Tuesday, October 26, 2010

आम्हा बहुजनांना नेमके काय हवे आहे?

ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद हा मुळात नवा नाही. या वादातुन फुले, आंबेडकर, शाहु महाराज यांच्या वैचारिक आणि क्रुतीशील द्रुष्टीकोनातुन अनेक क्रांतिकारी सामाजिक बदल घडले. सर्वांनीच नसले तरी ते बव्हंशी समाजाने...राज्यघटनेनीही ते मान्य केले त्यातुन बहुजनांना प्रगतीचे दरवाजे उघडले. आजवर बंद असलेली शिक्षणाची द्वारे, अगदी स्त्रीयांसाठीही, उघडली. अनेक बहुजनांनी/दलितांनी त्यातुन उंच झेपा घेत जगाला चकित केले.
पण...
आज हा वाद ज्या पद्धतीने सुरु आहे तो बहुजन आणि दलितांना कोणत्या दिशेने घेवुन चालला आहे, हा प्रश्न प्रत्येकाने स्वता:ला विचारायला पाहिजे. यातुन काहीतरी सकारात्मक निर्माण व्हावे, बहुजनांची आर्थिक उन्नती व्हावी हा या वादाचा हेतु आहे कि केवळ द्वेषमुलक भावना निर्माण करणे हा हेतु आहे?
ब्राह्मण्यवादी संघटना मुस्लिमांचे शिर्कान करावे या मताच्या आहेत व तसे प्रयत्न ते करत असतात. करतही राहातील. तसेच आता काही बहुजन धरती/देश नि:ब्राह्म्ण करा असे म्हनत आहेत...उद्या तेही तसे प्रयत्न करतील...मुद्दा हा आहे कि मग ज्या ब्राह्मण्वाद्यांचा तुम्ही तिरस्कार करता त्यांच्यात आणि तुमच्यात फरक तो काय? त्यांची संस्क्रुती तुम्हाला (मलाही) अमान्य जर आहे तर त्यांच्याच संस्क्रुतीचे पुन्हा अनुसरन करुन तुमची स्वत:ची संस्क्रुतीच नाही हे सिद्ध करण्याचा येडचापपणा का करता?

स्वत:ची संस्क्रुती शोधणे आणि तिचे प्रामाणिक अनुसरन करणे याला आपण आपापली संस्क्रुतीनिश्ठा म्हणु शकतो. तसे प्रयत्न केले जावेत. गतकाळातील चुकांबद्दल...मग त्या कोणाच्याही असोत...धि:कार केला जावा आणि त्या चुका पुन्हा होणार नहीत यासाठी प्रयत्न करावा...यालाच आपण सामाजिकता म्हनतो. पण ज्यांचा तुम्ही द्वेश करता त्यांच्याप्रमणेच वागु लागलात आणि गरळ ओकु लागलात तर ते चुकिचे होइल. आणि त्यातुन काहीएक साध्य होणार नाही...

माझा एक कट्टर ब्राह्मण वाचक माझा मुस्लिमांच्या योगदानाबद्दलचा लेख वाचुन मला म्हणाला: सारे मुसलमान मारुन टाकले पाहिजेत. मी म्हणालो...ओ.के. मी पुढे होतो...पण एक सांगा १८ कोटी मुसलमानांना मारायचे कसे आणि सर्वांना मारुन टाकले तर गाडायचे कोठे येवढे सांगा. तो निरुतर झाला. हिटलरला सर्वसत्ताधीश असुन सारे ज्यु मारता आले नाहीत, तर आता बहुजन सर्व ब्राह्म्णांना कसे मारणार हे मला सांगा.

आणि हीच तुमची संस्क्रुती आहे का?

मला वाटते हा वाद एका मुर्खपणाच्या टोकाला नेला जात आहे. त्यामागे कोणाचे काय स्वर्थ आहेत ते त्यांचे त्यांना माहित. पण यामुळे कोणताही प्रश्न सुटत नाही...सुटनार नाही हेही तेवढेच खरे.

बव्हंशी ब्राह्मण समाज वा नेत्रुत्व हे अडेल्तट्टु आहे. ते दादोजी हा शिवरायांचा बाप होता आणि रामदास हा गुरु होता ही पाल्हाळ अपवाद वगळता चालुच ठेवणार. त्याला प्रतिवाद कसा करावा याचाच बहुजनांत संभ्रम आहे. याला दुसरे कारण असे कि मुळात बहुजनीय विचारवंतांची (आताच्या) भाषाच भरकटलेली आहे आणि त्यामागे "संशोधन" वा शिवरायांप्रती आदर हे खरे कारण नसुन राजकारण झाले आहे. तरुणांची टालकी फिरवता येतात...ते फिरवतात...त्यात खरा रास्त संताप विरघळुन जातो याचे भान नाही.

ब्राह्मणांनी दादोजींचा पुतळा स्वता: हटवावा हे आव्हान मी जाहीरपणे केले होते. ददोजींबद्दल्ची खरी हकीकत मी फ़ेसबुकवर व ब्लोग वर मांदली होती आणि तो लेख पुण्यनगरीने प्रकाशितही केला होता. या क्षणापर्यंत त्या लेखात काही अनैतिहासिक आहे असे कोनता ब्राह्मण संशोधक सांगायला आलेला नाही. खरे तर ब्राह्मणांना काही संस्क्रुती असेल तर स्वत: पुढे येवुन तो पुतळा आजही हटवावा...पण ब्राह्म्न समाजही हटलेला आहे आणि बहुजन तो पुतळा हतवुन मुरारपंत जगदेवाचा पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवतांनाचा पुतळा बनवण्याच्या विचारात नाहित.

मग हवे काय आहे?

फक्त द्वेष...

पण हे एक उदाहरण झाले. अशी अनेक आहेत. आर्यवादाचा निकाल अजुनही कोणी लावत नाही. ब्राह्मण विचारवंत परस्परविरोधी आणि अनैतिहासिक वतवट करतात...बहुजन खालच्या पातळीवर येवुन त्याला प्रत्युत्तर देतात. पण मला वाटते ब्राह्मणांना महत्वच का देता? त्यांनी धर्म बिघडवला...जातीव्यवस्था निर्माण केली...भुतकाळात अनंत खोटी आख्याने रचुन आपल्याला भ्रमित केले...
हरकत नाही...आता तर ते सत्य आपल्याला समजले ना? ते लोकांपर्यंत पोहोचवण्याऐवजी, त्यंच्या मानसिकतेत बदल घडवण्याऐवजी, त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वेळ देण्याऐवजी ही "द्वेष मोहीम" का?
मग तरीही "मी मराठा", "मी बौद्ध" "मी ओ.बी.सी" सारख्या जातीयवादी भाषा का वापरता?

यामुळे तुम्हीही जातीयवादीच आहात हे सिद्ध होते आणि ज्या ब्राह्मणांविरुद्ध तुम्ही तथाकथित येल्गार पुकारला आहे...तेच जिन्कले आहेत असेच मला म्हणावे लागत आहे.

जर जातीव्यवस्था ब्राह्मणांची उपज आहे तर ती नष्ट करण्यातच बहुजनंचे अन्तिम ध्येय असले पाहिजे. ब्राह्मण-ब्राह्मण करत...त्यांना शिव्या देत बसल्याने जर बहुजनांचे कल्याण होणार असेल तर चला तेच करत राहु...पण तो आपलाच पराभव असणार आहे. गतकाळात त्यांनी आपल्याला नागवले ही तक्रार असेल ती तेवढापुरती ठीकही आहे...पण आता आपण स्वत:च नंगे व्य्हायला लागलो आहोत त्याची जबाबदारी फक्त आपल्यावरच राहणार आहे. स्वत:च्या नालायक्या लपवण्यासाठी ब्राह्मणी संस्था मुसलमानांना टारगेट करतात...तुम्ही ब्राह्मणांना.

स्वत:ची संस्क्रुती आधी ओळखायला शिका...एवढेच सांगणे.

अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!

पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत ...