Thursday, August 2, 2012

वाघ्याची पुनर्स्थापना...ख-या इतिहासाचा विजय!








(वाघ्याच्या पुनर्स्थापनेसाठी केलेले उपोषण सोडताना श्री.संजय सोनवणी, सोबत प्रा.हरी नरके,श्री.प्रकाश खाडे, श्री.रविकिरण साने,महेश कडु, सचिन शॆंडगे, धनंजय झुरुंगे, श्री.काळे)

आज दुपारपर्यंतच शासनाने वाघ्याचा पुतळा जेथे होता तेथे व तसाच बसवला आहे. त्यामुळे मी उपोषण थांबवले असून आता संभाजी ब्रिगेड या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणुन घोषित करुन तिच्यावर कायमची बंदी घालण्यात यावी व तिच्या पदाधिका-यांना कायदेशीर शासन करण्यात यावे यासाठी मी व समविचारी नागरिकांच्या मदतीने केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत. या आंदोलनात मला पाठिंबा देणारे, माझ्यासोबतच कालपासुन उपोषणात सहभागी झालेले प्रा. हरी नरके, प्रकाश खाडे, सचीन शेंडगे यांचा व मला देशभरातुन पाठिंबा देणा-या हजारो ज्ञात-अज्ञात मित्रांचा नितांत आभारी आहे. हा लढा येथेच थांबणार नसून अशा सामाजिक विद्वेष माजवणा-या कोणत्याही जातीयवादी संघटना असोत त्यांचा पुरेपुर नित्पात केल्याखेरीज आम्ही गप्प बसणार नाही.

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

47 comments:

  1. व्हेरी गुड
    पण दादोजींच्या पुतळ्याचा काय?
    त्याची पुनर्स्थापना करताना त्याची जात आडवी येत आहे का?

    ReplyDelete
  2. संजयजी, आपल्या धैर्‍याला नमस्कार. छान केलेत आपण. बरं वाघ्या कुत्र्याला न्याय मिळाला. पण लाल महालातील जीजाऊ-बाल शिवबा आणि दादोजी कोंडदेव हे सोन्याचा नांगर हात आहेत त्या शिल्पाला आणि पर्यायाने दादोजींना न्याय कधी मिळणार? त्यासाठीही तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील.

    ReplyDelete
  3. संजयजी अभिनंदन....खरं सांगायचं तर शिवाजी महाराजांच्या नावावर जी अनागोंदी, मनमानी, तालीबानी सुरु झाली आहे, तिला समस्त रयतेने एक होऊन उत्तर द्यायला झालेली ही सुरवात आहे. यानिमित्ताने ब्री-गेडी विकृती व त्यांची वैचारीक गरळ महाराष्ट्राने पुन्हा एकदा अनुभवली. कारण कोणतेही असो, शिवसेना, शिवप्रतिष्ठान व तत्सम हिंदुत्ववादी कार्यकर्तेही जातपात विसरुन एक झाले. राष्ट्रीय समाज पक्षानेही आपले सारे बळ एकवटले. यातून वाघ्याची पुनप्रर्तिष्ठा झाली. दादोजी असो वा वाघ्या...शिवरायांप्रति निष्ठा व्यक्त करणाऱ्या प्रतीकांची जपवणूक ही झालीच पाहिजे. यापुढे, हरामखोरांची हरामी कोणीच सहन करता कामा नये. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळते, हे या निमित्ताने दिसून आले. आपण या आंदोलनाला आवश्यक वैचारिक, तात्विक अधिष्ठान दिले होते. दादोजी प्रकरण हरी नरके साहेबांनी व्यक्त केलेली भावनाही तर्कशुद्ध होती, ती म्हणजे इतिहासाची चिकित्सा करणे हे इतिहाससंशोधकांचे काम आहे... एकमेकांच्या पुस्तकांचे हवाले देत इतिहासाची विकृत मांडणी करण्यांना यापुढे खड्यासारखे दूर ठेवले पाहिजे. यातच महाराष्ट्राचे हित आहे.

    ReplyDelete
  4. सोनवणी सर आगे बढो हम आपके साथ है !

    उपोषणात सहभागी झालेले प्रा.हरी नरके, प्रकाश खाडे, सचीन शेंडगे व सोनवणी सरांना देशभरातुन पाठिंबा देणा-यांचे मनापासून खुप खुप धन्यवाद !!!

    त्यांची 'दादा'गिरी आता बंद...

    ReplyDelete
  5. संभाजी ब्रिगेड ने वाघ्या कुत्रा फोडल्याचे वृत्त समजले. वाघ्याचा उल्लेख तत्कालीन अथवा उत्तरकालीन कागदपत्रे- अथव बखरिंमध्ये आढळत नाही म्हणुन वाघ्याचा पुतळा फोडण्यात आला . आणि या बातमीचे कोल्हापुरचे इंद्रजीत सावंत यांनी समर्थन केले. याठिकाणी आधीच स्पष्ट करतो की वाघ्याचा उल्लेख तत्कालीन अथवा उत्तरकालीनही कोणत्याही बघर अथवा पुस्तकामध्ये नाही हे मलाही माहीत आहे आणि याठिकाणी विषय वाघ्या अस्तित्वात होता की नव्हता हा इथे नाहीच आहे मूळी . या ठिकाणी संभाजी ब्रिगेड ने वाघ्याचा पुतळा फोडला .. हा विषय आहे. आणि या संभाजी ब्रिगेड च्या कारवाईला वाघ्या कुत्रा अस्तित्वातच नव्हता म्हणुन तो खनुन काढला असे समर्थन केले जाते. असे असेल तर अशांना माझा एक प्रश्न आहे. ..ज्याप्रकारे वनखात्याच्या जमिनिवर त्या मराठ्यांवरील आक्रमकाचे उदात्तिकरण झाले आहे ते तुझ्या डोळ्यात खुपत नाही का ? ज्या महाराष्ट्रात शिवा काशीदांच्या समाधीला साधे छत नाही त्याच महाराष्ट्रार त्या हरामखोर अफजलखानाची समाधी आत्तराने पुसली जाते हे पाहुन तुला काहीच वाटत नाही ? याचा साधा अर्थ संभाजी ब्रिगेड च्या लोकांना अफजलखाना पेक्षा वाघ्या कुत्रा जास्त धोकादायक वाटतो हे विषेश . आणि आता जर वाघ्या फोडलाच असेल तर पुढे अफजल खान समाधीचे अतिक्रमण कधी खणायचा संभाजी ब्रिगेड चा मानस आहे किंवा आहे पण कि नाही आणि नसेल तर का नाही ?? तसेच सिंहगडाचा कोसळलेला कल्याण दरवाजा आणि प्रतापगडाचे कोसळलेले बांधकाम करायची तयारी आहे का ??? या प्रश्नांची उत्तरे इंद्रजीत सावंत किंवा वाघ्या फोडणारे देतील का ??
    वाघ्या कुत्र्याचा पुतळा फोडायची अक्कल आहे मग सिंहगडाचा कोसळलेला कल्याण दरवाजा आणि प्रतापगडाचे कोसळलेले बांधकाम स्वखर्चाने आणि स्वतःच्या हाताने बांधण्याची अक्कल नाही का आली? शिवराज्यअभिषेक दिनाच्या दिवशी पुतळा फोडणार होतात तेव्हा का नाही फोडला? कारण माहित होते की जमलेली सगळी गर्दी तुमच्या विचारांची न्हवतीच मुळात, आता जेव्हा कुणीच न्हवते तेव्हा फोडलात पुतळा? एवढीच धमक होती तर बांधायचा होता कल्याण दरवाजा, प्रतापगडाचे ढासळलेले बांधकाम. शिवाजी महाराजांना एका विशिष्ट जातीच्या चौकटीत अडकवत त्यांचे पुरेपुर अपहरण करण्याचा हा कट आहे. त्यासाठी जो मार्ग वापरला जात आहे तो सांस्क्रुतिक दहशतवादाचाच एक भाग आहे. तमाम महाराष्ट्रीयांनी या प्रव्रुत्तीपासुन सावध राहण्याची गरज आहे.जर वाघ्या तर सिंहगडाचा कोसळलेला कल्याण दरवाजा आणि प्रतापगडाचे कोसळलेले बांधकाम का नाही ?? आहे उत्तर वाघ्या फोडणार्‍यांकडे ??
    अफजलखानचे अनधिकृत बांधकाम , शिवरायांच्या जवळ-जवळ सर्वज किल्ल्य्यांची होत चाललेली दुर्दशा सिंहगडाचा कोसळलेला कल्याण दरवाजा आणि प्रतापगडाचे आणि सिंधुदुर्गाचे कोसळलेले बांधकाम असे विषय जाणीवपुर्वक बाजुला सारुन वाघ्या कुत्र्याला टार्गेट करण्यामागे शिवरायांप्रती प्रेम अथवा भक्ती असणे शक्यच नाही.

    ReplyDelete
  6. http://jwalant-hindutw.blogspot.in/2012/08/blog-post.html

    ReplyDelete
  7. राजे तुम्ही रक्त सांडले........ स्वराज्यासाठी...
    आम्ही आज तुमचे किल्ले बघतो......... केवल मजेसाठी ...
    तुमच्या मावळ्यानि कड़े चढले....... तुमच्या स्वप्नासाठी ...
    आम्ही आड़वाटे नेही थकून जातो.... किल्ल्यावर जाण्यासाठी ...
    तुमच्या सिंहाचे स्मारके .......आज युवकांचे दारूचे अड्डे ....
    सिंहगडाच्या पायथ्याशी.......... रेव पार्ट्याचे सडे...
    मराठ्याच्या स्मराकांची हे हाल आता बघवत नाही ..
    मराठा असल्याचे किल्यावर गेल्यावर बोलवत नाही ...

    राज गड पासून ते राय गडा पर्यंत च्या आजही शोधाव्या लागतात वाटा..
    हया देशात राजे तुम्ही होतात म्हणुन आज होऊ शकले बिरला अन टाटा ...
    शिर्डीच्या बाबाना सोंन्याचे सिंहासन अन छत्रपतीच्या समाधीला उन्हाच्या झळा...
    मराठ्याचे मंत्री अन राजकर्ते शिव जयंतीला निधी करोडोचा करतात गोळा..
    राज्याच्या नावावर आज निघतात कित्तेक सेना ...
    अन मराठी लोकांसाठी लढना-याचा नावावर दाखल होतो गुन्हा ...
    राजे बार झाले तुम्ही लवकर गेले
    नाहीतर हे दुखः तुम्हास सहन नसते झाले ..
    तुमच्या नावासाठी लढताना मेले ते तुमचे मावळे ..
    आज तुमच्या नावावर करतात राजकारण
    अन भरतात आपली घरे ते आमचे डोम कवळे...
    नशीब राजे गड तुम्ही डोंगरावर बांधले
    जर असते कधी जमिनीवर तर त्याचे सात बारा ह्यानी नक्कीच बदलले गेले असते...
    कवी ग्रीष्म करतो सगळ्याना एक विनंती
    रखा पावित्र्य गडाचे आज नाहीतर शोधावे लागतील पुरावे आमच्या इतिहासाचे ....

    ReplyDelete
  8. अभिनंदन संजय सर..........
    आता ब्रिगेड सारख्या जातीयवादी संघटनांना चांगलाच चोप बसला आहे.
    सत्य नेहमीच जिंकत असते ह्याचा प्रत्यय आला..........

    ReplyDelete
  9. ब्रिगेडी लोकांचा उथळपणा यातून दिसून येतो. त्यांना जे वाटते तसा तो इतिहास बदलू पहात आहेत. वाईट एकाच गोष्टीचे वाटते ब्रिगेड मधली तरूण पिढी दिशा चुकलेल्या जहाजा सारखी भविष्याकडे आगेकूच न जाता उलट मार्गी फिरत आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. सचिन शेंडगे,तुमचा व तुमच्यासारख्या तरूणांचा विचार करा.लांडग्याने सारं फस्त केल्यावर कळणार आहे का तुम्हाला ?

      Delete
  10. हिंमत असेल तर डोकावुन पहा इतिहासात....
    पेटतिल पिढ्यान-पिढ्या मशाली....
    गरजेल शिवभक्तांची रण किलकारी....
    वनव्यात बदलेल ही आग....
    लांडगे टोळक्याने फिरतात....
    ...अरे एकट्याने शिकार करतो हा राष्ट्रिय समाजाचा ढाण्या वाघ....
    शिवरायांचा स्वामिनिष्ट वाघ्या पुन्हा शिवरायांच्या सेवेत रुजु....
    निधड्या छातिने रस्त्यावर उतरुन केलेल्या सहकार्याबद्दल सर्व शिवभक्तांना लाख-लाख धन्यवाद....!!!!
    असेच सहकार्य वेळोवेळी अपेक्षीत आहे....

    वाघ्या पुन्हा शिवरायांच्या सेवेत रुजू ....ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय सोनवणी यांनी उपोषण सोडले

    वाघ्या पुतला फिरसे रायगड में बिठाया ...सभीका हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
  11. अभिनंदन. असेच उपोषण आपण बाबरी मशिदीच्या पुनर्स्थापनेसाठी कराल अशी आशा आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. मित्रा, तुमच्या माहितीत नाही, ठीक आहे...बाबरी मशीदीच्या विध्वंसाचा निषेध मी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या उपस्थितीतील नवी दिल्ली येथील जाहीतर कार्यक्रमात केला होता. माझी "सव्यसाची" ही ५०० पानी कादंबरी केवळ बाबरी मशीदीच्या विध्वंसाभोवती फिरते. कसलेही वक्तव्य करतांना किमान माहिती ठेवावी ही विनंती.

      Delete
    2. उपोषण करणे आणि कादंबरी लिहिणे यात फरक असतो हे आपणासारख्या प्रकांडपंडिताला उमगू नये हे एक गूढ रहस्यच आहे! बाकी वरील फोटोंवरून 'ग्रेट माइंड्स थिंक अलाईक' म्हणजे काय ह्याची अभूतपूर्व प्रचीती आली.

      Delete
  12. kal star majha war tumhi kay karnar mhanun vicharle ani tumhi mi uposhanla basen ase sangitale...ani punha blog lihun sahanbhuti milvnyacha prayant suru kela....ha dongipana band kara....

    sonawani tumhi kay kartay he tumhala mahit ahe...ha laal ghote pana band kara....

    ReplyDelete
  13. केवळ मराठा संघटनाना विरोध करण्यासाठी आणि आपण समाजवादी आहोत हे दाखवण्यासाठी हा लाळ घोटेपणा सुरु आहे..

    ReplyDelete
    Replies
    1. या प्रकरणी किमान दोन मराठा संघटनांनी संभाजी ब्रिगेडचा निषेध केला आहे. व्यक्तिगत पातळीवर शेकडो मराठा तरुणांनी ब्रिगेडच्या या कृत्याबाबत उद्वेग व संताप नोंदवला आहे. हा लढा मराठ्यांविरुद्ध नसून मराठ्यांनाही बदनाम करणा-या मराठा म्हणवणा-या हिंसक व विध्वंसक मंडळींविरुद्ध आहे. या मंडळीला मुळात मराठा म्हणवून घेण्याचा कसलाही नैतीक अधिकार नाही.

      Delete
    2. संजयजी, या लोकांचा अजब तर्क आहे. धर्म सांगितला की ते स्वतःला शिवधर्मी म्हणतात...आणि जात मात्र मराठा. स्वधर्माचे पालन करणारे, नव्हे त्याला मुघल आक्रमकांपासून वाचवणारे शिवराय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कुठे आणि मुघलांनाही लाजवणारे हे नपुंसक ब्रीगेडी कुठे? ज्या गोष्टी शत्रूंनाही आक्रमणे करुन जमले नाही, त्या गोष्टी हे लोक अर्धवटांच्या विखारी प्रचाराला (की आणखी कशाला, हे त्यांनाच ठावे) करीत आहेत, ही खरोखरच लज्जास्पद गोष्ट आहे. खबरदार, यापुढे रायगडाकडे डोळे वटाराल तर...हा संदेश त्यांनी या घटनेतून घ्यावा. अन्यथा, स्वतःच पेटवलेल्या आगीत तेच भस्मसात होतील, ही काळ्या दगडावरील रेघ आहे.

      Delete
    3. sambhaji brigade chi lachari hi NCP chya marathyanchya sattepudhe lal ghotanari ahe....tyanchyat ani vaghya kutryat kahich farak nahi !!!

      Delete
  14. सर,तुमच्या प्रयत्नांना यश आले,अभिनंदन.अहमदपुरातही काल मल्हार सेनेची बैठक होवून अहमदपूर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.तुमचे पुनश्च अभिनंदन.लोकशाहीत इतिहासाचा नेहमीच जय होतो असे नाही.लोकशाहीमध्ये मतांच्या संख्येला महत्व आहे.आपले प्रामाणिक उपोषण तसेच वाघ्याच्या समर्थकांच्या मतांची संख्या ध्यानात घेऊन हा पुतळा बसवण्यात आला असावा असे मला वाटते.आपले पुनश्च अभिनंदन!

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Sir. I always appreciate your kind support to the unity of our entire society. We are one and shall try to remain one forever. Thanks.

      Delete
  15. ब्रीगेडींना हि चांगलीच चपराक बसली आहे.ते ह्यापुढे अशी कृती करताना नक्कीच विचार करतील अशी अशा आहे.

    ReplyDelete
  16. खरे तर ह्यांनी (ब्रिगेड नी ) पडलेले किल्यांचा जीर्णोद्धार करणे शिवभक्ती केल्यासारखे झाले असते.अनेक किल्ले ढासळलेळे पाहायला मिळतात.पण ह्यांना जातीद्वेष भडकावत ठेवायचा आहे आणि पुतळे पाडून समाजात दहशत बसवायची आहे.शिवाजीचा आदर्श हि मंडळी कधी घेणार ? शिवाजी हा काही एका जातीचा थोडाच होता ?

    ReplyDelete
  17. Congratulations sir to you and all those courageous people who were with you.

    ReplyDelete
  18. संभाजी 'बी' ग्रेडच्या गुंडगिरीविरुद्ध उभे रहायची हिंमत दाखवणारा एक तरी माणूस महाराष्ट्रात आहे हे बघून आनंद झाला.

    राष्ट्रवादीच्या आधाराने फोफावलेल्या या दहशतवादाच्या विषवल्लीला समूळ नष्ट करणे आवश्यक आहे नाहीतर ती बहुजनांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

    तुम्ही तुमचे पत्र व कुठे पाठवत आहात तो पता इथेही द्या आम्हीही समर्थनाची पत्रे लिहू.

    ReplyDelete
  19. संजय सर, हरिभाऊ आणि त्यांच्यासोबत असणार्‍या सर्वांचेच,

    या ऐतिहासिक यशाबद्दल अभिनंदन. विक्रमी वेळेत वाघ्याच्या पुतळ्याची पुन:प्रतिष्ठापना झाली व उपोषण सुरु होताक्षणीच विक्रमी वेळेत मागणी मान्य झाल्यामुळे सोडण्यात आलेले हे जगातिल कदाचित सर्वात अल्पायुषी उपोषण असावे

    सर्वांचेच हार्दिक अभिनंदन. असेच आपण एकत्र सोबत राहूयात मग कोणाची टाप आहे समाजाला घातक अशा कारवाया करायची? सर्वांना त्रिवार मुजरा

    ReplyDelete
  20. वाईट याचे वाटते कि तुमचे, हरी नरके यांचे पुरषोत्तम खेडेकर यांचे मतभेद झाल्यापासून तुम्ही कुचाळकी लोकानी लादलेला इतिहास खरा आहे हे सांगण्यासाठी जंग जंग पछाडत आहात..वाघ्या पुतळ्याचे समर्थन करताना तुम्ही केवळ विरोधाला विरोध म्हणून हि उठाठेव करीत आहात..जे तुम्ही करीत आहात ते काय आहे हे तुम्हाला चांगले माहित आहे..कृपया असे करू नका..हि फितुरी आहे..

    ReplyDelete
  21. sir dadoji kondevan veli ka thumi lok pudhe alat nahi karan te brahman hote mhanun aajche vijay nakich sambaji brigrade la cjhaprak ahe pan tumchya sarkhya lokan kadun sarwsamveshak vicharachi apeksha aahe

    ReplyDelete
  22. maratha yuvakannahi aata kalun chukle aahe ki brigade khara itihaas naawaachya shodhaane tarun peedhila bharkatawat aahe. hyaane pragati konaachich honaar naahi aahe. lawkarach bharkatlele yuvak jaateeyte pekshaa deshachya pragati saathi ladhtana distil ashi apeksha thewu........

    ReplyDelete
  23. पुतळा बसवणे किंवा काढणे हा खरा मुद्दाच नसावा. पुतळ्याभोवती समाजाच्या भावना केंद्रित करून त्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि समाजात फूट पाडणे हा या कृत्यामागील मूळ उद्देश असण्याची शक्यता आहे. तो साध्य देखील झालेला आहे. ही कृत्ये संतापाच्या भरात होत नसून अतिशय थंड डोक्याने जाणीवपूर्वक केली जात आहेत असे वाटते. शिवाजी महाराजांपासून ते फुले शाहू आंबेडकर यांना सामाजिक ऐक्यासाठी न वापरता सामाजिक विभाजनासाठी वापरणे हा खरा हेतू असण्याची दाट शक्यता आहे.
    प्रत्येक जातीच्या सामाजिक अस्मिता प्रथम टोकदार होईपर्यंत कुरवाळणे आणि नंतर त्या हेतुपूर्वक दुखावणे हा कार्यक्रम सतत चालू राहिला तर समाज मानसिक दृष्ट्या मनुस्मृतीच्या काळात गेल्यासारखेच चित्र निर्माण होईल. बहुजनांच्या हातूनच त्यांच्या महापुरुषांचा पराभव घडवून आणण्याची ही योजना ज्यांनी तयार केली त्यांच्या बुद्धीला मात्र दाद द्यायलाच हवी.

    ReplyDelete
  24. संभाजी ब्रिगेडने आत्म परीक्षण करावे...भाग १
    "अति घाई संकटात नेई " असे एक ब्रीद आपण सर्वांनी रस्त्याच्या कडेला वाचलेच असेल. परंतु अति घाई कशी आणि किती संकटात नेते हे समजून घेण्यासाठी संभाजी ब्रिगेड ने वाघ्या प्रकरणी केलेल्या आंदोलनाकडे पहावे लागेल.मुद्दा बरोबर असताना सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या या आंदोलनाचा कसां फज्जा उडाला आणि नवीनच शत्रू ब्रिगेड ने कसा निर्माण केला हे उभ्या महारास्त्राने पहिले आहे. मुळात ब्रिगेड चे हे आंदोलन पूर्वनियोजित नव्हते असे एकंदरीत वाघ्याच्या प्रकरणावरून लक्षात येते. कुणालाही कसलीही कल्पना नसताना अचानक वाघ्या काढण्यात येतो आणि साक्षात ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनाही याची माहिती नसते यावरून हे लक्षात येईल.एकतर ही वेळ पुतळा काढण्याची नव्हती आणि येन केन प्रकारेण काढलाच होता तर तो पुतळा तिथेच लपवून ठेवायला नव्हता पाहिजे.तो उध्वस्त करायला पाहिजे होता. दादोजी प्रकरणात ब्रिगेड ने जर असे आततायी कृत्य केले असते तर ते एखादे वेळी माफ केल्या गेल्या असते. कारण त्यावेळची पुतळा काढण्याची अपरिहार्यता. पण वाघ्या संदर्भात मात्र असे म्हणता येत नाही. दुसरी गोष्ट दादोजी प्रकरणात ब्रिगेडने २००३ ते २०११ अशी सलग ८ वर्ष वाट पहिली.आणि या ८ वर्षाच्या काळात ब्रिगेडने जो प्रचार आणि प्रसार केला त्याला भारताच्या सामाजिक आंदोलनाच्या इतिहासात तोड नाही. या भरभक्कम प्रचारा मुळे दादोजी चे शिल्प अगोदरच जनतेच्या मनातून उध्वस्त झाले होते. फक्त बाकी होते ते दादोजींचा पुतळा काढणे. परंतु वाघ्याच्या संदर्भात जून २०११ ते ओगस्ट २०१२ एवढंच कालावधी ब्रिगेडने घेतला. बर या कालावधीत कुत्रा कसा चुकीचा आहे, त्याला ऐईहासिक पुरावा कसा नाही आणि या कुत्र्यामुळे शिवरायाची कशी बदनामी होते यावर ब्रिगेडने रान उठवायला पाहिजे होते पण आरक्षण की पुतळा या द्विधा मनस्तीतीत ब्रिगेडने एकाही मुद्द्याला न्याय दिला नाही. आरक्षणा बाबतीतही ब्रिगेडने अशीच धरसोड केली. मुळात आरक्षणा बाबतीत सर्व मराठा संघठणाणमधेच एक वाक्यता नव्हती आणि ज्या मराठा समाजासाठी आरक्षनाची मागणी लाऊन धरण्यात आली त्या समाजालाच आरक्षनाची गरज कधी लक्षात आली नाही म्हणा किंवा त्याचे महत्व लक्षात आले नाही. म्हणून यासंदर्भात जेवढा समाज रस्त्यवर यायला पाहिजे होता तो कधी आलाच नाही. आणि हा मुद्दा कधीच कोणत्या संघटनेने समाजाला पटवूनही दिला नाही. बर आता १५ ओगस्ट ही आरक्षणाची डेडलाईन मिळाली असताना ब्रीगेडनेच नको त्यावेळी वाघ्याची घाण करून ठेवली. यामुळे ब्रिगेडची "तेलही गेले तूपही गेले हाती आले धुपाटणे " अशीच अवस्था झाली. पुतळाही बसला, बदनामीही झाली आणि कार्यकर्त्यान्वर फुकट केसेस पडल्या.

    वाघ्या प्रकरणात ब्रिगेडला हरी नरके, संजय सोनवणी यांनी महादेव जाणकर ला हाताशी धरून घरचाच आहेर दिला होता तेव्हा ब्रिगेडने हे प्रकरण सांभाळून हाताळायला हवे होते. जाणकर ची गरज नरकेला का पडली कारण माळी समाज हा नर्केच्या पाठीशी नाही आणि आपला समाज कोणता आणि आपला बाप कोणता याचा त्या सोनवनीला पत्ता नाही.बहुजन वर्गात मोडणारे लोक विरोधात असताना ब्रिगेडने हे आंदोलन थोडे संयमाने करायला पाहिजे होते. पण दादोजी प्रकरणामुळे हम करे सो कायदा अशी घमेंड कदाचित ब्रिगेडला आली आणि या देशात लोकशाही आहे याचा विसर त्यांना पडला असावा. आधीच नरके ब्रिगेडला "फुले-आंबेडकर विरोधी " दाखवण्यासाठी धडपडत होता त्यात वाघ्याचे प्रकरण करून ब्रिगेडने नरके- सोनवनेरूपी माकडाच्या हाती कोलीत देण्याचा प्रकार केला. मुळात नरके आणि सोनवनीच आंबेडकरवादी नाहीत. त्यात महादेव जाणकर आणि धनगर समाजाचे जाती अंताच्या लढाईत काय योगदान आहे हे राज्यात सर्वांना ठाऊक आहे. असे असतानाही या लोकांनी ब्रिगेडला परिवर्तन विरोधी ठरवणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच.वाघ्या प्रकरणानंतर या लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या वाचूनच या लोकांची वैचारिक उंची समजते. संजय सोनवनिचेच पहा वाघ्या काढला असे ऐकताच या घाबरट माणसाने ब्लॉगवर काय लिहावे?

    ReplyDelete
  25. संभाजी ब्रिगेडने आत्म परीक्षण करावे...भाग 2
    ...ही वेळ आपण सर्वांना गुडबाय करण्याची आहे.
    मित्रांनो....बहुदा ही वेळ आपण सर्वांना गुडबाय करण्याची आहे. मी गेली दोन वर्ष वाघ्याच्या स्मारकाबाबत लिहिले...तो एवढा काळ तरी सुरक्षीत राहिला. आताच ज्या बातम्या मी पाहिल्या त्यानुसार तो उध्वस्त केला गेला आहे. आता पुढचे टार्गेट मीच असणार याबाबत शंका असण्याचे मला काही एक कारण दिसत नाही. मी भयभीत नाही. मला जीवाची पर्वा नाही. असती तर असले पंगे मी घेतलेच नसते. या देशात कायदे हे सत्ताधारी जातींच्याच हातात होते व आहेत. ते म्न्हनतील ते कायदे. अशा स्थितीत मी आहे तरी कोण? वाघ्या हटवला...पोलीस बंदोबस्त असुन हटवला...मग त्या हटवण्याला सातत्याने विरोध करणारा हा यश्किश्चित सोनवणी कोण? मलाही हे हटवनार याबद्दल मला कसलीही शंका उरलेली नाही. जे एका स्मारकाचे रक्षण करु शकले नाही ते माझे करतील यावर तर विश्वास नाहीच, आणि मला ती अपेक्षाही नाही. पण मला एक सांगायचे आहे...वाघ्याचे स्मारक हटवुन जी झुंडशाहीची प्रवृत्ती दृष्ठीअल्याड आली आहे ती महाराष्ट्राचाच बळी घेवून थांबनार यात शंका नाही. यात माझा बळी गेला तर त्यात काय आश्चर्य?

    मी कोठे जाणार? याच मतीत जन्माला आलो त्याच मातीत मिळनार...पंण ही माती द्वेषाने ओतप्रोत ओथंबलेली आहे. मेहरबानी करा...मला या मातीत गाडु नका...कि येथे जआळुही नका...समुद्रात फेकुन द्या...

    किमान जलचरांचे पोट तरी भरेल...


    आता असले नालायक लिखाण करणाऱ्या हरामखोरांना जर विचारवंत म्हटले जात असेल तर अशा लोकांचा मानसोपचार तज्ञा करवी इलाज करण्याची गरज आहे. वाघ्या काढला हे ऐकूनच हा हरामखोर एवढा भयभीत झाला होता की त्याला वाटले आता ब्रिगेडवाले आपल्याला संपवतील.मुळात संभाजी ब्रिगेड ही अशा नालायकांना खिजगिनतीतही धरत नाही हा आज पर्यंतचा इतिहास आहे. असले डरपोक लोक परिवर्तनाची भाषा करू शकत नाहीत. म्हणूनच हा सोनवणी "जिकडे खोबरं तिकडे चांगभलं" असा वागतो. वाघ्या बसवल्यानंतर याची प्रतिक्रिया काय तर "मी जिंकलो संभाजी ब्रिगेड हरली." वाघ्या काही सोनवनीचा बाप नव्हता मी जिंकलो म्हणायला. हा नालायक जर स्वताला विचारवंत समजतो तर त्याने "सत्य जिंकले आणि असत्य पराभूत झाले " म्हणायला पाहिजे होते. छोट्याश्या गोष्टीने उन्मादात जाणारे विचारवंत नसतात तर विकारवंत असतात हे बिगेडणे ध्यानात ठेवायला हवे. महाड येथील वर्तमान पात्रातील सोनवनीचे स्टेटमेंट वाचून भल्या भल्यांना तोंडात बोटे घालायची वेळ आली. याचे स्टेटमेंट काय वाचा "वाघ्या जर नाही काढला तर आम्ही धनगरांच्या मुलींवर बलात्कार करू अशी संभाजी ब्रिगेडची धमकी. " आत्ता बोला.हा यांचा वैचारिक लढा. धनगर तर सोडाच पण ब्रिगेडच्या एकाही कार्यकर्त्याने कधी ब्राह्मण महिलांबद्दल असे उद्गार काढल्याचे महाराष्ट्र देशाला माहित नाही. ही आहे यांची वैचारिक उंची. हा सोनवणी सतत "ओल्ड मोंक " नावाची दारू ढोसत असतो, अशा हलकट आणि दारूबाज व्यक्तींकडून हीच अपेक्षा महाराष्ट्र करू शकतो. बर या सोनवनीला सत्याचा एवढाच ध्यास आहे तर जेम्स लेन प्रकरणात हा उपोषणाला का नाही बसला? हा उघड उघड जातीयवाद आहे.

    ReplyDelete
  26. संभाजी ब्रिगेडने आत्मपरीक्षण करावे...भाग 3

    नरके तर स्वताचे कौतुक स्वताच करून आधुनिक आंबेडकर बनण्याचा प्रयत्न करत आहे. उठ सूठ आंबेडकरी तत्वज्ञानाचे डोस पाजणाऱ्या नरकेने वायफळ बडबड न करता सगळा माळी समाज घेऊन भुजबळांसहित बौध धम्म स्वीकारावा.तरच तो खरा आंबेडकरी ठरेल. दुसरा वाघ्याचा भाऊ म्हणजे मधुकर रामटेके. याने फक्त बाबा साहेबांच्या जातीत जन्म घेतला म्हणून हा आंबेडकरी नाहोतर यांच्या सारखा जातीयवादी शोधूनही सापडणार नाही. काय तर म्हणे "मी एवढा कट्टर आंबेडकर वादी आहे की बाबा साहेबांना आधुनिक बुध समजतो." याला एवढेही माहित नाही की कट्टरवाद तो मग ब्रिगेडचा असो की रामटेकेचा असो तो हिटलर वादातच मोडतो. पण ब्रिगेडचा कट्टरवाद हिटलर च्या वळणाचा आणि आपला म्हणजे मानवतावादाचा असा यांचा गैर समज दिसतोय. बर या कट्टर आंबेडकरवाद्याने किमान बाबा साहेबांच्या म्हणन्यानुसार तरी वर्तन करावे ना? बाबासाहेब म्हणाले होते की "राजर्षी शाहूंचा जन्मदिन दलितांनी एखाद्या सणासारखा साजरा करावा." आणि हा रामटेके ज्या नरके-सोनावानीच्या ओंजळीने पाणी पितो ते तर कट्टर शाहू द्वेस्टे आहेत. या द्वेशातूनच या नराधमांनी जगभर प्रचलित असणाऱ्या "फुले-शाहू-आंबेडकर " चळवळीचे नामकरण केवळ "फुले-आंबेडकरी " चळवळ असे केले एवढा यांचा पराकोटीचा शाहू द्वेष . मग असे करणे कोणत्या "कट्टर आंबेडकर वादात " बसते याचे उत्तर रामटेके देतील काय? असे करणे हा बाबा साहेबांचा अपमानच नव्हे काय? मग अशा दुटप्पी माणसांनी ब्रिगेडवाल्यांना आंबेडकरवाद शिकवू नये. बर वाघ्या प्रकरणात जेव्हा संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर तथाकथित हल्ला झाला तेव्हा या रामटेकेला एवढ्या उकळ्या फुटल्या की त्याने आता कसं वाटतंय? असा प्रश्न विचारणे सुरु केले. हे पण कट्टर आंबेडकरवादाचेच द्योतक मानायचे काय?

    आता उरला प्रश्न "राष्ट्रीय समाज पक्षाचे " गल्लीतही माहित नसणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जाणकर यांचा. पुतळा बसवला तो यांच्या पक्षाला घाबरून नव्हे तर सामाजिक समतोल खराब होऊ नये म्हणून शासनानेच ही तत्परता दाखवली. पण या राष्ट्रीय नेत्याचे स्टेटमेंट पहा "वाघ्याला हात लावाल तर महादेव जाणकरशी गाठ आहे." राष्ट्रीय नेत्याच्या वर्तनावरून त्याच्या समाजाचे मूल्यमापन होत असते. एकीकडे महादेव जानकर यांना शत्रू समजू नका असे आव्हाहन करणारे ब्रीगेडवाले पहिले की या जानकरची वैचारिक उंची लक्षात येते आणि ब्रिगेड आज सुधा बहुजनवाद किती पराकोटीने जपते याचा प्रत्यय येतो. नरके-सोनवणी-रामटेके आणि आत्ता आत्ता जानकर यांच्या संबंधी ब्रिगेडचा व्यवहार पहिला की ब्रिगेडचा शत्रू निश्चित आहे आणि तो फक्त आणि फक्त ब्राहमनच आहे हेही लक्षात येते. मग प्रश्न येतो तो संभाजी ब्रिगेडच्या मराठा समजा विषयीच्या "सोफ्ट कॉर्नरचा." कोणताही व्यक्तीच्या मनात आपल्या समाजाच्या व्यक्तीच्या विषयी मनात सोफ्ट कॉर्नर निर्माण होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परशुराम हा क्षत्रियांचा कर्दनकाळ असूनही ब्राह्मण समाजाचा देव ठरला. आजही अफझल खानचा विषयजरी काढला तरी स्वताला शिवभक्त समजणाऱ्या मुसलमानांना सुधा या विषयावर बोलणे नको वाटते. दलितांनी चौक बाटविला म्हणून गायीच्या मुत्राने चौकाचे शुद्धीकरण करणाऱ्या छगन भुजबळांना नरके-सोनवणी-रामटेके ने जाहीर झोडपले नाही. उलट त्यांच्याच तुकड्यावर आजचा गालीच्च प्रकार होत आहे. अहो एवढेच कशाला इंग्रजांना घाबरून शिवरायांच्या ऐवजी कुत्र्याच्या स्मारकाला मदत करणारे होळकर सुधा धनगरांच्या अस्मितेचा विषय झालेच की नाही? मग आपण शिवरायाचा अपमान करणाऱ्या कुत्र्याला अस्मिता मानावी आणि ब्रीगेडवाल्यांनी स्वजातीय लोकांना बोलूही नये? हा कुठला न्याय झाला.वारंवार ब्रिगेडला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधनार्यांना शरद पवारांसमोर लोटांगण घालणारा आणि शेपटी घोळनारा समतावादी छगन भुजबळ कसाकाय चालतो? अहो परिवर्तन म्हणजे "बाहेर्चीला लुगडी आणि घरचिला नागडी ठेवणे नव्हे." परिवर्तनाचा उपयोग जर आपल्याच समाजाला होत नसेल तर असल्या परिवर्तनाला काय चाटायचे काय?(continue...)

    ReplyDelete
  27. संभाजी ब्रिगेडने आत्मपरीक्षण करावे...भाग 4
    तोंडात फुले-आंबेडकरांचे नाव घेऊन भांडारकर संस्थेच्या गाद्या गरम करणाऱ्या नरके पेक्षा ब्रिगेडवाल्यांचा आंबेडकरवाद केव्हाही एक नम्बरीच. नाहीतरी आता छगन भुजबळ-गोपीनाथ मुंडे-राष्ट्रीय नेते महादेव जानकर यांनी शिवसेना भाजपशी छुपी हात मिळवून सत्ता हस्तगत करायची तयारी चालवलीच आहे. म्हणजे सत्तेसाठी तुम्हाला ब्राहमणवादीही चालतात तर तुमचा असला आंबेडकर वाद हा बहुजन समाजाला जास्त घातक आहे हे समजण्या एवढा बहुजन मुर्ख नक्कीच नाही. ब्रिगेड वाल्यांनी वेळ चूकवली आणि या हरामखोरांना कोल्हेकुई करण्याची संधी मिळाली.नाहीतर यांना त्या वाघ्या कुत्र्याएवढेही कुणी विचारले नसते. या वादात आणखी एका प्राध्यापकाने उडी घेतली आणि आपली अक्कल पाजळली. हे महाशय म्हणजे प्रा.श्रावण देओरे. त्यांचे म्हणणे असे की " कुत्रा हा हीन प्राणी आहे म्हणून हे ब्रीगेडवाले त्याला काढायची मागणी करतात. त्या ऐवजी तिथे घोड्याचा पुतळा असला असता तर त्यांनी काढायची मागणी केली नसती."कुत्रा हा हीन प्राणी आहे हे मान्य असूनही एका प्राध्यापकाने घोड्याचे वीधान करावे हेच हास्यास्पद आहे. या प्राध्यापकाला एवढीही अक्कल नसावी की नंदीबैल हा मांगल्याचे प्रतिक असूनही त्याची जागा देवळात नसून बाहेरच असते.त्याला कोणी महादेवाच्या बोकांडी बसवत नाही. मग शिवरायाच्या समाधी पेक्षा उंच असणारा वाघ्या ब्रिगेडने का सहन करावा ?

    असो. राज्यात अजूनही बरेच प्रश्न शिल्लक आहेत. त्यातही मराठ्यांचे प्रश्न जास्तच गंभीर आहेत.जागतिकीकरणात मराठा काळाच्या मागे जात आहे.या साठी काय करता येईल या संबंधी ब्रिगेडने ठोस भूमिका घ्यावी. इतिहासामुळे अस्मिता जागी होते पण पोटात भूक असताना नुसत्या अस्मितेने पोट भरत नाही याचेही भान हवे. बाकीचे हौसे गौसे नौसे परिवर्तनवादी सोबत न घेता ही संभाजी ब्रिगेडने फक्त आणि फक्त मराठ्याची जरी मोट बांधली तरी भरपूर झाले. वरील माकड छाप राष्ट्रीय नेते कितीही सत्ता हस्तगत करण्याच्या मागे लागले तरी मराठ्यांच्या मता शिवाय यांना सत्तेचे स्वप्नही पाहता येणार नाही. आणि ब्रिगेडला विरोध होण्याचे कारणही हेच आहे. या हरामखोरांचे विचार आणि यांचे तर्कट बघितले की लक्षात येते यांचा एकाचाही पायपोस एकाला नाही. पण वरील सर्वामध्ये एकच मुद्दा सामाईक आहे तों म्हणजे मराठा द्वेष. या एकच मुद्यावर हे सगळे संभाजी ब्रिगेडच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांचा हा मराठा द्वेष्ट जातीयवाद कधीच यशस्वी होऊ न देणे ब्रिगेडच्या हातात आहे. आजही खऱ्या खुऱ्या आंबेडकर वाद्यांचा ब्रीगेद्लाच पाठींबा आहे.तो टिकवून ठेवावा. अजूनही ब्रिगेड गाव पातळीवर पोचली नाही त्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.प्रशिक्षण शिबिरानेच कार्यकरत्यंना वेगळी दिशा मिळते त्यात सातत्य ठेवावे. नव नवीन लेखक वक्त्यांना संधी द्यावी. समाजाची आर्थिक घडी व्यवस्थित बसवावी. आणि विशेष म्हणजे सारा महाराष्ट्र आपल्याच बापाचा आहे अश्या अविर्भावात वागणे बंद करावे. वाघ्या मुळे एक नवीन दिशा ठरवून आणि मरगळ झटकून कामाला लागावे. आपल्या सारख्याच बहुजन समाजातील छोट्या छोट्या समाज घटकांना सोबत घेऊन चालावे. अशी वाटचाल सातत्याने चालू ठेवल्यास शिवरायांचे स्वराज्य पुन्हा दिसेल. नाहीतर नरके-सोनवणी-रामटेके सारख्या बाटग्यांना सोबत घेऊन आम्ही सारे जात बांधव पेशवाई आणायला टपलेलेच आहोत.

    ReplyDelete
    Replies
    1. prof.Sanjay Sonavani Shri.shivalik verma yani chaar bhagat mandlelya ya vicharana? uttar dya...

      Delete
    2. " छगन भुजबळ-गोपीनाथ मुंडे-राष्ट्रीय नेते महादेव जानकर यांनी शिवसेना भाजपशी छुपी हात मिळवून सत्ता हस्तगत करायची तयारी चालवलीच आहे "

      राष्ट्रवादीने पुणे महापालिकेत शिवसेना आणि भाजपशी युती केली तेव्हा ब्रिगेडची दातखीळ बसली होती का? तेव्हा राष्ट्रवादीला ब्राह्मणवादी का ठरवले गेले नाही?

      Delete
  28. shivalik verma>> तुमच्या चार भागातील प्रतिक्रिया वाचल्या. उत्तर देण्यासारखं तसं काहीच नाही पण अगदी थोडक्यात उत्तर देतो.

    मुळात ब्रिगेड ही अजेंडालेस संघटना आहे. ब्रिगेडकडे विचारवंत नसल्यामूळे कुठेही जाऊन धडकतात ते. आता पर्यंत बामणांशी झालेल्या धडका-धडकीत ब्रिगेडची सरशी होत गेली. बामण मोठे चतूर त्याना तिथे माघार घेतली व जिथून वार करायला पाहिजे तिथून घाव घातलाच. अन असे घाव अधून मधून ते घालत राहतील. ब्रिगेडीना ते कळणारही नाही. आता तुम्ही म्हणाला की हे बामण भेडक आहेत. मागून वार करतात. त्यावर उत्तर असे आहे की तो गनिमी कावा आहे. तुमच्या शिवबानीच त्याची सुरुवात केली. तो जर शिवबांना चालतो तर बामणाना का चालू नये. उलट समस्त मराठ्यानी बामणांची स्तूती करत शिवबाचा गुण जपल्या बद्दल समस्त बामणांचा सत्कार प्रत्येक ब्रिगेडीनी फूलं देऊन करावा. इति बामण अध्याय समाप्त.

    आता वाघ्या प्रकरणावर थोडसं.
    मुळात वाघ्या होता की नाही यावर दळण दळण्य़ापेक्षा त्या गोटीयार(कि गोटीये)नी पुण्य़ात देवीच्या हातून तलवार घेणारा शिवाजी बसविला त्यावर ब्रिगेड भ्र शब्द बोलत नाही. याचे कारण काय असेल? कारण तो पुतळा व मंदिर RSS नी बांधला. म्हणून त्याला विरोध नाही. पण वाघ्या हा बहूजनानी बांधला म्हणून त्याला ब्रिगेडचा विरोध. थोडक्यात काय तर ब्राह्मण व संघवाले ब्रिगेडला चालतात. जे चालत नाही ते म्हणजे बहुजन. बास!
    नाहीतर मराठा समाज नेहमी ब्राह्मणहिताचे वागत आला आहे. खुद्द शिवाजी महाराज सुद्धा ब्राह्मणांचा ताफा रायगडावर पोषत असत. राज्यभिषेकाच्या वेळी शिवाजीनी ब्राह्मणांवर केलेली उधळपट्टी ही बहुजनांच्या रक्तामासाच्या पैशातून मिळविलेली होती. त्याचा धरून पुढे ब्राह्मण-मराठा अशी मोठी परंपरा महाराष्ट्रत होती ते दिसून येते. बामणांकडे धर्मसत्ता तर मराठ्यांकडे राजसत्ता हे शेकडो वर्षाचं समिकरण आहे. म्हणन तर पुण्य़ातील संघाने(बामणाने) बांधलेल्या शिवाजीच्या मंदिराच्या उदघाट्नासाठी मराठे मोठ्या दिमाखात हजर झाले व ब्रिगेड्नी आपली मूक संमती दिली.
    बहुजनाना ब्रिगेडचे हे बामण प्रेम दिसले. ब्रिगेडचा खरा शत्रू बामण असल्याचा कितीही आव आणला तरी आतून त्यांची हात मिळवणी आहे हे जाहिर आहे. अन वाघ्या वरुन तर ब्रिगेडनी चक्क धनगर बांधवांच्या विरोधात दंड थोपट्ले. अन ब्रिगेड रक्तबंबाळ झाली.
    -----------------
    थोडसं महादेव जानकरां बद्दल.
    बिचा-या प्रतिक्रिया देणा-याला हे ही माहित नाही की जानकर साहेब कोण आहेत? अहो राष्ट्रिय समाज पक्षाच्या स्थापनेच्या कित्येक आधीपासून ते बहूजन चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते होते. अन त्यांच्या राष्टिय नेतेपदावर जे कमेंट केले ते करण्या आधी किमान त्यांच्या बद्दल गुगलवर सर्चतरी करायचं ना. तुम्हाला कळलं असतं त्यांच साम्राज्य केवढं मोठं आहे.

    ---------------

    शाहू महाराजांबद्दल:-
    तुम्ही शाहू महाराजांबद्दल वर जे लिहलात त्यावर मी जाहिर काय लिहू. अरे तुम्हा मराठ्याना काल पर्यंत शाहू महाराज माहित तरी होते का? आम्हीच केला त्यांचा मान सन्मान. आज जर उभ्या भारताला शाहू महाराज माहित असतील तर ते आमच्यामूळेच. तुमच्या मराठा समाजानी तर चक्क दत्तक पुत्र म्हणून त्यांचा अपमान केला. ब्रिगेड शाहू महाराजांचं नाव घेते ते स्वार्थापोटी. आदरापोटी जर शाहुंचं नाव कुणी घेत असेल तर ते आम्ही. तेंव्हा शाहुं महाराजांची बढाई तुम्ही ईतरांकडे मारा. आमच्याकडे मारायची गरज नाही.
    जाऊद्या आता थांबतो.
    जयभीम
    ---
    एम. डी. रामटेके.


    राहिला प्रश्न आमच

    ReplyDelete
    Replies
    1. आधी तुम्हीच ब्राह्मण चतुर आहेत आणि ब्रिगेडी मूर्ख आहेत म्हणता. ब्राह्मणांनी ब्रिगेडवर घाव घातला असेही म्हणता. परत तुम्हीच ब्राह्मण आणि ब्रिगेडी यांची हात मिळवणी आहे असे देखील म्हणता. आधी तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ते ठरवून घ्या.

      Delete
    2. "मुळात ब्रिगेड ही अजेंडालेस संघटना आहे. ब्रिगेडकडे विचारवंत नसल्यामूळे कुठेही जाऊन धडकतात ते.आता पर्यंत बामणांशी झालेल्या धडका-धडकीत ब्रिगेडची सरशी होत गेली. बामण मोठे चतूर त्याना तिथे माघार घेतली व जिथून वार करायला पाहिजे तिथून घाव घातलाच." तुमच्या या विधानाला मी स्वतंत्र उत्तर देत नाही. याचे उत्तर Anonymous याने दिले आहे.म्हणून तुम्ही तुमचा वैचारिक गोंधळ मिटवा.


      "....त्यावर उत्तर असे आहे की तो गनिमी कावा आहे. तुमच्या शिवबानीच त्याची सुरुवात केली. तो जर शिवबांना चालतो तर बामणाना का चालू नये. उलट समस्त मराठ्यानी बामणांची स्तूती करत शिवबाचा गुण जपल्या बद्दल समस्त बामणांचा सत्कार प्रत्येक ब्रिगेडीनी फूलं देऊन करावा. इति बामण अध्याय समाप्त."
      पहा शिवप्रेमाचा आव आणत वाघ्याची भलामण करनार्यांचे खरे शिवप्रेम. शिवबा कुणाचा? तर तुमचा म्हणजे मराठ्यांचा आणि वाघ्या काय तुमचा बाप लागतो काय आधुनिक वीचारवन्तांनो? या लोकांनी म्हणजेच "हरी नरके-प्रा.श्रावण देवरे-संजय सोनवणी-रामटेके " यांनी ज्या ज्या गुप्त बैठका घेतल्या त्या मध्ये या लोकांनी शिवाजी महाराजांची प्रचंड निंदा नालस्ती केली. शिवरायांना सर्व सामन्यांच्या नजरेतून संपवण्याचे बेत आखले.रामटेकेच्या "तुमचा शिवाजी " या महाराजा बद्दलच्या कुत्सित वाक्यातून याची झलक आपण पाहिलीच असेल.मग यांना वाघ्याचा आणि धनगरांचा एवढा पुळका का येतोय हेही ध्यानात घ्या.


      "मुळात वाघ्या होता की नाही यावर दळण दळण्य़ापेक्षा त्या गोटीयार(कि गोटीये)नी पुण्य़ात देवीच्या हातून तलवार घेणारा शिवाजी बसविला त्यावर ब्रिगेड भ्र शब्द बोलत नाही. याचे कारण काय असेल? कारण तो पुतळा व मंदिर RSS नी बांधला. म्हणून त्याला विरोध नाही. पण वाघ्या हा बहूजनानी बांधला म्हणून त्याला ब्रिगेडचा विरोध. थोडक्यात काय तर ब्राह्मण व संघवाले ब्रिगेडला चालतात. जे चालत नाही ते म्हणजे बहुजन." तुमच्या या आक्षेपावर 'सर्वसमाज' या ब्लॉगवर खालिलप्रमाणे उत्तर देण्यात आले आहे. ते मन लाऊन वाचा बास्स.
      "... गोटियेने जे मंदिर बांधले ते खाजगी जागेवर आहे. वाघ्याचा पुतळा शिवरायांनी उभारलेल्या रायगडावर आणि महाराजांच्या समाधी शेजारी आहे. तुम्हाला वाघ्या हवाच असेल, तर सोनवणी यांनी आपल्या खाजगी जागेवर त्याचे भव्य स्मारक बांधावे. त्यासाठी सरकारकडून जमीन मिळविली तरी आमची काही हरकत नाही. आम्ही पाठींबा देऊ. हवी असल्यास वर्गणीही देऊ...वाघ्याची खोटी गोष्ट सत्य ठरविण्याचा अधिकार तरी संजय सोनवणी (तसेच नरके-देवरे-रामटेके )यांना कोणी दिला?"


      "खुद्द शिवाजी महाराज सुद्धा ब्राह्मणांचा ताफा रायगडावर पोषत असत.राज्यभिषेकाच्या वेळी शिवाजीनी ब्राह्मणांवर केलेली उधळपट्टी ही बहुजनांच्या रक्तामासाच्या पैशातून मिळविलेली होती" शूद्रांना राज्याभिषेकाचा अधिकार नव्हता म्हणून लाच (रामटेकेच्या शब्दात उधळपट्टी ) देऊन तो शिवरायांना करावा लागला असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या "शुद्र पूर्वी कोण होते ?" या ग्रंथात सविस्तर सांगितले आहे.ते जरा निवांत वाचा. ब्राह्मणांनी केलेला पहिला राज्याभिषेक नाकारून शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक शकत पद्धतीने केला, त्यावेळी त्यांनी दलित स्त्रीशी विवाहदेखील केला.


      "शाहू महाराजांबद्दल:-
      तुम्ही शाहू महाराजांबद्दल वर जे लिहलात त्यावर मी जाहिर काय लिहू. अरे तुम्हा मराठ्याना काल पर्यंत शाहू महाराज माहित तरी होते का? आम्हीच केला त्यांचा मान सन्मान. आज जर उभ्या भारताला शाहू महाराज माहित असतील तर ते आमच्यामूळेच.तुमच्या मराठा समाजानी तर चक्क दत्तक पुत्र म्हणून त्यांचा अपमान केला.ब्रिगेड शाहू महाराजांचं नाव घेते ते स्वार्थापोटी.आदरापोटी जर शाहुंचं नाव कुणी घेत असेल तर ते आम्ही.तेंव्हा शाहुं महाराजांची बढाई तुम्ही ईतरांकडे मारा. आमच्याकडे मारायची गरज नाही.
      जाऊद्या आता थांबतो."
      शाहू महाराजा बद्दल जाहीर काय लिहू? मग गुप्त बैठका घेऊन शिवरायान्सारखी शाहू राजांची पण बदनामी करनर आहात काय? आदरापोटी जर तुम्ही शाहूंचे नाव घेतले असते तर "फुले-शाहू-अम्बेडकर" चळवळीतील शाहू वगळून फक्त "फुले-आंबेडकर" संबोधणाऱ्या नर्केच्या पेकाटात तुम्ही दोन लाथा घातल्या असत्या.यावरून कोण स्वार्थी आहे हे लक्षात येते.आणि हो तुम्ही (म्हणजे सर्वजणच)आता थांबू नका,कारण आत्ता कुठे सुरुवात झाली आहे रामटेके साहेब.

      Delete
    3. वर्माजी तुम्ही अतिशय मुद्देसूद आणि योग्य भाषेत उत्तरे देत आहात. तुमच्या हजरजवाबी पण आणि ज्ञान वाखाणण्याजोगे आहे. कुठे ढोंगीपणा नाही . धन्यवाद आमच्या मनातील भावना लोकापर्यंत पोचवल्या बद्दल

      Delete
    4. एम.डी.रामटेके,ज्या पध्दताने शिवाजी महाराजांबद्दल नियोजनबध्द पध्दतीने कुचाळकी चालू आहे.त्याचपध्दतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,शाहू महाराज यांचेही अवमूल्यन चालू आहे.त्यात फक्त शिवरायांशी संबंधित कारस्थान तुम्हाला माहित आहे किंवा वापर करून घेतला जात आहे.तुमच्याच चांडाळचौकडीमधील काहींचे बामसेफच्या आडून बाबासाहेब व बौध्दधम्म यांविरोधातील फेसबुक व ब्लॉगच्या माध्यमातून चालू असलेली मोहिम पहा.जागे व्हा.स्वतःचे मार्गदर्शक स्वतः बना......

      Delete
  29. ज्या दिशेने हे सर्व चालले आहे ते पाहता लवकरच सर्वच जातींना हिटलर हा आदर्श पुरुष वाटू लागेल. फुले शाहू आंबेडकर हे जातीद्वेषाच्या ढिगाऱ्याखाली कधी गडप होतील याचा पत्ताही लागणार नाही.

    ReplyDelete
  30. तीच तीच भंपक चर्चा ..!! जग कुठे चाललेय आणि आपण गुवातच लोळतोय..!!अरे मित्रांनो या जुन्या गोष्टींचे दळण दळतांना एवढे लक्षात ठेवा कि पूर्वीपासून जे जे काही घडत होते त्याला त्यावेळचे संदर्भ , भौगोलिक परिस्थिती , सामाजिक परिस्थिती असे अनेक पैलू होते.त्यानुसार त्यावेळचे जीवन होते. ते त्या ठिकाणी बरोबरच होते किंवा त्याबाबतीत आपण आत्ता काहीही अनुमान काढू शकत नाही.( म्हणजे बरोबर किंवा चूक...?)
    आपला मूर्खपणा हा आहेकी आपण आत्ता या घडीला पुराणातल्या वान्ग्यांवरून आपलीच एकमेकांची चड्डी ओढतो आहोत. अरे मी म्हणतो शिवाजी महाराजांचा वाघ्या कुत्रा असेल किंवा नसेल,भट ब्राम्हणांनी त्यावेळी नंगा नाच घातला असेल , ब्राम्हणेतर जातींची त्यावेळी प्रचंड कुचंबना असेल सगळे ठीक आहे....परंतु या गोष्टींमध्येच रममाण होऊन आपण आपले वर्तमान विसरतो आहोत.आता तर तसे वातावरण नाहीना , मग दाखवा कि आपल्या xxxxx तला जोर..! उपद्रवी काम तर कोणीही करेल त्याला डोक्याची आवश्यकता नाही परंतु विधायक कामाला दम लागतो.आता तर कुणाची मक्तेदारी नाही मग का इतिहासाच्या कुबड्या घ्यायच्या? इतिहासाचाही सहारा लागेल परंतु कश्यासाठी तर प्रतिकूल परिस्थितीत टाळके कसे वापरावे यासाठी..!!कोण कुठला काल्पनिक शेरलोक होम्स , त्याच्या स्मृती त्या ब्रिटिशांनी कश्या जपून ठेवल्या ते पहा.आपण आपल्याच इतिहासाची वासलात आपल्या हातांनी लावायला चाललो आहोत.मी म्हणतो नव्हता न वाघ्या कुत्रा ,तर त्याच्या समाधीच्या बाजूला एका फलकावर व्यवस्थित संदर्भांसहित लिहून ठेवा ना कि ते कसे चुकीचे आहे .कोण तुम्हाला अडवेल.परंतु उठसुठ विखारी भाषा वापरून ,आड दांड पणा करून असे वागणे चुकीचे आहे त्यामुळे समाजात चुकीचाच संदेश जाणार , हशील तर काही होणार नाही.
    महाराजांच्या समाधीच्या बांधकामाच्या वेळीच जर वाघ्याची समाधी बांधली असेल तर ती माझ्या मते ऐतिहासिकच...!!तिची तोडफोड करण्यापेक्षा मी वर सांगितलेला उपाय केला तर जेव्हढे रायगडला भेट देतात त्यांच्या वाचनात तरी हि गोष्ट येईल .
    जाता जाता शेवटी , मला तर इतिहासाचा महाराज आणि शंभूराजे एक सोडले तर कुणाशीही घेणे नाही.आणि मला सन सनावळ्या ,महत्वाच्या नसलेल्या भंपक गोष्टी कि ज्यावरून बिनकामाचा गदारोळ होईल अश्या ,आणि वरील दोघांव्यतिरिक्त कोणीही दुसरा
    यांच्याशी काहीही घेणेदेणे नाही.परंतु याचा अर्थ असा नाही कि मी त्यांच्यावर गरळ ओकत बसेन..!कोणत्या क्षणी महाराज कसे वागले आणि का वागले आणि त्यातून काय बोध घ्यायचा एव्हढेच माझ्या लेखी महत्वाचे.त्यांच्या चरित्रातून जीवनातल्या प्रत्येक गोष्टीवर बोध घेता येईल ,त्यांचे विचार आणि आचार अंगिकारले तर या भंपक गोष्टींची कीवच येईल कारण त्यांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र असा कदापीही नव्हताच .उलट महाराजानंतर आणि शाम्भूराजानंतर आपण जी त्यांच्या अभिप्रेत असणार्या गोष्टींची जी काही वाट लावली आहे कि आपल्या शत्रुंनीही ती तेव्हढी केली नसेल ! महाराज जर वरून पाहत असतील तर हाच का तो आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र असा यक्ष प्रश्न त्यांना पडला असेल.
    आणि हो एव्हढा पत्र प्रपंच ह करायचे कारणही नव्हते , आणि मला तर याविषयी बोलायचेही नव्हते परंतु हा चाललेला पोरखेळ पाहून मला माझीच लाज वाटली .संजय सोनावानींचे मी अभिनंदन करेन कारण त्यानाही अभिप्रेत सर्व धर्म समभाव आहे ,उगीचच कारण नसतांना डोक्यात राख घालून घ्यायची नाहीये .त्यांना खरा शिव धर्म कळलेला आहे.आणि हा डबक्यात चालणारा गलिच्छ खेळ करून आपणच आपल्या अंगावर शिंतोडे उडवून घेत आहोत.

    जय शिवराय....!!!!

    ReplyDelete
  31. All the hope lies with you...thank you for doing this for us...maharastra needs people like you..take care..jay hind !

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...