माझे मित्र डा. मधुसुदन चेरेकर यांनी मला स्नेहपुर्वक सावरकरांवर शेषराव मोरे यांनी लिहिलेले दोन ग्रंथ (संक्षिप्त आवृत्या) आवर्जुन पाठवल्या व मी त्यावर लिहावे असे सुचवले. मी या माझ्या निकततम मित्राचा आभारी आहे. मी अत्यंत पुर्वग्रहरहित दृष्टीने त्यांनी पाठवलेले दोन्ही ग्रंथ आवर्जुन वाचले व आता त्यापैकी "सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग" या ग्रंथावर, व तेही दुस-यांदा वाचल्यानंतर लिहायला घेतो आहे.
पहिली बाब मी येथे स्पष्ट करु इच्छितो ती ही कि खुद्द सावरकरवाद्यांनाही सावरकरंची चिकित्सा कशी करायची हेच मुळात समजलेले दिसत नाही. सावरकरांच्या जीवनाचे खरे तर चार भाग पडतात. पहिला म्हणजे अंदमानपुर्व सावरकर, दुसरा म्हनजे अंदमानातील सावरकर, तिसरा म्हनजे अंदमानोत्तर सावरकर आणि चवथा म्हणजे गांधीहत्त्याकालोत्तर सावरकर. हे चारही सावरकर एक नसून एक व्यामिश्र संक्रमणांची एक मालिका आहे. या मालिकेने खुद्द सावरकरांचे जीवन ढवळुन निघाले असुन विरोधाभासी अनेक सावरकर समोर येतात व त्यांच्याकडे सलगपणे पाहणा-या शेषराव मोरेंसारख्या विद्वानांचीही गफलत होवून जाते. तशी ती या "सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग" या ग्रंथातही ठळकपणे दिसुन येते. आपल्याला मृत्योत्तर मोरेंसारखा एवढा चांगला वकील मिळेल याची सावरकरांनीही कल्पना केली नसावी.
या ग्रंथातील पहिल्याच प्रकरणातील (समाजाचा पाया विद्न्यान; धर्मशास्त्र नव्हे) डा. आंबेडकरांची जातीउच्चाटन करण्यासाठी धर्मशास्त्रेच कशी जबाबदार आहेत, सबब ती नष्तच कशी केली पाहिजेत ही मते नोंदवत मोरे असा युक्तिवाद करतात कि सावरकरही वेगळ्या भाषेत, म्हणजे "स्मृति-स्मृती-पुराणोक्त" प्रवृत्ती नष्ट केल्या पाहिजेत या शब्दांत सावरकर आंबेडकरांशी सहमती दर्शवतात. पोथीनिष्ठेऐअवजी विद्नानवादी धर्मच सावरकरांना अभिप्रेत आहे असेही अनेक युक्तिवाद मोरे करतात. पुढे मोरे असेही म्हनतात कि आंबेदकरांना अभिप्रेत असणारा "नवा धर्म" व सावरकरांना अभिप्रेत असणारा "विद्न्यानधर्म" याचा अर्थ प्रस्थापित वैदिक वा हिंदु धर्माचे उच्चाटन असाच आहे.....या हिंदु धर्माचा रुढ हिंदुधर्माशी नावाशिवाय कोणताच संबंध नाही.(पृष्ठ-९-१०-११)
जागतीक इतिहासात विद्न्यानाधारिक एकच धर्म निर्मण झाला होता व त्याचे नांव पायथागोरियन धर्म असे होते. गणित हेच मुलभुत धर्मतत्व आहे असा या धर्माचा दावा होता. अर्थात हा धर्म जन्मासोबतच संपला हे वेगळे. मुळात विद्न्यानाधारित "हिंदु" धर्म हेच एक भाकड मित्थक आहे. कोणताही धर्म, अगदी बौद्ध वा जैनही, विद्न्यानाधारित असु शकत नाहीत व नव्हते हे सावरकरांना वा त्यांच्या ज्येष्ठ वकीलांना माहित नसावे व सावरकरांना आंबेडकरांच्या पंक्तीत आणुन बसवण्याचा प्रयत्न करायचा एवढाच या प्रकरणाचा मतितार्थ आहे. असो. याच प्रकरणात मोरे अजुन एक धाडसी विधान करतात व ते हे कि, "सावरकर हिंदुत्ववादी असले तरी त्यांच्या हिंदुत्वाचा संबंध समाजसुधारणेशी येत नाही. त्यांचे हिंदुत्व म्हनजे "हिंदुधर्म" नव्हे. हिंदुधर्माला जेवढी मान्य आहे तेवढीच समाजसुधारणा स्वीकारायची..." (पृष्ठ १४) खरे तर हे विधान स्वयंस्पष्ट आहे. सावरकरांना धर्ममर्यादेत बसेल एवढीच समाजसुधारणा अभिप्रेत होती हे याच विधानात स्पष्ट दिसत असतांना हेच मोरे पुढे म्हणतात कि "त्यांच्या समाजकारणाचा पाया बुद्धी वा उपयुक्ततावाद हा होता...हिंदुत्ववाद हा नव्हता." येथे एकतर मोरे यांची सावरकर समजण्यातील गफलत आहे किंवा सावरकरांचेच विचार परस्परविरुद्ध आहेत. माझ्या मते दुसरी शक्यता अधिक आहे. म्हणजे हिंदु धर्माच्याच चौकटीतील सुधारणा सावरकरांना हव्यात आणि असे म्हणतांना हिंदु धर्माची चौकट न मोडता बुद्धीवादी-उपयुक्ततावादी समाजकारण त्यांना अभिप्रेत होते हे मोरेंचे युक्तिवाद तद्दन भंपक आहेत हे उघड आहे. कारण "हिंदुत्व" तर हवे पण समाजकारणासाठी तेही नको..., हिंदु हे लोकांचे नांव आहे व हिंदु धर्माचा अर्थ "हिंदु लोकांनी स्थापलेले धर्म" असा घेतला पाहिजे, असे सावरकरांचे मत मोरे जेंव्हा आपल्या शैलीत सांगतात तेंव्हा दोन अर्थ होतात, पहिला म्हणजे मोरेंना सावरकर तरी समजलेले नाहीत किंवा सावरकर हे अत्यंत भोंगळ विचारांचे व धर्मेतिहास काडीएवढाही माहित नसलेले गृहस्थ होते. हिंदु लोकांनी स्थापलेला म्हनजेच ज्याला सावरकर "हिंदुभु" म्हणतात त्या भुमीत स्थापित धर्म...जैन, बौद्ध, शीख इ. याऐवजीचे हिंदु भुमीत स्थापन न झालेले धर्म हे परके व एवतेव त्यागणीय आहेत असाच मतितार्थ सावरकरांच्या म्हनण्यावरुन निघतो. याचाच दुसरा अर्थ असा कि त्यांना अशा "हिंदु" लोकांचे एकत्व या अहिंदु धर्मांशीच्या लढ्यासाठी आहे. त्यात समाजकारण नसुन निखळ धर्मकारण आहे. त्यामुळे सावरकर हे विद्न्याननिष्ठ धर्माचे कामना करत होते हा मोरेंचा नि:ष्कर्ष सरळ बाद होतो.
सावरकरांचे चातुर्वर्ण्यौच्चाटक व जात्युच्छेदक विचार हे कोनत्या कोणातुन मोरेंना उदार वाटतात हे त्यांनाच माहिती. त्यासाठी ते जे सावरकरांचे सात युक्तिवाद मांडतात. या युक्तिवादात (पृष्ठ १६-१९) बुद्धीवाद नसुन सरळ सरळ चातुर्वर्ण्याचीच भुमिका घेत, जुन्या काळातही त्यात दोष होते हे मान्य करत, पटवून देत, किमान रोटीबंदी व स्पर्शबंदी तरी आपण तोडु शकतो असा पुरोगामी आविर्भाव दिसतो. मोरे हे सांगायचे विसरतात कि हे सावरकरांनी कोणाला उद्देशुन आणि कधी लिहिले. सावरकरांचा उदात्त हेतु क्षणभर गृहित धरला तरी एक बाब येथे लक्षात घ्यावी लागते ती ही कि सावरकरांनी स्वत: कधीही यातील एकही बंदी मोडलेली नाही. (अस्पृष्यांसोबतचे सहभोजनादि कार्यक्रम स्तुत्य असले तरी ते म्हणजे धार्मिक जोखडे सर्वस्वी झुगारणारे कार्य नवे.) महात्मा फुलेंबाबत "त्यांनी अस्पृय्ष्यांसाठी स्वतंत्र शाळा मागितल्या पण सावरकरांनी त्यांच्यानंतर २५ वर्षांत अस्पृष्य व सवर्ण एकाच शाळेत बसवण्याचे यशस्वी आंदोलन रत्नागिरी जिल्ह्यात घडवून आणले..." व्यक्तिपुजक चरित्रकार नेहमीच गोंधळ घालत असतात. महात्मा फुलेंनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा माहितल्यानंतर पन्नास वर्षानंतरचे आहेत, फुलेंचा म्रुत्यु १८९० ला झाल्यानंतरची वर्ष मोजुन मोरे काय साधु इच्छितात? सावरकरांनी चातुर्वर्ण्यावर प्रहार केले हे सांगतांना ते विसरतात कि त्यांच्याच कालात आंबेदकर त्याहीपेक्षा त्वेषाने आणि पुराव्यांसह चातुर्वर्ण्यावर तुटुन पडलेले होते व आंबेडकरांना फुल्यांची पुर्वसुरी होतीच. परंतु तसे सावरकरांच्या धर्मविषयक विचारांशी साधर्म्य असनारे गांधीजी मात्र मोरेंच्या चर्चेत येत नाहीत. सावरकरांनी गांधीजींशी कसलाही वैचारिक वाद वा संवाद साधला असल्याची ते माहिती देत नाहीत. आंबेदकरांना मात्र वेठीला धरत ते सावरकर व आंबेदकर यांच्या विचारांतील तादात्म्य सांगण्याचा मात्र प्रयत्न करतात...हे अनाकलनीय अशासाठी आहे, कि हे दोन विचारप्रवाहच मुलात परस्परविरुद्ध आहेत. आता हे मोरेंच्या लक्षात आले नसेल तर त्यांची वकीली फुकट गेली आहे असेच नाईलाजाने म्हणावे लागते.
सावरकरांचे विद्न्यान हे मुलात विद्न्यान नसुन वैद्न्यानिक अंधश्रद्धा याच सदरात मोडतात. ते कसे हे आपण पाहु. अनुवंशशास्त्र तर त्यांनी पार मोडीत काढलेले दिसते. "आज हिंदुंमद्धे ज्या विविध जाती आहेत, त्यामद्धे एकच रक्त खेळत आहे." येथेवर समजा ते खरे बोलत आहेत, (हे एकच रक्त फक्त हिंदुच नव्हे तर सर्वच मानवी प्रजातींत आहे असे विधान असते तर ते थोडेफार वैद्न्यानिक झाले असते.) पण लगेचच पुढच्या वाक्यात ते म्हणतात..."जेव्हा चार वर्ण निर्माण झाले अगदी त्याच दिवसापासुन एकच रक्त सर्व हिंदुंत संकरित होत आले आहे." आता यांना "रक्तसंकर" नांवाची कोनती वैद्न्यानिक उपाधी निर्माण करायची आहे? काही वैद्न्यानिक शब्द वापरले म्हणुन ते विद्न्यान होत नसते याचे भान सावरकरवादी कसे सोडतात त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
सावरकरांच्या स्त्रीविषयक मतांचा मी येथे परामर्ष घेत बसत नाही. कारण एकीकडे स्त्रीस्वातंत्र्य हवे म्हनत चुल आणि मुल हीसुद्धा राष्ट्रसेवाच आहे असे ते समजावुन सांगतात. म्हणजे तु पळ, पळु शकतोस, पण थांबलास तर तेही उत्तमच होय असे भोंगळ विधान करावे तसे त्यांचे स्त्रीस्वातंत्र्याबाबतचे विचार आहेत.
या पुस्तकात मोरेंनी सावरकरांचा जात्युच्छेदन, पतीतपावन मंदिर, अस्पृश्यांसह सहभोजनाच्या कार्यक्रमांचा आवर्जुन उल्लेख केला आहे. त्याबाबत मर्यादित परिप्रेक्षात का होईना, सावरकरांचे वर्तन अभिनंदनीय असेच आहे असे तत्कालीन कालसापेक्ष चौकटीत मान्य करावेच लागेल. परंतु त्यामुळे त्यांना युगप्रवर्तक समाजक्रांतीकारी अशी बिरुदावली बहाल करणे हे म्हणजे हास्यास्पद असेच आहे, कारण तोवर देशभर असंख्य गांधीअनुयायी ते समाजसुधारक संत अशी व याहुनही मोठी महत्कार्ये करतच होती. फुलेंनी त्याची सुरुवात ५०-६० वर्ष आधीच केलेली होती. परंतु आस्चर्याची बाब म्हनजे मोरे फुलेंचा उल्लेख अत्यंत अपवादात्मक करतात.
या पुस्तकातील मला जाणवलेले महत्वाचे मुद्दे म्हणजे, सावरकरांना हिंदु धर्मेतिहास मुळीच माहित नव्हता. किंबहुना हिंदु शब्दाची व्याख्या अत्यंत भोंगळ स्वरुपात त्यांनी केली जी त्यांच्याही अनुयायांनी ती मान्य केली नाही. वर्णव्यवस्था वा जातीव्यवस्थेच्या उगमाबाबत त्यांचे स्वत:चे असे कोनतेही ठाम मत वा संशोधन नव्हते, जसे बाबासाहेबांचे होते. "आपले सामाजिक बीज, रक्त, जातिजीवन नि परंपरा शुद्ध रहावी, संकराने विकृत होऊ नये यासाठी त्या त्या कालच्या हिंदुधर्मियांनी हिंदुराष्ट्राच्या हिताच्याच बुद्धीने ही जन्मजात जातिभेदाची प्रथा निर्मिली किंवा स्वयंप्रेरनेने निर्मु दिली..." (पृष्ठ ९५) हे विधान करणारे सावरकर विद्न्याननिष्ठ होते असे म्हननारे बहुदा स्वर्गीय नंदनवनात विहार करत असावेत. मुळात यांना हिंदु धर्म म्हणजे नेमके काय हे माहित नाही. हिंदु राष्ट्र नांचाची संकल्पना या देशात कधीही अस्तित्वात नव्हती हेही माहित नाही...तरीही ते इतिहासकार, विद्न्याननिष्ठ कसे ठरतात? खरे हेच आहे कि सावरकर हे चातुर्वर्ण्याचे छुपे समर्थक होते, व त्याचे अंश त्यांच्या अनेक विधानांत दिसतात. उदा. पृष्ठ ९६ वरील "पाप सर्वांचे: उत्तरदायित्व सर्वांचे" या मथळ्याखालील विवेचन पहावे. यात चातुर्वर्ण्य ही ब्राह्मण वा क्षत्रियांचेच पाप नसुन सर्व वर्णीयांचेच आहे म्हणुन सर्वांनीच त्याचे उत्तरदायित्व घ्यायला हवे असा आशय आला आहे.
या पुस्तकातील असंख्य विधानांचा परामर्श घेता येइल परंतु मी येथे या पुस्तकाविषयीचे माझे आकलन थोडक्यात मांडु इच्छितो.
१. सावरकर विद्न्यानवादी नसुन "वृथा-विद्न्यानवादी" होते. त्यांच्या वैद्न्यानिक म्हणुन मानल्या जाना-या एकाही विधानात विद्न्यान नाही.
२. हिंदुत्व या शब्दाबद्दल त्यांनी कितीही शब्दच्छल केला असला तरी त्यांना एतद्देशीय निर्मित धर्मांसहितचे हिंदुत्व हवे होते, व तसे हवे असा आग्रह आजही आर एस एस सारख्या हिंदुत्ववादी संघटना धरत असतात. म्हनजे जैन, बौद्ध शीख म्हणजे हिंदुच होत हा हिंदुत्ववाद्यांचा दावा मुलात या कोणत्याही धर्माला कधीही मान्य नव्हता व आजही नाही. थोडक्यात सावरकरांना अभिप्रेत हिंदुत्व हेच मुळात स्वार्थनिहाय पायावर उभे होते, शाब्दिक अभिव्यक्ती कशी का असेना.
३. सावरकर हे कधीही सामाजिक क्रांतीकारक नव्हते. तसा आरोप त्यांच्यावर करने हाच मुळात त्यांच्यावरील अन्याय आहे. सावरकर हे मुलत: सशस्त्र क्रांती मार्ग अवलंबनारे राजकीय व्यक्ती होते. अंदमानोत्तर काळात त्यांच्यावर राजकीय बंधने आली म्हणुन त्यांनी काही सामाजिक कार्ये (चळवळी नव्हेत) केली हे मान्य करुनही मुळात त्यांचा पींड हा सामाजिक कार्याचा वा विचारवंताचा नव्हता असे म्हनता येते.
४. सावरकरांनी काही सामाजिक कार्य केले म्हणुन ते समाजक्रांतीकारक होते, हे मोरेंचे विधान अत्यंत धाडसी व कोणत्याही सम्यक बुद्धीच्या विचारवंताला साजेसे नाही. असली कोणतीही "समाजक्रांती" म्हणता येइल, जी अन्यांनी त्यांच्या पुर्वी केलीच नव्हती, अशी बाब मुळात सावरकरांच्या बाबतीत लागु पडत नाही. क्रांती ही उपजत असते, अनुकरणात्मक, मर्यादित व स्वसापेक्ष नसते. कारण सावरकरांच्या मर्यादा यातच त्यांच्या वैचारिक अपयशाचे गुढ लपलेले आहे, परंतु प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकाने अभिनिवेशाच्या आहारी जात सावरकरांच्या कथित सामाजिक क्रांतीच्या भौगोलिक व कालीय चौकटी तपासुन पहाण्याचे कसब दाखवलेले नाही, हा त्यांच्या पुस्तकातील मोठाच दोष होय.
५. मुळात "सावरकर वाद" अस्तित्वात कधी होता काय आणि असल्यास त्याची नेमकी रुपरेखा काय याबाबत आजतागायत साधार विवेचन कोणी विद्वानाने केलेले नाही. खरे तर तसे कोणीतरी करायला हवे.
६. विशिष्ट भौगोलिक व जातीय मर्यादेपार सावरकर का जावु शकले नाहीत, यावरही मोरेंनी कसलीही चिकित्सा केलेली दिसत नाही.
७. सावरकरवाद समजा असला तरी त्याची तर्कशुद्ध व निर्भीड मांडनी करण्यात मोरेंना अपयश आलेले आहे. कोणत्याही कालातील संदर्भहीण विधाने, वक्तव्ये देत कोणताही वाद मांडता येत नसतो याचे मोरेंचे भान हरपले आहे. मी आधीच म्हटल्याप्रमाणे सावरकरांच्या जीवनाचे चार कालखंड व प्रत्येक कालखंडातील त्यांची त्याच विशिष्ट विषयांसंदर्भातील विचार क्रमाने आले असते तर कदाचित सावरकर समजावुन घ्यायला मदत झाली असती. पण तसे न करता काळाच्या संदर्भचौकटी उधळत मोरेंनी आपले व सावरकरांचे विचार लादण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे हा प्रस्तुत ग्रंथ होय.
मला हा ग्रंथ प्रेमपुर्वक चेरेकर सरांनी पाठवला. मला माहित आहे कि त्यांना माझे वरील आकलन आवडणार नाही. परंतु मी एवढेच सांगेल कि मी कसलाही पुर्वग्रह न ठेवता वरील लेखन केले आहे.