Saturday, October 25, 2014

प्रिये...!

नेहमी विचारतेस
मी काय लपवून ठेवलंय
माझ्या हृदयाच्या
गच्च अंधारल्या
गुंफेत....

काय करायचंय तुला?

एवढा स्वच्छ प्रकाश
मी ओसंडलाय तुझ्याच साठी...
नाच त्यात...बागड...हस
खळाळत्या निर्झरांसारखी...
उगा व्यर्थ प्रश्न विचारु नकोस....
अनंत वेदनामय
आक्रोशांतून
उमदळेल्या
माझ्या हृदयगुंफेतील
साकळलेल्या
एकाकी
आसवाच्या थेंबाला
रडवू नकोस...

प्रिये...!

निकोला टेस्ला: एक दुर्दैवी पण प्रतिभाशाली संशोधक!

आज आपण ज्या आधुनिक, कृत्रिम प्रकाशाने उज्वल झालेल्या प्रकाशमान आणि डिजिटल तंत्रज्ञानाने वेढलेल्या जगात जगत आहोत, त्या जगाची पायाभरणी एका अशा...