मी या लेखमालेत हिंदु, हिंदुत्व आणि हिंदु धर्म म्हणजे नेमके काय आहे याचा उहापोह करणार असून हा धर्म आज जागतिक परिप्रेक्षात ५व्या क्रमांकावर काफेकला गेला आहे आणि भविष्यात कसलीही सुधारण केली गेली नाही तर तो नष्ट कसा होणार आहे याची चर्चा करणार आहे. तसे पहिले तर "हिंदु" हा शब्दही कसा भ्रामक आहे हे तपासत या धर्माची निर्मिती दोन विरुद्ध धर्मांच्या सरमिसळीतुन कसा निर्माण झाला याचेही दिग्दर्शन करणार आहे. तसे पहिल्यास इस्लाम धर्म हा ज्यु धर्मतत्वांशी आणि प्रतिमापुजक अरबी पारंपारिक धर्माची सरमिसळ आहे तसेच ख्रिस्ती धर्म हा सुद्धा ज्यु आणि येशुच्या तत्वांची सरमिसळ आहे. असे असल्याने या सरमिसळीत वर्चस्व कोणत्या तत्वधारेचे राहते आणि का आणि त्यातून नवधर्मात नेमके कोणते गोंधळ माजतात ज्यांचे निराकरण होणे अशक्यप्राय होवून जाते याचेही दिग्दर्शन असेल आणि धर्मावनीतिची बीजे या सरभेसळीत असल्याने धर्माची कालौघात वारंवार शुद्धी का करणे आवश्यक असते याबद्दलही चर्चा केली जाणार आहे. यातून धर्माकडे पाहण्याची द्रुष्टी बदलावी ही भावना तर आहेच पण शुद्धीकरण का आवश्यक आहे हेही लक्षात यावे असा प्रयत्न केला जाणार आहे.
येथे मी येथे हिंदू धर्मातील त्रुटींवर प्रथम लक्ष वेधु इच्छितो. त्याची कारणे आणि संभाव्य उपाय यावर स्वतंत्र लेखात चर्चा करुयात.
१. हिंदु धर्माची धर्म म्हणुन एकही सर्वमान्य व्याख्या नाही.
२. जन्माधारित वर्ण व जातीनिहाय व्यवस्था हे हिंदू धर्माचे अविभाज्य अंग आहे.
३. कायद्याने नष्ट केली असली तरी धार्मिक पातळीवर अस्प्रुश्यता आजही विद्यमान आहे.
४. धर्म व धर्मतत्वांची सार्वभौम एकाधिकारशाही फक्त ब्राह्मण जातीच्या हाती एकवटलेली आहे.
५. हिंदु धर्माला एकमेव असा सर्वमान्य धर्मनेता नाही. या धर्मात सध्या १५ शंकराचार्य आहेत पण धर्मव्यवस्थेकडे वर्तमान परिप्रेक्षात जी परिवर्तनवादी भुमिका असायला हवी तिचा त्यांच्यात पुरेपुर अभाव आहे.
६. असंख्य धर्मबांधवांनाच हिंदु धर्म मंदिरांत आजही प्रवेश नाही.
७. स्त्रीया, मग त्या कोणत्याही जाती-वर्णाच्या असोत, त्यांना या धर्मात धार्मिक-सामाजिक पातळीवर समानता नाही.
८. वेद हे पुरातन धार्मिक वाड्मय आहे अशी मान्यता आहे परंतु आजही ब्राह्मण वगळता अन्य कोणासही वेदाध्ययनाचा/पठनाचा/धर्मक्रुत्यांचा धार्मिक अधिकार नाही.
९. हिंदु धर्मात अन्य धर्मियास प्रवेश करायचा असला तरी तशी धर्मव्यवस्था नाही. अन्य धर्मियांत प्रचार-प्रसार करणारी यंत्रना (मिशनरी) असते तशी हिंदु धर्मात नाही.
१०. जे मुस्लिम, ख्रिस्ती वा अन्य कोणत्याही धर्मात नाहीत ते (उदा. आदिवासी) हिंदुच समजले जातात जे अनैतिहासिक आणि स्वार्थप्रणित आहे.
११. बौद्ध, जैन, आणि शिख यांना हिंदु धर्मांतर्गत नेमके कोणत्या आधारे मांनले जाते याचे स्पष्ट उत्तर नाही. त्यामुळे एक सांस्क्रुति गोंधळ उडवून दिला आहे आणि त्याची कुफळे हिंदु म्हनवणा-या समाजास खावी लागत आहेत.
१२. सर्व दैवते वैदिक आहेत हे सांगितले जाते परंतू ते वास्तव नाही आणि त्यामुळे वैदिक विरुद्ध अवैदिक हा संघर्ष पेटवण्याचे पाप या धर्माने केले आहे. वास्तव स्वीकारण्याचे साहस या धर्मात नाही.
१३. जातीनिष्ठ भुमिकांमुळे या धर्माचा जोही इतिहास आहे तो जातीनिहाय बनला आहे, बनत आहे आणि तो फोफावणार याचे भान या धर्माला नाही.
१४. आधुनिक विद्न्यानयुगाचा या धर्माला अद्याप स्पर्श नाही. तो आजही पुराणपंथी आणि भुतकालीन गौरवगाथांत (ख-या कमी खोट्या अधिक) अडकलेला आहे.
१५. धर्माला कालसुसंगत बनवत सर्वसमावेशक करण्याचे प्रयत्न करण्याऐवजी त्याला अधिकाधिक संकुचित करण्याचे प्रयत्न अधिक होत आहेत. त्यातुन धर्म हीच संकल्पना संपवण्याचे प्रयत्न होत आहेत.
१६. या धर्मात तत्वद्न्यानाच्या पातळीवर अद्वैत सिद्धांत मान्य आहे, परंतु व्यवहारात ते अमान्य आहे. हा एक दुटप्पीपणा आहे.
१७. भगवद्गीता हा हिंदुंचा एक महत्वाचा धर्मग्रंथ मानला जातो. यात गुण आणि कर्म यावरच आधारित वर्ण आणि जात असते हे स्पष्ट नोंदवले असुनही त्याच धर्मग्रंथाचा अनादर करत गुण-कर्म नव्हे तर जन्माधारित वर्ण-जात ठरवण्याची प्रथा आहे. हा खरे तर गीतेचा, पर्यायाने धर्मग्रंथाचा अवमान आहे. आणि तो धर्ममार्तंडांनीच केला आहे.
१८. ऋग्वेदानेही जन्माधारित वर्णव्यवस्थेला विरोध केला आहे परंतू हे द्न्यान स्वधर्मियांपासुन लपवले गेले आहे...म्हणुनच वेद शिकण्यास अन्य वर्णीय-जातीयांवर बंदी असावी.
१९. पुरातन काळापासुन फक्त ब्राह्मण वर्चस्व असणारा धर्म म्हणजेच हिंदू धर्म अशी व्यवस्था बनली आहे. त्यामुळे हा धर्म static झाला असून नवे शिकण्याची परंपरा गमावून बसला आहे. त्यामुळेच बौद्ध, जैनादि धर्म याच धर्मातुन फुटुन जन्माला आले आणि आज बौद्ध धर्म हा जगभर पसरला आहे. यातुन हिंदु धर्माची अवनतीच होत गेलेली दिसते.
२०. हिंदु धर्म तत्वद्न्यानाच्या पातळीवर अद्वैतवादी आहे तर प्रत्यक्ष व्यवहारात बहुदैवतवादी आहे. नवनव्या दैवतांना जन्माला घालायचे, त्यांना पुरता उरणार नाहित अशा भाकड धार्मिक पुराकथा निर्माण करून स्थानमाहात्म्य वाढवायचे व पोटभरू धंदा करायचा या नादात एकच देवता-द्वयाला विखंडित करत जायचे यातुन एक धार्मिक अनाचार उत्पन्न केला गेला आहे. त्यामुळे "एक: सत...विप्र बहुदा वदंति..." या मुलभुत सत्याचा विपर्यास केला गेला आहे.
२१. वैदिकाश्रमी अभिमान बाळगत, त्याचाच प्रचार-प्रसार करत प्रत्यक्षात अवैदिक दैवतांचे अपहरण करत एक सांस्क्रुतिक व्यभिचार या धर्मात पुराणकाळापासुन केला जात आहे. त्यामुळे दैवतांचे मुळ स्वरूप धुसर होत गेले आहे आणि आता मुळ स्वरुप शोधण्याच्या मोहिमेवर संशोधकांना पाठवले जात आहे.
२२. धार्मिक म्हणुन काही समांतर राजकीय ते राजकीय संघटना या देशात आहेत परंतु त्यांना धर्मातीलच मुलभुत समस्या सोडवण्यात रस नाही. त्यामुळे त्या आजतागायत व्यापक सामाजिक/धार्मिक मुलाधार प्राप्त करु शकलेल्या नाहीत.
२३. अहिंसेचे स्पष्ट तत्वद्न्यान इसपु. १८०० मधील उपनिषदांत आलेले असतांनाही तेंव्हाचेही आणि आताचेही हिंदुत्ववादी हिंसात्मक तत्वद्न्यानाची केवळ अद्न्यानापोटी भलावन करत आहेत. हे मुळात धर्मविपर्यस्त आहे याचे भान कोनालाही नाही. उलट आक्रमक/हिंसक धर्मतत्वद्न्यान पाजळणारे वा तशी अल्प-स्वल्प क्रुती करणारे लोकांना आदर्श वाटावेत यासाठीच हिंदुत्ववाद्यांचा अधिक आटापिटा आहे. हे मुळात धर्मतत्वद्न्यानात बसते काय याबाबत कोणीही विचार करतांना दिसत नाही.
२४. वैदिक नेमके कोण होते आणि अवैदिक नेमके कोण याबद्दल विद्वानांनी स्वतंत्रपणे संशोधने केली असली तरी नेमके संशोधन कोणते स्वीकारायचे याबाबत कोणताही निर्णय घ्यायचे साहस अद्याप एकाही धर्मगुरुने केलेले नाही. यामुळे ब्राह्मण ते अन्य जातीय आपले मुळ नेमके काय याबाबत संभ्रमित असून त्याचा स्वार्थी शक्ति गैरफायदा घेत आहेत.
२५. हिंदु म्हनजे नेमका कोण...याचाही निर्णय लागलेला नाही...म्हनजेच हा हिंदु नामक धर्म अस्तित्वात तरी आहे कि नाही आणि असला तर त्याची नेमकी धारणा काय हा प्रश्न अनुत्तरीतच रहातो.
या वरील त्रुटी मी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. पुढील चर्चेत कदाचित अजुनही अनेक बाबी समोर येतील. पण यावर चर्चा आवश्यक वातते कारण जे स्वत:ला हिंदु समजतात आणि आंधळेपनाने भ्रमात राहतात त्यांचे डोळे उघडावे आणि हिंदू असने म्हनजे काय हे समजावून घेत धर्मातील कळकटे काढण्याचा प्रयत्न करत शुद्धीकरन होत धर्म हा सर्वसमावेशक आणि समतेच्या पायावर कसा जाईल यासाठी सर्वच प्रयत्न करतील अशी या चर्चेच्या निमित्ताने अपेक्षा आहे.
Sunday, June 5, 2011
Subscribe to:
Comments (Atom)
जगाचे भविष्य आमच्याच हातात!
मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...