Monday, June 20, 2011

निर्माणकर्ता म्हणजे काय?

निर्माणकर्ता म्हणजे काय?

"जेही समाजघटक पुरातन काळापासुन मानवोपयोगी कार्ये अन्न-पशुसंवर्धन ते असंख्य जीवनोपयोगी उत्पादने/सेवा/कला/वास्तुनिर्मिती आदि माध्यमांतुन करत आले आहेत, त्यांना संशोधन-अनुभवातुन विकसीत करत आले आहेत व ज्यामुळे संस्क्रुती ख-या अर्थाने वर्धीष्णु राहीली आहे ते समाजघटक म्हणजे निर्माणकर्ता समाजघटक होत." ही आहे थोडक्यात निर्माणकर्ता या शब्दाची मला अभिप्रेत असलेली व्याख्या. आजवरचा मानवी इतिहास जो लिहिला गेला आहे तो आहे राजे-रजवाडे, धर्मनेते, न्रुशंस रानटी आक्रमकांचा. परंतू या इतिहसाला ख-या अर्थाने निर्मितिमुल्य देणारे, स्रुजनात्मक असनारे, विविध कलांची निर्मिति करत संस्क्रुतीला आधार देनारे मात्र जागतिक इतिहासाने उपेक्षित ठेवले आहेत. वर्तमानातील वास्तवही वेगळे नाही.

आज जगाची पुरातन संस्क्रुती आपल्याला कळते ती नगर रचना, वास्तु, लेणी, प्रासाद, गढ्या, किल्ले, बंदरे, नाणी, शिलालेख, मुर्त्या, मंदिरावशेष यातुन. ज्यांच्या काळात ती निर्मिती झाली याची आपल्याला माहिती असते पण त्या वास्तु/वस्तुंमागील संकल्पनांची प्रतिभा नेमकी कोणाची होती याबाबत इतिहास मौन पाळुन आहे. अर्थात ती प्रतिभा त्या-त्या व्यवसायात तरबेज असना-या समाजघटकांची होती हे अमान्य करता येत नाही. या समाज घटकांनी त्या त्या कलेत काळानुसार प्रगती/बदल केलेलेही आपल्याला आढळतात. त्यातुन आपल्याला त्यांची विकसनशील व्रुत्तीही लक्षात येते. सिंधु, टायग्रीस, युफ्राटीस आदि संस्क्रुत्यांचे जे विलक्षण अवशेष आपल्याला आज मिळतात त्यांच्या निर्माणकर्त्या समाजांबद्दल आपण अनभिद्न्य असलो तरी ते पुर्णतया खरे नाही. समुद्रमार्गे व्यापारासाठी, मत्स्योद्योगा साठी छोट्या नौका ते १००-१५० शीडांच्या नौका बनवणारे कोण होते? त्यांच्यामुळे संस्क्रुत्या जगभर पसरत गेल्या त्यांचे मुख्य योगदान आपण आज का विसरतो? कोळी लोकांनी त्यांच्या गरजेपोटी नौका शोधत नंतर सुतारांकडुन त्यांची बांढणी करुन घेत पुढे त्यात विकास होत राहिला हेच तर सत्य आहे ना?

महाराष्ट्राचे आद्य वसाहतकार धनगर होते. पशुपालन करणारे, कधी स्थिर तर कधी भटके असा हा जनसमुह. त्यांच्यातुनच काही व्यवसाय करणारे घटक विकसीत झाले. राज्यसंस्था या नंतर अस्तित्वात आल्या. शस्त्रे बनवणारे, शेतीला सहाय्यभुत अशी साधने, शस्त्रे निर्मान करायला त्यातीलच कल्पक घटक बाहेर पडला...त्यांत सुतार, लोहार, चांभार असे अनेक घटक आले. वस्त्रांची निर्मिती अशाच कोणा अनाम आद्य विणकराने केली. जवळपास २-३ -या शतकापर्यंत भारतीय न शिवलेली प्रावरणेच वापरत असत. पुढे शिंपी समाज याच अवाढव्य समुदायातुन पुढे आला आणि शिवनकला विकसीत केली. अलंकारांचे आकर्ष्ण फक्त स्त्रीयानाच नव्हे तर पुरुषांनाही असे. असे अलंकार बनवणारे कलावंत पुढे आले. लोथल येथे तर अशा अलंकार निर्मात्यांचे कारखानेही सापडलेले आहेत. त्यांची निर्यातही होत असे. पाथरवट, मुर्तीकार, नगररचनाकार, गवंडी, आदि समाजघटकांनी या अवाढव्य वास्तु, बंदरे, नगरे यांची संकल्पना व निर्मिती केली. सेवा पुरवणारे, संरक्षण पुरवणारे, नंतर दलित म्हणुन रसातळाला पोहोचवले गेलेले महार/मातंग/वडारी/पाथरवट आदि घटकांचे योगदान तर इतिहास पार विसरला आहे. राजसत्तांनी/धर्मसत्तांनी त्यासाठी धन पुरवले हे खरेच आहे, पण निर्मितिशीलता व रचनात्मकता या अनेकविध समाजघटकांची होती.

एकाच विराट समुदायातुन वेगवेगळ्या संकल्पना/निर्मितीसाठी व्यवसायधिष्ट विभक्त वाटना-या, परंतु मुळात सर्वच एक असणा-या समाजाला जातींत विभक्त करुन त्यांची निर्मितिक्षमता व त्यातील भरारी मध्य युगात धर्ममार्तंडांनी पार घालवुन टाकली. निर्मिती पेक्षा पारलौकिक जीवनाची कास धरनारी परलोकवादी विचारसरणी लोकमतावर बिंबवत नेली आणि त्याचा परिपाक म्हणजे नवे संशोधन थांबले. अवाढव्य वास्तु/नगरे उभारण्याची इछ्छा राज्यकर्त्यांमधुनही नष्ट झाली. १३ व्या शतकानंतर शिवकालीन किल्ल्यांची रचना सोडली तर कोनतेही नवे कार्य झाल्याचे आढळुन येत नाही. पोटाला कमी मिळु लागले कि निर्मितीक्षमताही मंदावू लागते. आहे त्या व्यवसायात कोणी पडु नये अशी भावना जन्माला येते. भेद वाढत जातो...अर्थ-भेद शेवटी जातीभेदावर येवुन थांबतो.

महार समाज हा पुर्वी ग्रामरक्षक होता. लढवैय्या होता. चोर-लुटारु यापासुन गावाचे/व्यापारी तांड्यांचे रक्षन हे कार्य ते करत असत. न्यायालत्यांतील कोनत्याही, पार जमीनीच्या सीमाच्या वादांपर्यंत त्यांचीच साक्ष ग्रुहित धरली जात असे. महारचावडीचा मान गाव चावडीपेक्षा मोठा असे. राजकीय अस्थिरता जशी संपत गेली तसतसे त्यांचे महत्व संपवण्यात आले आणि त्यांना अत्यंत हीण पातळीवरची कामे करण्यास भाग पाडण्यात आले. या अस्थिरतेच्या इतिहासाला, समाजघटकांना विस्कळीत-गलितगात्र करुण टाकण्यात प्रजेला कसलेही महत्व न देणारे स्वार्थपरायण राजकीय सत्ताधारी होते, तसेच त्यांच्याच हातात हात घालुन चालणारे, प्रसंगी वर्चस्व गाजवणारे धर्मसत्ताधारीही होते.

जगात आज खालुन वरचा इतिहास (Sub-altern History) लिहिण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारतात अद्याप ही शाखा बाल्यावस्थेत आहे. परंतु आपण सारे मिळुन आपल्या समाजासाठी हे कार्य करायचे आहे.

यामागील उद्देष्य हा आहे कि या सर्वच संस्क्रुतीच्या निर्माणकर्त्य्यांना त्यांच्या एकजिनसी मुळाची जाणीव करुन देत सर्वैक्याची आत्मभानात्मक जाणीव करुन देत, वर्तमानातील सर्व समस्यांशी एकदिलाने लढत पुन्हा नवनिर्मितीचे कार्य हाती घेत पुन्हा एकदा संस्क्रुती, द्न्यानसत्ता, अर्थसत्ता यात आघाडी मिळवत, जातीनिहाय विचार न करता मुक्त मनाने नवी आव्हाने स्विकारत मुळच्या निर्मानशील भावनांना जागे करत हातात हात घालुन पुढे जाणे. यात सर्वांचे सहकार्य मिळेल याचा विश्वास आहे. जातीभेद/धर्मभेद/वर्चस्ववाद मानणा-यांना या विचारसंघात स्थान नाही.

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...