वैदिक धर्मिय हे हिंदू धर्माचे ठेकेदार नाहीत. पण त्यांच्या धर्मातील अपप्रवृत्ती हिंदुंमध्ये पसरवत त्यांनी हिंदू धर्माचा मुळ गाभाच भ्रष्ट करण्याचा चंग बांधला आहे. याला थांबवत हिंदू धर्माच्या समताप्रधान, स्त्री-पुरुषच काय पण माणसा-माणसांत भेद न मानणा-या मुळ धर्म गाभ्याकडे सर्व हिंदुंना वळावे लागेल. हिंदू मंदिरांत बंदी करायचीच झाली तर या भ्रष्ट वैदिकांवर घालावी लागेल!
शबरीमला या दक्षीणेतील विख्यात मंदिर सध्या चर्चेत आले आहे ते, "जोवर स्त्रीयाना त्या मासिक पाळीत आहेत कि नाही हे तपासण्याचे स्क्यनर बनत नाहीत तोवर मंदिरात स्त्रीयांना प्रवेश नाही." या वादग्रस्त विधानामुळे. हे विधान केले मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रमूख प्रयार गोपालकृष्णन यांनी. ते पुढे असेही म्हणाले कि मासिक धर्म स्त्रीयांना अपवित्र करतो आणि पवित्र मंदिरांत त्यांना प्रवेश देता येणार नाही. यामुळे वादंग उठले असून निकिता आझाद या विस वर्षीय तरुणीने ""Happy to bleed" हे आंदोलन सुरू केले असून आजवर असंख्य स्त्रीयांनी या आंदोलनात उडी घेतली आहे. स्त्रीयांचा मासिक धर्म हे वरकरणी कारण असून अय्यप्पा ब्रह्मचारी होते आणि शबरीमला येथे त्यांनी तप केले असल्याने स्त्रीदर्शनाने त्यांचा तपस्याभंग होऊ नये म्हणून (मेनकेने विश्वामित्राचा केला तसा) तेथे स्त्रीयांना प्रवेश नाही. यावर आपण अधिक चर्चा पुढे करुच, पण स्त्रीयांचा मासिक धर्म आणि त्यामुळे प्रार्थनास्थळ प्रवेशबंदी कोठे कोठे आहे हे पाहू.
भारतात सबरीमला, हाजी अली, जामा मशिद, पद्मनाभय्य मंदिर, पुष्कर येथील कार्तिकेय मंदिर, निजामुद्दिन दर्गा इत्यादि धर्मस्थळांत स्त्री प्रवेश बंदी आहे. अलीगढ विद्यापीठाच्या ग्रंथालयातही विद्यार्थिनींना बंदी आहे, पण त्याचे कारण मनोरंजक आहे. मुली ग्रंथालयात आल्या कि विद्यार्थी अभ्यासात लक्ष घालणार नाहीत म्हणून बंदी...हा असला विनोदी प्रकार आहे. मुस्लिम बंदी घालणारे म्हणतात कि शरियातच ही तरतूद आहे तर हिंदू म्हणतात...धर्मशास्त्रांतच हे लिहिलेले आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बंद्या भारतात अनेक धर्मस्थळांत अंमलात आणल्या जातात हे आपणास माहितच आहे.
मासिक धर्मामुळे स्त्री अपवित्र होते अशी समजूत यामागे आहे हे उघड दिसते. वरकरणी कारणे काहीही सांगितलेली असोत. यातून आपण स्त्रीयांचाचा अधिक्षेप करतो, धर्माच्या नांवाखाली निसर्ग-धर्माला पायतळी तुडवतो याचे भान मात्र आपल्याला आलेले नाही. यासाठी आपल्याला पुरातन काळापासून स्त्री, तिची मासिक पाळी आणि तिचा अपत्यजन्म देवून मानवी वंश साखळी अबाधित ठेवण्याच्या सामर्थ्याबाबत कसकसे विचार बदलत गेले हे पाहणेही उद्बोधक तसेच मनोरंजकही आहे.
मनुष्य जेंव्हा नुकताच कोठे भुतलावर अवतरला होता व निसर्ग व अन्य पशुंच्या प्रकोपात कसाबसा जगायचा प्रयत्न करत होता त्या काळात स्त्रीयांकडे तो कोणत्या दृष्टीने पाहत होता?
तिचा मासिक धर्म, तिने अपत्ये प्रसवणे ही बाब त्या काळातील मानवासाठी अद्भूत चमत्काराहून कमी नव्हती. महिन्यातील काही दिवस स्त्रीया रज:स्त्राव करतात आणि पुर्ववत होतात किंवा गरोदर होऊन अपत्य प्रसवतात या तिच्या शक्तीला आदिमानवाने देवत्व दिले. जगभरात आधी सुरू झाली ती स्त्रीपुजा. योनीपुजा. हिंदू धर्माची सुरुवातच मुळात सृजनशक्तीच्या योनीपुजेतून झाली. तिच्यात यातुशक्ती असाव्यात व ती आपल्याला जशी उपकारक अहे तशीच अपायकारकही असू शकते यामुळे स्त्री हे त्याच्यादृष्टीने गुढ-भयाचा सम्मिश्र विषय बनला. त्याला तोवर अपत्य जन्मात आपलाही सहभाग असतो हे माहितच नव्हते. चंद्रकला आणि नियमित येणारा मासिक धर्म यामुळे त्यांनी अपत्य जन्माचा संबंध चंद्राशी लावला. आपण आता चंद्र हा स्त्रीचा भाऊ आहे असे मानतो, पण पुरातन समाज हा चंद्र अपत्यला जन्म घालतो (म्हणजे तिचा पती) असा लावला गेला. भारतातील "चंद्रवंश" ही समजूत त्यातुनच निघाली.
उत्खनने आणि पुरातन गुहाचित्रातून ५०-६० हजार वर्षापुर्वीच्या माणसाचे लिखित नसले तरी समजुतींचे वस्तु-चित्ररूप दर्शन घडवते. सिंधू संस्कृतीत मातृदेवतांचे व तिच्या सामर्थ्याचे दर्शन घडवते. स्त्रीयोनीतून निघालेल्या पिंपळाचे चित्रण स्त्रीच्या प्रसवक्षमतेचे कसे उदात्तीकरण होते हेही दर्शवते. भारतात संभोगोत्सूक स्वरुपाची, शिर्षाच्या जागी कमळे असलेली पण ठळक योनी व स्तन दाखवणा-य मृण्मुद्रा आणि पाषाण शिल्पे विपूल प्रमानात तर आहेतच पण गांवदेवीच्या स्वरुपात जवळपास सर्व खेड्यांत स्त्रीमहत्तेचे अस्तित्व सापडते. किंबहुना मातृसत्ता आरंभीच्या काळत जगभरात पाळली जात होती असे पुरावे मिळतात. पुरातन काळात स्त्रीया पुरुषी कार्यात भाग घेतही असल्या तरी तो सीमित होता. किंबहुना तो सीमित ठेवला गेला तो या तिच्याकडे पाहण्याच्य गुढमिश्रीत श्रद्धाभावामुळे. बहुप्रसवा स्त्री ही टोळीचे वैभव मानली जात होती, कारण टोळीची लोकसंख्या त्यामुळेच वृद्धींगत होऊन टोळीसामर्थ्यही त्यामुळे वाढेल ही भावना त्यामागे असणे स्वाभाविक आहे.
समाजेतिहास तज्ञ म्हणतात कि शेतीचा शोध स्त्रीने लावला. त्यात तथ्य आहे कारण तिला निरिक्षण करत फेकलेल्या बिया कशा उगवतात हे पाहण्याची अधिक संभावना होती. आधी सुरू झली ती फिरती शेती. नंतर मानूस जलाशय-नद्या-ओढे यांच्या काठी स्थिर शेती करू लागला. आधी स्त्री ही टोळेचे मालमत्ता असे. शेतीच्य शोधाने मालकीहक्क व वंशसातत्याची कल्पना आली. किबहुना स्त्री-स्वातंत्र्य लयाला घालवणारी ही घट्ना होती.
आपण शेतीत बीज पेरतो तेंव्हा पीक होते हे ज्ञान आपलाही अपत्यजन्मात सहभाग आहे कारण आपण आपले बीज योनीत पेरतो हे ज्ञान माणसाला झाले. वारसाहक्काच्या कल्पनेतून मग माणसाने विवाहसंस्थेला जन्म घातला. ही व्यवस्था सैल होती. बहुपतीकत्व जसे लागू होते तसे बहुपत्नीत्वही आरंभी लागू होते. महाभारतात आपण नियोग प्रथा, बहुपतीकत्वाचे अवशेष द्रौपदीच्या रुपात पाहू शकतो.
भारतात वैदिक धर्म उशीरा आला. तत्पुर्वीच हजारो वर्ष योनीपूजा भारतात प्रस्थापित झालेली होती. ऋतूस्त्राव तंत्रसाधनेतील महत्वपुर्ण भाग होता. त्याला अपवित्र मानण्याचा प्रश्नच नव्हता. पण पुरुषप्रधान वैदिकांनी स्त्रीयांना गौण लेखायला सुरुवात केली. वैदिक धर्म येण्यापुर्वी सिंधुपुर्व काळापासून भारतात ,लिंग आणि योनीपुजा सुरू होती याचे अवशेष आपल्याला प्राप्त आहेत. पुढे स्त्री-पुरुष यांत एकात्मता प्रस्थापित करत लिंग आणि योनी संयुक्त स्वरुपात शिवलिंग या प्रतीक रुपाने सुरु झाली. या धर्मात स्त्रीमाहात्म्य व समता याचा परिपाक या प्रतीकातून दिसतो. हिंदुंतील शैव-शाक्त संप्रदायांनीही शक्ती (स्त्री) तत्वालाच जगन्माता मानत तिची आराधना प्राधान्याने केली. तंत्रांची निर्मिती शिवाने केली अशी श्रद्धा आहे. प्रस्तूत लेखाच्या दृष्टीने महत्वाची बाब म्हणजे यात रज:स्वलेला अनन्यसाधारण महत्व आहे. रज:स्त्रावाचा उपयोग यात्वात्मक क्रिया साधण्यासाठी केला जात असे. स्त्री रजोकालात अपवित्र नव्हे तर पवित्र व साधनेचे साधन मानली जात होती.
पुरातन काळी स्त्रीला किती महत्व होते हे आपण हिंदुंच्या अवशिष्ट राहिलेल्या परंपरांतून पाहू शकतो. शक्ती (स्त्री) ही पृथ्वी व अवकाश हे शिव तर पर्जन्य म्हणजे त्याचे वीर्य. या संगमातून पृत्वी सुफला होते अशी भावना होती. मानवी जीवनाचे आरोपण सृष्टीवर करणे हा मानवी स्वभाव आहे. सूर्य मृग नक्षत्रात गेल्यानंतरचे पहिले तीन दिवस हा पृथ्वीच्या रजोदर्शनाचा काळ मानला जातो. या काळात नांगरणे, बी पेरणे वर्ज्य मानले जाते. चवथ्या दिवशी दगडांना स्नान घालून पृथ्वी सुफलनासाठी योग्य झाली असे मानले जाते. अंबुवाची नांवाने हा उत्सव बंगाल, आसाम येथे व्यापक प्रमाणात तर अन्यत्र तुरळक प्रमाणात आजही साजरा होतो. आसाममद्ध्ये कामाख्या मंदिरातही हा देवीचा रजोदर्शन उत्सव साजरा होतो. या काळात मंदिर तीन दिवस बंद असते. चवथ्या दिवशी देवीला स्नान घालण्यात येते व भक्तांना लाल कपड्याचे तुकडे देवीच्या रजोदर्शनाचे प्रतीक म्हणून वाटले जातात. शबरीमलाच्या निषिद्धांच्या विपरित, खुद्द केरळमद्ध्येही पार्वती देवीच्या मंदिरात (चेंगान्नूर) पार्वतीच्या मासिक धर्माचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
याचा एक अर्थ असा कि रजोदर्शन हे काहीतरी अपवित्र आहे अशी भावना मुळात नव्हती. किंबुहना सुफलनतेत रजोदर्शन हे अटळ आहे, अपरिहार्य आहे आणि मानवाला वंशसातत्यासाठी आवश्यकच आहे अशी भावना होती असे दिसते. तीन दिवस स्त्रीला कामांपासून विश्रांती मिळावी म्हणू दूर बसणे हा तत्कालीन स्थितीत सुचलेला पर्याय सोडला तर स्त्री या काळात अस्पर्शीही होती असा आभसही मिळत नाही. उलट भारतातील ५२ शक्तीपीठे (सतीचे एकेक अवयव जेथे जेथे गळून पडले त्या स्थानांवर उभारलेली मंदिरे) स्त्री हे नरकाचे द्वार आहे, पापयोनी आहेत अशी वैदिक धर्मशास्त्रांनी निर्माण केलेली निषिद्धे हिंदू पाळत नव्हते असे दिसते.
वैदिक धर्मातही आरंभकाळी स्त्रीकडे पहायचा दृष्टीकोण व्यापक व उदारच होता असे ऋग्वेदावरुनच दिसते. अनेक स्त्रीयांनी सुक्ते रचलेली आहेत. ऋग्वेदातील १.७९ हे सूक्त लोपामुद्रेने लिहिलेले असून ती तत्ववेत्ती होती हे स्पष्ट दिसते. वैदिक स्त्रीयांना उपनयनाचा, वेदांचा व यज्ञकर्मात भाग घेण्याचाही अधिकार होता. ऋग्वेदात कोठेही ऋतुमती स्त्री अपवित्र असते वगैरे उल्लेख नाही. अगदी मनुस्मृतीतही मासिक धर्मकाळात पुरुषाने स्त्रीशी संभोग करू नये याव्यतिरिक्त अशुचीबाबत कसलेही विधान केलेले नाही. परंतू तैत्तिरिय संहितेत नंतर काही भाग घुसवत एक मिथक निर्माण करण्यात आले. ते असे:
इंद्राने त्वष्ट्याचा पुत्र असलेल्या विश्वरुपाची तीन मस्तके उडवून ब्रह्महत्या केली. याबाबत निंदा होऊ लागल्यावर इंद्राने आपले १/३ पाप पृथ्वी व झाडंना दिले व उरलेले पाप स्विकारण्याची त्याने स्त्रीयांच्या एका समुहला विनंती केली. त्यावर स्त्रीयांनी वर मागितला. रजोदर्शनाचा काळ संपल्यावर आम्हाला अपत्यप्राप्ती होऊ दे! मग इंद्राच्या पापाने रज:स्वला स्त्रीचे रुप घेतले. म्हणून रजस्वला स्त्रीबरोबर संभाषण करू नये, तिच्याजवळ बसू नये, तिच्या हातचे अन्न खाऊ नये कारण ती इंद्राच्या पापाचा रंग असलेले रक्त टाकत असते.
आता ही भाकडकथा आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. अशा लबाड्या करण्यात वैदिकांचा कोणी हात धरणार नाही. इंद्राने आपले पाप त्यांना देईपर्यंत त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हती का? त्यांना रजोदर्शन होतच नव्हते का? आणि हे झाले एका स्त्री समुहाबाबत...अन्य स्त्रीयांचे काय? रजोदर्शन अमंगळ आहे हे सांगण्यासाठी कोणी मुढाने ही कथा बनवली आहे हे उघड आहे.
रजोदर्शनापुर्वी मुलीचे लग्न करावे असे मनु सांगतो. पण अन्य स्मृती त्याच्याही पुढे जातात आणि रज:स्वलेने तीन दिवस कसे वागावे याबाबत अगदी बारीक-सारीक नियम घालतात. तिने स्नान करु नये, केस विंचरू नये, दात घासू नयेत, तिन्ही दिवस हातात घेऊन अन्न खावे, कोणाला, अगदी रज:स्वलेने रज:स्वलेलाही स्पर्श करू नये, एकवस्त्रा असावे वगैरे. यातील एक जरी नियम जरी वैदिक स्त्रीने मोडला तर तिला होणारा पुत्र चोर, रोगी, नपुंसक, वेडा वगैरे होतो अशी भिती दाखवायलाही हे वैदिक धर्मशास्त्रकार चुकलेले दिसत नाहीत.
तैत्तिरिय ब्राह्मणात तिला या काळात याज्ञिक धर्मकृत्येही निषिद्ध सांगितली आहेत. हे नियम अर्थातच वैदिक स्त्रीयांनाच कटाक्षाने लागू केले गेले हे उघड आहे. ्स्त्रीयांचे उपनयनही थांबले आणि तिचा वेदाधिकारही काढला गेला तो स्मृतीकालातच. तत्पुर्वी वेदाध्ययन जरी केले गेले नसले तरी विवाहाआधी तिचे उपनयन करण्यात येत असे. पण तीही परंपरा नंतर वैदिकांनी का सोडली याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यांच्या स्त्रीया या सर्व पातकांचे द्वार बनल्या हे मात्र खरे. हिंदुंचा त्याच्याशी संबंधच नव्हता!
इस्लाम
इस्लाममद्ध्ये (भारतात) काही ठिकाणी मशिद-दर्ग्यांत स्त्रीयांना प्रवेश नाही असे मी लेखारंभीच सांगितले आहे. हेही कुराणविरोधी आहे असे म्हणायला प्रत्यवाय नाही. कुराणनुसार स्त्रीयांना मशिदीत जाण्याचा, नमाज अदा करण्याचा अधिकार आहे. अनेक ठिकाणी स्त्रीयांसाठी मशिदीत वेगळी व्यवस्था असते. पण असे असले तरी स्त्रीयांनी घरीच नमाज पढावा यासाठी अधिक दक्षता बाळगली जाते व स्त्रीया मशिदींत मुळात जाण्याचा प्रयत्नही करत नाही असेही चित्र आहे. काही ठिकाणी तर बंदीच आहे. कुराणात पैगंबर म्हणतात, स्त्रीयांना कोणी मशीदीत जाण्यापासून रोखू शकत नाही. पण त्याला नंतरच्या धर्मशास्त्र्यांनी दिलेली जोड अशी कि "पण घर हीच त्यांच्या नमाजासाठी योग्य जागा आहे."
पैगंबरांनी स्त्रीयांबरोबर लहान मुले असतात व ते रडून नमाजात व्यत्यय आणतत म्हणून स्त्रीयांसाठी स्वतंत्र खोली व दरवाजा असावा असे म्हटले. असे असले तरी मासिक धर्मातील स्त्रीया व अपवित्र लोक यांच्यासाठी सामुदायिक नमाज पैगंबरांच्याच पत्नीमुळे, आयेशामुळे, नाकारला गेला असे इस्लामी पंडित सांगतात. अर्थात याला कुराणात दुजोरा मिळत नाही. हदिसने अनेक बाबींचा विपर्यास केला आहे हे स्पष्टच दिसते. कुराणवर विश्वास ठेवणा-या मुस्लिमांनी मुळ कुराणातच स्त्रीयांबाबतचे नियम पाहिले तर आपल्या वेडगळ समजुते टाकाव्या लागतील.
थोडक्यात धर्मांनी मुळातील बाबी व स्त्रीयांबाबतचा उदारमतवाद कसा धिक्कारला आहे हे आपण वैदिक व इस्लामबाबत पाहू शकतो. स्त्रीयांना दुय्यम स्थान देणे हा एकमेव हेतू त्यामागे होता यात शंकाच नाही. मुळ धर्मही बाजुला ठेवत स्वार्थासाठी, स्त्रीयांवरील व अन्यांवरील वर्चस्व गाजवण्यासाठी धर्मालाही तिलांजली दिली.
आज आपण आधुनिक काळात आहोत. समतेचे मुलतत्व आपण घटनात्मक पातळीवर स्विकारले आहे. त्यात स्त्री-पुरुष समता सर्वोपरी आहे. अनेक हिंदू धर्मातील वैदिक पुरोहितांनी हट्टाने वैदिक नसलेले, उत्तरकाळात बनवलेले, अगदी स्मृतींतही नसलेले अनेक नियम देवस्थान कायद्यांत घुसवले आहेत. धर्माच्या बाबतीत मुस्लिम सर्वस्वी मुल्ला काय अर्थ काढतो यावरच अधिक अवलंबून आहेत. खरे म्हणजे, अगदी धर्मात असले तरी, ज्ञान-विज्ञानाच्या प्रकाशात असले बाष्कळ नियम फेकून द्यायची गरज असतांना "धर्म’..धर्म" करत स्त्रीच्या निसर्ग धर्माचा अवमान करत आपण समस्त मानूसकीला काळिमा फासत आहोत हे लक्षात घ्यायला हवे. मशिद असो कि मंदिर, यज्ञ असॊ को पुजा, स्त्रीला समान अधिकार हवेत. ते पाळायचे कि नाही, धर्मस्थली जायचे कि नाहे ही बाब व्यक्तिस्वातंत्र्याची आहे. पण कोणी त्यांना जायचे असुनही आडकाठी करत असेल तर धर्मस्थळ कायदे, लिखित-अलिखित नियम, पंरपरादिंच्या नांवाखाली त्यांना रोखत असेल तर ते घटनात्मक स्वातंत्र्याच्या मुलभूत अधिकारावर गदा आणनारे आहे. असे कायदे अघटनात्मक असल्याने ते बेकायदेशिर आहेत.
स्त्रीयांनाच यात व्यापक प्रबोधनासाठी, स्वत:चे स्वातंत्र्य जपण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. मासिक धर्म अपवित्र नाही. ती वेडगळ समजूत आहे. पुरातन काळापासून या धर्माला प्रतिष्ठा होती. ती गमावली असेल तर ती पुन्हा मिळवायला हवी. आणि समस्त पुरुषांनीही डोळे उघडून पुरुषी वर्चस्वतावादाच्या सरंजामशाही मानसिकतेतून दूर होत आपल्याइतकेच्ध स्त्रीयांनाही स्वातंत्र्य आहे, त्या गुलाम नाहीत याचे भान ठेवले पाहिजे...!
आप्पा- , विषय लोकप्रिय होण्याची सुतराम शक्यता नाही !
ReplyDeleteबाप्पा- तुम्ही एक सांगा , घटना काय म्हणते ?आज या विषयावर सुप्रीम कोर्टात केस गेली आहे असे क्षणभर मानून आपण विचार करा , आपले कायद्याचे ज्ञान अपुरे असेल तर तद्न्य लोकांचा सल्ला घ्या , आणि मग बोला , की नेमके काय बरोबर आहे आणि चूक !
आप्पा- डॉ.आंबेडकर यांच्या चिंतनातून काहीच सुटले नाही ,असे मानले तर,त्यांनी मूलभूत हक्कांच्या यादीत हा विषय घेतला असता ! जग काय म्हणते यापेक्षा तुम्ही काय विचार करता याला जगात महत्व आहे.अगदी साधी गोष्ट म्हणजे अशा देवालयांवर तुम्ही बहिष्कार टाका , किंवा नवे मंदिर असे उभारा की जिथे देवासमोर काहीही केले तरी ते उचितच गणले जाईल!
मूळ मुद्दा बघा , तुम्ही सुप्रीम कोर्टात याबाबत न्याय मागितला तर ते काय म्हणेल त्याचा विचार करा आपण एकदा म्हणता की वेद रचना अगदी अलीकडे झाली आहे , त्यात मूलतः स्त्रीला महत्व होते , अनेक स्त्रियांनी वेद्रचानेत सहभाग घेतला आहे , वेद आणि वैदिक हे स्त्रियांच्या विरोधी मूलतः नव्हते वगैरे वगैरे , असे जर असेल तर तिथपासून सुरवात करा म्हणजे आम्ही तुमचा सच्चेपणा मानू !नाहीतर तुम्ही ढोंगी आहात असे समजू . कारण
बाप्पा- थांब रे आप्पा , आता मी बोलतो , हा संजय एकसारखा वायफळ बोलत असतो . मला सांगा , तुम्ही म्हणता वेद अगदी अलीकडे लिहिले गेले , त्यानंतर श्रुती स्मृती , आणि त्यानंतर पुराणे , मग असे मानूया , स्मृती पुराणे मुसलमान येण्याच्या सुमारास निर्माण झाली . दत्तावतार हा तर मनुष्य निर्मित कथेवर आधारित आहे ,नवनाथ हे नेमके काय आहे ?ज्ञानदेव हे शेवटचे नाथ कसे ?आपणास याची सर्वांचीच उत्तरे माहित असून आपण साप म्हणून भुई धोपटत बसता !
आप्पा- वाईट रूढी आणि वाईट समजुती या कालपरत्वे आपण बदलू शकतो हे सर्वमान्य आहे , सतीची चाल अशीच बंद झाली , केशवपन असेच काळाच्या पडद्या आड गेले. आज मासिक पाळी म्हणून कोणीच बाजूला बसत नाही . म्हणजेच समाजाच्या समजुती कितीतरी बदलल्या आहेत .
तुम्ही शाबारीमालेचे असे मंदिर उभारा की जेथे रजस्वला स्त्रीनेच आरती केली पाहिजे असा नियम करा. आपली ताकद अशी वाया घालवू नका , कोणासही असल्या गोष्टीत इंटरेस्ट उरलेला नाही . मुळात शाबरिमला कोण जाते ?दक्षिणेतील एक मंदिर ,तिथे द्रविड पद्धतीत वैदिकांचा काय संबंध ?सिंधू संस्कृतीत आपला पगडा बसवणारे द्रविड कुठे आणि दक्षिणेत जाउन आपला पगडा बसवणारे वैदिक कुठे ?खरे काय ?
बाप्पा- उगीच रान पेटवायचे सोडून अशा मंदिराना आपण सुप्रीम कोर्टात घेऊन जरा पुरुषार्थ दाखवा आणि हा बिनडोक वायफळ नपुसक ओरडा थांबवा ! हे छापणार का ?
आप्पा- शबाना आणि अरुंधतीचे मत काय आहे ? तुमच्या गावच्या गावकऱ्यांचे मत काय आहे ?
आपल्या धर्मात म्हणजे शैव धर्मात शिवाशिव आणि सोवळे ओवले याचे खूप स्तोम आहे , आणि हे सर्व संस्कार घरापासून सुरु होतात , खरेतर आज्जी आई यांच्या कडून प्रथा आणि रीतीरिवाज पाळण्याचे शिक्षण मिळते. म्हणजे असे लिखाण लिहिताना तुम्ही त्या एज ग्रुपला समोर ठेवून लिहायला पाहिजे . तुमच्या क्रांतिकारक विचाराना त्या वायोगटाने स्वीकारले पाहिजे . सावित्रीबाई फुलेना पटले म्हणून ज्योतिबा आपल्या उद्दिष्टांपर्यंत सुलभतेने पोहोचू शकले हे विसरता कामा नये .
ReplyDeleteकोणतीही क्रांती हि स्वयपाक घरातूनच सुरु होते असे म्हणतात ते खोटे नाही.
आपण स्त्री शक्तीचे महत्व जाणता ,त्यांची मते बदलण्या साठी आपण आपल्या लिखाणात आवश्यक बदल केले पाहिजेत असे सांगावेसे वाटते .
आपण म्हणता की वैदिकांच्यात सुद्धा स्त्रियांनी वेद वाङ्ग्मयात सहभाग दाखवला आहे. हे तर अत्यंत स्वागतार्ह म्हटले पाहिजे.वेद रचना ही इसपू २००-२५० आहे असे आपण म्हणत असता .शैव वाङ्ग्मयात काय सांगितले आहे ते मात्र आपण सांगत नाही - असे का ? आपण नेहमी वैदिक रचनेला दोष देत असता त्याच वेळेस शैव काय म्हणतात तेही सांगावे , म्हणजे जास्त परिणामकारक होईल असे वाटते कार्तिकेय हे शिवाचे अपत्य , म्हणजे शैव लोकांनीच याबाबत काय ते ठरवले पाहिजे . आपल्याकडे तर कार्तिकेयाचे दर्शन स्त्रियानी घेणे अमान्य आहे . आपण एक छोटेसे काम करू शकता .
उद्यापासून आपण रोज १०० स्त्रियाना पर्वतीवर घेऊन जा , आणि कार्तिकेय स्वामीचे दर्शन घडवा आणि घोषणा देत दर्शन होउ दे . नुसते ब्लोग वर तारे तोडण्यापेक्षा असे भरीव कृत्य करा , एकदम शाबरिमला बाबत लिहिण्यापेक्षा आधी १०००० पुणेरी आधुनिक पुरोगामी स्त्रियाना पर्वतीवर घेऊन जा !बघुया तरी !उगाच रिकामा न्हावी भिंतीला तुमड्या लावी असे करत बसू नका .
या पत्राला केराची टोपली दाखवण्याचा अधिकार आपला आहेच !
ReplyDeleteआपल्या लेखाचा उद्देश काय आहे ?
शैव वैष्णव हा वाद आपण नेहमीच आपल्या मतांमध्ये कौतुकाने रंगवत असता ,सामान्यपणे आजचा मराठी माणूस दोन्ही श्रद्धा जपत असतो, त्यात आपण हा विखार का घालता ?वैदिकांचे मूळ शोधायला गेले तर आपण अवेस्ता पर्यंत नेता , आणि शैवांची तर गणतीच नाही , मला तर वाटते , दार्विनची काही माकडेही शैव धर्म पाळत असतील इतका शैव पंथ जुना आपण ठरवू शकता !ते कसब आपणाकडे जन्मजात आहे !
शिवाचा पुत्र कार्तिकेय , त्याचे दर्शन स्त्रियाना निषिद्ध हे शैवानी ठरवले का वैदिकांनी ?खरेतर निकिता म्हणते तसा हा वाद कोणत्याही धर्माविरुद्ध नाही किंवा धार्मिक चालीरीती बद्दल नाही .
With the increasing spirit of the campaign, we have decided to take it further. The campaign ends on November 27, and we hope to connect to maximum people by then. After the campaign is over, we will be publishing a report about the campaign to state our larger goals and objectives. The campaign is not against any particular religion or religious practice, but against all the menstrual taboos that exist in our society. We urge the National Commission for Women to take a stand against such discrimination, whether it is practised in some religion, or society - म्हणजे या निकीताजी फक्त हवा निर्माण करणार आणि पुढचे सर्व स्त्रियांच्या राष्ट्रीय समितीवर सोपवणार ! हा पोरकट पणा नाहीका ? कोणीतरी प्रमोटर असणार हे सर्व घडवणारा , अगदी न्यापकीन ची जाहिरातही म्हणू शकतो आपण !आजचे युग जाहिरातींचे आहे , आणि संजय सर तुम्ही त्याला बळी पडताय ? कमाल आहे ,
आपण मुस्लिम धर्मा बद्दल लिहिले आहे तशी बंधने बौद्ध आणि जैन धर्मात काहीच नाहीत असे आपण छातीठोकपणे सांगू शकता का ? मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रमुख हे शैव नाहीत असे त्यांच्या नावावरून दिसते , गोपालकृष्णन हे शैव नाव नाही ! मग या वैदिकाने या शैव मंदिराचा ताबा कसा काय घेतला ? २० वर्षांची मुलगी प्रसिद्धीसाठी काय करेल ते सांगता येत नाही , तिने खरेतर इतरांच्या मत परिवर्तना पेक्षा नवे भव्य कार्तिकेयाचे मंदिर उभारायला पाहिजे जिथे सर्व स्त्रियाना मुक्त प्रवेश असेल - अशाने काय होईल , त्या मूळ देवळाचे उत्पन्न शून्य होईल आणि त्यांचे डोळे उघडतील !आणि मत परिवर्तानाही होईल ! शेवटी मंदिरेही धंदाच करायला निर्माण झाली आहेत असे एक लाडके मत आहेच पुरोगामी लोकांचे ! नाही का हो संजय सर ?
स्त्री पुरुष समानता आपण अती ताणत आहोत असे नाही का वाटत ?आजकाल प्रसिद्धीसाठी अतिशय सोपे तंत्र म्हणजे काहीतरी ब्यानर करायचे , मेणबत्या पेटवायच्या आणि मिरवायचे !
एफटीआयआय सारखे रिकाम टेकाडे पडीक विद्यार्थी पूर्वी असले उद्योग करत असत जागृती बद्दल आसुसलेली शबाना , अरुंधती राय , सामाजिक न्यायाचे भान असलेले इतर गुलजार , गिरीश कर्नाड , नसरुद्दिन , जब्बार , काय म्हणतात ?
या निकीतेला संजय सर आपण विचारले का की तुला शैव धर्म आणि वैदिक धर्म माहित आहे का ?टीका करणारा परिपक्व असतोच असे नाही ,आपल्याला न्यायालयाचे दरवाजे कायम उघडे आहेत त्याचा वापर का करत नाही हि निकिता ?
आपण म्हणता तसे असंख्य (?) स्त्रियांनी तिच्या आंदोलनात उडी घेतली असेल तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे अगदी सहज शक्य आहे . स्यानिटरी न्याप्कीन घेऊन त्यावर पेनने काहीतरी लिहून बीबीसी वर मिरवण्यापेक्षा ,वर्गणी काढत माणशी ५०० रुपये जमा करून सुप्रीम कोर्टात का जात नाही ? घटना कर्ते आपणास नक्कीच न्याय देतील !
नाही नाही हा स्त्रीयांवरचा अन्याय थांबलाच पाहिजे !अरेरे किती हा अन्याय ? संजय सर तुम्ही शनिवारवाडा प्रांगणातून आपल्या चेल्यांसकट ( ? ) एक विराट मोर्चा काढा ,
( आपला मोर्चा विराट असेलच )आणि तडक पर्वतीवर कार्तिकेय मंदिरात आपण असंख्य स्त्रीयांसकट मुक्काम ठोका , आणि एक विराट सभा घेऊन निकिता आझाद ला आपला पाठींबा जाहीर करा ! चला तर , या रविवारी होऊन जाऊ द्या , आंबेडकर पुण्यातीथी ला आपण इतके नक्कीच कराल !हि सुवर्ण संधी सोडू नका ! निकिताला घेऊनच या !
खरेतर २७ नोवेंबर ला हे आंदोलन संपले संजय सर का शिळ्या कढीला उत आणत आहेत तो शिवच जाणे ! नमः शिवाय !
तारतम्य नावाची काही गोष्ट आहे हे संजय सोनवणी यांच्या गावीही नसते .
ReplyDeleteएक २० वर्षांची मुलगी एका विषयावर ७ दिवस अभियान चालवते आणि नंतर म्हणते की पुढील कृतीसाठी आम्ही स्त्रियांच्या राष्ट्रीय लवादासमोर जाणार आहोत , अशा प्रकारात मूळ विषय काय आहे ?आणि त्याचे काय होईल ? राष्ट्रीय लवाद बाजू ऐकून नोंद घेईल ,इतकेच !
त्यापूर्वी बीबीसीवर या मुलीला कव्हरेज मिळाले . हेतू काय ? किती झोकून देऊन आंदोलन होत आहे याचा काहीही अभ्यास न करता संजय सरांनी आपले मत प्रदर्शन केले आहे .
खरेतर ज्या तरुण मुलामुलीना असले धार्मिक अन्यायाचे प्रश्न सतावत असतील त्याना न्यायालयाचे दरवाजे कायम उघडे आहेत , पण स्टन्ट करायला सोकावलेल्या काही जणांना जाणून बुजून तसे करायचे नसते , स्वस्तात प्रसिद्धी हवी असते .
कोणतीही गोष्ट पटत नसेल तर अनेक मार्ग आहेत
१ आपण त्या मंदिरावर सामुहिक बहिष्कार टाकू शकतो .
२ आपण नवीन भव्य प्रती मंदिर जवळच उभारून जन जागृती करून प्रस्थापित मंदिराची गर्दी आटवून प्रस्थापिताना आव्हान देऊ शकतो .हे नवीन मंदिर सर्व स्त्रियाना मुक्त प्रवेश देणारे असेल आणि पुजारीही स्त्रीच असेल !
३ कोर्टात धाव घेऊन , आपली मागणी धसास लावू शकतो
४ वर्गणी काढून नवीन मंदिराचे काम हाती घेत जनमताचा रेटा वाढवत आपली मते लोकप्रिय करू शकतो , अयोध्येच्या बाबतीत असेच घडले होते , लोकांनी खुषीने या आंदोलनास आपले आंदोलन मानले होते .
परंतु असे काही न करता किंवा सुचवता , संजय सर एकदम वैदिक आणि शैव हे तुणतुणे घेऊन नाचू लागतात तेंव्हा ते जोकर वाटू लागतात , एक २० वर्षांची मुलगी संजय सरांच्या भाषेत असंख्य ( ? ) स्त्रियात जागृती निर्माण करू शकते हे असंभवनीय नसले तरी , निकिताचे रेकार्ड पाहिल्यावर अशक्य वाटते . तिची प्रोफाईल वाचली की ती फिल्म टेलिव्हिजन सारख्या एखाद्या संस्थेत शोभेल अशीच वाटते ,त्यांचा जसा भ्रम निरास झाला तसाच हा प्रकार आहे . त्याची वंदनीय संजय सरांनी इतकी दाखल घ्यावी आणि त्यातही लगेच वैदिकाना झोडपून घ्यावे हे निंदनीय आहे .
इतके असेल जर कौतुक , तर पुण्यातच संजय सरांनी मोर्चा काढावा , शाबारीमालेच्या पुजाऱ्याचा निषेध करत , प्रतिमा दहन करत , पर्वतीच्या कार्तिकेयाचे असंख्य स्त्रियांसमवेत दर्शन घ्यावे !
संजय सरांनी निकिताचे आंदोलन २७ तारखेस संपले त्यानंतर तो धागा पकडून असे केले तर तो तिच्या कृतीस पाठींबा म्हणून धरता येईल . डॉ बाबासाहेब यांच्या पुण्यतिथीस हे घडवून आणायला गर्दी मात्र जमणार नाही - बिन तिकीटाची गर्दी सगळी मुंबईस असणार - तो मुद्दा पण महत्वाचा आहे ! बघा कसे जमेल तसे पर्वतीला मात्र जाउन या !
जय कार्तिकेय ! वैदिक असो वा शैव - जयजयकार करायलाच हवा !
आणि हो , ते लिहा वाचा हल्ली गप्प गप्प झाले आहेत , मी भारतीय रुसले आहेत आणि अविनाश पाटसकर परागंदा झाले आहेत , हे काही तुमच्या चळवळीला शोभत नाही !जागे रहा , रात्र वैऱ्याची आहे ?
तारतम्य नावाची काही गोष्ट आहे हे संजय सोनवणी यांच्या गावीही नसते .
ReplyDeleteएक २० वर्षांची मुलगी एका विषयावर ७ दिवस अभियान चालवते आणि नंतर म्हणते की पुढील कृतीसाठी आम्ही स्त्रियांच्या राष्ट्रीय लवादासमोर जाणार आहोत , अशा प्रकारात मूळ विषय काय आहे ?आणि त्याचे काय होईल ? राष्ट्रीय लवाद बाजू ऐकून नोंद घेईल ,इतकेच !
त्यापूर्वी बीबीसीवर या मुलीला कव्हरेज मिळाले . हेतू काय ? किती झोकून देऊन आंदोलन होत आहे याचा काहीही अभ्यास न करता संजय सरांनी आपले मत प्रदर्शन केले आहे .
खरेतर ज्या तरुण मुलामुलीना असले धार्मिक अन्यायाचे प्रश्न सतावत असतील त्याना न्यायालयाचे दरवाजे कायम उघडे आहेत , पण स्टन्ट करायला सोकावलेल्या काही जणांना जाणून बुजून तसे करायचे नसते , स्वस्तात प्रसिद्धी हवी असते .
कोणतीही गोष्ट पटत नसेल तर अनेक मार्ग आहेत
१ आपण त्या मंदिरावर सामुहिक बहिष्कार टाकू शकतो .
२ आपण नवीन भव्य प्रती मंदिर जवळच उभारून जन जागृती करून प्रस्थापित मंदिराची गर्दी आटवून प्रस्थापिताना आव्हान देऊ शकतो .हे नवीन मंदिर सर्व स्त्रियाना मुक्त प्रवेश देणारे असेल आणि पुजारीही स्त्रीच असेल !
३ कोर्टात धाव घेऊन , आपली मागणी धसास लावू शकतो
४ वर्गणी काढून नवीन मंदिराचे काम हाती घेत जनमताचा रेटा वाढवत आपली मते लोकप्रिय करू शकतो , अयोध्येच्या बाबतीत असेच घडले होते , लोकांनी खुषीने या आंदोलनास आपले आंदोलन मानले होते .
परंतु असे काही न करता किंवा सुचवता , संजय सर एकदम वैदिक आणि शैव हे तुणतुणे घेऊन नाचू लागतात तेंव्हा ते जोकर वाटू लागतात , एक २० वर्षांची मुलगी संजय सरांच्या भाषेत असंख्य ( ? ) स्त्रियात जागृती निर्माण करू शकते हे असंभवनीय नसले तरी , निकिताचे रेकार्ड पाहिल्यावर अशक्य वाटते . तिची प्रोफाईल वाचली की ती फिल्म टेलिव्हिजन सारख्या एखाद्या संस्थेत शोभेल अशीच वाटते ,त्यांचा जसा भ्रम निरास झाला तसाच हा प्रकार आहे . त्याची वंदनीय संजय सरांनी इतकी दाखल घ्यावी आणि त्यातही लगेच वैदिकाना झोडपून घ्यावे हे निंदनीय आहे .
इतके असेल जर कौतुक , तर पुण्यातच संजय सरांनी मोर्चा काढावा , शाबारीमालेच्या पुजाऱ्याचा निषेध करत , प्रतिमा दहन करत , पर्वतीच्या कार्तिकेयाचे असंख्य स्त्रियांसमवेत दर्शन घ्यावे !
संजय सरांनी निकिताचे आंदोलन २७ तारखेस संपले त्यानंतर तो धागा पकडून असे केले तर तो तिच्या कृतीस पाठींबा म्हणून धरता येईल . डॉ बाबासाहेब यांच्या पुण्यतिथीस हे घडवून आणायला गर्दी मात्र जमणार नाही - बिन तिकीटाची गर्दी सगळी मुंबईस असणार - तो मुद्दा पण महत्वाचा आहे ! बघा कसे जमेल तसे पर्वतीला मात्र जाउन या !
जय कार्तिकेय ! वैदिक असो वा शैव - जयजयकार करायलाच हवा !
आणि हो , ते लिहा वाचा हल्ली गप्प गप्प झाले आहेत , मी भारतीय रुसले आहेत आणि अविनाश पाटसकर परागंदा झाले आहेत , हे काही तुमच्या चळवळीला शोभत नाही !जागे रहा , रात्र वैऱ्याची आहे ?
माननीय संजय सोनवणी ,
ReplyDeleteखरेतर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येतील असे वाटत होते , पण आपले लाडके आप्पा बाप्पा सोडले तर कुणालाही यामध्ये म्हणावा तितका रस वाटत नाही असे दिसते विषय नाजूक आहे आणि टोकाच्या प्रतिक्रिया उमटू नेटवर पाहिले असता , निकिता आझाद ही काही फार मोठी वाटत नाही , प्रसिद्धी माद्यामानी पुढे आणलेली एक व्यक्ती असावी , तिची मते सुमार आहेत हे तिच्या इतर कॉमेंट्स वरून दिसते . ज्ञानेश्वरांनी १६ व्या आणि २१ व्या वर्षी जे लोकोत्तर कार्य केले तसे प्रत्येकाला जमेल असे नसते , पण हीच प्रसिद्धीच्या हव्यासाने चटावलेली माणसे ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर हे एक का दोन ? अशा गप्पा मारत बसतात !स्यानितरी न्याप्कीनाने स्पोन्सर केलेला हा सर्व नाटकी भाग वाटतो .
अगदी थोडक्यात सांगायचे तर याला कायदेशीर द्वारे कायम उघडी आहेत . अशा मंदिरांवर सर्व स्त्रियांनी बहिष्कार टाकावा किंवा एक नवे मंदिर उभारून तेथे पुरुषाना बंदी घालावी असे उपहासाने म्हणावेसे वाटते . जेथे जेथे शक्य आहे तेथे तेथे आपल्याला होणारा वैदिक विरोधाचा मोह अचंबित करतो .
अजूनही मी भारतीय किंवा लिहा वाचा , नीरज , अमित यांची प्रतिक्रिया येईल अशी आशा आहे , ते सर्व नक्कीच वाचनीय असते .मी भारतीय तर एकामागून एक दहादहा पाने लिहितात !
सर यावेळेस आपले मोहोन्जोदारो सुद्धा आपण खुबीने यात घुसवले याची दाद दिली पाहिजे !
पूर्वी कुणीतरी सिद्ध केल्या प्रमाणे खालील व्यक्ती या एकाच असून त्याच बायकांच्या नावाने लिहित असतात , असे क्दिसते , ते पाहिले तर मग आपल्या लिखाणास फक्त एकाच माणूस प्रतिसाद देत असतो असे दिसते . आपला ब्लोग लाखो लोक वाचतात हा आपला दावा अत्यंत पोकळ आहे हेही सिद्ध होते .
ReplyDeleteअरेरे , किती दयनीय अवस्था आहे ही ! जगप्रसिद्ध इतिहासकार , धडाडीचे वक्ते आणि पुरोगामी चळवळीचे अध्वर्यू इतके एकाकी कसे ?
टीव्हीवर परवा आपली मते आपण सांगत होतात त्यात नुसता नाम निर्देशही नव्हता याची खंत वाटते आत्ता पर्यंतचा आढावा घेतला तर एकाच एक व्यक्ती आपल्या अनेक नावाने इथे लिहित असते , मग ते स्नेहप्रभा असो , सुमती असो किंवा आगाशे , अमित , नीरज , असो . आप्पा बाप्पा हे तर पेन नेम आहे हे समजतेच . कशाला इतका आटापिटा ?संजय सर तुमचीच माणसे वा प्रपंच का मांडत असतात ?कुणी वाचक नाहीत म्हणून ?
एकंदरीत इतर महत्वाचे विषय सोडून असले फुटकळ विषय चिवडत बसण्यात काय अर्थ आहे ? छापा किंवा नका छापू , एकदा हे बिंग उघड करायलाच हवे होते .
गोरे साहेब व्यक्ती, विचार आणि मत स्वातंत्राचा इतका गैरवापर? आगाशे, अमित, मी एकाच व्यक्ती? कश्यावरून आपण हा (कु)तर्क काढलात?
ReplyDeleteआता पर्यंतचे सगळे लेख हे माझ्या दृष्टीने तरी फार महत्त्वपूर्ण होते. तुम्हला कुठला विषय फुटकळ वाटला आणि का हे कळेल का?
BTW तुम्हीही एखादा भन्नाट ब्लोग का नाही लिहित?
Cheers,
Niraj.