आज दुपारपर्यंतच शासनाने वाघ्याचा पुतळा जेथे होता तेथे व तसाच बसवला आहे. त्यामुळे मी उपोषण थांबवले असून आता संभाजी ब्रिगेड या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणुन घोषित करुन तिच्यावर कायमची बंदी घालण्यात यावी व तिच्या पदाधिका-यांना कायदेशीर शासन करण्यात यावे यासाठी मी व समविचारी नागरिकांच्या मदतीने केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत. या आंदोलनात मला पाठिंबा देणारे, माझ्यासोबतच कालपासुन उपोषणात सहभागी झालेले प्रा. हरी नरके, प्रकाश खाडे, सचीन शेंडगे यांचा व मला देशभरातुन पाठिंबा देणा-या हजारो ज्ञात-अज्ञात मित्रांचा नितांत आभारी आहे. हा लढा येथेच थांबणार नसून अशा सामाजिक विद्वेष माजवणा-या कोणत्याही जातीयवादी संघटना असोत त्यांचा पुरेपुर नित्पात केल्याखेरीज आम्ही गप्प बसणार नाही.
-संजय सोनवणी
९८६०९९१२०५