Monday, April 14, 2014

तुम्हाला काय वाटते?

निवडणूक आयोगाच्या मतमोजणी घोषणा प्रक्रियेमुळे ग्रामीण भागात एक मोठा अकारणचा तणाव निर्माण होतो आहे. कोणत्या पोलिंग स्टेशनवर कोणत्या पक्षाला/उमेदवाराला किती मते मिळालीत हे समजायची पद्धत सध्या असल्याने निवडून आलेला व हरलेलाही उमेदवार ज्या प्रभागातुन मते कमी मिळालीत त्यावर डुख धरतो. विकासकामे जाणून-बुजून केली जात नाहीत, शेतीचे पाणी तोडणे ते पतसंस्थांच्या वसुलीचे झेंगट मागे लावून देणे असे प्रकार घडत असल्याचे मला ग्रामीण भागातील अनेक मतदारांनी सांगितले आहे. यामुळे निर्माण होणारे तणाव अनेकदा हिंसक पातळीपर्यंतही जात असल्याने यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.


निवडणूक आयोगाने कोणत्या प्रभागातुन कोणाला किती मतदान झाले हे घोषित करण्याऐवजी एकुणातीलच निकाल घोषित केला तर चांगले होईल असे वाटते. मतदान हे सर्वस्वी गुप्तच रहायला हवे.

अगदी माहितीच्या अधिकारातही कोणत्या प्रभागात कोणाला किती मतदान झाले याची माहिती दिली जावू नये.

तुम्हाला काय वाटते?

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...