Sunday, November 14, 2010

"बहुजनीय चळवळीचे मारेकरी कोण?"

"बहुजनीय चळवळीचे मारेकरी कोण?" या विषयावर शनिवारी परिसंवाद झाला. यातील वक्त्यांची मनोगते बोलण्याच्या क्रमाने थोडक्यात खाली दिली आहेत.

संजय सोनवणी: "जातीव्यवस्थेचे निर्माते म्हणुन आपण ब्राह्मण समाजाला, मनुस्म्रुतीला दोष देतो, पण आजही बहुजनीय जातीअंत घडवु शकले नाहीत. फुले माळी समाजाचे, शाहु मराठ्यांचे तर आंबेडकर दलितांचे अशी वाटणी झाली आहे. याचा अर्थ मनुवाद जिंकला असे खेदाने म्हणावे लागत आहे. आजच्या बहुजनीय चळवळीसुद्धा जातींत वाटल्या गेल्या आहेत आणि याच संघटना बहुजनीय चलवळीचे मारेकरी बनु लागल्या आहेत.

ब्राह्मण समाजावर खोटा इतिहास लिहिल्याचा आरोप केला जातो पण अनेक चलवळीतील विचारवंतसुद्धा धड्धडीत खोटा इतिहास सांगु लागले आहेत. मुलनिवासी व आर्य या संद्न्या अवैद्न्यानिक आणि असत्य असतांनाही तरुणांमद्धे चुकीचे मत प्रसारित करुन त्याचा उपयोग द्वेष वाढवण्यासाठी होत आहे. "प्रुथ्वी नि:ब्राहमण करा" अशा घोषणा दिल्या जात आहेत. प्रत्यक्षात मुळात कोणी ना मुलनिवासी नाही आणि कोणी आर्यही नाही हे सत्य लपवले जात आहे. ब्राह्मणी संघटनाही मुस्लिमांना कापुन काढा असे सांगतात...त्याचे गुजरातमद्धे थोडे प्रयोगही झाले आहेत...हे योग्य नाही...

ब्राह्मण समाज फक्त त्यांचेच नेते-पुर्वज मोठे करतात असाही आरोप आहे, पण बहुजनीय तरी वेगळे काय करत आहेत?

धर्माचे थोतांड दुर करणे, जातीअंत करणे व बहुजनीयांना द्न्यान-विद्न्यान-तत्वद्न्यानात अग्रणी बनवणे, त्याची हा बहुजनीय चलवळीचा मुख्य उद्देष्य होता...पण आता तो फक्त ब्राह्मण द्वेषाशी येवुन थांबला आहे...आणि ब्राह्मण परस्पर विजेते ठरले आहेत... कारण बहुजनही "नव-मनुवाद" पाळत आहेत...उभय्पक्षी दोषी आहेत. ब्राह्मणी संघटणा मुस्लिम द्वेष शिकवतात तर आपले विचरवंत ब्राह्मण द्वेष पसरवत आहेत...मग वेगळेपण काय राहिले? असेच सुरु राहिले तर बहुजनीय चळवळ संपेल. भावनिक आधारावरील द्वेष्पुर्ण चळवळी कधीही यशस्वी होवु शकत नाहीत हा जगाचा इतिहास आहे. पण ब्राह्मणांवर टीक केली तर ते जसे "ब्राह्मण्द्वेश्टा" असा शिक्का मारुन मोकळे होतात तसेच बहुजनीय चळवळीतील उणीवा प्रामाणिकपणे दाखवल्या बहुजनीय कार्यकर्ते-नेते-विचारवंत त्त्याची "भटाळलेला", "ब्राह्मणानी दत्तक घेतलेला" अशी हेटाळणी करतात...मग संतुलीत विद्वानांनी काय समरसता मंचावर जायचे?

बहुजन महत्मा बळीचा वारसा सांगतात...त्याची आजही पुजा करतात...परंतु ती महान संस्क्रुती आता विक्रुत करत बळीला पुन्हा पाताळात गाडण्यासाठी नवे "वामन" अवतार सिद्ध झाले आहेत आणि ही चिंतेची बाब आहे...यावर प्रखर आत्मचिंतन केले जावे.

प्रा. विलास वाघ: बहुजन म्हणजे नेमके कोण याचीच अजुन नीट व्याख्या नाही. या शब्दाचा अर्थ सोयीने लावला जातो. मराठे बहुजन आहेत का? ओ.बी. ची. बहुजन आहेत का? मग अस्प्रुश्य, भटके विमुक्त नेमके कोठे मोडतात याचा विचार नाही. मुस्लीम-जैनही सोयीने बहुजन ठरवले जातात. ही लबाडी असुन दलितांवर अत्याचार करण्यात ब्राह्मणांएवढेच मराठेही जबाबदार आहेत हे खैरलाजी प्रकरणावरुन स्पष्ट दिसते. गावोगावी दलितांवर अन्याय करणारे मराठेच आहेत हे वास्तव नाकारता येत नाही.
आम्ही दलितांबाबत मराठे आणि ब्राह्मणांत फरक करु शकत नाही. जातीच्या मुद्द्यांना बगल देण्यासाठी "बहुजन" हा शब्द वापरला जात आहे.

बहुजनीय चळवळ भरकटलेली आहे आणि जोवर मुख्य मुद्द्यांवर एकमत होत नाही तोवर ती यशस्वी होणार नाही.

परशुराम वाडेकर: ब्राह्मणी व्यवस्था आणि भांडवलशाहीवादी व्यवस्था या दोन्ही चळवळीच्या मारेकरी आहेत, मानवजातीच्या शत्रु आहेत. त्यांना विरोध करणे आवष्यक आहे. जातीय अहंकाराची परिणती अंतता: सर्वविनाशात होइल आणि ते योग्य नाही. माझ्यासारख्या कर्यकर्त्याला नेहमी प्रष्न पडतो कि आपण कोठे जात आहोत? नेमके ध्येय काय आहे?

शुद्धोदन आहेर: बहुजनीय चळवळीने गौतम बुद्धाच्या सम्यक तत्वद्न्यानाचा उपयोग करायला हवा. "बहुजन" हा शब्द पहिल्यांदा गौतम बुद्धाने वापरला. जातीय/वांशिक अहंकारांमुळे इतिहासात विनाशच घडलेला दिसतो. आजही आपण तीच परंपरा चालु ठेवत असु तर ते सर्वविनाशक ठरेल. जाती नश्ट करण्याऐवजी त्या अधिक धारदार होत आहेत आणि त्यातच बहुजनीय चळवळीचे अपयश दडलेले आहे यावर चिंतन करावेच लागणार आहे. त्यातुन व्यापक मानवतावादी दिशा ठरवावी लागणार आहे. द्वेषाने आंधळे झालेले समाजाचे कसलेही नेत्रुत्व करु शकत नाहीत. सद्ध्या तीन छावण्या आहेत...एक चैत्यभुमीवरची, दुसरी रेशीमबागेतली तर तिसरी बहुजनीय. या सार्यां छावण्या असंबब्द्ध आणि हिरमोड करणार्या आहेत.

प्रा. हरी नरके: जेही ब्राह्मण नाहीत, ब्राह्मण्वादी नाहीत त्या सर्वांना बहुजन समजावे. जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था याचे समर्थन करणारे सारेच बहुजनीय चळवळीचे मारेकरी आहेत. जे आजही द्न्यानबंदी घालुन समाजाला मर्यादित परीघात ठेवत आहेत तेही चळवळीचे मारेकरी आहेत. पण त्याहुनही मोठे मारेकरी आहेत बहुजनीय चळवळीचे नेत्रुत्व करणारे परशुराम खेडेकर, वामन मेश्राम किंवा श्रीमंत कोकाटे यांच्यासारखे वैचारीक मतभेद मान्य न करता, लोकशाहीची तत्वे न मानता हुकुमशाहीची सारी वैशिष्ट्ये कायम ठेवणारे लोक. मी भांडारकर संस्थेवर सरकारी प्रतीनिधी म्हणुन आहे...असे असतांनाही त्यांनी नुकताच माझ्याविरुद्ध मी, डा. आ.ह. साळुंखे यांनी राजीनामा द्यावा असा ठराव केला. एकीकडे हेच लोक अशा संस्थांवर बहुजनीय विचारवंत का नाहीत असे विचारतात. हा दुटप्पीपणा आहे. "मुलनिवासी नायक" सारखे चिंधी व्रुत्तपत्र सातत्याने "मी भटाळलो आहे" अशी टीका करत आहे. मला काहीही न विचारता माझे म्हणणे काल्पनीकपणे छापले जात आहे. खेडेकरांनी तर माझा एक लेख स्वता:च्या नावाने छापला...पण साधी दिलगिरीही व्यक्त केली नाही. यांचे इतिहास संशोधन फक्त स्वर्थापुरते, अप्रगल्भ आहे आणि लोकांना भडकावणे आणि ब्राह्मणांना शिव्या देणे एवढ्यापुरते मर्यादित आहे. मी ब्राहमणी व्यवस्थेचा विरोध करतो...करत राहील पण म्हणुन कोणी सा-या ब्राह्मणांचाच द्वेष करा असे सांगेल तर ते मला मान्य नाही. आम्ही एकाकी वाटचाल करु...ब्राह्मणी छावणीत कधी जाणार नाही...पण असे हे लोक करत राहतील, खोटे रेटुन बोलत राहतील तर मात्र चळवळ संपेल. मी गेली २५ वर्ष एवढ्या तळमळीने फुले-आंबेडकरांवर रात्रंदिवस काम करीत असता, त्यांचे सारे साहित्य संशोधन करत प्रकाशित करत असता हेच लोक, माझेच संशोधन वापरत चळवळ करत असता सोयीचे मुद्दे घेतात आणि गैरसोयीचे टाकुन देतात याचे आश्चर्य वाटते. उदा: माझ्या प्रेतावर ब्राह्मणाची सावली पडु नये असे फुलेंनी म्रुत्युमत्रात लिहिले असे हे लोक सांगतात...पण प्रत्यक्षात त्यानी लिहिलेय कि "जोही कोणी ब्राह्मण स्प्रुष्य-अस्प्रुष्यता मानतो अशा ब्राह्मणाची माझ्या प्रेतावर सावली नको" असे म्हटले आहे. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला, त्याचे "यशवंत" असे नांव ठेवले व सारी इस्टेट त्याला दिली हे सांगितले जात नाही. भांडारकरांचे फुलेंनी त्यांच्या एका पवाड्यात मदत झाल्याबद्दल आभार मानले आहेत तर खुद्द आंबेडकरांनीही भांडारकरांबद्दल व अन्य अनेक पुरोगामी ब्राह्मणांबद्दल आदरच व्यक्त केला आहे...असे असतांनाही "सब घोडे बारा टक्के" या न्यायाने सार-याच ब्राह्मणांना टार्गेट करणे मला मान्य नाही.

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...