ब्राह्मण, ब्राह्मण्य आणि ब्राह्मण्यवाद हे आज चर्चेचे विषय झाले आहेत. या तीनही बाबी एकच आहेत म्हणुन त्या तिरस्करणीय आहेत असा आक्षेप नोंदवला जातो. ब्राह्मण्यवादाचा "संसर्ग" इतर जातीयांनाही होवु लागला आहे असेही म्हणण्यात येते. यावर ब्राह्ह्मण समाजाचा आक्षेप आहे असे दिसते. ब्राह्मण्य हा जणु काही एक रोग आहे असा अर्थ त्यातुन निघतो, त्यामुळे काही ब्राह्मणही "मी ब्राह्मण आहे पण बाह्मण्यग्रस्त नाही" असे म्हणु लागतात. खरे तर ही एक विपरीत स्थिती आहे आणि त्यावर चर्चेची निकड आहे.
"ब्राह्मण" हा एके काळी फक्त वर्ण होता. "जो मंत्र रचतो तो ब्राह्मण" ही ऋग्वेदाची व्याख्या आहे, मग त्याचा अन्य व्यवसाय काहीही असो. उपनिषदांच्या द्रुष्टीने पाहिले तर "ज्यालाही ब्रह्माचे द्न्यान आहे तो ब्राह्मण." महाभारतात युधिष्ठीराने " ज्याच्या अंगी द्न्यान, भुतदया, शील, क्षमा इ. गुण आहेत त्याला ब्राह्मण म्हणावे." अशी ब्राह्मणाची व्याख्या केली आहे. पौराणिक व्याख्या पाहिली तर "जो ब्राह्मण मातापित्यांच्या पोटी जन्माला आला आहे, उपनयन झाले आहे, ज्याने वेदाध्ययन केले आहे, जो यद्न्यकर्म जाणतो तोच ब्राह्मण होय."
वरील व्याख्या पाहिल्या तर वरील अर्थाने "संपुर्ण ब्राह्मण" म्हनता येइल असे मुळात किती ब्राह्मण आहेत हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे "ब्राह्मण" आणि "ब्राह्मण्य" हा खरे तर कळीचा मुद्द बनण्याचे काहीएक कारण नाही. परंतु जन्माधारीत जात म्हणुन पाहिले तर ब्राह्मण हे ब्राह्मणच आहेत, परंतु त्यांचे वर्ण म्हणुन आजचे स्थान काय हाही प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. जात म्हणुन ब्राह्मण असणे आणि वर्ण म्हणुन ब्रह्मण असने यात मुलभुत फरक आहे आणि तो फरक खुद्द ब्रह्मण समाजालाच न समजल्याने हा घोटाळा झाला आहे.
पण ज्याअर्थी तो घोटाळा झाला आहे त्या अर्थी ब्राह्मणपक्षांची काहीतरी गफलत होते आहे.
म्हणजे वैदिक वर्णाधारित अर्थानेही आम्ही उच्च...आणि जात म्हणुनही उच्च असा काहितरी ग्रह झाला आहे.
ब्राह्मण हा वर्ग परंपरेने कथीत हिंदु धर्माचा "पुरोहित" मानला आहे. पण पुरोहित फक्त ब्राह्मणच आहेत असे नाही हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे. पण जर ब्राह्मण हा धार्मिक पुरोहितच असेल तर ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यात विभेद मानण्याचे कारण नाही. प्रत्येक धर्मियांना परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी, त्याच्यापर्यंत आपली कर्मकांडात्मक अर्चना पोहोचवण्यासाठी पुरोहितवर्गाची गरज भासते. हा समाजानेच त्या वर्गाला दिलेला अधिकार असतो. हे जगभर झाले आहे. त्यामुळे प्रसंगपरत्वे धर्मनियम बदलणे, अखिल धर्मियांच्या धार्मिक हिताची काळजी वाहणे हे पुरोहितांचे कर्तव्य असते तर त्या बदल्यात दान, दक्षिणा, देणग्या इ मार्गाने त्यान्च्या चरितार्थाची सोय लावणे व संरक्षण देणे ही उर्वरीत समाजाची जबाबदारी असते.
पुरोहित हा समाजाच्या नैतीकतेचा आदर्श मानला जाणे स्वाभावीकच होते आणि ते तसे झालेही. मनुस्म्रुती ते मिताक्षरीपर्यंत ब्राह्मणांवर जेवढे कठोर आचार-विचारादि नैतीक बंधने आहेत ती त्यामुळेच. ब्राह्मणाने शेती करणे, व्यापार करणे, शस्त्र हाती घेणे इ. निषिद्धे आहेत. असे करणारा ब्राह्मण तात्काळ धर्मबाह्य होइल अशी स्म्रुत्योक्त तरतुद आहे.
पण जर इतिहास पाहिला तर असे दिसते की ब्राह्मणांनीच या स्म्रुती धाब्यावर बसवल्या. महाभारतात द्रोणाचार्य, क्रुपाचार्य हे ब्राह्मण असुनही शस्त्र हाती घेउन युद्ध करतांना दिसतात आणि द्रोणाचर्यांच युद्धातील म्रुत्युस कोणी "ब्रह्महत्या" म्हनत नाही...कारण त्याने वर्ण बदलला आहे. २ -या शतकात पुष्यमित्र श्रुंग हा ब्रुहद्रथ राजाची हत्या करुन सत्ताधारी बनुन हजारो बौद्धानुयायांची कत्तल करतांना दिसतो. शेती ते व्यापार यात ब्राह्मण हिरिरेने पडलेले दिसतात. "सेवा" धर्म त्याज्य असुनही ते सेवकही बनलेले दिसतात. आता तर अनेक ब्राह्मण त्यांना धर्मोक्त अति-त्याज्य अशाही सेवा-व्यवसायांत आहेत.
स्म्रुतींचा आधार घेतला तर असे सर्व ब्राह्मण आज मुळात "ब्राह्मण" म्हनवुन घेण्यास पात्र नाहीत असे स्पष्ट दिसते. केवळ जन्माधारीत ब्राहमण्य म्हणजे "ब्राह्मण" अशी सोयिस्कर भुमिका ब्राह्मण समाजाने घेतली आहे. स्वत: एकाही धर्मनियमांचे पालन करत नसता इतरांनी मात्र ते केलेच पाहिजे आणि ब्राह्मणांचा आदर केला पाहिजे, वेदांचा, वैदिक संस्क्रुतीचा अभिमान बाळगलाच पाहीजे, वैदिक धर्माचा सन्मान अवैदिकांनीही ठेवलाच पाहिजे अशा प्रकारची भुमिका काही ्ब्राह्मण विव्द्वान घेतात त्यातुनच या वादंगाचा जन्म झाला आहे. आणि तो अभिमान बाळगावा अशी अपेक्षा ठेवित, इतर दोन वैदिक वर्णांना जवळपास धर्मबाह्य करीत त्याच परधर्माचे पुरोहित म्हणून मिरवण्याची असांस्क्रुत भुमिका दिसते. थोडक्यात वर्णाश्रमाचे स्वत: कोनतेही नियम पाळायचे नाहीत आणि वर वैदिक संस्क्रुतीचा टेंभा मिरवीत सांस्क्रुतीक वर्चस्ववाद गाजवण्याचा प्रयत्न करायचा यालाच सध्या "ब्राह्मणवाद", माझ्या मते याला वैदिकवाद म्हणतात. वैदिकवाद म्हणून त्याचा ब्राह्मण्याशी संबंध नाही, कारण वैदिक असल्याची श्रेष्टा ते मनोभावे जपत असले तरी ब्राह्मण या वैदिक संज्ञेपासून, ज्या स्म्नृतींचा ते गौरव करतात त्या स्मृत्यांपासून त्यांचे व्यावहारिक आचरण कधीच तडीपार झालेले आहे.
वर्ण नव्हे फक्त जात
ब्राह्मण हा वर्ण आहे. पण आता ब्राह्मण वर्ण हा जवळपास ५५० उपजातींत वाटली गेलेली "जात" आहे. या जातींत आपापसात संघर्ष आणि मद-मत्सर आहेत. महाराष्ट्रापुरते पहिले तरी देशस्थ, क-हाडे, कोकनस्थ असे वाद आहेतच आणि त्याचा संसर्ग त्या-त्या ब्राह्मण उपजातीन्तील विद्वानांनाही लागलेला आहे. असे असले तरी या समाजाची स्वतंत्र सामाजिक वैशिश्ट्ये आहेत. हजारो वर्ष शिक्षणक्षेत्रात (भले घोकंपट्टी का असेना) राहिले आहेत. त्या जोरावर प्रतिष्ठा-संपत्ती प्राप्त केली आहे. त्यामुळे त्यांची अशी वैशिष्ट्यपुर्ण जीवनशैली आहे. आजचा मोठा मध्यमवर्ग-उच्च-मद्धय्मवर्ग याच समाजातुन आला आहे. जेही कोणी अन्य-जातीय प्रगती साधत या मध्यमवर्गात प्रवेश करतात ते स्वाभावीकपणे ब्राह्मणांच्या जीवनशैलीचे अनुकरण करतात वा करण्याचा प्रयत्न करतात. असे जगभर घडत असते. ब्राह्मण वर्ग आज अमेरिकन जीवनशैली हळुहळु स्वीकारु लागला आहे. इतर वर्गालाही त्याची लागन झाली आहे. सोविएट रशियात अशा वर्गाला निंदाजनक अर्थाने "बुर्झ्वा" म्हटले जायचे. आता येथे त्यालाच "ब्राह्मण्यग्रस्तता" असे म्हटले जाते. किंबहुना असे म्हणणार्यांना तोच अर्थ अभिप्रेत असावा. आणि परिवर्तनाला विरोध करु पाहणार्यांचा एक वर्ग समाजात असतोच आणि तो अशा वेगळ्या जीवनशैली जतन करणार्यांची हेटालणी करत असतो.
परंतु, प्रश्न असा आहे कि ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यात भेद करता येइल काय?
ब्राह्मण ही जात मानली आणि केवळ एक जात म्हणुन तिच्याकडे पहायचे ठरवले तर ब्राह्मण आणि ब्राह्मण्य वैदिक अर्थाने वेगळे आहे असे म्हणता येइल. जो धर्माचा पुरोहीत आहे, जो समाजाच्या पारलौकिक हिताची काळजी वाहतो त्या ब्राह्मणात ब्राह्मण्य आहे असे म्हनता येइल. किंवा जीही कोणी व्यक्ति समाजास द्न्यान देण्यासाठी कटीबद्ध आहे, वा संस्क्रुतीत मोलाची भर घालत आहे अशा व्यक्तींतही ब्राह्मण्य आहे असे म्हणता येइल. त्या अर्थाने ब्राह्मण्य हे आदरार्थीच घ्यावे लागेल. खरे तर आजचे बव्हंशी ब्राह्मण असे धर्मोक्त/वेदोक्त ब्राह्मण्य पाळत नाहीत आणि तरीही श्रेश्ठत्वाच्या व वैदिक वर्चस्वतावादाच्या भावना बाळगतात म्हणुन ते निंदेस पात्र झाले आहेत असे म्हणावे लागेल.
थोडक्यात जात म्हणुन पाहिले तर ब्राह्मण आणि ब्राह्मण्य या सर्वस्वी वेगळ्या बाबी आहेत.
ब्राह्मणांनी "द्न्यान" कोंडले असा एक ब्राह्मणांवर आरोप आहे. कै. नरहर कुरुंदकर या संदर्भात म्हणतात "ब्राह्मणांनी त्यांचे द्न्यान उधळुन वाटले असते तरी समाजाला त्याचा काही एक उपयोग नव्हता कारण मुळात ते द्न्यान समाजोपयोगी नव्हते." मी त्यांच्या मताशी सहमत आहे. त्या द्न्यानाचा उपयोग अन्य समाज सोडा, खुद्द त्यांनाही (ब्राह्मणांनाही) झाला नाही अन्यथा त्यांना इतरांच्या व्यवसाय-धंद्यांत पडावे लागले नसते. त्यामुळे एक जात म्हणुन उरलेला आणी तरीही वैदिक वर्णश्रेष्ठता जपणारा असा हा ब्राह्मण समाज आज एका विलक्षण टीका-गर्तेत अडकला आहे आणि तो गुंता सोडवणे एक मोठे आव्हान आहे.
ब्राह्मणंनी पौरोहित्य हाच आपला व्यवसाय ठेवणे आताच काय गेल्या हजारो वर्षांत शक्य नव्हते. ब्राह्म्णांची ५% लोकसंख्या ग्रुहीत धरली तर दर १९ मानसांमागे १ पुरोहित अशी वाटणी होते आणि मग त्यांचा उदरनिर्वाह लागणे अशक्य होते व आहे ही वस्तुस्थीती आहे. त्यामुळे ब्राह्मणांनी प्रसंगपरत्वे व्यवसाय बदलले असले तरी ते योग्यच आहे. त्यांनी इतिहासात वंशपरंपरेने दरोडे घालण्याचेही उद्योग केले आहेत. सेनार्तने "बुंदेलखंडातील ब्राह्मण वंशपरंपरेने दरोडेही घालण्याचा उद्योग करत असत आणि त्यांना प्रतिश्ठाही होती." असे नमुद केले आहे. थोडक्यात जीवनयापनासाठी ब्राह्मणांनी जवळपास सर्वच क्षेत्रे निवडली असे स्पष्ट दिसते आणि त्यात चुकीचे काहीएक नाही.
परंतु असे करत असतांना "ब्राह्मण" असल्याचा अहंकार, श्रेष्ठत्वाचा अहंकार त्यांना अभावानेच सोडता आला आहे असेही दिसते.
ब्राह्मण अल्पसंख्य?
आपण अल्पसंख्य आहोत असे ब्राह्मण समाजाचे एक दुखणे आहे. भारतातील जवळपास ४५०० जाती पाहिल्या आणि एकुन लोकसंख्येशी तुलना केली तर भारतातील प्रत्येक जात एकेकट्या पातळीवर अल्पसंख्य तर कधी अति-अत्यल्पसंख्य असल्याचे दिसेल. त्यामुळे आम्हीच अल्पसंख्य आहोत असे समजण्याचे ब्राह्मणांना मुळात काही कारण नाही. किंबहुना अशाच अल्पसंख्यांची एकुणातली गोळाबेरीज म्हणजे आजचा कथित हिंदु धर्म. पण ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशी संद्न्या लावली आणि इतर समाज विरुद्ध ब्राह्मण असे समीकरण मांडले तरच ब्राह्मण अल्प्संख्य ठरतात, पण ते वास्तव नाही. ती ब्राह्मण समाजाने स्वता: करुन घेतलेली वंचना आहे. वा त्यात त्यांचे काही राजकारण असेल. मायावतीने ब्राह्मण समाजाचा उपयोग करुन घेतला(?) हा अलीकडचाच इतिहास आहे आणि तसेच राजकारण महारष्ट्रात खेळण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला हाही अलीकेडचाच इतिहास आहे. पुण्यात डी.एस. कुलकर्णी यांना त्यांच्या पक्षाने तिकिट दिले यामागे तोच हेतु होता. येथे ते कथित सोशल इन्जिनीयरीन्ग सपशेल फसले.
पण मुळात ब्राह्मण समाज वापरला जावु शकत नाही, तो वापरला गेल्याचे दाखवुन वापरुनच घेणार हे मायावतींच्या लक्षात आलेले दिसत नाही.
असे का याचे उत्तर नजिकच्या स्वतंत्र्यपुर्व काळात ते आजवरच्या ब्राह्म्णी राजकिय ते कथित सामाजिक संघटणांच्या उद्दिश्टंत व प्रत्यक्ष कार्यात आहे. त्यांच्या कार्याचा फायदा सर्वच ब्राह्मणांना मिळाला आहे असे मात्र चित्र नाही. पण या संस्था/संघटना ब्राह्मण व पर्यायाने ब्राह्मणी (बुर्झ्वा) संस्क्रुतीचे अनुसरण करणार्यांवर प्रचार-प्रसार माध्यमांतुन वा कुज-बुज मोहिमेतुन खालील प्रभाव टाकण्यात यशस्वी झाले आहेत...वा अनेकांना त्या प्रभावात खेचण्यासाठी जे प्रयत्न अविरत चालले आहेत ते असे...
अ. वैदिक संस्क्रुतीची श्रेश्ठता.
ब. मुस्लिम-ख्रिस्ती द्वेष.
क. प्रति-दहशतवादाचे माहात्म्य.
ड. गांधीवादाचा द्वेष.
इ. ब्राह्मण (वैदिक)निश्ठ हिंदुत्ववाद.
या सार्यात "ब्राह्मण्य" कोठेही बसत नाही हे उघड आहे. ब्राह्मण जातीचे (वर्णाचे नव्हे...वर्ण बदलता येतो...जात नव्हे...) पुरातन वर्चस्व पुन्हा अबाधित ठेवण्याचे हे कारस्थान आहे आणि त्याला ब्राह्मण्य म्हणजे नेमके काय हे न समजणारा ब्राह्मण सामाजच कारणीभुत आहे. वैदिक संस्क्रुती लयाला जावुन २००० वर्ष झाली, पण वैदिक धर्ममहत्ता कायम राहिली. गेल्या दीड पावनेदोन शतकांत तिला हादरे बसु लागले व ब्राह्मण संरक्षक कोशात गेला पण उचल खात तीचे पुनर्जीवन करण्याचा हा उद्योग आहे हेच या वैदिकवर्चस्ववादी ब्राह्मणांच्या लक्षात येत नाही.... हिंदुंचे संघटन वैदिक नेतृत्वाखाली व त्या प्रभावाखाली व्हावे असे वाटणारे ब्राह्मण याला जबाबदार आहेत. वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म नव्हे, वर्ण आणि जात या दोन्हीही पुर्णतया विभिन्न बाबी आहेत हेच त्यांच्या लक्षात येत नाही किंवा लक्शात असुनही वरकरणी वेगळे रुपडॆ धारण केले जाते. त्यामुळे त्यांच्या पापक्रुत्यांबद्दल अन्य जातीयाने थोडीतरी टीका केली तर त्याची रवानगी "ब्राह्मण्द्वेश्ट्यान्च्या" यादीत केली जाते.
आणि त्यामुळे अहंकार सुखव्रुद्धी होत असल्याने एकाच वेळेस वर्ण आणि जात, मग सामाजिक वर्तन कसलेही असो, दोन्ही उपभोगण्याचा हा प्रयत्न आहे हे उघड आहे. पण तेच मुळात अवास्तव आणि अधार्मिक आणि असामाजिक आहे. प्रत्यक्षात वैदिक संहितांनीही असली कोणतीही बाब मान्यच केलेली नाही. त्यामुळे आता जे "ब्राह्मण्य" टीकेचे कारण झाले आहे ते "वर्णीय व जातीय वर्चस्वाचे" आहे...
त्यामुळे हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणवादाचे (वैदिकवादाचे) पुनरुजीवन अशी व्याख्या कोणी मान्य करु शकत नाही, कारण जात म्हणुन ब्राह्मणाना समाजाने शिरावर घेण्याचे काहीएक कारण नाही...कारण तीही आता अन्य जातींप्रमाणे एक जात आहे...आणि त्यापलिकडे त्यांचे वेगळे...आस्तित्व मानण्याचेही कारण नाही. त्याची महत्ता मानण्याचे कारण नाही कारण ही जातही अन्य जातींच्या, त्यांच्या वर्णानेच नाकारलेल्या व्यवसायांत घुसलेली आहे. याबद्दल ब्ब्राह्मणांना दोष देउ नये, पण त्याचवेळी वर्णाचे जन्मसिद्ध अधिकारही हवेत हा आग्राह कसा चालेल?
परंतु प्रयत्न त्या दिशेने होत असतात हे नाकारुन कसे चालेल?. आजच्या काळातही सती प्रथेचे उदात्तीकरण केले जाते, चातुर्वर्ण्यश्रेश्ठता जपण्याचे महत्व ठसवले जाते, वेदांमद्ध्ये सारे आधुनिक द्न्यान आहे असे वेडगळ दावे केले जातात, आणि या बाबींवर जो कोणी टीका करतो त्याला सरळ ब्रह्मणद्वेश्टा ठरवुन टाकले जाते.
"ब्राह्मणवाद" हा वरील अर्थाने मान्य होवु शकत नाही. ब्राह्मणांवर होणार्या जहरी टीकेमागे मुळात ब्राह्मण आणि ब्राह्मण्य याबाबत झालेली गफलत आहे. बाह्मण्याचा अस्त घडवुन आणत फक्त जन्माधारीत ब्राह्मण असण्याचा अहंकार बाळगत ज्याही कोणी ब्राह्मण विद्वानांनी वैदिक ब्राह्मणत्व श्रेश्ठत्वाचे डंके पिटले त्यातुन निर्माण झालेली ही अवस्था आहे.
जातीचा अभिमान ब्राह्मणांनाच आहे असे नाही तर तो प्रत्येक जातीत मुरलेला आहे असेही चित्र आपल्याला दिसेल. जाती म्हणुन ते योग्यही आहे. कारण प्रत्येक जातीने परस्परांची सेवाच केली आहे. ब्राह्मणाला मंत्र येतात, पौरोहित्य येते, तर कुम्भाराला, चांभाराला, शिंप्याला, तेल्यालाही किंवा ढोर-मातंगाला मानवी ऐहिक गरज पुर्तीची शक्ती आहे. त्या अर्थाने सर्वच जाती समान आहेत. पण त्या समान न मानण्याची कारणे वैदिक धर्मीय संकल्पनांत आहेत हे ब्राह्मणांनी लक्षात घेत पुढे यायला हवे. विषमतावादी सामाजिक तत्वज्ञान वैदिक धर्म देतो आणि तोच विषमतावादी विचार हिंदू समाजात घट्ट बसला आहे. त्यामुळे वैदिकत्व घेत श्रेष्त्वतावाद जपायचा कि ब्राह्मण ही अन्य जातींप्रमाणे एक हिंदू जात आहे असे समजत परस्पर जातीसन्मानाची भावना बाळगत, तसे वागत "सर्व जाती समान" या तत्वाप्रत येत सर्वच जातींचे एक दिवस विलयन होईल हे पहायला हवे.
मला ब्राह्मण चालेल- ब्राह्मण्य नको...हे म्हणण्यापेक्षा वैदिक वर्चस्वतावादी जन्माधारित अहंकार नको अथवा वैदिकवाद नको असे म्हणायला हवे. कारण ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यात ब्राह्मण्याचे जन्मदातेही ब्राह्मण ठरतात. तेही वास्तव नाही. विषमतेची मुळे वैदिक तत्वज्ञानात आहेत. म्हणून ते तत्वज्ञान हिरीरीने प्रचारत बसण्यापेक्षा त्या तत्वज्ञानाचा त्याग महत्वाचा ठरेल.
- संजय सोनवणी
९८६०९९१२०५