Sunday, May 24, 2020

रामजन्मभुमीवर मंदिराचे अवशेष?


Ram Mandir | Ancient idols, pillars and Shiv Ling found in Ayodhya ...


Zafaryab Jilani | Zafaryab Jilani calls findings at Ram Mandir ...

रामजन्मभुमी सपाटीकरणातील शोध आणि माझे आत्ताचे निरिक्षण-
१. रामजन्मभुमीच्या ठिकाणी राम मंदिर निर्माण कार्य करण्यासाठी जमीनीचे समतलीकरण करतांना काही नक्षीयुक्त स्तंभ आणि शिवलिंगाकार पाच फुट उंचीचा नक्षीदार स्तंभ मिळाल्याची बातमी आहे. सपाटीकरणाच्या कामात हे अवशेष मिळालेत म्हणजे ते फार खोलवर गाडले गेलेले नसावेत.
२. अयोध्येला ब्रिटिशकाळापासुन पुरातत्वीय सर्वेक्षणे व उत्खनने सुरु झाली. त्यात अयोध्येला असंख्य हिंदू व जैन मंदिरे आणि बौद्ध विहार-स्तुपांचे अवशेष असल्याचे उजेडात येत गेले.
३. बी. बी. लाल यांनी बाबरी मशिदीच्या जवळ अकराव्या शतकातील स्तंभांचे पाये सापडले असल्याचा अहवाल अलाहाबाद उच्च न्यायालयाला सादर केला होता तो त्यांच्या १९७४-७५ च्या उत्खननांवरुन.
४. २००३ साली पुरातत्व विभागाने उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन बाबरी मशीदीच्या ठिकाणी उत्खनन केले. त्यात बाबरी मशिदीच्या जागी पुर्वी एक विशाल बांधकाम होते असा निष्कर्ष काढण्यात आला होता. पण ते स्थान मंदिरच होते असे सिद्ध करणारा कोणताही पुरावा ते देऊ शकले नाही. विशेष म्हणजे या उत्खननात एक अरेबिकमध्ये कोरलेला एक लेखही सापडला होता तसेच कमळ, कौस्तुभ, मकराकृती कोरलेयाही सापडल्या होत्या. ख्रिस्तपुर्व १००० ते अकरावे-बारावे शतक या काळातील विविध वस्तु तेथे मिळाल्या. बारावे शतक ते सोळावेे शतक या कालात मात्र तेथे कसलेही बांधकाम असल्याचे आढळून आले नाही. सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभुमीबाबत निवाडा देतांना याचा विशेष उल्लेख केलेला आहे.
५. आता प्रश्न असा पडतो की, इतक्या पुरातन स्तरांपर्यंत जेथे उत्खनन झाले आहे त्या ठिकाणी हे जवळपास बारा स्तंभ आणि शिवलिंगसदृष्य पाच फुट उंचीचा स्तंभ व तोही वरच्या स्तरात कोठून आले? पुरातत्व खात्याला आणि तत्पुर्वीही ज्यांनीही उत्खनन केले त्यांच्या नजरेतुन हे कसे सुटले?
६. या स्तंभांवरील नक्षी, यक्ष-यक्षीणींच्या (वा रुपसुंदरींच्या) प्रतिमा आणि कमलाकृती व त्यांच्या घडणीतील व शैलीतील सफाई पाहता त्या चारेकशे वर्षांपेक्षा जुन्या वाटत नाहीत. त्या कोणी भग्न केल्या आहेत असे तर मुळीच वाटत नाही. एखादे पुरातन मंदिर/वास्तू निसर्गत: भग्न झाल्यावर जे स्वरुप येऊ शकेल तसे या स्तंभ/प्रतिमादिंचे स्वरुप उपलब्ध केलेल्या छायाचित्रांवरुन दिसते.
७. हे अवशेष सापडल्याचा दावा केला आहे तो श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी. हे अवशेष सापडलेत ते म्हणे टाळेबंदीच्या काळात सपाटीकरण करण्याचे काम करंणा-या कारागिरांना. जे पुरातत्व खात्याच्या सुसज्ज टीमला इतकी वर्ष सापडले नाही त्यांना हे अवशेष सापडलेे असा दावा करायला संघाला सवयीने सहज शक्य असले तरी जोवर पुरातत्व तज्ञ या दाव्याचे परिक्षण करत नाही तोवर काही अंदाज बांधु नये. कारण मुळात हे अवशेष सापडल्याच्या दाव्यावरच विश्वास ठेवावा की नाही ही शंका दावाकर्त्यांनीच निर्माण केली आहे.
-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...