भारतात वैदिक पगडा उत्तरकाळात बसण्याचे एक कारण म्हणजे क्षत्रियत्वाचा अतोनात सोस. क्षत्रिय म्हणजे वीर, योद्धा, राज्य करायला लायक असा समाज हा समज ब-याच समाजांत/जातींत आजही एवढा दृढमूल आहे कि जो तो उटतो आणि आपले मुळ क्षत्रियत्वाशी भिडवायचा प्रयत्न करतो अथवा आपण क्षत्रिय आहोतच असे समजतो. अर्थात याला कोणा शंकराचार्याची मान्यता नसते हे वेगळे. वेदोक्त प्रकरणात टिळक म्हणले होते, "या काळात ब्राह्मण व शुद्र असे दोनच वर्ण राहिले असून शिवाजी महाराजही शूद्रच होते. तथापि त्यांच्या कार्यावर मोहित होऊन तत्कालीन महाराष्ट्रातील कर्त्या पुरुषांनी ( म्हणजे वैदिक धर्मीय ब्राह्मणांनी) खास सवलत म्हणून त्यांना क्षत्रियत्व बहाल करून गागाभट्टाच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला ; पण त्या वेळी भोसले घराण्याची सर्व धर्मकृत्ये पुराणोक्तच करावीत अशी परंपरा वैदिक ब्राह्मणांनी घालून दिली होती. हीच परंपरा पाळली गेली पाहिजे. छत्रपती घराण्याशिवाय अन्य मराठे क्षत्रिय नाहीत. सबब त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही . . . ." (संदर्भ : "राजर्षी शाहू छत्रपती" ; डॉ जयसिंगराव पवार , पृष्ठ ३५, "लोकमान्य टिळक यांचे चरित्र" , न. चिं. केळकर) मला वाटते हे विधान स्वयंस्पष्ट आहे. तरीही आपण क्षत्रिय म्हणजे नेमके काय व वैदिक धर्मात त्यांचे स्थान काय होते व कसे नष्टही झाले हे पहायला हवे.
ज्या पुरुषसुक्तात वर्णव्यवस्था प्रथमच अवतरली असे मानले जाते त्यात मुळात "क्षत्रिय" हा उल्लेखच नाही तर "राजन्य" हा आहे. म्हणजे ऋग्वेदाच्या दृष्टीने क्षत्रीय नव्हे तर राजन्य हा ब्राह्मणाखालोखालचा वर्ग आहे. राजन्य आणि क्षत्रिय एकच नव्हे. वैदिक टोळ्यांचा जो प्रमूख असे त्यालाच राजन्य ही संज्ञ लागू होती. अवेस्त्यातही राजन हा शब्द अनेकदा अवतरतो. (पह झामयाद यष्ट, ८८ ते ९०) येथेही राजन या शब्दाचा अर्थ राज्यकर्ता/विजेता असा आहे. लढवैय्या लोकांना (जातीला नव्हे) रथेष्ट्रा नांवाने ते संबोधत. ऋग्वेदात क्षत्र हा शब्द छत्र या अर्थाने येत असला तरी तो समाज अथवा वर्ण या अर्थाने येत नाही. पुरुषसुक्तातील राजन्य (क्षत्रीय नव्हे) हा शब्द राजाचे निकटचे नातेवाईक या अर्थाने आला असावा असे अनेक विद्वान मानतात तर जायस्वाल आणि राम शरण शर्मा म्हणतात कि गणतंत्रातील प्रमुखालाच राजन्य ही संज्ञा होती, त्यामुले पुरुषसुक्तातील राजन्य म्हणजे गणतंत्रीय राजांचा समूह असावा. अर्थात गणतंत्रातील राजनपद हे वंशपरंपरागत नसे.
राजन्य हा शब्द पुरुषसुक्तात स्पष्टपणे नमूद असता त्याची जागा क्षत्रिय या शब्दाने कशी आणि कधी घेतली? शिवाय या सुक्तात "वर्ण" हा शब्द येत नाही हेही लक्षणीय आहे.
क्षत्रीय शब्दाचा मूळ अर्थ युद्धात नेतृत्व करणारा, कुळांच्या/टोळीच्या जमीनींवर मालकीहक्क गाजवणारा असा होता. तर राजन्य म्हणजे सर्वांचा प्रमुख. क्षत्रीयाला वर्णव्यवस्थेत मुळात स्थानच नाहे हे ऋग्वेदावरुन स्पष्ट दिसते. ब्राह्मणोSस्य मुखमासीद् बाहू राजन्य: कृत: | ऊरू तदस्य यद्वैश्य: पद्भ्या शूद्रोSअजायत,असे ऋग्वेद स्पष्टपणे म्हणतो. यात क्षत्रियांचा उल्लेख नाही. ब्राह्मण, वैश्य आणि शुद्रांबाबत आपण नंतर विवेचन करू. पण प्रतिपाद्य विषय असा आहे कि नंतरच्या काळात कधीतरी राजन्याची जागा क्षत्रियाने घेतली. मग क्षत्रीय नेमके कोण?
वर सांगितल्याप्रमाणे क्षत्रीय याचा मुलार्थ शेत- जमीनींचा स्वामी व युद्धात नेतृत्व करणारा. क्षत्रिय हा शब्द खतिय या मुळ प्राकृत शब्दापासून साधला गेला असून तो शेतीशीच निगडित आहे. शिवाय पंचविश ब्राह्मणानुसार राजन्य प्रथम तर ब्राह्मण दुस-या स्थानावर आहे. येथेही क्षत्रियाचा उल्लेख नाही. परंतू असे स्पष्ट दिसते कि वैदिक धर्म भारतात आल्यानंतर वैदिकांना राजन्य उडवत क्षत्रियांना (म्हणजे जमीनदार/राज्यकर्ते) यांना ते स्थान द्यावे लागले कारण तत्कालीन कृषीप्रधान भारतीय अर्थव्यवस्थेमुळे राजे-सरंजामदारही शेतमालकच असत. टोळीजीवनातील जुने "राजन्य" प्रकरण त्यांना त्यागावे लागले. घुर्ये म्हणतात कि वैदिक धर्म भारतात आल्यानंतर त्यांनी अनेक स्थानिक जमातींतील प्रभावशाली लोकांना आणि स्थानिक धर्माच्या पुरोहितांना क्षत्रीय व ब्राह्मण संज्ञा दिल्या. गौतम बुद्ध व महावीर हे व्रात्य (अवैदिक) क्षत्रीय होते असे राजवाडे व घुर्ये म्हणतात. याबाबत सविस्तर नंतर. पण येथे सांगायचा मुद्दा हा कि क्षत्रीय हा मुळात ऋग्वैदिक/वैदिक वर्ण नव्हे. तो त्यांनी त्यांच्या धर्माच्या रक्षणाच्या निमित्त केला पण नंतर तो रद्दही करून टाकला.
हे कसे झाले हे आपण पाहुयात. यामागे वैदिकांच्या मुळच्या स्थलांतराची कारणे आहेत. ते भारतात आले तेंव्हा येथील स्थिती वेगळी होती. धर्म वेगळा, राज्यव्यवस्था व समाजव्यवस्था वेगळी. कृषीप्रधान अर्थव्यवस्था. वैदिकांशी मैत्र करणारे पंजाब-कुरु-पांचालमधील काही राजे होते तसेच अन्यत्र सर्वत्र विरोध करणारेही होते. त्यासाठी त्यांना त्यांच्याच धर्मातून रक्षक घटकाची गरज होती. ती त्यांनी क्षत्रीय नांवाखाली भागवली. पुर्वी जन्माधारित नसलेला ब्राह्मण जसा आता जन्माधारित झाला तसाच हाही वर्ग जन्माधारित झाला. हा वर्ग आधी अल्पच होता. परंतू हा वैदिकांतुनच निर्माण झालेला पण योद्धा वर्ग असल्याने अन्य योद्धा गटांशी, म्हणजेच खतियांशी, मिसळतही गेला. वैदिक धर्माशी त्यांची नाळ तुटत गेली. किंबहुना क्षत्रीय हा वर्णच उरला नाही कारण तो वैदिकाश्रयीही उरला नाही. नंद घराण्याने कुरु-पांचालातील वैदिक सत्ता नष्ट केल्यानंतर नंदांनंतर क्षत्रीय उरले नाहीत असे खुद्ध वैदिकांनाच म्हणावे लागले. परशुरामाच्याही क्षत्रीय संहाराच्या भाकडकथा निर्माण करत तसेच कलीयुगात क्षत्रीय नाहीत अशा वदंता निर्माण करत वैदिक धर्मात क्षत्रीय का उरले नाहीत याच्या स्पष्टीकरण कथा द्याव्या लागल्या. राजन्य हा मुळचा पुरुषसुक्तीय वर्ण तर कधीच नष्ट झालेला. पण राजन्य म्हणजे क्षत्रीय व या वर्णाला वेदमान्यता आहे असा भ्रम मात्र निर्माण झाला तो झालाच!
पुराणांनी क्षत्रीय संज्ञेचे माहात्म्य वाढवायला खूप मदत केली असे म्हणावे लागेल. क्षत्रीय व ब्राह्मण हा वर्चस्वाचा संघर्ष होता असे मानले जाते. परंपरेने वैदिक परंपरा ब्राह्मणांची तर औपनिषक परंपरा क्षत्रियांची असेही मानले जाते. यात गोंधळ असा आहे कि हे क्षत्रीय (खतिय) वैदिक होते काय? उत्तर आहे, नाही. औपनिषदिक परंपरा नंतर दुषित केली गेली असली तरी स्पष्ट दिसते कि ती वैदिक तत्वज्ञानाच्या अत्यंत विरोधात आहे. महावीर-बौद्धाला तर "व्रात्य क्षत्रीय" म्हणण्यात येते. व्रात्य हे वैदिक नव्हेत. व्रात्यांना वैदिक धर्मात घेण्याची सोय होती व त्यासाठी व्रात्यस्तोम नांवाचा विधी होता. समान भाषांत अनेक संज्ञा समान वाटतात पण अर्थ वेगळे असतात. उदा. ब्रह्म या शब्दाचा ऋग्वैदिक अर्थ मंत्र असा होतो तर उपनिषदातील अर्थ सृष्टीचे मुलकारण असा होतो.
वेद हा शब्दही तसाच आहे. वेद म्हणजे ज्ञान अथवा दिसलेले. जेथे रिक, साम, अथर्व वा यजुस हे जोडशब्द नाहीत तेथे वेद म्हणजे हेच चार वेद असा अर्थ घेण्याचे मुळात कारण नाही. परंतू नंतर वेद शब्दाचा अर्थ म्हणजे हेच चार वेद (अथवा अन्य उपवेद) असा घेतला गेल्याने वेद शब्दाचा अर्थ मर्यादित तर झालाच पण वेदस्तोमही त्यामुळेच प्रचंड वाढले. हे स्तोम तर वाढलेच पण पुराणकथा व रामायण-महाभारत काव्यांतील प्रचंड घालघुसडीमुळे क्षत्रीय स्तोमही वाढले...पण वैदिक धर्मानुसार क्षत्रीय उरलेलेच नव्हते!
ही विसंगती फारशी लक्षात घेतली गेली नाही. मी वर दिलेले टिळकांचे अवतरण स्वयंस्पष्ट आहे. टिळकांना त्यांचा धर्म समजत नव्हता असे कोणी म्हणू शकत नाही. वैदिक धर्म संकुचित होत जात विराट हिंदू समाजच त्यांनी परभारेच आयता रक्षणकर्ता बनवल्यानंतर त्यांना क्षत्रीय वर्णाची गरजच नव्हती. हिंदूंना वैदिक कर्मकांडांची गरज नसल्याने त्यांनीही वैदिकांशी सख्य ठेवले असले तरी त्या धर्माचा भाग होण्याचे नाकारले.
सनपुर्व दहावे शतक ते सनपुर्व सहावे शतक या काळात कुरु-पांचाल व मगध या प्रांतात वैदिक धर्माला चांगला जम बसवता आला हे खरे आहे. शिशुनाग वंशानंतर मात्र वैदिक धर्माला मगधात हादरे बसू लागले. गौतम बुद्ध आणि महावीर मगधातुनच वैदिक धर्माला विरोध करायला पुढे आले कारण हा धर्म त्याच भागात प्रबळ होता. अन्यत्र त्याचे अस्तित्वही नव्हते त्यामुळे त्याला विरोधाचे कारणही नव्हते. बुद्धोत्तर काळ ते गुप्तकाळ या प्रदिर्घ काळात हा धर्म एक सामान्य पंथ बनून उरला होता व आपला प्रभाव अन्यत्र पसरवण्याच्या कशाबशा प्रयत्नांत होता. हा प्रवास कसा झाला तेही आपण क्रमाने पाहुच. पण याच काळात क्षत्रियत्वाला डच्चू मिळाला तसाच वैश्यांनाही (ते मुळात वैदिक धर्मात किती होते?)
असे असुनही क्षत्रियत्वाचे गारूड वेदांप्रमाणेच जनसामान्यावर बसत गेले हेही तेवढेच खरे आहे. वेदांत जसे वर्णीय तथ्य नाही, वर्णांत जसे तथ्य नाही तसेच क्षत्रीयत्वाच्या मोहातही तथ्य नाही हे आजही लोकांच्या लक्षात आलेले नाही. वेदमान्यतेच्या नांवाखाली वेदांतच नसलेल्या असंक्भ्य बाबी समाज आंधळेपणाने स्विकारत गेला. हिंदुंना वेद वाचंणे अथवा ऐकने यावर बंधन का होते हे समजून घ्यायला हवे. पहिले कारण म्हणजे ते वैदिक धर्मियच नसल्याने त्यांना तो अधिकार नव्हता. आणि समजा वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म मानले व त्यांना वेदाभ्यासाचा अधिकार असतात तर वेदांज्ञांतील थोतांड हिंदुंनी कधीच ओळखले असते व तेंव्हाच वेद नाकारले असते!
क्षत्रियत्वाचे थोतांडही असेच आहे. मुळात हा वर्ण नव्हता व नाही ही पहिली बाब. हा वर्ण कोणी नष्ट केला ही भ्रमकथा आहे कारण तो मुळात अस्तित्वातच नव्हता ही दुसरी बाब. क्षत्रियत्व हे खेतियत्वाशी, म्हणजे शेतीशी व अर्धवेळ युद्धव्यावसायिकांशी संबंधीत होते व आहे. भारतीय कृषीव्यवस्थेच्या अत्यंत यशस्वी पायाभरणीनंतर बहुसंख्य राज्ये व गणराज्ये ही ज्याची शेती मोठी त्याच्याशी निगडित असत. याचा वैदिक वर्नव्यवस्थेशी काडीमात्रही संबंध नाही. हा वर्ण नाही किंवा जातही नाही. त्यामुळे क्षत्रियत्वात आत्मगौरव शोधणारे स्वत:ची वंचना करून घेतात असेच म्हणने क्रमप्राप्त आहे!
(क्रमश:)