Sunday, March 20, 2011

जैतापुर...त्सुनामी...आणि ही कविता...असली तर...

ही शक्ति नको तशी शक्ती नको
एन्रोन नको कि जैतापूर नको
कोळश्याची वीज नको
कि वायूची नको...
प्रदुषण नको कि
जीवाचा धोका नको...
किमान येथे
मी राहतो त्या परिसरात तर नक्किच नको...!

बघा कि दुसरी जागा...

पण वीज हवी...
लोड शेडींग नको...
शेतकर्यांवर अन्याय नको,
शहरवाल्यांवर तर आजिबात नको...
वीज गेली तर वीज मंडळापासुन सर्वांना
शिव्या द्यायची वेळ नको...
वीज नाही...
तर महासत्ता कधी होणार बाळांनो?
चला, वीज हवी...हवीच...

पण अशीही नको नि
तशीही नको!

प्रदुषण होणार...
रोज जो-तो गाड्या घेतोय तो काय
हवेत
सोडतोय सुगंध
वातावरण पवित्र करायला?
म्हणे जमीनी नापिक होतील..
नालायकांनो...
भरमसाठ पाणी आणि रासायनिक खते वापरून लाखो हेक्टर जमीन
नापीक करताय ते कोणत्या अडानचोट पर्यावरणवाद्यांना विचारून?
बघा स्वतालाच विचारून!

म्हणे समुद्र नासेल...मासे मरतील...
तसेही भरमसाठ मासेमा-या करून
ठेवलेच आहे काय त्या रत्नाकराच्या उदरात?
होताहेत तशाही लाखो समुद्र-प्रजाती नष्ट...
आहे काही करुणा त्यांच्याबदल तुमच्या ह्रुदयात?

जलविद्युत उर्जाप्रकल्प करावेत...
पण म्हणे धरणे नकोत...
धरण करा पण विस्थापने नकोत...
आदिवासी बिचारे दुर्लक्षित...
येतात यांच्यामुळे उजेडात...
क्षणभर नियतीशी तडजोड करत...
जगावेच लागते त्यांना
मिळेल ते घेत...
आणि हे
गळ्यापर्यंत पाणी येईपर्यंत
जलसमाधीची आंदोलने करणार
आणि तरीही शेतीला पाणी हवे आणि
वीज हवी ही बोंब हेच मारणार...
म्हननार "नाहीतर महासत्ता तुम्ही कसे बनणार?"
खराय...
पण मग वीज काय आभाळात जावून बनवणार?

खाटल्यावर जवळपास मरतात सारे
म्हणुन खाट कोणी सोडत नाही...
रस्त्यावर मरतात काही
म्हणुन रस्ता कोणी त्यागत नाही...
पण मरणाची काल्पनिक दाखवून भीती
हे दल्ले
आपला धंदा सोडत नाही!

सत्याशी यांचे मन करत नाही ग्वाही
असते मिरवायाचे
जन-हित-समाजप्रेमी लवलाही
पण जरा विचारा त्यांना
विकत तुम्हा कोण घेई?

हे खरेच आहे निसर्ग
करणार तयाची मनमानी
लाखो वाहुन जाती प्रतिवर्षी
महापुर...ढगफूटींतुनी
भुकंप-दुष्काळांतुनी...
कधी मरतो आपण क्रुत्रिम रोगरायांनी...(जसे स्वाईन फ़्ल्यु मधुनी...)
मरनाची मानवी यंत्रे असता एवढी कार्यरत अविरत...
भय निसर्गाचे का मग?
तक्रार कशाची अन कोणाची
निसर्गाची कि
मानवी स्वार्थांची?

म्हणे नको अणुवीज प्रकल्प
जपान उदाहरण किती उपयुक्त
अरे भाट अन मुर्खांनो
येतो काळ कधी का सांगत?
तुम्ही भाट स्व-स्वार्थाचे...
काळ तुम्हा कधी कळे काय?

नपुंसक आधीच झाले हे सगळे
दाखवती भीती नपुंसकत्वाची
प्रगती हवी म्हणे हेच
हे वांझ प्रगतीवादी...

एन्रोन हवेही होते
एन्रोन नकोही होते
मार्क रीबेकाच्या
गळमीठीत अडकले होते...
एन्रोन नकोही होते
एन्रोन हवेही होते
कोकणाच्या प्रगतीची
हे स्वप्ने दाखवत होते
उरलेल्या वीज ग्राहकांना हे
स्वप्ने दाखवत होते.

कोकणी नेहमीप्रमाणे
आळशी अनुद्योगी
कधी याच्या तर कधी त्याच्या
पाठीशी लागत होते
न करता काही ज्याना
हवी असते प्रगती
त्यांची वाट लागते ऐशी
आहे जगताची नियती...

आता जैतापूर नको जे म्हनती
पण जमीनीचे भाव वाढवून बसती
गुंड, पुंड, दल्ले अन
राजकिय हिजडे बोकांडी बसती
जो तो उठतो अन बनतो
अणु-तंत्रद्न्य
पाजळतो आपुली अक्कल
आता तर आहे जपानी
त्सुनामीचे भयकारी उदाहरण!

पण एक बाब ध्यानी ती घ्यावी
निसर्गाची त्सुनामी परवडली
या वेड्यांची त्सुनामी नाही
अपघात घडती नित्य...
कधी निसर्ग नियमांनी
तर कधी मनुष्यनिर्मित चुकांनी
हा धर्म मानवाचा
कि चुका दुरुस्त करुनी
वेग वढवा प्रगतीचा.

पण म्हनाल हेही नको...
करा...
पण आमच्याकडे नको..
पण हवे आम्म्हाला हेही...
आणि नको आम्हाला हेही
मग
तुम्हीच शोधा काही
उर्जेवीण जगायची रीत...

जगत होता मानव
या क्रुत्रीम जीवनाव्यतिरिक्त
कशा हवी तुज वीज
कशास हवी तुज कार?
का जगत नव्हता सुखपुर्ण
भूतकाळी आपला पुर्वज?
का हवे तुला मग अवघे
जगण्याचे अविरत वैभव...
हे नको...ते नको...
असेही नको
नि तसेही नको
म्हनण्याचे स्वातंत्य्र?

अरे दांभिका...
तसाही तू मरणारच आहेस...
असाही तू मरतच आहे कणाकणाने...
तूला सारे काही हवे आहे..
आणि हव्याच्या हव्यासात
तू स्वता: कोठे आहेस?


तुला नेमके काय हवे हे ठरवशील....प्लीज?

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...