जागतिकीकरणाची सुरुवात होण्यापुर्वीचा भारत आणि नंतरचा भारत याची नुसती वरवर जरी तुलना केली तरी दोन्ही कालखंड सांस्कृतीकदृष्ट्या पुर्णतया विरोधाभासी आहेत हे सहज लक्षात येईल. १९९२ नंतर भारतीय जीवनाचे आर्थिक व सांस्कृतीक संदर्भ वेगात बदलले गेले. आता त्याची गती भोवळ आणेल एवढी वाढलेली आहे. अलीकडेच झालेली नरेंद्र दाभोळकरांची हत्या, महिला पत्रकारावरील व मतीमंद मुलींवर झालेले बलात्कार आणि आता संत म्हणवणा-या आसारामबापुला अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे केल्याबद्दल झालेली कोठडी आणि आसारामबापुच्या भक्तांनी घातलेला हैदोस आपल्या सांस्कृतीक पातळीने केवढा रसातळ गाठला आहे याचे हे विदारक चित्र आहे.
धर्म हा मानवी जीवनाला एक मानसिक आधार देणारा पुरातन काळापासुनचा अपरिहार्य घटक आहे. श्रद्धेने आपण संकटांतून तारून जावू असा विश्वास नाही अशी माणसे भुतलावर अत्यंत अल्पच असतील. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांत एक अत्यंत धुसर सीमारेषा असते हेही आपल्या सहज लक्षात येईल. असे असले तरी श्रद्धांचे अवडंबर माजवले जावू लागले कि त्या भिषण अंधश्रद्धांत बदलतात आणि तेथेच धर्म नामक संकल्पनेचे अध:पतन सुरु होते. जागतिकीकरणाच्या विज्ञाननिष्ठ काळात सहजीवनाचे, सहिष्णुतेचे आणि जातीभेदातीत जागतिक समाजाचे जे विचारवंतांचे स्वप्न होते ते इतके कोसळत गेले कि १९९२ पुर्वीचा भारत गरीब व आधुनिक तंत्रज्ञानांपासून दूर असला तरी सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अधिक बलशाली होता असेच म्हणायची वेळ आलेली आहे. सत्तर-ऐंशीच्या दशकांत मी खेड्यातच राहिलो आहे. तेंव्हा जातीभेद असले तरी सामाजिक जीवन बव्हंशी सहिष्णुच होते. एकमेकांच्या मदतीला धावून जायची प्रवृत्ती होती. इर्जिकी होत असत. आजचे ग्रामीण वास्तव एवढे बदलले आहे कि जातीच्या कुबड्यांखेरीज उभे राहणे जवळपआस अशक्य झाले आहे. जातिसंस्था नष्ट होण्याऐवजी बळकट व अत्यंत असहिष्णू झाली आहे असे चित्र आपल्याला दिसते.
बुवा-बापू-प्रवचनकार-किर्तनकार तेंव्हा नव्हते असे नाही. परंतू त्यांना ब-याच प्रमाणात नैतिकतेची चाड होती. सामाजिक ददपणही त्याला कारणीभूत होते. अगदी शिक्षकही खरोखरच निष्ठेने आपला पेशा व त्याची प्रतिष्ठा जपत असत. परंतू आताचे वास्तव पाहिले तर बुवा-बापुंचा आध्यात्मिक धंदा पुर्णतया अर्थनिष्ठ बनलेला आहे. तो एक अवाढव्य उद्योग बनलेला आहे. आध्यात्मिकतेची जागा स्वैराचार आणि नैतिक भ्रष्टाचाराने घेतली आहे. हे धर्मसम्स्कृतीचे अध:पतन नव्हे काय? आणि याला जबाबदार कोण आहेत?
"धर्म ही अफुची गोळी आहे..." असे विधान कार्ल मार्क्सने केले होते. धर्मच नव्हे तर विज्ञान व अर्थसत्ताही जेंव्हा अफुच्या गोळ्या बनू लागत मानवी जीवनाला पुरते नशेत ढकलतात तेंव्हा नैतिकतेचे मापदंड बदलणे अपरिहार्यच होते. ज्या इश्वराने विश्व बनवले असे अध्यात्मवादी-धर्मवादी मानतात त्यालाच सोन्या-चांदीचे मुकुट-सिंहासने अर्पण करणारे, दान-देणग्या देणारे वायफळ भक्त जेंव्हा निर्माण होतात तेंव्हा श्रद्धेचेच मुलार्थ बदललेले असतात. परमेश्वरालाच भिकारी करून टाकणारी हे धर्मव्यवस्था आणि भक्ती सर्वस्वी त्याज्ज्य आहे हे अशा अगणित भक्तांच्या लक्षातही येत नाही. या देवांचे प्रतिनिधी म्हणवना-यांच्या पायी आपले शील व संपत्ती अर्पण करु पाहणा-यांतच जेंव्हा स्पर्धा निर्माण होते तेंव्हा अशा बुवा-बापुंचे अनैतिक सआहस वाढतच जाणार व त्यातून आसारामबापुकडून घदले तसे प्रकार वाढण्याची संभावनाही बळावणार हे या अंध भक्तांच्या कधीही लक्षात येत नाही. खरे तर असे भक्त हे धर्मांचे व अध्यात्मांचे मारेकरी असतात हे लक्षात घ्यायला हवे.
आधुनिकतेच्या काळात आपला समाज नैतिक भ्रष्टाचाराने ग्रासलेला आहे असे चित्र दिसते. आपल्या संवेदनाही बोथट होत गेल्या आहेत असेही दिसते. याचे कारण म्हणजे अर्थप्राप्तीचे मार्ग नैतीक प्रेरणांनी प्रभावित नसून गैरमार्गांचाच अवलंब वाढलेला आहे. भ्रष्टाचा-यांना आणि अनीतिमानांना आता सामाजिक प्रतिष्ठा आहे. अशी अप्रतिष्ठा करुन घेतलेल्या समाजाला अधिकाधिक हाव असल्याने त्यासाठी अथवा आपले भ्रष्टाचार उघडकीस येवू नये यासाठी अशा बुवा-बापुंची व दैवतश्रद्धांची अधिकची निकड भासते. असे भक्तच मुळात अनीतिमान असल्याने त्यांचे आध्यात्मिक गुरुही त्याहुन अनैतिक असले-बनले तरी आश्चर्य वाटून घ्यायचे कारण नाही. आपल्या सामाजिक अध:पतनाचे ते एक प्रकट रुप आहे एवढेच.
अशी अध:पतने थांबवण्यासाठी जेंव्हा दाभोळकरांसारखे अविरत प्रयत्न करीत असतात त्यांची हत्या होणे अथवा हत्येच्या धमक्या मिळनेही तेवढेच क्रमप्राप्त होऊन जाते. प्रा. हरी नरकेंना व अण्णा हजारेंनाही "तुमचा दाभोळकर करून टाकू" अशा धमक्या अलीकडेच मिळालेल्या आहेत यावरून काय ते लक्षात घ्यावे. म्हणजे विचारांनाच मारून टाकायचा हा हिंसक उद्योग फोफावला आहे असे नाही काय? ज्या देशात गुन्हेगार सुरक्षित आहेत पण विचारवंत सुरक्षित नाहीत त्या देशाचे आणि त्या देशातील समाजांचे काय भवितव्य असणार आहे?
विचारांचा विरोध विचारांनी करावा असे म्हणने सोपे अहे परंतू जेंव्हा समाजातुन विचारच हद्दपार होतो तेंव्हा हत्येसारखी वरकरणी सोपी वाटनारी उत्तरे शोधली जातात. विचारकलहातुनच समाज अग्रगामी राहत असतो, प्रागतिक होत असतो आणि वारंवार स्वत:ला तपासत असतो. नवीन पुराव्यांच्या, संशोधनांच्या प्रकाशात आपली मते बदलत जात असतो. सामाजिक सुधारणा समाजस्वास्थ्यासाठी घडवून आणत असतो. परंतू आपली अवस्था वेगळीच आहे. जाती नष्ट व्हाव्यात असे म्हनणारेच स्वजातीच्या संघटना बांधतात. गतकाळातील स्वजातीय महनियाला पुढे आणीत आपसूक प्रस्थापित महनियांपेक्षा आमचीच महनिये कशी श्रेष्ठ होती याचे हिरीरीने दावे केले जातात. प्रसंगी इतिहासाची तोडमोडही केली जाते. स्वजातीय महनियांची चिकित्सा नाकारली जाते. असा समाज कधीही विवेकी आणि विज्ञाननिष्ठ होवू शकत नाही हे उघड आहे. अशा समाजअत बनतात त्या झुंडी. आज आपण अशा असंख्य झुंडींच्या विळख्यात सापडलेलो आहोत आणि त्याचे निराकरण कसे करायचे असा भयभीत प्रश्न यामुळे निर्माण होतो.
पण स्वजातशक्तीच्याच बळावर जेंव्हा न्याय्य हक्क मिळवावे लागतात आणि मिळतात असे वास्तव बनले असेल तर जातीय संघटनांना तरी कसा विरोध करायचा? मुळात आपली राजकीय व्यवस्था समतेच्या तत्वाचा सिद्धांत पाळते काय? न्याय्य प्रश्नांची उत्तरे जी व्यवस्था देत नाही त्या व्यवस्थेत द्वेषाचे आणि हिंसकतेचे स्तोम माजू लागले कि एक नवी अंधश्रद्धा तयार होवू लागते आणि तिचे निराकरंण करण्यासाठी राजकीय शक्तींनी जेवढे समानतेचे धोरण ठेवायला हवे ते ठेवले नाही कि जातीय अंधश्रद्धा फोफावणे स्वाभाविकच आहे. तिची परिणती अनेकदा हिंसकतेत झालेली आहे हे आपण आजवरच्या विविध सामाजिक प्रश्नांवरील आंदोलनांत पाहिली आहे.
आम्ही अर्थसत्ता आणन्यासाठी अविरत धडपडत आहोत. राजकीय सत्तेतील सहभागाचे महत्व आता नव-जागृत जाती-समाज घटकांना
समजू लागले आहे. आपल्याला एकुनातीलच व्यवस्थेत डावलले जात आहे याचेही भान येवू लागले आहे. ही अस्वस्थता कधी उद्रेकात बदलेल याचा नेम नाही. परंतू साकल्याने विचार करून कायदे करत बसण्यापेक्षा न्याय्य वाटपाचे तत्वच अवलंबले तर किती प्रश्न सुटतील? परंतू शक्य तेवढे दमनच करायचे, शक्य तेवढे शोषणच करायचे अशा प्रवृत्ती बळावल्या आहेत हे आपले एक दुर्दैवी वास्तव आहे.
एकुणात आपण सर्वच घटनांकडे तुकड्यातुकड्यात न पाहता त्यांचे समग्र आकलन करून घ्यायला हवे. आसाराम बापुला अटक झाली अथवा कोठल्या तरी बलात्कार घटनेतले आरोपी पकडले...त्यांना फासावर लटकवा वगैरे मागण्या करून आपली सामाजिक भुमिका व जबाबदारी पार पडत नाही हे आपल्याला लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी आपणा सर्वांनाच आपली विवेकशक्ती वाढवावी लागेल. एकुणातीलच समाजाचे सामाजिक भान वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. धर्म आणि निखळ धर्मश्रद्धा कोनाच्याही विरोधाचे विषय नाहीत. धर्माच्याच अंगाने पाहिले तरी या सर्वच घटना धर्मांनीच त्याज्ज्य ठरवलेल्या आहेत, अनीतिमान ठरवल्या आहेत हे धार्मिकांनीही लक्षात घ्यावे लागेल. ईश्वराचा कोणीही दूत, माध्यम अथवा प्रतिनिधी नसतो. असू शकत नाही. मनुष्य आणि परमेश्वर यांच्यात थेट संवाद असू शकतो...मध्यस्थाची गर नाही...असे मध्यस्थ हे भोंदूच असतात याचे भान धार्मिकांनी ठेवायला हवे. नैतीकतेचा उद्धार झाल्याखेरीज तुमच्या धर्माचा कसा उद्धार होवू शकतो?
यावर प्रकट आणि खुल्या मनाने सर्वांनीच चिंतन केले पाहिजे अन्यथा आमच्याच पुढच्या पिढ्या सर्वार्थाने विनाशपथ चालतील याबाबत शंका बाळगायचे कारण नाही.