महारक्षक ते महार... एक प्रवास!
(आजच्या महाराष्ट्र टाईम्समद्धे शुद्धोदन आहेर यांनी लिहिलेले माझ्या "महार कोण होते?" या पुस्तकावरील परिक्षण).
19 Aug 2012, 0000 hrs IST
शुद्धोधन आहेर
मानवी समाजाच्या ऐतिहासिक विकासकामात भारतीय उपखंडात आलेला ' जातिसंस्था ' हा विषयसमाजशास्त्रज्ञांनाच नव्हे , तर अनेक चिंतनशील संवेदनाक्षम व्यक्तिमत्त्वांनादेखील आव्हानास्पद वाटतो आहे .भारताच्या इतिहासात व वर्तमानातही जातिसंस्थेने घातलेला हैदोस हा संतापजनक असाच आहे . हल्लीच्याकाळात अनेकविध कारणांमुळे जातिसंस्थेचे भौतिकशास्त्र बदलत असून तिच्या विखंडनाची प्रक्रियाही वेगवान होतचालली आहे . त्यामुळे तिच्या समाजघटकांचाही विविध प्रकारे अभ्यास होत आहे . ' महार कोण होते ? ' हे संजयसोनवणीलिखित पुस्तक यादृष्टीने दखलयोग्य आहे .
महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासात , पूर्वास्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या महार समाजाचे महत्त्व अनन्यसाधारणआहे . डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातिसंस्था निर्मूलनवादी चळवळीचा एक प्रमुख घटक असणाऱ्या यासमाजाने अत्यंत विपरित परिस्थितीशी संघर्ष करून डोळ्यांत भरणारी शैक्षणिक व तदानुषंगिक प्रगती केली आहे .ही प्रगती काहींच्या असूयेचा तर काहींच्या कुतुहलाचा विषय झाला आहे . मंडलोत्तर काळात आत्मभान आलेल्याओबीसी बुद्धिमंतांच्या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे संजय सोनवणी या सर्जनशील महारविषयक कुतूहलानेझपाटले आणि त्यातून प्रथम ' ... आणि पानिपत ' ही कादंबरी जन्माला आली . इसवी सन १६८० ते १७६१ याकालखंडातील राजकीय संज्ञासंघर्षाचा तत्कालीन महार समाजाच्या नजरेतून धांडोळा घेताना संजय सोनवणीयांना काही भौतिक साधनसंपत्ती प्राप्त झाली असावी . खरेतर ' पानिपत ' कार विश्वास पाटील यांच्यापेक्षा ' ...आणि पानिपत ' कार संजय सोनवणींसमोरील आव्हान हे कित्येक पटीने खडतर होते . त्यात त्यांनी ब्राह्मणसमाजातील पात्रांचे व्यक्तिचित्रण यथायोग्य अलिप्ततेने रेखाटले आहे . तथापि , ब्राह्मणी ' इगो ' न कुरवाळण्याचाअपराध (!) त्यांनी केल्यामुळे तिचा ' गाजावाजा ' करण्यात आला नाही , हा भाग अलाहिदा ! ' महार कोण होते ? 'या प्रस्तुत पुस्तकात , महार या शब्दाचा उदय शोधताना लेखकाने पाली साहित्याचा आधार घेतला आहे . पालीसाहित्य हे भारताच्या ऐतिहासिक संचितांचा अनमोल असा साठा आहे . या साहित्याचे निर्माते प्रामुख्याने बौद्धभिक्खू आहेत . त्यांनी राजापासून रंकापर्यंत सर्वांना दुःखमुक्त करण्याचा वसा घेतलेला असल्याने त्यांचे जीवनविश्वआशयसंपन्न होते . त्यामुळे तत्कालीन समाजजीवन पाली साहित्यात उत्कृष्टरित्या प्रतिबिंबित झाले आहे . अशापाली साहित्यात अनेकदा वापरल्या गेलेल्या ' महारक्षक ' या शब्दाचा संबंध महार या शब्दाशी जोडला जाऊशकतो , असे लेखकाचे प्रतिपादन आहे . हे महारक्षक संपूर्ण गावातील शूर , प्रसंगावधानी , धैर्यशाली व विशेषतःप्रामाणिक व्यक्त िंमधून निवडले जात आणि त्यांच्यावर संपूर्ण गावाच्या रक्षणाची जबाबदारी असे . हे कार्यदर्शविणारा महारक्षकी हा शब्द , महारकी या शब्दाचा पूर्वसूरी ठरतो . थोडक्यात , महारक्षक या सन्माननीयपदनामाचे परकीय मुस्लिमांच्या राजवटीत महार या जातनामात रूपांतर झाल्याचा निष्कर्ष लेखकाने काढला आहे.
लेखकाचा हा निष्कर्ष काही प्रमाणात कुतूहल शमविणारा आहे , हे खरे आहे . कोणे एके काळी एखादे कुलदैवतमानणारी टोळी एकच आडनाव घेऊन विविध जातींमध्ये विभागली गेली , असे प्रतिपादन दुसरे एक ओबीसीविचारवंत प्रा . श्रावण देवरे यांनीही केले आहे . मात्र सोनवणी यांच्या प्रतिपादनातून उद्भवणारा नवा प्रश्न म्हणजे ,महारक्षक हे पद देशातील ( देशाच्या काही भागांतील ) इतर प्रांतांत देखील असणार . मग महार केवळमहाराष्ट्रातच का आढळतात ? पंजाब , राजस्थान , गुजराथ या प श्चिमेकडील राज्यांत मिहिर , म्हार , मेहरा असेशब्द आढळतात . परंतु उत्तर प्रदेश , बिहार अशा प्रांतांतील ' महारक्षक ' कुठे गेले ? पाली भाषेचा प्रभावजवळपास सर्वच भारतीय भाषांवर पडला आहे . मग ' महारक्षक ' या पदाचे अवशेष हिंदी भाषिक वा दक्षिणेकडीलपट्ट्यात आढळतात का ? आढळत असतील तर कसे व नसतील तर का नाही ? लेखकाने अथवा या विषयातस्वारस्य असणाऱ्या इतर कोणीही या अशा प्रश्नांची संशोधनपर उत्तरे शोधण्यास या विषयावर अधिक प्रकाश पडूशकेल .
या पुस्तकात लेखकाने आजचे संक्रमण व उद्याची झेप याचेही विवेचन केले आहे . आजची संक्रमणावस्था ही सर्वचसमाजातील गोंधळाच्या रूपाने प्रतिबिंबित झाली आहे . परंतु जात आता तिच्या विरुद्ध गुणधर्मात रूपांतरित होऊलागली आहे . त्यामुळे अनेकदा ती उच्च जातीयांना बाधक तर कनिष्ठ जातीयांना तारक ठरू लागली आहे . जातीचेहे बदलते गतिशास्त्र जातिसंस्थासमर्थकांचा पराभव सूचित करणारे आहे . हे गतिशास्त्र बदलविण्यामागील एकमहत्त्वाचा घटक महार समाज आहे . उदाहरणार्थ , या वर्षीच्या डॉ . आंबेडकरजयंती कार्यक्रमात हाताळण्यातआलेले काही विषय बघा , डॉ . आंबेडकरप्रणीत जातिसंस्था निर्मूलनाची व्यूहरचना , ओबीसींचा मंडल अहवालआणि डॉ . आंबेडकर , आमचा आदर्श सम्राट अशोकाचा भारत , अर्थसंकल्प आणि मागासवर्गीय , ब्राह्मणवाद विरुद्धबहुजनवाद इ . या अशा कार्यक्रमांतून अभ्यासपूर्ण वक्तृत्व करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बोलाविलेजाते . गैरसोयींची कोणतीही पर्वा न करता हजारो सुशिक्षित , उच्चपदस्थ कार्यकर्ते या प्रक्रियेत आपले योगदान देतअसतात . प्रा . आ . ह . साळुंखे , प्रा . हरी नरके यांसारखे बिनीचे विचारवंत घडविण्यात या कार्यक्रमांचा फार मोठाहातभार लागला आहे .
या प्रक्रियेत इतर समाजाचा सहभाग वाढावा म्हणून कित्येक ठिकाणी डॉ . आंबेडकर जयंतीसह शिवजयंती वमहात्मा फुले जयंतीचेही आयोजन करण्यात येते . वीज , पाणी , भूमिसिंचन , संततीनियमन , हिंदू कोड बिल ,खेतीविरोधी चळवळ यांबाबत डॉ . आंबेडकरांनी सर्वसामान्य भारतीयांसाठी अमूल्य योगदान दिले आहे . स्टेट्सअँड मायनॉरिटीज व भारतीय संविधान यांबाबतही सर्वसामान्यांना हळूहळू का होईना पण कळू लागले आहे .परिणामी जातीय पूर्वग्रह बाळगणाऱ्यांचा अपवाद वगळता मोकळ्या मनाने विचार करणाऱ्या सर्वजातीयभारतीयांना डॉ . आंबेडकरांचे महत्त्व पटू लागले आहे . त्यामुळे डॉ . आंबेडकर जयंती कार्यक्रमाकडे पाहण्याचीत्यांची दृष्टीही नितळ होत चालली आहे . विशेषतः सर्व बहुजन समाजाने या प्रक्रियेतील सहभाग वाढविल्यासजयंती कार्यक्रमांतील त्रुटींचे निराकरण होत जाईलच शिवाय त्यातून आजच्या संक्रमणावस्थेतून बाहेर पडण्याचामार्गही मोकळा होईल .
कोणत्याही निर्मितीला स्थळकाळाच्या मर्यादा असणे अपरिहार्य असते . ' महार कोण होते ? ' हे पुस्तकही त्यालाअपवाद नाही . जातिसंस्थेतील स्थानबदल , शूद्र या संज्ञेविषयी काही आवश्यक विवेचन , महार समाजाबाबतकाही नामवंतांची निरीक्षणे या अशा गोष्टींनी पुस्तकांचे आशयमूल्य निश्चितच वाढले असते . शिवाय शाम्यांच्याविनाशाचा ऐतिहासिक प्रसंग परिशिष्ट स्वरूपात समाविष्ट करून जातीय अहंकाराचे दुष्परिणामही मांडता आलेअसते . असे जरी असले तरी महार या शब्दाची पाली भाषेच्या अंगाने उत्पत्ती शोधणारे हे पुस्तक जातिसंस्थेच्याअभ्यासकांना उपयुक्त ठरणारे आहे . त्यामुळे ' महार ' या शब्दाविषयी स्वारस्य असणाऱ्यांनीच नव्हे तर सर्वचवाचकांनी त्याचे वाचन , चिंतन , मनन करून प्रसंगी वादविवाद करून जातिसंस्था निर्मूलनाच्या प्रक्रियेला हातभारलावणे गरजेचे आहे .
...........................................................................
' महार कोण होते ? '
संजय सोनवणी
प्रकाशक - पुष्प प्रकाशन , पुणे
पृष्ठं - ११०
किंमत - १०० रु .