Saturday, June 1, 2013

हा देशच शिव-शक्तीमय आहे!

वैदिकवादाची पुढची पायरी म्हणजे वैष्णववाद होय. चवथ्या शतकापर्यंत माहितही नसलेला हा ऋग्वेदातील दुय्यम देव "पांचरात्र" या श्रीकृष्णाच्या पुरातन अवैदिक संप्रदायातील काही तर काही बौद्ध तत्वे उचलत प्रचलित केला गेला. स्त्री-पुरुष विषमतेचा खरा पाया वैष्णवांनी घातला. समुद्रतळी लक्ष्मी त्याचे पाय चेपत बसलेली असते. लक्ष्मीला एकंदरीतच विष्णुच्या एकुन व्यक्तिमत्वात स्थान नाही. त्याउलट शिव-पार्वती हे पुरातन समतेच्या मुल्यावर जीवन जगणारे जोडपे...सारीपाट खेळणारे...भांडनारे...एकमेकांवर रागावणारे...रुसणारे...स्वतंत्र व्यक्तिमत्चे जपून असलेले हे जोडपे. स्त्री-पुरुष समतेचा आद्य आविष्कार शिव-शक्ती ऐक्यातून आपल्याला दिसून येतो.

अवैदिक व्यक्तिमत्वे हडप करण्यासाठी अवतार संकल्पनेचा जन्म घालण्यात आला. बुद्धालाही  नववा अवतार बनवून टाकले. श्रीक्रुष्ण जो सात्वतांत पांचरात्र मतातून वासुदेव रुपात पुर्वीच भजला जात होता त्यालाही वैष्णव करुन टाकले. वासुदेव भक्ती ही इसपू दुस-या शतकापर्यंत लोकप्रिय होती हे आपण ग्रीक राजदूत हेलिओडोरसने विदिशेजवळ उभारलेल्या स्तंभातून दिसून येते. पंढरपुर, तिरुपती, श्रीरंगम ई. मुळची काही शैव स्थाने  वैष्णवी करण्यात आली.

तरीही वैष्णवांचा फटका म्हणावा तेवढा शैवांना बसला नाही. तो बसला तो बौद्ध धर्माला. अहिंसा, मांसाहार निषेध ई. बौद्ध कल्पना उचलत टाळ-चिपळ्या हाती देत व बुद्धालाही विष्णुचा अवतार घोषित करत बौद्धांना वैष्णव बनवण्यात यश मिळवले. बौद्ध धर्माचा भारतातील अस्त बौद्ध धर्मात घुसलेल्या अनिष्ट प्रथांमुळे जेवढा झाला नाही तेवढा वैष्णवीकरणामुळे झाला.

पण राम-कृष्णाचे वैष्णवीकरण भारतीय धर्मेतिहासातील एक काळे पर्व आहे. काळे पर्व अशासाठी कि या पंथाचा उदयच मुळात लबाडीतून झाला. पांचरात्र मत जे कृष्ण (वासुदेव), बलराम, प्रद्युम्न, संकर्षनादिंच्या पंचव्युहात आधीच प्रसिद्ध होते (महाभारतात पांचरात्र मताची सैद्धांतिक माहिती मिळते.) आणि अवैदिक होते....त्यातीलच कृष्णाला बरोबर बाजुला काढुन विष्णुचा अवतार ठरवत कृष्णाचे स्वयंपुर्ण व्यक्तित्व गिळंकृत करण्यात आले.  रामाचेही तसेच करण्यात आले. "असूरांना मायामोहाने ग्रस्त करीत पथभ्रष्ट करण्याचे महान कार्य" केले म्हणून बुद्धालाही विष्णुचा अवतार बनवण्यात आले.

याचा धर्म-मानसशास्त्रावरील विपरीत परिणाम म्हणजे स्रुष्टीची निर्मिती, प्रतिपाळ व संहार ही तिन्ही कामे जी शिवाकडे होती त्यातील फक्त विध्वंसाचे कार्य शिवावर टाकत प्रतिपाळ विष्णुकडे तर निर्मितीचे काम ब्रह्मावर टाकण्यात आले. ब्रह्मदेव हा भारतीय पुराकथांत अवचित उगवलेला देव असून त्याला कसलीही पुर्वपिठिका नाही. यात शिवाची महत्ता घदविण्याचा मोठा उद्योग घडला. पण त्यामुळे विष्णुमहत्ता वाढली नाही हेही इतिहासावरून लक्षात येते. उदा. विष्णुमंदिरे भारतात अल्पसंख्य आहेत. लक्ष्मीला "संपत्तीची देवता" म्हणुन सन्मान दिला असला तरी तिचे स्वतंत्र असे पुजन होत नाही. दिवाळीत आपण ज्याला "लक्ष्मीपुजन" म्हणतो ते मुळचे यक्षपूजन आहे. किंबहुना दिपावलीला "यक्षरात्री" असेच म्हणतात. शिव हा यक्षगणांचा अधिपती आहे. दिपावली व लक्ष्मी यांचा कसलाही संबंध नाही.

लक्ष्मीची प्रतिमा नाण्यांवर सर्वप्रथम अवतरते ती गुप्तकाळात (चवथे शतक). विष्णु प्रतिमारुपात अजून उत्तरकाळात डोकावतो. गुप्तनाण्यांवर गरुडचिन्ह येते. ते विष्णुचे प्रतीक आहे असे मानण्याची नव्य प्रथा आहे. मुळात हे प्रतीक वासुदेवाचे (म्हणजेच कृष्णाचे) होते. ऋग्वेदातील श्रीसूक्त हे लक्ष्मीचे सूक्त आहे असे मानण्याची प्रथा आहे...पण तेही वास्तव नाही. श्रीसूक्त ही उत्तरकाळातील घालघुसड आहे...त्याला खिलसूक्त म्हणतात ते त्यामुळेच. वस्तुत: ऋग्वेदात विष्णुला पत्नीच नाही. तो एक उपेंद्र...दुय्यम देवता आहे.
यावर आपण अधिक विश्लेशन नंतर करूच...येथील मुद्दा एवढाच आहे कि वैष्णववादाची निर्मिती शैवांना आणि बौद्धांना शह देण्यासाठी झाली.

बौद्धांना परास्त करण्यात वैष्णवांना यश मिळाले असले तरे शैवांबाबत एवढ्या पौराणिक नव्या मिथ्थकथा बनवुनही जमले नाही म्हणुन मग "हरी-हर" ऐक्याच्या कल्पना पुढे आणल्या गेल्या. मुळात "हरी" हा शब्दच कृत्रीमरित्या "हर" या शिवसंबोधनाला शह देण्यासाठी निर्माण केला गेला. जसा असूर शब्दाला शह देण्यासाठी सूर शब्द कृत्रीमरित्या बनवला गेला. लक्षात घ्या, सूर हा शब्द संस्कृतात अर्थवाही होत नाही, एवतेव तो कृत्रीम आहे व असुरांच्या विरुद्धार्थी निर्माण केला गेला आहे, असे मत डा. रा. ना. दांडेकरांनी व्यक्त केलेले आहे. तसाच "हरी" हा "हर" या संबोधनाला निर्माण केला गेलेला पर्यायी शब्द होय.

 बौद्ध धर्मतत्वे आणि वैष्णव-धर्मतत्वे तपासली तर दोहोंतील भक्तिमार्ग वगळता अनेक मतांमधील समानता लक्षात येईल. बौद्धांनी केला नसेल तेवढा अहिंसेचा अतिरेक वैष्णवांनी केला असल्याचेही लक्षात येईल. महात्मा गांधींची अहिंसा ही वैष्णव-धर्मपंथाची अहिंसा होती जी जैन-बौद्धांतुन उचलली गेली होती हेही लक्षात येईल. अहिंसेत वाईट काही नाही...पण ती ज्या हेतुंनी वैदिकांनी उचलली तिचे हेतू संशयास्पद आहेत...जे महात्मा गांधींना माहित असने शक्य नव्हते, कारण ते धर्मेतिहासाचे अभ्यासक नव्हते. यज्ञातुइल हिंसा हे वैदिक धर्माचे प्रमूख अंग...ते त्यांना का टाकणे भाग पडले व प्रतीकात्मक बनवावे लागले तो वेगळ्या लेखाचा विषय आहे.

कोणत्याही धर्मात विकसनशिलता असते. असावी. ती अपेक्षीत व कौतुकास्पद असलीच पाहिजे. पण अप्रामाणिक हेतुंनी कोणताही धर्म विकसनशील न होता जडत्व येत नामशेष होण्याच्या मार्गाला लागतो. वैदिक धर्मियांचे नेमके तसेच झाले. वैष्नव संप्रदायांना परसत्तांनी कधीच विरोध केला नाही कारण तो निरुपद्रवी होता. शैवांची (उदा. राजपुत, मराठे, कुणबी, धनगर, वंजारी, आगरी-कोळी ते अगणित समाजघटक, जे वारकरी/वैष्णव बनले नाहीत) मात्र तशी स्थिती नव्हती. भारतात इस्लामी सत्ता स्थापित व्हायला किमान पाचशे वर्ष लागली, तरीही ते भारताचे पुर्ण इस्लामीकरण करू शकले नाहीत. याचे कारण म्हणजे ग्रीककाळापासून ते नवव्या शतकापर्यंत परकीय सत्तांना आपल्या तलवारीचे पाणी दाखवणारे योध्येय ते गुजराती शैव सम्राट होते. इस्लामची इतरत्र ज्याही प्रांतांत आक्रमणे झाली तेथे अल्पावधीत सारेच्या सारे जनसमुह मुस्लिम बनले...भारतावर पाचशे वर्ष आक्रमणे करत राहिल्यानंतर सत्ता वसवता आली याचे कारण या शव समुहांत आहे. भारताची युद्ध घोषणा नेहमीच "हर हर महादेव" अशी राहिली आहे..."हरी हरी विष्णू" अशी कधीही नव्हती हाही फरक लक्षात ठेवावा लागनार आहे. वैष्नव निर्मिती ही उत्पन्नाची पर्यायी साधने निर्माण करण्यासाठी झाली.

(श्रीमंत देवस्थाने ही वैष्णवच असतात आणि त्यांचे पुरोहोत हे हमखास वैदिकच असतात. अपवाद वगळले तर शिवस्थानांचे पुजारी गुरव-जंगमच असतात. मी गुरव समाजाच्या अध्यक्षाला याबाबत विचारले तर त्याचे उत्तर होते..."साहेब, शिव-पुजा-याला मिलतेच काय? ते कशाला तेथे येतील?  तरीही लघुरुद्र-महारुद्राची चाल त्यांनी केली...एवढेच नव्हे तर अथर्वशिर्षाचा अवैदिक गणपतीशी काडीइतकाही संबंध नसता त्याचीही सोय लावली. आजकाल तर गणपतीला चक्क जानवे घालण्याची प्रथा आली आहे...स्वार्थासाठी वैदिकीकरण कशाला हा माझा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. गणपतीला कोणीही भजावे...पण मुळ स्वरूप विकृत करून का?)

थोडक्यात  विष्णू हा भारतीय धर्मेतिहासाला विकृत करनारा घटक ठरला आहे कारण त्याचे प्रेझेंटेशन करण्यामागील हेतुच स्वार्थी होता. वारकरी संप्रदायाने शिवाजी महाराजांसाठी स्वराज्यनिर्मितीचा प्रेरणास्त्रोत दिला हे विधान अनैतिहासिक अशासाठी आहे कि स्वत: शिवाजी महाराज एकदाही पंढरपुरला गेल्याचेही उल्लेख नाहीत. तुकाराम महाराज हे त्यांचे गुरू होते हेही विधान अनैतिहासिक आहे. त्याला कसलेही पुरावे नाहीत. शिवाजीमहाराज शिवभक्त व देवीउपासक होते याचे मात्र विपूल पुरावे असतांना आजकालचे वैदिक मात्र शिवाजी महाराज विष्णुचे अवतार होते असे घोषित करत असतात त्याचा अर्थ समजावून घ्यायला हवा. शैवांच्या उद्धस्तीकरनाचा हाही एक वर्तमानकालीन टप्पा आहे. भारतीय जनमानसातील शांती, प्रीती, सृजन, युद्ध, आणि पुनर्निर्मिती ही जी मुलतत्वे शिव-पार्वतीत पाहिली जातात त्यांना शह देण्याची ही गेल्या सोळाशे वर्षांतील चाल आहे. सुदैवाने ती तेवढी यशस्वी ठरलेली नाही हे खरेच आहे...कारण मुळात हा देशच शिव-शक्तीमय आहे!

-Pls read this also...

http://sanjay-sonawani.hubpages.com/hub/Myth-of-Lord-Vishnu

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...