Thursday, April 10, 2014

मोदी विवाह: काही प्रश्न!

नरेंद्र मोदींनी आपला विवाह झाला आहे हे अधिकृतरित्या मान्य केले ही चांगली बाब आहे. पण त्यातून उठणारे प्रश्न मात्र अत्यंत गंभीर आणि अनैतिकतेची/अमानुषतेची परिसीमा दाखावणारे आहेत.

नरेंद्र मोदींचे बंधू सोमभाई यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. कि नरेंद्रभाईंचा जसोदाबेनशी झालेला विवाह हा तत्कालीन प्रथेप्रमाणे झालेला "बालविवाह" होता. (मोदी तेंव्हा १७ वर्षांचे होते.) पारिवारिक दबावाखाली केला गेलेला होता. नरेंद्रभाईंनी वैवाहिक जीवन सुरु होण्याआधीच जसोदाबेनला सोडले व समाजकार्याला वाहून घेतले.

प्रश्न असा आहे कि मोदींनी आपल्या पत्नीला घटस्फोट देवून त्यांना दुसरा विवाह करण्यासाठी अथवा स्वतंत्रपणे त्यांच्या आयुष्याचा कोणताही निर्णय घेण्याची संधी का दिली नाही? त्यांना वैवाहिक बंधनात आजतागायत अडकावून ठेवत, त्यांचा पुर्ण त्याग करत जसोदाबेनच्या भावनिक जीवनाची राखरांगोळी करण्याचा त्यांना कोणता नैतिक अधिकार पोहोचतो? स्त्रीयांना गौण लेखणा-या संस्कृतीचे पक्के अनुयायी असल्याचेच त्यांनी सिद्ध केले नाही काय?

आणि आजतागायत निवडणुकींत दिलेल्या प्रतिज्ञापत्रांत त्यांनी विवाहाबाबतचा रकाना रिकामा ठेवून निवडणूक आयोगाची (पर्यायाने जनतेची) फसवणूक केली नाही काय? केवळ निवडणूक आयोगाच्या धाकाने त्यांना नाईलाजाने आपल्याला पत्नी आहे हे मान्य करावे लागत असेल तर मोदींचे नेमके नैतिकतेचे मापदंड काय?


Peoples Act 1951  प्रमाणे पत्नीविषयकच नव्हे तर तिच्या चल-अचल संपत्तीची माहिती देणेसुद्धा बंधनकारक आहे. मग पत्नी सोबत रहात असो अथवा दूर. ही मोदींनी केलेली फसवणूक नाही काय? 

प्रश्न बरेच आहेत.

पण साध्या माणुसकीचे चिन्ह मात्र कोठे दिसत नाही. विवाह आणि दांपत्य जीवन ही खाजगी बाब आहे हे खरे...पण सीतात्यागाबद्दल आजही रामालाही दोष देणारा समाज मोदींचा हा पत्नीत्याग कसा घेणार आहे?

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...