सर्वच प्रकारच्या, सर्वच धर्मियांच्या दहशतवादाने आजचे मानवी जीवन कस्पटासमान करुन टाकण्याचा कसा चंग बांधला आहे हे मागील प्रकरणातील विवेचनातून आपल्या लक्षात आले असेलच. त्यामुळे निर्माण होणार्या समस्या ह्या केवळ सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरुपाच्या नसून त्यातून मानवी जीवनाच्या आस्तित्त्वाचा अति-गंभीर प्रश्न उभा ठाकलेला आहे. केवळ जिवंत असने वा जिवंत राहण्याची धडपड करत राहणे म्हणजे मानवी आस्तित्त्व टिकते आहे वा टिकेल अशी आशा बाळगणे अयोग्य असुन त्यातून मानवी जीवनाचे एकुणातीलच सार निघून जात मानवी समाज हा हळुहळु मुल्यविरहित होत जात तो न्रुशंस अशा आदिम काळात परतण्याची भिती त्यातून निर्माण झाली आहे.
मानवी आस्तित्त्व हे एक समाज म्हणुन, एक परिवार म्हणुन आणि एक व्यक्ती म्हणुन आकारत असते. राष्ट्र, धर्म, पंथ जात या परिघात मानवी आस्तित्त्व वावरत असतांनाच बहुसांस्क्रुतिकतेचा शिरकावही आजच्या जागतिक खेड्यात अपरिहार्यपणे होत असतो आणि तो अयोग्य आहे असे म्हनता येत नाही. एका परीने ही जागतीक मानवी समुदायाची एक-राष्ट्रवादाकडे/एक सांस्क्रुतिकतेकडे होत जाणारी अपरिहार्य वाटचाल आहे आणि ती अनेक संदर्भात खरीही ठरत आहे. भविष्यात कदाचित एक जग-एक राष्ट्र-एक संस्क्रुती ही संकल्पना खरीही होवु शकेल...पण त्याचेवेळीस एकीकडे उर्धगामी वाटचाल आणि त्याच वेळीस होत असणारी अधोगामी घसरण यातून मानवी मुल्यांचे वर्धन होण्याऐवजी घसरणच होत आहे असेही आपल्या लक्षात येईल.
सर्वच स्तरांतुन अविरत कोसळत असणारा दहशतवाद हा मानवी आस्तित्वाचा सार्थकतेच्या ध्येयमार्गातील महत्त्वाचा अडथळा आहे. दहशतवादी संख्येने अल्प असले तरी ते जी परिणामकारक साधने वापरत असतात त्यातुन सारखे जे तांडव निर्माण होते ते सर्वच समुदायांना पुन्हा कोणत्या ना कोनत्या प्रति-दहशतवादाचा आश्रय घेण्यास भाग पाडत आहे असेही चित्र आपल्याला दिसते. यातुन जी काही एक स्थिती निर्माण होवु पहात आहे त्यातुन निकोप मानवी आस्तित्त्वाचा लोप होत जात आहे आणि ही अत्यंत काळजी करण्याची बाब आहे.
दहशतवाद हा काही आधुनिक जगाची उपज नव्हे हे मी विविध प्रकरणांत स्पष्ट केले आहेच. पुरातन कालापासून, अगदी मानव हा टोळीमानव असल्यापासुन दहशतवादाचा एक-केन-प्रकारेन उपयोग करत आला आहे. त्याने भौतिक प्रगति केली असली तरी त्याची ही आदिमता अवशिष्ट रहात मानवी वर्तन दुभंगमय करत राहिले आहे. सहिश्णु म्हनवनारे तथाकथित समाज/धर्मही प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष रित्त्या दहशतवादी मुल्ल्यांना जपत असतात. त्यासाठी वापरले जानारे मार्ग आणि त्या-त्या दहशतवादाच्या साधनांच्या तिव्रता कमी-जास्त असतात एवढेच. परंतु परिणाम मात्र एकच असतो आणि तो म्हनजे दुस-यांना भयभित करणे, ठार मारणे वा त्यांचे सांस्क्रुतिक अपहरण करणे. एन-केन प्रकारेन वर्चस्वतावाद गाजवणे. अशा दहशतवादांना प्रति-दहशतवादही सामोरा येतो आणि तोही मुल्यांचे नाव घेत वा गतकालातील अन्यायाचे पाढे वाचत प्रतिपक्षाला नामोहरम करण्यासाठी कंबर कसत असतो. असे करत असतांना सत्त्याची चाड एकाही पक्षाला उरत नाही. "आम्ही आणि इतरेजन" अशी समाजाची/जगाची सोयिस्कर वाटणी केली जाते. भारतातील ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा वाद असेल वा हिंदुत्ववादी विरुद्ध अन्य धर्मिय असा वाद असतील, त्यामागे Theory of Others" पराकोटीच्या प्रमानात उपयोजिली जात आहे हेही आपल्य ल;अक्षात येईल. हे "इतरपन" जे आहे ते स्वता:चा समाज आणि अन्यांचा समाज यात संघर्ष निर्माण करत परस्परांवर कुरघोडी करण्यासाठी सज्ज असतात. त्यासाठी सोयिस्कर तत्वद्न्यानांची निर्मिती केली जाते. सोयीची संशोधने स्वीकारली जातात...वा त्यांना हवी तशी वाकवली जातात...त्यांचाच उदो-उदो केला जातो. सोयिचेच आयडाल्स हव्या त्या सोयिच्या पद्धतीने वाकवुन वापरले जातात. भारतातील सावरकरवादी, टिळकवादी, गांधीवादी, शिवाजीवादी, ते पेशवाईवादी यांचा या परिप्रेक्षात विचार केला जावु शकतो. साम्यवादी जगाने कार्ल मार्क्सचा वापर केवढ्या सोयीने केला हा इतिहासही येथे विचारात घ्यायला हवा. यातुन मुलभुत तत्वद्न्यान दूर रहात असुन मानवी आस्तित्त्वाचाच संकोच केला जात असल्याचे विदारक चित्र आपल्याला पहायला मिळते.
परंतू अभिनिवेशाच्या आहारी जात तत्कालिन परिस्थिती व प्रचार यातून आपले स्वतंत्र विचार आणि व्यक्तित्व यांस हरपुन बसणारे शेवटी कशाची प्राप्ति करतात हा एक प्रश्नच आहे. समाजाच्या व्यापक भवितव्यासाठीचे ते बलिदान आहे वा त्याग आहे ही विधाने खुपच अपवादात्मक परिस्थितीत करता येतात. खरे तर दहशतवादाचे कोणतेही हत्यार न वापरतासुद्धा हीच साध्ये साद्ध्य करता येवू शकतात. परंतू तसे घडने हेच मुळात नेत्यांना/राष्ट्रप्रमुखांना आणि अनेकदा पिसाट उन्मादवादी अनुयायांनाही नको असते. उदा. इराकचा प्रश्न हा अश्लाघ्य पद्धतीचा दहशतवाद करुनच सुटु शकत होता का...? आणि दहशतवादामुळे तो पुरेपूर साध्य झाला असे म्हनता येईल का? अमेरिकेने वा रशियाने जेथेही आपली समर्थक पांगळी नेत्रुत्त्वे लादुन ठेवली ते पाकिस्तान, इजिप्त ते आता लिबियात काय सुरु आहे? इस्राएलचे अरबांच्या बोकांडी बसवलेले राष्ट्र किती गरजेचे होते...? मग लदाखच्या स्वातंत्र्याचा प्रश्न मात्र जगात कोणाचीही प्राथमिकता का नाही?...मग स्वातंत्र्याच्या गप्पा हाकणारे हे कोण आहेत? जागतीक राजकारणात अनुपयुक्त असणार्यांचे आस्तित्व कसे बेदखल केले जाते हे आपण यातुन पाहु शकतो. हा दहशतवाद नव्हे काय? मानवी आस्तित्वाची किंमत सोयीस्कर ठरवण्याचाच हा अश्लाघ्य प्रयत्न नव्हे काय?
आणि त्याविरोधात किती नागरीक जागरुकतेने उभे राहतात यावरून आजच्या जगाची नैतीक पातळी ठरवायला गेलो तर ती वजाबाकीत जाणारी आहे असेच स्पष्ट दिसेल. किंबहुना प्रत्येकालाच कोणत्या ना कोनत्या प्रकारचा दहशतवाद मान्य आहे, समर्थन आहे वा सहभाग आहे असेच चित्र दिसते. सनातन प्रभात असो कि बजरंग दल, शिवसेना असो कि म.न.से., त्यांचेही दहशतवाद स्वजातीयांना/धर्मियांना/प्रांतियांना प्रिय होत जातात आणि हीच आधुनिक मानवी समाजाची शोकांतिका आहे. ही उदाहरणे दिली कारण आपण सहिष्णू असण्याचा दावा करणार्या धर्मातीलच हे लोक आहेत.
मुळात आज सारेच जग माध्यमांच्या वेढ्यात आवळले गेले आहे आणि ही माध्यमे अत्यंत सोयीने वापरण्यात सारेच सत्तापिपासू तरबेज झाले आहेत. लोकांची मते ही बनवली जातात...स्वतंत्र विचार करण्याची त्याची शक्तीच हिरावून घेतली जात आहे आणि आजच्या मानवी समुदायाला त्याचे कितपत भान आहे? खोट्या वा अर्धसत्य माहितीचा मारा करत वा भावनिक आवाहने करत प्रजेची स्वतंत्र विचार करण्याची शक्ति हरपवणे हा मानवी आस्तित्वावरील न्रुशंस हल्ला आहे आणि त्याचा आताच विरोध केला जायला हवा याची जाणीव आजच्या आधुनिक समाजाला कितपत आहे?
हिंसक असो, आर्थिक असो, सांस्क्रुतिक असो, दबावगटांतर्फेचा असो, राजकिय असो, सामाजिक असो...कोनत्याही प्रकारचा असो...दहशतवाद हा आजच्या समाजाच्या मानगुटीवर बसलेला आहे. एवढा कि अनेकांना आपण स्वता:च दहशतावादी आहोत हेही समजत नाही एवढा तो सर्वव्यापी झाला आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोनत्या प्रकारच्या दहशतवादाची साधने दैनंदिन जीवनात वापरु लागला आहे...विचार आणि क्रुती त्यातुनच प्रकटु लागल्या आहेत...
यात मानवी जीवनाचे सौन्दर्य पुरेपूर विक्रुत केले जात आहे. मानवी आत्मा हरवला जात आहे. समस्त मानवी जीवनच आस्तित्वहीन होत मानवी जगण्याचे संदर्भच बदलले जात आहेत. ही काही चांगली बाब नाही. जगण्याचा शोध घ्यायचा तर आता कलावंतांनाही घाणीतच बरबटुन घावे लागत आहे. कारण मुलात मानवी जीवनच तेवढे गढुळले गेले आहे.
दहशतवादी म्हणुन एखाद्या जातीसमुहालाच वा धर्मालाच तेवढे जबाबदार धरता येत नाही हे मागील प्रकरणांवरुन लक्षात आले असेलच. सारेच धर्म/पंथ या ना त्या प्रकारे दहशतवादी क्रुत्यांत इतिहासकाळापासुन सहभागी राहिलेले आहेत. मग ते ख्रिस्ती असोत कि हिंदू, मुस्लीम असोत कि ज्यू, बौद्ध असोत कि जैन. प्रत्येक काळात कोनत्या ना कोणत्या धर्माचा दहशतवाद उफाळुन आलेला आहे. आज मुस्लिमांचा वाटतो. पण तो तेवढाच, किंबहुना त्याहीपेक्षा अवाढव्य पातळीवर अन्य धर्मियांकडुनही राबवला जात आहे, हे लक्षात कोणी घ्यायचे? ख्रिस्ती दहशतवाद हा आज राष्ट्रप्रणित दहशतवाद आहे. प्रत्येक युरोपियन राष्ट्राचा (साम्यवादी वगळता) अधिक्रुत धर्म ख्रिस्ती हाच आहे. त्यांना मुस्लिमांना नावे ठेवण्याचा अधिकार नाही. उच्चवर्णेय हिंदू कितीही नाकाने कांदे सोलत असले तरी "वैदिक भगवा दहशतवाद" आहे आणि त्याला लाखो समर्थक आहेत हे ते नाकारु शकत नाहित. तो त्यांच्या असंख्य क्रुतींतुन समोर नित्यही येत आहे. गतकाळातही तो होताच आणि पुरातन काळीही होता. त्याला प्रतिक्रिया म्हणुन काही बहुजनवादी संघटनाही प्रतिदहशतवादाचे हत्यार वापरत आहेत. हे सारे आपल्याच भावी पीढ्यांचे भविष्य नासाडुन टाकत आहेत हे कधी लक्षात येणार?
एकीकडे तंत्रद्न्यानाच्या प्रगतीमुळे राष्ट्र ही संकल्पनाच सैल होत चालली असतांना आणि मुळात ही संकल्पनाच क्रुत्रीम असतांना तिचा उदो-उदो आणि अतिरेकी अभिमान भविष्यातील पिढ्यांना कितपत आकर्षित करनार आहे? त्यात जगात आज ज्या गतीने मानवी समुदाय एका राष्ट्रातून दुस-या राष्ट्रांत विस्थापित होत आहेत, त्यांच्या पुढील पिढ्यांना हेच लोक कोणता राष्ट्रवाद वा सांस्क्रुतिकता शिकवणार आहेत?
कि अजून कोणतातरी नवीन दहशतवाद शोधला जाणार आहे?
आणि त्यातून कोणत्या मुल्यांची जपणूक होणार आहे?
दहशतवादाचे हे अविरत भयावह साहचर्य मुलभूत मानवी प्रेरणांना मारक ठरत आहे. जीवनातील सहजपणा हरपत चालला आहे. मानवी परस्पर संबंध निकोप आणि मानवी पातळीवर न राहता न्रुशंस होत चालले आहेत. प्रत्येक जातीय/धर्मीय आपापले कंपु बनवत त्यातच आपल्या जीवनाचा अर्थ शोधत आहे, ध्येये व प्रेये शोधत आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवरही आपण आजच्या आधुनिक जगाचे हे कंपुवादी चित्र पाहू शकतो. प्रत्यक्ष जीवनात अनेक मित्र मुस्लिम असुनही हिंदुंचे फ़ेसबुकवर किती मित्र असतात? ब्राह्मण-ब्राह्मनणेतर कंपू, त्यांचे जातीनिहाय ऊप-कंपु या आधुनिक तंत्रद्न्यानाचेही एक प्रकारचे विडंबण करत नाहिहेत तर काय आहे? सन्माननीय अपवाद वगळले तर त्यांच्या पोस्ट्स हा त्यांच्या जातींचा/धर्मश्रद्धांचा/तत्वद्न्यानाचा/नायकांचा प्रचार करण्यासाठीच असतात...ईतरांच्या बाजू/श्रद्धेये समजावून घेण्याची क्वचितच परंपरा दिसते. उलट एकमेकांची श्रद्धेये हीनभावनेतुन बघत त्यांची कधी कधी अत्यंत अश्लाघ्य भाषेत नालस्ती करण्याची/अश्लाघ्य प्रतिहल्ले करण्याची परंपरा जोशात सुरू आहे. हे कदाचित पुरेसे उदाहरण वाटणार नाही...पण एक वास्तव हे आहेच कि पुरातन काळात मानवी समुदायांत जो टोळीवाद होता तो आजही पुरेपूर जिवंत आहे आणि तो भयावह आहे...कारण या स्वत:च निर्माण केलेल्या भिंती/कुंपने एकुणातीलच समग्र मानवी जीवनासाठी विघातक आहेत याचे कसलेही भान न बाळगता आपण वैश्विक नागरिक होण्याची वाटचाल बंद करुन नकळत स्व-बंदिस्त होत आत्मविकासाचा अंत घडवतो आहोत ही जाणीवच संपुष्टात येत आहे. ही नक्कीच काळजी करण्याची बाब आहे.
प्रश्न असा आहे कि या सा-याच दहशतवादांतून मानवी आस्तित्त्वाचे अखेर काय होणार आहे?
मुळात मानवी आस्तित्व म्हणजे काय आणि ते आपण गमावत आहोत म्हणजे नेमके काय होते आहे हे तरी लक्षात येत आहे काय हा एक प्रश्नच आहे.
"स्व" विषयक जाणीवा, नेणीवा, स्वीकारणीय जीवनमुल्ये, बाह्य घटकांना प्रतिसाद देण्यासाठी होणा-या सकारात्मक क्रुती ई.च्या एकुणातील समुच्चयातून मानवी आस्तित्व आकार घेत असते. हे आस्तित्व प्रगतिशील असते. म्हणजे गतकाळातील चुकांतुन शिकत त्या चुका टाळत उदात्त मानवी ध्येये गाठण्यासाठी होणा-या वाटचालीतुन मानवी आस्तित्व प्रगल्भ होत असते. हा धेयवाद नव्हे वा आशावाद नव्हे. हे असे घडने हेच मानवी अस्तित्वाचे नैसर्गिक निदर्शक आहे.
परंतू मानवी समाज जेंव्हा पुरातन काळापासुन अनैसर्गिकच वागण्याचा हेका धरून बसला आहे तेंव्हा काय करायचे? आधुनिक द्न्यान-विद्न्यानाच्या अवाढव्य परिघातही तो आपल्या आदिम प्रव्रुत्तींतून बाहेर पडु शकत नसेल, संकुचितच होत जात असेल तर काय करायचे?
आपण कोठेतरी गंभीर चूक करत आहोत हे नक्की!
या पार्श्वभुमीवर भविष्यातील जग हे अधिक सौहार्दमय असेल अशी आशा बाळगता येत नाही. जग जवळ येत जाईल हे खरे परंतू भिंतींची/कुंपनांची संख्या अपरंपार वाढलेली असेल. व्यक्ति-व्यक्तिंमधील संबंध तणावपुर्ण होत जात (तसेही आज ते होतच आहेत) त्याची परिणती ही नुसती व्यक्तिला एकाकी करून थांबनार नाही तर त्याला पुरेपुर हिंसक बनवून टाकेल. जी भाषा विकसीत करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी मानवाच्या पुर्वजांनी अपार कष्ट केले ती भाषाच अडखळेल...तिची गरज कमी होत जाईल कारण संवादच थांबला असेल...जो काही उरेल तो गरजेपुरता...आदिम भावनांच्या शमनापुरता संवाद. मानवी जीवनातील काव्य हरपलेले असेल. सौन्दर्य हरवलेले असेल. मानवी संबंध निव्वळ गरजाधारित होत जात द्वेष हाच जीवनाचा मुलाधार बनलेला असेल. हिंदू विरुद्ध मुस्लिम, मुस्लिम विरुद्ध ख्रिस्ती, ख्रिस्ती विरुद्ध ज्यू...ते...कंपनी विरुद्ध कंपनी, व्यक्ती विरुद्ध व्यक्ती, संघटना विरुद्ध संघटना, पिता विरुद्ध पुत्र...स्त्री विरुद्ध पुरुष अशा असंख्य परिमाणांत संघर्ष वाढत जाईल. शहरे विरुद्ध खेडी, शेतकरी विरुद्ध कारखानदार, भांडवलदार विरुद्ध साम्यवादी अशी बंडे घडु लागतील. असे घडण्याची बीजे आजच्या वर्तमानात आम्ही रोवलेली आहेतच! द्वेषाची लागण झालेली नाही अशी व्यक्ती आज सापडने अवघड होत चाललेच आहे...त्याची परिणती या भयावह वाटणा-या भविष्यात होनारच नाही याची खात्री कोणीएक देउ शकत नाही. आम्ही सारे नंग-चोट पिसाट होत चाललो आहोत. कदाचित असेच घडावे अशीच आमची लायकी असेल!
पण असे काही घडायचे नसेल, मानवी आस्तित्व ख-या अर्थाने बहरुन यावे असे वातत असेल तर आम्ही आजही बदलू शकतो...अजुनही वेळ गेलेली नाही. दहशतवादाच्या सर्वच रुपांना आम्ही तिलांजली द्यायला हवी...बस्स...एवढेच!
Sunday, March 13, 2011
Subscribe to:
Comments (Atom)
व्रात्य कोण होते?
हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...