Thursday, June 27, 2013

स्वप्नांनी निळसर ....

स्वप्नांनी निळसर
तळ्यात डुंबावे
चिंब भिजून आभाळाला
घोसांगत लटकावे
येथून तेथे निवांत
भटकणा-या वा-याला
नि:शब्द गीताचे शब्द द्यावे
क्षितीजाकाठी ओठंगलेल्या
त्या मेधमय अनाम
चिरंतन प्रेयसीला
अवघे विश्व भेट द्यावे...

स्वत:च अवघे विश्व व्हावे!

या “सुंदर” मूर्खपणाचे रहस्य काय?

भारतातील एक न्यायाधीश देशातील तरुणांना झुरळ आणि बांडगुळ म्हणतो आणि त्यावर उपहास म्हणून अमेरिकेतील एक तरुण आभासी कॉक्रोच जनता पार्टी स्थापन क...