Tuesday, August 13, 2013

समाजव्यवस्थेला पंगू करणारे अन्नसुरक्षा विधेयक!



अन्न सुरक्षा विधेयक अनेक कारणांनी गाजते आहे. त्यात सामाजिक कारणे किती आणि राजकीय कारणे किती हा भाग अलाहिदा, परंतू स्वातंत्र्यानंतर आता ६६ वर्ष उलटून गेल्यानंतरही भारतात कुपोषणाचा प्रश्न भेडसावत असेल आणि त्यासाठी केवळ लोकप्रियतेसाठी निवडणुकांवर डोळा ठेवत असे विधेयक मांडले जात असेल तर आपल्याला या विधेयकाच्या अन्य काळ्या बाजुही तेवढ्याच प्रखरतेने पहायला हव्यात. सध्या सरकार शेतक-यांच्या हिताचे आहे कि अहिताचे आहे हा प्रश्न निर्माण व्हावा अशा पद्धतीने उलट-सुलट निर्णय घेत आहे. येवू घातलेला नवीन भुमी अधिग्रहण कायदा, कमाल भूधारणा कायदा आणि अन्नसुरक्षा विधेयक ही अंतत: शेतक-यांचेच अस्थित्व संपवतील...मग अन्न सुरक्षा विधेयक राबवायला अन्न कोठून आणनार हा प्रश्न निर्माण होतो.

प्रत्येकाला सकस अन्न मिळायलाच हवे याबाबत कोणाचेही दुमत असू शकत नाही. किंबहुना तो मुलभूत मानवी अधिकार आहे व याची जाण आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. एकीकडे भारत महासत्ता म्हणुन पुढे येण्याचे स्वप्न पहात व दाखवत असतांना भारतात कुपोषनाचे प्रमाण प्रचंड आहे. मुले व स्त्रीया कुपोषणाच्या सर्वाधिक बळी ठरत आहेत. मेळघाटासारख्या आदिवासी भागात कुपोषणाने होणा-या बालमृत्युंचे प्रमाण शेकडो कोटींच्या योजना जाहीर करुनही कमी होत नाहीय. दुसरीकडे शेतक-यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही कमी होण्याचे नांव घेत नाहीय. शाळांत विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे व त्यात सातत्यही रहावे म्हणून माध्यान्ह भोजनाची योजना चालुच आहे. एकार्थाने शाळा या भोजनघरे बनलेल्या आहेत. यामुळे शिक्षितांचे प्रमाण खरोखर किती वाढनार आहे हा एक वेगळाच प्रश्न आहे व त्याचे समाजशास्त्रीय अध्ययन अद्यापतरी झालेले दिसत नाही. पण जीही काही निरिक्षणे समोर येताहेत त्यावरुन विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण त्यांना पाचवी होवूनही साधी बाराखडी येवू नये इतके निकस बनले आहे हेही उघड आहे. थोडक्यात शासकीय योजना जनतेच्या व भावी पिढ्यांच्या हितासाठी आहेत कि त्यांचे अपरंपार नुकसान करण्यासाठी यावर गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

अन्न हा मानवाचा मुलभूत अधिकार आहे हे खरे आहे. परंतू यासाठी शासनाने महागात अन्न खरेदी करुन नगण्य किंमतीत दारिद्र्यरेषेखालील लोकांना वाटावे कि दारिद्र्यरेषेचाच नायनाट होईल यासाठी दीर्घमुदतीच्या योजना आखाव्यात व राबवाव्यात आणि बाजारभावाने हवे ते अन्न खरेदी करण्यासाठी त्याला सक्षम करावे हा आहे. हा फरक नीट लक्षात घेतला पाहिजे. आज सरकारे आकडेवा-या काहीही सांगत असल्या तरी दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या किमान ३५ कोटी एवढी अवाढव्य आहे. ही संख्या थोडकी नाही. सर्वच नसले तरी यातील किमान २० कोटी जनसंख्या कुपोषित आहे. या २० कोटींत बव्हंशी स्त्रीया आणि मुले आहेत. गर्भवती स्त्रीयांना पोषक आहार मिळत नसल्याने त्याचा परिणाम साहजिकच बालकांच्या आरोग्यावर होणे अपरिहार्य आहे. अन्नसुरक्षा विधेयकात गर्भवती स्त्रीयांसाठी योजना आहे हे खरे आहे पण त्यामुळे कुपोषण थांबेल काय हा कळीचा मुद्दा आहे.

दारिद्र्य रेषेखाली येणारे समाजघटक पाहिले तर त्यात अल्पभुधारक व कोरडवाहू शेतकरी, शेतमजूर, भटके-विमुक्त असे वर्ग मोडतात. अजुनही अनेक विखुरलेले वर्ग आहेतच. आज अन्नधान्याचे उत्पादन करणारे बव्हंशी शेतकरीच दारिद्र्यरेषेखाली आहेत. अन्न १ ते ३ रुपये किलोच्या दराने सहज मिळू लागले तर ते अन्नधान्य पीकांची तुलनेनी महागडी जाणारी लागवड करतील काय हा खरा प्रश्न आहे. ते अन्य पीकांकडे वळण्याचीच शक्यता अधिक आहे. याचे कारण म्हणजे सरकार हमीभावाने जरी अन्नधान्याची खरेदी करत असले तरीही वाढत्या उत्पादन खर्चांमुळे छोट्या शेतक-यांना ते परवडत नाही. याचा एकुणातच अन्न-धान्य उत्पादनांवर किती परिणाम होणार आहे याचा अभ्यास झाला आहे असे दिसून येत नाही. परंतू अन्नधान्य उत्पादन ब-यापैकी कमी होण्याचा व नाईलाजाने आयात करण्याचा धोका यातून उभा राहू शकतो यावर पुरेशा गांभिर्याने विचार करण्याची निकड आहे.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे (वितरणव्यवस्थेत त्रुटी राहणार नाहीत हे गृहित धरले तरी) स्वस्तात मिळनारे हे अन्न-धान्य कितपत सुपोषण करू शकेल हा आहे. रेशनवर सध्या उपलब्ध मालाचा दर्जा पाहता हा प्रश्न पडने स्वाभाविक आहे. योग्य व शास्त्रीय साठवणक्षमतेच्या अभावामुळे अन्न-धान्याचा दर्जा घसरत जातो. तेच अन्न-धान्य शेवटच्या गरजवंतापर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या दर्जात होणा-या हानीचा विचार केला तर ते कितपत सकस राहील हा प्रश्नच आहे. त्यात अपेक्षितच असलेल्या लांड्या-लबाड्या-चो-या व भ्रष्टाचाराचा विचार केला तर ही अन्नसुरक्षा योजना बाबुशाहीला "आर्थिक सुपोषित" करण्यासाठीच वापरली जाईल याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही.

सर्वांना पुरेसे अन्न मिळावे व तेही स्वस्तात हा मानवतावादी दृष्टीकोण झाला. तो बाळगणे वावगे म्हणता येणार नाही. परंतू त्याचे पुढचे समाजमानसशास्त्रीय तोटेही समजावून घेतले पाहिजेत. सध्याच्या एकुंणातीलच समाजपरिस्थितीत श्रमसंस्कृती लयाला जाऊ घातलेली आहे. अर्धशिक्षित तरुणांना आधीच शेतीत रस नाही पण जगण्याचे अन्य साधन नाही म्हणुन तो शेती करतो. आहे त्या उत्पन्नातून तो बाजारभावाने अन्न-धान्य विकत घेतो अथवा स्वत:च्या शेतीत पिकलेलेच अन्नधान्य वापरतो. अन्नसुरक्षा विधेयकामुळे जगणे स्वस्त झाले तर कष्ट करण्याच्या प्रवृत्तीही कमी होणार नाहीत याची हमी कोणीही देवू शकनार नाही. त्यासाठी शासनाची कोणती पर्यायी योजना आहे? शिवाय अन्नसुरक्षा विधेयकामुळे खरेदीदार (मग तो गरीब का असेना) आपले निवडस्वातंत्र्य कसे वापरणार? उपलब्ध आहे तो आणि त्याच दर्जाचा माल घेणे त्याच्यावर नकळतपने बंधनकारक होणार नाही काय? हा त्याच्या मुलभूत स्वातंत्र्याचा संकोच नव्हे काय? 

इंदिराजींनी गरीबी हटावचा नारा देऊन आता अनेक दशके उलटुन गेली आहेत. किंबहुना गरीबी हाच प्रत्येक निवडणुकीतील कळीचा मुद्दा राहिलेला आहे. तरीही आज अन्नसुरक्षा द्यावी लागण्याचा अर्थ गरीबी हटलेली नाही एवढाच होतो. प्रत्येक नागरिकाची क्रयशक्ती वाढत नाही तोवर अर्थव्यवस्था सबल होऊ शकत नाही हा अर्थशास्त्राचा साधा नियम आहे. आज एवढ्या अवाढव्य लोकसंख्येची क्रयशक्ती अन्न-धान्यही विकत घेता येत नाही एवढी खालावलेली असेल तर सरकारने आपल्या शासनक्षमतेवर शरम बाळगली पाहिजे. गरीबीची व्याख्या काय आणि कोणाला दारिद्रयरेषेखालील मानावे याबाबतचे निकष (आणि अनेकांनी या संदर्भात तोडलेले तारे) वगळले तरी दारिद्र्य आहे आणि ते भिषण आहे हे वास्तव समजावून घ्यायलाच हवे. त्यासाठी सामान्यांची क्रयशक्ती वाढावी व या अवाढव्य श्रमशक्तीचे निर्मितीक्षमतेत कसे परिवर्तन करावे याबाबत आपले अर्थतज्ञ काय करत आहेत? त्यासाठी जर त्यांच्याकडे मनरेगासारख्या कुचकामी योजना असतील तर त्यांच्या तज्ञतेबाबतच शंका घ्यायला पुरेसा वाव आहे. या विधेयकामुळे अर्थव्यवस्थेवर काय ताण पडेल हाही प्रश्न आहे. त्याची भरपाई कोठुन करनार याचे उत्तर सर्वांनाच माहित आहे. पण ताण पडायचाच असेल तर तो अधिक उपयुक्त पद्धतीने पडला तर त्यात वावगे वाटनार नाही. निरर्थक ताण हा अर्थव्यवस्थेला मारकच ठरेल हेही आपल्याला लक्षात घेतले पाहिजे.

खरा प्रश्न आहे तो अन्न-धान्य स्वस्तात देण्याचा नसून लोकांची एकुणातील क्रयशक्ती कशी वाढवायचा हा आहे, होता आणि पुढेही राहील. ख-या प्रश्नांना सोडवण्यात अपयश आले कि त्यावर सोपी पण तकलादू उत्तरे फेकून त्यांचे मतांत रुपांतर करण्यात सर्वच राजकारणी तरबेज झालेले आहेत. अन्नसुरक्षा विधेयक हा त्यातीलच एक भाग आहे. यामुळे कुपोषण कमी होईल हा तर निखळ भ्रम आहे. एक तर आपल्या सामाजिक व्यवस्थेत स्त्रीयांचे स्थान दुय्यम असल्याने व तिच्याकडुन पुरुषापेक्षाही अधिकची राबवणुक करुन घेण्याची प्रवृत्ती असल्याने अगदी फुकटात मिळाला तरी तिच्या वाट्याला पुरेसा पोषक आहार येण्याची हमी कोणीही घेऊ शकत नाही. गर्भावस्थेच्या काळात तिला मोफत भोजन पुरवले म्हणजे सक्षम अपत्ये जन्माला येतील हाही अवैज्ञानिक भ्रम आहे कारण तिची शारीरस्थिती ही आधीपासुनच दुर्बल बनलेली असेल तर या सहा-नऊ महिन्यांच्या भोजनाने त्यात कितीसा फरक पडणार आहे?  मला वाटते यावरही विचार करण्याची गरज आहे. आणि यावरील उत्तर हे समाजव्यवस्थेच्याच मुळात आहे व ते बदलवण्याचे कार्य अन्नसुरक्षा विधेयक कसे करू शकणार आहे?

प्रत्येक नागरिकाला स्वाभिमानाने जगण्याचा हक्क आहे. त्याला रोजगाराचा हक्क आहे. रोजगार हक्क वाढवत...त्याचे मूल्य वाढवत त्यातून अधिक मुल्यवर्धकतेची कामे करून घेत प्रत्येकाची क्रयशक्ती कशी वाढेल यासाठी योजनांची गरज आहे. त्या सक्षमतेने राबविण्याची गरज आहे. त्यातुनच त्याच्या निवडस्वातंत्र्याचे आणि स्वाभिमानाचे रक्षण होईल. आजही असंख्य सामाजिक घटक हे आपल्या एकुणातील अर्थव्यवस्थेच्या परिघाबाहेर आहेत. भटक्या-विमुक्तांचा यात लक्षनीय समावेश आहे. त्यांच्याकडे तर साधी राशनकार्डेही नाहीत. त्यांच्यासाठीच आजतागायत जे सरकार काहीच करू शकले नाही, ज्यांना साधी सामाजिक सुरक्षा नाही, ज्यांना नागरिक म्हणुन ओळखले जात नाही...त्यांचे काय करायचे? जेथे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे ते बाजूला ठेवत लोकप्रियतेच्या लाटांवर वाहून जायचा ज्यांचा मानस आहे त्यांना एक प्रश्न विचारायला हवा तो हा कि आजवर अनेक राज्यांत प्रादेशिक पक्ष स्वस्त धान्याच्या घोषणा देत निवडुन आलेले आहेत...त्यांच्या या घोषणांचे काय झाले? किती लोक अन्नसुरक्षा प्राप्त करू शकले?

अन्नसुरक्षा विधेयक हे समाजाला व अर्थव्यवस्थेला पंगू करणारे ठरेल त्यामुळे त्याचा गांभिर्याने विरोध झाला पाहिजे व अधिक सक्षम पर्याय पुढे आणला गेला पाहिजे.


18 comments:

  1. अन्नसुरक्षा विधेयक हे समाजाला व अर्थव्यवस्थेला पंगू करणारे ठरेल SAHAMAT

    ReplyDelete
  2. अहो , तुम्हीतर डांगोरे पिटत असता की या ब्लोग वर विरोधी भूमिका देखील छापली जाते

    मग हे काय आहे ?

    आधीची मेल हवेत विरली वाटते ?

    अस काय लिहिले होते त्यात ?अडचणीचे का असभ्य ?

    हेच खाली लिहिले आहे तेच ना ?


    छापणार का आता ?

    प्र. रा ग जाधव यांनी आणि इतर अनंत लेखक विद्वानांनी यापूर्वी व्याकरण आणि भाषाशुद्धी याबद्दल आग्रही भूमिका मांडली आहे

    ते तर अनेक वर्षे साहित्य संमेलनाशी संबंधित आहेत - पण त्यांचे तुम्हाला काय ?आपण थेट व्याकरण आणि साहित्य शुचीतेवर घाला घालताय !अगदी साधे आनि पानी चे आणि पाणी करण्याबद्दल सांगितले तर तुमच्या नाकाला मिरच्या झोंबतात !



    " हा जो कोण ब्लोग लिहिणाररा संजय नावाचा माणूस आहे त्याला अजून मराठी शुद्ध लिहिता येत नाही आणि त्याचे विचार तर दूरच , पण त्याचे लिखाण अशुद्ध आहे त्याला साहित्य संमेलनाच्या

    मंडपात कुठे बसवायचे ?


    सतरंज्या गोळा करा -

    आधी न आणि ण चा फरक लेखणीतून आणि जिभेतुन सिद्ध करा आणि मग अध्यक्ष पदाचे बोल !

    न जाने कहा कहासे आ जाते है "

    ReplyDelete
    Replies
    1. Navane liha ani sabhya bana...pratikriya tashach rahtil...rahile vyakaran...te kon tharavnar?
      Tumhi ki tathakathit bhashapandit jyana bhashach samajat nahi?

      Delete
    2. Puneri Punekar ! Without doing anything they want to comment on grammar and useless nonsense . Sanjay ji aage badho ! Lingo is not important content is !!

      Delete
    3. अहो अभय तरंगे ,

      कुठे हवेत तरंगताय ?का भाराकाताताय कातलेल्या पतंगासारखे ?- दिशाहीन आणि कणाहीन ?

      म फुले पुणेकर होते

      डॉ आंबेडकर पुणेकर होते

      खुद्द शिवाजी महाराज लाल महालात राहात - तो पुण्यातच आहे -ते काय सातारला नव्हते रहात !

      महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे पुण्याचेच

      पुण्यात रुजलेल्या- मोठे झालेल्या किती जणाना भारतरत्न मिळाले - तुम्हीच बघा !

      विनोबा भावे आणि पां वा काणे ,भीमसेन जोशी , लता मंगेशकर यांचे बरेचसे कर्तृत्व पुण्यात घडले तसे त्यांनी अनेक वेळा आपल्या भाषणातून सांगितले आहे ! सगळे भारतरत्न !

      गमतीचा भाग म्हणजे - खास संजय सोनवणी साठी - सगळे आपापल्या कार्यात मराठी व्याकरणाचा मान राखत होते - की . भीमसेन जोशी तर प्रत्येक अक्षर शुद्ध म्हणायचा आग्रह धरत - मराठीचा - स्वतः कानडी असून -लता मंगेशकर तर संस्कृत आणि मराठी उच्चार याबाबत अत्यंत दक्ष असते !विनोबा आणि पां वा काणे तर संस्कृतचे गाढे अभ्यासक !आणि दोघेही महर्षी शिंदे आणि महर्षी कर्वे तर सरस्वतीचे पुजारीच !


      पुण्यात उत्तम महाविद्यालये कुणी काढली ?

      टिळक आगरकर या लोकांनी रक्ताचे पाणी करून राष्ट्रीय शिक्षण या भूमिकेतून स्वतःला त्रास करून हे ज्ञान वृक्ष रुजवले - आत्ता सारखा पतंगराव आणि इतरांसारखा पैसे कमावण्याचा उद्योग केला नाही -

      पुणेकरांनी काहीही केले नाही हे म्हणणे म्हणजे स्वतःच्या नपुसक कर्तृत्वहीन आयुष्याच्यावरून तर निष्कर्ष काढत नाही न आपण ?

      पुण्याच्या ज्ञान विश्वाला प्रचंड परंपरा आहे !सर्व जातीचे आणि जमातीचे लोक या नगरीने आपले मानून त्यांना यशाचा मार्ग दाखवला आहे !

      पुणेकर हे काहीही करत नाहीत हे थोतांड आहे - तशा कथा रचणे हा तुमचा खानदानी पेशा दिसतो आहे !

      बोल संजय राव - तुम्हालापण झोप लागली वाटते ?

      का तुमचे हितसंबंध दडले आहेत अशा प्रकारचे छापण्यात ?

      बोला - बोला !

      उचलली जीभ आणि लावली टाळ्याला - हा प्रकार बंद करायला शिका जरा !असे जरा त्या अभय तरंग्याला सांगा !

      Delete
  3. सर, तुम्हाला पूर्ण अनुमोदन. बाकीच्यांकडे लक्ष देऊ नका नाहीतरी आपल्या लोकांना दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टींना चांगले म्हणणे जमत नाही. तुम्ही लिहिले आहे ते अगदी खरे आहे. मुळात योग्य रस्ते, धान्य साठवून ठेवण्याची योग्य क्षमता करणे. लोकांना प्रामाणिकपणे काम करायला लावणे आणि कायद्याची योग्य अमलबजावणी करणे वगैरे काहीही करणार नाहीत पण लोकांना असे काहीतरी करून फक्त सत्तेवर येणे आणि मुर्खा बनवणे एवढेच करणे हाच एक आपल्या राजकाराण्यान्चा आवडता धंदा झाला आहे.

    ReplyDelete
  4. बरे झाले व्याकरणाबद्दल बोललात

    ज्या संस्थेच्या निवडणुकीसाठी इतके अस्वस्थ झाला आहात त्याच साहित्य संस्थेने व्याकरणाबाबत भरीव कार्य केले आहे !

    त्याचे भान आपल्याला आहे का ?

    संध्यासमयीच्या गुज गोष्टी या पुस्तकात श्री रा ग जाधव काय लिहितात ?


    महाराष्ट्र राज्य शासनाने एक गोष्ट फार चांगली केली ती म्हणजे साहित्य संस्था साहित्यिक इत्यादींनी निश्चित केलेली मराठी शुद्धलेखनाची नियमावली झटकन संमत करून तिला अधिमान्यता दिली . भाषा संचालनालयाची स्थापना. या संस्थेतर्फे शासकीय पदनाम कोश , शासकीय भाषा व्यवहार यांची पद्धतशीर निर्मिती केली

    लोकराज्य ऑक्टोबर २ ० १ १ चा हा लेख आहे !

    भाषा मरतात आणि त्या मृत भाषांचा समाज नष्ट होतो ! त्यातील संचित टिकून राहाते .

    आपण व्याकरणावर विश्वासच ठेवत नसाल तर कठीणच आहे -

    जगातील प्रत्येक समृद्ध भाषेला व्याकरण आहे .

    त्यापेक्षा हेच व्यासपीठ वापरून आपण यच्चयावत व्याकरण पुरस्कर्त्यांचा निषेध करा की !

    तुमचे भंकस सिद्धांत गल्ली बोलात ठीक आहेत - ते गावठी टाळ्या मिळवून देतील पण चार सामिक्षकांपुढे तुमचेच हसे होईल !

    तेंव्हा या निमित्ताने जरा बोलते व्हा आणि करा सुरवात तुमच्या आतिषबाजीला -

    सच्चा भाषेला व्याकरणाच्या मर्यादा नसतात - इत्यादी इत्यादी !

    ReplyDelete
  5. आप्पा- बाळ स्वप्नाली - उगी उगी !

    बाप्पा - बाळ स्वप्नाली - इतकं काही गंभीर होण्याची गरज नाही

    आप्पा - आमच्या संजय रावांची हीच तर मजा आहे !

    बाप्पा - कुणी निंदा किंवा वंदा ते आपला मार्ग सोडत नाहीत

    आप्पा - बाल स्वप्नाली - अग हे असेच चालणार - जो माणूस आपल्या पुस्तकांच्या विक्रीतून किती पैसे आपल्याला मिळाले ते सांगण्यात धन्य मानतो त्याच्या लेखनाचा दर्जा बद्दल काय बोलावे ?

    बाप्पा - ह्या संजय साहेबांचे लेखनाचे विषय तर अतिशय बाष्कळ असतात !त्यांचा एक कंपू आहे आणि म्होरके आहेत ते नरके !साथीला सांगलीकर , चैतन्य असे फुटकळ शिष्यगण !

    आप्पा - आचार्य अत्रे आठवा , पु ल आठवा - खांडेकर शिरवाडकर आठवा - म फुले आंबेडकर आठवा , सावरकर टिळक आगरकर आठवा-इतिहास संशोधनात सांकलिया गम बा सरदार आठवा - राजवाडे सरदेसाई आणि सेतुमाधव पगडी आठवा -

    बाप्पा - अहो एकाची तरी सर आहे का यांच्या लिखाणाला ?

    आप्पा - इतके आचरत आणि बावळट लिखाण आम्ही आज पर्यंत पाहिले नाही -

    बाप्पा - आणि उद्दामपणा तर बोलूच नका ! दुसऱ्या अभ्यासकांचे सिद्धांत खोडून काढताना विनम्रपणा तर अजिबात नाही - त्यामुळे होते काय - त्यात अभ्यासू वृत्ती चा पूर्ण अभाव दिसतो आणि गोबेल्स तंत्र जास्त दिसते !हि काही अभिमानाची गोष्ट नाही -

    आप्पा - आणि म्हणे हे अध्यक्षपदासाठी उभे राहणार - डोम्बल आपल !

    बाप्पा - अहो यांचा साहित्य या प्रकाराशी कधी दुरान्वयानेही संबंध आल्या सारखे वाटत नाही !यांचे लिखाण म्हणजे शुद्ध पत्रिका रुपातले प्रचारकी लेखन !

    आप्पा - जाऊ द्या हो - यात पण आरक्षण मान्य करून टाका आणि बसावा त्या बिचाऱ्याला त्या औट घटकेच्या सिंहासनावर - !

    बाप्पा - बाळ स्वप्नाली - उगी उगी - हि सरड्याची धाव आहे - आलं का लक्षात !

    बेडकी कितीही फुगली तरी किती फुगून फुगून फुगणार ?

    आप्पा - आगदी लाखात एक बोललात !अहो ही त्यांची दुसऱ्याच निवडणुकीची रंगीत तालीम चालली आहे - २ ० १ ४ - आल का लक्षात ?

    ReplyDelete
  6. तिकडे काका पुतणे खो खो हसत बसले आहेत

    इकडे संभाजी ब्रिगेड खुदकन हसताहेत

    सातारकर तर काय परस्पर पावणे तेरा असं काहीतरी कुजबुजत आहेत -

    सगळ्यांना एकाच प्रश्न !

    आज पर्यंत कोणत्याही लेखकाने स्वतःच्या लेखनाचा इतका डांगोरा पिटला नसेल -

    बिच्चारे संजय राव ! इतके कसे हो तुम्ही हे !

    उगी उगी असं म्हणत आहेत त्या स्वप्नालीला ते खर तर तुम्हाला म्हटलं पाहिजे

    तुमच वाचन कमी - चिंतन फारच कमी - ममान तर अजिबातच नाही -

    नुसती पानेचा पाने छापत सुटलात म्हणजे काय लेखक झाला की काय तुम्ही ?

    जाऊ द्या हो राव - नका आपले हसे करून घेऊ सर्वांसमोर

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर लेख!!!!!!!!! धन्यवाद!

    ReplyDelete
  8. संजय सर,

    आपल्या निवडणुकीच्या निर्णयाचे वेगवेगळ्या तऱ्हेने , तीव्रतेने आणि तन्मयतेने

    स्वागत केल्याचे पाहून करमणूक होत आहे

    श्री रा ग जाधव यांना तथाकथित भाषापंडित म्हटलेले अजिबातच पटले नाही

    आपणास स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !

    ReplyDelete
  9. अहो अभय तरंगे ,

    कुठे हवेत तरंगताय ?का भाराकाताताय कातलेल्या पतंगासारखे ?- दिशाहीन आणि कणाहीन ?

    म फुले पुणेकर होते

    डॉ आंबेडकर पुणेकर होते

    खुद्द शिवाजी महाराज लाल महालात राहात - तो पुण्यातच आहे -ते काय सातारला नव्हते रहात !

    महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे पुण्याचेच

    पुण्यात रुजलेल्या- मोठे झालेल्या किती जणाना भारतरत्न मिळाले - तुम्हीच बघा !

    विनोबा भावे आणि पां वा काणे ,भीमसेन जोशी , लता मंगेशकर यांचे बरेचसे कर्तृत्व पुण्यात घडले तसे त्यांनी अनेक वेळा आपल्या भाषणातून सांगितले आहे ! सगळे भारतरत्न !

    गमतीचा भाग म्हणजे - खास संजय सोनवणी साठी - सगळे आपापल्या कार्यात मराठी व्याकरणाचा मान राखत होते - की . भीमसेन जोशी तर प्रत्येक अक्षर शुद्ध म्हणायचा आग्रह धरत - मराठीचा - स्वतः कानडी असून -लता मंगेशकर तर संस्कृत आणि मराठी उच्चार याबाबत अत्यंत दक्ष असते !विनोबा आणि पां वा काणे तर संस्कृतचे गाढे अभ्यासक !आणि दोघेही महर्षी शिंदे आणि महर्षी कर्वे तर सरस्वतीचे पुजारीच !


    पुण्यात उत्तम महाविद्यालये कुणी काढली ?

    टिळक आगरकर या लोकांनी रक्ताचे पाणी करून राष्ट्रीय शिक्षण या भूमिकेतून स्वतःला त्रास करून हे ज्ञान वृक्ष रुजवले - आत्ता सारखा पतंगराव आणि इतरांसारखा पैसे कमावण्याचा उद्योग केला नाही -

    पुणेकरांनी काहीही केले नाही हे म्हणणे म्हणजे स्वतःच्या नपुसक कर्तृत्वहीन आयुष्याच्यावरून तर निष्कर्ष काढत नाही न आपण ?

    पुण्याच्या ज्ञान विश्वाला प्रचंड परंपरा आहे !सर्व जातीचे आणि जमातीचे लोक या नगरीने आपले मानून त्यांना यशाचा मार्ग दाखवला आहे !

    पुणेकर हे काहीही करत नाहीत हे थोतांड आहे - तशा कथा रचणे हा तुमचा खानदानी पेशा दिसतो आहे !

    बोल संजय राव - तुम्हालापण झोप लागली वाटते ?

    का तुमचे हितसंबंध दडले आहेत अशा प्रकारचे छापण्यात ?

    बोला - बोला !

    उचलली जीभ आणि लावली टाळ्याला - हा प्रकार बंद करायला शिका जरा !असे जरा त्या अभय तरंग्याला सांगा !

    ReplyDelete
  10. शुद्ध भाषा म्हणजे काय हा एक प्रश्नच आहे . पेशव्यांची मोडी लिपीतली पत्रे कर व्याकरणाचे नियम लावून तपासली तर ? बरे वेद हे आर्ष म्हणजे अशुद्ध संस्क्रुत भाषेत आहेत हे माहित आहे काय …
    व्याकरणाचे नियम काळानुसार बदलत असतात .

    सध्या इंटरनेट वर लिहिण्याचा काळ आहे . त्यात इंग्रजी फोनेटिक टाइपराइटर वापरला जातो . त्यामुळे आणि आणि पाणि आणि कोणि वेगळ्या प्रकारे लिहिले जाते ……

    प्रमाण भाषा म्हणजे मुख्यत: पुण्याच्या पेशव्या ची बोली भाषा . त्याने हि भाषा कोकणातून आणल्याने कोकणातला कुणबी शुद्ध मराठि बोलतो ! तर सांगलीचे देशपांडे हि आनि पानि च करतात ……… तेंव्हा शुद्ध भाषा प्रमाण भाषा असा काही नसत ! शाळेतल्या मुलांसांठि एक ठीक आहे । पण सगळेच लेखन प्रमाणभाक्षेतुन होऊ लागले तर ते एकसुरी । बोर …. आणि कंटाळवाणे होईल … प्रमाणभाषेचा आग्रह वर्चस्व वाडी वृत्तीतून होतो आहे असे वाटते …

    ReplyDelete
  11. डॉ . अभिराम दीक्षित सर ,

    रा रा संजय सर

    आप्पा -प्रथम एक सांगू का ?

    आम्ही आप्पा बाप्पा -

    नेहमी आपापसात गप्पा मारत असतो - पण आपण विषय छान मांडला आहे - म्हणून ,



    बाप्पा -आम्ही आपणास स्वतः कोकणात घेऊन जाउन दाखवू शकतो की कोकणातला कुणबी , भंडारी अथवा खारवी - इतके कशाला अगदी कोकणस्थ ब्राह्मणही -अजिबात शुद्ध मराठी बोलत नाही - ( आपली येण्याची इच्छा असेल तर !) -गोकुळाष्टमीला ?- तरीही कोकणी माणसाच्या बोलण्याला गोडवा असतोच अगदी पुणेरी बोलीपेक्षा ! भाषेचा गोडवा व उत्स्फूर्तता आणि त्याची सर्वमान्य शुद्धता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत !आता सर्वमान्य म्हणजे काय ? तर सरकार जे काही मंडळ नेमते ते आपण सर्व साधारणपणे सर्वमान्य धरतो - उदा . आरक्षण ,जातीची दिली जाणारी शिफारसपत्रे यासाठीची सरकारने नेमलेली मंडळे , काहीजण जुन्या ग्रंथांची शुद्ध प्रत बनवतात - कुणाचे जन्म दिवस ठरवतात - उदा . छ . शिवाजी महाराज असो ! किंवा ज्ञानेश्वरी वा तुकाराम गाथेची सुधारीत प्रत असो -



    शुद्धता ठरवल्याशिवाय अशुद्धता ठरवता येणार नाही - नाही का ?आणि सगळ पुणेरी ते शुद्ध असतेच असेपण नाही !पुणेरी ही कल्पना आहे - जसे राष्ट्रीय हिंदी तसेच पुणेरी मराठी - कधीकधी ही हास्यास्पद ठरेल असेपण अवतार घेते - त्यावेळी आपण त्याला सरकारी मराठी म्हणून हिणवतो !

    बरीच वर्षे शासकीय निर्णय प्रक्रियेत कोकणस्थ ब्राह्मणांचा सहभाग असल्यामुळे असा समज झाला असावा की पुणेरी जे जे - ते ते सर्व ब्राह्मणी - असो !

    पण शामची आई च्या लिखाणात कोकणाचे वर्णन आहे पण भाषा कशी आहे ?बाळबोध - लिहिणारे साने गुरुजी कोकणातलेच - पण कुठेही भाषेत कोकणस्थी ( ? )आगावपणा नाही -



    -आप्पा - तसेच प्रत्येक विभागाचे आहे - मग ते खानदेशी असो किंवा वऱ्हाडी -प्रत्येक भागाच्या बोलीभाषेची गोडी अवीटच आहे , पण ती अधिकृत भाषा ठरत नाही

    पेशवे असोत किंवा शिवाजी महाराज - त्यांच्या काळात पण राज व्यवहाराची भाषा शुद्ध मराठी नव्हतीच - त्यात फारसी शब्द जास्त होते - छत्रपतींनी तर राज व्यवहार कोश तयार करण्यात पुढाकार घेतला - तो का ?

    तो अस्मितेचा प्रश्न असावा - एक वेगळे राज्य - त्याचा निर्माता - जन्मदाता - छत्रपती म्हणतो की आपली भाषा एका विशिष्ठ नियमांनी बद्ध असावी - "त्यांचे "शब्द आपण हिंदवी स्वराज्यात वापरावेत असे न होता आपण आपल्या लेखनाचे - राज व्यवहाराचे - नियम स्वतः तयार करू -त्यासाठी त्यांनी त्यावेळच्या शिष्ठ संमत लोकांची ( ब्राह्मण ? ) मदत घेतली - तो राज व्यवहाराचा भाग झाला - छत्रपती पूर्व काळा पासून ते थेट आजपर्यंत राज्यकर्ते भाषेचे धोरण असो किंवा शिक्षणाचे - ब्राह्मणांचा आधार का घेताना दिसतात ! निजाम असो किंवा बहामनी राज्ये किंवा मुघल अथवा स्वराज्य - वकील सगळे ब्राह्मण - असे का ? त्याना भाषेचा अभ्यास - आणि वाक्यांचे अर्थ लावता येत होते म्हणूनच ना ?



    बाप्पा -तसेच आज सरकार म्हणा किंवा काही संस्था - समजा साहित्य परिषद किंवा तत्सम कार्य करणाऱ्या संस्था असा विचार करून तसे काम करतात त्या वेळेस आपणपण काही नियम आणि बंधने स्वीकारणे भाग आहे - नाही का ?कारण अशाने कोणत्याही मुद्द्यावर कितीतरी पिढ्या एकमतच होणार नाही - जसे सध्या माहिती अधिकाराच्या कायद्याचे आपण बघत आहोत !-

    एक भाषा ( क्षणभर तिची शुद्धता बाजूला ठेवू या ) सर्वाना एकत्र ठेवेलच असेपण नाही हेपण आपण आता तेलंगण आणि इतर बाबतीत बघत आहोत !

    एका धर्माने तरी कुणाला एकत्र ठेवले का ?-युरोपियन आणि अरबी देश पाहिले की ते लगेच लक्षात येते -पण एक शिस्त म्हणून एक प्रांत एक भाषा या तत्वानुसार त्या भाषेच्या शुद्धाशुद्धतेसाठी तिचा जर व्यवहारात - कोर्ट कचेऱ्यात -शिक्षणात,आणि राज्य भाषा म्हणून वापर करायचा असेल तर तिला एक चौकट आणि व्याकरणाचे नियम मान्य करावेच लागतील - लागतात .ते न मानणे ही एक स्वनाळू फ्यांटसी म्हणता येईल -

    घराचे घरपण टिकवायला जसे घराचे नियम असतात तसेच देशाचे आणि प्रांताचे - नाही का ?










    ReplyDelete
  12. शिवाजी महाराजांनी राज व्यवहार कोषात " लई , वंगाळ ,शानपना ,अशा शब्दाना मान्यता दिली नाही - तात्पर्य - शुद्ध ते पुणेरी असेपण आम्ही मानत नाही आणि ते ब्राह्मणी तर मुळीच नव्हे असे आमचे मत आहे !

    आमचे हे मत रा रा संजय सोनवणी प्रेमाने ऐकून घेतील असे वाटते

    आप्पा - चला बाप्पा -

    बाप्पा - फार जाड जाड शब्दात बोललो नाही का ?

    आप्पा - राजभाषा हि बहुजनांची भाषा नसतेच -

    बाप्पा - पण ती असावी लागते हि पण एक अपरिहार्यता असतेच !

    आप्पा - चला माझी जीभ दुखायला लागली - खूप आईस्क्रीम खाल्यावर रामरक्षा म्हणायला सांगितले तर जसे होईल तसे झाले आहे - !

    बाप्पा - अच्छा !!

    आप्पा - अच्छा ! संजय महाराज !

    बाप्पा - खरच दमलो - हुश्श !

    आप्पा - छत्री विसरलात बघा - बाप्पा - थ्यांक यू - बर का -

    बाप्पा - अहो धन्यवाद म्हणा हो - आपल्या भाषेचा प्रश्न आहे - गाढवापुढे वाचली गीता -

    आप्पा - लई बिल झाल राव तुमच - कुणाला गाढव म्हणतो रे तू बोडक्या ?

    बाप्पा - अहो तस नाही हो - मी काय म्हणत होतो - त्याच अस आहे - - पेशवेकाळात आणि

    शिवकालात आणि शिवपूर्व काळात -

    आप्पा - गुमान घरी जावा आवाज न करता








    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...