Wednesday, January 15, 2014

...तेंव्हा मरणाची चिंता करण्यात काय अर्थ आहे?

मानवी सत्य हे भविष्याकडे क्रमाक्रमाने जात असते....कालच्या सत्याचे अनेक तुकडे आज असत्य म्हणुन नव्या सत्याच्या प्रकाशात फेकून द्यावे लागतात. आजच्या परिप्रेक्षात जुन्या काळातील सत्ये आजही सत्य मानणे हे धर्मवाद्यांसाठी ठीक आहे...तत्वज्ञानात त्याला स्थान नाही. मुळात भविष्य ज्याला आपण म्हणतो तो काळ किती आहे...सांत आहे कि अनंत आहे हेच मुळात आपल्याला माहित नाही. आज तो सांतही असु शकेल किंवा अनंतही असु शकेल किंवा त्याच्या वेगळ्या अजुनही अनेक मिती असतील एवढेच आपण म्हणु शकतो...अंतिम सत्य म्हणावे अशी स्थिती असु शकत नाही....कारण ते नेमके काय हेच माहित नाही. मनुष्य हा विश्वाचे जैवरासायनिक उत्पादन आहे. त्याला त्याच्या मर्यादा आहेत. कमी कि जास्त याबाबत फारतर आपण निर्णय घेऊ शकतो. अर्थात तोही व्यक्तीपरत्वे बदलेल हे ओघाने आलेच! 

मृत्यु...जे जीवंत राहतात त्यांच्यासाठी (इतरांचा मृत्यू) अंतिम सत्य असेल कदाचित...नव्हे असतेच...पण जो मरतो त्याच्या दृष्टीने काय? जो इतरांसाठी खरेच मेला त्याचे अस्तित्व खरेच मेले असते असे आपण कोणत्या आधारावर म्हणू शकतो? ते आस्तित्व मानवी नसले तरी काहीतरी भौतिक असतेच...भौतिक गोष्टींचा समुच्चय म्हणजे जीवंत प्राणी...त्याचे पुन्हा विखंडन होणे म्हणजे मृत्यु असे आपण मानतो...अथवा म्हणू शकतो...पण ते सत्य असते काय?

....पुन्हा भौतिक गोष्टीही लवकर वा अत्यंत सावकाश बदलतच राहतात....तेंव्हा तेही अंतिम सत्य नाही...

माणुस अनुभव इंद्रियांमुळे घेतो. कोण घेतो? इंद्रिये विशिष्ट संरचनेची व जानण्याची माध्यमे असतात. पण जाणनेही भौतिक असते. कारण जाननारे इंद्रियही भौतिक संरचनेने बनलेले असते. ती संरचना उध्वस्त होणे म्हणजे आपण मृत्यु मानतो. पण संरचनेतील सामील एकुण घटकांचे काय? ते तर मरत नाहीत. फारतर विखंडित होतात आणि स्वतंत्र वाटचाल करु लागतात. ती वाटचालही बदलांशी निगडित असते. कोणाचा काळ प्रदिर्घ तर कोणाचा अल्प...पण मग आपण "काळ" या राशीशी येतो. प्रश्न हा आहे कि अनुभव घेणारा एक बायालोजिकल उत्पादन आहे तर अनुभव घेनारे इंद्रियही बायालोजिकल उत्पादन...म्हणुणच भौतिक नाही काय?

आणि जर सारेच भौतिक असेल तर अविनाशित्वाच्या नियमाप्रमाने ज्याला कायमचा मृत्यू म्हणता येईल तसा मृत्यू कसा अस्तित्वात असेल? काळ सांत असेल तर मग सर्वच गोष्टीना अंत आहे असे म्हनता येईल...आणि तो जर अनंत असेल तर अस्तित्वही अनंत आहे असे म्हनावे लागेल....नाही काय?

तेंव्हा मरणाची चिंता करण्यात काय अर्थ आहे?

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...