Saturday, October 15, 2011

गांधी नावाचा माणुस लोकशाहीवादी नव्हताच!



राजकारण हा काही माझ्या लेखनाचा आवडता प्रांत नाही. मी राजकीय पार्श्वभुमीवरील थरारकथा अनेक लिहिल्या आहेत पण त्यातील राजकारण हे बव्हंशी कथानुकुल असे आहे, वास्तवाशी त्याचा फारच थोडा संबंध आहे. बरे मी कोणत्याही पक्षाशी संबंधीत नाही. जेही पक्ष सध्या आहेत आणि एकामागुन एक निघत आहेत आणि पुढेही निघतील असे स्पष्ट चित्र आहे, तर प्रश्न असा येतो कि ज्या देशात अक्षरश: शेकडो पक्ष आहेत तो देश राजकीय वैचारिकतेच्या कोनत्या तरी शिखरावर जावून पोहोचला असला पाहिजे, कारण एवढ्या विभिन्न समाजोपयोगी राजकीय विचारधारा या देशात आहेत. एवढे पक्ष आहेत आणि सारेच या देशाचे कल्याण करणा-या तत्वद्न्यानाने सज्ज आहेत.
मी आजतागायत एकदाच मतदान केले आहे. मतदान करणे हा प्रत्येक मतदाराचा अधिकार आहे आणि तो बजावला गेलाच पाहिजे असे सांगितलए जाते...ते मलाही मान्यच आहे...पण निवडनुकीस उभे असलेल्यांपैकी जे काही पक्षीय ते अपक्ष ५-५० (कधी शे दोनशे) असतात...ते सारेच एकतर बदमाश वा केवळ हौस म्हणुन उभे असतात हे दिसत असेल तर मी मतदान का आणि कोणातरी एका बदमाशाला वा नाकर्त्याला का करावे? मी माझा वेळ वाया का घालवावा?
खरेच मी फक्त आजतागायत एकदाच मतदान केले आहे आणि ज्याला केले त्याला करुन खुप पस्तावलो आहे. आता म्हणतात "उमेदवाराला परत बोलवायचा कायदा आणुयात..." मी म्हनतो यासारखा अधिक मोठा विनोद दुसरा कोनताच नाही...कारण मागे बोलावणार कोण? जे मतदार आधी मते द्य्यायला आणि चुकीचा उमेदवार निवडुन आणण्यात चुकले तेच मतदार पुन्हा बोलावतांनाही चुकणार नाहीत याची काय खात्री? आणि त्याच्या जागी ज्याला आननार तोही महाभद्र असेल ही मतदारांची कशी खात्री असू शकते?
तेंव्हा जनलोकपालापासुन ते उमेदवाराला परत बोलावण्याच्या कायदेशीर तरतुदी करण्याच्या ज्याही मागण्या होत आहेत त्या मुळात कोणत्या भ्रष्ट प्रेरणांतुन होत आहेत हे तपासले पाहिजे. उदाहरणार्थ महान (स्वयंघोषित महात्मा) अण्णा हजारे जेंव्हा आपले सामाजिक चळवळीचे काम सोडुन विशिष्ट पक्षाविरोधात प्रचार करतात हे कोनत्या सामाजिक चळवळीत बसते? हा नैतिक भ्रष्टाचार नव्हे काय? ज्यांची वैचारिक व नैतिक भुमिका ठाम (स्थिर) नाही, त्याला गांभिर्य नाही...असे लोक सध्याचे जेही राजकारण आहे त्यावर एक नैतिक आणि वैचारिक दबावगट म्हणुन तरी काम करु शकतील अशी आशा बाळगणे हा समाजाच्याच वैचारिक अध:पतनाचा उत्क्रुष्ठ नमुना आहे.
मी मतदान एकदाच केले. केले तिही चुकच होती याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मी मतदान करावे यासाठी कोणी मला दारुच्या बातल्या वा गांधीबाबा घेवुन आला नाही. (वाया जाईल अशी भिती उमेदवारांना वाटली असेल...) कोणी मला मोतरबाईक वा एखादी एजंसी वा पद देण्याचे वचन दिले नाही हेही कारण असेल. पण मी मतदान फक्त एकदाच केले आणि पस्तावलो हेही खरे.
म्हनजे मला लोकशाही मान्य नाही असाच अर्थ निघतो का? खरे तर होय...असाच अर्थ निघतो...
भ्रष्ट लोकांनी भ्रष्ट लोकांना मतदान करत निवडुन आणलेली राजकीय साठमारीयुक्त झुंडीची तत्त्वप्रणाली राबवणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही अशी व्याख्या ज्यांनाही मान्य आहे त्यांनी या देशात आहे तिला खुशाल लोकशाही म्हनावे. मी तिला मुळात लोकशाही मानतच नाही त्यामुळे मी मतदानच करत नाही.
समजा मतदानच सर्वांनीच केले नाही तर?
हे या देशात अशक्यप्राय आहे. मतदान होनारच कि. पैसे काय फुकट वातलेत काय? आणि ज्यांना पैसे दिलेत त्यांच्या बोटावरील (मत कोणालाही दिलेले असेल) पण खुणा लपतात काय?
तेंव्हा मतदान होनारच. हा नाही तर तो बदमाश निवडुन येणारच.
०% मतदान होनार नाही...
आणि "यातील एकही उमेदवार पसंत नाही" (अशीही व्यवस्था केली तर...) अशी किती मते पडतील?
तेंव्हा निवडनुका होनारच...कोणीनाकोणी उमेदवार निवडुन येनारच...
येवुद्यात...
काय हरकत आहे? उगा पैसे वाया घालवतो कि काय तो? हरलेल्याचे वाया गेल्याचे दुक्ख नाही...कोठे प्रामाणिक उत्पन्नातुन त्याने खर्चलेत ते? हराम का हराम मे गया असे म्हणत तो हरलेला पुन्हा नवीन काड्यांत लागणारच कि!

पक्षीय तत्वद्न्यान, व्यापक सामाजिक, आर्थिक, धार्मिक व मुल्यधिष्ठित राजकीय तत्वद्न्यान असनारा मला या देशात एक पक्ष सांगा. मला तरी दिसत नाही. एके काळी अमुक पक्ष चारित्र्यसंपन्न लोकांचा होता हा इतिहास आता उगाळण्यात अर्थ कोठे आहे बरे? अविवाहित असतात पण ब्रह्मचारी नसतात. भ्रष्ट नसतात पण आपले सारे भाईबंद दारिद्र्याच्या अंधारावर मात करुन गडगंज होतात. बाकी लोक मुर्खच असतात. दारिद्रायाचा अंध:कार हतवण्याचा त्यांच्याकडे कार्यक्रमही नसतो, मार्गही नसतो आणि तरीही आपण दरिद्री नाही असे सरकारी आयोगच सांगतात...जर रोज ३० रुपयात तुम्ही जगु शकता तर लेको तुम्ही दरिद्रीच नाही...आणि हा सिद्धांत सांगायला असले आयोग अब्जावधी रुपयांची उधळण करत दर २० मिनिटांना २५ रुपयाचा चहा पीत घोषित करु शकतात...मग तुम्हीही दरिद्री नाही आणि मग कशाला त्या निवडुन आलेल्यांच्या, मंत्री-मुख्यमंत्री बनुन आलेल्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या दारिद्र्यनिर्मुलनावर खडे फोडता बरे?
मी फोडत नाही. मी मतदानही करत नाही.

मला लोकशाही मान्य नाही हे आपल्या आता लक्षात आले असेलच.
का असावी?
जर या देशातील सर्वच केंद्रिय ते ग्रामपंचायतींच्या सरकारांना लोकशाही मान्यच नाही...
लोकशाही आहे याचे अस्तित्व मला जानवतच नाही...
तर मग माझी काय चुक बरे?
हो...तुम्हाला मर्यादित परिप्रेक्षातील लोकशाही अनुभवायला मिळते. म्हणजे तुम्ही हवे ते लिहु शकता, बोलु शकता...(तेही कितपत?), हव्या त्या होटेल्मद्धे, मालमद्धे परवडतात ते सारेच घेवु शकतात, सिग्नल पाळलाच पाहिजे याचे बंधन नाही...अडवले कोणी तर एक गांधीबाबा पुरेसा आहे, त्यापार बाब गेली तर कोणीनाकोणी पोलिसांना फोन करुन झाडनारा आहे...सोदवणारा आहे...नस्देलच तर नशीब...शेवटी या देशाचा नशिबावर एवढा हवाला आहे कि हवाला कांड काही विशेष बाब नाही.
हवालात खायची निमुट...अजुन काय?

तर आपण लोकशाहीबद्दल बोलत होतो. आहे ना लोकशाही. मी उगाचच कधी कधी पेसिमिस्टिक होतो. असली लोकशाही जगात सापडनार नाही. खरेच कि... भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे.
या देशात कोन्ग्रेसची लोकशाही आहे, भाजपाची लोकशाही आहे, कम्युनिस्तांची अनेकवादी लोकशाही आहे, कोंग्रेसच्या पिल्लावळीची लोकशाही आहे, समाजवाद्यांची लोकशाही आहे, ठोकशाही ते दबल-ठोकशाहीवाल्यांची आणि त्यांच्याही पिल्लावळीची लोकशाही आहे...त्यांच्याच्तच असुन तरीही स्वतंत्रवादी दादा-भाउ-काका-सरसेनापती...ह्रुदयसम्राट-युवराज- महायुवराज-माई-ताई-आक्का-सायबाची लेक-इंदिरामायची उहु......अशा स्वतंत्र व्यक्तित्वांची रेलचेल आणि त्यांचे त्यांचे स्वतंत्र दरबार आणि हुकुम झाद्डण्याची क्षमता असणे हे लोकशाहीचे केवढे विलक्षण जागतीक पातळीवरचे सर्वश्रेष्ठ दर्शन आहे बरे?
एकाच लोकशाहीवादी म्हनणा-या देशात एवढ्या अंतर्गत लोकशाह्या असने हा लोकशाहीवादाचा विलक्षण विजय आहे.
दुर्दैव एवढेच या अभिनव लोकशाहीवादाचे तत्वद्न्यान कोणी मांडत नाही.
पण बहुदा तत्वद्न्यानच नसणे हेच तत्वद्न्यान आहे असा अलौकिक सिद्धांत त्यांनी मनोमन मान्यच केला असेल कदाचित...
यालाच तर सर्र्वतत्वद्न्यानवादी भारतीय संस्क्रुती म्हणतात.
मी मतदान करत नाही...म्हनजे मी लोकशाहीवादी नाही असे म्हनता येते ते यामुळेच.
उभ्या असलेल्या सर्वच बदमाशांशी मला घेणे नाही. ते कधी मी घरातुन बाहेर पडल्यावरील रस्ता धड असावा अशी व्यवस्था असेल...कोणीही असो...विश्वासच नाही...मला काम करायचेय पण मला वेळेवर वीज असेल...प्यायला शुद्ध पानी असेल, पायी चालत असता मागुन उलटा येत आपले वाहनचालक कौशल्य दाखवत धडकुन सरळ मला कोसळवुन माझ्याच खर्चाने दवाखाना दाखवणारच नाही याची खात्री नसेल...पोलिस त्याला नव्हे तर मलाच दरडावणार असतील...मलाच पैसे मागणार असतील...मी ज्यांना समाजातील असे अनिष्ट संपावे म्हणुन ज्याही कोना आण्णाला महानेता महात्माही मानायला तयार असेल आणि हे स्वयंघोषित महात्मे एक नंबरचे लुच्चे लबाड आणि प्रसिद्धीच्या मागे लागत आमच्याच परिवर्तनाच्या भावनांचा दुरुपयोग करत असतील तर मी लोकशाहीवादी का व्हावे?
मी मतदान करत नाही.
एकदाच केले होते...गंभीर चुक केली होती.
उगा वेळ वाया घालवला.
भ्रष्ट लोक भ्र्ष्टांनाच निवडुन द्यायला जेथे सज्ज आहेत तेथे माझ्या मताला अर्थच नाही.
आणि मी निराशावादीही नाही.
हे सरकार...ही व्यवस्था यांची पर्वा न करता...त्यांचे सारे अन्याय सोसत जगायची मी माझी व्यक्तिगत व्यवस्था बनवली आहे.
आणि तेथे मतदानाची गरज नाही.

मी मतदान करत नाही...

तरुण होतो तेंव्हा (म्हनजे अजुन मी पुरेसा म्हाताराही झालेलो नाहीय...) पण वाटायचे क्रांती व्हावी...खरे प्रामाणिक जनांदोलन व्हावे...प्रत्येकाला एक आत्मविश्वास मिळावा...जगने सुसह्य व्हावे...पण...
मी १९७४-७५ साली वरुडे आणि चिंचोली (तालुका शिरुर जिल्हा पुणे) येथील गांवतळ्यांवर ७ रुपये रोज आणि एक सुकडीचे पाकीट या रोजंदारीने माझ्या आता दिवंगत पण जीवलग मित्र प्रशांत पोखरकरसह राबलो. अण्णांना विचारा ही गावतळी...जी दुष्काळातील रोजगारहमी योजनेतील तळी होती...ती तुमच्याच संघटनांनी कशी बळकावली आणि पुनश्च अनुदाने लाट्ली बरे? माहितीचा अधिकार तुम्हीच मिलवुन दिला. तो कसा वापरला जातो आहे हे त्यांना माहित आहेच. मी म्हणतो या गांवतळ्यांची माहिती जरा तुम्ही स्वत:च माहितीच्या अधिकारात मिळवा आणि प्रसिद्ध करा. चिंचोली मोराच्या त्या ब्राह्मनमळ्यात आता जे पर्यटनस्थळ निघाले आहे त्याचीही माहिती मिळवा आणि प्रसिद्ध करा.
मी हे का सांगतो आहे? अणा माझे शत्रु नाहीत. खरे तर सोनिया, अटलजी, आता देशाला भ्रष्टाचार कसा वाईट असतो हे शिकवायला निघालेले अडवानीजी, हजारो मुसलमान मारुन भारताचे, पंतप्रधान कधी होवु शकणार नसले तरी वापरुन घेतलेले-मोदीजी, दलितांची अवाढव्य शत्रु मायावती ते एकामागुन एक नग असलेले(ल्या) दक्षिणेतील अभिनयाची पारणे फेदनारी एकामागुनची एक व्यक्तिमत्वे...या देशाच्या राजकारणाचा महाप्राण आहेत. कधी हा तर कधी तो. त्यावरचा मुकुटमणी तर महाराष्ट्रदेशी आहे. पण या महामानवाला (त्याच्या उद्दाम पुतन्याला वा नासमझ कन्येला) तर या यच्चयावत विश्वात विष्णु, अब्राहम, ख्रिस्त....असे जेही कोणी मित्थिकल झाले त्यांच्या तोंडात हासडता येईल असे महाकर्तुत्व या त्रयीने घडवले आहे...अजुन उदंड आयुष्य आणि कदाचित अमरतेचे लेने असल्याने या महत्तेत दिवसेंदिवस भरच पदत राहील आणि भविष्यात महाकाव्ये लिहिली जातील याचा मला विश्वास आहे.
भारतभुमी पुण्यभुमी आहे हे सावरकर का म्हणतात हे मला उशिरा कळाले असले तरी कळाले हे तर नशीबच आहे.
मी मतदान करत नाही.
जे महान असतात ते निवडुन येणारच असतात...मग मी का बरे मतदान करावे?
अशा महान लोकांनी हा देश व्यापला आहे. ही पुण्यभुमी आहे.
हा देश लोकशाहीवादी आहे.
येथे गांधींचा खुन झाला याचे जे वाईट वाटायचे ते आता वाटतच नाही...
गांधी नावाचा माणुस लोकशाहीवादी नव्हताच! हुकुमशहावादी होता तो...उग आपले कर हे उपोषण...कर ते उपोषन...काय गरज होती असली हुमुमशाही दाखवायची?
आम्ही लोकशाहीवादी....
एक गोळी घातली...आणि संपवली कि रे म्हाता-या तुझी हुकुमशाही...
मी लोकशाहीवादी नाही...
मी मतदान करत नाही..
एकदाच केले...
चुकी झाली...

सांगायचे काय तर पक्ष खुप आहेत...इतके कि दिशा पुरुन उरतील आणि तरीही ते अस्तित्वात नाहीत कारण कोणत्याही अर्थाने वेगळेपण नाही. राजकीय म्हणुन जेही काही मुलभुत तत्वद्न्यान हवे ते दिसतच नाही आणि म्हणुनच सारे भरकटलेले आहेत. भारतीय राजकीय पक्ष हे खरे तर जातीयवादीच आहेत आणि तसे राहणे एवढीच त्यांच्या अस्तित्वची गरज आहे. धर्मनिरपेक्षतेही धार्मिकता आहे आणि धर्मसापेक्ष पक्षांतही तेवढीच जातीयता आहे. उपपक्ष प्रादेशिक असले तरी प्रादेशिकतेतीलही जातीयवाद त्यांनी उचललेला आहे. भारतातील जाती या काही प्रदेशांत संख्येने अधिक आहेत तर कोठे विरळ आहेत. जेथे आपली जात प्रबळ वाटते४ तेथे स्वार्थी जात्यंध आपल्याच जातीचे नुकसान करायला सज्ज आहेत. कोणीप्रादेशिक अस्मिता काढतो आणि देशाला वेठीला धरतो. खरे तर प्रदेशिक वा अन्य आधारावर (जात/धर्म/भाषा/संस्क्रुती/विकास) सार्वभौम देशात वेगळे राज्य मागतात त्यांना देशद्रोही ठरवुन फासावर लटकावले पाहिजे.
पण हेच लोक आपल्या लोकशाहीचे प्रतिनिधी आहेत.
मी मतदान करत नाही.
मी पुण्यात...मी फारफारतर पुण्याच्या कोणत्या खास्ददाराला/आमदाराला/नगरसेवकाला) मत द्यायचे व द्यायचेच नाहे एवढेच ठरवु शकतो...
त्या तेलंगनवाद्यांना असो वा विदर्भवाल्यांना असो कि काश्मिरवाद्यांना असो....
मला तेथे मतच नाही...
त्यामुळे मी मतदान करत नाही.
मी खड्ड्यांत खुष आहे आणि य लोकशाहीवर तर बेहद्द खुश आहे..
फक्त एवढेच...मी मतदान करत नाही...
एकदाच केले होते...
पण तो पस्तावा जात नाही.


अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!

पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत ...