पत्र आपण वाचले आहे काय? ते पत्र खोटे आहे यावर शिक्कामोर्तब करणारे पुरावे असल्यास ते द्यावेत ही कळकळीची विनंती.

  हे पत्र जर खरे असेल तर त्यात शिवाजी महाराजांनी लिहिले आहे - "राजश्री श्री दादाजीपंतांचे विद्यमाने बावाचे व तुमचे व आमचे श्रीपासी इमान जाले ते कायम व वज्रप्राय आहे." या वाक्यातील दादाजीपंत कोण असावेत? रोहिरेश्वराचा उल्लेख या पत्रात का आढळतो? स्वराज्याची प्रतिज्ञा घेताना उपस्थित असणारे हे दादाजीपंत ’राजश्री श्री’ या उपाधीने का उल्लेखलेले आहेत?"
  प्रथम मी आपले लक्ष कस्तुरे आणि आपल्या त्या पत्रांतील विसंगतींकडे लक्ष वेधु इच्छितो. गुप्ते, कुलकर्णी कि देशपांडे? देशपांडे आणि कुलकर्णी या दोन विभिन्न पदव्या आहेत...आडनांवे नाहीत. त्यांचे एकत्रीकरण होत नाही.
  तुम्ही ज्या पत्राचा उल्लेख केलात त्यात "दादाजीपंत" असे म्हटले आहे....तर कस्तुरे त्या पत्राचाच संदर्भ देतांना त्यात "दादापंत" असा शब्द आहे असे म्हणतात. दादापंत...दादाजीपंत आणि दादोजीपंत...नेमके काय? या दोन्ही आव्रुत्त्यांत "दादोजी" असा उल्लेख नाही हे तर स्पष्ट आहे. शिवाय हे कथित पत्र लिहिले आहे तेही दादाजी नरसप्रभुंना. तेही दादाजी. सगळे दादाजी हे दादोजी कोंडदेवच ठरवायचे असा कही विचार आहे काय? दादाजी हे अत्यंत सर्वसाधारण नांव होते व आजही आहे.

  रियासतकार सरदेसाई यांनी दादोजी कोंडदेवांनी रंगनाथ गणेश सोनटक्के या कुलकर्णीपद भोगणा-याचा महसुलाच्या तंट्यावरुन कोंडाना किल्ल्यावर खुन केला आणि म्हणुनच अदिलशहाने घोरपड्यांना पाठवुन त्यांचा हात तोडायची सजा दिली. रंगनाथ गनेश सोनटक्के हे कस्बे जिन्ती, परगना श्रिगोन्दे येथील कुलकर्नी वतन पहात असत. ते जमा महसुल घेवुन महसुलाचा हिशोब द्यायला दादोजी कोंडदेव यांच्याकडे कोंडाना मुक्कामी आले. आधीचे हिशोब आणि आताचे हिशोब जुळत नसल्याने दादोजींशी सोनटक्के यांचे भांडन झाले पण तदनंतर दादोजींनी त्यांना भोजन प्रित्यर्थे आपल्या निवासी निमंत्रीत केले. रात्री भोजनानंतर (भोजनात वीष घातले असल्याने) त्यांचा दादोजींच्याच निवासस्थानी म्रुत्यु झाला. तदनंतर रंगनाथ यांचे पुत्र विसाजी रंगनाथ सोनटक्के यांनाही दादोजींनी धमक्या दिल्या. हा इतिहास दस्तुरखुद्द रियासतकार सरदेसाई यांनीच मांडला आहे. अशा खुनी मानसाला शिवाजी महाराजच काय अन्य कोणी महत्ता देत असण्याची शक्यता नाही. हात तोडला गेल्यानंतर (सन १६४६) वर्षाच्या आतच दादोजीने आत्महत्या केली.

  काय वाट्टेल ते करुन, अस्सल पत्रांचाही चुकीचा सोयीचा अन्वयार्थ काढतच बसायचे तर माझ्या दादाजी म्हणुन असलेला सोळाव्या शतकातील पुर्वजालाही मी महाराजांच्या गुरुपदी बसवु कि काय? तुमच्याहे पुर्वजांत या नांवाची अनेक माणसे झाले असतील. "राजमान्य राजेश्री" ही उपाधी अगदी अलिकडे पर्यंत सर्वच पत्रांत वापरली जायची, म्हणुन ते खरेच राजेश्री वा राजमान्य होते कि काय?
  खुनी, भ्रष्टाचारी आणि अदिलशहाच्या आकन्म चाकरीत असलेल्या दादोजीबाबत खरे तर आता तरी पुर्णविराम मिलावा ही अपेक्षा. इतिहासात जे चांगले ब्राह्मण जहाले त्यांच्याबद्दल सकारात्मक चर्चा करुयात कि!

  ReplyDelete
  Replies
  1. riyasatkar sardesai yani lihleli sarv mat aani history tumhi may\nya karnar ki aapalyala soyiskar tevdhe ghenar?

   Delete
  2. Rahul...sarv mat many karanyacha va nakaranyacha prashn naahi. Riyasatkaranni mahan kaary kele aahe...pan tyanchi mate many karatana itarahi purave vicharat ghyave lagtat.

   Delete
  3. खुनी, भ्रष्टाचारी आणि अदिलशहाच्या आकन्म चाकरीत असलेल्या दादोजीबाबत ...
   i object this words, you have to prove this beyond doubt or take back it. only quoting riyasatkar and not quoting others historians regarding this matter, you are deliberately suppressing the truth.
   रियासतकार सरदेसाई यांनी दादोजी कोंडदेवांनी रंगनाथ गणेश सोनटक्के या कुलकर्णीपद भोगणा-याचा महसुलाच्या तंट्यावरुन कोंडाना किल्ल्यावर खुन केला आणि म्हणुनच अदिलशहाने घोरपड्यांना पाठवुन त्यांचा हात तोडायची सजा दिली. रंगनाथ गनेश सोनटक्के हे कस्बे जिन्ती, परगना श्रिगोन्दे येथील कुलकर्नी वतन पहात असत. ते जमा महसुल घेवुन महसुलाचा हिशोब द्यायला दादोजी कोंडदेव यांच्याकडे कोंडाना मुक्कामी आले. आधीचे हिशोब आणि आताचे हिशोब जुळत नसल्याने दादोजींशी सोनटक्के यांचे भांडन झाले पण तदनंतर दादोजींनी त्यांना भोजन प्रित्यर्थे आपल्या निवासी निमंत्रीत केले. रात्री भोजनानंतर (भोजनात वीष घातले असल्याने) त्यांचा दादोजींच्याच निवासस्थानी म्रुत्यु झाला. तदनंतर रंगनाथ यांचे पुत्र विसाजी रंगनाथ सोनटक्के यांनाही दादोजींनी धमक्या दिल्या. हा इतिहास दस्तुरखुद्द रियासतकार सरदेसाई यांनीच मांडला आहे. अशा खुनी मानसाला शिवाजी महाराजच काय अन्य कोणी महत्ता देत असण्याची शक्यता नाही. हात तोडला गेल्यानंतर (सन १६४६) वर्षाच्या आतच दादोजीने आत्महत्या केली.
   You are writing very wrong history. why you not quote Shejwalka

   Delete
 5. दुसरे असे महजरनामे म्हणजे नेमके काय हे सांगायचे कष्ट इतिहासकार का घेत नाहीत? काय लपवु पाहतात ते? महजरनामा म्हनजे "गोतसभेचा अहवाल". तत्कालीन काळात (जवळपास एकोणीसव्या शतकापर्यंत) गोतांतील वाद हे गोतसभेतच मिटवले जात. गोतसभेत पंचायतीप्रमाने विविध प्रतिनिधी असत. त्या उपस्थितांची नांवे आधी नोंदवुन त्या वादांबाबत जे निर्णय होत त्यांचा अहवाल म्हणजे महजरनामा. महजर म्हणजे विशिष्ट समाज. म्हनजेच गोत. यांचा निर्नय (गोत्र हे फक्त ब्राह्मण समाजातच असल्याने) त्या त्या गोत्राच्या सभांत घेतले जात असत. सुभेदार हा गोतसभेच्या निर्णयाप्रमाणेच हुकुम काढत असे आणि त्यालाच महजरनामा म्हणतात. मुस्लिमांबाबतचे महजरनामे हे काझी काढत असत. ब्राह्मणांच्या जशा गोतसभा असत तशाच अन्य जातींच्याही जातपंचायती असत आणि जात पंचायतीचे निर्णय शक्यतो राजसत्ता धुडकारत नसत. अगदी पेशवाईपर्यंत ही प्रथा कटाक्षाने पाळली जात असे. थोडक्यात दादोजीचे महजरनामे म्हणजे तो केंद्रिय सत्तेचा...म्हनजेच अदिलशहाचाच सुभेदार होता हे सिद्ध करतात. जहागिरदारांना त्यांत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे पुन्हा दादोजीची बाजु लुळी पडते.
  खरे तर माझे असे स्पष्ट मत बनले आहे कि काही ब्राह्मणांना आपला कंड शमवण्यासाठी दादोजीचा बळी द्यायचा आहे...ते देत आहेत. दादोजी होता तेथे त्याला सुखरुप राहु द्यात आणि पुढे चला. हा वाद वाढवाल तेवढाच त्रास वाढेल...बघा काय करायचे ते!

  ReplyDelete
 6. हा इतिहास दस्तुरखुद्द रियासतकार सरदेसाई यांनीच मांडला आहे. अशा खुनी मानसाला शिवाजी महाराजच काय अन्य कोणी महत्ता देत असण्याची शक्यता नाही. हात तोडला गेल्यानंतर (सन १६४६) वर्षाच्या आतच दादोजीने आत्महत्या केली. ...
  नरहर कुरंदकर म्हणतात:-सर्व पुरावा तपासोन दि.वि.काळे यांनी आत्महत्या रद्द ठरविली आहे.शेजवलकरांनी पुन्हा एकवार आत्महत्या रद्द ठरविली आहे.उतारवयात आजारी पडून दादाजी स्वाभाविक मरणाने वारला,हीच गोष्ट अस्सल साधनांनी सिद्ध होते.सभासद बखर,९१ कलमी बखर,अस्स्ल साधने स्वाभाविक मरणच सांगतात.
  दादोजींचा शिवैतिहासाशी संबंध नसेल तर ४थीच्या पुस्तकात त्यांच्या चांगुलपणाचे वर्णन करणारा परिच्छेद जयसिंगराव पवारांनी अजूनही ठेवला आहे.त्यामागचे रहस्य काय?

  ReplyDelete
 7. नरहर कुरुंदकरांचे मत-पान क्र.१६,प्रस्तावना,श्रीमान योगी.

  ReplyDelete
 8. शिवचरित्र साहित्य, खंड ३ मधील ३९९ व्या लेखात पुरंदर किल्ल्यांची हकीकत आली आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांनी पुरंदरचे किल्लेदार महादजी निळकंठराव यांना असे लिहीले आहे की, ’’ दादोजी कोंडदेव आंम्हा जवळ वडिली ठेवून दिले होते. ते मृत्यू पावले, आता आम्ही निराश्रीत झालो. दादोजी कोंडदेवाच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी पाठविलेल्या अनेक पत्रामध्ये दादोजी कोंडदेव सुभेदार यांना देवाज्ञा झाली असा आदरयुक्त उल्लेख आला आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. प्रिय मधुसुदनजी, आपणच त्या पत्राचा उल्लेख करत दादोजी हे "सुभेदार" होते हेच सिद्ध करत आहात. मुख्य म्हनजे दादोजींच्या निवाड्यांना कायम करणारी व त्यांचा उल्लेख असणारे फक्त चारच अस्सल पत्रे उपलब्ध आहेत. ९१ कलमी बखर ही उत्तरकालात लिहिलेली असुन ती कोणीही संशोधक विश्वसनीय मानत नाही. दादोजी हे सुभेदार असल्याने त्यांच्याशी शहाजी वा शिवाजी महाराजांचा संबंध येणे अपरिहार्य होते जसा कोंडाना प्रांतातील अन्य जहागिरदारांचाही येत होता. या सुतावरुन स्वर्ग गाठने म्हनजे कडवेपणाची हद्द व हवे ते रेटण्याचा प्रयत्न नाही काय? सुभेदार हा जहागिरदाराचा कारभारी असुच शकत नाही हेच मी मांडले आहे. दादोजी हे ना शिवाजी (वा शहाजीराजांचे) कारभारी होते ना शिवाजी महाराजांच्या तर्फे त्यांनी निवाडे केले (कारण जहागिरदारांना निवाड्यांचा हक्कच नव्हता) हेच तर मी सांगतोय आणि मुख्य मुद्दा तोच आहे. अशा स्थितीत आपण तारतम्याने निर्णय घ्यावा कि नाही?

   Delete
 9. my bad...
  सोनवणी सर, उत्तराबद्दल धन्यवाद.
  मी तुम्हाला प्रथम प्रतिसादात सोनवणीऐवजी सोनावणी असे संबोधित केलेले आपल्याला (कदाचित) खटकले असेल. ती माझी टंकलेखनाची चूक होती. क्षमस्व!
  तद्वतच मी उपरोक्त पत्रात ’दादापंत’ या शब्दाऐवजी ’दादाजीपंत’ असा शब्द टंकित केला तीही माझी टंकलेखनाची चूक होती. क्षमस्व! त्यामुळे ’दादाजी’ या शब्दाभोवती चर्चा करणे आपणास निष्कारण भाग पडले. तेव्हा तो मुद्दा चर्चेतून बाद होतो.


  आता मूळ मुद्द्याकडे वळू...(पुढच्या प्रतिसादात)

  ReplyDelete
 10. आता मूळ मुद्द्याकडे वळू.

  इतिहासाच्या बहुतेक सर्व अभ्यासकांना माहित असेल की शिवराजकालीन पत्रांत संबोधन करताना आडनावाचा उल्लेख फारसा केला जात नसे. ’अमूकशाह वल्द/फरजंद तमुकशाह’ या मुस्लिम पद्धतीप्रमाणे मराठीतही बापाच्या नावावरून मुलांना ओळखले जाई.(उदा. सिवाजीराजे फरजंद शहाजीराजे किंवा शामराज नीळकंठ इ.)त्यापुढे त्यांना मिळालेल्या वतनांचा/उपाध्यांचा/नोकरीचा उल्लेख असे.(उदा. शामराज नीळकंठ पेशवे - पेशवे हे आडनाव/कूळनाव नव्हे.) उपरोक्त पत्रात शिवाजी महाराजांनी दादाजी नरसप्रभू यांच्या ’देशपांडे कुळ० ’ अशा दोन वतनांचा उल्लेख केला आहे. दादाजी नरसप्रभू हे गुप्ते होते की घोरपडे होते की चोरघे होते (कूळनाव) त्याचा उल्लेखच या पत्रात नाही. मात्र त्यांच्याकडे देशपांडे आणि कुळकर्णी ही दोन्ही वतने होती. हे सर्वांनी मान्य केलेले आहे.त्यामुळे पत्रातील मजकुराच्या अस्सलपणाला मुळीच बाध येऊ नये. म्हणजे हे पत्र अस्सल आहे.(या पत्राची पार्श्वभूमी म्हणून हे पत्र शिवाजी महाराजांनी का पाठवले? तेही पहाणे उद्बोधक ठरेल. ते ३० मार्च १६४५ चे विजापूरच्या वजीराचे शिरवळच्या अमिनामार्फत पाठवलेले पत्रही अस्सल दस्त आहे. या पत्रात विजापूरचा वजीर हा दादाजी नरसप्रभु देशपांडे कुळकर्णी, रोहिड खोरे आणि वेलखंड खोरे, यांना शिवाजीच्या नादी न लागण्याची सक्त ताकीद देतो.)

  ’विद्यमाने’ या शब्दाचा अर्थ ’विद्यमान असणे’ असा जुन्या मराठीत स्पष्ट होता. हल्लीच्या मराठीत तो ’पुरस्कृत’ या चुकीच्या अर्थाने सर्रास वापरला जात आहे. (उदा. अबक गुटखा व चटप बिडी यांचे संयुक्त विद्यमाने...)विद्यमान शब्दाचा अर्थ http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8&display=utf8&table=molesworth (मोल्सवर्थ*) येथे दिल्याप्रमाणे The presence, as a witness, of a third person असा स्पष्ट आहे. इतर अर्थही याची पुष्टी करतात.

  तसेच मराठीतील आजकालच्या श्री. रा.रा. या उल्लेखाबद्दल. आजकाल कोणीही सोम्यागोमाला राजमान्य राजश्री वगैरे लिहिण्याची चाल आहे. हे म्हणजे राजा आपल्या हत्तीवर सोन्याची झूल चढवतो आणि रजक आपल्या गाढवावर चिंध्यांची गोधडी चढवतो म्हणून रजकालाही राजा म्हणण्यासारखे आहे. पण शिवाजी महाराजांच्या काळी ’राजश्र” ही उपाधी केवळ राजपदावरील महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वापरली जात असे. http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80&display=utf8&table=molesworth (मोल्सवर्थ*) येथे दिलेल्या अर्थानुसार राजश्री म्हणजे A title of kings, Majesty.

  *मोल्सवर्थ डिक्शनरीने दिलेला शब्दांचा अर्थ हाच ग्राह्य मानला पाहिजे कारण ती बरीच जुनी (१८५७ सालची)आहे. जुन्या मराठीला शब्दांचे कोणते अर्थ अभिप्रेत होते ते पाहिले पाहिजे. शिवाजी महाराजांनी लिहीलेली पत्रे आजच्या मराठी भाषेतली नाहीत याची गांभिर्याने दखल घेतली गेली पाहिजे.

  (पुढे सुरू...)

  ReplyDelete
 11. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी रोहिरेश्वरासमोर (दादाजी नरसप्रभू यांच्या समवेत)स्वराज्याची आण घेतली त्यावेळी त्याला ’साक्षी’ म्हणून (’विटनेस’ म्हणून) कोणीएक राजेश्री श्री दादा’पंत’ उपस्थित होते. त्यांची साक्ष प्रत्यक्ष शिवाजी राजांनी देऊन त्याबद्दल खात्री बाळगण्याचा विश्वास दादा’जी’ नरसप्रभूंना दिला आहे. इतके महत्त्व असलेली ही व्यक्ती कोणती - जी तरूण शिवाजी आणि त्यांचा एक तरूण (मित्र) सहकारी (तोही मावळातल्या दोन खोऱ्यांचा देशपांडे आणि कुळकर्णी!) या दोघांनाही साक्ष म्हणून महत्त्वाची वाटते जिचे नाव ’दादापंत’ आहे? शिवाजी आणि त्यांचे तरूण सहकारी यांनी रोहिरेश्वराजवळ स्वराज्याच्या आणाभाका घेतल्या त्यावेळी साक्षीदार म्हणून उपस्थित असणारी ही ’राजेश्री श्री दादापंत’ व्यक्ती कोण?
  या प्रश्नाचे उत्तर शोधू पाहता त्या सर्व भूभागाचा अधिकार ज्याच्याकडे आहे आणि ज्याला दोन्ही बाजू (पार्ट्या) महत्त्वाचे मानतात अशा व्यक्तीचा हा उल्लेख आहे हे ध्यानात येते.

  तरीही सोयीसाठी असे मानू की ती व्यक्ती म्हणजे दादोजी कोंडदेव नव्हतीच. तरीही तिचा ’पंत’ हा उल्लेख मुळातलाच आहे. ’पंत’ हा उल्लेख मोल्सवर्थप्रमाणे - Abridged from पंडित ’An affix to the name of a Bráhman who, not having studied the Shástras, employs himself in accounts and writing.’ या अर्थाचा आहे.

  पत्रातले शिवाजी महाराजांचे वाक्य इंग्रजीत (अर्थ स्पष्ट व्हावा म्हणून) असे वाचता येते-
  "The oath taken in front of the God between your father, yourself and myself in witness of majesty Mr. Dada-pandit is permanent and stands like (as strong as) a diamond...."

  (means : As Diamonds are forever so our oath is. वज्र या शब्दाचा अर्थ हिरा/कधीही न भंगणारा कठिण पदार्थ असा होतो.)

  हे अस्सल पत्र प्रत्यक्ष ’शिवाजी महाराजांनी’ लिहिले आहे. तुम्ही आम्ही नव्हे. तेव्हा त्यात ढिसाळपणा मुळीच नाही. प्रत्येक शब्द तावून-सुलाखून-पारखून वापरलेला आहे. ’असेच असेल - तसेच असेल’ असे अंदाज बांधण्यासाठी तेथे मुभा नाही. म्हणजेच - शिवाजी,त्याच्या समवयस्क मावळातील एक अधिकारी व्यक्ती आणि त्या व्यक्तीचे पिता या सर्वांना आदर वाटेल असा कोणी एक राजश्री दादापं(डि)त ब्राह्मण स्वराज्याची प्रत्यक्ष रोहिरेश्वरासमोर आण घेताना साक्षीदार म्हणून उपस्थित होता याबद्दल कोणतीही शंका रहात नाही.

  (पुढे सुरू...)

  ReplyDelete
 12. आता हा प्रश्न उभा राहतो की तरूण शिवाजीला जवळ असणारा हा ’राजेश्री पंडित ब्राह्मण’ कोण?
  अजूनही त्याच्याबद्दल इतिहासात कोणताही उल्लेख कसा नाही? इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीचा शोध इतिहासकारांनी लावण्याची पराकाष्ठा केली पाहिजे.त्या व्यक्तीचे या मावळात इतके महत्त्व होते की स्वत: शिवाजी महाराजांना जमा केलेले तरूण शिलेदार आपल्यापासून दूर जाऊ नयेत म्हणून त्यांच्या साक्षीचा उल्लेख करणे जरूरीचे वाटले.म्हणजे याच व्यक्तीमुळे मावळातील अनेक मह्त्त्वाचे तरूण शिलेदार शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रयत्नांत सामिल राहिले हे नक्की.

  आजपर्यंत या व्यक्तीचा शोध कोणत्याही इतिहासकाराने लावला नाही याचे आश्चर्य वाटते. इतिहासाने ’राजेश्री पंडित ब्राह्मण दादापंत’ या व्यक्तीवर फारच अन्याय केला आहे असे खेदाने म्हणावे लागते...

  ’अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त - स्तंभ ना तिथे कुणी बांधला पेटली न वात...’ अशी उपेक्षा या हिंदवी स्वराज्यासाठी प्रयत्न करणाया व्यक्तीची होणार असे दु:खद चित्र दिसू लागले आहे.

  सोनवणी सर म्हणतात,"इतिहासात जे चांगले ब्राह्मण जहाले त्यांच्याबद्दल सकारात्मक चर्चा करुयात कि!’. माझे याला मनापासून अनुमोदन आहे. खुनी, पाताळयंत्री आणि भ्याड अशा दादोजी कोंडदेव या भ्रष्ट ब्राह्मणाबद्दल नकारात्मक चर्चा करण्यापेक्षा सकारात्मक चर्चा म्हणून आता आपण या ’राजेश्री पंडित ब्राह्मण दादापंत’ नावाच्या इतिहासात जहालेल्या एका चांगल्या परंतु अंधारात असलेल्या ब्राह्मणाबद्दल चर्चा करू या.
  या ’अननोन’ माणसाबद्दल सरांना काही माहिती असेल तर ती येथे द्यावी ही नम्र विनंती.
  या अनाम वीराचा शोध घेण्यासाठी सोनवणी सरांना मनापासून शुभेच्छा आणि आमच्यासारख्या मूढांनी केलेल्या त्याच्या उपेक्षेबद्दल क्षमाप्रार्थना !

  ReplyDelete
  Replies
  1. व्हिक्टरजी, आपल्या संयत आणि अभ्यासपुर्ण प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. दादाजी नरस प्रभु हे रोहिर खोरे व वळवण खो-याचे अनुक्रमे देशपांडे व कुलकर्णी होते. १६४५ मद्धे रोहिरेश्वरी शिवाजी महाराजांनी आपल्या काही मित्रांसोबत स्वराज्याची प्रतिद्न्या घेतली. अर्थात ही प्रतिद्न्या दंतकथा असावी असाही अनेक इतिहासकारांचा निश्कर्ष आहे. पण प्रतिद्न्या खरी होती हे ग्रुहित धरुन आपण पुढे जावुयात. राजेश्री ही उपाधी असणारा कोणी उच्चपदस्थ वा राजपदावरील व्यक्ती असला पाहिजे हा एक तर्क झाला. प्रत्यक्षात या शब्दाचा वापर फारच उथळ व सरसकट (आजकाल होता तसाच) होत होता. सुभेदार हा उच्चपदस्थ खरा परंतु राजश्री ही उपाधी त्यासाठीच राखुन ठेवली होती हे मानता येत नाही. दुसरे असे कि हे दादा पंत दादोजी होते असे म्हटले तर हेच दादोजी शहाजी राजांकडे शिवाजी महाराजांविरुद्ध कागाळ्या का करत होते या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देण्यामागे दादोजींचा हात होता असा विचार एवढा रुजला...रुजविला गेला आहे कि त्या भ्रामक मायाजालातुन लवकर बाहेर पडता येणे अवघड आहे हे मी समजु शकतो. असो. येथे आपल्याला दादा पंत कोण असु शकतील यावर विचार करायचा आहे.

   शिवचरित्रात अनेक "दादा" लोक सापडतात. उदा. दादाजी क्रुष्णा, दादाजी बापुजी इइइ. शिवाजी महाराजांची जी दादोजींबाबतची जी चार अस्सल पत्रे उपलब्ध आहेत त्यात त्यांचा उल्लेख "दादोजी कोंडदेव (सुभेदार)" असाच आहे. त्यामुळे एखाद्याच पत्रात ते त्यांचा उल्लेख फक्त "दादापंत" असा करणार नाहीत. त्यामुळे हे दादा पंत अन्य कोणी तत्कालीन रोहिरा खो-यातील एखादी वजनदार व्यक्ती असली पाहिजे हे नक्कीच. इतिहास अनेक महान व्यक्तींबद्दल मुक आहे हे वास्तवही आपण जाणतोच. शिवाजी महाराज मुत्सद्दी राजकारणी होते व त्यांनी आपल्या कार्यात असंख्य लोकांना सामावुन घेतले आहे, स्वराज्यासाठी वापर केला आहे हेही वास्तव आहे. त्यातील प्रत्त्येकाची ओळख काळाने ठेवलेली नाही. या पत्रानंतर दादा पंत इतिहासातुन अद्रुष्य झालेले दिसतात याचे कारण म्हणजे बहुदा पुढे त्यांचा स्वराज्य सेवेत फारसा सहभाग नसेल एवढेच फारतर आपण म्हणु शकतो....वा त्या व्यक्ती महत्वाच्या आहेत असे बखरकारांना वाटले नसेल. प्रत्त्येक महान कार्यात छोट्या-मोठ्यांचा काही वाटा असतोच. पण "योजक: तत्र दुर्लभ:" या न्यायाप्रमाणे योजकच नसेल तर कार्य कसे होणार? अन्यथा असे अगणित पंत/पंडित देशात होवुन गेले...पण शिवाजी एकच का झाला....यामागील रहस्य हेच आहे. इतिहास खरोखरची महनीय कार्ये, कोणी कितीही अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला तरी, विसरत नाही...आणि जे कार्यच नाही त्याची फारशी दखल घेतलीही जात नाही. उगा घेतली गेली तरी त्याची सत्य जागा कधी ना कधी उजेडात येतेच.

   दुसरी बाब म्हनजे दादोजी ब्राह्मण होते म्हणुन हे सव्यापसव्य नाही. मला ब्रह्मण-ब्राह्मणेतर वादात काडीएवढाही रस नाही. माझा विरोध हा प्रव्रुत्तींना आहे, जातींना नाही. (या जाती कधे नष्ट होतील?) आणि राहीला इतिहास तर जे सत्याचे दिग्दर्शन होते, मग ते काहीही असो, ते मान्य करणे हेच मला श्रेयस्कर वाटते.

   Delete
  2. I wanted not to discuss further on this subject. However, here you mention your principle opposition is to the Caste-System. I applaud your stand. This is the precise reason on which I would like to add.
   For the sake of argument, Let us assume that Dadoji Konddev was indeed the teacher and Shivaji was his pupil. And also that Dadoji was instrumental in developing the desire to build a sovereign state of the Hindus in the mind of Shivaji Maharaj. And now let us also assume that instead of being a Brahmin, he was a Maratha or a Koli or a Bhandari for that matter.
   What would have been the effect today? Whether Dadoji would have been desecrated in this fashion? What is the reason behind the hullabaloo now? Is it his caste or is it the history?
   For many centuries, Dadoji was the unequivocal teacher of Shivaji for historians. Not only Sabhasad or Chitnis (who were brahmins) but the writers of Tarikh-i-Shivaji (who were not even Hindus) and the English, Portuguese historians have mentioned Dadoji as such. Now, after so many years, just because he was brahmin, some people are challenging history. Sabhasad or Chitnis were brahmins, no doubt. But the history they wrote was of a Maratha Leader for a Maratha Leader. The history they wrote was for their maratha masters - None other than the Bhonsale clan itself. (Sabhasad was the minister of Shivaji's own son Rajaram! Chitnis was senior writer in the Satara court of Shahu II.) Both of these direct descendents of Shivaji Maharaj must have read/heard this written history. The rulers of Maratha Empire at that time had no dispute at all on Dadoji being Shivaji's teacher then how does it justify to contradict this now?

   And Sonawani Sir, please mind that it is just because of the caste-system : The Marathas of today think that by accepting that Dadoji was the teacher of Shivaji, their caste superiority gets blemished. They do not understand that Dadoji was just a teacher to his master's (Shahaji's) Son. A teacher is nothing but a glorified servant in a palace. By denying this vehemently and saying that Shahaji Maharaj was the actual teacher of Shivaji, they are actually lifting the stature of Dadoji to an equal pedestal of Shahaji Maharaj.
   Indeed it is time to call spade a spade and forget about the talk of caste superiority. Brahmins have been teachers and writers for long. They have been the balladeers of the kings. But that does not make their caste any superior.

   Please spare Dadoji, He was just a teacher. Had there been no Shivaji Maharaj, the founder of the Maratha empire, nobody would have disputed him being a teacher of any other Shivaji of his time.
   He is known to the history just because of his pupil and not vice versa.

   Delete
  3. No matter what caste Dadoji belonged to, if he was not the teacher of Shivaji, the truth should be told. There have been good and bad people in every caste. I had to write al;l this because dadoji was un-necessarily dragged in by Mr. Mehandale. the seven Brahmin ministers of Shivaji had far more important contribution in founding of svarajy...let's not forget this.

   Delete
 13. sonavni sir, very well said.
  It is our pleasure to have person like u.

  ReplyDelete
 14. Thanks Palaskar ji. Its my pleasure to have encouraging friends like you.

  ReplyDelete
 15. १.९१कलमी बखर विश्वसनीय नाही पण सभासद बखर तर विश्वसनीय आहे ना.यात दादोजींनी आत्महत्या केली नाही असे लिहिले आहे.
  २.[मौनीबुवा शिवरायांचे गुरु होते असे ९१कलमी बखर म्हणते.तेही अविश्वसनीय मानायचे काय?]
  ३.कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी लिहिलेल्या शिवचरित्रात दादोजींविषयी shivaji honoured him like a father असे म्हटले आहे.केळुस्कर हे ब्राह्मणेतर होते.
  ४.दादोजी हे गुरु नव्हते,ते शहाजींचे नोकरही नव्हते पण त्यांच्या न्यायनिवाड्याचे काम पाहून शिवाजीमहाराजांनी काही ना काही शिकले असावे.कारण त्यांच्या न्यायनिवाड्याची स्तुती त्यांच्या पत्रातून दिसते.

  ReplyDelete
 16. यापुढे दादाजी नरसप्रभूंविषयी चर्चा करु या.वाचून येतो.

  ReplyDelete
 17. चर्चा वाचून नेमक्या कोणाच्या काय भावना आहेत त्या कळल्या !!
  वर्चस्ववाद वर्चस्ववाद म्हणून इतिहासाचे पुनर्लेखन करणे गरजेचे आहे याचा यथोचित पुरस्कार केलाय.
  त्यामुळे पुनर्लेखन करताना दादोजी कोंडदेव , समर्थ रामदास स्वामी हे कधी झालेच नाहीत. त्याहीपेक्षा पेशवे हा केवळ भंपक पण होता . बाजीरावाने एकाही लढाई जिंकली नाही.
  असं पुनर्लेखन करून मोकळे व्हा एकदाचे.
  कोकाटे , खेडेकर यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं असं हल्लीच्या इतिहासाचं पुनर्लेखन केलं तरी ते वर्चस्ववादाविरुद्ध पुनर्लेखन आहे म्हणून मान्यताप्राप्त सुद्धा होईल.
  आपला वर्चस्ववादविरोधी पुनर्लेखनसमर्थक
  -
  शुद्ध रक्त राजा .

  ReplyDelete
 18. दादोजी कोंडदेवांच्या विरुद्ध लिहिण्यात आपण आघाडीवर होतात.
  नंतर त्या कुत्र्याचे प्रकरण झाल्यावर आपणाला नवा दृष्टांत झाला असावा.
  खेडकर आणि कंपनी यांच्या पासून आपण लांब होत आहात हे अभिनंदनीय आहे.
  एक जहाल मराठा ग्रुप ,संभाजी ब्रिगेड , आणि त्यांना पोसणारे राजकारणी

  ReplyDelete
  Replies
  1. Mr. Datta, I deal with historical facts, and not to support or oppose any croocks. dadoji was not Guru or ithe service of Shivaji/Shahaji. Waghya historically existed and that too I have proved. I was never with Khedekar gang. So remove all the misunderstandings from your mind. Thanks.

   Delete
  2. thanks for the explanation
   i have received a strong reply for my comments
   from shivarayacha mavala . is this a group or a person.
   one neednot hide their real identity while passing comments.it is unhealthy.
   is it not ?

   Delete
 19. i can't read all comments regarding ur article on dadoji kondev. but history is glorified with fights and victories of some upper caste people then it is obivious that those with remaining identities can't see to it proudly. u have said that some historains from a caste mis guided u ,they have told to faulty things.various topics are debated repeatedly (shilya kadhila ut aanne).now it is note worthy point that no one presently is confident about past situation and truth. those who have fulfilled their needs they can debate about shivaji maharaj and dadoji kondev ralationship.but keep in mind that ur blog is open to all and it is read by some sense less people. it is social mental claim that if some people feel proud having some identity then they can drag them selves in communism and violence. ur writtings about history itself is a thing to satisfy ur thoughts that have evoked by ur perceptions after reading things. so,what u have alleged to other replies suits u also completely.if others are finding their identities and wanting them proud about it, same is the case with u also.u can't or i reiterate u mustn't deny that what u have written has come from some pre conceived notions.so it u should be helpless if u want to prove something or tell something.otherwise it is claimed that u don't have enough words to convince anyone.don't deny that you are convicing people since u write ur blog to be satisfactory which comes to u by those who read it.

  ReplyDelete