Friday, January 16, 2026

आज वेळच तशी आली आहे म्हणुन....

आज वेळच तशी आली आहे म्हणुन बोलणे भाग आहे. मी मोहन भागवत अथवा आसारामबापुच्या विधानांवर प्रतिक्रिया का दिली नाही असा प्रश्न मला काही मित्रांनी विचारला म्हणून मी खालील मुद्दे मांडत आहे. १. पहिली बाब म्हणजे वैदिक महत्ता मानतात ते हिंदू नाहीत. नाहीत कारण वेद हे ९५% हिंदू समाजाच्या धर्माचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कधीही अंग नव्हते. त्यामुळे आपसूक मुर्ती-प्रतिमापुजक अवैदिक समाज हाच हिंदू आहे...वैदिक महत्ता मानणा-यांनी मेंढ्याचे कातडे पांघरुन हिंदु धर्मात घुसखोरी करण्याचे कारण नाही. मोहन भागवत अथवा आर.एस.एस. ही वैदिकमहत्ता मानणारी संस्था असल्याने तिचाही हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. २. जे आमच्या धर्माशी संबंधीत नाहीत त्यांना आमच्या धर्माबाबत वेडगळ विधाने करण्याचा काडीइतकाही अधिकार नाही. कपडे आम्ही कशी घालत होतो याची चित्रे आजही अजंठा चित्रसमुहात मिळतात...म्हणुन बलात्कार होत होते काय? तरुण्याला मुक्तता देनारा, स्वातंत्र्य देणारा "वसंतोत्सव"" आम्हीच दहाव्या शतकापर्यंत साजरा करत होतो, बलात्कार झाले का? ३. वैदिक संस्कृतीत इंद्राने मात्र वारंवार बलात्कार केल्याची उदाहरणे वारंवार मिळतात...याचे रहस्य समजू न शकणारे आम्ही बहुजन बावळट आहोत काय? ४. आम्हे शैव आहोत. शिवाने केवळ मदनाने पार्वतीसाठे कामूक व्हावे म्हणुन कामबाधा निर्माण करणारा बाण चालवला तर शिवाने तृतीय नेत्र उघडून मदनालाच जाळून टाकले. आम्ही अशार्थाने शैव आहोत. वैदिक इंद्रासारखे अजरामर कामूक आणि वखवखलेलो नव्हेत! ५. वैदिकांचे आपल्या धर्मावरचे अतिक्रमण झुगारा अन्यथा ते धर्म आणि संस्कृतीच्या नांवाखाली तुम्हाला एक दिवस वैदिकाश्रयी गुलाम बनवतील आणि आजही त्यांना अर्धवट जमलेले काम पुर्ण करुन तुम्हाला विषमतेच्या काळडोहात फेकून देतील. (जसे आजवर त्यांनी प्रयत्न केले तसे) ६. मोहन भागवत अथवा कोणीही वैदिक जेंव्हा हिंदू धर्माबाबत बोलतात तेंव्हा ते खोटेपणाचा कळस गाठत असतात. बहीण-भावाचे, आई-मुलाचे नाते यांना व गाय-वृषभाला महत्ता देणारे आपण हे विसरतो कि या वैदिकांच्या संस्कृतीचा यांशी काडीइतकाही संबंध नाही. नव्हता. पण हेच आज आमचीच संस्कृती त्यांचीच म्हणुन सांगतात, वेडपट तर्क देतात. ते आमच्या धर्माचे कसे? उदा. सावरकर गाय हा उपयुक्त पशू आहे असे म्हनतात ते त्यांच्या गवालंभ यज्ञ करणा-या संस्कृतीशी सुसंगतच नाही काय? वर हे सांगनार-सावरकर विज्ञाननिष्ठ होते. असे असेल तर मग गाय-बैलांना यज्ञासाठी ठार मारणारे आणि खाणारे पुरातन वैदिकही केवढे विज्ञाननिष्ठ असले पाहिजेत बरे? उपयुक्त पशु नाही काय? ७. वृषभाच्या आदरयुक्त मुद्रांची रेलचेल सिंधु संस्कृतीच्या उत्खननांत आहे. आम्ही त्याच असूर संस्कृतीचे वारसदार आहोत कारआण आम्ही मुर्तीपुजक आहोत. यज्ञ ही काही आमची संस्कृती नाही. मग आम्ही जे आमचे नाही त्या संस्कृतीच्या लोकांना आपल्यात का घेतले? आजही का घेत आहोत? हाकला त्यांना या हिंदू धर्मातुन जे वैदिक आहेत. ८. वैदिकांची पोट भरण्याची आपण व्यवस्था केली. त्यांच्यावर विश्वास ठेवला कि ते आपला धर्म जपतील...पाण त्यांने त्यांचाच धर्म जपला ही त्यांचे नव्हे आपली चुक आहे. ख्रिस्त्याला कोणी मशीदीचा इमाम बनवते काय? पण ज्या वैदिकांनी शिव वगैरे आपली दैवते अनार्य ठरवली, म्हणे पावन करुन घेतली, मग ते आमचे इमाम आम्ही केले कसे? ९. वैदिकांचा आमच्या धर्माशी संबंध नाही. जेही कोणी वैदिक संस्कार करुन घेतात ते हिंदू नाहीत तर वैदिक आहेत. आणि हिंदू धर्माशी वैदिकांचा ना तत्वज्ञान, ना कर्मकांड ना आचारधर्म...संबंधच नाही तर मग ते हिंदू कसे? १०. मोहन भागवत ते आसारामबापु ते वैदिक महत्ता मानणारे हिंदू नाहीत. ते कधीही नव्हते. त्यांच्या संघटना या केवळ वैदिक धर्माच्या प्रसारासाठी आहेत. त्यांना स्त्रीयांना दुय्यम ठरवण्याची हौस आहे. मग आम्ही जगदंबेला जगन्माता मानतो त्याशी हे वैदिक तत्वज्ञान विरोधी नाही काय? हे तर स्त्रीला भोग्यच मानतात! यांचा इंद्र तर वृंदा असो कि अन्य कोणी...भोगायलाच जातो कि नाही? ११. आमची दैवते, मग खंडोबा असो कि शिव...सती असो कि पार्वती...कधी असले उद्योग केल्याची किमान दंतकथा तरी आहे काय? १२. हे वैदिक लोक मुळात भोगवादी आहेत हे अगदी पुराणकथांतुनही सिद्ध होते. ऋग्वैदिक तत्वज्ञानही भोगवादी आहे. आमच -हास यांच्या तत्वज्ञानाच्या प्रभावखाली जात असल्याने होतोय. १३. मित्रहो, वैदिक समजणा-यांना प्रथम हिंदू धर्मातून हाकला. एक तर तुम्ही वैदिक आहात नाही तर हिंदू आहात. जर तुम्ही वैदिक आहात तर तुमचाच धर्म तुम्हाला मुर्तीपुजेची परवानगी देत नाही. हेही महित नसेल तर माहित करुन घ्या. आम्ही मोकळेपणे कबूल करतो कि होय, आम्ही मुर्तीपुजक आहोत! आम्ही आत्मपुजक आहोत...आम्ही योगाला मानतो कारंण आदिनाथ शिव हा योगाचा मुख्य प्रवर्तक आहे हे आम्हालाच नाही...तुम्हालाही नाईलाजाने का होईना मान्य आहे. थोडक्यात वैदिक महत्ता ज्यांना गायची त्यांनी खुशाल गावी...पण मग स्वत:ला हिंदू म्हणुन घेवू नये. आजवर आम्ही तुमच्या अनैतिहासिक बाता ऐकल्या आता त्या ऐकल्या जाणार नाहीत. आम्हाला आमचा धर्म माहित आहे आणि तो आम्ही इमानदारीने पाळतोय...आमची कोनतीही इष्ट देवते असो तिची पुजा करतोय...तुम्ही उलट स्वधर्म घातकी आहात! अरे कोणत्या तुमच्या घरात गृहाग्नी असतो बरे? कोण इंद्र ते अदितीला आप्ल्याच घरात स्थान देतो बरे? किती लोकांचे कुलदैवत ईंद्रादि वैदिक दैवते आहेत बरे? नाहीत ना? मग कशाला त्या धर्माला हिंदू म्हणुन आमच्यावर लादायचा प्रयत्न करता? सिंधुचा हिंदु झाला. ठीक आहे. आमच्या संस्कृतीचे ते पुरातन अवशेष आहेत. काय फरक पडतो? पण वैदिकाश्रयी लोक हिंदू नाहीत. कधीही नव्हते. हे मोहन भागवत काय कि आसारामबापु काय...जर हिंदुच नाहीत पण तरीही स्वत:ला हिंदू समजतात तर अशांना धर्माबाहेर आपणच हाकलून द्यायला नको काय? होय...अशा वैदिकाभिमानी लोकांना, त्यांच्या धर्माचा आदर ठेवत त्यांना हिंदू धर्माबाहेर हाकललेच पाहिजे. आणि ही प्रक्रिया आता जोरात सुरू होईल याची वैदिक समजणा-यांनी खात्री बाळगावी!

No comments:

Post a Comment

आज वेळच तशी आली आहे म्हणुन....

आज वेळच तशी आली आहे म्हणुन बोलणे भाग आहे. मी मोहन भागवत अथवा आसारामबापुच्या विधानांवर प्रतिक्रिया का दिली नाही असा प्रश्न मला काही मित्रांनी...