Wednesday, January 14, 2015

छावण्यांच्या तुष्टीकरणासाठी इतिहास?

"भारतीय इतिहासकारांची एक मोठी समस्या म्हणजे ते बव्हंशी कोणत्या ना कोणत्या छावणीतील आहेत. म्हणजे मार्क्सवादी, हिंदुत्ववादी, आर्यवादी, मुलनिवासीवादी, बहुजनवादी वगैरे. समस्या अशी आहे कि छावण्यांच्या तुष्टीकरणासाठी व त्या छावण्यांच्या भुमिका लादण्यासाठी इतिहास लिहिला जातो, त्यामुळे ऐतिहासिक घटनांचे उदात्तीकरण, अतिउदात्तीकरण अथवा विकृतीकरण केले जाते अथवा अनेक घटनाच अनुल्लेखाने मारल्या जातात. थोडक्यात यामुळे भारतात "इतिहास" ख-या अर्थाने लिहिलाच गेलेला नाही असे म्हणायला भरपुर वाव आहे. छावण्यांच्या दृष्टीकोणातून इतिहास लिहिणे सोपे असते, आयते समर्थक मिळतात, मानसन्मान मिळतात...पण इतिहासाचा खून पडतो याचे भान असले पाहिजे.

"नवीन इतिहासकारांनी प्रथम या सर्वच छावण्यांचा त्याग केला पाहिजे. जुन्या इतिहासकारांबद्दल आदर ठेवत त्यांचे नि:ष्कर्ष नाकारत, पुर्ण संशयी होत त्यांचे दावे, संदर्भ पुन्हा तपासले पाहिजेत. इतिहास हा स्वत:च्या किंवा कोणाच्या भावना सुखावण्यासाठी अथवा दुखावण्यासाठी नसतो तर तर फक्त उपलब्ध तथ्यांची इमान राखणारा असतो. इतिहास असा लिहिला जाणार असेल तर लिहावा अथवा त्याच्या वाटेला जात एकुणातील समाजांचे नुकसान करु नये.

"युरोपियन इतिहासकार फार सज्जन आहेत असा भ्रमही बाळगायचे कारण नाही. आर्यवाद असो अथवा आताचा इंडो-युरोपियन भाषा सिद्धांत असो, याचा जन्म केवळ सेमेटिक भाषागटाच्या लोकांवर वर्चस्वतावाद निर्माण करण्यासाठी झाला व त्यासाठी पुरातत्वीय पुराव्यांची सोयिस्कर मांडणी केली गेली. आजही केली जात आहे. इतिहास भवितव्यासाठी कि इतिहास भवितव्यात विकृती निर्माण करण्यासाठी याचा निर्णय आपण घ्यायला पाहिजे."

(अलीकडेच अक्षरमानवतर्फे ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी भरवलेल्या इतिहास लेखन कार्यशाळेत बोलतांना मी मांडलेला एक मुद्दा.)

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...