Saturday, June 4, 2011

भारताला वंश-विच्छेदात्मक कत्तलींचा धोका आहे काय?

जगाचा इतिहास हा वांशिक हिंसाचाराच्या अनगिनत घटनांनी भरलेला आहे. त्यात भारतीय समाजही पुरातन काळातही मागे राहिलेला नव्हता हे आपंण महाभारतातील क्रुष्नार्जुन जोडीने खांडववनातील नागवंशीयांची कशी कत्तल केली या उदाहरणावरुन व नंतरच्या जनमेजयाच्या सर्पसत्रावरुन बघू शकतो. हे नाग म्हणजे खरोखरचे सर्प नव्हते, तसे असते तर जरत्कारू या ऋषिने नाग स्त्रीशी विवाह केला नसता हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे या घटना या वंशसंहाराच्याच होत्या असे म्हणता येते. पण येथे वंश आणि संस्क्रुती, वा दोन धर्मांतील द्वेषमुलक रक्तपात एवढ्याच मर्यादित अर्थाने वांशिक विद्वेशाची तुलना करता येत नाही. वांशिक विद्वेषांच्या मागे बौद्धिक, शारीरिक, वर्णीय श्रेष्ठत्वाची, संस्क्रुतीवरील स्वामित्व हकाची भावना असते. युरोप-अमेरिकेतील गो-यांचा काळ्यांविरुद्धचा रोष आजही जिवित असून गोरे हेच काळ्यांपेक्षा बुद्धीने श्रेश्ट असतात, एव-तेव काळ्यांना दुय्यमच स्थान दिले गेले पाहिजे असे भ्ह्रामक संशोधनही पसरवले जाते. कु-क्लक्स-क्लानसारखी दहशतवादी संघटना आजही काळे व ज्युवंशीयांविरुद्ध हिंसाचार घडवून आणत असते. दक्षीण आफिरेकेतील वर्णद्वेशी हिंसाचार व अत्त्याचार आपण विसरु शकत नाही. हिटलरने तर त्या वंशद्वेषावर कळस चढवून ज्युंचे अमानुष छळ व सरसकट कत्तली केल्या तो आजही जगाच्या इतिहासावरील एक कलंक आहे.

वंश: एक भ्रामक संकल्पना:

वंश विभेदाची भ्रामक भावना ही पुरातन काळापासून मानवी समाजात रुजलेली आहे. मंगोलाईड, काकेशियन, नोर्डिक, द्राविडियन, आस्ट्रेलाईड इ. अशी विभाजनेही मानववंशशास्त्राच्या सुरुवातीला १७व्या शतकात होवू लागली. पुढे होमो सेपियन या पुर्व आफ्रिकेत जन्मलेल्या आद्य गटातील मानव जगभर सर्वत्र पसरला असा एक सिद्धांत पुढे आला. अर्थात हा सिद्धांत सर्वमान्य झालेला नाही. मानवजाती वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रात स्वतंत्रपणे उत्क्रांत झाल्या असाही सिद्धांत आहे. प्रत्येक मानव हा ज्या ज्या भौगोलिक क्षेत्रात स्थिर झाला तेथील पर्यावरणाचा, खाद्य संस्क्रुतीचा पिढ्यानुपिढ्या परिणाम होत आज हे वर्ण, उंची, कवटी व जबड्याची रचना ई. शारिरीक घटक विकसीत होत गेले व त्याचा परिणाम त्या त्या समुदायांच्या संस्क्रुती-विकसनावरही होत गेला असे म्हणने क्रमप्राप्त आहे. त्यामुळे वंश ही सकल्पनाच बाद होते. १९५२ ला जिनेव्हा येथे भरलेल्या मानववंशशास्त्रद्न्यांच्या परिषदेत हे प्रथम जाहीर केले गेले.

असे असले तरी वंशवादी मंडळी गप्प बसली नाही. वंशाच्या आधारावर इतरांवर स्वामित्व गाजवण्याचा, त्यांना संपवून टाकण्याचा प्रयत्न नेहमीच होत असतो. वांशिक हिंसाचारात खालील टप्पे पडतात:

१. आम्ही आणि इतर ही विभागणी: वंश-धर्म-जात या आधारावर समाजाची वाटणी करणारे तत्वद्न्यान प्रस्रुत करणे आणि स्व-श्रेष्ठत्वाचा डंका पिटत इतरांची अवहेलना सुरू करणे. विद्वेश पसरवण्यास सुरुवात करणे.
२. इतर गटांचे सामाजिक आस्तित्व नाकारायला सुरुवात करत त्या इतर गटाला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न करणे.
३. द्वेषाधारित संघटनेचे स्थापन करत, त्यांच्या सदस्यांची प्रत्यक्ष हिंसेसाठी योजनाबद्ध रितीने मानसिकता तयार करणे.
४. इतर गटांच्या विरुद्ध हिंसक घोषणा देत त्या गटामद्धे भयभीतता निर्माण करणे.
५. समविचारी सत्तेत घुसवणे व त्यांचा उपयोग करून घेणे वा सत्ता मिळवुन मगच प्रत्यक्ष कारवाई सुरु करणे.
६. त्या गटातील प्रत्यक्ष बळी निश्चित करणे. त्यांची हत्या करण्यासाठीची कारणे निश्चित करणे आणि प्रत्यक्ष कार्यवाही करणे. असे करणे हा गुन्हा नसुन ते कर्तव्यच आहे असे सिद्ध करत राहणे आणि गुन्ह्याचे समर्थन करणे.

भारतात "आम्ही आणि इतर" अशा अनेक विभागण्या आधीच झालेल्या आहेत हे आपल्या लक्षात येईल. वरील तप्पे काहींनी पार करायला आधीच सुरुवात केली आहे तर काही संघटना प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या निकट पोहोचल्या आहेत असेही दिसुन येईल.

मुस्लिम हा "इतर" आणि हिंदू हा श्रेष्ठ या संकल्पनेवर आधारित आर.आर.एस, सनातन प्रभात, बजरंग दलादि संघटना मुस्लिमांवविरुद्धच्या हिंसेचे अविरत समर्थन करतांना दिसतात. गुजरात मद्धे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली आहे. ती हिंसा समर्थनीय आहे यासाठी मुस्लिमांना काळ्याकुट्ट रंगात रंगवणे, त्यांच्यामुळे देश व संस्क्रुती कशी धोक्यात आलेली आहे हे आपल्या लोकांच्या मनावर बिंबवणे हे कार्य होतच आहे. या संघटना जसजशा प्रबळ होत जातील तसतसे हिंसचाराचे प्रमाण वाढत जाइल हे उघड आहे.

त्याउलट इस्लाम हाच श्रेश्ठ आहे, हिंदू काफिर हेच इस्लामचे मुख्य शत्रू आहेत आणि भारताचा पाकिस्तान करू त्यासाठी जमेल तेवढ्या हिंदुंना ठार मारायला हवे या तत्वद्न्यानावर आधारित भारतात सिमि ते मुजाहिदीन असे असंख्य वंश-उच्छेदाला तयार गट आहेत आणि असंख्य क्रुत्यांतुन त्यांनीही हिंसाचार केलेला आहे.

यामागे परस्परांनी एकमेकांना भयभीत करणे, एकत्र व्हायला भाग पाडने आणि द्वेष करायला लावणे हे टप्पे कधीच ओलांडलेले आहेत.

आम्ही आणि इतर ही द्वेषमुलक विभागणी वंशसंहाराला कारण ठरायला सुरुवात होते ती अशी.

ब्राह्मणविरुद्ध मुलतत्ववादाची भर!

भारतात आधीच धार्मिक विद्वेशावर आधारित वंश उच्छेदाचे तत्वद्न्यान फोफावत असता, त्याचे परिणाम म्हणुन हिंसाचार होत असता, एका नवीन मुलतत्ववादाची भर यात पडलेली आहे आणि त्यावरही गहन चिंतनाची गरज आहे. हा मुलतत्ववाद आहे ब्राह्मणांविरुद्धचा. त्याने मी वर विषद केलेले वांशिक हिंसाचारासाठी आवश्यक असणारे बरेचसे टप्पे ओलांडलेले आहेत म्हणुन त्याची दखल घेणे आणि त्यामागील कारणे शोधणे क्रमप्राप्त आहे.

वंशसंहारासाठी आधी आम्ही आणि इतर अशी वाटणी सर्वप्रथम आवश्यक असते. त्यासाठी मुलभुत तत्वद्न्यानाची गरज असते...

ते असे आहे:

१. ब्राह्मण हे युरेशियन आहेत. आर्य वंशीय आहेत. या भिन्नवंशीय आक्र्मकांनी येथील मुलनिवासी भुमीपुत्रांना पराजित करून त्यांच्यावर धार्मिक सत्ता लादली त्यामुळे त्यांचे समुळ उच्चाटन करुन प्रुथ्वी नि:ब्राह्मणी केली पाहिजे.
२. भारतातील आजच्या सा-या समस्यांचे मुळ ही ब्राह्मणी व्यवस्था आहे आणि ती संपवली पाहिजे.
३. ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला आहे त्यामुळे बहुजनीय महनीय महापुरुषांचे खरे चित्र समोर न येवु देता ते डागाळले गेले आहे. अनेकांना इतिहासातून पुसुन टाकले आहे तर काहींना पुरते बदनाम केले आहे.
४. ब्राह्मणांनी स्वतांच्या वंशात जन्मलेल्या क्षुद्र माणसांनाही महान बनवले आहे, बहुजनीयांच्या बोकांडी बसवले आहे, काहींना बहुजनीय महापुरुषांचे पित्रुत्व बहाल केले आहे, त्यामुळे इतिहासातुन त्यांची हकालपट्टी केली पाहिजे.
५. शिवाजी महाराजांना ब्राह्मणांनी विष देवून मारले, संभाजी महाराजांची हत्त्या मनुस्म्रुतीप्रमाणे करायला भाग पाडले. महात्मा बळीचा खुन केला. त्यामुळे ब्राह्मण संपवलेच पाहिजेत.
६. बहुजनांचा धर्म हिंदू नसून ती वैदिक ब्राह्मनांनी केलेली चाल आहे.

असो ही यादी बरीच मोठी आहे, परंतु वंशसंहारासाठी जे तत्वद्न्यान हवे असते ते उपलब्ध केले गेले आहे हे उघड आहे. यामागे ब्राह्मणांच्या गतकाळातील आणि काहींकडुन वर्तमानातही होणा-या चुका कारणीभुत आहेत हेही अमान्य करता येत नाही. पण सर्वच समाजघटकांकडुन चुका घडलेल्या आहेत, हे मान्य करत त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी जो विद्वेषाचा कहर वाढवला जातो आहे तो मात्र चिंता करण्यासारखा आहे.

या कोणत्या संघटना आहेत?

प्रस्तुत लेख मी महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवत असल्याने येथील संघटनांबाबत लिहितो आहे. बामसेफ (वामन मेश्राम गट), भारत मुक्ति मोर्चा, मराठा सेवा संघ आणि तिचीच उपशाखा म्हणजे संभाजी ब्रिगेड येथे विचारार्थ घेतल्या आहेत. हिंदु धर्मच नाकारला असल्याने त्यांनी स्वतंत्र शिवधर्मही स्थापन केला आहे. ब्राह्मणांना त्यात प्रवेश नाही हे ओघाने आलेच. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री पुरुषोत्तम खेडेकर असून संभाजी ब्रिगेड ही त्यांची आर.एस.एस. च्या बजरंगदलासारखी लढावू शाखा आहे. जेम्स लेनने लिहिलेल्या पुस्तकात जिजाउंची बदनामी झाल्याने त्यावर महाराष्ट्रात वादळ उठले. ब्रिगेडने भांडारकरवर हल्ला केला आणि ब्रिगेड प्रकाशझोतात आली. लालमहालातील दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरण ब्रिगेडने लावुन धरले आणि त्याला काही ब्राह्मण वगळता सर्वच इतिहाससंशोधकांचा पाठिंबा होता कारण खरोखरच दादोजींचे शिवचरित्रातील स्थान नगण्य होते. प्रस्तुत लेखकानेही दादोजींबाबत विस्त्रुत लेख लिहिला होता आणि त्याचा वापरही त्यांना झाला. परंतु दादोजी पुतळा हटवल्यानंतर मी आव्हान केले होते कि या विजयातून उन्माद येवू नये...पण तसे व्हायचे नव्हते. त्यांनी शनिवार वाडा म्हणजेच लालमहाल आणि रायगडावरील शिवस्मारकासमोरील वाघ्याचे स्मारक हा शिवरायांचा (होळकरांचाही) अवमान करणारा ब्राह्मणी कावा असे सांगत वाघ्याचा पुतळा हटवा अथवा तो उद्वस्त केला जाईल असा इशाराही दिला. प्रस्तुत लेखकाने या प्रकरणाबाब्त सविस्तर अभ्यास करून वाघ्याचे स्मारक हटवण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण नाही, शिवचरित्रात लिखित नसला तरी त्यांच्याच काळात यादवाड (कर्नाटक) येथे बनवलेल्या शिल्पात कुत्राचे अस्तित्व स्पष्ट दिसते हे सिद्ध केले. परंतू विरोधी पुरावा (म्हणजे त्यांना न पटणारा) दिला कि त्याला बामणांचा दल्ला, भडवा इ. शेलकी विशेषणे प्रस्तुत लेखकाला खावी लागली.

असो, हे जरा विषयांतर झाले. दहशतवाद हा नेहमीच हिंसक नसतो. तो इतरांचे मानसीक खच्चीकरण करणे, भयभीत करणे, बदनाम करणे अशा माध्यमांतुनही वापरला जात असतो. ब्राह्मणाविरुद्धचा द्वेष हा आता धोक्याची पातळी ओलाडत आहे हे मात्र खरे.

भारत मुक्ति मोर्चाचे सर्वेसर्वा देशातील सर्वच स्थीति-दुस्थीतीला युरेशियन ब्राह्मणांना दोषी ठरवत असतात. ब्राह्मण हे युरेशियातुन आले आहेत हा त्यांचा आणि अर्थातच त्यांच्या अनुयायांचा लाडका सिद्धांत आहे. त्यांच्या मुलनिवासी नायक या दैनिकातुन ब्राह्मणविद्वेष नाही असा एक दिवस जात नाही. त्यांच्या प्रकाशनाने अशी शेकडो पुस्तके प्रसिद्ध केलेली आहेत. त्यासाठी डी.एन.ए. संशोधनालाही वेठीस धरत ब्राह्मण हे परकीय (युरेशियन) वंशाचे आहेत हे सिद्ध झाल्याचा दावा ठामपणे केला जातो. मायकेल बामशाद या शास्त्रद्न्याचे संशोधन तोडफोड करून मांडले जाते. (पहा- डी.एन.ए. अनुसंधान, ले. वामन मेश्राम आणि प्रा. पी. डी. सत्यपाल.) जेनोम प्रकल्प हा मुळात वांशिकी नसून आनुवांशिकी ठरवण्यासाठी असतो याचे मुलभुत द्न्यान लपवले जाते. या सा-याचा एकत्रित परिणाम म्हणजे ब्राह्मण हे भिन्न वंशीय आहेत, आक्रमक आहेत आणि मुलनिवासींच्या अस्मितेवर घाला घालणारे आहेत आणि त्यामुळेच त्यांची हकालपट्टी व्हायला पाहिजे असे त्यांचे म्हनणे आहे.

मराठा सेवा संघाचेही स्वतंत्र मासिक आहे तसेच "जिजाउ प्रकाशन" ही संस्था आहे. या प्रकाशन संस्थेमार्फत ब्राह्मणद्वेशाने ओतप्रोत अशी असंख्य पुस्तके प्रसिद्ध होत असतात.

वंशसंहाराच्या पहिल्या पाय-यांत आम्ही आणि इतर अशी विभागणी प्रथम करावी लागते. ती येथे झालेली आहे. ब्राह्मण हा ब्राह्मणच असतो, तो बहुजनांचा एकमेव शत्रुच असतो आणि त्याला नष्ट करणे हेच प्रथम कर्तव्य आहे अशी विभागणी झालेली आहे आणि त्यासाठी तत्वद्न्यान बनलेले आहे. पुढची पायरी असते ती ही कि लढावु संघटन बनवणे आणि त्या मानसिकतेचे तरुण तयार करणे...तेही झालेलेच आहे. कारणांची कमतरता नाही. अनेक कारणे स्वत: ब्राह्मणांनी देवून ठेवलेलीच आहेत आणि अन्य तयार करता येतात. ही फासिस्ट पदद्धत यथायोग्य राबवली जात आहे. आणि तिचा उद्रेक होणार नाही असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. ते कसे हे मी आता येथे स्पष्ट करतो.

"शिवरायांच्या बदनामीची केंद्रे"-ले. श्री. पुरुषोत्तम खेडेकर

ब्राह्मणांविरुद्धचे मराठा सेवा संघाची अनेक पुस्तके आहेत. स्वता: श्री. खेडेकरांची जवळपास ५६ पुस्तके आजवर प्रसिद्ध झालेली आहेत. त्यातील अनेक पुस्तकांत त्यांनी पुर्वी ब्राह्मण तसेच ब्राह्मण स्त्रीयांबद्दल लिहिले होतेच परंतू १३ नोव्हेंबर २०१० रोजी जिजाऊ प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे" या पुस्तकातील मजकूर लेखाच्या प्रतिपाद्द्य विषयाच्या अनुषंगाने चर्चणे आवश्यक आहे.

या पुस्तकातील पहिला अश्लाघ्य मजकुर येतो तो पान क्र. ३३ ते ३७ यावर. तो सर्वस्वी अश्लाघ्य आणि ब्राह्मनच नव्हे तर अखिल स्त्रीजातीचा अवमान करणारा आहे. येथे सर्वच मजकुर जागेअभावी देता येणे शक्य नाही (आणि कोणताही सुसंस्क्रूत मनुष्य ते वाचुही शकणार नाही...तरी त्यातील ठळक मुद्दे असे...

१. मराठ्यांना ब्ल्याकमेलिंग करून, समाजापासुन तोडुन एकाकी करायचे आणि त्यांचे दु:ख हलके व्हावे म्हणुन तरून वा मध्यम वयाच्या ब्राह्मण स्त्रीयांना त्यांन मिठीत घ्यायला लावून त्यांना पुरते नागवायचे.
२. ब्राह्मण पुरुष हे नपूसक, विक्रुत, बेईमन असअतात यावर जागतीक वंशशास्त्रद्न्यांचे एकमत असून तो आपल्या स्त्रीयांचे समाधान करण्यात असमर्थ असतो. त्याच्यामधे समलिंगीपणाचे प्रमाण सर्वाधिक असते.
३. अनेक ब्राह्मण घरांत एकच मराठा-बहुजन पुरुष सासु-सुन-मुलगी अशा तीन-तीन पिढ्यांतील स्त्रियांचे लैंगिक समाधान करण्यात गुंतलेले असतात.
४. आजही चित्पावन-द्कोकणस्थ ब्राह्मण आपली बायको सहजतेने दुस-याच्या कुशीत देतो आणि उशीत तोंड खुपसून बघत रहातो.
५. शरांतील वेश्या व्यवसाय कमी होण्यास ब्राह्मण स्त्रीयांची ही लैंगिक कुचंबना आहे.

असो. यापेक्षा अधिक लिहिता येत नाही. वाचायचे त्यांनी मुळातुनच वाचावे. पण या लेखनामागे नेमका काय उद्देश आहे हे समजावून घेणे गरजेचे आहे. मी याला विक्रुती मानत नसून द्वेशाधार वाढवण्याची, "इतर" घटकात मुद्दाम प्रतिक्रिया उमटवण्याची खेळी मानतो. प्रतिपक्ष जीही प्रतिक्रिया देतो त्यावरचे उत्तरही तयार असते. याच मजकुराबाबत बोलायचे झाल्यास झी २४ तास या व्रुत्तवाहिनीवर या मजकुराबाबतच चर्चा झाली होती त्यात संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्री. श्रीमंत कोकाटे यानी म्हटले कि ब्राह्मणांनी पुर्वी वेद ते पुराणांत बहुजनीय स्त्रीयांचा अवमान केला आहे, दास विश्रामधामात "बहुजनांत कोणी श्रेष्ठ निपजला तर तो नि:संशय ब्राह्मण बीजापासुन झाला असे मानावे." असे म्हटले आहे...आधी ते जारे जाळा मगच आमची चूक असेल तर आमचे साहित्य आम्ही जाळुन टाकू.

कट्टरपंथीय मराठ्यांना (बहुजनांना नव्हे, मराठे हे बहुजनीय नाहीत...त्यांनी भांडुन का होईना वर्णव्यवस्थेत क्षत्रियाचे स्थान मिळवले आहे.) पटेल असेच हे उत्तर आहे कारण मुळात मुळ वेद-पुराणे वाचण्याचे कष्ट किती जणांनी घेतलेत आणि त्याचा खरा ऐतिहासिक अन्वयार्थ किती जणांनी लावला हा एक प्रश्नच आहे. पण यातून आम्ही श्रेश्ठ कसे आणि ब्राह्मण पुरुष हे षंढ असून त्यांच्या स्त्रीया मात्र उपभोग्य आहेत असे जाणीवपुर्वक लिहून वंशौच्छेदाच्या कार्यक्रमाला एक कारण दिले आहे. पुरातन काळी बव्हंशी टोळीयुद्धे स्त्रीयांसाठीच होत. पुरुषांची कत्तल करून स्त्रीया पळवून आणल्या जात. तोच प्रकार येथे आहे आणि तो कसा हा पुढील परिछ्छेदातुन आपल्या लक्षात येईल.

ब्राह्मण-कत्तलीची योजना

याच पुस्तकात प्रुष्ठ क्र. ५४ व ५५ वर श्री. खेडेकर आवाहन करतात...(असेच आवाहन मुजाहिदीन वा सिमिने हिंदुंबद्दल केले असते तर केंद्र सरकारची प्रतिक्रिया काय असती?)

"अशा अवस्थेत सुबुद्ध व प्रशिक्षित मराठा युवकांनाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी जाणीवपुर्वक मराठा समाजालाच धार्मिक जातीय दंगल घडवून आणावी लागेल. अशा धार्मिक वा जातीय दंगलीचे पूर्ण नेत्रुत्व मराठा समाजालाच करावे लागेल; तर सुधारणा क्रांती परिवर्तन समाजात शक्य आहे. अशी सुनियोजित धार्मिक व जातीय दंगल घडवून आणण्यासाठी मराठा समाजाने इतर सर्वच बहुजन समाजाला, मुसलमानांना, ख्रिस्चनांना, बौद्धांना, जैनांना, शिखांना, आदिवासींना इत्यदी सर्वच ब्राह्मणेतर-आर्येतर समाज घटकांना विश्वासात घेवून सोबत घ्यावे लागेल. त्यांचे प्रबोधन करावे लागेल. त्यांच्यासमोर ब्राह्मण हाच एकमेव मानसिक, बौद्धिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, जातीय शत्रू असल्याचे स्पष्टपणे मांडावे लागेल. त्यांना त्याचा स्वीकार करावाच लागेल. हिटलरशाहीप्रमाणे मराठा व बहुजनांच्या मनावर ’ब्राह्मण हाच एकमेव शत्रू, व तो नेस्तनाबूत करणे हाच आमचा संकल्प’ ही प्रतिद्न्या कोरावी लागेल. अशा प्रशिक्षित व आक्रमक समुहाचे नेत्रुत्व मराठा समाजाने करून भारतभर, प्रत्येक शहरात,-गावात ब्राह्मणवस्त्या सरसकट नेस्तनाबुत कराव्या लागतील. सर्वच ब्राह्मण पुरुष कापून वा जाळुन मारावेच लागतील. ही दंगल केवळ व केवळ ब्राह्मण पुरुषांविरोधात राबवल्या जातील. त्यात सज्जन, दुर्जन, बालक, म्हातारा, समाजवादी, देशस्थ, कोकनस्थ, मराठी-अमराठी असा कोणताही भेदभाव केला जावू नये. महाराष्ट्रासह भारत देश "निब्राह्मणी’ करावा लागेल. त्याशिवाय भारताला व बहुजनांना भवितव्य नाही. मराठा समाजानेच अशा दंगलीचे नेत्रुत्व केल्यास इतर समाजही त्यांना सर्वच सहभाग देईल. ते सामाजिक आणि कायदेशिर मराठा कर्तव्य आहे. बोला मराठा तरुणांनो या शिवकार्यास तयार आहात काय? हेच खरे शिवप्रेम. हेच खरे शिवकार्य."

वरील परिच्छेद बोलका आहेच. पण त्यातील सुप्त भावनाही लक्षात घ्यायला हवी. फक्त ब्राह्मण पुरुष मारावेत असे आवाहन यात आहे...स्त्रीयांना कोणत्या उपकारात्मक भावनेतून सोडले आहे? हा प्रश्न येथे उद्भवतो आनि त्याचे उत्तर श्री. खेडेकरांच्या आधीच्या ब्राह्मण स्त्रीयांबद्दलच्या विवेचनात आहे.

दुसरे असे कि हे सर्व मराठा समाजाने अन्य बहुजनीय जाती ते अन्य धर्मियांची मदत घेवून करावे असे यात स्पष्ट आहे. मराठा सेवा संघ वा भारत मुक्ति मोर्चा मुस्लिमांना जवळ करत होता याबद्दल खरे तर मलाही कौतूक होते...पण या जवळ करण्यामागील हा मतितार्थ स्वीकारणीय असुच शकत नाही.

तिसरे असे कि मराठा आणि बहुजन या स्वतंत्र बाबी आहेत हे त्यांनी यात स्पष्ट केले असून फक्त मराठ्यांनीच नेत्रुत्व करावे आणि इतरांनी मुकाटपणे त्यांचा मार्ग स्वीकारावा अशी हिटलरवादी भुमिका घेत वांशिक विद्वेषाला भलतेच परिमान दिले आहे. वाट चुकलेले अनेक अमराठा तरुणांनी या भुमिकेला ओळखले पाहिजे.

मतितार्थ असा कि:

१. ब्राह्मण पुरुषांना वयादिंचा विचार न करता ठार मारले पाहिजे,त्यासाठी सुनियोजित दंगली घडवायला पाहिजेत हा निर्धार येथे स्पष्ट दिसतो.
२. ब्राह्मण पुरुष ठार मारल्यानंतर ब्राह्मण स्त्रीया या मराठ्यांच्याच उपभोगासाठी शिल्लक रहायला हव्यात असा विचारही स्पष्टपणे मांडलेला आहे.
३. आर.एस.एस. प्रमाणेच हिटलर हे यांचे आदर्श आहे.

या पुस्तकावरून महाराष्ट्रात फार नसला तरी जीही काही पेल्यातली वादळे आली आहेत त्यावरुन बव्हंशी लोकांना हे लेखन दुर्लक्ष करावे या योग्यतेचे वाटते. या मुढांसाठी मला खालील काही मुद्दे स्पष्ट करायचे आहेत.

१. ब्राह्मण हा शत्रु आहे ही भुमिका स्पष्ट करण्यात या संघटनांना ब-यापैकी यश मिळाले आहे काय?...उत्तर आहे होय.
२. ब्राह्मण हा विदेशी वंशाचा आहे हे पटवण्यात त्यांना यश मिळाले आहे काय?...उत्तर आहे होय आणि याला ब्राह्मनही जबाबदार आहेत.
३. ब्राह्मण हा एकमेव शत्रू या तत्वद्न्यानावर विश्वास ठेवणा-या सहयोगी का होईना संघटना झाल्यात काय?...उत्तर आहे होय.
४. ब्राह्मण शत्रू मानून विध्वंसक घटना घडल्या आहेत काय?....उत्तर आहे होय.
५. शासनामद्धे या संघटनांना पुरेसे पाठबळ आहे काय?...उत्तर आहे होय.
६. असे क्रुत्य खरोखर घडवून आनण्यासाठी कट्टर सदस्य या संघटनांकडे आहेत काय?...उत्तर आहे होय. काही प्रमाणात का होयिना ते असे क्रुत्य वास्तवात आणु शकतात.

थोडक्यात मी लेखारंभी वंशौच्छेदकारी टप्प्यांचे जे विवेचन केले आहे ते बव्हंशी टप्पे ओलांडले गेलेले आहेतच. त्यामुळे काहीच क्रुती होणार नाही, हिंसा होणारच नाही या भ्रमात कोणत्याही समाजाने राहु नये. याची काळजी सरकारला, समाजाला वाटत नसेल तर ते एका नव्या भस्मासुराला जन्म देत आहेत असेच नाइलाजाने म्हणावे लागेल. मग याची जबाबदारी त्या-त्या समाजघटकावर आहे.

सिमि, मुजाहिदिन, अल-कायदा, बजरंग दल, सनातन प्रभात, अभिनव भारत ते ख्रिस्ती दहशतवादी संघटना यांनी जे तत्वद्न्यान अंगिकारलेले आहे तेच आणि तसेच पण शत्रू पक्ष वेगळा टार्गेट करून या नव्य संघटना उभ्या रहात आहेत. या सर्वच संघटना आणि त्यंचे अंधानुयायी भारतीय समाजाचे एकुणात शिर्कान करायला सज्ज आहेत. काहींनी ते पराक्रम आधीच केले आहेत तर काही ते पराक्रम करण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांवर आताच निर्बंध असायला हवेत अन्यथा एका वेगळ्याच यादवीला तोंड द्यावे लागेल आणि ते कोणालाच परवडनार नाही. पण आपले राजकारण भलत्या विषयांत एवढे मुद्दामहुन अडकावून घेतले गेले आहे कि याकडे कोण लक्ष देणार?

मानव वंशशास्त्र हे मुळात न समजता वांशिक भेद निर्माण करणे हे हिंदु समाजातील वर्ण्भेद-जातीभेद निर्माण करण्याएवढेच घोर पातक होते. त्याचा दोष आता एकमेकांवर ढकलला जातो ही अजुनच आस्चर्यकारक घटना आहे. धर्म ही मानवनिर्मित बाब असून ती मुळात वंशद्वेषावरच आधारित आहे. म्हणजे सारे मुसलमान इस्लाममद्धे समान मानले जात नाहीत. ख्रिस्त्यांतही तसेच आहे. अन्यथा पकिस्तानमद्धे मशिदींवरच जिहादी आत्र्मघातकी हल्ले का झाले असते? हा सारा वर्चस्ववादाचा खेळ आहे. आणि प्रस्तुत लेखाबद्दल बोलायचे तर मराठा समाजाला एव-तेव प्रकारे राजकिय आणि आता ते निर्माण करताहेत ती सांस्क्रुतीक राजवट आणायची आहे असे स्पष्ट दिसते. अन्यथा असे लेखन अन्य कोणी जातीयाने/धर्मियाने केले असते तर तो आज कोठडीत बसला असता.

भारतात ब्राह्मणांनी काय पापे केली, ख्रिस्त्यांनी-मुस्लिमांनी काय अन्याय-अत्याचार केले, हिंदु म्हणवणा-यांनी बौद्धांच्या विरोधात कशी शस्त्रे उपसली, ज्याने-त्याने आपापला इतिहास कसा लिहिला, तो खरा कि खोटा असा परस्परांवर वार करत पुन्हा नवा खोटेपणा करण्यात सारे सज्ज असतील तर एक सांगतो त्यांचा निषेध होतच राहणार. हिंदुत्ववाद्यांनी इतरांना (कथित हिंदुंना) ग्रुहित धरले आहे.तर मराठे अन्य बहुजनांना/दलितांना ग्रुहित धरत स्वत:ची सत्तालालसा आणि सरंजामशाहीपणा सिद्ध करण्याच्या नादात आहेत. या सा-या लोकांना नाकारणारे आणि आपापली स्वतंत्र पाळेमुळे शोधत शांततामय सहजीवन जगु इच्छीणारे कोट्यावधी लोक आहेत.

त्यांना या द्वेषोन्मादात आणण्याचा प्रयत्न करणारे सारेच मानव-शत्रू आहेत. त्यांची जागा मुळात जेथे आहे तेथे त्यांना पाठवणे हेच आजच्या सुसंस्क्रुत जगाचे ध्येय असले पाहिजे. पण दुर्दैवाने सत्ताधारी लांगुलचालनाच्या नादात, स्वजातीय-स्वधर्मीयांच्या विळख्यात अडकून या शक्तिंना मुक्तद्वार देत आहेत आणि त्यांचा मी येथे स्पष्ट निषेध करतो.

-संजय सोनवणी

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...