Tuesday, June 28, 2011

भविष्य या देशाचे पुन्हा हेच घडवणार आहेत....!

धर्मशास्त्रे जो समाजेतिहास सांगतात तो प्रत्यक्ष मानवी समाजाच्या इतिहासाशी जुळत नाही, म्हणुन त्याला महत्व देण्याची मुळात गरज नाही वा त्यावरुन भांडण्यातही काही अर्थ नाही. आवश्यकता आहे ती कालसुसंगत नवनिर्मितीची आणि या सर्व निर्मानकर्त्या समाजघटकांमद्धे नवे आत्मभान आणुन नवा इतिहास घडवायची!

आपल्याला धर्मशास्त्रे सांगतात कि आधी ब्राह्मण, मग क्षत्रिय, मग वैश्य आणि शेवटी पायापासुन शुद्र जन्माला आले. ही एक धार्मिक भाकडकथा आहे हे उघड आहे. वास्तवात मनुष्य आधी अन्नसंकलक होता...मग तो शिकारी बनला. शिकारीसाठी लागणारी हत्यारे त्यानेच शोधली. त्याचे हजारो पुरावे आज भारतात मिळतात. नंतर पशुपालक समाज आणि मग क्रुषिवल समाज आस्तित्त्वात आला.

धर्माची निर्मिती ही एका विशिष्ट समाजघटकाने केलेली नाही. धर्म ही तत्कालीन मानवी समुहांची श्रद्धामय अभिव्यक्ती होती व त्यासाठीची प्रतिके त्यांनी निसर्गातुनच शोधली. प्रतिकसाम्यांतुन तत्कालीन प्रतिमा-पुजक लोक आस्तित्वात आले. त्यामुळे आद्य धर्माची निर्मिती ही सामुदायिक होती असेच म्हणावे लागते. त्यानंतर व्यक्तिपरणीत धर्म आस्तित्वात आले ते परंपरागत धर्मातील त्रुटी दुर करण्यासाठी. हे धम्म-प्रवर्तक ब्राह्मण नव्हते हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर हिंदू धर्मातील एकही अवतार (वामन अवतार वगळता कोणीही ब्राह्मण नाही...पण या अवताराबद्दल नंतर लिहितो.) त्यामुळे धर्मशास्त्रांतील समाजनिर्मितीचे सिद्धांत पुरेपूर गैरलागु ठरतात...खोटे सिद्ध होतात. त्या सिद्धांतांची निर्मिती प्रतिकात्मक म्हणुन पाहु शकतो वा धर्ममहत्ता ठसवण्यासाठी केली गेली असेही म्हणु शकतो. पण त्याबद्दलचा वाद हा गैरलागू आहे. आपला वेळ आणि प्रतिभा त्यासाठी किती वाया घालवायची हे आपल्यालाच ठरवावे लागणार आहे.

समाजेतिहास असे सांगतो कि राजसत्ता आणि धर्मसत्ता या आधी टोळीप्रमुखाच्या/ग्रामप्रमुखाच्या हाती असे. लढण्यायोग्य होते ते सारेच युद्धांत वा रक्षणात भाग घेत. तेच जीवनोपयोगी संसाधनांच्या शोधात असत व निर्मिती करत असत. पशुपालक माणसाच्या सोबत क्रुषीमानवही आला तो याच विराट समाजातुन. याच समुदायातुन आद्य धातुकर्मी...लोहार आले आणि काष्ठकर्मी सुतारही. कारण तत्कालीन गरजा...मग त्या शस्त्रांच्या असोत कि निवासाच्या...हेच घटक सांभालत होते. त्यासाठी त्यांना केवढी प्रतिभा पणाला लावावी लागली असेल याबद्दल मी नंतर लिहिणारच आहे...पण गरज जशी निर्माण होत गेली तसतसे एकेक तंत्रद्न्यान निर्माण होत गेले...त्यातील कुशल प्रतिभावंत मानवी समाजाला पुढे नेण्यात अग्रसर होत गेले.

स्त्रीया यात मागे नव्हत्या. जिला हा धर्म सरसकट शुद्राचा दर्जा देतो तो इतिहास पाहता निव्वळ अधमपणाच आहे. आध्य शेतीची जनक आहे ती स्त्री. कोणत्या वनस्पती खाद्य...कोनत्या अखाद्य आणि त्या खाद्य असल्या तरी कोणत्या पद्धतीने कराव्यात याचे शास्त्र स्त्रीया विकसीत करत गेल्या. त्यांची विद्न्यान/प्रयोगशीलतेचे आज सारी मानवजात फायदे घेत आहे हे विसरता येत नाही. आद्य मानवाने स्त्रीला आदिशक्तीच्या रुपात का पाहिले हे यावरुन लक्षात यावे...पण आज आपण क्रुतघ्न आहोत आणि याची शरम क्वचितच दिसते.

येथे एवढेच स्पष्ट करायचे होते कि धर्म जो मानवेतिहास सांगतात तो खरा नाही. तसे पुरावेही नाहीत. पण त्याचा गेली काही हजार वर्षे सावकाश पगडा बसत गेल्यामुळे जे आद्य होते ते शेवटचे आहेत आणि जे सर्वात शेवटी त्याच समाजातुन धार्मिक गरजांसाठी निवडले गेले म्हणुन आले ते मात्र आद्य असा भ्रम निर्माण होत गेला. ज्यांनी त्यांना धर्मकार्यासाठी म्हणुन आपल्यातुनच निवडले होते ते कालौघात समाजाशी उपक्रुत भावना न ठेवता स्वयंघोषित श्रेष्ठत्व मिरवु लागले. पण असे घडायला असंख्य कारणेही आपल्याच समाजेतिहासात/आर्थिक इतिहासात दडलेली आहेत. त्यावरही आपल्याला निरपेक्ष चर्चा करायची आहे.

मानवेतिहासात प्राचीन काळी सुरक्षा, विकास, प्रयोग...संशोधन आणि त्यांचा विकासासाठी उपयोग करुन घेत मानवी जीवन सुसह्य बनवणे असाच होता. धर्म ही प्रत्यक्ष जीवनातील एक मानसीक गरज होती, तिला तसे ऐहिक मुल्यच नव्हते. आजही या मुलभुत तत्वद्न्यानात बदल झालेला नाही...पण या देशातील मुळ निर्मानकर्ते मात्र संशोधन-विकासापासुन मागे हतत गेले हेही एक वास्तव आहे. नवे जग घडवण्याची, तेवढ्याच तोडीची अत्याधुनिक जीवनसाधने शोधण्याची त्यांच्यात क्षमता होती...पण ती मध्ययुगापासुन कोंडीत पकडली गेली. आकांक्षांनी फुलून जाण्याऐवजी ते क्रमशा: हतबल होत गेले...

आजच्या जगात या निर्मानकर्त्यांची ससेहोलपट होते आहे. जे लोक प्रसंगी राजांना कर्ज देत ते आज जगण्याच्या वाटा शोधण्याच्या प्रयत्नांत हताश होत आहेत.

मनावर एक राख जमा झालीय...हवीय एक जोरदार वावटळ....भविष्य या देशाचे पुन्हा हेच घडवणार आहेत....!

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...