Saturday, April 21, 2012

संस्कृत भाषा पुरातन?

 संस्कृत भाषा नुसती पुरातन नव्हे तर ती इंडो-युरोपियन भाषा समुदायाची जननी आहे. भारतातील द्राविडियन भाषागट वगळता अन्य सर्वच भाषा संस्क्रुतोद्भव आहेत.  संस्कृत ही साक्षात "देववाणी "असून ऋग्वेद म्हणजे परमेश्वराचे नि:श्वास आहेत...अशी आपली बराच काळ समजुत आहे हे खरे. परंतु तसे पुरावे आहेत काय? मुळात संस्कृत भाषा पुरातन आहे हा समज खरा आहे काय? ग्रीक व ल्यटीन भाषासुद्धा  संस्कृतमधुनच निर्माण झाली असे म्याक्समुल्लरने प्रथम मत प्रस्रुत केले व त्यांची सर्वच भाषाविदांनी री ओढली. यामागे म्यक्समुल्लरचा "आर्य" हे मध्य अशिया किंवा उरल प्रांतातुन क्रमश: टोळ्यां-टोळ्यांनी निर्गमीत झाले आणि काही टोळ्या युरोपात तर काही इराणमार्गे भारतात प्रवेशल्या असा तर्क होता. भारतात तेंव्हा ज्या दास-दस्यु ई.रानटी जमाती रहात होत्या त्यांना जिंकुन त्यांनी त्यांना चवथ्या, म्हणजे शुद्र वर्णात स्थान दिले असाही तर्क होता. परंतु सिंधु संस्क्रुतीचे अवशेष सापडल्यानंतर जोही काही वेदकाळ मानला जातो, त्याच्याही पुर्वी भारतात अत्यंत सम्रुद्ध व प्रगत संस्क्रुती अस्तित्वात होती हे प्रत्यक्ष भौतीक अवशेषांमुळेच सिद्ध झाल्याने आर्य सिंद्धांताला बधा येवू लागली. तरीही प्रथम आर्यांनीच सिंधु संस्क्रुती नष्ट केली व  लोकांना
दास केले असे म्हणत तेही अंगलट यायला लगल्यावर सिंधु संस्क्रुती वैदिकांनीच निर्माण केली असे तर्क डा. मधुकर ढवळीकरांसारखे विद्वान प्रस्रुत करु लागले. आर्य नांवाचा कोणताही वंश अस्तित्वात नव्हता व आक्रमक म्हणून येथे आले हेही खरे नाही हे आता असंख्य पुराव्यांवर सिद्ध झाले आहे. मग  संस्कृतचे काय? मुळ ऋग्वेद नेमका कोणत्या भाषेत लिहिला गेला होता? या प्रश्नांची उत्तरे येथे थोडक्यात तपासायची आहेत.

१. मुळात  संस्कृत म्हणजे संस्कारीत, बदलवलेली क्रुत्रीम भाषा तर प्राक्रुत म्हणजे मुळची, नैसर्गिक भाषा. आता हा अर्थ सरळ व स्पष्ट असल्याने प्राक्रुत भाषेवरच संस्कार करुन जी भाषा बनवली गेली तीच  संस्कृत
 हे उघड आहे. म्हणजे प्राक्रुत भाषा याच मुळच्या ठरतात.

२. प्रत्येक भाषा ही आपली प्रादेशीक ओळख देते. उदा. मागधी, अर्धमागधी, (मगध प्रांतातील भाषा) माहाराष्ट्री प्राक्रुत, शौरसेनी, तेलगु इ. एवढेच नव्हे तर ग्रीक, डोरियन, अक्काडियन, ल्यटिन (ल्यटियनन या प्रांतात बनली म्हणुन) पर्शियन...ई. परंतु  संस्कृत भाषेला असे प्रादेशिक संदर्भ नाहीत जसे ते पाली या भाषेलाही नाहीत. पालीला नाहीत कारण ती भाषा ग्रांथिक उपयोगासाठी प्रयत्नपुर्वक बनवली गेलेली सर्वात पहिली क्रुत्रीम ग्रांथिक भाषा आहे.  संस्कृतही तशीच क्रुत्रीम भाषा आहे. त्यामुळेच तिला्ही कसलेही प्रादेशिक संदर्भ नाहीत.

३. ग्रीक भाषेवर  संस्कृतमधील काही मोजक्या शब्दांतील किरकोळ साधर्म्यामुळे तिचा प्रभाव होता व त्यातुनच ग्रीक भाषेचा जन्म झाला असे मानण्याचा प्रघात आहे. परंतु भाषाविद येथे हे विसरतात कि ग्रीक भाषेतील पहिला वाचला गेलेला लेख (लिखित) इसपु १७०० मधील आहे. ल्यटीन भाषेतील पहिला शिलालेख हा इसपु ६०० मधील आहे. इराणी भाषेची जननी  संस्कृत  आहे असेही मानण्याचा प्रघात आहे, परंतु या भाषेतीलही पहिला शिलालेख बेहुस्तिन येथील इसपु ५२२ मधील राजा दारियसचा आहे. सिंधु लिपी अद्याप वाचता आली नसली तरी त्यांही काळी लिपी होती याबाबत दुमत नाही. भारतात जुन्यात जुना (वाचला गेलेला) शिलालेख हा इसपु १००० मधील असुन तो व्रज (शौरसेनी) भाषेतील आहे. इसपु ३२२ पासुन पाली, अर्धमागधी, मागधी, तमिळ भाषेतील शिलालेखांची मात्र रेलचेल आहे. जर  संस्कृत  इंडो-युरोपियन समुदायातील असती तर तिचीच अपत्ये मानल्या गेलेल्या भाषांत मात्र पुरातन लेख आढळतात. पण  संस्कृत मात्र अर्वाचीन ठरते. हे असे का?

 ४. हे लेख लिहिले गेले कारण त्या भाषांना स्वत:ची लिपी होती हेही उघड आहे. आश्चर्याची गोष्ट अशी कि संस्क्रुत भाषेतील (तोही प्राक्रुत-संस्क्रुत मिश्रीत..) शिलालेख गिरनारला सापडतो तो इसवी सनाच्या 165 चा. तोही ब्राह्मी लिपीतला, ज्यात तत्पुर्वीच इसपु १००० पासुन असंख्य प्राक्रुत शिलालेख कोरले गेलेले होते. सहाव्या शतकापासुन मात्र संस्क्रुत शिलालेखांचे प्रमाण वाढलेले दिसते. याचा अर्थ असा आहे कि मुळात  संस्कृतला स्वत:ची कसलीही आणि कधीही लिपी नव्हती....भाषा पुरातन असती तर लिपी नक्कीच असती जशी ग्रीक, ल्यटीन, पर्शियन व भारतीय प्राक्रुत भाषांची होती. पैशाची भाषेत गुणाढ्याने "बृहत्कथा" लिहिले होते व त्यातील लाखभर पाने जाळली अशी कथा आहे...म्हणजे तो ग्रंथही मुळात लिखितच होता.

५. प्रत्यक्ष पुराव्यांवरुन सातवाहन काळापर्यंत तरी संस्क्रुत ही कोणाचीही दरबारी भाषा नव्हती हा इतिहास आहे. सर्व राजकारभार प्राक्रुतातुन चालत असे. इसच्या १५० पर्यंत एकही शिलालेख वा नाण्यांवरील मजकुर संस्कृतात नाही. साहित्यही संस्क्रुत भाषेत नाही.

६. चवथ्या शतकात साधलेल्या रामायणच्या संस्करणात सोडले तर खुद्द ऋग्वेद ते महाभारतात संस्क्रुत भाषेचे नांवही येत नाही. विपुल बौद्ध व जैन वाड्मयात कोठेही सम्स्क्रुत भाषेचे नांव येत नाही. पाणिनीला अभिजात सम्स्क्रुतचा श्रेश्ठ व्याकरणकार मानले जाते, परंतु इसवी सनाच्या तिस-या शतकात त्याने लिहिलेल्या अष्टाध्यायीतही संस्क्रुत हा शब्द येत नसुन तो ज्याचे व्याकरण लिहित होता त्याला "छंदस" व "भाषा" असे म्हनतो...संस्क्रुत नाही. सर्वात महत्वाची नोंद घेण्याची बाब म्हणजे पाणिनी हा शैव होता. त्याच्या सुत्रांना महेश्वर सुत्रे अथवा शिव सुत्रे असेच म्हटले जाते. संस्क्रुतचा नंतरचा व्याकरणकार पतंजली हाही शैव होता.

७. दुस-या-तिस-या शतकापुर्वीचा एकही संस्क्रुत म्हणवणा-या भाषेतील एकही लेख, राजाद्न्या, ग्रंथ, काव्य वा महाकाव्य वा पुराण मिळत नाही. उलट जैन व बौद्ध साहित्याचे हस्तलिखित पुरावे हे किमान सनपुर्व चवथ्या शतकापासुन आढळतात. खुद्द ऋग्वेद इसवी सनाच्या सहाव्या शतकात तमिलनाडुमद्धे ग्रंथबद्ध केला गेला. वेद मौखिक परंपरेने जपले असे मान्य जरी करायचे म्हटले तरी अन्य कोनताही व्यवहार संस्क्रुतातुन का नोंदला गेला नाही? जर संस्क्रुत ही देशाची पुरातन भाषा होती व किमान ब्राह्मण-क्षत्रीय-वैश्य समाजाच्या नित्य बोलण्यातील व्यवहारातील भाषा होती...तर एकही तसा भौतीक पुरावा आजतागायत का मिळाला नाही? कारण ती भाषाच मुलात अस्तित्वात नव्हती.

८. ऋग्वेदाची भाषा ही "वैदिक संस्क्रुत" आहे असे मानण्याचा प्रघात आहे, कारण ती पानीनिच्या व्याकरणशी फारसा मेळ घालत नाही. उलट तिचा मेळ प्राक्रुत व्याकरण व भाषेशी जास्त बसतो आणि त्याचे कारण स्वाभाविक आहे. ऋग्वेद रचना ही सनपुर्व 1500 ते सनपुर्व 1000 पर्यंत सुरु होती, असे मानण्याचा प्रघात आहे. परंतु या प्रदिर्घ कालावधीत भाषेत आपसुक जे कालौघात बदल घडत असतात (जशी चक्रधरांची---द्न्यानेश्वरांची मराठी व आजची...) तसे काहीएक बदल ऋग्वेदात आढळत नाहीत. इंग्रजीतही आपण शेक्सपियरची इंग्रजी आणि आजची इंग्रजी हा भेद सहज पाहु शकतो. जगात असे कोनत्याही भाषेबाबत...अगदी ग्रीक वा ल्यटीनबाबतही घडलेले नाही. मग ऋग्वेदाची भाषा का बदलत नाही? याचे कारण असे कि मुळात वेद हे मुळात संस्क्रुतात रचलेच गेलेले नव्हते. असे असुनही सम्स्क्रुत पुरातन...देववाणी...असा भ्रम आपल्या डोक्यात बसला तो विल्ल्यम जोन्स व म्यक्समुल्लरमुळे. असा सिद्धांत मांडण्यात त्यांचे सांस्कृतिक व राजकीय
फायदे होते. पण येथील विद्वान मात्र फारच उत्तेजीत झाले. पण ते वरील प्रश्नांची उत्तरे देवू शकत नाहीत हे उघड आहे.

आता प्रश्न पडतो तो असा कि नेमकी संस्क्रुत भाषा कधीची? मुळात या भाषेचे कसलेही भौतीक पुरावे इसवी सनाच्या दुस-या शतकापार जात नसल्याने तिचा जन्म याच काळच्या आसपास झाला असे ठामपणे म्हनता येते. म्हणजे ही भाषा अगदी पालीपेक्षाही किमान ५०० वर्षांनी अर्वाचीन ठरते. पाली भाषा ही बौद्ध धर्मीयांनी मागधी-अर्धमागधी व शौरसेनीतील शब्द-व्याकरण यांचा मेळ घालत ग्रांथिक कारणांसाठी बनवली हे मी आधीच म्हटले आहे. मग बौद्ध धर्माचा प्रसार पालीमुळे देशभरच नव्हे तर विदेशातही होत आहे हे पाहुन वैदिक धर्मियांनी पाली, व पालीपासून पुढे विकसीत झालेली संस्कृत वापरण्याचा निर्णय घेतला असावा. कारण मुळ वेद व ब्राह्मणे ज्या भाषेत लिहिली होती ती "जुन्या पर्शियनच्या निकटतम भाषेत. नंतर तो मिश्र प्राकृतात आणला गेला. आजचे वेद हे भाषेचे तिसरे रुप आहे, मुळचे नव्हे....याचे आता शेकडो पुरावे उपलब्ध झालेले आहेत.

पाणिनीने तिस-या शतकात संस्कृतला व्याकरणबद्ध केले. त्यानंतर अभिजात संस्कृतमधील साहित्याचा विस्फोट झाला. पाणिनी हा वैदिक नव्हे तर पणी समाजातील एक विद्वान. प्रचलित भाषांवर संस्कार करुनच बनवली गेलेली ही भाषा असल्याने त्या भाषेची स्वतंत्र लिपी असण्याचे कारण नव्हते.  त्यामुळे तमीळ ब्राह्मी, ब्राह्मी वा क्वचित खरोष्टी या प्रचलित लिप्या वापरात आणल्या. या भाषेला पहिला राजाश्रय मिळालेला दिसतो तो शक क्षत्रप रुद्रदामनाच्या काळात, कारण पहिला संस्क्रुतातील शिलालेख त्याचाच आहे! तो आधीच म्हटल्याप्रमाणे शुद्ध नव्हे तर मिश्र संस्कृतातील आहे.

मुळ ऋग्वेद जुन्या पर्शियनसदृष्य भाषेत होता. अवेस्त्याची भाषा व वैदिक भाषेतील साम्य विलक्षण आहे. असे असले तरी प्राकृताची अनेक रुपे वैदिक भाषेत दिसतात. वैदिक संस्कृत ही पाणिनीच्या संस्कृतपेक्षा सैल व व्यामिश्र त्यामुळेच झाली.  हे खुद्द ऋग्वेदातील शेष राहिलेल्या मुळ शब्दांवरुनच सिद्ध होते. उदा. सोम पवमान सुक्त. नंतर प्रारंभिक संस्कृतात अनुवाद करतांना ज्या मुळ अवेस्तन शब्दांचे अर्थ माहित नव्हते ते शब्द तसेच ठेवले गेले. त्यामुळे अगदी यास्क असो कि सायनाचार्य असो, त्यांनाही ऋग्वेदातील अनेक ऋचा/शब्दांचा अर्थ लावता आला नाही. तोवर पाणिनीचे व्याकरण तयार झाले. पण या सा-याचा देशभर प्रसार-प्रचार व्हायला अजुन दोन-तिनशे वर्ष लागली. पुढची तीन-चारशे वर्ष संस्कृतने राज्यव्यवहार ते साहित्यक्षेत्रात अधिराज्य गाजवले...इतके कि मुळ प्राकृत ग्रंथ संस्क्रुतात झपाट्याने अनुवादित झाले...यातुन कालिदास, भवभुतीसारखे मुळ प्राक्रुत नाटककारही सुटले नाहीत. पण मग पुन्हा ही भाषा हळु हळु लोप पावली ती पावलीच.

मग संस्क्रुत ही सर्व भाषांची जननी हा सिद्धांत का आला? याला खरे तर राजकीय कारणे आहेत. म्यक्समुल्लर हा जर्मन पंडित या सिद्धांताचा मुख्य पुरस्कर्ता ठरला. युरोपियन (ग्रीस आणि रोम वगळता) कोणाचाही इतिहास पाचव्या शतकापार जात नव्हता. त्यांनाही त्यांची सांस्क्रुतीक पाळेमुळे भक्कम करायची होती. आर्यभाषागट सिद्धांतामुळे मात्र त्यांचाही इतिहास पुरातन ठरु शकत होता. कारण आर्य भाषा बोलणारे कधीतरी एकत्र होते आणि ते क्रमश: युरोप ते भारतात पसरले व स्थानिकांना सुसंस्क्रुत केले. हे सिद्ध केले कि आर्यन वंशवादाचा राजकीय लाभ जसा जर्मनांना होनार होता तसाच इंग्रजांनाही. भारतातील ब्राह्मण हे आपसुक त्यांचे पुरातन "आर्यरक्ताचे बांधव" ठरणार होते...म्हणजेच एतद्देशियांवर सत्ता गाजवणारे पहिले आक्रमक. विष्णुशास्त्री चिपळुनकर तर जाहीरपणे इंग्रजांना पुरातन रक्तबांधव म्हणु लागले ते यामुळेच. लो. टिळकांनीही तोच कित्ता गिरवला व "आर्क्टिक होम इन वेदाज" हा ग्रंथ लिहुन मोकळेही झाले. (नंतर डा. नी. र. व-हाडपांडे
यांनी टिळकांच्या सिद्धांताला ऋग्वेदाचाच आश्रय घेत फेटाळुन लावला) पण यामुळे जसा युरोपियनांचा राजकीय/सांस्क्रुतीक फायदा झाला तसाच येथील वर्चस्ववादी वैदिकांचाही झाला व त्यांनी संस्क्रुतचा व आर्यवादाचा उद्घोष करायला सुरुवात केली. खरे तर या विदेशी प्राच्यविद्या संशोधकांनी सर्वात आधी प्राक्रुत भाषांकडेच लक्ष पुरवले असते तर संस्क्रुतचा फोलपणा व प्राचिनत्वावर तेंव्हाच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते, व आजचा हा साम्स्क्रुतीक गोंधळ मुळात निर्मानच झाला नसता. ट्रम्प सारख्या व्याकरणकाराच्या मात्र ही बाब लक्षात आली होती. त्याने प्राक्रुत भाषा याच पुरातन असुन सम्स्क्रुतचा जन्म अत्यंत अर्वाचीन आहे हे सिंधी भाषेचे पहिले व्याकरण लिहितांना १९व्या शतकात मांडले होते. केतकरांनीही माहाराष्ट्री प्राक्रुतातुनच संस्क्रुतचा जन्म झाला हे त्यांच्या ज्ञानकोशात मांडले होते. पण लक्षात कोण घेतो?

लिप्यांकित भाषा व अलिप्यांकित भाषा यातील भेद लक्षात घेतला असता तर ग्रीक, ल्यटीन भाषांवरील प्रभाव हा प्राक्रुतामुळे आहे व ते सिंधु संस्क्रुतीपासुन चालत आलेल्या व्यापारामुळे व सांस्क्रुतीक देवानघेवाणीमुळे आहे हे त्यांच्या सहज लक्षात आले असते. असो.

प्राक्रुत भाषा याच पुरातन असून संस्क्रुतचा इतिहास इसवी सनाच्या दुस-या शतकापार जात नाही हे मात्र सर्वच उपलब्ध पुराव्यांवरुन ठामपणे सिद्ध होते. थोडक्यात संस्क्रुत ही अत्यंत अर्वाचीन भाषा असुन तिला अभिजाततेचा दर्जा देणेही चुक आहे. या भाषेतील ऋग्वेदासहित सर्व वाड्मय हे मुळ कोणत्या ना कोणत्या प्राक्रुतातुन अनुवादित केलेले आहे. मग प्रत्यक्ष पुरावे असलेले कथासरित्सागर घ्या, सिंहासन बत्तीशी घ्या कि रामायण महाभारत घ्या. थोडक्यात संस्कृत ही अर्वाचीन भाषा आहे. ग्रांथिक कारणांसाठी वैदिक, बौद्ध, आगमीक व जैनांनी निर्माण केलेली आहे. ही संयुक्तपणे विकसीत केली गेलेली भाषा आहे. ही भाषा अभिजात नाही.


(माझा हा लेख रविवारच्या (22/4/12) नवशक्तीत प्रसिद्ध आहे.)

====संजय सोनवणी





 

12 comments:

  1. चला, मुल्क - इ - मैदान तोफेप्रमाणे सोनवणी नामक उखळी तोफ आता धडाडली असून आणि वैदिकांच्या अभेद्य, बळकट अशा समजल्या जाणाऱ्या संस्कृत नामक गडाचे बुरुज डळमळीत होऊ लागले आहेत !

    ReplyDelete
  2. First I must say it's a very informative and nice article. But there are too many theories in the battle of languages. People are even considering Darwin's theory of evolution and tracking the evolution of languages in parallel with the human evolution, which is logical. Looking at the current status of Sanskrit it doesn't seem to be an ancient most language but all of us need proofs for the same. I understand that giving these many proofs in a single blog is very difficult. I hope to read your book in the future. Good luck.

    ReplyDelete
    Replies
    1. I am considering darwin's theory of evolution in the first chapter of the book "Origin of the Languages" in which how language develops, evolves and why there are similarities and dissimilarities in the languages.

      Thanks for your kind comment.

      Delete
  3. सोनवणी साहेब, मला तुमच्या लेखाबद्दल आत्ताच काही म्हणायचे नाही, कारण अर्थातच माझा ह्या विषयाचा तेवढा अभ्यास नाही. तथापि काही प्रश्न -
    १. संस्कृत, ग्रीक, लातिन, ह्या भाषांची इंडो-युरोपिअन भाषांशी असलेली संगती अगदीच उघड आहे, ह्यात केवळ शब्द साधर्म्य नव्हे तर व्याकरणातील साधर्म्य ही दिसते. माझ्या मते हा भाषांचा 'परिवार सिद्धांत' आता सर्वमान्य आहे. विशेषतः फ्रेंच भाषेचा अभ्यास करताना बरेच मुद्दे लक्षात येतात. आपल्या मते ग्रीक, लातिन ह्या पुरातन असून संस्कृत ही त्यातून निर्माण झाली आहे काय?
    २. ऋग्वेद जर आधी अन्य भाषेत असेल तर त्याचे पुरावे (काही न कळणारे शब्द सोडून) काय? अशी काही हस्तलिखिते सापडली आहेत काय?

    संस्कृत ही दैनंदिन व्यवहाराची भाषा नसावी ह्या म्हणण्यात नक्कीच तथ्य आहे. ती कृत्रिम भाषा असेही म्हणता येईलच. प्राकृत भाषांमधून शब्द घेउन ह्या भाषेची निर्मिती झाली असावी हे खरे वाटते. तथापि माझे प्रश्न प्राचीनत्वाबद्दल आहेत. संस्कृत ही नक्कीच सर्वात प्राचीन भाषा नव्हे, परंतु ऋग्वेद हे सर्वात प्राचीन साहित्य मानले गेले आहे. आता ते भाषांतरित आहत असे तुम्ही म्हणता आहात. पण एवढ्या मोठ्या दाव्याकरता तसाच मोठा पुरावा हवा. केवळ न कळणाऱ्या शब्दांमधून हे सिद्ध होते असे मला वाटत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. संदीपजी, भाषा परिवार सिद्धांताबद्दल मी स्वतंत्रपणे लिहितोच आहे. मुळात भाषांचा जन्म कसा होतो हे लक्षात आले तर हा प्रश्नही मिटेल. त्याबाबत मी संशोधन केलेले असुन स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करत आहे. एकाच प्रकारच्या मानल्या जाणा-या भाषा स्वतंत्रपने विकसीत होवु शकतात, त्यासाठी परस्पर प्रभावांची गरज नाही. (भाषांचे मुलभुत मानसशास्त्र), प्राक्रुत भाषांची व्याकरणेही मग संस्क्रुत इतकीच इंडो-युरोपियन भाषांशी काही अंशी जुळतात. पण ध्वनीशास्त्र, शब्दक्रमपद्धती ई,त प्रचंड फरक का याचे उत्तर त्यातुन मिलत नाही. याकडे अत्यंत नव्या द्रुष्टीकोनतुन पहावे लागणार आहे, त्यासाठीच हा प्रपंच. क्रुपया मी आजच पोस्ट केलेला पाणिनीविषयकचा लेखही पहावा व आपल्या काही सुचना असल्यास नक्कीच कळवावे ही विनंती. धन्यवाद.

      Delete
  4. संजय जी
    माझी खरे तर भाषा तिची उत्पत्ती इ विषयांवर बोलण्याची पात्रता नाही.
    तरी सुद्धा माझ्या मनातील एक मत मी आपल्या समोर नमूद करू इच्छितो.
    मुळात अभिजात भाषा म्हणजे काय ह्याचे स्पष्टीकरण इथे देणे आवश्यक ठरेल.
    कारण अभिजात भाषा ह्या शब्दाचा अर्थ वेगवेगळा घेतला जाऊ शकतो.
    परंतु अभिजात भाषा याचा अर्थ 'जी भाषा पूर्वी मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात होती पण आता तिचे अस्तित्व तेवढेसे शिल्लक नाही' असा घेतला जातो.
    त्यामुळे संस्कृत ला अभिजात भाषा म्हणणे मला योग्यच वाटते.
    आपल्याच लेखात आपण असे म्हणाला आहात कि संस्कृत ह्या भाषेला इसवी सनाच्या तिसर्या शतकात मोठ्या प्रमाणावर गती मिळाली.
    परंतु हि भाषा आज शोचनियतेप्रत पोचली आहे.
    म्हणजेच हि भाषा अभिजात म्हणण्यास योग्य आहे.
    आज मुख्यतः पाली अर्धमागधी आणि संस्कृत या भाषा अभिजात मानण्याचे कारण तेच आहे कि या भाषा पूर्वी मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात होत्या पण आता त्या नाहीत.
    त्याच प्रमाणे श्री संदीप यांनी मांडलेल्या मताप्रमाणे कि केवळ वैदिक साहित्यातील काही शब्द संस्कृत व्याकरणात बसत नाहीत म्हणून वैदिक साहित्य हे भाषांतरित आहे असे म्हणणे मला योग्य वाटत नाही.
    तरी मी आपल्या उत्तराची अपेक्षा करतो.
    कळावे,
    स्वरंग सचिन पुंडलिक

    ReplyDelete
    Replies
    1. प्रिय स्वरंगजी,

      अभिजात भाषेचे खालील मापदंड आहेत:

      १. ती भाषा किमान २००० वर्ष जुनी असली पाहिजे.
      २. त्या भाषेची निर्मिती स्वतंत्रपणे झालेली असली पाहिजे.
      ३. ती भाषा जनव्यवहार व साहित्य व्यवहाराची महत्वाची माध्यम असली पाहिजे.
      ४. त्या भाषेत स्वतंत्र असे ग्रंथ (काव्यादि साहित्य) निर्माण झालेले असले पाहिजे.
      ५. ते भाषा आज जीवंत कि मृत हा निकष महत्वाचा नसुन त्या भाषेच्या अस्तित्वकालात तिने संस्क्रुतीत काय स्वतंत्र भर घातली हे पाहिले जाते.

      हे वरील महत्वाचे निकष आहेत. संस्कृत ही कधीही जन-बोलीभाषा नव्हती तर ग्रांथिक भाषा होती. तिची निर्मिती ही स्वतंत्रपणे झालेली नसुन एतद्देशीय रुढ प्राकृत भाषांचेच एक अभिनव सम्मिश्रण करत बनवली गेलेली भाषा आहे. या भाषेत अगदी स्वतंत्र (उदा. रामायण महाभारत ते पार ऋग्वेदही पोराकृत भाषेत होते.) निर्मिती तिस-या शतकापासुन सुरु झालेली असुन ही भाषा माहाराष्ट्री, अर्ध-मागधी, मागधी, शौरसेनी, व्रचदा सिंधी, तमिळ, तेलगु या भाषांपेक्षा अर्वाचीन आहे. संस्कृतला अभिजाततेचा दर्जा मिलाला कारण इंडो-युरोपियन भाषासमुदायाची ती जननी मानली गेल्याने, पण आता तेच मत असत्य ठरत आहे. ऋग्वेदात काही नव्हेत असंख्य शब्द आहेत जे मुळ द्राविडी व प्राकृत भाषांतील आहेत. प्राकृत भाषा या संस्कृतोद्भव आहेत असे मानण्याचा प्रघात होता परंतु प्राकृत भाषांचे व्याकरण संस्कृताशी अत्यल्प मेळ खाते हे पाश्चात्य विद्वानांनी सिद्ध केलेच आहे. माझी या विषयावरची लेखमालिका अवश्य वाचत रहा म्हनजे काही मुद्दे पुराव्यानिशी मांडलेले आपल्याला आढलतील. अगत्यपुर्वक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.

      Delete
  5. भाषा पुरातन असती तर लिपी नक्कीच असती जशी ग्रीक, ल्यटीन, पर्शियन व भारतीय प्राक्रुत भाषांची होती.
    this statement is very much wrong, please study whole world languages. with few referances don't come to this conclution. sankrit kiti juni kiti navi ha vegala mudda aahe. bhasha aahe mhanaje lipi aasatech aase nahi.kindly research more, your article is very good and need to study further or at least i can say that we must study this subject.
    secondly in india the languages changes at 12 mail. we have very vast no of boli bhasha and therefore we can't jump to any conclusion at one stress. from latin we can see many english words are taken, but latin is different from english.
    u have raised good point.

    ReplyDelete
  6. मला असे वाटते की भाषा समृद्ध करण्यासाठी इतर भाषातून शब्द घेतले जातात,आणि भाषा समृद्ध होते,राज्यकर्त्यांनी आज जो हिंदी बाबत व्यवहार चलवलाअहे तोच प्रकार पूर्वी घडला असेल.सर्व भारताला एक भाषा - हा नियम लावून प्रत्येक भाषेतून प्रतिशब्द घेत भाषा समृद्ध होऊ शकते.
    उदा.पाणी साठी - जल,पय,तोय,नीर,वारी,अंबू .. ..असे .. .. दक्षिणेत नीर, उत्तर प्रदेशात जल,ओरिसात वारी असे प्रत्येकातून एक प्रतिशब्द घेत असे बिरूद मिरवता येते कि आमची भाषा किती श्रीमंत.
    इंग्रजांनी पण आपले शब्द त्यांचात घेऊन त्यांची भाषा श्रीमंत केलीच ना.. हा एक मला सुचलेला विचार .. तो तुमच्या शास्त्रात बसानार्ही नाही ,एक मुक्त विचार , इतकेच .

    ReplyDelete
  7. कश्याला रे नको ते संशोधन करून बुद्धी च प्रदर्शन करता ? वेद हे प्राकृत मद्धे होते , आजची मराठी आणि आधीची मराठी एक आहे का ? तेवढाच फरक प्राकृत आणि संस्कृत मद्धे आहे , प्राकृत बिजोक्त आहे . म्हणजे वं या बीजाचा अर्थ अमृत आहे असा . संस्कृत मद्धे त्याला अमृत म्हणतात .
    वेदांच्या आधी विविध भाषा अस्तित्वात होत्या हे खर पण वेद जेव्हा ऋषींनी आत्मसात केले तेव्हा ती भाषा देव-भाषा म्हणून पुढे गेली . सातवाहन काळा आधी संस्कृत मुख्य दरबारी भाषा होती पण नंतर स्थानिक भाषा पुढे आल्या . तरी स्थानिक भाषेत असलेल्या कित्तेक चुका संस्कृत वापृणार पूर्ण करण्यात आल्या . तेलुगु सर्वात जास्त संस्कृतच्या जवळची आहे आणि संस्कृत शिकण्याची सर्वात मोठ्ठी केंद्र हि दक्षिण भारतात होती . कांची त्या साठी सर्वात जास्त प्रसिद्ध होत .
    संस्कृत ला पुरावे नाहीत अस तुला का वाटत ? जेवढे प्राचीन महापुरुष आहे त्यांची नाव संस्कृत नियम आधारित आहेत . दुसर्या भाषेत सांग कृष्ण नावाचा अर्थ . वैदिक नाव आहे ते , कृशांती ण स कृष्ण ... जो आनंद आकर्षित करतो तो कृष्ण .
    याचा अर्थ कृष्णाच्या काळात संस्कृत होती .

    ...आर्य हरीतेजम

    ReplyDelete
  8. दुष्काळ पडला भावार्थाचा| विश्‍वास दृढ कैचा|
    विवेक आणि वैराग्याचा| फड मोडोनि गेला॥
    स्वधर्माचा लोप झाला| अधर्मी जन प्रवर्तला|
    स्वइच्छा गोंधळ घातला| कलीसे सावकाश॥
    भक्ति अवधी बुडाली| आणि अभक्ती ठाकली|
    भक्तिच नाही या मुक्ती| कैची असेल तेथे॥

    ------श्री समर्थ रामदास

    ReplyDelete
  9. खूप छान लेख

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...