Saturday, February 22, 2014

वैदिक धर्म म्हनजेच "हिंदु" धर्म ?


वैदिक धर्म म्हणजे काय?

मी वैदिक/अवैदिक अथवा वैदिक धर्म आणि शैवधर्म अशी मांडणी करत असतांना अनेक मित्रांनी मला या दोहोंतील नेमका भेद सांगण्याचे आवाहन केले होते. खरे तर खालील लेख माझ्या ब्लोगवर गेली दोन वर्ष होता. पण अधिक स्पष्टिकरणासाठी त्यातच नेमकी भर घालत त्याची माहिती देत आहे.

सनातन वैदिक धर्म म्हनजेच "हिंदु" धर्म आहे अशी सर्वसाधारण सामाजिक मान्यता आहे, पण ते वास्तव नाही. हिंदू धर्माची व्याख्या न होऊ शकण्याच्या कारणांत वैदिक तत्व आडवे आल्याने ती होऊ शकलेली नाही आणि वैदिकांना हिंदू म्हणवून घेतल्याखेरीज वैदिक धर्मसत्ताही राबवता येत नाही त्यामुळे गोंधळ झाला आहे. खरे काय आहे हे समजावुन घेण्यासाठी मुळात वैदिक धर्म म्हणजे नेमके काय आहे हे माहीत असायला हवे. कोणताही धर्म वेगळा आहे हे ओळखण्याचे साधन म्हनजे:

१. मान्य धर्मग्रंथ
२. धार्मिक कर्मकांड
३. धार्मिक श्रद्धा
४. परलोकजीवनाविशयक कल्पना
५. मान्य जीवन मुल्ये
६. संस्थापक.

वैदिक धर्माची वरील मुद्द्यांवर चर्चा करुयात.

१. ऋग्वेद हा वैदिक धर्मियांचा महत्वाचा धर्मग्रंथ आहे. या वेदात यज्ञप्रसंगी म्हणावयाचे मंत्र आहेत. वैदिकांचे सामाजिक, धार्मिक, विश्वोत्पत्तीशास्त्र यात सामाविष्ट आहे. त्याचबरोबर ब्राह्मणे, मनु ते अन्य स्मृती या धर्माचे नियमन करणारे धर्मग्रंथ आहेत. ऋग्वेदात काही सुक्तात इतिहासविषयकही अनेक ऋचा आहेत. सामवेद हा स्वतंत्र वेद नसुन ऋग्वेदातील ऋचा कशा गायच्या याचे दिग्दर्शन करणारा वेद आहे तर यजुर्वेद हा काही विशिश्ट यद्न्यांचे सांगोपांग वर्णन करणारा वेद आहे. अथर्ववेद हा चवथा वेद म्हणुन इ.स.पु. च्या ४थ्या शतकापर्यंत मान्य नव्हता. खरे तर अथर्ववेद हा मुळ वैदिक धर्माचा भाग नाही.

२. वैदिक धर्माचा उदय सरस्वती नदीच्या काठी राज्य करणार्या सुदास राजाच्या कारकिर्दीत झाला. त्याचा मुख्य प्रवर्तक म्हणजे वशिश्ठ होय. त्याचा काळ हा सरासरी इ.स.पु. १५०० वर्ष असा अंदाजिला गेला आहे. (माझ्या मते हा काळ इसपू आठवे ते नववे शतक एवढाच आहे.)

३. ऋग्वेदाची एकुण दहा मंडले असुन तो १० ऋषिकुळांतील ३५०च्या वर व्यक्तिंनी रचला आहे. ऋग्वेद रचना ही जवळपास २-३०० वर्ष सुरु होती. यात एकुण १०२८ सुक्ते आहेत.

४. यद्न्य हे वैदिक धर्माचे महत्वाचे कर्मकांड असुन यद्न्यात विविध द्रव्ये, मांस यांची आहुती देवुन इंद्र, मित्र, वरुण, नासत्यादि शेकडो देवतांना आवाहन करत त्यांच्याकडुन धन, पशुधन, दिर्घायुष्य, आरोग्यादिची मागणी करणार्या ऋचा म्हटल्या जातात. अनेक यद्न्य तर १२-१२ वर्ष चालणारे असत.

५. वैदिक धर्मियांच्या देवता अमर नसुन त्यांचे आयुष्य मानवापेक्षा खुप मोठे असते ही श्रद्धा. म्हणजे इंद्रसुद्ध मर्त्य्यच, कारण अमरतेची संकल्पना वैदिक धर्मात नाही. वैदिक देवता या बव्हंशी निसर्गाची प्रतीके आहेत. उदा. इंद्र हा पर्जन्याचे तर मित्र हा सुर्याचे प्रतीक आहे. परलोकाची संकल्पना वैदिक नाही.

६. वैदिक धर्मात मोक्षाची, आत्म्याची, पुनर्जन्माची संकल्पना नाही. तसेच संन्यास मान्य नाही. दीर्घायुरोग्य लाभो हीच अपेक्षा असंख्य ऋचांमधुन केली आहे. संततीहीण मनुष्य वैदिक समाजाला मान्य नव्हता...म्हणुनच संन्यासही मान्य नव्हता.

७. आश्रमव्यवस्था (ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ व संन्यास) ऋग्वेदात नाही. ती प्रथा वैदिक नाही. असुर प्रल्हादाचा पुत्र कपिल मुनीने सर्वप्रथम आश्रम व्यवस्था प्रचलित केली. तिचा वैदिक धर्माशी संबंध नाही.

८. यद्न्यसंस्थेभोवतीच सारे वैदिक कर्मकांड फिरते.

९. वैदिक धर्मात मुर्ती वा मुर्तीपुजेला स्थान नाही. "पुजा" हा शब्द मुळचा द्राविड असुन त्याचा अर्थ होतो "माखणे", म्हणजे जल, तेल, सिंदुर वा प्रसंगी रक्ताने पुज्य मुर्तीला माखणे म्हनजे पुजा. पुढे तिचा अर्थ अधिक व्यापक झाला, पण पुजा ही वैदिक नाही.

१०. सोमरस प्राशण हा महत्वाचा धार्मिक विधी होय. ऋग्वेदाचे पहिले मंडल तर पुरेपुर सोमसुक्तांनी भरलेले आहे. सोम म्हनजे इफेड्रा ही नशा आननारी वनस्पती होते असे धर्मानंद कोसंबी यांनी म्हटले आहे. सोम म्हणजे भांगही असावी असेही एक मत आहे. सोमपान करुन नशा होत असे एवढे मात्र खरे.

११. वैदिक समाज हा पित्रुसत्ताक पद्धतीचा होता. स्त्रींयांना यद्न्यात भाग घेण्याचा अधिकार नव्हता. एकही वैदिक मंत्र स्त्रीच्या नांवे नाही हे येथे नमुद केलेच पाहिजे.

१२. वैदिक धर्मात वर्णांतर सहज शक्य होते. म्हनजे क्षत्रिय ब्रह्मकर्म करु शके तर वैश्यही क्षत्र कर्म करु शके. याचे महत्वाचे कारण म्हणजे "ब्रम्ह" या शब्दाची ऋग्वैदिक व्याख्या. ऋग्वेदानुसार "ब्रह्म" म्हणजे "मंत्र". जोही मंत्र रचतो तो ब्राह्मण अशी अत्यंत सुट्सुटीत व्याख्या आहे ही. थोडक्यात मुळ ऋग्वेदात वर्णव्यवस्था जन्माधारित नव्हती. पुरुष सुक्त हे प्रक्षिप्त आणि वर्णव्यवस्था सुद्ड्रुढ झाल्याच्या काळात ऋग्वेदात घुसवण्यात आलेले आहे.

१३. अहिंसेच्या व अपरिग्रहाच्या तत्वद्न्यानाला वैदिक धर्माची मान्यता नाही. किंबहुना यद्न्यांचा पाया हा हिंसा हाच होता व आहे.

१४. संस्कार हे वैदिक धर्माचे मुख्य अंग आहे. गौतम धर्मसुत्रानुसार ४८ संस्कार दिले असले तरी ऋग्वेदात फक्त ३ संस्कार आहेत. पुढे वैदिक धर्मात फक्त १६ संस्कार महत्वाचे मानले जावु लागले ते असे-
गर्भादान, पुंसवन, सीमंतोन्न्यन, जातकर्म, नामकरण, निष्क्रम, अन्नप्राशन, चुडाकर्म, कर्णवेध, उपनयन, वेदारंभ, केशांत, समावर्तन, विवाह, विवाहाग्नी स्वीकार व दक्षिणाग्नी, गार्हपत्य आणि आहवनीय या ३ अग्नींचा संग्रह...म्हणजे अग्निहोत्र.

१५. कुलदैवत/देवता वैदिक धर्माला मान्य नाहीत. गोत्र/प्रवर या त्यांच्या संकल्पना.  शिव, पार्वती, गणपती, मारुती वा त्या परिवारातील मुर्ती-तांदळा स्वरुपात पुजल्या जाणा-या देवता अवैदिक असुन यद्न्यप्रसंगी या देवतांनी विघ्न आणु नयेत अशा अनेक प्रार्थना ऋग्वेदातच आहेत. शिवास "शिस्नदेव" असे हीणवण्यात आले असुन त्याला "स्मरारि" (म्हणजे यद्न्याचा विध्वंसक) अशी संद्न्या आहे. विनायक तथा गणपतीस तर यद्न्यात विघ्न आणु नये म्हणुन "विनायक शांती" प्रथम करुन त्याला दुर जाण्याच्या प्रर्थना आहेत. त्यामुळे वैदिक धर्मियांसाठी विनायक हा "विघ्नकर्ता" होता...विघ्नहर्ता नव्हे. वैदिक धर्मात नसलेल्यांना "अयाजक" (यद्न्य न करणारे) असे संबोधुन त्यांची हेटाळणी केली आहे. तसेच वैखानस, समन, यती, संन्यासी अशा अवैदिक पंथीयांचीही निंदा केली आहे.

१६. या धर्माचा मुळ संस्थापक वशिष्ठ ऋषि असुन त्याच्या सोबतची अन्य ९ ऋषिकुले सहसंस्थापक मानता येतात. ही सारी ऋषिकुले सुदासाच्या काळात होती व जोवर सुदासाचा वंश चालु राहीला तोवर ऋग्वेद व अन्य वेदांची रचना होत राहीली.

१७. वेद हे मौखिक परंपरेने जतन करण्यात आले अशी एक श्रद्धा आहे. परंतु त्याबाबत शंका आहे. वेद विस्म्रुत झाले म्हणून अवशिष्ट वेद एकत्रीत करुन मग त्या संहितेचे वेदव्यासांनी चार भागांत विभाजन केले असे परंपरेने मानले जाते. हे वेदव्यास म्हणके महाभारतकार व्यास नव्हेत. मुळ वेद नेमके कोणत्या भाषेत होते यावर आता संशोधन सुरु आहे. मुळ वेदांची भाषा ही संस्क्रुत असणे शक्य नाही असे माझे मत आहे आणि त्याबाबत विपुल पुरावे सामोरे येत आहेत.

१८. गोत्र ही संकल्पना सर्वस्वी वैदिक धर्मियांची आहे.

१९. ऋग्वेदातील ऋचांमधून संततीची मागणी १३७ वेळा, अन्नाची २३७ वेळा, संरक्षणाची ४५० वेळा तर धनाची मागणी ७९० वेळा आली आहे. परलोकजीवनासाठी अथवा स्वर्गप्राप्तीसाठी एकही मागणी नाही. वैदिक धर्म सर्वस्वी इहवादी आहे.

२०. ओंकार हा ऋग्वेदात अथवा कोणत्याही वैदिक साहित्यात येत नाही. ऒंकाराला (जो आपण शिवासाठी वापरतो) जन्म शैवांनीच दिला आहे.
वरील माहिती अत्यंत थोडक्यात असुन महत्वाचे मुद्दे तेवढे दिले आहेत. सखोल माहिती ज्यांस हवी आहे त्यांनी मुळात वेद वाचलेलेच बरे.

आता वैदिक धर्म आणि आपल्या शैवप्रधान धर्मात जमीन आस्मानाचा फरक असल्याचे आपल्या लक्षात येईल. आजचा हिंदू धर्म हा वेदाधारितच नसल्याने वैदिक महत्ता, वेदमान्यता, स्मृतीमान्यता हे दांभिकतेचे स्तोम असल्याचे आपल्या लक्षात येईल.

पण तरीही हा धर्म आज पृथक रित्या अस्तित्वात आहे हे वास्तवही समजावून घ्यायला हवे. ते कसे हे थोडक्यात पाहुयात.

१. वर्णव्यवस्था हे वैदिक धर्माचे मुख्य अंग आहे. तीन वर्ण वगळता जेही बाकीचे आहेत ते शुद्र-अतिशुद्र असून वैदिक धर्मियांच्या दृष्टीतून व धर्मवचनांतून वेदबाह्य समाज अथवा विद्वानांच्याच मतांनुसार अनार्य आहेत.

२. जेही वर्णव्यवस्था पाळतात, वर्णाचे जन्मजात अधिकार भोगतात व त्यानुसार सामाजिक उतरंड ठरवतात ते वैदिक आहेत..

३. ज्यांनाही जन्मजात वेदांचा व वेदोक्त संस्कारांचा अधिकार आहे व जेही ते वेदोक्त संस्कार (उपनयनादि) करवुन घेण्यास जन्माधारित पात्र आहेत वा करवून घेतात ते वैदिक आहेत.

३. जेही समाज वैदिक धर्माचार्यांची पुर्वांपार मान्यता नसतांनाही स्वत:ला ब्राह्मण, क्षत्रीय अथवा वैश्य समजतात व वर्णव्यवस्थेची पाठराखन करतात ते छद्म-वैदिक धर्मिय आहेत.

४. पोटार्थी म्हणुन वैदिक असुनही शैव देवतांचे पौरोहित्य करतात ते द्वैधर्मिय (म्हणजे दोन धर्मांचे आणि म्हनून पाखंडी) असतात. हे लोक हिंदू धर्माला जास्त धोकेदायक आहेत. वैदिक धर्माला मुर्तीपूजा मान्य नाही आणि ते शिवपरिवाराच्या देवतांचे ऋग्वेदकालापासून ते पौराणिक काळापर्यंतचे कट्टर विरोधक होते.

५. उपनिषदे वैदिक धर्माचे अंग नाही. किंबहुना उपनिषदे ही वेद व यज्ञविरोधी आहेत...ती शिव-शक्तीचे महिमान गातात त्यामुळे  औपनिषदिक तत्वज्ञान वैदिक तर नाहीच पण  सांख्य, वैशेषिक आणि न्यायदर्शनेही वैदिक नाहीत.

६. तरीही वैदिक समाज या तत्वज्ञानावरही मालकी सांगतो आणि त्याच आधारावर आपला वर्चस्वतावाद निर्माण करतो या मुळे हिंदू धर्मात विषमतेची आणि न्युनगंडाची विषारी बीजे पेरली गेलेली आहेत. पण सर्व तत्वज्ञाने वैदिक नाहीत...ती शैव तत्वज्ञाने आहेत हे वास्तव समजावून घ्यायला हवे आणि आपल्या जन्मजात न्य़ुनगंडातून बाहेर यायला हवे.

७. समता हा शैव तत्वज्ञानाचा मुलाधार असून समतेचे तत्व पाळेल तोच शैव अथवा हिंदू...बाकी सारे वैदिक. मग तो जन्माने असो कि विचारांनी असो!

अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!

पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत ...