हिंदु धर्मासमोरील समस्या (९)
सावरकरांचे हिंदुत्व हे धार्मिक व्याख्या करत नसुन हिंदु राष्ट्रीयत्वाबद्दल आहे असा समज त्यांच्या विधानावरुन होतो. असा समज होणे स्वाभाविक आहे. एवढेच नव्हे तर जेंव्हा सावरकर म्हनतात "हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले तीस कोटी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. मनुष्यजातीस ह्या शक्तीस तोंड द्यावे लागेल असा एक दिवस उगवेल. ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत ! - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ९०)" तेंव्हा ते अखिल विश्व हेच एक राष्ट्र असा सिद्धांत स्वीकारत एक महा-मानवतावादी असल्याचा देखावा निर्माण करत एक उदात्त भुमिका घेतांना दिसतात तेंव्हा त्यांच्याबद्दल अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. "वसुधैव कुटुंबकम" वा "हे विश्वची माझे घर..." ही तत्वद्न्यांची विराट द्रुष्टी सावरकरही बालगतात हे पाहुन संतोषही होतो.
पण सावरकरच म्हनतात जर "मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' इतर सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल. जसे माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल की जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन मनुष्यपणा तेवढा जगात मनुष्यमात्रात नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन." - (१९२८ स.सा.वा. ३ : ६४४)
सावरकरांचे हेही विधान व्यापक आणि विश्ववादी असल्याचा आभास निर्माण होतो आणि खरे तर ते माझ्याही "One world One nation" या भुमिकेशी सुसंगतच आहे. पण सावरकरच म्हनतात "काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !" - (१९३५ स.सा.वा. ३ : ५७२) तर याचा अर्थ असा होतो कि सर्वच "त्व" वादी "हिदुत्ववादी" व्हायला हवेत कारण तोच ग्राह्यतम धर्म आहे. आता हिंदु हा धर्म जर सावरकरांच्याच मते नाही, हिंदु म्हणुन ओळखल्या जाणा-या भुप्रदेशातील आणि या प्रदेशाला आपली पुण्यभुमी मानणारे ते हिंदु अशी त्यांचीच व्याख्या आहे तर (विश्वातील) ग्राह्यतम धर्म् हिंदु हाच होय असेही सावरकर ठासुन सांगतात.
हेच सावरकर पुढे म्हनतात कि "बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६९ )
मी पुर्वीच्या लेखांत म्हटले आहेच कि हे हिंदुत्ववादी म्हनजे खरे वैदिकतावादी आणि वैदिक संस्क्रुतीचे गौरवगान करत शब्दछल करत सामान्य हिंदुंची ग्झोर फसवणुक करत असतात. वरील सावरकरांच्याच विधानात "सनातन धर्म", "श्रुती-स्म्रुती-पुराणोक्त धर्म" अथवा वैदिक धर्म अशा संद्न्या येतात. श्रुती-स्म्रुती म्हणजे सावरकरांना काय अभिप्रेत आहे हे वेगळे सांगण्यत तसा अर्थ नाही, पण श्रुती म्हणजे वेद तर स्म्रुती म्हनजे मनुस्म्रुत्यादि वर्णव्यवस्थेची महत्ता आणि अपरिहार्यता सिद्ध करणारी धार्मिक महत्ता आहे. "सनातन" धर्माचाच अर्थ मुळी वैदिक धर्म असल्याने सध्या बहुजनवाद्यांत "सनतनी" हा शब्द केवढा बदनाम झाला आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पण सावरकर जेंव्हा शीख, जैन, बुद्ध यांनाही हिंदु म्हनतात वा त्यांना हिंदुत्वाच्या परिघात ओढतात तेंव्हा आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. हा सर्वसमावेशकतावाद वरकरणी कोणालाही आकर्षित करु शकतो. पण वास्तव ते नाही आणि कवि असल्याने अवास्तवता मांडणे हा सावरकरांचा एक मुलधर्म आहे. मुलत: हे तिनही धर्म वैदिक धर्माच्या पुरेपुर विरोधात असुन त्यांचे तत्वद्न्यानही अवैदिक आहे. सनातन धर्मात ते लबाडी अशी करतात कि त्यातच शैवादि मुर्तीपुजक अवैदिक परंपरागत धर्माचाही समावेश करुन टाकतात.
कोणी म्हनेल...काय हरकत आहे? हा एकतावाद अधिक महत्वाचा नव्हे काय? हीच हिंदु धर्माची खरी ओळख नव्हे काय? मला मुर्खांच्या नंदनवनात रहायला आवडत नाही. धर्मच अमान्य करुन कोणी असा मानवतावाद मांडला तर तो स्वीकारणे वेगळे आणि धर्म तर हवा पण मी म्हणेल त्या तत्वांचा स्वीकार करणारा असला दुतोंडीपणा कोणीही स्वीकारु शकत नाही. किंबहुना अशा व्याख्या याच हिंदु धर्माच्या (हिंदुत्वाच्या नव्हे) मार्गातील खरे अदथळे बनुन बसल्या आहेत. र.स्व. संघाच्या अशाच धर्मासंबंधीच्या कोलांटौड्या पुढे आपल्याला पहायच्याच आहेत, पण सावरकरांच्या विचारांची चिकित्सा येथे प्रथम आवश्यक आहे.
हिंदु धर्म म्हनजे नेमके काय आणि त्याच्या प्रगतीत पुर्ण अडथळे का येत आहेत याचे कारण येथे शोधायचे आहे. सावरकरांचे हिंदुत्व हे मुलत: प्रादेशिक व्याख्येवरच कसे भर देते हे आपण आधीच्या प्रकरणात पाहिलेच आहे आणि या प्रकरणात सावरकरांचे हिंदुत्व हे मुलत: खरे वैदिक कसे आहे हे आपण पहात आहोत. त्यांनी व त्यांच्या सांप्रदायिकांनी ही भुमिका मान्य केलेलीच आहे आणि ज्यांना ती अमान्य आहे अशांवर शरसंधान करायला ते सर्वस्वी कसे सज्ज असतात हे आपण पाहिले आहे. म्हनजेच या वैदिक सावरकरवादी सांप्रदायिकांनी स्वत:ला हिंदु म्हनणे सोडुन द्यायला हवे कारण ते हिंदु नाहीत तर वैदिक आहेत. त्यांनी आपला धर्म खुशाल जपावा, त्याबाबत कोणाला वावगे वातायचे काही कारण नाही पण धर्माचाच एक गोंधळ उडवुन देत मेंढराचे कातडे पांघरुन लांडग्यांनी अदआणी, नि:ष्पाप मेंढरांच्या कलपात घुसुन त्यांना हाकलायचे व सावकाश गिळण्याचे पातक थांबवावे एवढेच. प्रादेशिकतेचे नांव घेत वैदिकत्वाचा अंमल बसवण्याचा हा प्रयत्न भारतीय "हिंदु" म्हणवणा-यांनीही का नाकारला याचे विवेचन या उत्तरात आहे.
म्हणजेच हिंदु म्हनजे नेमके काय हा अजुनही कळीचा प्रश्न रहातो. आणि त्या प्रश्नाची सोदवणुक हा या लेखमाकिकेचा उद्देश आहे. सावरकरवादी हिंदुत्व हे कडवे, वैदिकतावादी, श्रुती-स्म्रुती-पुरानवादी कसे आहे हे आपण पाहिले. सावरकरांचा अस्प्रुश्यतेला विरोध कसा होता, त्यांनी अस्प्रुश्यांसांठी स्वतंत्र पतितपावन मंदिर कसे उभारले, स्वातंत्र्योत्तर काळात अस्प्रुश्यताविरोधातील कायदा आल्यावर कसे स्वागत केले हे आम्हाला सावरकरवादी हिरिरेने सांगत असतात...आणि आम्हाला सावरकर द्वेष्टे ठरवत त्यांची व हिंदुत्वाची चिकित्सा करणे कसे महत्पाप आहे हे दरडावत सांगत असतात. त्यांना मला हेच सांगायचे आहे कि तुमच्या व्याखेनुसार मी महत्पापी असेल, परंतु मी ख-या हिंदुंसाठी एक चेतनादायी कार्य करत आहे. त्यांची जाग्रुती हे माझे स्वप्न आहे...तुमच्या द्वेषाला मी काडीएवढीही किंमत देत नाही.
थोडक्यात हिंदु हा धर्म कसा याची कसलीही (प्रादेशिक वगळता) सावरकर व्याख्या करत नाहीत पण वैदिकतावाद आणि मनुवाद हाच हिंदुत्वाचा कसा पाया आहे हे ते ठसवतात. हरकत नाही. पण हिंदु धर्म त्याच्याही पार आहे. तो सर्वांच्या आचरणात आहे पण त्यावरची पुटे मात्र खरवडुन काढावी लागणार आहेत. पुढील लेखात आपण रा.स्व.वादी अर्थात गोळवलकरगुरुजीवादी हिंदुत्वावर चर्चा करत वेदांकडे पुन्हा वळुयात.