प्रत्येकजण आपापल्या स्थितीचे अपत्य असतो
प्रत्येकजण आपापल्या स्थितीचा धनी असतो
प्रत्येकजण आपापल्या स्थितीचा गुलामही असतो
प्रत्येकजण आपापल्या स्थितीचा अनिवार्य बळी असतो...
प्रत्येकजण आपापल्या स्थितीचा धनी असतो
प्रत्येकजण आपापल्या स्थितीचा गुलामही असतो
प्रत्येकजण आपापल्या स्थितीचा अनिवार्य बळी असतो...
संघर्ष कोणाचा कोणाशीही वाटत असला
तरी प्रत्येकाचा संघर्ष शेवटी स्वत:शीच असतो!
तरी प्रत्येकाचा संघर्ष शेवटी स्वत:शीच असतो!
. . .
दांभिकांचा, सोयधरू लोकांचा सुळसुळाट जेंव्हा कोणत्याही समाजात होतो तेंव्हा हे निश्चित समजून चालावे कि त्या समाजाचा विनाश अटळ आहे.
बाकी सारे अरण्यरुदन आहे.
. . .
बामसेफ अथवा तत्सम संघटनानी पसरवलेल्या अविचारी, अनभ्यासी, सांस्कृतिक अज्ञानातून, आमचे लोक सोडा, विचारवंतही जोवर बाहेर पडत नाहीत, निरपेक्षपणे आपली भुमिका निश्चित करत नाहीत तोवर ते ज्यांच्यासाठी काम करतो असा आव आणतात त्यांचेच वैचारिक वाटोळे करत राहतील यात शंका नाही.
असे पुरोगामी म्हणवणारे समाजाला प्रतिगाम्यांएवढेच विघातक आहेत. कारण यांना ना धड आगा ना धड पीछा ...काही माहितच नाही....किंवा जे मानायचे ते केवळ सोयीचे ...म्हणून हे वारंवार पराजित होतात.
आज भारतात जर प्रतिगाम्यांचा, तात्पुरता का होईना, विजय होत असेल तर त्याला तेवढेच जबाबदार हे तथाकथित निर्बुद्ध पुरोगामी आहेत...
कारण प्रतिगाम्यांएवढीच निर्बुद्धपणची बीजे त्यांनीही रुजवून ठेवलेली आहेत...
आणि म्हणुनच आज "पुरोगामी" हा शब्द शिवीसारखा बनला आहे...याचे भान यांना येत नाही हे अधिकचे दुर्दैव आहे!
. . .
मुळात माणसाला देवा-धर्माची मानसिक गरज का भासते या प्रश्नाच्या मुळाशी भिडल्याखेरीज देव-धर्माविरुद्धचा पुरोगामीपणा हे अवघे थोतांड आहे हे समजुन चालावे.
. . .
वातावरणातील दाटून आलेला उन्माद सामान्य जनतेलाही भयभित करून सोडत आहे.
उन्माद्यांच्या झुंडी सावजांच्या शोधात आहेत.
विवेकी लोकांची जबाबदारी कधी नव्हे एवढी वाढली आहे.
. . .
आपल्याला आजचे आहे ते ज्ञान आत्मसात करत भविष्यकालीन ज्ञानाकडे जायचे कि भुतकालीन गहन अज्ञानाकडे जायचे याचा निर्णय आम्ही घेणार आहोत काय?
घेणार नसू तर आम्हाला कसलेही भविष्य नाही!
. . .
मागे अनंत काळ, विश्वाच्या जन्मापासून, पृथ्वीवर सूर्य उगवला...नितनियमाने मावळला आहे. जेंव्हा पृथ्वीवर पहिल्यांदा सूर्य उगवला असेल तेंव्हा तो पहायला मानवजात अस्तित्वातच नव्हती...
सूर्य पुढेही नितनेमाने उगवत राहील...सृष्टीच्या अंतापर्यंत...
पण तो पहायला पृथ्वीतलावर माणुस असेल कि नाही हा खरा प्रश्न आहे....!
. . .