Saturday, December 17, 2016

अतिरेकी मक्तेदारी

अतिरेकी मक्तेदारीवादी भांडवलशहा हळू हळू सर्वच क्षेत्रांचे स्वामित्व घेत चालले आहेत. किंबहुना सरकारे व जनताही नियंत्रित करणे हाच त्यांचा अंतिम हेतू आहे. स्पर्धा संपवण्यासाठी ते आज ज्या गतीने कार्यरत आहे ती गती पाहता जगात मोजकेच उद्योगसमूह राहतील जे जगावरच नियंत्रण आणतील अशी चिन्हे दिसत आहेत. जागतीक शेतीही यातुन सुटणार नाही. राजकीय नेते हे फक्त त्यांचे छुपे प्रवक्ते बव्हंशी बनलेलेच आहेत व उद्या ती प्रक्रिया किती उघड होईल याची चुणुक भारतीय पंतप्रधानांनी दाखवलेली आहे. ट्रंपही त्याला अपवाद नाही. असे अनेक राष्ट्रप्रमूख आज आहेत. हा त्यांचा दोष नसून जी व्यवस्था विकराळ होत सर्व मुल्ये गिळंकृत करत चालली आहे त्या व्यवस्थेचा आहे व याचे जन्मदाते मक्तेदारीयुक्त सम्राट होण्याच्या आकांक्षेने झपाटलेले उद्योगसमूह आहेत. नेता कोणताही असो त्याला जनतेच्या नव्हे तर यांच्या तालावर नाचण्याशिवाय व त्यांचीच उद्दिष्टे साकार करण्याखेरीज पर्याय नाही. विचारधारांना येथे काहीएक अर्थ राहत नाही. मानवी स्वातंत्र्याचा संकोच अपरिहार्य आहे. मानवतावादी स्वतंत्रतावाद ऐकून घेण्याच्या स्थितीत नागरिकही नसावेत, सामाजिक लादलेल्या विपन्नतेचेही समर्थन करणारे लोक वाढावेत म्हणजे त्यांचे ब्रेन कंडिशनिंग करण्यात ते यशस्वी होत आहेत व त्यांची संख्या वाढतच जाईल अशी चिन्हे आहेत.


एक दिवस, सारे उद्योगसमूह एका छत्राखाली आणण्याच्या आकांक्षेने झपाटलेला कोणतेही मार्ग वापरून जागतिक सत्तेचे नियंत्रण करू शकतो. हे अशक्य नाही. अर्थकारण नियंत्रित केले की मनांवरचे नियंत्रणही सहज होते हे त्यांना पक्के माहित आहे. हा एका अर्थाने आर्थिक साम्राज्यवाद आहे व त्याला राजकारणी आडवे येऊ शकत नाहीत एवढे ते दुर्बल होत चालले आहेत. या आर्थिक हुकुमशाहीशी कसे लढायचे हा आमच्यासमोरचा प्रधान विषय राहिला पाहिजे!

अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!

पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत ...