Monday, August 19, 2013

सांस्कृतिक धोरणाचे काय झाले?

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण प्रकाशन

ज्या समाजाची संस्कृती प्रगल्भतेच्या व अधिकाधिक समृद्धीच्या वाटेवर असते तोच समाज सुसंस्कृततेचे मानदंड गाठण्यास व प्रगतीशील राहण्यास योग्य समजला जातो. संस्कृती ही विविध मानवी प्रतिभेच्या विविध व समर्थ अभिव्यक्तींतून आकाराला येत असते. भाषा, साहित्य, नाट्य, संगीत, शिल्पकला, चित्रकला, राजनीति ते नगररचनाशास्त्रातून संस्कृतीचा एकुणातील आविष्कार होत असते. ती प्रगतीशील रहावी, नवविचारांचे-संकल्पनांचे सृजन करणारी व सर्वसमावेशक असावी असे प्रयत्न होण्याची गरज असते. महाराष्ट्र राज्य हे देशातील एक पुरोगामी राज्य मानले जात होते. परंतू अलीकडे महाराष्ट्राचा एकुणातील संस्कृती विकासाचा वेग इतर राज्यांपेक्षा कमी झाला आहे असा आरोप अनेक विचारवंतही करू लागले आहेत.

महाराष्ट्र राज्याचे असे सांस्कृतिक धोरण असावे कि ज्यायोगे संस्कृती विकसनाची गती वाढेल आणि त्यात सर्वसमावेशकता येईल यासाठी २००९ मध्ये राज्य शासनाने डा. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. समितीने अभ्यास करुन व जनतेकडुनही सूचना मागवून आराखडा निश्चित केला आणि राज्य शासनास सोपवला. या अहवालाचे प्रकाशन ७ जून २०१० रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्याला आता तीन वर्ष होऊन गेली आहेत. अद्याप या अहवालातील कोणत्याही  शिफारशींवर घोषणांच्या पलीकडे आणि काही फुटकळ प्रशासकीय सूचनांवरील अंमलबजावणीपलीकडे काहीही काम झालेले दिसत नाही.  विचारवंत-साहित्यिकांना खूष करण्यासाठी समित्या नेमायच्या आणि त्यांच्या शिफारशींवर कोणतेही पाऊल उचलायचे नाही ही आपली शासकीय संस्कृती योग्य नाही. सांस्कृतिक संवर्धनाला प्रोत्साहन देण्याचे कार्य शासनाला पार पाडावेच लागते मात्र त्याचे भान हरपलेल्या राजकीय संस्कृतीमुळे आपले शासनकर्ते विसरले आहेत कि काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

डा. साळुंखे समितीने सांस्कृतिक धोरणामागील भुमिका स्पष्ट करतांना नमूद केले आहे कि, हे धोरण १. भारतीय संविधानाची मूळ उद्दिष्टे साध्य होतील, अशा रितीने आखण्यात आले आहे. २. सर्व समाजघटकांना आपापल्या विधायक सांस्कृतिक जीवनमूल्यांची जपणूक करण्यासाठी स्वातंत्र्य देणारे व साहाय्य करणारे आहे परंतु त्याबरोबरच आपल्यापेक्षा वेगळी सांस्कृतिक मूल्ये मानणाऱ्या समाजघटकांशी सुसंवाद साधणे आणि त्यांना समजावून घेणे हे स्वतःला अधिक परिपूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे, ही जाणीव वृद्धिंगत करणारे आहे. ३. महाराष्ट्राच्या सर्व सांस्कृतिक अंगांना सामावून घेणारे आहे. ४. सर्व उपक्रमांमध्ये शासनाचे प्रोत्साहन, साहाय्य इत्यादी देताना समाजाच्या विविध घटकांना आणि त्या त्या घटकांतील महिलांना उपक्रमांच्या स्वरूपानुसार यथोचित प्रतिनिधित्व देण्यासाठी बांधील आहे. ५. राज्याच्या सर्व भागांतील जनतेला लाभदायक ठरणारे आहे. ६. समाजाच्या सर्व घटकांतील आणि संस्कृतीच्या सर्व क्षेत्रांतील गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी व विकास साधण्यासाठी यथोचित उपक्रम राबविणारे आहे. ७. सर्वांना आत्माविष्काराच्या सुयोग्य संधी देणारे आहे. ८. महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवरील विविध सांस्कृतिक घटकांबरोबरची नाळ तुटू न देता समग्र भारतीय संस्कृतीबरोबरचे नाते दृढ करणारे आहे. ९. जागतिकीकरणाचा वेध घेत, भारताबाहेरील समाजांच्या संस्कृतींशी आदानप्रदान करीत विज्ञाननिष्ठा आणि मानवतावादी विचारांवर भर देणारे आहे. १०. महाराष्ट्राच्या परंपरेतील सध्याच्या काळात अभिमानास्पद ठरणाऱ्या उज्ज्वल वारशाची जोपासना करणारे, तसेच नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारे आहे. ११. व्यक्तीचे स्वातंत्र्य व समाजाचे हित यांच्यामध्ये संतुलन साधून त्यांना परस्परपूरक बनविणारे आहे. १२. केवळ नियम/कायदे करण्यावर विसंबून राहण्यापेक्षा समाजात इष्ट परिवर्तन व विकास घडविण्याचे उद्दिष्ट बाळगून लोकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रभावी उपक्रम राबविण्यावर भर देणारे आहे. १३. राज्यशासन सध्या राबवीत असलेले व विद्यमान काळाशी सुसंगत असे उपक्रम अधिक परिणामकारकरीत्या कसे राबविता येतील आणि वरील सर्व उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी या उपक्रमांमध्ये समन्वय कसा साधता येईल, याचा या धोरणात विचार करण्यात आला आहे. तसेच, विविध उपक्रमांची नव्याने भरही घालण्यात आली आहे. १४. हे धोरण योग्‍य त्‍या क्रमाने व टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने राबविण्‍यात येईल.

वरील भुमिका अत्यंत स्वागतार्ह आणि मराठी संस्कृतीच्या रक्षणास, विकसनास, आणि सर्व सामाजिक घटकांच्या सांस्कृतिक उद्गारांस सबल बनवत सांस्कृतिक एकोप्याकडे नेणारी आहे याच्याशी कोणीही सुजाण नागरिक सहमत होईल. या समितीने केलेल्या प्रशासकीय शिफारशी मी येथे देत नसून महत्वाच्या सांस्कृतिक शिफारशी खालीलप्रमाणे देत आहे...

१. दक्षिण आशिया संशोधन संस्था -' गेल्या ५० वर्षांत केंद्र शासनाच्या साहाय्याने अन्य काही राज्यांत प्रगत संशोधन संस्था निर्माण झाल्या असल्या, तरी महाराष्ट्रात अशा संस्था निर्माण झालेल्या नाहीत, हे वास्तव ध्यानात घेऊन दक्षिण आशिया मधील (‘सार्क’ राष्ट्रांचा) विविधांगी अभ्यास करणारी एखादी संस्था महाराष्ट्रात निर्माण करावी, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येईल आणि अशी संस्था स्थापन होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
२. प्रमाण भाषा कोश - मराठीसाठी प्रमाण भाषा कोश नाही. अशा प्रकारचा प्रमाण भाषा कोश तयार करण्यासाठी 'प्रमाण भाषा कोश मंडळ' स्थापन करण्यात येईल. मराठी प्रमाण भाषेच्या समृद्धीसाठी मराठी प्रमाण भाषेमध्ये प्राकृत, संस्कृत इत्यादी भाषांसह मराठी भाषेच्या विविध बोलींतील निवडक शब्दांचाही आवर्जून समावेश करण्यात येईल. याशिवाय भारतातील अन्य भाषांतून आणि विदेशी भाषांतून स्वीकारण्यात आलेले आणि आता मराठीत रुळलेले शब्दही विचारात घेतले जातील.
३. मराठी बोली अकादमी - राज्याच्या वेगवेगळ्या भागांत मराठीच्या विविध बोली बोलल्या जातात. या बोलींचे अध्ययन, अध्यापन, संशोधन, कोशनिर्मिती, साहित्यनिर्मिती तसेच या बोलींतून होणाऱ्या कलांच्या सादरीकरणाचे संवर्धन इत्यादींसाठी एक स्वतंत्र ‘मराठी बोली अकादमी’ स्थापन करण्यात येईल. .
४. लेखनपद्धती/वाक्प्रयोग-पुनर्विचार - गेल्या ५० वर्षांत भाषिक आणि एकूण सामाजिक परिस्थितीत घडलेले बदल, तसेच माहिती तंत्रज्ञानामुळे विकसित झालेली संपर्कसाधने इत्यादी बाबी लक्षात घेऊन मराठी भाषेसाठी वापरल्या जाणाऱ्या देवनागरी लिपीच्या लेखनपद्धतीमध्ये काही बदल करणे ही काळाची गरज बनली आहे. हा बदल करताना पूर्वापार मराठी लेखनपद्धतीमधील काळानुरूप स्वीकारार्ह भाग कायम ठेवून मराठी भाषा व्यवहारोपयोगी आणि अधिक समृद्ध करण्याकरिता लेखनपद्धतीचे नियम अधिक तर्कसंगत आणि अधिक लवचिक करण्यात येतील. लेखनपद्धतीच्या संदर्भात जुन्या विचारांचे योग्य भान ठेवून नवीन प्रवाहांचे स्वागत करणारे अभ्यासक/ तज्ज्ञ यांच्या अभ्यासगटामार्फत लेखनपद्धतीचे नवे नियम ठरविण्यात येतील, तसेच, मराठीतील विशिष्ट शब्द, वाक्प्रयोग इत्यादींचा वापर करण्याच्या बाबतीतही पुनर्विचार केला जाईल.
५. कलासंकुल - प्रयोगात्म व दृश्यात्मक कलांच्या संवर्धनासाठी विभागीय पातळीवर प्रत्येक महसुली विभागात 'कलासंकुल' उभारण्यात येईल. या संकुलांमध्ये नाटक, संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रकला, लोककला, आदिवासी लोककला, हस्तकला इत्यादींसाठी प्रशिक्षण, तालीम आणि सादरीकरण इ. साठी सोयी असतील. या सोयी भाडेतत्त्वावर कलाकार आणि सांस्कृतिक संस्था यांना उपलब्ध असतील. अशी संकुले उभारण्यासाठी शासन प्रत्येक विभागीय महसूल आयुक्तालयाला निधी उपलब्ध करून देईल.
६. खुले नाट्यगृह -प्रत्येक तालुक्यात एक खुले नाट्यगृह (ऍम्फी थिएटर) आणि जिल्हा पातळीवर एक छोटेखानी, सुमारे ३५० ते ५०० आसनक्षमतेचे नाट्यगृह खाजगी सहभागाने बांधण्यात येईल. ते मुख्यत्वे सांस्कृतिक उपक्रमांसाठी वापरले जाईल.
७. शास्‍त्रीय संगीतासाठी प्रोत्‍साहन योजना - मराठी रंगभूमी आणि लोककला यांच्‍यासाठी राज्‍य शासनाने अलिकडेच दोन स्वतंत्र प्रोत्‍साहन योजना (पॅकेज) जाहीर केल्या आहेत. त्‍याच धर्तीवर शास्‍त्रीय संगीतासाठी अनेक उपक्रमांचा समावेश असलेली शास्त्रीय संगीत प्रोत्‍साहन योजना अमलात आणली जाईल. शिष्‍यवृत्‍ती, सन्‍मानवृत्‍ती, जीवन गौरव पुरस्‍कार, संगीतसभांना (‘म्‍युझिक सर्कल्‍स’ना) अनुदान, महाविद्यालयीन पातळीवर शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्‍यासाठी अर्थसाहाय्य इ. उपक्रमांचा या योजनेत समावेश असेल.
८. ललित कला अकादमी – केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात दृश्यात्मक कलेसाठी कार्य करणाऱ्या संस्थेची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र ललित कला अकादमी स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्‍यात येईल. अकादमीच्या अंतर्गत सुयोग्य ठिकाणी कलाग्राम स्‍थापन करण्‍यात येईल. त्‍यामध्‍ये पुढील सुविधा असतील- धातू ओतशाळा (मेटल फाउंड्री), ग्राफिक्‍स स्‍टुडिओ, सिरॅमिक फाउंड्री, प्रदर्शनासाठी कलादालन, कार्यशाळा (वर्कशॉप शेड), भाडेतत्त्वावर आवश्यक तितके स्‍टुडिओ, खुले नाट्यगृह (ऍम्‍फी थिएटर), अतिथिगृह इत्यादी.
९. संतपीठ - पैठण येथे स्‍थापन झालेल्‍या संतपीठाचे कार्य तांत्रिक अडचणी दूर झाल्‍यानंतर त्‍वरित सुरू करण्‍यात येईल. हे संतपीठ सर्व धर्मांतील व जातींतील मानवतावादाचा पुरस्‍कार करणाऱ्या संतांच्‍या विचारांचे व कार्याचे अध्‍ययन आणि अभ्‍यास करणारे केंद्र म्‍हणून विकसित करण्‍यात येईल. शिक्षक व अन्‍य शासकीय कर्मचारी, तसेच सर्वसामान्‍य जिज्ञासू यांच्‍यासाठी लघुमुदतीच्‍या अभ्‍यासक्रमांचे केंद्र, संतांच्‍या विचारांवर संशोधन करणाऱ्या विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थ्‍यांसाठी संदर्भालय आणि विविध धर्मांतील व जातींतील संतांच्‍या विचारांचा/कार्याचा तुलनात्‍मक अभ्‍यास करण्‍यासाठी महत्त्वाचे केंद्र म्‍हणून सदर संतपीठ विकसित करण्‍यात येईल.
१०. परदेशात अध्यासने - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोलंबिया विद्यापीठात (अमेरिकेत) आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने ऑक्सफर्ड विद्यापीठात (ब्रिटनमध्ये) अध्यासन निर्माण करण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल. ही अध्यासने शासनाच्या आर्थिक सहभागाबरोबरच त्‍या दोन्‍ही देशांतील तसेच आपल्‍या देशातील लोकांच्‍या सहकार्यातून निर्माण करण्‍याचे प्रयत्न करण्यात येतील.
११. सहजीवन शिक्षण -'स्त्री-पुरुषांनी परस्परांना नीट समजावून घ्यावे, त्यांनी एकमेकांचा आदर करावा आणि एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी पोषक ठरावे, असे सहजीवनाविषयीचे प्रबोधनात्मक शिक्षण शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना देण्यात येईल. यासाठी मानसशास्त्र, वैद्यकशास्त्र इत्यादी क्षेत्रांतील तज्ज्ञ व परिपक्व व्यक्तींकडून/शिक्षकांकडून असे शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येईल.

या धोरणात अजुनही अनेक बाबींचा समावेश करणे आवश्यक होते. उदा. प्रशासकीय मराठी ही सामान्यांच्या आकलनापलीकडील व इंग्रजीची मदत घेतल्याखेरीज न समजण्यासारखी आहे. प्रशासकीय भाषा सोपी असावी यासाठीचा आग्रह धरणेही संयुक्तिक झाले असते. दुसरे म्हणजे जुन्या दुर्मीळ मराठी ग्रंथांचे डिजिटायझेशन. मल्हारराव होळकरांचे १८९३ साली प्रसिद्ध झालेले मुरलीधर अत्रेकृत मराठी चरित्र मला टोरोंटो विद्यापीठाने डिजिटायझेशन केले असल्याने उपलब्ध झाले. जे कार्य विदेशे विद्यापीठ करू शकते ते आपले महाराष्ट्र सरकार का करु शकत नाही?  सर्वात महत्वाचे म्हनजे मराठीतील गाथा सप्तशतीपासून ते आधुनिक काळातील साहित्यिकांच्या निवडक श्रेष्ठ कलाकृतींचे इंग्रजी अनुवाद करून ते जगभरच्या विद्यापीठांच्या ग्रंथालयांत उपलब्ध करणे तेवढेच आवश्यक आहे. ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा हीच मागणी गेली अनेक वर्ष सातत्याने करत आले आहेत. परंतू त्याबाबत काही झालेले नाही. असे असले तरी मुळात डा. साळुंखे समितीच्याच शिफारशी धूळ खात पडून आहेत तेथे या नव्या मागण्या शासन कोठुन मान्य करणार आणि मान्य झाल्या तरी त्यावर कोण अंमलबजावणी करणार? त्यासाठी जनमताचाच रेटा वाढवावा लागेल हे निश्चित आहे. सर्वांनीच त्यासाठी आपला आवाज उठवला पाहिजे. मराठी संस्कृतीच्या वृद्धीसाठी ते आवश्यक आहे.

82 comments:

  1. श्री विकास भाऊ

    आपली प्रतिक्रिया अत्यंत विचित्र आहे

    प्रचारकी आहे

    आम्ही कै . डॉ दाभोळकरांना अतिशय जवळून बघत आलो आहोत

    ते असे शब्द बंबाळ कधीही बोलत नसत -अतिशय महान होते ते -

    त्यांना श्रद्धांजली वाहताना उगाचच चिखलफेक करून डॉ दाभोळकरांच्या आत्म्यालाही क्लेश होतील - इतके उमदे व्यक्तिमत्व होते ते !

    आपल्या कृतीत त्यांचे विचार उतरवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल

    आणि तुम्ही त्यांचे निष्ठावंत असाल तर तुम्हालाही वेगळ्या प्रकारे दुःख प्रकट करावे असे वाटेल

    आणि त्यांच्या विचारांची गंगा तुम्ही निश्चित पुढे न्याल

    हि वेळ सर्व पुरोगामी विचारांच्या सत्व परीक्षेची आहे

    आपले नम्र

    आप्पा बाप्पा

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा बाप्पा बस करा गप्पा. तुमची चित्र-विचित्र प्रतिक्रिया वाचली आणि गोडसेवादी तसेच सनातनवादी शब्दांनी तुमचे पितळ उघडे पडले हेच खरे! कसे झोंबत आहेत शब्द! अतिशय उत्तम!

      Delete
    2. आप्पा बाप्पा says.......

      आपली प्रतिक्रिया अत्यंत विचित्र आहे?????????????????????????

      प्रचारकी आहे???????????????????????????????

      Comment is absolutely true, don't become upset and angry, think before you write anything.

      SUDHAKAR, ATALI-KALYAN.



      Delete
  2. श्री विकास भाऊ

    आपली प्रतिक्रिया अत्यंत विचित्र आहे

    प्रचारकी आहे

    आम्ही कै . डॉ दाभोळकरांना अतिशय जवळून बघत आलो आहोत

    ते असे शब्द बंबाळ कधीही बोलत नसत -अतिशय महान होते ते -

    त्यांना श्रद्धांजली वाहताना उगाचच चिखलफेक करून डॉ दाभोळकरांच्या आत्म्यालाही क्लेश होतील - इतके उमदे व्यक्तिमत्व होते ते !

    आपल्या कृतीत त्यांचे विचार उतरवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल

    आणि तुम्ही त्यांचे निष्ठावंत असाल तर तुम्हालाही वेगळ्या प्रकारे दुःख प्रकट करावे असे वाटेल

    आणि त्यांच्या विचारांची गंगा तुम्ही निश्चित पुढे न्याल

    हि वेळ सर्व पुरोगामी विचारांच्या सत्व परीक्षेची आहे

    आपले नम्र

    आप्पा बाप्पा

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा बाप्पा बस करा गप्पा. तुमची चित्र-विचित्र प्रतिक्रिया वाचली आणि गोडसेवादी तसेच सनातनवादी शब्दांनी तुमचे पितळ उघडे पडले हेच खरे! कसे झोंबत आहेत शब्द! अतिशय उत्तम!

      तुम्ही पक्के अंधश्रद्धाळू आहात, नाहीतर आत्मा शब्द वापरलाच नसता.(त्यांना श्रद्धांजली वाहताना उगाचच चिखलफेक करून डॉ दाभोळकरांच्या आत्म्यालाही क्लेश होतील - इतके उमदे व्यक्तिमत्व होते ते !)

      पुरोगामी विचार तुम्ही आम्हाला न शिकविलेलेच बरे!

      तुमचा भ्रम नष्ट होण्यासाठी वाचा "पुरोगामित्व म्हणजे काय?, लेखिका श्रुती तांबे"

      धन्यवाद!

      Delete
  3. महात्मा फुलेंच्या काळापासून असल्या प्रवृत्तींचा निषेधच होत आला आहे. पण आता नुसता निषेध न करता प्रत्यक्ष कृतीची वेळ आली आहे. सनातनी विचारधारेचा कणाच मोडून पडेल असे कृत्य करण्याची आवश्यकता आहे. वैचारिक लढा हा माणसांशी लढता येतो. पिसाटलेल्या जनावरांशी नाही.

    ReplyDelete
  4. 'प्रशासकीय भाषा सोपी असावी यासाठीचा आग्रह धरणेही संयुक्तिक झाले असते'
    हे मात्र अतिशय योग्य.

    ReplyDelete
  5. माझ्या कडून सुद्धा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा निर्घुण खून करणाऱ्या भ्याड गोडसेवादी, होय गोदासेवादीच, सनातनवादी, होय सनातनवादीच प्रवृत्तीचा जाहीर निषेध!

    एक समतावादी.

    ReplyDelete
  6. श्री विकास सर

    आपण कोण असाल ते असा - ते काही तितके महत्वाचे नाही

    आपण आप्पा बाप्पा यांना पुस्तके वाचायला सांगत आहात आणि त्यांच्या लिखाणावरून त्यांना मनुवादी प्रतिगामी म्हणत आहात आणि आपण स्वतःला फारच हुषार समजत असाल तर -आपण समोरासमोर प्रत्यक्ष भेटल्यास बरे होईल - श्री संजय सरांचा सल्ला घ्यावा या बाबतीत


    एक गोष्ट सांगतो की आपण फारच पुस्तकी आहात आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की

    डॉ दाभोळकर हे आमच्या भागातच रहात असत त्यांचा बहुतांशी सर्वांशी उत्तम संपर्क होता त्यांचे विचार आम्ही नेहमी ऐकत आलो आहोत आम्ही आणि आप्पा बाप्पा साधानाशी सुपरिचित आहोत ! असे म्हणणे चूक म्हणता येणार नाही

    मी तर साधानाशी १९६१ - ६२ पासून संपर्कात आहे आणि कदाचित आप्पा बाप्पा पण ! इतके ते ज्येष्ठ असावेत हे मी खात्रीने सांगू शकतो !

    मी माझी बहिण आम्ही साने गुरुजी कथा मालेत असायचो १९६२ साली - लायब्ररीचे कार्य करायचो -पहिल्या मजल्यावर = छोटीशी काचेची कपाटे होती लाकडी !आमचे वय ते काय - पण आमची तिथे एसेम ना ग गोरे अमरशेख अशी ओळख झाली तिथे चांगली चर्चा होत असे ती ऐकायला मिळे असो -


    आपल्याला असे उठसुठ दुसऱ्यांना हिणवायचा मक्ता कुणी दिला आहे ?अहो तुम्ही अशी मुक्ताफळे उधळण्या पुर्वी अपराधी भावनेने स्वतःच अंतर्मुख होणे जास्त योग्य होइल -


    नाही का हो संजय सर ?


    माझा फोन नंबर आणि राहण्याचे ठिकाण आपणास संजय सर सांगतील हवे असल्यास !


    आज आपण एका महान कार्य करणाऱ्या थोर महामानवाला मुकलो आहोत

    आप्पा आणि बाप्पा तर या लोकांशी फारच सख्य राखून होते हे खरे आहे

    विकास गुरुजी आपण एकतर वयाने लहान असाल किंवा आपण मंद बुद्धी असणार त्यामुळेच असे वेड्यासारखे बडबड करता आहात !

    आपले मौलिक प्रतिपादन ? ऐकावा किंवा प्रत्यक्ष भेटूया तरी - काय ?

    ReplyDelete
    Replies
    1. DATTATYEYA AGASHE,

      You are a dotard, senility man.

      (आपण म्हातारचळ लागलेला मनुष्य आहात)

      SUDHAKAR, ATALI-KALYAN.

      Delete
  7. विकास काका ,

    विकास काकू रागावतील बर का असे वागलात तर

    आपण सर्व सामान्यपणे एखाद्या दिवंगत व्यक्ती बद्दल बोलताना असे म्हणतोच की -

    त्यांच्या आत्म्याला वेदना - वगैरे वगैरे

    मे गोड रेस्त हिज सोल इन पीस असे म्हणतातच की विदेशात

    जगात हि एक आपल्या भावना व्यक्त करायची रीत आहे

    ज्याच्या बद्दल काही माहिती नाही अशा लोकांबद्दल गोडसेवादी सनातनी असे बोलणे आपणास शोभत नाही डॉ दाभोलकर असे नव्हते नेमकी हीच गोष्ट त्यांच्या कडून शिकायची तुमच्या कडून राहून गेली असे वाटते


    आज श्रीमती शैला दाभोलकर यांची मुलाखत आपण पाहिली का ?

    किती संयम राखला होता त्यांनी - हा दर्जा आपण सर्वजण का निर्माण करू शकत नाही ?


    आप्पा बाप्पा काय म्हणत होते - डॉ दाभोलकर यांचे विचार कृतीत आणूया - यात त्यांचे काय चुकले ?

    आत्मा शब्द वापरला म्हणजे काय जगबुडी झाली काय ?

    आपण प्रामाणिकपणे हे करून दाखवा - कराल का ?

    नवीन आगगाडी सुटते त्याची पूजा करणाऱ्या मंत्र्याचा असाच निषेध करा नारळ फोडणे ,उदबत्या ओवाळणे - -

    - तुमच्या गणपती मंडळात सत्य नारायण घालताना असेच आडवे येउन दाखवा किंवा कोल्हापुरात स्त्रीच्या हातचा लाडूचा प्रसाद स्त्रीच्या मासिक पाळीमुळे घेण्यास नकार देणाऱ्या आणि स्त्रीयांना गाभाऱ्यात जाऊ न देणाऱ्या लोकांना तिथे जाउन विरोध करून दाखवाल का आणि कधी ?

    ज्याचे वय किंवा इतर काहीच माहिती नाही अशा लोकांवर शिक्के मारायची हौस आपणास असेल तर सरांचे इतर कार्य पूर्ण करून दाखवा डॉ , सरांनी कधीही असे अपशब्द वापरले नाहीत सनातनता - गोडसेवाद आणि भोंदुगिरी या वेगवेगळ्या गोष्टी आहेत

    सरांचे कार्य क्षेत्र शनि शिंगणा पुरात किंवा शिखरशिंगणा पुरात राहून पूर्ण करता येईल शिवापूरला जाउन करता येईल - आहे तुमच्यात क्षमता -

    एसेम , ना ग गोरे ,मधु लिमये ,विनोबा भावे हे कोण होते - ब्राह्मणाच ना - समाजवाद आणि नवनिर्माण रुजवण्यात त्यांचे कार्य थोर आहे - सगळेच ब्राह्मण सनातनी नसतात - खरे ना ?

    आणि गोडसेवादी तर अजिबात नसतात -म. गांधींच्या प्रार्थने नंतर - "अरे नथु , तू इथे कसा "असे विचारणारे कोण होते -कै. काकासाहेब गाडगीळ ! याच शनवार पेठेतले - साधना कार्यालया पासून १५ पावलांवर राहणारे एक ब्राह्मण - सगळेच सनातनी नसतात - गोडसेवादी पण नसतात हे लक्षात ठेवा -

    खरे तर तुम्ही तर फारच फालतू विचाराचे वाटत आहात - अपरिपक्व किंवा पगारी घोषणा देणारा वाटता - हल्ली इकडे पैशाला पासरी मिळतात , आणि छू म्हटले की धावणारे खंडीभर मिळतात !

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा बाप्पा, पद्मजा आणि आगाशे इतके जास्त तसेच भंकस, फालतू लिहायला तुम्हाला वेळ तरी कसा मिळतो ते तरी सांगा. काही काम-धंदा आहे कि नाही? कि उगीचच चांभार चौकश्या?

      Delete
    2. काय रे निनावी बेवारशी अनानिमास

      विकास कुठे गेला ?

      वेळ कसा मिळतो ?वेळ काढावा लागतो !

      विचारावर आघात झाला की वेळ काढावा लागतो

      विकासचा आवडता ब्लोग म्हणजे अनिता पाटील चा म्हणजे त्याची जातकुळी आणि कुंडलीच कळली -

      आता निनावी लोकांचे काय ते म्हणजे बेवारशी लूत भरलेले कुत्रे - हाड म्हटले की शेपूट घालून पळतात - हे सर्व आप्पा बाप्पा , पद्मजा आणि आगाशे निदान उघड चर्चा तरी करतात

      विकासची कीव केली पाहिजे

      खुल्ला आमंत्रण दिल्यावर समोर येण्याला घाबरणे हीच का तुमची वृत्ती ?

      जा की त्या म्हाताऱ्या ना भेटायला - करा चर्चा - वेळ काढावा लागतो !

      Delete
    3. विकासजी या वयस्क लोकांजवळ खूप निवांत वेळ असतो. आपला किमती वेळ या लोकांच्या संगतीत घालविणे योग्य न्हवे. यांच्याबरोबर चर्चा करण्यात कोणत आलंय हशील? यांना खुशाल वेळ-खाऊ गोष्टी करू द्यात. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.
      स्वप्नाली विश्वास तुझे डोके ठिकाणावर आहे काय? काय हि भाषा! थू तुमच्या जिंदगीवर.
      समतावादी, विवेकवादी, बुद्धिवादी बन! उगीचच बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखे वागू नकोस!

      राजू घोडके, पिंपरी

      Delete
    4. @पद्मजा पद्मावती,

      हि बाई खरच खूपच अंधश्रद्धाळू आहे.

      काय होणार या देशाचे ?

      Delete
  8. श्री आगाशे

    वा वा !

    किती वर्षांनी पै .अमरशेख किंवा विकास काकांच्या सोयीसाठी पै.वगळून नुसते अमर भाई म्हणूया -

    उगीच विकासकाकांचा पापड मोडायला नको

    आगाशेकाका - अमर् भाई यांची आठवण ताजी केलीत यार तुम्ही !

    तेंव्हा गर्दीत चपला हरवायच्या म्हणून एक पिशवी देत असे आज्जी

    आठवतंय का ?

    सभा संपली की

    शनिवार वाड्याच्या त्या वळणावर हमखास चुकामुक होत असे !


    अमरशेख किती गोड गायचा



    कॉंग्रेसच्या बैलाला मत द्या म्हणता

    बैलाला मत कस द्यायचं ?

    बैलाला मत देऊन का आपण

    बैलोबा म्हणून ऱ्हांयंच - -


    काय धारदार गळा होता नाही का ?



    डोंगरी शेत माझ ग मी बेणू किती

    आल वरीस राबून मी राबू किती


    कुणी एक मेला सावकार कोल्हा

    हिस्कून घेतो बाई लोण्याचा गोला

    उपाशी ऱ्हांवू नग आमी मराव किती



    डोंगरी शेत माझ ग मी बेणू किती


    रात्री शनिवारवाड्यावर सभा होत असे - त्या वेळेस सगळ्या वक्त्यांचा रोख यशवंतराव मोरारजी आणि पुण्यातले काकासाहेब गाडगीळ यांच्यावर असे -एसेम दंगे आणि अत्रे असे कडाडून बोलत असत -संपले सगळे - यशवंत रावांनी बघता बघता सगळ्यांना गुंडाळून चकवून संयुक्त महाराष्ट्र माझ्यामुळेच झाला असे दाखवत चळवळीचा कलश आणून पार चोथा केला

    पानशेत आणि चीन युद्धाने तर चित्रच बदलले पण यशवंत राव आणि समाजवादी यांचे संबंध सुसंस्कृत पायावर उभे होते - ते दिवसच मंतरलेले होते -

    जाऊ दे विकास राव - आम्ही त्या मंतरलेल्या दिवसावर जगणारे !

    आगाशे साहेब माझा मेल देत आहे aappaabappaa@gmail,com

    आपला पत्ता द्याल का ?

    ReplyDelete
    Replies
    1. विकास सर धन्यवाद.
      तुम्ही जे निषेधाचे लिहिले आहे ते अतिशय योग्य आणि समर्पक असेच आहे. गोडसेवादी किंवा सनातनवादी प्रवृत्ती म्हणजे ब्राह्मण असे समीकरण नाही, कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी. तपासाचे धागे-दोरे सनातनच्याच भोवती फिरत आहेत, हे सांगणे न लगे. आप्पा बाप्पा आणि दत्तात्रेय आगाशे हे स्वतःला कितीही पुरोगामी, हुशार समजत असतील पण हे अजिबात पटत नाही. यांच्या विचाराला सनातनी झालर आहे हे मात्र नक्की. नाहीतर या दोघांच्या कपाळात गेल्या नसत्या आणि असे भलते-सलते फालतू लिखाण केले नसते.
      असो या दोघांचाही निषेध नोंदवून माझे चार शब्द संपवितो.

      अमित काळे, टीटवाळा.

      Delete
  9. यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्र आणला? या बाबतीत अत्रेंची एक प्रतिक्रिया आठवते. सामान उचलले म्हणीन हमालाला कोनि मालक म्हणत नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी यशवंत राव आणि त्यांचे बगलबच्चे दिल्लीचे पाय धरण्यात मश्गुल होते परंतु महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर मात्र केवळ संख्याबळावर आपण आपल्या जात भाइञ्चि सत्तेची सरंजामी पिढ्यानपिढ्या कशी चालेल याची मात्र या कोन्ग्रेस वाल्यांनी काळजी घेतली आणि घेताहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. संजयजी

      अनोनिमास यांनी लिहिलेले अगदी खरे आहे की स्व . यशवंतराव यांनी कलश आणला म्हणजे फक्त मराठा समाजाची मक्तेदारी सुरु केली आणि

      ती पवार साहेबांच्या कोलांट्या उड्या मारण्याच्या तंत्राने अजून चालूच आहे .


      कोकणस्थ ब्राह्मण हे साधारणपणे स्वप्नाळू असल्याने " समाजवाद " किंवा "आदर्शवाद " अशा भ्रमिष्ट राजकीय संकल्पनेत लवकर रमूत जातात

      स्व . यशवंत रावांनी दक्षिण मध्य महाराष्ट्राचे संबंध उत्तम जपले

      गोडसे प्रकरणात अतोनात जाळपोळ करत त्यांनी ब्राह्मण द्वेषाची मुहूर्तमेढ रोवली . ब्राह्मणाशी गोडी गुलाबीचे संबंध ठेवत , वेळ प्रसंगी त्यांना कौटुंबिक मदत करत त्यांना सत्तेपासून दूर ठेवले . कुल्कायादा करून त्याला कायमचे देशोधडीला लावले -

      वार्यावर उघडा पडलेला ब्राह्मण मात्र काळाशी झुंज देत परत उभा राहिला - जे झाले ते ठीकच झाले कारण ब्राह्मण समाज त्यामुळे या विशाल जगताशी लवकर एकरूप झाला -

      आरक्षणाने तर त्यांना अजूनच उघड्यावर आणल्याने त्यांना आपले कर्तृत्व सिद्ध करतच पुढे जावे लागत आहे -

      जे होते ते चांगल्यासाठीच असे म्हणा फार तर !

      मराठा समाज मात्र अजून एकीकडे कुणबी आणि एकीकडे ९६ कुली खानदानी पानात अडकला आहे

      आता इतर ओ बी सी लोकांनी त्यांचे लचके तोडायला सुरवात केली आहे -

      सामान्य मराठा समाजाला आता हे खानदानी लोक जवळही उभे करणार नाहीत

      म्हणून आता ओ बी सी ना ढकलत आपल्याला तिथे जागा निर्माण करायची केविलवाणी धडपड चालली आहे -

      ब्राह्मण द्वेषाने चालू केलेले चक्र अशा रूपाने पूर्ण होत आहे


      महाराष्ट्राच्या निर्मितीत ब्राह्मण समाजाचा फार मोठा हातभार लागला आहे . संघाचे सन्स्थापक्सुद्धा कोकणस्थ ब्राह्मण नव्हते -तरी या इतर ब्राह्मणांनी पुणेरी कोकणस्थ ब्राह्मणाना वापरून आपली पोळी भाजून घेतली हा इतिहास आहे सर्व ब्यांका शाळा यावर आज जो देशस्थ ब्राह्मणांचा पगडा दिसतो - कुलकर्णी आणि जोशी देशपांडे यांचे वर्चस्व दिसते ते या संघाचा परिमाण आहे

      त्यांनीपण सर्व ब्यांका आणि शाळा यांची मक्तेदारी ठेवत संस्तांची वात लावली !

      .

      गोडसेनी कोकणस्थ ब्राह्मणांचे अतोनात नुकसान केले आहे हे अतिशय कटू सत्य आहे !

      Delete
  10. दाभोलकर म्हणजे ब्राम्हणांनी बहुजानात सोडलेला गुप्तहेर असे हेच लोक म्हणत असत. अगदी महारावापासून ते सोनवणी पर्यंत. मग आपल्याच गुप्तहेराला सनातन्वादी कसे मारतील?

    ReplyDelete
    Replies
    1. अहो सनातनवादी म्हणजे ब्राह्मण नव्हे तर हिंदू धर्मरक्षणाचा ठेका घेतल्यासारखे टेंभा मिरविणारे सर्व.

      Delete
    2. स्पष्ट सांगा ना, सनातन संस्कृती संस्था.

      Delete
    3. सनातन संस्कृती संस्था. समूळ नष्टच केली पाहिजे, फक्त बंदी घालून सुद्धा काहीही उपयोग होणार नाही.

      Delete
  11. महात्मा फुलेंच्या काळापासून असल्या प्रवृत्तींचा निषेधच होत आला आहे. पण आता नुसता निषेध न करता प्रत्यक्ष कृतीची वेळ आली आहे. सनातनी विचारधारेचा कणाच मोडून पडेल असे कृत्य करण्याची आवश्यकता आहे. वैचारिक लढा हा माणसांशी लढता येतो. पिसाटलेल्या जनावरांशी नाही.-------------------> विचारांचा मुकाबला जेव्हा विचाराने करता येत नाही तेंव्हा हि पिसाळलेली जनावरे हिंसेकडे वळतात.

    ReplyDelete
  12. संजयजी

    अनोनिमास यांनी लिहिलेले अगदी खरे आहे की स्व . यशवंतराव यांनी मंगल कलश आणला म्हणजे फक्त मराठा समाजाची मक्तेदारी सुरु केली आणि

    ती पवार साहेबांच्या कोलांट्या उड्या मारण्याच्या तंत्राने अजून चालूच आहे .



    कोकणस्थ ब्राह्मण हे साधारणपणे स्वप्नाळू असल्याने " समाजवाद " किंवा "आदर्शवाद " अशा भ्रमिष्ट राजकीय संकल्पनेत लवकर रमूत जातात

    स्व . यशवंत रावांनी दक्षिण मध्य महाराष्ट्राचे संबंध उत्तम जपले

    गोडसे प्रकरणात अतोनात जाळपोळ करत त्यांनी ब्राह्मण द्वेषाची मुहूर्तमेढ रोवली . ब्राह्मणाशी गोडी गुलाबीचे संबंध ठेवत , वेळ प्रसंगी त्यांना कौटुंबिक मदत करत त्यांना सत्तेपासून दूर ठेवले . कुळ कायदा करून त्याला कायमचे देशोधडीला लावले -

    वाऱ्यावर उघडा पडलेला ब्राह्मण मात्र काळाशी झुंज देत परत उभा राहिला -

    जे झाले ते ठीकच झाले कारण ब्राह्मण समाज त्यामुळे या विशाल जगताशी लवकर एकरूप झाला -

    आरक्षणाने तर त्यांना अजूनच उघड्यावर आणल्याने त्यांना आपले कर्तृत्व सिद्ध करतच पुढे जावे लागत आहे -

    जे होते ते चांगल्यासाठीच असे म्हणा फार तर !

    मराठा समाज मात्र अजूनही एकीकडे कुणबी आणि एकीकडे ९६ कुळी खानदानी पणात अडकला आहे आता इतर ओ बी सी लोकांनी त्यांचे लचके तोडायला सुरवात केली आहे -



    सामान्य मराठा समाजाला आता हे खानदानी लोक जवळही उभे करणार नाहीत

    म्हणून आता ओ बी सी ना ढकलत आपल्याला तिथे जागा निर्माण करायची केविलवाणी धडपड चालली आहे -

    ब्राह्मण द्वेषाने चालू केलेले चक्र अशा रूपाने पूर्ण होत आहे



    महाराष्ट्राच्या निर्मितीत ब्राह्मण समाजाचा फार मोठा हातभार लागला आहे . संघाचे संस्थापक कोकणस्थ ब्राह्मण नव्हते -तरी या इतर ब्राह्मणांनी पुणेरी कोकणस्थ ब्राह्मणाना वापरून आपली पोळी भाजून घेतली हा इतिहास आहे सर्व ब्यांका शाळा यावर आज जो देशस्थ ब्राह्मणांचा पगडा दिसतो - कुलकर्णी आणि जोशी देशपांडे यांचे वर्चस्व दिसते ते या संघाचा परिमाण आहे

    त्यांनीपण सर्व ब्यांका आणि शाळा यांची मक्तेदारी ठेवत त्या संस्थांची वाट लावली !

    .

    गोडसेनी कोकणस्थ ब्राह्मणांचे अतोनात नुकसान केले आहे हे अतिशय कटू सत्य आहे !

    कुणीतरी लिहिले आहे की सर्वच कोकणस्थ हे गोडसेवादी नाहीत - हे खरे सत्य आहे

    ReplyDelete
    Replies
    1. अहो स्वप्नाली विश्वास

      को. ब्रा. (कोब्रा- जहरीला नाग)

      हे समीकरण नीट समजावून घेतल्या नंतर "कुणीतरी लिहिले आहे की सर्वच कोकणस्थ हे गोडसेवादी नाहीत - हे खरे सत्य आहे" हे धांदात खोटे विधान तुम्ही केले नसते.

      राजेश खाडे

      Delete
  13. ज्या ऐतिहासिक महापुरुषांच्या केवळ नावामुळे या भौगोलिक महाराष्ट्राला एक इतिहास प्राप्त झाला आणि देशाच्या किंबहुना जगाच्या पाठीवर आपले कायम वेगळे पण ज्याने सिद्ध केले याच महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागणारी गोष्ट इथे घडली, सबंध आयुष्य अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी , परंपरा यांच्या विरोधात अतिशय सय्यमाने आणि अहिंसक मार्गाने विधायक विरोध ज्यांनी केला त्या डॉ . नरेंद्र दाभोलकारांचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत म्हणजे पुण्यात भरदिवसा खून करण्यात आला.
    खर तर ज्यांच्या नावांची रीघ लावून आपण या महाराष्ट्राला पुरोगामित्वाचे विशेषण लावतो त्यातील कुठल्या व्यक्तीला या खुनी प्रवृत्तींनी सोडलं ? कोवळ्या ज्ञानेश्वर आणि त्याच्या भावंडांना याच प्रवृत्तींनी लाथाळ्या घालून वाळीत टाकलं, संत नामदेव, एकनाथ, चोखामेळा असो व जगत गुरु संत तुकाराम यांच्यावर याच धर्म आणि संस्कृती मार्तंड नि अनेक घाव केले.
    सामान्य कष्टकर्यांचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय, लोकाराजे राजश्री शाहू महाराज यांना शुद्र म्हणून हिणवले, हजारो वर्षे गुलामगिरीच्या, अपमानाच्या कोंडवाड्यात अडकलेली स्त्री ज्यांनी मुक्त केली त्या महात्मा ज्योती फुल्यांना आणि सावित्री बाईंच्या विरोधात "फुले नावाची दुर्गंधी" म्हणून अगदी कालपरवा पर्यंत गरळ ओकली जाते. विशिष्ट जातींवरची धार्मिक गुलामगिरी मोडून त्यांना नवा श्वास देणाऱ्या बाबासाहेबांना तरी यांनी कुठे सोडले, म्हणजेच ज्यांच्या नावांचा रोज या राज्यात जप केला जातो किंवा फ़क़्त यांच्यामुळेच या महाराष्ट्राचे महानपण वारंवार सिद्ध झाले त्यांच्या बाबतीत याच राज्यात त्यांच्या विरोधात विष पेरणारी विकृती सुद्धा इथेच पोसली गेलि.
    आज हि कधी कधी फेसबुक , ट्विटर किंवा व्हाट एअप्स वरचे काही संदेश वाचले कि असे वाटते पुन्हा तीच परिस्थती आणण्यासाठी हेतुपुरस्सर प्रयत्न केले जात आहेत. लक्षात ठेवा तेव्हा "राम" होता, कधी काळी कुणी ज्ञानेश्वर - तुकाराम होता, कधी कोणी शिवाजी - संभाजी किंवा शाहू होता तर कधी ज्योतिबा आणि बाबासाहेब होते…. दुर्दैवाने काल डॉ नरेंद्र दाभोलकर हे होते. त्यांचा आणि त्यांच्या विचारांचा खून करण्याचा प्रयत्न गेली अनेक शतके अविरतपणे चालूच आहे आणि आपण समाज याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत.
    परत - परत या शक्ती आपले डोकं वर काढतच असतात त्यांना तिथेच गाडून टाकण्याची खरी जबाबदारी स्वतःशी थोडे तरी प्रामाणिक असणार्या प्रत्येक नागरिकाची आहे.

    ReplyDelete
  14. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (R.S.S) आणि सनातनी वैदिकांना विरोधाला न जुमानता डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी नेहमीच अंधश्रद्धा निपटून काढण्यासाठी आपले प्रयत्न चालूच ठेवले. त्यांचे कार्य खरे तर शोषित, दिन-दुबळ्या गरीब लोकांना अंधश्रद्धधेपासून वाचविण्यासाठी चालले होते. त्याला धर्मांद सनातनी लोकांचा नेहमीच विरोध होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्लेही चढवले होते हे आपण विसरता कामा नये ! जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी आणि विचारवंतांनी प्रयत्न केले तेव्हा त्यांच्यावर प्राणघातक हल्ले करण्यात आले. मग महात्मा गांधी, महामानव डॉ आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले, सावित्रीआई फुले, राजर्षी शाहू यांची संघर्ष कहाणी आणि उदाहरणे आपल्याला हेच दर्शवितात. काही इतिहासकारांनी छत्रपती शिवरायांना आणि आद्य समाजसुधारक संत तुकाराम यांना याच सनातन्यांनी मारले असे संशोधन पुढे आणले आहे. हेच वास्तव आहे मित्रानो !

    ReplyDelete
  15. दाभोळकरांची हत्या कोणी केली व का केली याचा विचार करण्याआधी ही सर्व पार्श्वभूमी अभ्यासणे देखील गरजेचे आहे. मुळात त्यांच्यावर असा खुनी हल्ला व्हावा अश्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून विद्वेषाची पेरणी कोण करत होते हे देखील उघड गुपित आहे. एका महन्ताने भर सभेत काढलेले दाभोळकराचा दुसरा गांधी करून टाकू हे उद्गार आता देखील यु ट्यूब वर एका क्लिप च्या रुपाने गरळ ओकत आहेत. दाभोळकरांच्या छायाचित्रावर जणू eliminated अश्या फुल्या कोणी व का केल्या आहेत(गुगल इमेजेस) हे देखील उजेडात आणणे गरजेचे आहे.
    आम्ही म्हणतो तेच खरे बाकी सर्व धर्मद्रोही आणि जे जुमानत नाहीत त्यांना संपवा ...ही मुलतत्ववादी विचारसरणी मग ती कोणत्याही धर्मियांची असो लोकशाही साठी अत्यंत घातक आहे. तिची पाळेमुळे खणून काढणे गरजेचे आहे. आणि यांच्या गोळ्या जणू दाभोळकरांसाठीच राखून ठेवल्या होत्या. तिच्यात टुन्डा, एम के शेख, ओवेसी यांच्यापर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य नाही. दाभोळकरांसारख्या ऋजू स्वभावाच्या असंरक्षित समाजसेवकाची हत्या कसली करता ? हिंमत असेल तर या लोकांपर्यंत पोहोचून दाखवा.

    ReplyDelete
  16. विकास साहेब, आता यांचा फक्त निषेध करून चालणार नाही तर अशा प्रवृत्तीच्या लोकांना शोधून काढून ठेचायालाच हवे!

    ReplyDelete
  17. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे।
    भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।

    ह्या विचारांना प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे. आता एकच पाऊल असे उचलले पाहिजे की असली कृत्ये करणारी ही जनावरं मुळापासून हादरतील.

    ReplyDelete
  18. दाभोलकरांच्या मारेकर्यांना गोडसेवादी, सनातनवादी म्हटल्यावर ज्यांना-ज्यांना राग येतो त्यांना ब्राह्मण्यवादी किंवा मनुवादी म्हटल्यास वावगे ठरू नये.

    अविनाश

    ReplyDelete
  19. आता फक्त एकाच नारा मनुवादाला हद्दपार करा!

    ReplyDelete
  20. मी दत्तात्रय आगाशे

    मी असे काय लिहिले

    डॉ दाभोलकर आणि साने गुरुजी कथा माला आणि एसेम जोशी अशा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या वेळच्या आठवणी लिहिल्या

    कोणाबद्दल काहीही माहित नसताना उलटे लिहू नये असे लिहिले

    आम्ही अनेक वर्षे साधनात जात आहोत

    आमच्यावर संस्कार समाजवादाचे झाले


    श्री संजय सोनावनी यांचा फोन आला होता परवाच

    आश्चर्याचा भाग म्हणजे ते या बाबतीत काहीच हस्तक्षेप करत नाहीत


    एखादा माणूस गेल्यावर जुन्या आठवणीना उजाळा दिला जातो - त्यात सारखा सनातन वाद आणि गोडसेवाद आणणे किती योग्य आहे

    आम्ही रोज फिरायला सकाळी जात असताना डॉक्टर वाटेत भेटायचे - मान हलवून ओळख दाखवत असत - या झाल्या आठवणी - त्या प्रसंगाच्या दुःखातून आम्ही सर्व अजून बाहेर पडलेलो नाही

    डॉक्टर आणि जाधव सर रोज समोर राज हॉटेलात चहा प्यायला येत असत

    या आठवणीनी मन रडवेले होते

    आणि हा उगाचच चाललेला आगाशे नावाचा उद्धार मन उद्विग्न करतो

    मन मोकळे करण्याचा आणि काहीतरी विधायक लिहिण्याचा हा ब्लोग म्हणजे या वयात माझा आधार होता

    पण तोही आता उरणार नाही असे वाटते - कारण इथे लिहिणारे खूपच विसंवादी लिहितात

    संजय सर , आता निरोप घेतो !

    ReplyDelete
  21. ठेचायचे म्हणजे नेमके काय करायचे? कशाने ठेचायचे?

    हत्यारांनी?

    कि विचारांनी?

    माझ्या मते प्रगल्भ बुद्दीवादी विचारांनी?

    ReplyDelete
  22. विकास

    भकास

    बकवास

    सगळ्यांची चड्डी सुटली का ?

    संजय आणि त्याचे चमचे हे सगळे चिडीचूप झाले

    संजयला अनोनिमस च्या नावाखाली दुसऱ्या लोकाना पेटवायची सवय आहे

    त्यांच्या इतका दुतोंडी माणूस आम्ही पाहिला नाही

    संजयची चौकडी काय दर्जाची आहे हे उघड आहे !

    विकास , चैतन्य , आणि असे अनेक पाळीव पशु पक्षी

    दाणे टाकले की चिव चिव करतात


    संजय च्या कविता ना कुणी दाद देत नाही

    याला लेखक म्हणून समाजात मान माही

    याची अक्कल ब्राह्मण द्वेषामुळे आंधळी झाली आहे

    वाघ्या कुत्र्यामुळे मराठा समाजाने याला दूर ढकलले



    अतिशय पळपुटा माणूस आहे !

    निवडणुकीत याचे तीन तेरा वाजले की कळेल

    ReplyDelete
    Replies
    1. विकास सर, तुमचे विचार झकास-झकास.

      मल्हार बोरकरचा तोल सुटला!
      कळायच्या अधिक गांडीवर आपटला!

      संतोष तोरणे

      Delete
    2. विकास सर, तुमचे विचार झकास-झकास.

      मल्हार बोरकरचा तोल सुटला!
      कळायच्या आधीच गांडीवर आपटला!

      संतोष तोरणे

      Delete
    3. मल्हार बोरकर पिसाळलासकी काय?

      मित्रा,कावळ्याच्या शापाने माणसे मरत नसतात, हे लक्षात ठेव!

      मंगेश देशपांडे

      Delete
  23. पुरोगामी म्हणजे काय?

    विवेकी, बुद्धिवादी विचार करणारे, वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारलेले, देवा-धर्माच्या पलीकडे गेलेले, समतावादी सहजीवन जगणारे, समाजात नैतिकतेने वागणारे, समाजातील अंधश्रद्धांना मुठ-माती देण्यासाठी सदैव अग्रेसर असणारे, प्रामाणिक लोक!


    गोडसेवादी म्हणजे काय?

    कशाचीही पर्वा न करणारे, धर्मांध विचाराने प्रेरित होऊन, अहिंसक महामानवांना जीवनातून उठविणारे हिंसक, भ्रष्ट बुद्धीचे माथेफिरू लोक!

    सनातनवादी म्हणजे काय?

    देवा-धर्माच्या नावाने सामान्य जणांना फसवून लुबाडणारे, जुनाट खुळचट चालीरीतींना चिटकून बसलेले, वेदांना प्रिय मानणारे, भ्रष्ट मनुस्मृतीचा गौरव करणारे, समाज सुधारणेला बाधा आणणारे, हिंसेला प्रवृत्त करणारे, परधर्मीयांबद्दल बद्दल आकस निर्माण करणारे, जातीवर्चस्वाचा टेंभा मिरविणारे, प्रसंगी बॉम्ब स्फोट करणारे, तथाकथित धर्मांध लोक!

    सुनील न्यायाधीश.

    ReplyDelete
  24. स्वयंसेवकांनो, कोणत्या संस्कृतीचे गोडवे गाता?

    स्वयंसेवकांना पुढील प्रमाणे आवाहन करावे, असे वाटते.
    'स्वयंसेवकांनो, तुमच्या गर्वात भंपकगिरी आहे. क्रूरता, धर्मांधता आणि चार्तुवर्ण्याचे तसेच जातीव्यवस्थेचे समर्थन तुमच्या गर्वात अध्याहृत आहे.
    या गर्वात कुठलीही मानवतेची हाक नाही, प्रेमाचा अंश नाही. अभिमान हा शेवटी धर्मविरोधी असतो. आणि गर्वाचे म्हणाल तर छोटी मुलेही ओरडतात कि, गर्वाचे घर खाली. तोच गर्व तुम्ही कपाळी लावता. तुम्हाला अखेर झाले आहे तरी काय? हिंदूंनी गर्व करून घेण्यासारखे काहीही नाही. ज्या ज्ञानेश्वरांना तुम्ही संत म्हणून बोलबाला करता; त्याच ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना तुमच्या वर्ण वर्चस्ववादी पूर्वज्यांनी जलसमाधी घ्यायला लावली आहे. तेच आज ज्ञानेशाची स्तुती करीत आहेत. कोणाला माहित ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली, कि त्यांचेही काही बरे -वाईट केले?
    तुमचा धर्म खरेच छान आणि महान आहे काय? तुम्ही बदलायला पाहिजे. अत्याधुनिक वेशभूषा केली आणि इंग्रजी बोलायला आले कि, तुम्ही आधुनिक म्हणून गणले जाणार नाहीत. आपल्या धर्माची तुम्ही कठोर चिकित्सा करायला हवी. आपला सगळा इतिहासच पराभवांचा, मानभंगाचा आणि क्रूरतेचा आहे. शूद्रांना गावकुसाबाहेर ठेवणारी आमची संस्कृती महान असूच शकत नाही आणि याच संस्कृतीचे गोडवे गाणारा धर्म आणि देशही महान बनू शकत नाही. हे तुम्हाला बोचणारे आहे, पण खोट्या दंभाने स्वतःची पाठ थोपटून घेण्यात कुठले हशील आहे? तुम्हाला धर्मच हवा असेल, तर फक्त स्वतःच्या हृदयाला विचारा, तुमच्या हृदयातून येणारा तुमचा धर्म असेल!’

    विवेक (सिडको-औरंगाबाद)

    ReplyDelete
  25. रा. स्व. संघ आणि विध्वंस!

    ’ एखाद्याला संघ परिवाराबद्धल अवास्तव अभिमान असल्यास विध्वंसाकडे त्यांची डोळेझाक होणार हे ओघानेच आले. काही प्रमुख विध्वन्सांची नोंद येथे घेणे योग्य ठरेल.

    □ धार्मिक शिक्षण देण्याच्या मिषाने मुलांमद्धे पाद्दत्शीरपणे चातुर्वर्ण ओतण्याचा प्रयत्न केला. परधर्मद्वेषापोटी विकृत इतिहास शिकविला आणि तसा प्रयत्न अविरत चालू आहे.

    □ मुस्लीम -ख्रिश्चनांचा परमोच्चद्वेष म्हणजे हिंदू धर्मप्रेम हा अजब सिद्धांत संघवाल्यांनी स्वीकारल्यामुळे प्रतिक्रियावादी बनलेला तरुण हिंदू धर्माच्या कथित आणि पढिक प्रेमापायी परधर्मद्वेष्ठा बनतो.

    □ संघाचे स्वयंसेवक एक धार्मिक कृत्य म्हणून संघाच्या संघटनेकडे पाहतात आणि तन-मन-धन खर्ची घालतात. ते राष्ट्र उभारण्यासाठी नव्हे, तर धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी. देशापेक्षा धर्म मोठा असे शिकवल्यास असेच घडणार.

    □ रा. स्व. संघ निश्चितपणे हिंदू-धर्मांधतेचे प्रतिनिधित्व करतो, नव्हे धर्मांधता हाच संघाच्या राजकारणाचा मूळ उद्देश आहे. त्याच दृष्ठीने लाखो हिंदूंना धार्मिक प्रश्नाच्या दावणीला बांधले जाते.

    □ हिंसा हा संघाचा स्थायीभाव आहे. हिंसा हि संघीष्ठांच्या नसानसात एखाद्या जहरी विषासारखी भिनलेली आहे. ‘मशिदी उखडून लावणे’ हे त्यांचे लाडके स्वप्नरंजन असते.

    □ महात्मा गांधींचा खून करणारा गोडसे (तथाकथित माथेफिरू ) हा रा. स्व. संघाचा स्वयंसेवक होता. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

    □ राखीव जागाविरोधी आंदोलन पेट घेते तेंव्हा रा. स्व. संघ समाज्यात ढोंगीपणे वावरताना दिसतो. अशावेळी संघ हिंदुत्ववादाला अनुसरून भूमिका घेताना दिसत नाही व दिसला नाही.

    प्रमोद शिंत्रे (इगतपुरी-नाशिक)

    ReplyDelete
  26. पुरोगामी म्हणजे काय?

    विवेकी, बुद्धिवादी विचार करणारे, वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारलेले, देवा-धर्माच्या पलीकडे गेलेले, समतावादी सहजीवन जगणारे, समाजात नैतिकतेने वागणारे, समाजातील अंधश्रद्धांना मुठ-माती देण्यासाठी सदैव अग्रेसर असणारे, प्रामाणिक लोक!


    गोडसेवादी म्हणजे काय?

    कशाचीही पर्वा न करणारे, धर्मांध विचाराने प्रेरित होऊन, अहिंसक महामानवांना जीवनातून उठविणारे हिंसक, भ्रष्ट बुद्धीचे माथेफिरू लोक!

    सनातनवादी म्हणजे काय?

    देवा-धर्माच्या नावाने सामान्य जणांना फसवून लुबाडणारे, जुनाट खुळचट चालीरीतींना चिटकून बसलेले, वेदांना प्रिय मानणारे, भ्रष्ट मनुस्मृतीचा गौरव करणारे, समाज सुधारणेला बाधा आणणारे, हिंसेला प्रवृत्त करणारे, परधर्मीयांबद्दल बद्दल आकस निर्माण करणारे, जातीवर्चस्वाचा टेंभा मिरविणारे, प्रसंगी बॉम्ब स्फोट करणारे, तथाकथित धर्मांध लोक!

    सुनील न्यायाधीश.

    ReplyDelete
    Replies
    1. अतिशय सुंदर व्याख्या. अगदी तंतोतंत बरोबर.

      THANKS SUNIL.

      Delete
  27. विठू, तुझी पंढरी बदनाम...PART-I

    डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जाण्यानंतर जादूटोणा प्रतिबंधक विधेयकाच्या अनुषंगाने विविधांगी चर्चा सुरू झाली आहे. विधेयक लटकण्याची अनेक कारणे सांगितली जातात. जातीयवादी शक्तिंचा विरोध, सरकारची निष्क्रियता, कथित शहाण्या लोकप्रतिनिधींची उदासीनता, बाकीच्यांचे मेंढरासारखे पक्ष किंवा नेत्याच्या मागे जाणे इत्यादी इत्यादी. या सगळ्या प्रक्रियेमध्ये घोळ घातला तो वारकरीं मंडळींनी. वारकरी संप्रदाय, पंढरपूरची वारी म्हटलं की उगा अनेकांचा ऊर भरून येतो. अनेकांना गहिवरून येते. कुणाला त्यात सामाजिक समता दिसते, तर कुणाला विमानातून वारकऱ्यांच्यातला विठ्ठल दिसतो. अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमे वारीचा एवढा गाजावाजा करतात, की त्यामुळे राज्यकर्त्यांवरही वारकऱ्यांचा दबाव राहतो. वारी आणि वारकरी संप्रदायाशी घसट दाखवून पुरोगामी असल्याचे प्रदर्शन केले जाते. ज्ञानोबा-तुकोबांचा वारसा पुरोगामी असला तरी आजचा वारकरी संप्रदाय पुरोगामी आहे, असे म्हणणे म्हणजे फसवणूक करून घेण्यासारखे आहे. महाराष्ट्र सरकार समजून-उमजून गेली काही वर्षे अशी फसवणूक करून घेत आहे.

    ReplyDelete
  28. विठू, तुझी पंढरी बदनाम...PART-II

    वारकऱ्यांचे कातडे पांघरलेल्या जातीयवादी शक्ती वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र सरकारशी चर्चा करीत राहिल्या. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री एवढे अडाणी नाहीत, की त्यांना वारकरी संप्रदायातले खरे पुढारी कोण आहेत, हे माहीत नाही. परंतु त्यांनी खुळ्याचे सोंग घेऊन वारकरी सेना नामक जातीयवादी शक्तिशी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवले. कायद्याला वारकऱ्यांचा विरोध आहे, अशी आवई सतत उठवली जाऊ लागली. आणि विधेयक लटकून ठेवण्यास सरकारला तेवढेच निमित्त मिळाले. हिंदुत्ववादी जातीयवादी शक्तिंनी सरकारची मानसिकता ओळखली होती. वारकरी संप्रदायाबाबत सरकार हळवे आहे, हे ओळखून त्यांनी वारकऱ्यांचे कातडे पांघरले आणि सरकारसह कायद्याची अडवणूक सुरू केली. ही अडवणूक सुरू असताना खरोखरचे वारकरी संधिसाधूपणे मागे राहिले.
    वारकरी चळवळीच्या इतिहासाकडे आणि अलीकडच्या काळातील काही घडामोडींकडे बारकाईने पाहिले तरी यातला घोळ लक्षात येतो. यंदाच्या वारीत वारकऱ्यांच्यातील प्रतिगाम्यांनी जादूटोणा प्रतिबंधक विधेयकाला विरोध करून मुख्यमंत्र्यांना पूजा करू दिली जाणार नाही, वगैरे इशारे दिले. त्याचवेळी तुकोबांच्या पालखीने आताच्या पचपचीत विधेयकाला नव्हे, तर मूळ स्वरुपातील अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला पाठिंबा दिला होता, हे कुणीच लक्षात घेत नव्हते. तुकोबांच्या पालखीतील साडेतीनशे दिंड्यांनी तसे ठराव केले आहेत. वारकरी संतांचे तत्त्वज्ञान हाच या अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाचा गाभा असल्याची भूमिका तुकोबाच्या पालखीशी संबंधित मांडली आहे. परंतु प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेतली नाही आणि सरकारनेही.

    ReplyDelete
  29. विठू, तुझी पंढरी बदनाम...PART-III

    गावोगावचे वारकरी जे वारीत सहभागी होतात, ते भोळेभाबडे, विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीची वाट तुडवीत असतात. संतांचे तत्त्वज्ञान त्यांनी आत्मसात केलेले असतेच असे नाही. विठ्ठलावर श्रद्धा असली तरी बाकी कुठल्याही देवाचे त्यांना वावडे नसते. उलट सगळ्या देवळांतल्या सगळ्या देवांची ते पूजा करीत असतात. याचाच गैरफायदा घेऊन विश्व हिंदू परिषद आणि तत्सम संघटनांनी त्यांच्याच श्री राम रुजवण्याचा प्रयत्न केला. अयोध्या प्रकरणानंतर त्याला जोर आला.
    विश्वहिंदू परिषदेने वैद्यकीय आणि अन्य सेवा देण्याच्या निमित्ताने वारीमध्ये घुसखोरी करून हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. वारकऱ्यांची मूळची मातकट रंगाची पताका घालवून भगवी पताका वारकऱ्यांच्या हाती दिली. कीर्तनांमध्ये रामायण, रामकथा सुरू केल्या. वारकऱ्यांच्या भजनांमध्ये रामदासांची भजने आणली. हळुहळू पण नियोजनबद्ध रितीने वारकरी चळवळीमध्ये जातीयवादी तत्त्वज्ञान घुसवले आणि वारकऱ्यांची चळवळ भ्रष्ट करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. बंडातात्या कराडकर वगैरे मंडळींनी साताऱ्य़ाला वारकरी परिषद घेऊन तिथे विश्वहिंदू परिषदेच्या नेत्यांना मार्गदर्शनासाठी बोलावले. वारकरी परंपरेच्यादृष्टिने पंढरपूर आणि चंद्रभागा पवित्र मानली जाते. परंतु या जातीयवाद्यांनी काही वर्षांपूर्वी एक टूम काढली. म्हणाले, चंद्रभागेचे तेज कमी झाले आहे. गंगेचे पाणी चंद्रभागेत आणून ते तेज पुन्हा वाढवायचे. त्यासाठी वारकरी फडांकडून वर्गणी गोळा केली. बंडातात्या कराडकर मधल्या काळात न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्यासोबत काम करीत होते. परंतु त्यांनी विश्वहिंदू परिषदेच्या संतपीठाशी असलेले संबंध तोडले आहेत किंवा नाही, हे जाहीर केल्याचे ऐकिवात नाही.
    विश्वहिंदू परिषदेने वैद्यकीय आणि अन्य सेवा देण्याच्या निमित्ताने वारीमध्ये घुसखोरी करून हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. वारकऱ्यांची मूळची मातकट रंगाची पताका घालवून भगवी पताका वारकऱ्यांच्या हाती दिली. कीर्तनांमध्ये रामायण, रामकथा सुरू केल्या. वारकऱ्यांच्या भजनांमध्ये रामदासांची भजने आणली. हळुहळू पण नियोजनबद्ध रितीने वारकरी चळवळीमध्ये जातीयवादी तत्त्वज्ञान घुसवले आणि वारकऱ्यांची चळवळ भ्रष्ट करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. बंडातात्या कराडकर वगैरे मंडळींनी साताऱ्य़ाला वारकरी परिषद घेऊन तिथे विश्वहिंदू परिषदेच्या नेत्यांना मार्गदर्शनासाठी बोलावले. वारकरी परंपरेच्यादृष्टिने पंढरपूर आणि चंद्रभागा पवित्र मानली जाते. परंतु या जातीयवाद्यांनी काही वर्षांपूर्वी एक टूम काढली. म्हणाले, चंद्रभागेचे तेज कमी झाले आहे. गंगेचे पाणी चंद्रभागेत आणून ते तेज पुन्हा वाढवायचे. त्यासाठी वारकरी फडांकडून वर्गणी गोळा केली. बंडातात्या कराडकर मधल्या काळात न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्यासोबत काम करीत होते. परंतु त्यांनी विश्वहिंदू परिषदेच्या संतपीठाशी असलेले संबंध तोडले आहेत किंवा नाही, हे जाहीर केल्याचे ऐकिवात नाही.
    विश्वहिंदू परिषदेने वैद्यकीय आणि अन्य सेवा देण्याच्या निमित्ताने वारीमध्ये घुसखोरी करून हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. वारकऱ्यांची मूळची मातकट रंगाची पताका घालवून भगवी पताका वारकऱ्यांच्या हाती दिली. कीर्तनांमध्ये रामायण, रामकथा सुरू केल्या. वारकऱ्यांच्या भजनांमध्ये रामदासांची भजने आणली. हळुहळू पण नियोजनबद्ध रितीने वारकरी चळवळीमध्ये जातीयवादी तत्त्वज्ञान घुसवले आणि वारकऱ्यांची चळवळ भ्रष्ट करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. बंडातात्या कराडकर वगैरे मंडळींनी साताऱ्य़ाला वारकरी परिषद घेऊन तिथे विश्वहिंदू परिषदेच्या नेत्यांना मार्गदर्शनासाठी बोलावले. वारकरी परंपरेच्यादृष्टिने पंढरपूर आणि चंद्रभागा पवित्र मानली जाते. परंतु या जातीयवाद्यांनी काही वर्षांपूर्वी एक टूम काढली. म्हणाले, चंद्रभागेचे तेज कमी झाले आहे. गंगेचे पाणी चंद्रभागेत आणून ते तेज पुन्हा वाढवायचे. त्यासाठी वारकरी फडांकडून वर्गणी गोळा केली. बंडातात्या कराडकर मधल्या काळात न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्यासोबत काम करीत होते. परंतु त्यांनी विश्वहिंदू परिषदेच्या संतपीठाशी असलेले संबंध तोडले आहेत किंवा नाही, हे जाहीर केल्याचे ऐकिवात नाही.

    ReplyDelete
  30. विठू, तुझी पंढरी बदनाम...PART-IV

    गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राला विलासराव देशमुख, अशोक चव्हाण यांच्यासारखे सत्यसाईभक्त मुख्यमंत्री लाभले. जयंत पाटलांसारखे टेक्नोसॅव्ही नेतेही सत्यसाईंच्या चरणी लीन होत असल्याचे दिसू लागले. अशांच्या भक्तिभावाने महाराष्ट्राच्या पुरोगामी वर्तुळाला अनेकदा संभ्रमित केले. अशोक चव्हाण यांनी तर सत्यसाईबाबांची सरकारी निवास्थानी पाद्यपूजा करून कळस चढवला होता. आदर्श प्रकरणानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाली. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार आले. हे दोन्ही नेते शरद पवार यांच्याप्रमाणे विज्ञाननिष्ठ आणि कोणत्याही बुवा-बाबाचा नाद न करणारे म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या मार्गातील अडथळा दूर झाल्यासारखे वाटत होते. परंतु या दोघांनीही महाराष्ट्राचा भ्रमनिरास केला. कोणत्याही टप्प्यावर त्यांनी या कायद्यासाठी इच्छाशक्ती दाखवली नाही. खोट्या वारकऱ्यांनी जादूटोणा प्रतिबंधक विधेयकाच्या मार्गात अडथळे निर्माण केले असताना खरे वारकरी, त्यांचे पुढारी संधिसाधूपणे मागे राहिले. वारकरी संप्रदाय आणि संतांची परंपरा अनिष्ट प्रथांच्या विरोधातील आहे, याची जाणीव ठेवून वारकरी चळवळीतील लोक मोठ्या संख्येने निडरपणे पुढे आले असते तरीही जातीयवादी मागे ढकलले गेले असते. वारकऱ्यांच्या विधायक शक्तिचा उपयोग जादूटोणा प्रतिबंधक कायद्याला समर्थन देण्यासाठी झाला असता, तर वारकरी परंपरा उजळून निघाली असती. परंतु तसे झाले नाही. दुर्जनांनी सरकारला वेठीला धरले आणि सज्जन निष्क्रिय राहिले. परिणामी कायदा लटकला. कायद्यासाठी लढा देणाऱ्या डॉ. दाभोलकरांची हत्या झाली. वारकरी चळवळीला जबाबदारी झटकता येणार नाही. समतेचे पीठ मानली जाणारी विठ्ठलाची पंढरी बदनाम झाली.

    ReplyDelete
  31. अरे बापरे! ४४ Comments व Replies आणि त्यामधील तब्बल ४० एकाच विषयाला वाहिलेल्या!

    मला पाठींबा दिलेल्या तसेच माझ्या विरोधात लेखन केलेल्या सर्वांचाच खूप-खूप आभारी आहे, अगदी मनापासून !

    श्री. सोनवणी भरघोस मतांनी निवडून येवोत अशी माझी मनोमन इच्छा!!!!!!!!!!!

    धन्यवाद!

    ReplyDelete
  32. विकास

    बैलगाडीच्या नळ्याच्या मधून - दोन चाकांच्या मधून जाणाऱ्या कुत्र्याला असेच वाटते -

    जणू आपल्या मुळेच हि गाडी चालली आहे असे त्याचे मन त्याला सांगत असते -


    त्याचा मीपणा आणि तुझा मीपणा यात फरक तो काय ?


    हि ४४ मते कशामुळे आली इतकी ?कुणाबद्दल इतका जयजयकार झाला -

    डॉ . नरेंद्र दाभोळ कर नावाच्या कर्तृत्व वान माणसाला तो सलाम होता

    कुणी वंदन केले कुणी स्यालुट केला , कुणी लोटांगण घातले तर कुणी कुर्निसात केला -

    भाव आणि भावना एकच होत्या -

    त्या तुला समजल्या नाहीत हे तुझे दुर्दैव - !तो काही तुझा विजय नव्हता


    वेडा आहेस !लहान आहेस !


    जगाला माहित असते की गाडी कोण खेचते आहे ते आणि कोणासाठी !

    अजून सुधारायला वाव आहे -


    मनाचे श्लोक रोज वाचत जा ! चिंतन आणि मनन करत जा -

    कुरुन्दकर आणि डॉ राम मनोहर लोहिया ,

    आणि अनेक लेखकांची पुस्तके वाचत जा - माणसात येशील

    आणि त्या अनिता पाटील चा विचारमंच सोडून दे माणसात येशील

    तू एक चांगला होतकरू मुलगा आहेस - तुला भविष्य घडवायचे आहे -

    प्रगल्भ होणार आहेस न तू लेकरा ? स्वःताचे विचार स्वतः करायला शिकणार ना तू ?

    उगी उगी !

    जमेल सगळ ! पूर्वी बोळ्याने दुध पीत होतास ना ?

    आता स्वतः पितोस ना ?आणि दूधच पी -

    आरोग्याला बरे असते !

    आणि खातोस काय ?

    शेण खाऊ नकोस !- आई वडिलांचा आदर कर - देवा धर्माचा आदर कर -

    देव तुझे भले करो !

    देवाला मानत नसशील तर अधिक भाल होईल !

    सगळ्याना दारोदारी फिरून सांग - देव ही सगळी बंडलबाजी आहे - थोतांड आहे

    सर्व धर्म सम भाव हा सर्व श्रेष्ठ आहे - मुसलमान लोकात मूर्तीपूजा नाही म्हणून तो आपल्या पेक्षा श्रेष्ठ धर्म आहे - चला सगळ्यांनी आपापले देव नदीत फेकून देवू -

    चल सगळे बौद्ध होवूयात ! या वर्षापासून गणपती नको दसरा नको दिवाळी नको

    येशूचा नाताळ साजरा करुया !

    या बामणांची तोंडे बघायला नकोत !

    ReplyDelete
    Replies
    1. मल्हार बोरकर पुन्हा पिसाळलासकी काय?

      इंजेक्शन नाही मिळाले वाटतं की देशी उपचार चालू आहेत, ते तरी सांग.

      बालीशपणा आता सोडून दे! इतरांना शिकवीत बसण्या पेक्षा स्वतः ला सुधार अगोदर, ते तुझ्याच फायद्याचे होईल.

      पुरोगामी विचारवंतांची पुस्तके वाच, विज्ञानाची पुस्तके वाच, बघ काय प्रकाश पडला तर!

      दुसर्यांना काहीही उपदेश देण्याच्या भानगडीत पडू नकोस, बाळा तेवढा तू हुशार नाहीस, हे विसरू नको.

      बस! आता येवडेच पुरे, नाहीतर तुझ्या डोक्या वरून जाईल कदाचित.

      मंगेश देशपांडे


      Delete
    2. अंधश्रद्धा निर्मुलन वर्तापत्राचा सभासद हो, आणि बन निर्भेळ पुरोगामी, मानवतावादी!

      मंगेश देशपांडे

      Delete
    3. मंगेश विकास देशपांडे

      चुकलच की माझं

      मला तुला तसं दुखवायचं नव्हत !

      मी बोलतोय तो विकास वेगळा आहे !

      मला काय माहित हे असे असेल -

      खरच !


      शाम मानवांचा विजय असो !

      अंधश्रद्धा निर्मुलनाचा विजय असो !

      Delete
    4. केवलभाई रमणभाई

      काय हे, माझ्या वडिलांचे नावच बदलले तुम्ही. हे काही बरोबर केले नाही. तुमचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. स्वतःच्या बापाचेही नाव बदलत राहता की काय अशी शंका येते? आईकडूनच असे बाळकडू मिळाले असल्याची दाट शक्यता आहे.

      मंगेश पुरुषोत्तम देशपांडे

      मंगेश देशपांडे

      Delete
    5. बोरकरच्या आईचा नवराAugust 25, 2013 at 2:37 AM

      ह्या बोरकरला स्वत:चा बाप माहित असेल तर नाव बदलणार ना! सतत वेगवेगळी नावे वापरून लोकांचा बुद्धिभेद करणारे किती बापांचे आहेत हे त्यांनाही माहित नसेल.

      Delete
  33. केवलभाई - चला - सर्वानी लायनीत उभे राहायचे आहे

    रमणभाई - सर्वाना एकच नियम

    केवलभाई - बोरकर सरांचे विचार इतक्या लोकाना पटतील असे वाटले नव्हते

    रमणभाई- या सर्वानी पिशवीतून काय आणलाय एव्हढे ? - अहो देव्हारे आहेत - टाक आणि पुजेतले देव आहेत - विष्णू आहे शाळीग्राम आहे लंगडा बाळकृष्ण आहे

    -केवलभाई - म्हणजे सगळेजण आज नदीत देव्हारे आणि देव फेकणार ?- इतकी वैचारिक क्रांती ? सारू बात छे ! पछी तू एम कर नी !



    रमणभाई- अहो बोरकर साहेब !- लोक तर धर्मच बदलण्याच्या गोष्टी करत आहेत -

    - आत्ता संजय सर येतील आणि विकास सर आणि अनिताताई एकत्र येतील

    आज अनिता ताई सांगतील की हिंदू नावाचा धर्मच नाहीये ते नाव इंग्रजांनी दिलय आपल्याला !अनिता ताईंचे पटणार नाही असे कसे ?

    त्यामुळे या लोकांनी ठरवले आहे की हिंदू धर्मच नसेल तर मग हिंदू देव पण नाहीत !

    देवीचे घटही नाहीत आणि गणपतीचे ते दहा दिवसही नाहीत !स्थापना नाही आणि विसर्जनही नाही - सत्यनारायण तर अजिबात नाही - ब्राह्मणाच नाही !अगदी समजायला सोपे आणि सरळ - ते ठरवतील तो मंत्र आणि तंत्र



    केवलभाई - मग काय - म्हणून हे सर्व नदीत विसर्जन करणार सगळी लोक ?

    रमणभाई - हो - या सगळ्या सुवासिनी - त्यांची मंगळसूत्रे नदीत विसर्जन करणार - कुंकवाचे करंडे नदीत फेकून देणार - कारण हिंदू धर्मच नाही -आता कपाळे पांढरी - खंडोबाच्या भंडाऱ्या बाबत अजून निर्णय नाही झाला

    - तो श्रेष्ठींनी राखून ठेवला आहे - तो लवकरच ठरेल

    केवलभाई - हिंदू नाही म्हणजे आपण आता सुंता करायचा का ? विकास सर त्याची व्यवस्था करायला गेले का आत्ता धावत धावत ?



    रमणभाई - आता भाषणे होणार आहेत त्यानंतर नवीन शैव धर्माची आरती होणार आहे -

    आता कुणीही आपल्या मुलांची नावे विष्णू वरून ठेवायची नाहीत - त्याला आजीवन दंड होईल-

    आणि मुलींची नावे लक्ष्मी सरस्वती अशी नाही चालणार - आता फक्त पार्वतीची नावे

    त्यावर संजय सोनावणी यांनी नवीन पुस्तके लिहिली आहेत मुलींची १००० नावे पार्वती गिरीजा -

    आणि शैव नावे पुरुषांची शिव , शंकर - - १००० - हा त्यांचा योगा योगाने १००० वा ग्रंथ आहे



    केवलभाई -आता त्यांचे नाव गिनीज बुकात येणार आहे

    त्यांच्या तर्फे शैव धर्मासाठी विकास याची पुरुष विभागात प्रमुख आणि अनिता ताई यांची स्त्री विभागात प्रमुख अशी निवड झाली आहे त्यामुळे तिघेही आनंदी आहेत -


    जणू शंकर पार्वती आणि नंदी !-" आ नंदी आ नंदी " अशी नांदी झाली आहे !


    आता पूजेचे नियम बदलणार - ब्राह्मणच नाहीत - सगळ्यांनी जानवी फेकून घनगराच्याकडून विणलेल्या गोधडीचाच तुकडा गळ्यात घालावा - हे सगळे त्या पुस्तकात आहे - जास्त सांगत नाही - किमत फक्त ५०० रु आहे म्हणे -पाने फक्त ५०- बिन व्याकरणाच्या मराठीत आहे ! समजले तर ठीक नाहीतर आपापला अर्थ लावायचा - घोन्गडीच्या ठिकाणी गोधडी म्हणा ! कारण व्याकरण मानत नाहीत हे शैव धर्माचे लोक - प्रत्येकाने आपल्याला हवा तो अर्थ काढा - आणि साजरा करा शिवधर्म !



    ReplyDelete
  34. दाभोलकरांच्या मारेकर्यांना गोडसेवादी, सनातनवादी म्हटल्यावर ज्यांना-ज्यांना राग येतो त्यांना-त्यांना ब्राह्मण्यवादी किंवा मनुवादी म्हटल्यास वावगे ठरू नये.

    अविनाश

    ReplyDelete
  35. …म्हणून 'त्यांनी' गोळ्या घातल्या!

    प्रतिमा जोशी

    आपले हितसंबंध जपणारी व्यवस्था शाबूत राहावी यासाठी राजसत्ता , अर्थसत्ता आणि धर्मसत्ता या तिन्ही सत्तांचा वापर करणारी माणसं नेमकी कशाला आणि कोणाला बाजूला सारू पाहतात ? याचं उत्तर शोधू गेलं तर या सत्ताचौकटींचं मुखवट्याआडचं अस्सल रूप ज्यांना दिसलं आणि ते इतरांच्या नजरेला आणून देण्याचा खटाटोप ज्यांनी आरंभला अशांना बाजूला सारलं.
    महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन लागलं की आश्वासनांच्या कागदपत्रांचे आणि कायद्याच्या सुधारित मसुद्याचे भारे घेऊन मंत्र्यांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत खेटे घालणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर आता यापुढं विधानभवनाच्या आणि मंत्रालयाच्या वास्तूला दिसणार नाहीत. त्यांचे म्हणणे बुद्धीला तर पटते आहे , मात्र राजकारणाच्या गाळात ते प्रत्यक्षात आणण्याची इच्छा नाही , अशा धर्मसंकटातून जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची किंचित सुटका झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये इतकी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची आणि पर्यायानं डॉ. दाभोलकरांचीही परवड महाराष्ट्राने केली. मंगळवारी थंड डोक्यानं कट रचून केली गेलेली त्यांची क्रूर हत्या ही एकप्रकारे मनुष्यप्राण्याला माणूसपण देणाऱ्या विवेकाच्या आतल्या आवाजाचीच हत्या म्हणावी लागेल.
    डॉ. दाभोलकर यांना हा विवेकाचा आतला आवाज गेल्या चार दशकांपासूनच सतावत होता. स्वस्थ बसू देत नव्हता. दाभोलकरांच्या कुटुंबाचाच अविभाज्य भाग असलेल्या या विवेकाचा समाजवाद हा चेहरा होता आणि मार्गाची प्रेरणा म. गांधींची होती. १० भावंडांमधील सर्वात धाकटे असलेले नरेंद्र यांची प्रकृती थोरले बंधु शिक्षणतज्ज्ञ देवदत्त , शेतीतज्ज्ञ बंधु श्रीपाद , दुसरे बंधु दत्तप्रसाद आणि दत्तप्रसन्न यांच्यापेक्षा काहीशी बंडखोरीची आणि कठोर चिकित्सेची. साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून शालेय आणि सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतल्यावर मिरजेच्या मेडिकल कॉलेजातून त्यांनी एम.बी.बी.एस. पूर्ण केलं. १२ वर्षं साताऱ्यात डॉक्टरकी केली. लौकिक अर्थानं पाह्यलं तर कोणाही मध्यमवर्गीयाला समाधान वाटेल असं आयुष्य आणि करिअर त्यांच्या हिश्श्याला आलं होतं. नुसती डॉक्टरकीच केली असती तरी लोकांनी नावाजलं असतंच... पैसाही मिळाला असता.
    (पुढे चालू.........)

    ReplyDelete
  36. १९७०चं दशक हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वादळ घेऊन आलं. दलित चळवळीची झंझावाती सुरुवात झाली होती. सत्यशोधक विचारधारा प्रमाण मानत समाजपरिवर्तनाचा आग्रह धरणारे नेते डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेल्या ' एक गाव एक पाणवठा ' मोहिमेने महाराष्ट्रात खोलवर रुजलेल्या जातीयतेचं विद्रुप रूप समोर येत होतं. विकासाच्या गंगेचा थेंबही न पोहोचलेल्या खेड्यापाड्यातील वंचित भूमिहिनांची गाऱ्हाणी मुखर करणारी आंदोलनं रुजू पाहत होती. अशा स्थितीत नरेंद्र दाभोलकर नावाचा एक तरुण निव्वळ डॉक्टरी करत सुखाचं आयुष्य जगणं शक्यच नव्हतं. आपली सुविद्य पत्नी वृंदा यांच्या हाती हॉस्पिटलचा पसारा सोपवून निश्चयानं ते समाजपरिवर्तनाच्या लढ्यात पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून उतरले. ' एक गाव , एक पाणवठा मोहीम ' ही त्यांच्या विचारांच्या , अग्रक्रमांच्या , कार्यपद्धतीच्या दृष्टीनं नेमकेपणा आणणारी ठरली.
    सातारा जिल्हा हा एका अर्थानं यशवंतराव चव्हाण , प्रतापसिंह आणि अभयसिंहराजे भोसले अशा दिग्गजांचा जिल्हा. काँग्रेसचा बालेकिल्ला. समाजवादी युवक दलाच्या माध्यमातून कष्टकऱ्यांचे , दलितांचे , मजुरांचे , भूमिहिनांचे , स्त्रियांचे प्रश्न घेऊन सत्तेच्या या चिरेबंदीला भेदणं हे आव्हानाचंच काम होतं. डॉ. दाभोलकरांच्याच शब्दांत सांगायचं तर , ' शक्तिशाली निद्रिस्त सिंहाच्या अंगावर बागडणाऱ्या उंदरासारखी ' ही धडपड होती. मात्र हा उंदीर नंतर भलताच उपद्रवी ठरणार आहे याची जाणीव प्रस्थापितांना तेव्हापासूनच व्हावी इतका नेमकेपणा आणि आक्रमकपणा डॉक्टरांच्या मांडणीत आणि कार्यक्रमांतही होता.
    डॉ. आढावांबरोबर म. जोतिराव फुले समता प्रतिष्ठानचं आणि विषमता निर्मूलन समितीचं काम पुढं रेटताना प्रतिष्ठानशी संबंधित अनेक कार्यकर्त्यांना आपल्या कार्याच्या पुढील दिशा स्पष्ट झाल्या. त्यात डॉक्टरांचा कल अंधश्रद्धा निर्मूलनाकडं झुकला आणि १९८३च्या सुमारास ' अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ' चं काम महाराष्ट्रात सुरू झालं.
    सत्यसाईबाबांच्या चमत्कारांना आव्हान देणाऱ्या अब्राहम कोवूरांच्या ' चमत्कार खरे आहेत हे सिद्ध करा , एक लाखाचं इनाम घेऊन जा ,' हे आवाहन त्यांनी राज्यभर तळमळीनं पोचवलं. आजतागायत हे आवाहन स्वीकारणारा माईचा लाल निघालेला नाही. पुरोगामी चळवळीच्या शिरस्त्याप्रमाणं समितीचं विभाजन झालं आणि १९८९पासून डॉक्टरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वेगळी चूल मांडली. कामाचा जोष आणि झपाटा मात्र कायम राहिला. नरबळी , भानामती , भूतप्रेत , जादूटोणा याबरोबरीनंच आध्यात्मिक झुलीखाली झुलणारी आणि भक्तांना झुलवणारी बाबा आणि बापूगिरी यांचा पर्दाफाश समिती करत राहिली. या २५ वर्षांत डॉक्टरांनी तरुण उत्साही कार्यकर्त्यांची अफाट फौज जमवली. जिल्ह्याजिल्ह्यात , तालुक्या-गावांत हे तरुण-तरुणी श्रद्धा , अंधश्रद्धा , भक्ती , कर्मकांड यांवर आज निर्भीड विचार मांडत आहेत. चिकित्सा करत आहेत.
    (पुढे चालू.........)

    ReplyDelete
  37. हीच धर्मचिकित्सा डॉक्टरांच्या प्राणावर बेतली का ? निश्चित सांगणं अवघड आहे ; परंतु संशयाच्या सुया तिथंच वळत आहेत. ऑगस्ट २००२पासून त्यांनी अंधश्रद्धांना आवर घालणारा कायदा व्हावा , या मागणीसाठी रान उठवायचं ठरवलं. कायद्याचं प्रारूप तयार करणं , तांत्रिक गरजांनुसार त्यात बदल करणं , आराखडा बनून विधेयकात त्याचं रूपांतर होईपर्यंत प्रबोधनाचे सर्व मार्ग चोखाळणं , राजकीय पक्षप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचं मन या कायद्यासाठी अनुकूल करणं हे त्यांचं जणू मिशनच बनलं होतं. या कायद्याबद्दल अनेक गैरसमज आपापतः किंवा हेतूतः पसरले/पसरवले गेले. विशेषतः वारकरी संप्रदायात त्याला मोठा विरोध निर्माण झाला. त्यांच्याशी आणि ज्यांना ज्यांना शंका आहे त्या सर्वांशी चर्चा करण्यात डॉक्टर कधी थकले नाहीत आणि हटलेही नाहीत. विविध दबावांमुळे या विधेयकात इतके बदल झाले की त्याचे नावही अखेर ' जादूटोणाविरोधी कायदा ' असं बदललं.
    इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही डॉ. दाभोलकर नामोहरम झाले नव्हते. ' बोलू आणि मार्ग काढू ' अशी त्यांची तयारी असे. धर्म , परंपरा , कर्मकांड यांबाबत शांतपणं पण ठामपणं ते वादंगाला कायम तयार असत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या सापेक्ष कल्पना आहेत आणि त्यांच्यात फारच अस्पष्ट रेघ आहे... सबब फक्त अंधश्रद्धांचं निर्मूलन हे मृगजळ आहे , असं मानणाऱ्या पुरोगाम्यांमधील जहाल गटांनी त्यांच्या भूमिकांवर बरेचदा टीका केली आहे. त्यांच्या मध्यममार्गाची खिल्लीही उडवली आहे. त्यांचे अनेक जुने सहकारी त्यांना दुरावले. या कशानेही विचलित न होता ते आपलं म्हणणं मांडत राहिले.
    मात्र ' अंनिस ' हीच त्यांची ओळख नव्हती. राष्ट्र सेवा दल असो , महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आर्थिक आधार देणारा सामाजिक कृतज्ञता निधी असो , साताऱ्यातील रयत शिक्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन या संस्था असोत , परिवर्तन हे व्यसनमुक्ती केंद्र असो की गेली सात वर्षं त्यांनी यशस्वीपणं सांभाळलेली ' साधना ' साप्ताहिकाची धुरा असो ; डॉ. नरेंद्र दाभोलकर हे नाव त्यांच्या इतिहासात कुठं ना कुठं सापडत राहीलच. तुकड्यातुकड्यांनी चळवळी उभारत नाहीत , टिकत नाहीत , त्या समग्र प्रश्नाशी जोडून घ्यायला हव्यात , हा त्यांचा आग्रह असे. कायम खादी वापरणाऱ्या डॉक्टरांच्या वैयक्तिक जीवनातही या आग्रहाचे प्रतिबिंब वेगळ्या पद्धतीनं पडलेलं दिसेल... त्यांच्या मुलाचं नाव हमीद आहे , हमीद दलवाईंशी असलेला डॉक्टरांचा स्नेह हे त्यांच्यातील बहुमुखी कार्यकर्त्याचंच प्रतिबिंब आहे.
    अशा या चर्चेला कायम तयार असणाऱ्या , अहिंसेचं तत्त्व मनोमन मानणाऱ्या , समाजातील वाईटाचं निर्मूलन होऊन सर्वसामान्यांचं जीवन सुखी व्हावं असं वाटणाऱ्या माणसाची अखेर ही महाराष्ट्रातील सुजाणांना चिंता वाटावी अशीच आहे. त्याचबरोबर , एरवी गुळगुळीत वाटणारा नेमस्त पण चिवट आणि ठाम मध्यममार्ग प्रत्यक्षात हितसंबंधीयांना ' थ्रेट ' वाटत असतो , हे सत्य पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
    (समाप्त).

    ReplyDelete
  38. दाभोलकरांचा विचार संपणार नाही..

    अतुल पेठे

    डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून म्हणजे एका विवेकी माणसाची अविवेकी माणसांनी केलेली हत्या होय. दाभोलकरांना दोन गोळ्या मारण्यात आल्या. त्यातली पहिली गोळी ही विवेक संपवण्यासाठी, तर दुसरी गोळी विचार संपवण्यासाठी होती. या दोन्ही गोळ्यांमुळे दाभोलकरांचा मृत्यू झाला, म्हणजेच दाभोलकरांचा देह संपला; पण याचा अर्थ त्यांनी रुजवलेला विचार संपला असा नाही. मारणाऱ्या व्यक्तीला वाटते की माणूस संपला की विचार संपला; पण मारणाऱ्या व्यक्तीचे हे केविलवाणे अज्ञान असते. ज्यांना विचारांचा सामना विचारांनी करायचा नसतो, त्याच व्यक्ती ही असली कृत्ये करतात. तोंडाला काळे फासणे, अॅसिड फेकणे, हातपाय तोडणे, प्रसंगी मारून टाकणे, असली कृत्ये ही भ्याड माणसे करतात. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे महात्मा गांधींचा खून किंवा सफदर हश्मी या लेखक- कलावंताचा खून, डॉ. दाभोलकरांचा खून हा त्यांच्या पुरोगामी विचारांचा सामना न करण्यातूनच झालेला आहे. इतिहासात असे विचार संपवण्याचे अनेक मार्ग लोकांनी विविध पद्धतीने अवलंबिलेले आहेत. तुम्ही विचार करता हाच त्यांच्या दृष्टीने मोठा गुन्हा असतो. तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवणे, ज्ञानेश्वरांना वाळीत टाकणे, असे अनेक प्रकार आपल्याला आढळतात. गेल्या काही काळामध्ये समाजात वैचारिक अधिष्ठान लयाला जाऊन दांडगाईचे, गुंडपणाचे अधिष्ठान मुख्य बनले आहे. विचार करणाऱ्या माणसांविषयी घृणा उत्पन्न करणे हे अर्थातच एका मोठय़ा राजकारणाचा भाग असते. विचार करायला लावणारा माणूस हा आजूबाजूच्या माणसांना अज्ञानातून मुक्ती देत असतो, परिस्थितीची प्रखर जाणीव करून देत असतो. महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांनी समाजातील शूद्र आणि स्त्रियांबाबत मांडलेले विचार तत्कालीन समाजासाठी धक्कादायक होते. म्हणूनच त्यांना समाजाचा रोष पत्करावा लागला, प्रसंगी प्राणघातक हल्ल्यालाही सामोरे जावे लागले होते.
    आता प्रश्न असा आहे, की कुणी म्हणेल, आम्ही पण विचार करतो. मग काही लोकांचा विचार महत्त्वाचा आणि काही लोकांचा विचार कमी महत्त्वाचा असे कसे? आपण वर उल्लेख केलेल्या व्यक्तींचे विचार हे पुरोगामी होते. पुरोमागी विचार असणे म्हणजे समाजाला प्रगतिपथावर नेणे. काळानुरूप होणाऱ्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, तांत्रिक बदलांप्रमाणे पूर्वीच्या विचारांना मोडावे किंवा वाकवावे लागते.
    (पुढे चालू.........)

    ReplyDelete
  39. आज महत्त्वाची असणारी गोष्ट उद्या बिनमहत्त्वाची ठरू शकते. आपले जगणे याअर्थी प्रवाही असते. जगण्याचे जेव्हा डबके होते, तेव्हा त्या डबक्यामध्ये डास आणि अळ्या तयार होतात, पाणी खराब होते. जगणे जर प्रवाही व्हायचे असेल, तर नवे विचार आत्मसात करत ते पुढे न्यायला हवेत. काळानुरूप विचारांची, आपल्या आयुष्याची पुनर्माडणी करणे गरजेचे असते. आपल्या देशात विविध जाती, धर्म, पंथ यांचे वेगवेगळे समूह आपल्याला एकाच वेळेस लक्षात घ्यावे लागतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली भारतीय घटना ही साऱ्या समूहांचा विचार करून लिहिलेली एक पुरोगामी संहिता आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तीन गोष्टींना इथे केंद्रस्थान आहे. समाजात वावरताना बोलणे, लिहिणे, व्यक्त करणे याबाबत ही घटना आपल्याला मार्गदर्शक तत्त्वे सांगते. अशा वेळी एखादी गोष्ट पटली नाही, तर लोकशाहीमध्ये न्यायालयीन प्रक्रियाही आहे.
    वादविवाद, आपल्या बाजूचा मतप्रवाह तयार करणे अशा सर्व बाबी करण्यासाठी इथे पुरेसा अवकाश आहे, जागा आहे. पुरोगामी विचार हा जातपातविरहित, भाषा, प्रांत, सीमा यांना उल्लंघून जाणारा, अखिल मानवतेचा, सुसंस्कृत आणि सहिष्णू विचार आहे. बालविवाह, सतीची चाल बंद करणे हा पुरोगामीच विचार होता. समाजातील विविध स्तरांची, दु:ख, वेदना, व्याकूळता असा मोठा परीघ पुरोगामी विचारांत आहे. वंचित, शोषितांचा विचार हा पुरोगामी विचारांचा गाभा आहे. आपापल्या धर्माचे आचरण करीत एकमेकांविषयी आदर ठेवणे हे पुरोगामी विचारांचे मूळ आहे. डॉ. दाभोलकर याच पाश्र्वभूमीवर सातत्याने पुरोगामी विचार मांडत होते. लोकांनी अज्ञानाने अथवा त्यांच्या फायद्याकरिता दाभोलकरांचे विचार नीट समजून घेतले नाहीत. ते हिंदुद्वेष्टे आहेत, धर्मबुडवे आहेत अशी हाकाटी केवळ अज्ञानातून आलेली आहे. त्यांचे विचार हे खरे तर आगरकर आणि गाडगेमहाराज यांच्या विचारांशी जवळीक साधणारे होते. विज्ञाननिष्ठ, विवेकनिष्ठ, वैचारिक आचरण ही त्यांच्या विचारांची त्रिसूत्री होती.
    डॉ. दाभोलकरांची महाराष्ट्रात, पुण्यात आणि शनिवार पेठेत खून व्हावा ही लांछनास्पद गोष्ट आहेच पण पुन्हा नव्याने विचार करायला लावणारी घटना आहे. याबाबत बटरड्र रसेल या विचारवंताचे एक वाक्य महत्त्वाचे वाटते, Fear is the main source of superstition and one of the main source of cruelty. To conqure fear is the begining of wisdom. (भीती हे अंधश्रद्धेचे मूळ आहे. या भीतीचे रूपांतर कधी कधी क्रौर्यातही होऊ शकते म्हणूनच भीतीवर मात करणे हीच शहाणपणाची सुरुवात आहे.) डॉ. दाभोलकरांनी मांडलेल्या पुरोगामी विचारांची भीती सोडून त्यांनी मांडलेले शोषणमुक्त विचार आत्मसात करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.
    (समाप्त).

    ReplyDelete
  40. संजय सर ,

    या सर्व अमृत मंथनातून उत्तम विचारांचा अमृत कलश हाती लागला आणि विष पण !

    हे हलाहल पचविण्याचे सामर्थ्य राष्ट्र सेवा दलाच्या आणि अंध श्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत नक्कीच आहे . काल हा उत्तम परीक्षक असतो

    पुण्यातील असंख्य लोकांचे मनोबल या चळवळीच्या मागे आहे


    सध्या सरांच्या मुलाखती ती व्ही वर बघायला मिळतात

    तशीच सी डी साधनाने काढली तर फार उपकार होतील

    ReplyDelete
  41. आप्पा बाप्पा व स्वप्नाली विश्वास,
    तसेच
    मल्हार बोरकर व केवलभाई रमणभाई, व्यक्ती आणि प्रवृत्ती एकच.
    फक्त नावे वेगळी आहेत.

    दत्तात्र्येय आगाशे आता सुधारण्याच्या मार्गावर, हेही नसे थोडके!

    अविनाश.

    ReplyDelete
    Replies
    1. लबाड गाढव (आप्पा बाप्पा,स्वप्नाली विश्वास,मल्हार बोरकर,केवलभाई रमणभाई,दत्तात्र्येय आगाशे)

      एका माणसाजवळ एक गाढव होते. तो माणूस वाणी होता. तो परगावी सामान विकत घेई आणि गाढवावर लादून आपल्या घरी आणी. एकदा तो वाणी गाढवावर मिठाची गोणी लादून घरी आणीत होता. वाटेत एक लहानशी नदी होती. नदीतून जाताना गाढवाचा पाय घसरला आणि ते नदीत पडले, तोच नदीचे पाणी मिठाच्या गोणीत शिरले व बरेच मीठ विरघळून गेले. फार मीठ विरघळले होते; त्यामुळे गाढवाचे ओझे अगदी हलके झाले. पुढे काही दिवसांनी वाणी मिठाची दुसरी खेप घेऊन आला. नदीजवळ येताच गाढवाला मागील खेपेची आठवण झाली. लागलीच ते जाणूनबुजून पाय चुकवून नदीत पडले. पुन्हा मीठ विरघळून ओझे हलके झाले. आणखी दोन-चार वेळा गाढवाने तसेच केले. शेवटी गाढवाची ही लबाडी मालकाला कळून चुकली. पुढच्या खेपेस गाढवावर खूपसा कापूस लादून तो घरी येऊ लागला. पुन्हा नदीजवळ येताच गाढव खाली पडले. पण या वेळेस कापूस विरघळून भार कमी झाला नाही, उलट पाणी कापसात शिरून ओझे जड बरीक झाले. मोठे ओझे पाठीवर पडून ते लबाड गाढव भाराखाली चेंगरून गेले.

      तात्पर्य : याकरिता आपले काम नेहमी इमानाने करावे. लबाडी केली तर ती कधीतरी उघडकीस येते व आपणास फार मोठी शिक्षा घडते.

      संतोष तोरणे

      Delete
  42. KEEP IT UP! SUNIL.

    ReplyDelete
  43. सनातन विकृती (PART-I)

    प्रकाश पोळ, कराड.

    ता. २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची सुसंस्कृत पुण्यामध्ये गोळ्या घालून निर्घृण हत्या झाली. डॉ. दाभोलकरांचे कार्य इतक्या मोठ्या प्रमाणात समाजात पसरत चालले होते कि संकुचित मनुवादी प्रवृत्त्तींनी त्यांची खूपच धास्ती घेतली होती. समाजाला जाती-धर्माची, अंधश्रद्धेची नशा पाजून आपली तुंबडी भरणारे महाभाग समाजात भरपूर आहेत. या महाभागांनी दाभोलकर आणि अंनिसबद्दल आजपर्यंत खूप अपप्रचार केला. दाभोलकर हयात असताना त्यांच्याबद्दल खूपच असभ्य भाषेत टिकाटिपण्णी करण्यात येत होती. परंतु हिंदू धर्म-संस्कृतीचा ठेका घेतलेले हे लोक किती खालच्या पातळीवर उतरू शकतात याचा अनुभव साऱ्या महाराष्ट्राने दाभोलकरांच्या हत्येनंतर घेतला.

    दाभोलकरांच्या हत्येने महाराष्ट्रच नव्हे तर देशाला धक्का बसला. राष्ट्रीय राजकारण, समाजकारण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक मान्यवरांनी दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कार्याचा गौरव केला. राज्यसभेतही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला. दाभोलकरांचे सहकारी आणि पुरोगामी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून मनुवादी, धर्मांध प्रवृत्तींचा निषेध करत होते.

    यावेळी दाभोलकरांचे वैचारिक (?) विरोधक असलेले सनातन संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते सनातन वर सर्व स्तरातून होणारी टिका आणि आरोप यांचे खंडन करत होते. सनातन संस्थेची आजपर्यंतची कार्यपद्धती आणि विचारसरणी पाहता सनातन संस्थेचे नाव यात येणे स्वाभाविक आहे. पोलीस तपास करत असताना सर्व शक्यता पडताळून पाहत असतात. त्यातीलच एक शक्यता सनातन संस्थेचा यात सहभाग असू शकतो ही आहे. जर तसा सहभाग नसेल तर त्यांना काळजी करण्याचे कारण नाही. सनातन संस्थेचे नाव सर्वांच्याच तोंडात का होते याचा विचार सनातनने केला पाहिजे. उठसुठ हिंदू धर्म-संस्कृतीचा टेंभा मिरवणाऱ्या सनातनने दाभोलकरांच्या मृत्युनंतर त्यांचाबद्दल असभ्य भाषेत टिकाटिपण्णी करून आपल्या वैचारिक दिवाळखोरीचे दर्शन अवघ्या महाराष्ट्राला घडवले. हीच जर हिंदू संस्कृती असेल तर अशा संस्कृतीची, विचारधारेची आपणाला लाज वाटावी अशी परिस्थिती सनातनने निर्माण करून ठेवली आहे.

    ReplyDelete
  44. सनातन विकृती (PART-II)

    मरणान्तानि वैराणि !

    मरणान्तानि वैराणि ! असे शीर्षक देवून सनातन प्रभातच्या २१ ऑगस्टच्या अंकात संपादक जयंत बाळाजी आठवले हे लिहितात, ‘आज सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची बातमी समजली, तेव्हा गीतेतील जातस्य हि ध्रुवो मृत्युः ! म्हणजे जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित असतो, या शिकवणीची आठवण झाली. नंतर कर्मयोगाच्या दृष्टीकोनातून पुढील विचार मनात आले.

    1. 1. जन्म आणि मृत्यू हे प्रारब्धानुसार होतात.
    2. 2. प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ मिळतं.

    ते पुढे लिहितात, ‘आजाराने अंथरुणाला खिळून मरण्यापेक्षा किंवा शल्यकर्मानंतर वेदनादायी मृत्यू येण्यापेक्षा डॉ. दाभोलकरांना असा आलेला मृत्यू ही एकप्रकारे त्यांच्यावर ईश्वराने केलेली कृपाच आहे.’

    ‘डॉ. दाभोलकर ईश्वर मानत नसले, तरी ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.’
    जयंत बाळाजी आठवले यांची सनातन प्रभातमधील ही खुनशी वक्तव्ये पाहता हिंदू धर्माचा अभिमान आणणारी कोणतीही व्यक्ती शरमेने मान खाली घालेल यात तिळमात्र शंका नाही. हिंदू धर्माच्या नावाखाली ब्राम्हणी व्यवस्था, धर्म-परंपरा यांचा प्रचार-प्रसार करण्यात सनातन आघाडीवर असते. ब्राम्हणी विचार म्हटले कि बहुतांशी लोक पाठ फिरवतात, विरोध करतात. त्यामुळे हे सर्व हिंदू संस्कृती या गोंडस नावाखाली चालते. इथे बहुतांशी हिंदू आहेत आणि त्यांना आपल्या धर्माचा अभिमान असणार हे सनातनला चांगलेच माहित आहे. त्यातच सामान्य माणसाला धर्माची नशा पाजणे तुलनेने सोपे असते. ब्राम्हणी व्यवस्थेला विरोध करणऱ्या कार्यकर्त्यांना हिंदू धर्मद्रोही ठरवून त्यांची निंदानालस्ती केली जाते. असाच प्रकार दाभोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्याच्या बाबतीतही सनातन संस्थेने नेहमी केलेला आहे.

    सनातन संस्था आणि दाभोलकर हे एकमेकांचे वैचारिक विरोधक होते हे सर्वश्रुत आहे. एखाद्याचे विचार पटले नाहीत तर सभ्यतेच्या मर्यादा पाळून वैचारिक वाद घालायला काहीच हरकत नाही. समोरच्या माणसाबद्दल (जरी तो आपला वैचारिक विरोधक असला तरी) आदर बाळगला पाहिजे. आणि सनातनला हेच मान्य नसावे. नाहीतर दाभोलकरांच्या जाण्यानंतर सनातनला इतक्या उकळ्या फुटल्या नसत्या.

    जन्म आणि मृत्यू निश्चित असतात असं आठवले म्हणतात ते खरं आहे. कारण ते एक वैज्ञानिक सत्य आहे. त्यात कोणताही चमत्काराचा भाग नाही. परंतु आठवले पुढे मात्र असं म्हणतात कि जन्म मृत्यू प्रारब्धानुसार होतात आणि प्रत्येकाला आपल्या कर्माचं फळ मिळतं. म्हणजे दाभोलकरांनी जे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य चालवले होते त्याचे फळ दाभोलकरांना त्यांची हत्या होवून मिळाले. म्हणजे दाभोलकरांची हत्या झाली हे योग्यच झाले कारण ते त्यांच्या कर्माचे फळ होते. म्हणजे दाभोलकरांची हत्या समर्थनीय आहे असे तर सनातनला सुचवायचे नाही ना ? आणि हत्येसारखे वाईट फळ दाभोलकरांना मिळाले म्हणजे त्यांचे कर्म चुकीचे होते, वाईट होते असे सनातनला म्हणायचे आहे का ?

    ReplyDelete
  45. सनातन विकृती (PART-III)

    पुढे तर आठवले अत्यंत धक्कादायक विधान करतात. अंथरुणाला खिळून किंवा शल्यकर्माने मृत्यू येण्यापेक्षा असा आलेला मृत्यू ही ईश्वरी कृपाच आहे. आता दाभोलकरांना कसा मृत्यू आला. तर त्यांची गोळ्या घालून हत्या झाली. (तीही पाठीमागून. बहुदा दाभोलकरांचे तेज मारेकरी आणि त्यांच्या अंतस्थ प्रेरणांना सहन होत नसावे. उगीच दाभोलकरांच्या शरीरातून पुरोगामी विचारांची किरणे निघून त्यांचा तेजोभंग व्हायचा.) तर दाभोलकरांची झालेली हत्या ही त्यांच्यावर ईश्वराने केलेली कृपा असू शकते का याचे उत्तर एखादे शेंबडे पोरही देईल. आठवले यांच्यावरील विधानातून त्यांची दाभोलकरांच्या हत्येबद्दल काय भावना आहे हे लगेच समजून येते. ही मानसिकता आजची नाही. अगदी गांधीहत्येनंतरही काही लोकांना आनंद झालाच होता की. गांधींच्या विचारांचा प्रतिवाद होवू शकत होता. जसा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला. परंतु लोकशाहीपेक्षा ठोकशाहीवर ज्यांचा विश्वास आहे त्यांच्याकडून सभ्य वैचारिक प्रतिवादाची अपेक्षा कशी करावी ? गांधीना संपवले, दाभोलकरांना संपवले आणि नंतर त्यांच्या हत्येबद्दल आनंद व्यक्त केला गेला हे कशाचे लक्षण आहे ? सुसंस्कृतपणाचे कि अतिरेकी उद्दामपणाचे ?

    सनातनच्या याच अंकात दाभोलकर आणि अंनिसचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचाही उल्लेख आहे. त्यांना परदेशातून आर्थिक मदत मिळत होती असाही आरोप करण्यात आलेला आहे. पोलीस प्रशासन अशा भडकाऊ आणि तर्कविसंगत आरोपांचा समाचार घेणार आहे कि नाही ? राज्यकर्ते सनातनच्या अशा विषारी प्रचाराला लगाम घालणार कि नाही ? मागे सनातन प्रभातने महात्मा फुले यांची बदनामी करून आपल्या अकलेचे तारे तोडले होते. तेव्हाही त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही हे कशाचे द्योतक आहे ?

    याच अंकात सनातन मध्ये दाभोलकरांच्या हत्येबद्दल काही जणांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सनातनवर सर्वांचा रोख वळलेला पाहून सनातनने सावकाश दाभोलकरांच्या हत्येचा निषेध केला. परंतु आपल्या सनातन प्रभातच्या अंकात संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान या संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याची प्रतिक्रिया अशी आहे, “बरे झाले, एक हिंदू धर्मद्वेष्टा गेला.” तसेच सनातननेही स्वतःचे मत नोंदवले आहे. ते असे कि, ‘प्रसारमाध्यमे उगीच दाभोलकरांचा उदोउदो करत आहेत. त्यांच्या हत्येबद्दल फारसे कुणाला वाईट वाटलेले नाही. उलट हत्या झाल्यानंतर काही तासात चौकाचौकात जमून लोक अशा प्रतिक्रिया व्यक्त करत होते कि बरे झाले, हिंदू धर्मद्वेष्टा गेला. आता दाभोलकर जरी सनातन आणि त्यांच्या समविचारी लोकांचे वैचारिक शत्रू असले तरी दाभोलकरांच्या मृत्यूने त्यांना आनंद होणे हे मानसिक विकृतीचे लक्षण आहे. आणि ज्या धर्म-संस्कृतीचा टेंभा हे लोक मिरवतात त्याची हीच शिकवण आहे का ? असा आमचा सवाल आहे.

    बहुजन समाजातील अनेक लोक सनातनच्या जाळ्यात अडकलेले आहेत. त्यांना सनातन संस्थेची विचारसरणी भलेही योग्य वाटत असेल. आणि तसे वाटत असण्यात काही गैर नाही. कुणालाही कोणताही विचार स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे. फक्त त्यांनी इतकाच विचार करणे गरजेचे आहे कि सनातन किंवा इतर धार्मिक संघटना जो विचार मांडतात तो खरेच सर्व समाजाच्या भल्याचा आहे का ? जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे करून कुणाचे भले होणार आहे ? या निरर्थक संघर्षातून काय साध्य होणार आहे ? या गोष्टींचा विचार करावा. हिंसा माणसाला विकृत बनवते. आणि जिथे वैचारिक प्रतिवाद शक्य आहे तिथे तर हिंसेचा मागमूसही नको. गांधींना संपवून त्यांचे विचार संपत नाहीत. त्याचप्रमाणे दाभोलकरांना मारून त्यांचे विचार मरणार नाहीत. भलेही गांधीवधाप्रमाणे ‘दाभोलकर वध’ असा शब्दप्रयोग सुसंस्कृत पुण्यात रूढ होऊ दे. समाजातील तरुण, सुजाण लोकांनी एकच विचार करावा कि समतेचा, शांततेचा, अहिंसेचा, विवेकाचा मार्ग योग्य कि हिंसा, द्वेष, अविवेकाचा मार्ग योग्य ? सारासार विचार करून तटस्थ मनाने, आपला धर्म-जात डोक्यातून काढून केवळ माणुसकीच्या भूमिकेतून विचार करावा आणि मगच आपण कशा पद्धतीने वाटचाल करायची आहे ते ठरवावे.
    FINISHED.

    ReplyDelete
  46. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे परिवर्तनासाठी हौतात्म्य

    डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या हा परिवर्तन-वादी चळवळीवरील मोठा हल्ला आहे. विवेकवाद, विचाराचे स्वातंत्र्य व अंधश्रध्दा विरुध्द बंड करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या आयुष्याचे जीवित ध्येय असणाऱ्या अंधश्रध्दा निर्मूलनाचे बिल सर्व पक्षांनी एकमताने मंजूर करणे, हीच डॉक्टरांना खरी श्रध्दांजली ठरेल!डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येने समस्त सातारकर हादरले, व्यथित झाले, आपल्या घरातलाच एक माणूस परिवर्तनासाठी हौतात्म्य पत्करता झाला, अशीच सर्व सातारकर नागरिकांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि सर्व दाभोलकर बंधू सातारकरांच्या अभिमानाचा विषय होते.
    डॉक्टरांच्या विवेकवादाची सूत्रे
    गेले 16 वर्षे डॉ. नरेंद्र दाभोलकर साधना साप्ताहिकाच्या संपादन व साधना विश्वस्त निधीच्या सचिव पदामुळे जवळ जवळ पुणेकर झाले होते. त्यांच्या अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे महाराष्ट्रभर त्यांनी जाळे विणले होते. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या जीवनाचे मूल्य होते, चार सूत्रात, समता, समाजवाद आणि अन्यायाला विरोध त्यांनी केलाच.
    1) शोषण करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रध्दांना विरोध करणे.
    2) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणे, त्या आधारे विविध घटना तपासणे.
    3) धर्मनिरपेक्षतेचा वेगळा दृष्टिकोन रुजवणे आणि व्यापक परिवर्तनाचे भान जागृत करणे.
    त्यांनी 1978 सालापासून अंधश्रध्दा निर्मूलनाला वाहून घेतले होते. आपल्या समाजात धर्माची कृतिशील चिकित्सा करायला कुणी तयार नसते. धार्मिक मूलतत्त्ववाद्यांची दादागिरी व गुंडगिरी यामुळे सामान्य माणसं मनातून जरी मान्य असली तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांप्रमाणे सद्‌सद्‌विवेकबुध्दीला जागून मुकाबला करण्यास तयार नसत. डॉ. दाभोलकरांच्या हत्त्येने किडलेल्या समाज वास्तवाची ही भयसूचक घंटा आहे. बाळू मामाची मेंढरं असो, किंवा अस्लमबाबा असो, नर्मदा माता असो, या सर्व बुवाबाजीच्या विरुध्द डॉक्टर उभे राहिले. डॉक्टर धर्माविरुध्द अजिबात नव्हते. धर्म ही खाजगी बाब मानत होते. परंतु धर्माच्या नावावर मानवी संस्कृतीचा जो संकोच केला जात होता, त्याच्या विरुध्द होते. धर्माच्या नावावर शोषण अगतिकता, चंगळवाद, फसवणूक या सर्व अपप्रकारांच्या विरुध्द होते.cont.........

    ReplyDelete
  47. आणीबाणीतले डॉक्टरांचे कार्य

    डॉक्टरांनी आणीबाणीत विचार स्वातंत्र्यावर आक्रमण होताच, त्या आणीबाणीचा विरोध केला होता. डॉ. विवेकवादी व विचार स्वातंत्र्यवादी होते आणि त्यामुळे त्या काळांतही ते आणीबाणीच्या विरुध्द उभे राहिले. याच भूमिकेतून त्यांनी क्रीडा महर्षी बबनराव उथळे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने उभे केले. बबनराव उथळे हे त्यांचे क्रीडा गुरू होते, यापेक्षा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या इंदिरा गांधींच्या हुकूमशाही प्रवृत्तीविरुध्द हा लढा ते समजत होते.
    अंधश्रध्दा निर्मूलन कायदा
    गेले 14 वर्षे सारा महाराष्ट्र डॉक्टर नरेंद्र दाभोलकर पिंजून काढत होते. अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याचा मसुदा शरद पवार यांना सादर केला. विधानपरिषदेत तो प्रस्ताव मंजूरही झाला. गोपीनाथराव मुंडे, विलासराव देशमुख, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण या सर्वांनी हा शोषण करणारा कायदा मंजूर करण्याचे ठरविले. त्या कायद्याचे नाव "जादूटोणा, तत्सम अंधश्रध्दा विरोधी कायदा', अशी जाहिरात करण्यात आली. प्राचार्य एन. डी. पाटील, बाबा आढाव या सर्वांच्या मदतीने त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. 2004 सालापासून हिंदू जनजागृती समितीने कायद्याला विरोध केला. हिंदूंतील हितसंबंधी लोकातील हा कायदा धार्मिक सण, पंढरपूरची वारी, व्रतवैकल्ये, ज्योतिष, वास्तुशास्त्र, पंचांग याच्या विरोधी असून भक्तांना तुरुंगात जावे लागेल, असा अपप्रचार सातत्याने करून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विरुध्द रान पेटवायला सुरुवात केली आणि सरकार व सर्व पक्ष आपल्या मतपेढीच्या सुरक्षेसाठी डॉक्टरांना दाद देत नव्हते. प्रत्येकवेळी आश्वासन देवून महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांचे नाव घेणारे राज्यकर्ते क्रियाशून्य होते. सावरकर म्हणत, "आमच्या हिंदू राष्ट्रातील आजच्या वैज्ञानिक युगात टाकाऊ असणाऱ्या खुळचट रुढी, व्रते, मते, सोडावी' हाच विचार घेऊन डॉ. नरेंद्र दाभोलकर पुढे जात होते. उध्दव ठाकरे यांच्या सूचनेनुसार अघोरी शब्द काढून "जादूटोणा व दुष्ट प्रथांचे समूळ उच्चाटन, अधिनियम 2005' असे कायद्याचे नामाभिधान ठरले. परंतु समाज, रुढी, कर्मकांडे, परंपरा यात अडकून पडणाऱ्या धर्म धुरिणांनी हा हिंदू धर्मावर घाला आहे, असे समजून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विरुध्द जहरी प्रचार केला. डॉक्टर मुस्लिम समाजाला का बदलत नाहीत, असा प्रतिवाद केला. अनेकांना माहिती नाही, की मुस्लिम समाज सुधारक हमीद दलवाई डॉक्टरांचे व माझे परम स्नेही होते. डॉक्टरांनी आपल्या मुलाचे नाव हमीद ठेवले, याचे मुख्य कारण मुस्लिम समाजात नकळत सामंजस्य यावे. गुलाबभाई बागवान यांच्या मदतीने त्यांनी सर्व धर्म समभावावर आधारलेली परिषद घेतली. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, गाडगेबाबा यांच्या परंपरेचे डॉ. नरेंद्र दाभोलकर पाईक होते. प्रबोधनाची प्रभावी चळवळ त्यांनी उभी केली. सरकारविरोधी उपोषणे, मोर्चे हे सर्व काढले. परंतु सरकार ढिम्म झाले, त्यांनी हा कायदा बासनात ठेवला आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या समाज कार्यकर्त्याला हौतात्म्य पत्करावे लागले. एका प्रकारे परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना मूलतत्त्ववाद्यांना आपल्या कडव्या, दहशतवादाची खूण दाखवून दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर मधुरभाषी होते. त्यांनी कधीही दुसऱ्यांच्या भावना प्रक्षुब्ध होतील, असे वक्तव्य केले नाही. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असे मानणाऱ्या मूलतत्त्ववाद्यांनी डॉक्टरांवर सातत्याने अपप्रचाराच्या फैरी झाडल्या. डॉक्टर गणपतीच्या विरुध्द नव्हते. प्रदूषण लक्षात घेवून गणपती मूर्तीचे दान करावे, अशी भूमिका त्यांनी घेतली. परंतु देवतांचे दान घेणे, हा अपमान आहे, असे लोकांनी मानले. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या घराण्यातील राजमाता कल्पनाराजे यांनीही तळ्यात गणपतीचे विसर्जन करायला विरोध केला होता. यामध्ये कोठेही भावना दुखावण्याचा प्रश्न नव्हता.cont.............

    ReplyDelete
  48. डॉक्टर बुवा, बाबा, स्वामी, महाराज, संत-महंत यांच्या विरुध्द नव्हते. फक्त हेच संत-महंत एक विचारांचा प्रवाह अडवतात आणि मानसिक गुलामगिरी लादतात. याबद्दल डॉक्टरांच्या मनात राग होता आणि म्हणूनच श्रध्दांची नैतिक तपासणी झाली पाहिजे, समाजात विवेकी आत्मभान आले पाहिजे, असे ते मानत. पं. नेहरूंचा वैज्ञानिक दृष्टिकोन डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याजवळ होता. पं. नेहरू म्हणत, "डलळशपींळषळल ींशाशिीराशपीं ळी िीेलशीी ेष ींहळपज्ञळस, ाशींहेव ेष रलींळेप, ीशरीलह ेष र्ींीीींह, ुरू ेष श्रळषश, ीळिीळीं ेष र षीशश ारप.' डॉ. नरेंद्र दाभोलकर या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते होते, तो त्यांचा जीवन व्यवहार होता. अंधश्रध्दा निर्मूलन समिती मार्फत तरुणांची विवेकी पिढी महाराष्ट्रात त्यांनी उभी केली.
    डॉक्टर व माझा गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा स्नेह आहे. डॉ. दाभोलकरांचे घर हे कार्यकर्त्यांचे ऊर्जा केंद्र होते. लक्ष्मण माने, वर्षा देशपांडे, प्रमोद कोपर्डे, सुजित शेख, तुषार भद्रे, सुभाष वारे असे असंख्य कार्यकर्ते त्यांनी उभे केले. या कार्यकर्त्यांशी जरी मतभेद आले, तरी माझ्याजवळ चुकूनही त्यांच्याबद्दल अनुद्‌गारही काढला नाही. त्यांच्या कर्तृत्वाने लालबहादूर शास्त्री महाविद्यालयामागे परिवर्तनाचे ऊर्जा केंद्र त्यांनी उभे केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर या नावाला साताऱ्यात प्रतिष्ठा होती. हजारो लोकांनी निधी दिला. परंतु केवळ तांत्रिक कारणावर डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे हे ऊर्जा केंद्र बळकावण्याचा उद्योग काहींनी केला. तरीपण हे सर्व परिवर्तनवादी असल्यामुळे डॉक्टरांनी कधीही कांगावा केला नाही.
    क्रीडा क्षेत्रातील योगदान
    डॉक्टर उत्कृष्ट कबड्डीपटू होते. शिवाजी विद्यापीठाचे कर्णधार होते. आपल्या व्यापातून शिवाजी उदय मंडळाच्या कार्यक्रमासाठी ते वेळ काढत. शिवाजी उदय मंडळाची प्रतिष्ठा वाढावी म्हणून अविरत काम करत. शरद पवारांनी बबनराव उथळे यांना उभे करताना विचारले, डॉक्टर बबनरावांजवळ पैसे कुठे आहेत? डॉ. दाभोलकर म्हणाले, बबनराव उथळे यांच्यासाठी घाम गाळणारे हजारो कार्यकर्ते आहेत. डॉक्टरांनी बबनराव उथळे यांची निवडणूक याच निष्ठेने लढवली आणि आपले गुरू ऋण अदा केले. सातारच्या क्रीडा क्षेत्रात डॉक्टरांचा दबदबा होता.
    कार्यकर्त्यांचे ऊर्जाकेंद्र
    डॉ. दाभोलकर, डॉ. सौ. शैला दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर यांच्याशी माझ्या परिवाराचा वैयक्तिक संबंध होता. आजारात असून, मानसिक ताणाखाली असून डॉक्टर तत्परतेने मदतीला येत.
    दैनिक ऐक्यचे संपादक कै. सुरेश पळणिटकर हे सातत्याने डॉ. दाभोलकरांच्या मागे उभे राहिले. डॉक्टरांच्या संस्थेचे ते एक विश्वस्त होते. काही कारस्थानी लोकांनी परिवर्तनवादी चळवळीचे ऊर्जाकेंद्र ताब्यात घेतले तेव्हा पळणिटकरांना दु:ख झाले व त्यांनी आणि डॉक्टरांनी दहशतवादापेक्षा न्यायालयीन मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला.
    डॉक्टरांचे साधनेतले कार्य अलौकिक होते. साधना ट्रस्टला आज संपत्तीच्या दृष्टीने त्यांनी स्वयंपूर्ण बनवले. साने गुरुजी जन्मशताब्दी, साने गुरुजींच्या वाङ्‌मयाचे खंड काढले. साधना साहित्य संमेलने भरवली. प्रधान मास्तर, मोहन धारिया, सारेपाटील, कै. किशोर पवार यांचा विश्वास संपादन केला होता. डॉक्टरांच्या जाण्याने "साधना' पोरकी झाली. साधना साप्ताहिकाला 65 वर्षांची परंपरा खंडीत न करण्यात डॉक्टरांचा सिंहाचा वाटा आहे. असा आमचा परिवर्तनवादी मित्र या जगातून जाणे व त्याची हत्या होणे हे महाराष्ट्र शासनाला लाजिरवाणे आहे. सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकमताने अंधश्रध्दा निर्मूलन विरोधी बिल मंजूर करणे हीच डॉक्टरांना श्रध्दांजली ठरेल आणि परिवर्तन कार्यकर्त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता, मानसिक दृष्ट्या खच्ची न होता, डॉक्टरांचा विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली होय.
    डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि साधना परिवार
    डॉक्टरांवर प्रधान मास्तरांचे अपत्यव्रत प्रेम होते. आम्ही दोघांनी एकाच वेळेस साधनेत प्रवास केला. आज साधनेसारखी उत्कृष्ट मिडिया सेंटर नाही. डॉ. रा. ग. जाधव यांना घर घेऊन देणे व महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देण्यासाठी कृतज्ञता निधी उभा करणे ही डॉक्टरांची सर्वात मोठी देणगी परिवर्तनवादी चळवळीला होती. सामजिक समतेचा विषमता निर्मूलनाचा हा सैनिक आज धारातिर्थी पडला, त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांनी एकच मंत्र लक्षात ठेवावा, "सदैव सैनिका तुवा पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे!'
    - पुरुषोत्तम शेठ, सातारा.
    end.

    ReplyDelete
  49. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा

    गेल्या मंगळवारी, वीस ऑगस्टला, नरेन्द्र दाभोळकर यांची हत्त्या झाली. म्हणजे नरेन्द्र दाभोळकर या नावाच्या व्यक्तिची हत्त्या झाली. पण नरेन्द्र दाभोळकर ही केवळ एक व्यक्ती नव्हती. ती एक वृत्ती आहे, एक विचारधारा आहे. आणि त्या विचारधारेची हत्त्या झालेली नाही. किंबहुना एका व्यक्तिची हत्त्या करून त्या विचारधारेला नेस्तनाबूत करता येतं हीच मुळी एक अंधश्रद्धा आहे. आणि तिचा विरोध करायला हवा.अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात यावा यासाठी झगडणार्‍या दाभोळकरांच्या बलिदानानंच शेवटी तो कायदा मंजूर होतो आहे. पण कायद्यानं अंधश्रद्धा निर्मूलन होईल यावर विश्‍वास ठेवणं कठिण आहे. समाज सुधारणेच्या दृष्टीनं आजवर अनेक कायदे केले गेले. पण त्यामुळं त्या अनिष्ट प्रथा नष्ट झाल्या नाहीत. अंधश्रद्धा निर्मूलन व्हायचं असेल तर त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोण समाजात रुजवण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी वेगळा कायदा करण्याची गरजच नाही. कारण आपल्या राज्यघटनेतच वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवण्याला आवर्जून स्थान दिलं गेलं आहे.
    ते आजवर साध्य होऊ शकलेलं नाही कारण मुळातच वैज्ञानिक दृष्टिकोण म्हणजे नेमकं काय याविषयीच वैचारिक गोंधळ आहे. विज्ञानाचा प्रसार करणार्‍या अनेक संस्था आज निष्ठेनं कार्य करत आहेत. जवळजवळ प्रत्येक राज्यात त्या त्या भाषेतून विज्ञान प्रसाराची दिंडी चालवणार्‍या स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. परंतु त्यांचा भर विज्ञान साक्षरता वाढवण्यावर आहे. ते कार्यही महत्त्वाचं आहे. परंतु विज्ञान साक्षरतेत वाढ झाली म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोण अंगिकारला जाईलच असं समीकरण जुळवता येत नाही. तसं असतं तर वैज्ञानिकांनी अंधश्रद्धांना थारा द्यायला नको होता. वस्तुस्थिती तशी नाही.विज्ञानाच्या पद्धतीचं जे वैचारिक अधिष्ठान आहे त्या चिकित्सक वृत्तीचा स्वीकार करणं म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोणं रुजवणं होय. विज्ञान संशोधन हे सतत प्रस्थापित गृहीतांची तपासणी, फेरतपासणी करण्यावर भर देतं. बाबा वाक्यं प्रमाणम् ही प्रणाली विज्ञानाला मान्य नाही. निर्भेळ सत्य व्यक्तिनिरपेक्ष असतं असंच विज्ञान मानतं. केवळ न्यूटननं सांगितलं म्हणून या विश्‍वात सर्वत्र गुरुत्त्वाकर्षणाचं बल कार्यरत आहे यावर विश्‍वास ठेवला जात नाही.
    पण त्यानं सांगितलेल्या गुरुत्त्वाकर्षणाच्या बलाच्या प्रभावाचा सर्वांनाच सर्वत्र आणि सर्वकाळ अनुभव येतो म्हणून ते अंतिम सत्य असल्याची मोहोर त्यावर उठवली जाते.आइन्स्टाईन हा विसाव्या शतकातला महान वैज्ञानिक होता हे सर्वांनाच मान्य आहे. परंतु केवळ त्यानं प्रतिपादित केला म्हणून त्याच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला मान्यता मिळाली नाही. किंबहुना तो सिद्धांत अँनॅलेन डेर फिजिक या त्यावेळच्या अग्रगण्य विज्ञान नियतकालिकात प्रकाशित झाला याचं कारण त्या सिद्धांताचं निरुपण करण्यासाठी आइन्स्टाईननं वापरलेल्या गणितात कोणतीही चूक दिसली नव्हती. त्यामुळं त्याला सिद्धांताच्या स्तरावर मान्यता मिळाली. परंतु या विश्‍वाचा गाडा त्या सिद्धांतात प्रतिपादित केलेल्या सूत्रांनुसारच चालतो याची प्रचिती जोवर मिळत नव्हती तोवर त्याला एक वैश्‍विक सत्य म्हणून मान्यता मिळाली नव्हती.त्या सिद्धांतानं केलेल्या भाकितानुसार दूरवरच्या तार्‍याकडून येणारा प्रकाश सूयार्सारख्या भारदस्त गोलाजवळून जाताना त्याच्या गुरुत्त्वाकर्षणाच्या प्रभावापोटी त्याच्या दिशेन झुकायला हवा होता. म्हणजेच त्याची दिशा बदलायला हवी होती. याचा पडताळा घ्यायचा तर खग्रास सूर्यग्रहणाची वाट पाहणं आवश्यक होतं. ती संधी मिळताच एडिन्गटनं प्रत्यक्ष प्रयोग करून त्या भाकिताची चाचपणी केली. त्यात त्या दूरवरच्या तार्‍याकडून येणार्‍या प्रकाशाच्या दिशेत आइन्स्टाईननं सांगितल्याप्रमाणे आणि त्यानं केलेल्या भाकिताइतकाच बदल झाल्याचं सिद्ध झालं तेव्हा कुठं त्या सिद्धांताला सत्याच्या पातळीवर चढवण्याला सुरुवात झाली. तरीही नोबेल पारितोषिकासाठी इन्स्टाईनच्या या सिद्धांताचा विचार केला गेला नाही. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट या त्याच्या तितक्याच मौलिक संशोधनाच्या आधारावर त्याला हा पुरस्कार दिला गेला. आइन्स्टाईनसारख्या महान वैज्ञानिकाच्या विचारांचा स्वीकारही जिथं त्याची चिकित्सक तर्ककठोर पाहणी केल्याशिवाय होत नाही तिथं इतरांची काय कथा!हेच तर मुळी वैज्ञानिक दृष्टिकोणाचं वैशिष्ट्य आहे. कोणत्याही कथनाचं असं चिकित्सक विेषण केल्याशिवाय त्याचा स्वीकार न करण्याचं बाळकडू जेव्हा समाजाला दिलं जाईल तेव्हाच खर्‍या अर्थानं अंधश्रद्धा निर्मूलन होईल. तोवर नाही.

    डॉ. बाळ फोंडके

    ReplyDelete
  50. ‘विचारांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी’

    पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांबरोबरच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येबाबतची चीड मनात घेऊन आलेले असंख्य सामान्य नागरिक..चळवळीसाठी विचारांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरण्याची व्यक्त झालेली तयारी.. आणि डॉ. श्रीराम लागू यांनी सांगितलेली विवेकाच्या निर्धाराची प्रतिज्ञा. राष्ट्र सेवा दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘निर्धार परिषदे’ ने ‘दाभोलकरांनंतर पुरोगामी चळवळीचे काय होणार’ या उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नाला आश्वासक उत्तरच दिले!
    सामाजिक कार्यकर्त्यां रझिया पटेल, मानवी हक्क संघटनेचे कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे, डॉ. दाभोलकर यांची कन्या मुक्ता, चिरंजीव हमीद , ‘आयबीएन लोकमत’ चे संपादक निखिल वागळे, ‘साप्ताहिक कलमनामा’ चे संपादक युवराज मोहिते, सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य या वेळी उपस्थित होते.
    आपण आणि बंधू हमीद यांना सामान्य कार्यकर्ता म्हणूनच चळवळीत राहायचे असल्याचे मुक्ता दाभोलकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,‘‘डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर कार्यकर्ता नसलेल्या व्यक्तींपर्यंतही विवेकाचा आवाज पोहोचला असल्याचे दिसून येते. सर्वव्यापी संघटन हे डॉ. दाभोलकर यांच्या कामाचे वैशिष्टय़ होते. चळवळीत संघटनाला कोणताही पर्याय असू शकत नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलनाविषयीच्या कायद्याला यंत्रणांचे पाठबळ मिळणे आवश्यक आहे.’’
    रझिया पटेल यांनी सांगितले, ‘फॅसिस्ट शक्ती पुन्हा डोके वर काढत असून त्यांची जागतिकीकरणाशी युती झाली आहे. आपल्या धर्माची वेगळी ओळख दिसली पाहिजे हा विचार तरुणांमध्ये पेरला जात आहे. त्यासाठी आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातून बाहेर पडलेल्या युवकांना लक्ष्य केले जात आहे.’
    दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांवर राग धरू नये तर त्यांना मदत करण्याचीच भूमिका घ्यावी, असे असीम सरोदे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘ ‘आम्ही सारे दाभोलकर’ अशा घोषणा देताना दाभोलकर यांचे अण्णा हजारे होऊ नयेत याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. या घोषणा विरून जाता कामा नये. जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत येत्या सहा महिन्यांतच अधिकाधिक गुन्हे नोंदवले जायला हवेत. पोलिसांनाही या कायद्याचे प्रशिक्षण द्यायला हवे.’’ जादूटोणा कायद्याबाबत राज्यभर वकिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    ReplyDelete
  51. दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ प्राध्यापकांची निदर्शने

    डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या आणि महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांचा निषेध करण्यासाठी ‘बॉम्बे युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स युनियन’ (बुक्टू) या प्राध्यापकांच्या संघटनेतर्फे मंगळवारी (२७ ऑगस्ट) मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
    घटनेला आठवडा झाला तरी दाभोलकरांचे मारेकरी मोकाट आहेत. त्यानंतर काहीच दिवसांत मुंबईत एका वृत्तछायाचित्रकार महिलेवर पाच जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. सामाजिक कार्यकर्ते आणि महिला या राज्यात सुरक्षित नसून ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेचेच प्रतीक आहेत. याचा निषेध करण्यासाठी प्राध्यापक बुक्टूच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत.

    ReplyDelete
  52. सावधान! सनातन 'शक्ती' वाढतेय..(PART-I)

    बहुजन आणि अभिजन वारकरी अशा दोन वर्गांत वारकरी विभागले आहेत. बहुजन वारकर्यां्नी संत तुकारामांच्या शिकवणुकीप्रमाणे कायम अंधश्रद्धेविरुद्ध भूमिका घेतली आहे. संत तुकाराम म्हणतात, 'तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, शेंदरी हेंदरी दैवते, कोणी ती पूजते भूतेखेते' या विचारांवर श्रद्धा असणारे वारकरी अंधश्रद्धा विधेयकाला विरोध करतील का?

    जागतिकीकरणाने आलेला चंगळवाद समाजामध्ये भोगविलासी प्रवृत्ती वाढवत असताना बाराव्या-तेराव्या शतकातील सनातन मानसिकतेला २१व्या शतकात बुवा-बाबांनी खतपाणी घातले आहे. धर्मशास्त्रातील श्रृती-स्मृतींचा आधार घेऊन कर्मकांडे वाढवणारे धर्ममार्तंड सामाजिक प्रश्नांवर सनातनी निर्णय देत असतात. तोच प्रकार जातपंचायतीच्या रूपाने हेतुपुरस्सर वाढवला जात आहे. या सनातन प्रवृत्तींनी आणलेल्या सामाजिक विषमतेने समाज जीवन गढूळ केले. जुनाट रुढी-परंपरांचे जोखड समाजावर बसवले आणि त्यालाच धर्मतत्त्वज्ञानाचा मुलामा देऊन सर्वसामान्य माणसांची आणि महिलांची गळचेपी केली. धर्माच्या नावाखाली बोकाळलेल्या अपप्रवृत्तींनी महिलांना शुद्रातिशुद्रांच्या पंक्तीत बसवून त्यांच्याप्रमाणेच हीन लेखले. महिलांकडे केवळ भोगवस्तू म्हणून तुच्छतेने बघण्याची प्रवृत्ती, जातीय विषमता आणि पुरुषी अहंभाव रुजवण्याचे आणि अंधश्रद्धा वाढवण्याचे काम झाले. त्यावर प्रहार करण्याचे काम संतांनी केले. संतांनी अंधश्रद्धांमधील खोलपणा दाखवून सुधारणांचे मार्ग सांगितल्यामुळे संतांचा पुरोगामी वारसा पुढे चालवणारे फुले-शाहू-आंबेडकर घडले; परंतु पुरोगामी विचाराने सर्वधर्मसमभाव आणि जात-धर्म विरहित समाज निर्माण झाला तर राजसत्ता आणि राजसत्तेतून धर्मसत्ता मिळवणे कठीण असल्याने सनातन प्रवृत्तींनी उचल खाल्ली आहे. बुवा-बाबांचे आणि कर्मकांडांचे उदात्तीकरण केले जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाविरुद्ध उभे ठाकलेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या हा सनातन्यांच्या कटाचाच एक भाग आहे आणि महिलांना तुच्छ समजणार्याि सनातन शक्तींनीच 'शक्ती' मिल कम्पाऊंडमध्ये एका छायाचित्रकार-पत्रकार महिलेवर सामूहिक बलात्कार केला. महात्मा गांधींचा खून करणारी सनातन प्रवृत्ती कशी वाढत राहिली, याचीच ही ठळक उदाहरणे आहेत.

    'पाप के चार हथीयार' या आपल्या एका निबंधात सुप्रसिद्ध साहित्यिक हजारी प्रसाद द्विवेदी यांनी म्हटले आहे की, १) विचार मारायचा असला की, चांगला विचार सांगणार्यााला प्रथम विरोध करतात. २) विरोध करून ऐकला नाही तर त्याला छळतात. ३) छळवणुकीनंतरही विचार रुजवत राहिला तर त्याला मारतात. ४) त्याचा विचार समूळ नष्ट करायचा तर त्याचा पुतळा करतात आणि विचार संपवतात. पुरोगामी विचारांची सर्मथ परंपरा चालवणार्यात संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव आदी सर्व संतांनी हिंदू धर्मातील विषमतेवर प्रहार केल्यामुळे त्यांचा छळ झाला. ज्ञानेश्वमरांना वाळीत टाकले आणि संत तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवली म्हणून त्यांचे विचार संपले नाहीत. गाथा वर आली ती वारकर्यां्नी तारली. वारकरी पंथामध्ये मराठा, कुणबी, माळी, तेल्यांपासून महारांपर्यंत सर्व अलुतेदार, बलुतेदार सहभागी झाले. त्या सर्वांनी संतांचे विचार टिकवले. जे विचार करतात, त्यांना तारणे हे व्यक्तीच्या नव्हे समष्टीच्या हातात असते. बुद्धीप्रमाण्यवादी, स्वच्छ, स्पष्टवक्ते, विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर हे सर्वसमावेशक मवाळ क्रांतिकारक होते. त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा यांच्याविरोधात आंदोलन उभारले. त्यांचा विचार मारण्याचे काम सनातत्यांनी जाणीवपूर्वक केले. जनसामान्यांना पालखीचे भोई बनवणार्याा प्रवृत्तींनीच ज्ञानेश्व्रांचा अनन्वीत छळ केला आणि तेच रथावर बसले. अशा मंबाजींनी डॉ. दाभोळकरांचा खून केला. असे मंबाजी आज समाजकारण, राजकारण, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात आणि पत्रकारितेतही आहेत.

    ReplyDelete
  53. सावधान! सनातन 'शक्ती' वाढतेय..(PART-II)

    जादूटोणाविरोधी आणि अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला वारकर्यांकचा विरोध होता, असा जावईशोध लावण्यात आला. बहुजन आणि अभिजन वारकरी अशा दोन वर्गांत वारकरी विभागले आहेत. बहुजन वारकर्यांननी संत तुकारामांच्या शिकवणुकीप्रमाणे कायम अंधश्रद्धेविरुद्ध भूमिका घेतली आहे. संत तुकाराम म्हणतात, 'तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, शेंदरी हेंदरी दैवते, कोणी ती पूजते भूतेखेते' या विचारांवर श्रद्धा असणारे वारकरी अंधश्रद्धा विधेयकाला विरोध करतील का? वारकर्यांेचा बुद्धिभेद करणार्या बडव्यांच्या तुरुंगातून वारकर्यांकनीच विठ्ठल सोडवला. याचाही विचार झाला पाहिजे.

    केंद्र आणि राज्य सरकारने डॉ. दाभोळकरांची दिवसाढवळय़ा हत्या करून पुरोगामित्वाचा गळा घोटू पाहणार्याा मारेकर्यांाना पकडून त्यांना समाजासमोर आणले पाहिजे. डॉ. दाभोळकर हे कोणी धर्माचे प्रेषित नव्हते, समाजातील वेडगळ समजूत दूर करून समाज सुदृढ करण्याचे व्रत घेतलेला एक साधासरळ कार्यकर्ता होता. अंधश्रद्धा विधेयकातील धार्मिक भावना दुखावणार्याो तरतुदी काढून टाकण्यालाही त्यांनी संमती दिली होती. तरीदेखील सत्ताधार्यां नी हे विधेयक मंजूर करण्यास टाळाटाळ केली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाचा उद्घोष करून सलग तीन वेळा सत्तेत येणार्यांेनी या विधेयकाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. एरवी विधिमंडळाच्या सभागृहांमध्ये गोंधळ झाला असता, त्या गोंधळातच अनेक विधेयके चर्चेविना मंजूर केली जातात. परंतु हे विधेयक मंजूर केले नाही. एकप्रकारे सनातनवाद्यांना सरकारनेच ढिल दिली. विधेयक मंजूर झाले असते तर सनातन्यांना नाइलाजाने गप्प बसावे लागले असते. परंतु ढिल मिळाल्यामुळे डॉ. दाभोळकरांच्या हत्येचे षड्यंत्र यशस्वी करण्यासाठी प्रतिगाम्यांना बळ मिळाले. सनातनी प्रवृत्तीने गेल्या गुरुवारी आणखी एक बळी घेतला. पत्रकारितेच्या क्षेत्रात पहिले पाऊल ठेवलेल्या बावीस वर्षांच्या एका छायाचित्रकार मुलीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. मुंबईच्या शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये आपल्या सहकार्यावबरोबर बातमीसंबंधी छायाचित्रण करण्यासाठी ही मुलगी गेली होती. दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा आक्रोश क्षमण्याआधीच ही घटना घडली आणि पुनश्च गल्लीपासून दिल्लीपर्यंत संतापाचा उद्रेक झाला. महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा पुरता झाकोळून गेला. मुंबई हे सर्वाधिक सुरक्षित शहर असल्याची शेखी आम्ही मुंबईकर मिरवत होतो. पण आमची मान शरमेने खाली गेली. या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह तर लागलेच; पण महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकार आणि लोकप्रतिनिधी गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले. राज्य विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सदस्य प्रतिस्पध्र्यांना नामोहरम करण्यासाठी अथवा आमदार निधीत वाढ करण्यासाठी गोंधळ घालतात. सभागृहाचे कामकाज बंद पाडतात; पण महिलांचे प्रश्न व बलात्कारासारख्या घटनांसाठी एवढा जोराचा आवाज उठवला जात नाही. सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला शक्ती उभी राहिली आहे. तिचे पद्धतशीर खच्चीकरण केले जात आहे. तिला शक्तिहीन करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

    ReplyDelete
  54. सावधान! सनातन 'शक्ती' वाढतेय..(PART-III)

    स्त्रीची गर्भातच हत्या केली जाते आणि दोन वर्षांच्या बालिकेपासून सत्तर वर्षांच्या ज्येष्ठ महिलेपर्यंंत प्रत्येकीला बलात्काराला सामोरे जावे लागत आहे. अल्पवयीन मुली, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनी, नोकरी-व्यवसाय करणार्याय महिला, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक महिला अशा सर्व वयोगटातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्याच सप्ताहात पुण्याजवळ दौंडमध्ये पाचवी इयत्तेतील अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. यापूर्वी सातारा, जळगावमध्ये आंतरजातीय विवाह केला म्हणून जन्मदात्या माता-पित्यांनीच मुलीचा बळी घेतला. रेशनकार्डासाठी गेलेल्या चेंबूर गृहिणीवर रेशनकार्ड एजंटानेच बलात्कार केला. एका सहाय्यक पोलीस आयुक्ताने महिलेवर बलात्कार केला. मुंबईत कफ परेडमधील झोपडपट्टीत अडीच वर्षांंच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. हिंगोलीत उपचारासाठी दवाखान्यात गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाला. बलात्काराचे सत्र सुरूच असून, अनेक प्रकरणे पोलीस ठाण्यात नोंदवून घेतली जात नाहीत. सरकारने विधिमंडळात दिलेल्या एका लेखी उत्तरामधून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जानेवारी ते डिसेंबर २0१२ या कालावधीत राज्यात बलात्काराच्या १७0४ घटना घडल्या आहेत. बलात्काराचे १४ हजार ४१४, विनयभंगाचे ३१ हजार ४१२ व छेडछाडीचे ९ हजार ४८0 प्रकरणे विविध न्यायालयांत प्रलंबित आहेत. गतवर्षी झालेल्या बलात्काराच्या १७0४ घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवरील बलात्काराची संख्या ९२४ आहे. ही सर्व प्रकरणे जलदगती न्यायालयांमध्ये वर्ग करण्याच्या सूचना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिल्या आहेत. तथापि जोपर्यंंत बलात्कार्यां ना कडक शासन होत नाही, तोपर्यंंत पोलिसांचा अथवा कायद्याचा धाक वाटणार नाही. ही सर्व प्रकरणे पाहता सरकारच्या आणि समाजाच्या संवेदना बोथट झाल्या आहेत की काय, असे वाटत असून, यामुळे सनातन शक्ती प्रभावी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

    राही भिडे

    FINISHED.

    ReplyDelete
  55. वरील सर्व प्रतिक्रिया मनाला अंतर्मुख करायला लावणाऱ्या आहेत!

    ReplyDelete
  56. 'अंनिस'च्या कार्यकर्त्यांना संरक्षण देऊ

    डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत काम करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी शासनाकडे यादी द्यावी , त्यानुसार त्यांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातील , असे आश्वासन मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिले.

    डॉ. कदम यांनी आज डॉ. शैला दाभोळकर , डॉ. हमीद आणि अॅड. मुक्ता यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ते म्हणाले , ' डॉ. दाभोळकर हे माझे चांगले मित्र होते. सेवादलाचे शिबिर धनकवडीला आमच्या आवारातच झाले होते. ' अॅड. मुक्ता यांच्याशी जादुटोणाविरोधी कायद्याबाबत चर्चा करताना डॉ. कदम यांनी विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव विजय अचलिया यांच्याशी फोनवर संपर्क साधून माहिती घेतली.

    डॉ. कदम पढे म्हणाले , ' जादूटोणाविरोधी कायद्याबाबत २६ऑगस्ट रोजी गॅझेट निघाले आहे. येत्या अधिवेशनात त्याला मंजुरी मिळेल. डॉ. दाभोळकरांसोबत काम करणाऱ्या ' अंनिस ' च्या प्रमुख कार्यकर्त्यांची यादी द्यावी. त्यांना संरक्षण पुरविले जाईल , असेही ते म्हणाले. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. अरविंद बुरुंगले , सहसचिव एन. एस. गायकवाड , डॉ. मोहन पाटील , ' अंनिस ' चे माधव बावगे , प्रशांत पोतदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

    ReplyDelete
  57. अंधश्रद्धा निर्मुलन करणारा नव्हे, ब्राह्मणशाही माजविणारा कायदा!

    -राजा
    ________________________________________
    अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्य सरकारने अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मूळ कायद्यातील महत्त्वाची कलमे रद्द करण्यात आल्यामुळे हा कायदा अंधश्रद्धेच्या विरोधातील कायदा ठरण्याऐवजी ब्राह्मणशाही माजविणारा कायदा ठरणार आहे. देवॠषी, वैदू, छु-छावाले यांची भोंदूगिरी या कायद्याने बंद होईल. ब्राह्मणांकडून होणारी भोंदूगिरी मात्र निर्वेधपणे सुरू राहील. इतकेच नव्हे, तर ब्राह्मणांकडून होणा-या भोंदूगिरीला कायदेशीर संरक्षणही मिळेल.

    '‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायदा'' असे या या कायद्याचे मूळ नाव आहे. हा कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेच शिवसेना-भाजपा सरकारच्या काळात राज्य सरकारला सादर केला होता. तेव्हापासून तो पडून होता.
    अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे मूळ विधेयक आणि २०११ साली सरकारने विधिमंडळात सादर केलेले सुधारित विधेयक यात फरक आहे. मूळ विधेयक १३ कलमांचे होते. सुधारित विधेयकात ११ कलमे आहेत. कलम ५ आणि कलम १३ काढून टाकण्यात आले आहे. कलम ५ मध्ये धार्मिक ट्रस्टसंबंधी काही जाचक तरतुदी होत्या. तर कलम १३ मध्ये ब्राह्मणांच्या भोंदुगिरीवर थेट पाय पडेल, अशी तरतूद होती. या दोन्ही तरतुदी काढल्यानंतर हे विधेयक आता एकांगी आणि एकतर्फी झाले आहे. कनिष्ठ जातीतील प्रथा आणि परंपरा या विधेयकामुळे बेकायदेशीर ठरल्या आहेत. त्याच वेळी ब्राह्मणांच्या हस्ते पार पाडल्या प्रथा आणि परंपरा मात्र श्रद्धेच्या कक्षेत आल्या आहेत. वारक-यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ब्राह्मणी संघटनांनी केलेल्या आंदोलनाचे फळ त्यांना मिळाले आहे.

    काय होते कलम १३?
    या कायद्यात अंधश्रद्धा म्हणजे काय याचा खुलासा करणारे एक स्वतंत्र कलम आहे. तसेच या अंधश्रद्धांसाठी शिक्षा सांगितल्या आहेत. ही कलमे कोणाला लागू आहेत आणि कोणाला लागू नाहीत, याचा खुलासा कलम १३ मध्ये करण्यात आला होता. कलम १३ मध्ये एक तरतूद खालील प्रमाणे होती :
    ‘‘ शंका दूर करण्यासाठी याद्वारे असे घोषित करण्यात येते की, ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला शारिरिक व आर्थिक बाधा पोहचत नाही, असे कोणतेही धार्मिक विधी व धार्मिक कृत्ये अंतर्भूत असलेल्या कृतींना या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.''
    ज्या विधिने नागरिकास शारिरिक किंवा आर्थिक झळ पोहोचविणारे विधि करणे या कायद्यानुसार बेकायदेशीर होते, असा वरील तरतुदीचा स्पष्ट अर्थ आहे. ब्राह्मणांमार्फत केले जाणारे कोणतेही विधि हे दक्षिणा घेतल्याशिवाय होत नाहीत. याचाच दुसरा अर्थ असा की, ब्राह्मणांना दक्षिणा घेण्यावर या कायद्याने बंदी येणार होती. तथापि, आता १३ वे कलमच या कायद्यातून काढून टाकले गेले असल्यामुळे ब्राह्मणांना दक्षिणा घेण्याचा तसेच धर्माची, ग्रहता-यांची भिती घालून नागरिकांची लुट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्राह्मणांकडून करण्यात येणा-या लुबाडणुकीला आळा घालणारी एकमेव तरतूद या कायद्यातून वगळण्यात आल्यामुळे हा कायदा आता ब्राह्मणांसाठी फायद्याचा ठरणार आहे.

    ब्राह्मणांची ती श्रद्धा बहुजनांची मात्र अंधश्रद्धा
    कनिष्ठ जातीत पाळल्या जाणाèया प्रथा अंधश्रद्धा तर ब्राह्मणांच्या मार्फत पाळल्या जाणा-या प्रथा श्रद्धा असा सरळ भेद नव्या कायद्याने केला गेला आहे. हा मुद्दा आपण उदाहरणाने समजून घेऊ या. ''.. मरिआईचा प्रसाद खाल्ला नाही, तर तुझे तळपट होईल. तुझा सर्व धंदा बसेल!'' अशी भीती कोणी घातलीच तर या कायद्याने ती अंधश्रद्धा ठरून भीती घालणारास शिक्षा होईल. मात्र, ''... सत्य नारायणाचा प्रसाद खाल्ला नाही, म्हणून साधू वाण्याची नौका बुडाली. त्याचे तळपट झाले...'' हे सांगणे या कायद्यानुसार अंधश्रद्धा ठरणार नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नागाची पुजा केली जाते. नागाचा कोप झाला म्हणून देवॠषांमार्फत विधी केले जातात. हे प्रकार नव्या कायद्यानुसार बेकायदेशीर ठरतील. मात्र, नाशिकला त्र्यंबकेश्वरला जाऊन ब्राह्मणांच्या हस्ते नारायण नागबळी केल्यास बेकायदेशीर ठरणार नाही. देवॠषाकडे विधी केल्यास येणारा खर्च शे-दोनशे रुपयांचा असतो. त्र्यंबकेश्वरला नारायण नागबळी करण्याचा खर्च साधारण २५ हजार असतो. नारायण नागबळी हा विधि फक्त ब्राह्मणांच्याच हस्ते केला जातो.

    अंधश्रद्धा निर्मूलनाचा नवा कायदा बहुजन समाजातील भोंदुगिरीला बंदी घालून ब्राह्मणांच्या भोंदूगिरीला प्रोत्साहन देणार आहे, एवढाच या चर्चेचा निष्कर्ष आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या धांदलीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन ब्राह्मणांशाही माजविणारा कायदा राज्यात निर्माण होत आहे. त्यामुळे जरा सावधान.

    ReplyDelete
  58. दाभोळकरांचा खूनी वर्तकच !

    रवींद्र तहकिक
    ------------------------------------------------------------------------------
    महाराष्ट्र पोलिस सध्या डॉ नरेंद्र दाभोळकरांच्या खुन्यांना पकडण्य साठी जंग जंग पछाडत आहेत .
    परंतु खून कोणी केला याचा मागमूस पोलिसांना आजून लागलेला नाही .कारण स्पष्ट आहे : पोलिस
    चुकीच्या दिशेने तपास करीत आहेत . ही काही कुण्या सर्वसाधारण माणसाची हत्या नाही . जी कोणी
    वयक्तिक सुडाच्या भावनेतून किंवा रागाच्या उद्रेकातून केली असेल . किंवा हा खून एखाद्या फसलेल्या किंवा
    बिनसलेल्या व्यवहारातुन झाला आसेल असेही नाही . दाभोलकरांचे व्यक्तिमत्व , वर्तन आणि व्यवहार अत्यंत
    चोख , काटेकोर आणि पारदर्शी होते . त्यांचे नैतिक आचरण देखील अतिशय सरळ होते . विचारसरणी , विचारांची मांडणी आणि भूमिकेचे प्रगटन देखील नेमस्त आणि साधन शुचीत्वाच्या मर्यादा पाळणारे होते .
    असे असताना त्यांचा खुनी शोधताना त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अस्तिवा पेक्षा त्यांच्या कार्याचे आस्तित्व कुणाच्या हिताआड येत होते ? कोणाच्या डोळ्यात खुपत होते ? कुणाला ते विचारानेच नव्हे तर जगण्याने देखील नकोसे झाले होते ? कोण त्यांच्या सत्यान्वेशी विचार समोर हतबल झाले होते ? आणि कोण एखादा विचार हाणून पडता येत नसेल तर माणूस हाणून पाडा ! ही ब्राम्हणी विचारधारा आपल्या संस्थेचे ब्रीद
    म्हणून मिरवतो ? हे पोलिसांनी तपासले पाहिजे .
    वर्तकला पकडा
    ---------------------
    महाराष्ट्र पोलिसांना आम्ही अगदी खात्री पूर्वक सांगतो की दाभोलकरांचे खुनी पकडण्या साठी
    सगळ्या महाराष्ट्रात सैरावेंरा धावायची आजीबात आवश्यकता नाही . कारण ज्यांनी खून केला ते
    सुपारी घेतलेले शार्पशुटर आहेत. त्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध करणे , सी सी टीव्ही फुटेज तपासणे , संभाव्य
    मोटारसायकल नंबर वरून मालकाचा शोध घेत आज इकडे तर उद्या तिकडे धावपळ करणे यात वेळ आणि
    उर्जा दोन्हीचा अपव्यय आहे . आशा प्रकरणात प्रत्यक्ष खून करणाऱ्या पेक्षा खुणा मागचा सूत्रधार पकडणे
    आवश्यक असते . तो आधी पकडला नाही तर मग नंतर खुनी पकडले तरी सूत्रधार कायम पडद्याआडच
    राहतो. या प्रकरणातही अशीच शक्यता आहे . म्हणूनच आमचे पोलिसांना असे आव्हान आहे कि
    आधी सनातन संस्थेच्या अभय वर्तकला पकडा . टायर मध्ये घालून तेल लावलेल्या बेताच्या दंडुक्याने
    त्याच्या ढूगंणा वर दहा पाच टोले हाणा ; एका तासात तो पादरा बामन कटाचे कारस्थान हागेल .
    पुन्हा ती चूक नको
    -----------------------------
    मुख्य सूत्रधार सोडून खुन्याचाच तपास केल्या मुळे आपण महात्मागांधी , इंदिरा गांधी , राजीव गांधी
    यांच्या हत्या प्रकरणात फक्त प्रत्यक्ष खुन्या पर्यंतच पोहोचलो आणि त्यांना फाशी देवून मोकळे झालो .
    परंतु या खुनाचे मुख्य सूत्रधार , त्यांनी रचलेले षड्यंत्र , कट कारस्थान आज्ञातच राहिले . -ते कधीच
    बाहेर येवू शकले नाही. महात्मा गांधी हत्या नथुराम गोडसेच्याच मेंदूतून उगवलेली कृती होती ;
    असे कुणीही गुन्हेशास्राचा व राजकीय हत्यामागील कारणांचा आभ्यास करणारा अभ्यासक मान्य करणार नाही . हीच बाब इंदिरा राजीव हत्ये बाबत लागू होते , आता दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास देखील
    ज्या प्रकारे आणि ज्या पद्धतीने चालू आहे त्यातही कदाचित खुनी पकडले जातीलहि ( ?) पण मुख्य सूत्रधार मात्र साळसूदपणे आसुरी आनंद घेत टीव्ही वर प्रतिक्रिया आणि चर्चा करील ! आमची पोलिसांना एकाच विनंती आहे कि महात्मा गांधीच्या वेळी केली तशी चूक पुन्हा करू नका , वेळ न दवडता सनातन संस्थेच्या अभय वर्तकला पकडा ; आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवून बोलते करा .
    वर्तकला पकडण्यासाठी सबळ पुरावे
    -----------------------------------------------
    वर्तकला पकडण्यासाठी सबळ पुरावे आहेत , सनातन संस्थेने वेळोवेळी दाभोलकर आणि त्यांच्या चळवळी
    विषयी आपल्या पुस्तिका , प्रकाशने तसेच वेब साईट वरून जे लिखाण केले आहे , हे लिखाण ज्या भाषेत
    केले आहे तो एकमेव पुरावा देखील वर्तकच्या मुसक्या आवळण्यासाठी पुरेसा आहे , या शिवाय दाभोलकर यांच्या छायाचित्रावर मारलेली लालफुली : या शिवाय आठ महिन्यांपुर्वी दाभोलकर तसेच श्याम मानव यांच्यावर पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात सनातनच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला ( धक्का बुक्की ) आणि
    त्यावर वर्तकची " यह तो बस झाकी है " हि प्रतिक्रिया ! वर्तकला बेड्या ठोकून ; पोलिस कोठडीत बर्फाच्या लादीवर पालथा झोपवून सुंद्री ने त्याचे टिंगर झोडायला आणखी कोणते पुरावे हवेत ?

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...