Monday, March 26, 2012

ग्रेस येथेच आहेत....!

कवी मरत नसतात. ग्रेस येथेच आहेत. फक्त नव्या अनुभुतींची नव्हाळी पहायला मिळनार नाही एवढेच.

"कवि गेला तेंव्हा ग्रीष्माचा आक्रोश उमदळत होता...
चौकटीत अडकला तेंव्हा हताश सुर्य एक होता...
तो कवि होता म्हणुनी रडल्या कितीक अभागी जमीनी
त्या पायी झिजला होता तो एक महाकवी होता...
कवि गेला तेंव्हा...

तो गेला अन उगाचच अगोचर भावना अनावर झाल्या
तो म्हटला होता...मी आलो अन भावना भावोत्कट झाल्या
या भावांनी जगलो आणिक मेलो जसे माणिक प्रुथेसम
तो म्हटला होता मी धरल्या नाही गोष्टी आल्या-गेल्या"

ग्रेस गेले. ते गेले नाहीत. त्यांची मला आवडती कविता येथे थरथरत्या हातांनी टंकित करतो आहे...

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई
कवी : ग्रेस

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...